Friday 9 September 2011

पर्यावरण मुक्त गणपती (Eco friendly Ganpati)



 
 
 
मुलांचे पाय जमीनीवर रहावेत असे तुम्हाला वात असेल तर त्यांच्या खांद्यावर काही जबाबदारी द्या.  ~अबिगेल व्हॅन ब्राउन

गणपती आले की मला माझ्या लहानपणीच्या लहानशा खामगावातील सण आवतो. खामगाव हे विदर्भातील अगदी छोेसे गाव आहे. तेव्हा आकर्षक रोषणाई किंवा मोमो्या मूर्ती किंवा मंडप असे काहीही नसायचे तरीही त्याचा दिमाख काही औरच असायचा. तेव्हा गणेशोत्सव खऱ्या अर्थाने सामूहिक सोहळा असायचा. ऑर्केस््राचे आयोजन व्हायचे किंवा प्रसिद्ध हिंदी चित्रप दाखवले जायचे आणि गल्लीतल्या मुलांच्या गँगची नाकं व्हायची, वकृत्व स्पर्धा वगैरेसारखे विवध कार्यक्रम आयोजित केले जायचे आणि ते बघायला आणि मुलांचं कौतुक करायला परिसरातली सगळी मोी मंडळी जमायची! हा सण तरुणांसाी त्यांच्यातले विविध गुण आणि कौशल्ये दाखवण्यासाी एक उत्तम व्यासपी होते आणि त्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास वाढायचा जी त्यांची महत्वाची संपत्ती होती. मी स्वतःदेखील मिश्र श्रोत्यांसमोर विविध विषयांवर भाषणे द्यायला तिथेच सुरुवात केली, तेव्हा बक्षिसाची रक्कम असायची अवघे पाच रुपये. याचा मला आज विविध लोकांसमोर सादरीकरण देतांना अतिशय फायदा होतो. मनाच्या एका कोपऱ्यात व्यासपीावरील त्या सादरीकरणांना अतिशय आदराचे स्थान आहे कारण त्याचमुळे माझ्यासारख्या एका खेडेगावातील मुलाचा आत्मविश्वास वाढला, कारण पुण्यासारख्या शहरात आल्यानंतर माझ्याकडे तेवढे एकच कौशल्य होते! माझ्यासाी गणशेउत्सवाचा हाच अर्थ आहे!

आज २०११ मध्ये मात्र परिस्थिती बरीच बदलली आहे, मात्र गणशोत्सवाचे दिवस बहुधा पुण्यातील सर्वोत्तम दिवस असतात, कारण इथे दिवाळीपेक्षाही या सणाचा उत्साह अधिक मोा असतो! पावसाळा संपत आलाय आणि पुढे येणाऱ्या सणांची चाहूल लागल्याने शहराला एक नवचैतन्य लाभले आहे ते नव्या वर्षाच्या स्वागतापर्यंत कायम राहणार आहे! सणांच्या बदलत्या स्वरुपाबद्दलही बरीच चर्चा होते, त्यामध्ये सादर होणारे कार्यक्रम आणि त्यांचे बजे अतिशय मोे झाले आहे. आता एखाद्या मंडळामध्ये केवळ गल्ली-परिसरातील मुलांचाच नाही तर सेलिब्रिीज आणि मो्या बॅनरचाही यामध्ये समावेश होतो. आता गणपती मंडळांचा उल्लेख त्यांच्या आरासीमुळे होते त्यांच्या कार्यक्रमांमुळे किंवा त्यातील सहभागामुळे नाही. केवळ विसर्जन मिरवणुकीकडे पाहिल्यावरही काय दिसते? मोठमोठे स्पिकर्स, बेधुंद होऊन नाचणारे मंडळांचे सदस्य, उधळला जाणारा प्रचंड गुलाल आणि मूर्ती नेणाऱ्या वाहनावर केली जाणारी प्रचंड रोषणाई! आता याला कुल्या प्रकारे इकोफ्रेंडली (पर्यावरणास पूरक) म्हणायचं असा प्रश्न मला पडतो! काही मंडळे याला अपवाद असतील मात्र सर्वसाधारणपणे केवळ पुण्यातच नाही तर बहुतेक सर्वच शहरांमध्ये असेच चित्र आहे. सामान्य माणूसही या सार्वजनिक उत्सवापासून दूर होत आहे केवळ विविध मंडळांना भे देऊन आरास पाहणे एवढ्यापुरताच त्याचा सहभाग राहिला आहे. आता ते समाजातील सर्व स्तरातील लोकांनी एकत्र येऊन काही सादर करण्याचे आणि प्रत्येकाला आपले कौशल्य दाखवता येईल असे व्यासपी राहिले नाही. गेल्या काही वर्षात गणेशोत्सव आला की तो इकोफ्रेंडली पद्धतीने साजरा करण्याची आवाहने केली जातात, तसे लेख लिहीले जातात! इकोफ्रेंडली गणेश मंडळांसाी स्पर्धाही आयोजित केल्या जातात. ही काळाची गरज आहे यात शंकाच नाही पण आपण योग्यपणे यातील व्यवहार्यतेचा विचार करतो का, किंवा इतर गोष्ींप्रमाणेच यालाही इक्रोफ्रेंडली असे लेबल लावण्याचे हे एक फॅड आहे?

