Wednesday 28 October 2015

लढा रिअल ईस्टेटचा का बिल्डरांचा ?



















काही वेळा एखाद्या चांगल्या कामासाठी आपल्याला चुकीच्या गोष्टी कराव्या लागतात”…  चाणक्य

 आपल्या पुराणातील किंवा इतिहासातील या अत्यंत महान बुद्धिमान व्यक्तिमत्वाची वेगळी ओळख करुन द्यायची गरज नाही, तो काय आणि का एखादी गोष्टकरत होता याची त्याला सदैव जाणीव होती, त्याच्या विचारांमध्ये एवढी सुस्पष्टता होती, की हजारो वर्षानंतरही चाणक्याचे विचार लागू पडतील! मी त्याचे अवतरण निवडले कारण सर्व बांधकाम व्यावसायिकांची शिखर संस्था असलेल्या क्रेडाईनं अलिकडेच रिअल इस्टेट क्षेत्रातील भ्रष्टाचार व लाल फितीच्या कारभाराला वाचा फोडण्यासाठी एक मोर्चा काढला होता. देशाच्या सर्व प्रमुख शहरांमधील,रिअल इस्टेट उद्योगातील एवढे बांधकाम व्यावसायिक,पहिल्यांदाच त्यांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांसह रस्त्यावर उतरले. रिअल इस्टेट उद्योगाच्या मनामध्ये यंत्रणेतील भ्रष्टाचार व प्रकल्पाच्या प्रस्तावांना मंज देण्यास होणाऱ्या उशीराबद्दल तसेच बदलत्या धोरणांबद्दल प्रचंड चीड, नैराश्य व राग खदखदत होता,मात्र बहुतेक वेळा वैयक्तिक पातळीवर त्याला तोंड दिले जायचे किंवा फार फारतर सहाकाऱ्यांशी गप्पा मारताना त्यावर चर्चा व्हायची. इथे अनेक जणांना हा विनोद वाटेल की यंत्रणेला भ्रष्ट करण्यामध्ये स्वतः बांधकाम व्यावसायिकांचाच हात असताना; ते स्वतःच्याच कामावर कसे वैतागू शकतात! नेमका याच मुद्द्यावर आजचा लेख आहे, सामान्य माणसाच्या नजरेत बांधकाम व्यावसायिक, राजकीय नेते, सरकारी कर्मचारी हे एकाच माळेचे मणी असतात व त्यांच्यामुळे घरांच्या किमती आवाक्याबाहेर जातात. मात्र जसा काळ बदलतोय तशी रिअल इस्टेट उद्योगातली समिकरणंही बदलताहेत. अशा परिस्थितीत, रिअल इस्टेटविषयी नियमितपणे लेखन करणारे ब्लॉगर रवी करंदीकर यांनी मोर्चाचे चित्रिकरण करायचे ठरवले तसेच भ्रष्ट यंत्रणेविरुद्ध लढा देण्यासाठी सामान्य माणसांनी बांधकाम व्यावसायिकांना पाठिंबा देण्याविषयी मत जाणून घेण्यासाठी माझी मुलाखत घेतली. या मुलाखतीची लिंक त्याने फेसबुकवर दिली. माझ्या अपेक्षेप्रमाणे ही मुलाखत वाचून लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया आल्या; तिथे जुंपलेली शाब्दिक लढाई इथे देत आहे, कारण तिथे जो काही संवाद झाला त्यासाठी लढाई हाच शब्द योग्य ठरेल व त्यानंतर आपण यंत्रणेविरुद्ध लढा देण्याच्या विविध पैलुंविषयी चर्चा करु शकतो! कृपया नोंद घ्या की या टिप्पणी फेसबुकच्या पोस्टवरुन कॉपी केल्या आहेत, मी ज्या व्यक्तिंनी मते व्यक्त केली आहेत त्यांची नावे तशीच ठेवली आहेत मात्र गोपनीयता कायम ठेवण्यासाठी त्यांचे वैयक्तिक तपशील तसेच शाब्दिक आरोप काढून टाकले आहेत. शेवटी आपल्याला या विषयाचे विश्लेषण करण्यात रस आहे कुणीही व्यक्ती किंवा एखाद्या संघटनेला दोष देण्यात नाही! त्याचशिवाय भाषा आहे तशीच ठेवण्यात आली आहे कारण ती फेसबुकची शैली आहे त्यामुळे व्याकरण व शुद्धलेखनाच्या चुका माफ करा, चला तर मग

सलील देसाई: बांधकाम व्यावसायिक ग्राहकांची लुबाडणूक थांबवतील का? ते अप्रामाणिकपणा थांबवतील का व न्याय्यपणे वागण्याचे आश्वासन देतील का? ते त्यांच्या आश्वासनांचे पालन करतील का? अशा प्रकारची आवाहने करण्यापूर्वी, बांधकाम व्यावसायिकांनी अशा प्रकारची आवाहने करण्यापूर्वी घराच्या ग्राहकांना त्यांच्याविषयी काय वाटते ही वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे.
प्रदीप सीके: मला असं वाटतं ज्या दिवशी बांधकाम व्यावसायिक रोख मागणे/स्वीकारणे थांबवतील त्या दिवशी या आवाहनाला अधिक विश्वासार्हता येईल स्माईल इमोटीकॉन
स्वप्निल वाघ हा हा.. काय विनोद आहे
मधुकर कुलकर्णी:उत्पादक, ग्राहक/बाजारातील प्रतिनिधी बांधकाम उद्योगातील भ्रष्टाचार नियंत्रित करण्यासाठी एकत्र येऊ शकतात याचे मला आश्चर्य वाटते. कृपया याविषयी बोला किंवा स्पष्टीकरण द्या. व्यावसायिकपणे 
मधुकर कुलकर्णी:  या उद्योगातील भ्रष्ट लोक कोण आहेत?
अनिरुद्ध झंवरसर्वप्रथम बिल्डरांनी  संपूर्ण यंत्रणा भ्रष्ट केली व त्यानंतर ग्राहकांना शक्य त्या सर्व मार्गांनी लुटले व आता बाजारात मंदी आल्यामुळे व त्यांच्या मुलांना उत्पादन विकता येत नसल्यामुळे ते ग्राहकांनाही त्यांच्यात सामील व्हायला सांगत आहेत... त्यांना लाज वाटत नाही का?

येझदी मोतीवाला:  आदरणीय श्री डीएसके तुमच्या बांधकाम व्यावसायिकांच्या लॉबीमध्ये अजूनही हिटलरशाही का सुरु आहे असा माझा तुम्हाला प्रश्न आहे मला एकाच बांधकाम व्यावसायिकाकडे सदनिकेची दुसऱ्यांदा विक्री करताना एनओसी का मिळत नाही आधी त्यांनी मला आणखी संदेश पाठवले तर तुम्हाला तुमची सदनिकाही मिळणार नाही असे धमकी देणारे मेसेज पाठवून माघार घ्यायला लावली. मी जेव्हा माझ्या सदनिका क्रमांक ७ च्या 'स्पष्ट मालकी अधिकाराची, पाण्यासारख्या मूलभूत सुविधांची मागणी केली तेव्हा मला हा अनुभव आला. आपल्या देशात ही बडी धेंडे एकजुटीने उभी आहेत जय हिंद
संजय देशपांडे: मित्रांनो मी संजय देशपांडे मी अभियंता आहे व मला बांधकाम व्यावसायिक असल्याचा अभिमान आहे, बांधकाम व्यावसायिक होण्यात काही चुकीचे आहे असे मला वाटत नाही! मी तुमच्या भावना समजू शकतो व मात्र यासाठी यंत्रणा अधिक दोषी आहे कारण ती लोकांना भ्रष्ट मार्ग निवडायला भाग पाडते!! एखाद्याला द्यायची घ्यायची गरज का पडते हा प्रश्न आहे मला असे वाटते कोणती बाजू अधिक चुकीची आहे हे महत्वाचे नाही तर म्हणूनच आजूबाजूचे सर्व चांगले लोक कमी होण्यापूर्वी त्याचे प्रमाण कमी होणे आवश्यक आहे!! कृपया चित्रफीत पाहा व मी त्यामध्ये मी बांधकाम व्यावसायिक अगदी धुतल्या तांदळासारखे असतात असे म्हटलेले नाही; किंबहुना या लढ्याला पाठिंबा देऊन तुम्ही बांधकाम व्यावसायिकांना आधी स्वतःचे घर स्वच्छ करायला सांगू शकता कारण जर एखादा बांधकाम व्यावसायिक त्याच्या ग्राहकांना योग्य वागणूक देत नसेल तर त्याला भ्रष्टाचार थांबवायचा कोणताही नैतिक अधिकार नसेल एवढेच मी म्हटले आहे! जसे चांगले बांधकाम व्यावसायिक आहेत तसेच वाईट बांधकाम व्यावसायिकही आहेत; एका ग्राहकाला चांगला बांधकाम व्यावसायिक निवडण्याचे स्वातंत्र्य असते त्याचप्रमाणे ते वाईट बांधकाम व्यावसायिकापुढे काहीवेळा माघार घेतात व काही वेळा चांगल्या बांधकाम व्यावसायिकांनाही भ्रष्टाचाराला शरण जावे लागते व म्हणूनच त्यांनी या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे! कारण शेवटी ग्राहकालाच त्याचा घाम गाळून मिळवलेला पैसा बांधकाम व्यावसायिकाला द्यायचा असतो जो अप्रत्यक्षपणे भ्रष्ट लोकांच्या खिशात जातो, अशा दृष्टिकोनातून विचार करा एवढेच माझे म्हणणे आहे! मित्रांनो एखादी चांगली व्यक्ती वाईट प्रवृत्तीविरुद्ध लढा देत असेल व ती केवळ वाईट लोकांच्या समूहात आहे म्हणून लढ्याचा हेतू बदलत नाही; आता आपण नेमके कशासाठी लढायचे हे आपल्यावर आहे एवढेच मला सांगावेसे वाटते!