गणेशउत्सव हे लोकांना पर्यावरणाच्या विविध पैलूंबद्दल जागरुक करण्यासाी कदाचित सर्वोत्तम व्यासपी आहे. इकोफ्रेंडली गणपती म्हणजे मो स्पिकर्स न वापरुन केवळ आवाज कमी करणे, नदीचे प्रदूषण कमी करणे, निर्माल्य नदीत विसर्जित न करणे, गुलाल न उधळणे, किंवा केवळ प्लॅस्र ऑफ पॅरिस किंवा थर्मोकॉल ाळणे एवढाच होत नाही. तर या व्यासपीाचा पर्यावरणाच्या रक्षणासाी सर्वाधिक वापर करणे असा होतो. आपण नुकसान कमी करण्याबद्दल विचार करत आहोत पण पर्यावरण रक्षणाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाी, लोकापर्यंत पोहोचण्याची या उत्सवाची क्षमता आपण विसरलो आहोत.

प्रत्येक जण आपल्या मंडपामध्ये आणि आजूबाजूला जैवविविधतेचे रक्षण करण्याविषयी भित्तीपत्र/फलक लावू शकतो. केवळ डीजे किंवा ऑर्केस््रासारख्या पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याऐवजी आपण पर्यावरणविषयक कार्यक्रमांचे आयोजन करु शकतो. मंडपांमध्ये कर्कश गाणी वाजवण्याऐवजी आपण दहा दिवस मंडपाला भे देणाऱ्यांना पर्यावरणाचे भान राखण्याविषयीची पत्रके वाू शकतो, अशा अनेक पद्धतींनी आपण या कामामध्ये थोडासा हातभार लावू शकतो. अशा अनेक समाजसेवी संस्था तसेच इतरही संस्था आहेत ज्या समाजासाी अनेक चांगली कामे करतात, मात्र सर्वसामान्य लोकांना त्याबद्दल फारशी माहिती नसते. या उत्सवाच्या व्यासपीाचा उपयोग करुन आपण त्याविषयी लोकांना माहिती देऊ शकतो. अगदी वार्षिक अहवालात सेलिब्रिीजची छायाचित्रे छापण्याऐवजी, अशा संस्थांचे काम छापले किंवा पावतीच्या मागे अशा संस्थांची माहिती दिली तरीही बरेच काम होईल. परिसरातल्या सर्पमित्रांच्या नावासारखी साधी माहितीही तुम्ही छापू शकता, कारण बऱ्याच जणांना घरात साप दिसला तर काय करायचे आणि कुणाला बोलवायचे याची माहिती नसते. बऱ्याच वेळेला मला मित्रांचा फोन येतो की त्यांना त्यांच्या परसदारी एक जखमी पक्षी सापडला आहे आणि त्याला वाचवण्यासाी काय करायचे? त्यानंतर मी त्यांना कात्रज सर्पोद्यानाचा क्रमांक देतो आणि मग हालचाली सुरु होतात. शहरातील सुरक्षित जीवन जगताना आपण निसर्गापासून दूर जात आहोत आणि निसर्गाशी पुन्हा मैत्री करण्याचा संदेश देण्यासाी हा उत्सव अतिशय चांगले साधन होऊ शकतो.

गणपती मंडळे निसर्ग आणि जैवविविधता या विषयाशी संबंधित वत्कृत्व ते चित्रकला अशा विविध स्पर्धांचे आयोजन करु शकतात आणि त्यामध्ये अधिकाधिक शाळा/कॉलेजच्या विद्यार्थ्यांना समाविष् करुन घेण्याचा प्रयत्न करु शकतात. स्पर्धेमधील चित्रे मंडपाच्या आजूबाजूला लावली जाऊ शकतात ज्यामुळे भे देणाऱ्यांमध्ये जागरुकता वाढेल आणि ती चित्रे काढणाऱ्या कलाकारांनाही चांगला वाव मिळेल. त्याचप्रमाणे शहरातील रस्त्यांचे खड्डे तसेच कमी होत चाललेली हिरवळ अशा विविध समस्या याविषयावरील छायाचित्र स्पर्धाही आपण आयोजित करु शकतो.

आपल्याला आपले पूर्वीचे दिवस पुनरुज्जीवित करुन त्यामध्ये सर्वसामान्य जनतेचा सहभाग वाढवला पाहिजे, समाजाच्या सर्व स्तरातील घकांना समाविष् करुन खऱ्या अर्थाने हा सामाजिक सोहळा बनवला पाहिजे. कारण इकोफ्रेंडलीचा खरा अर्थ काय आहे? ती एक जीवनशैली आहे, ज्यामध्ये समाजातील सर्व घक सोहळ्याचा आनंद शांततेने उपभोगू शकतात आणि हा दृष्ीकोन केवळ दहा दिवसांसाठी नाही तर वर्षभर स्वीकारला पाहिजे! गणेश उत्सवातून आपल्याला असा अनुभव मिळाला तरच तो खऱ्या अर्थाने इकोफ्रेंडली होईल! शहाण्या माणसाने म्हल्याप्रमाणे आपण स्वतःला याविषयी जागरुक केले तरच पुढची पिढी याविषयी अधिक जबाबदार होईल! आपण जेव्हा हे साध्य करु त्या दिवशी आपल्याला अतिशय अभिमान वाेल आणि आपण बाप्पाचे स्वागत करण्यासाी अधिक लायक रु!

संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

एन्व्हो_पॉवर समिती, सीआरईडीएआय, पुणे

संजीवनीची विचारणी जाणून घेण्यासाठी कृपया माझ्या ब्लॉगला भेट द्या!


संजीवनीची सामाजिक बाजू!


शहराविषयी तुमच्या काही तक्रारी असल्यास खालील लिंकवर लॉग करा


हिरवाईचा विचार करा, जीवनाचा विचार करा

No comments:

Post a Comment