अनिरुद्ध झंवर:  संजय देशपांडे सर, सर मी तुमच्या मताचा व चांगल्या हेतूचा आदर करतो... मात्र बांधकाम व्यावसायिक ज्याप्रकारे ग्राहकांचे शोषण करतात.... त्यांच्या कष्टाच्या पैशांशी खेळतात... ते अत्यंत दुर्दैवी आहे.. डोक्यावर छप्पर असावं यासाठी ग्राहकाला व त्याच्या संपूर्ण कुटुंबाला किती त्याग करावा लागतो हे तुम्हाला माहिती नाही..वर्षानुवर्षे.. तुम्ही व तुमच्या यंत्रणेने त्यांच्या कचाट्यात पकडून असाहाय्य केले आहे.. तुमचे (व्यक्तिशः घेऊ नका तुम्ही म्हणजे बांधकाम व्यावसायिकांची लॉबी) साटेलोटे आहे व या सर्व खेळाचा तुम्हीही तितकाच भाग आहात....मला पक्की खात्री आहे की निदर्शनामध्ये सहभागी झालेल्या ९९% बांधकाम व्यावसायिकांना मृताविषयी यत्किंचितही आदर नसेल केवळ स्वतःची पोळी भाजण्यासाठीच ते आले आहेत.. मला माफ करा मात्र मला प्रामाणिकपणे असे वाटते की कुणीही बांधकाम व्यावसायिकांच्या लॉबीवर विश्वास ठेवू शकत नाही व ठेवणार नाही. तुम्ही एक व्यक्ती म्हणून चांगले असाल मात्र तुम्हीही सुपर बिल्ट अप किंवा इतर काही बाही नावाखाली, किंवा पार्किंगसाठी लुबाडलेल्या ग्राहकांचा विचार करा..तुम्ही स्थापत्य अभियंता असल्यामुळे तुम्हाला कायद्याची व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची पूर्णपणे माहिती असेल की तुम्हाला त्यासाठी एक रुपयाही आकारता येणार नाही..नाही का?यंत्रणेत बदल करण्यापूर्वी आधी तुम्ही स्वतःत बदल करा.. यंत्रणा काळाच्या ओघात आपोआप बदलेलच.. तुम्हाला जो बदल पाहायचा आहे तो स्वतःत घडवून आणा!!

संजय देशपांडे:  मला मान्य आहे अनिरुद्ध व मी केलेल्या आवाहनावर ज्या लोकांनी आपली मते व्यक्त केली आहेत त्यांचा राग मी समजू शकतो; मला फक्त एवढंच सांगावसं वाटतं की या उद्योगात अजूनही काही चांगले लोक आहेत व ते टिकावेत व आणखी चांगले लोक या उद्योगात यावेत असं वाटत असेल तर आपण या यंत्रणेविरुद्ध एकत्रितपणे लढायला हवं, व या प्रक्रियेमध्ये वाईट बांधकाम व्यावसायिकांना एकतर सुधारावे लागेल किंवा उद्योगातून बाहेर पडावे लागेल.... हेच आपले उद्दिष्ट आहे! ग्राहकांनी वाईट बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पांवर बहिष्कार टाकल्यावर ते आपोआपच उद्योगातून बाहेर पडतील!! याचसाठी लढा दिला जातोय!!
 अनिरुद्ध झंवर : संजय देशपांडे सर, मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे
चंद्रकुमार गुप्ता:  हे म्हणजे गरिबी दूर करण्यासाठी घोड्याला आणि गवताला हातमिळवणी करण्यास सांगण्यासारखं झालं..... : विंक इमोटीकॉन

वैभव.एन.लोढा.: मला श्री देशपांडे यांनी उपस्थित केलेला मुद्दा पटतो ..
की अनेक ग्राहक त्यांचे संपूर्ण आयुष्य ज्या घरात घालवतात त्याच्या निर्मात्याची आठवण काढत नाहीत ..

चेतन लिगाडे : कारण हे बांधकाम व्यावसायिक नमुन्यासाठी काही चांगल्या सदनिका दाखवतात मात्र प्रत्यक्षात ते अतिशय निकृष्ट दर्जाच्या सदनिका बांधतात त्यामुळे लोक या सदनिकांच्या निर्मात्यांची आठवण काढत नाहीत.....
 चेतन लिगाडे : या निर्लज्ज बांधकाम व्यावसायिकांविषयी मला अजिबात सहानुभूती वाटत नाही....
 वैभव एन लोढा:  तरीही ग्राहक त्यांचे संपूर्ण आयुष्य अशा स्वस्त सदनिकांमध्ये घालवतात.. अशी फसवणूक स्वीकारणाऱ्या ग्राहकांचं देव भलं करो ..
येझदी मोतीवाला:  आदरणीय श्री डीएसके कृपया माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या तुमच्या बांधकाम व्यावसायिकांच्या लॉबीमध्ये अजूनही हिटलरशाही का आहे, मला एकाच बांधकाम व्यावसायिकाच्या माझ्या सदनिकेच्या दुसऱ्या विक्रीसाठी एनओसी का दिले जात नाही आधी त्यांनी मला पुढील एसएमएसद्वारे बाहेर पडण्यास भाग पाडले "मला आणखी संदेश पाठवले तर...
संजय देशपांडे:  धन्यवाद वैभव मला असे वाटते तू खरोखरच चित्रफित पूर्ण पाहिली आहेस! मित्रांनो मी संजय देशपांडे आहे मी अभियंता आहे मला बांधकाम व्यावसायिक असण्याचा अभिमान आहे व मला बांधकाम व्यावसायिक होणे काही गैर नाही असे वाटते! तुम्ही जे मत व्यक्त केले आहे व हाव मी समजू शकतो मात्र यंत्रणा अधिक दोषी आहे व ती लोकांना भ्रष्ट मार्गाला लावते!! कुणालाही देण्या घेण्याची गरज का पडते हा प्रश्न आहे, व कोणती बाजू अधिक चुकीची आहे हा मुद्दा नाही तर त्याचा परिणाम चुकीचा होतो व त्यामुळे आजूबाजूचे सगळे चांगले लोक संपण्याआधी ते कमी करणे आवश्यक आहे!! कृपया चित्रफित पाहा व मी त्यामध्ये मी बांधकाम व्यावसायिक अगदी धुतल्या तांदळासारखे असतात असे म्हटलेले नाही; किंबहुना या लढ्याला पाठिंबा देऊन तुम्ही बांधकाम व्यावसायिकांना आधी स्वतःचे घर स्वच्छ करायला सांगू शकता कारण जर एखादा बांधकाम व्यावसायिक त्याच्या ग्राहकांना योग्य वागणूक देत नसेल तर त्याला भ्रष्टाचार थांबवायचा कोणताही नैतिक अधिकार नसेल एवढेच मी म्हटले आहे!

चंद्रकुमार गुप्ता:  वैभव एन लोढा पूर्ण पैसे देऊन आपल्याकडे घरात नाही तर सदनिकेत राहण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो 
संजय देशपांडे: चंद्रा अशा बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध तुमची बाजू भक्कम असेल तर तुम्ही ग्राहक न्यायालयासारख्या प्राधिकरणांकडे गेले पाहिले!
संग्राम माळी:   राजकारण्यांच्याच भ्रष्ट भावंडांना पाठिंबा देऊ शकच नाही..भारतामध्ये सामान्य माणसाला जे परिणाम भोगावे लागतात तसेच त्यांनाही भोगावे लागू देत..जे ग्राहक समाजाला योगदान देण्यासाठी दुसऱ्या शहरातून येतात त्यांना त्यांनी काही दया दाखवली का...?..त्यांनी घर वेळेत द्यायचे, सर्व मूलभूत सोयी द्यायचे लेखी आश्वासन दिले का, ते बांधकाम साहित्याच्या दर्जाविषयी आश्वासन देतात का...त्यांच्यापैकी बहुतेक भ्रष्ट, असंवेदनशील, लोभी आहेत ....
 मेहेरनोश मिस्त्री:  माझीही हीच तक्रार आहे! या माणसांना घर विकताना असं वाटतं की आपणच देव आहोत. मात्र अगदी मूलभूत सोयी द्यायची वेळ येते, तेव्हा मात्र ते माघार घेतात....?
 मेहरनोश मिस्त्री:  माझ्या आजी आजोबांनी मला जे हात तुम्हाला भरवतात त्यांना चावू नये असं शिकवलं. मात्र बांधकाम व्यावसायिकांना असे करताना कोणतीही खंत किंवा नैतिकता नसते! मला अजून तरी प्रामाणिक बांधकाम व्यावसायिक भेटायचा आहे...ज्याच्यावर मी विश्वास ठेवू शकतो!
 संजय देशपांडे: नमस्कार मेहरनोश, तुमच्या आजोबांनी जे काही सांगितलं त्याविषयी मला कौतुक व आदर वाटतो; मी सर्वोत्तम आहे असा मी दावा करत नाही मात्र मी ग्राहकांशी प्रामाणिक राहायचा प्रश्न केला आहे, म्हणूनच माझ्या ग्राहकांना कोणत्याही माध्यमावर तोंड देण्याची माझ्यात हिंमत आहे व माझ्यासारखीही माणसं आहेत एवढेच मला सांगावसं वाटतं! किंबहुना माझे ग्राहक हेच माझे सर्वोत्तम मित्र आहे मला असं वाटतं यातूनच सर्व काही समजू शकतं! मला मान्य आहे की रिअल इस्टेटमध्ये अनेकांना वाईट अनुभव आले आहेत व ग्राहकांना त्याचा त्रास झाला आहे मात्र मला पुन्हा एकदा सांगावेसे वाटते की याच वेळी तुम्ही समीकरण सुधारु शकता!
 येझदी मोतीवाला:  मेहनो मिस्त्री अगदी खरंय एक दुसऱ्यापेक्षा अधिक हुशार असतो हाहाहाहाहाहाहाहाहाहहाहाहाहाहाहा जय हिंद
 चंद्र कुमार गुप्ता : नो उल्लू बनायिंग.......अनुवाद पाहा
 संजय देशपांडे:  मित्रांनो मी संजय देशपांडे व मी अभियंता आहे तसंच मला बांधकाम व्यावसायिक असल्याचा अभिमान आहे कारण बांधकाम व्यावसायिक असणं काही चुकीचं नाही असं मला वाटतं! तुम्ही व्यक्त केलेली मते व हाव मी समजू शकतो मात्र यंत्रणा अधिक दोषी आहे ज्यामुळे लोक भ्रष्टाचार करतात!! कुणालाही देण्या घेण्याची गरज का पडावी हा प्रश्न आहे व मला असे वाटते कोणती बाजू अधिक चुकीची आहे यापेक्षाही त्याचा परिणाम वाईट आहे त्यामुळे आजूबाजूची सर्व चांगली माणसे कमी होण्यापूर्वी तो कमी झाला पाहिजे!! कृपया चित्रफित पाहा व बांधकाम व्यावसायिक काही धुतल्या तांदळासारखे असतात असं काही मी म्हटलं नाही; किंबहुना या लढ्यात सहभागी होऊन तुम्ही बांधकाम व्यावसायिकांना आधी त्यांचे स्वतःचे घर स्वच्छ करायला सांगू शकता कारण कोणत्याही बांधकाम व्यावसायिकाला भ्रष्टाचार रोखण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही जर तो त्याच्या ग्राहकांना चांगली वागणूक देत नसेल एवढेच मी म्हटले आहे!

चंद्र कुमार गुप्ता : ग्राहक म्हणून आम्ही ९९.९९९९९९% बांधकाम व्यावसायिकांवर विश्वास ठेवत नाही. आधी तुम्ही एकतर्फी करार तयार करता व ग्राहकाने सांगितलेला एकही मुद्दा त्यामध्ये घालायला तयार नसता. माझी सदनिका मला केव्हा मिळेल याची काहीही खात्री नसते मात्र तुम्ही बांधकाम व्यावसायिक करारामध्ये कलम घालता की अगदी बँकेने कर्जाचे पैसे उशीरा पैसे दिले तरीही १२% दंड आकारला जाईल. तुम्ही सुपर सुपर सुपर बिल्ड अप सारखी शुल्के आकारता मात्र आम्हाला ग्राहकांना दिलेल्या पैशाच्या तुलनेत अगदी लहानशी सदनिका मिळते. बांधकामाचा दर्जा वाईट असतो व इतरही कितीतरी कारणे असतात.....
 संजय देशपांडे: मला एक गोष्ट समजत नाही ग्राहकाला बांधकाम व्यावसायिकाच्या अटी मंजूर नसतील किंवा त्या पारदर्शक नसतील तर तो सदनिका का आरक्षित करतो? नंतर तक्रार करण्यात काय अर्थ आहे? मला माझ्या योजनेला पीएमसीकडून मंजुरी घेण्यासाठी किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडून एनओसी घेण्यासाठी त्यांच्यापुढी लोटांगण घालण्याशिवाय दुसरा काही पर्याय नसतो, मात्र ग्राहकांना एवढे पर्याय उपलब्ध असताना जो बांधकाम व्यावसायिक चुकीच्या पद्धतींचे पालन करतो त्याच्याकडे घर का आरक्षित करतात? माझ्यासारख्या प्रत्येक गोष्ट योग्य पद्धतीने करणाऱ्या व शक्य तितके पारदर्शक राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या माझ्यासारख्या लोकांवर हा अन्याय नाही का? सर्व संवाद वाचावासा वाटला!
 प्रभाकर पाठक:  मी संजय पाठक आहे
 मेहेरनोश मिस्त्री:  बांधकाम व्यावसायिक ग्राहकांना लुबाडतात! हे सुपर बिल्ट अप व ४०% लाभ रक्कम हे काय आहे!! तुम्ही केवळ १००० चौ. फू. खरेदी करता व वापरता अशा वेळी १४०० चौ. फू.साठी का पैसे द्यायचे?? आता सरकारी अधिकारी बांधकाम व्यावसायिकांची लुबाडणूक करतात, तेव्हा ते मोर्चामध्ये येतात???
अखिल अग्रवाल: अगदी बरोबर बांधकाम व्यावसायिक ग्राहकांनाच लुटतात
मेहरनोश मिस्त्री: भारतामध्ये, ते सदनिका विकतात!!! जगाच्या इतर भागात, ते घरे विकतात!!!!!! हाच मुख्य फरक आहे मित्रांनो!
अरविंद कौशल:  बांधकाम व्यावसायिक कुणावरही मेहरबानी करत नाहीत, ते सदनिका मोफत देत नाहीत. बांधकाम व्यावसायिक स्वतःला राजा समजतात, बांधकाम व्यावसायिकांनी सदनिकेच्या ग्राहकाचे त्याची सदनिका खरेदी करण्यासाठी आभार मानले पाहिजेत व एलजी किंवा इतर कोणत्याही व्यावसायिक कंपनीप्रमाणे लगेच सापडलेले दोष दूर करावेत.
 येझदी मोतीवाला:  सगळे पांढरपेशा शार्क आहेत जय हिंद
 येझदी मोतीवाला: प्रिय श्री. संजय तुम्ही मला तुमच्या प्रकल्पामध्ये स्पष्ट मालकी हक्क असलेली पिण्यायोग्य पाण्यासारख्या मूलभूत सोयी सुविधा असलेली सदनिका देऊ शकता का आभारी
लाईक · रिप्लाय · १ मिनिट
आदित्य लांजेवार: बांधकाम व्यावसायिकांपैकी कुणीही दर महिन्याला विक्रीयोग्य भागावर देखभाल शुल्क का आकारतात हे स्पष्ट करु शकेल का? ग्राहकाचे चटई क्षेत्र कुणीही स्वच्छ करत नसले किंवा त्याची देखभाल करत नसले तरीही? एवढी साधी नैतिकता नसतानाही तुम्ही रस्त्यावर उतरता व सामान्य माणसाने तुम्हाला पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा करता?
 आदित्य लांजेवार:  माझा प्रश्न अतिशय सोपा आहे व तरीही अनुत्तरित आहे स्माईल इमोटीकॉन
 अखिल अग्रवाल:  मोफाच्या कलम ६ नुसार तुमच्या बजेटनुसार देखभालखर्च असला पाहिजे, चटई क्षेत्र किंवा बांधकाम क्षेत्रावर आधारित असायला नको.. मला असे वाटते सोयीसाठी तो ग्राहकांना विक्री मूल्याच्या आधारे आकारला जातो.. सर्व रकमांची नोंद ठेवली पाहिजे व खर्चाचे लेखापरीक्षण करणे बंधनकारक आहे
आदित्य लांजेवार : अखिल सोय कुणाची?
अखिल अग्रवाल:  सगळ्यांची सोय विशेषतः जेव्हा सामाईक संस्था स्थापन केली जाते तेव्हा देखभाल खर्च आकारण्यासाठी काहीतरी आधार असला पाहिजे तुम्ही तो चटई क्षेत्रावर आकारला तर तो प्रति चौरस फूट जास्त होईल व त्याला विरोध होऊ शकतो

आदित्य लांजेवार:  चटईक्षेत्राच्या आधारे आकारल्याने अधिक महाग पडेल की विक्री मूल्यावर आकारल्याने अधिक महाग पडेल?
 अखिल अग्रवाल:  अर्थातच प्रति चौरस फूटने जास्त महाग पडेल. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे विक्री दर किंवा चटई क्षेत्राने फरक पडत नाही.. देखभाल रक्कम ही ठेवीसारखी असते जिचा जमाखर्च ठेवावा लागतो त्यावर नफा किंवा तोटा होऊ नये, जर अतिरिक्त रक्कम असेल तर पुढील वर्षांच्या रकमेत व्यवस्थित करुन घ्यावी
 संजय देशपांडे : आदित्य मला एक गोष्ट कळली नाही, ग्राहकाला एखाद्या बांधकाम व्यावसायिकाच्या अटी आवडल्या नाही किंवा त्या पारदर्शक नसल्या तरी तो सदनिका का आरक्षित करतो? नंतर तक्रार करुन काय उपयोग आहे? बांधकाम व्यावसायिक म्हणून मला पीएमसीकडून माझ्या योजना मंजूर करुन घेण्यासाठी पीएमसीकडे जाण्यावाचून किंवा एनओसीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे जाण्यावाचून पर्याय नाही, म्हणून मला त्यांच्यापुढे शरणागती पत्करावी लागते मात्र ग्राहकांसाठी इतके पर्याय उपलब्ध असतानाला चुकीच्या पद्धती अवलंबणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांकडे ते घर का आरक्षित करतात? माझ्यासारख्या सरळमार्गी व शक्य तितक्या पारदर्शकपणे काम करणाऱ्या लोकांवर हा अन्याय नाही का? मला सर्व संवाद वाचावासा वाटला!
 आदित्य लांजेवार:  मला ऐकून आनंद वाटला, तुम्ही एखादी १ बीएचके योजना सुरु करणार आहात का... मला तुमच्याकडे घर करायला आवडेल ...
 रवी करंदीकर: आदित्य लांजेवार, नेहमी लक्षात ठेवा रिअल इस्टेट हा गुन्हेगारी उद्योग आहे. ताबा मिळण्याच्या वेळी देखभाल खर्च ही अक्षरशः लूट असते. बांधकाम व्यावसायिकाकडून पैशांची अफरातफर ही अगदी सामान्य बाब आहे.
 संजय देशपांडे:  प्रिय आदित्य आमच्या संकेतस्थळाला भेट दे www.sanjeevanideve.com
मेहरनोश मिस्त्री:  मी आता भारताबाहेर खरेदी करण्याचा विचार करतोय! मी ज्या दलाल व एजंटना भेटलो त्यांनी नेहमी त्याचा घर असाच उल्लेख केला! अपार्टमेंटना काँडोज म्हणतात जे तुम्ही फक्त कपडे घेऊन जायचे बाकीचे सर्व आधीच बसविलेले असते!! "बांधकाम व्यावसायिक" तुम्हाला फक्त एकदाच देखभाल खर्च आकारतो, जो घराच्या खर्चातच समाविष्ट असतो! तो दर महिन्याला प्रति चौरस फुटानुसार द्यावा लागत नाही!!! कारचे पार्किंग मोफत दिले जाते! कार पार्किंसाठी ब्लॅक किंवा रोख रक्कम द्यावी लागत नाही!!
मेहेरनोश मिस्त्री:  आता बदलाची वेळ आली आहे व आरबीआय गव्हर्नर व अर्थमंत्री जेटली यांचे आभार, ही महामार्गावरील लूट आता लवकरच संपेल!! सामान्य चाकरमान्याला आजकालच्या आकाशाला भिडणाऱ्या किंमती परवडतील का? घर ही गरज आहे, चैन नाही!!!
अखिल अग्रवाल:  मान्य आहे की सरकारने किमती कमी करण्यासाठी काहीतरी केले पाहिजे 
संजय देशपांडे:  मित्रांनो मी संजय देशपांडे, मी अभियंता आहे व मला बांधकाम व्यावसायिक असल्याचा अभिमान आहे व मला बांधकाम व्यावसायिक असणे काही गैर वाटत नाही! मी तुमच्या भावना व लोभ समजू शकतो ही यंत्रणाच अधिक दोषी आहे जो लोकांना भ्रष्टाचाराचा आधार घ्यायला लावते!! कुणालाही द्यायची किंवा घ्यायची गरज का पडते हा प्रश्न आहे कोण किती चुकीचे आहे हा प्रश्न नाही तर त्याचा परिणाम चुकीचा होतो यामुळे आजूबाजूची सर्व चांगली माणसे नाहीशी होण्यापूर्वी तो कमी केला पाहिजे!! कृपया चित्रफित पाहा व बांधकाम व्यावसायिक धुतल्या तांदळासारखे असतात असे मी काही म्हटलेले नाही; किंबहुना या लढ्यात सहभागी होईन तुम्ही बांधकाम व्यावसायिकांनी स्वतःचे घर स्वच्छ करावे असे सांगू शकाल कारण कोणत्याही बांधकाम व्यावसायिकाला जर तो त्याच्या ग्राहकांना चांगल्या प्रकारे वागवत नसेल तर भ्रष्टाचार थांबविण्याचा अधिकार नाही एवढेच मी म्हटले आहे! चांगले बांधकाम व्यावसायिकही असतात व वाईट बांधकाम व्यावसायिकही असतात; ग्राहकांना चांगले बांधकाम व्यावसायिक निवडण्याचे स्वातंत्र्य असते मात्र त्याच वेळी चांगल्या बांधकाम व्यावसायिकांना भ्रष्टाचाराला शरण जावे लागते व म्हणूनच ते त्यांच्या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन करत आहेत! शेवटी सदनिका धारकालाच बांधकाम व्यावसायिकाला रोख रक्कम द्यावी लागते, या दृष्टिकोनातून विचार करा एवढेच माझे म्हणणे आहे! मित्रांनो एखादी चांगली व्यक्तिही वाईटाविरुद्ध लढा देत असेल व ती वाईट लोकांच्या गटात असेल तर त्यामुळे लढ्याचा उद्देश बदलत नाही; आपण कशासाठी लढायचे हे आपल्यावर आहे एवढेच मला सांगायचे होते!
 संजय देशपांडे:  रवीदा माझा दृष्टिकोन स्वीकारल्याबद्दल मी तुमचा अतिशय आभारी आहे व अशाप्रकारे माझी चित्रिफित देऊन तुम्हाला भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्यात सहभागी झाला आहात!
 सायली फडणीस गडकरी:  अगदी बरोबर बोलतात काका स्माईल इमोटीकॉन

ओजस जोशी : जे लोक फसवणूक झाल्याची तक्रार करताहेत ते चुकीच्या बांधकाम व्यावसायिकाकडून खरेदी करताहेतप्रत्येक उद्योगाच चांगली व वाईट माणसे असतातच. त्याचप्रमाणे काही ग्राहकही वाईट असतात असे मी म्हणू शकतो. ते वेळेत पैसे देत नाहीत व त्यामुळे आर्थिक नियोजन पूर्णपणे बिघडतेम्हणूनच मुद्दा हा की योग्य बांधकाम व्यावसायिकाकडून खरेदी करा. मी अभिमानाने सांगू शकतो की आमच्या कंपनीने आपल्या जवळपास ७०० ग्राहकांना कधीही दुखावले नाही व मी अशाच प्रकारे व्यवसाय करणाऱ्या आणखी ५० बांधकाम व्यावसायिकांची नावे सांगू शकतो.
 संजय देशपांडे:  चंद्रा मी सहमत आहे व तुमच्या बांधकाम व्यावसायिकाला हे सर्व प्रश्न विचारण्याची सर्वोत्तम वेळ आहे! एखादा बांधकाम व्यावसायिक यंत्रणेला काळा पैसा देत असेल तर ग्राहक त्याला पैसे का देतोय? जो बांधकाम व्यावसायिक रोख रक्कम मागतो व तुमच्याशी पारदर्शक नाही त्याच्याकडे सदनिका आरक्षित करु नका; एवढे साधे उत्तर आहे!
 संजय देशपांडे:  चंदा मी समजू शकतो मात्र अशा सर्व ग्राहकांसाठी ही सर्व बांधकाम व्यावसायिकांना विचारायची योग्य वेळ आहे की ते त्यांच्या ग्राहकांना सर्वप्रथम चांगल्या सेवेची कशी खात्री देणार आहेत? तुम्हाला असे वाटत नाही का?

नितीन गोखले:  ..किमती वाढण्यामागे भ्रष्टाचार हे कारण आहे यात शंका नाही व सर्व बांधकाम व्यावसायिक सारखे नसतात. दुर्दैवाने, त्यापैकी काही टिकतही नाहीत, कारण त्यांनी राजकारण्यांशी संगनमत केले नाहीकेवळ बांधकाम व्यावसायिकच हे थांबवू शकतात, मात्र कसे? कदाचित, इतर कुठला व्यवसाय सुरु करुन, कारण सरकारी यंत्रणा लाच मिळाल्याशिवाय तुमची फाईल पुढे सरकवणार नाहीजलसिंचन विभागाच्या मालकीची अनेक एकर जमीन आता पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकांच्या मालकीची आहेशहरातील काही कनिष्ठ अभियंत्यांच्या घरात ठिकठिकाणी इतका पैसा दडून ठेवला आहे की ते लोकांना त्यांच्या घरीही येऊ देत नाहीत. अगदी त्यांच्या नोकरांनाही ठराविक खोल्यांमध्ये जायची परवानगी नसते! या लोकांनी पैसे कसे कमावले? राजकीय लागेबांधे असलेल्या बांधकाम व्यावसायिकांडून, आणखी कोण.

फोर्ब्ज भारताला भ्रष्टाचारात पहिल्या दहा देशांमध्ये मानत नाही, मात्र मला ते चुकीचे वाटतात. आपण सर्वांनी फोर्ब्जच्या संपादकांना पत्रे लिहीली पाहिजेत व त्यांनी त्यांचे पत्रकार पुण्याला पाठवून भ्रष्टाचाराची व्याख्या समजावून घेतली पाहिजे.
संजय देशपांडे:  प्रिय नितीन नेहमी चांगली आणि वाईट अशा दोन्ही प्रकारची माणसे असतात, ग्राहकाकडे नेहमी त्याला हवा तो पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य असते, एवढेच मी म्हणेन! यंत्रणा अशी असावी की जी लोकांना भ्रष्टाचार करण्याची संधीच देणार नाही यातच प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे, कृपया माझा ब्लॉग वाच!
संजय देशपांडे:  प्रिय येझदी, मी दोन अगदी मूलभूत गोष्टी पाळतो, मी जोपर्यंत एनए मंजूरी मिळेपर्यंत सदनिकांचे आरक्षण सुरु करत नाही व जोपर्यंत मला अधिकाऱ्यांकडून प्रकल्प पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मिळाशिवाय मी ताबा देत नाही! माझ्या कोणत्याही ग्राहकाला विचारा त्यांना कधीही माझ्याकडे मालकी हक्काची कोणतीही समस्या आली नाही!
 संजय देशपांडे:  तुम्ही रवी करंदीकर सरांकडून खात्री करुन घेऊ शकता
 शशी कामटे:  संजय, बांधकाम व्यावसायिकाने कधी सदनिका विकणे अपेक्षित आहे? एनए परवानी मिळाल्यानंतर, योजना मंजूर झाल्यानंतर, बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर?
संजय देशपांडे:   शशी, अतिशय चांगला प्रश्न आहे! मला असे वाटते सर्व ग्राहकांनी सदनिका आरक्षित करण्यापूर्वी हा प्रश्न विचारला! एक बांधकाम व्यावसायिक सक्षम प्राधिकरणाकडून सर्व मंजूरी मिळाल्यानंतर काम सुरु  करण्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच आरक्षण घेऊ शकतो! अनेक परिस्थितींमध्ये एनए सशर्त असते मात्र ते असावे असा सल्ला आहे!
गौतम आदमाने: सौ चुहे खाकर बिल्ली चली हज को....अशी अवस्था झाली आहे क्रेडई सदस्यांची

केदार प्रकाश वनजपे:  दुर्दैवाने यालोकांना पकण्यासाठी कायदे बदलले जात नाहीत तर शेवटी त्याचा ग्राहकावर परिणाम होतो!! व्हॅट, सेवा कर; आयबीटी, मेट्रो कर! हे शेवटी कोण भरणार आहे?? सर्व काही ग्राहकाच्या खात्यावर घातले जाते बांधकाम व्यावसायिकाच्या खात्यावर नाही!! पुन्हा जी काही रक्कम भरली जाते...
 रवी करंदीकर: याचा त्रास कोण भोगतंय? मालमत्ता खरेदी करणारे भोगताहेत! केदार याकडे लक्ष दे!
 निलेश धमाल:  बांधकाम व्यावसायिक भ्रष्टाचाराविरुद्ध मोर्चात सहभागी झाले असले तरीही त्यांना बांधकामातून प्रचंड पैसा मिळतोग्राहकांचे काय. ते सदनिकेमध्ये त्यांची आयुष्यभराची कमाई गुंतवत असतात व तरीही अनेक बांधकाम व्यावसायिक त्यांना त्यांच्या मूलभूत सुविधाही देत नाहीत........

असे असूनही सदनिका धारक गप्पा आहेत........ का?????????
 येझदी मोतीवाला:  प्रिय नागरिकांनो मी येझदी मोतीवाला मी तुम्हाला एक सत्य घटना (तथ्ये) सांगू इच्छितो, माझ्या नागरिक बंधुंच्या हितासाठी मला हे सांगावेसे वाटते कारण मला बांधकाम व्यावसायिकांमुळे खूप त्रास झाला आहे व मला माझ्या बंधुंना अशा प्रकारचा त्रास होऊ नये असे मला वाटते...
 अतुल ठक्कर:  आता ए. राजा, लालू प्रसाद असे इतरही भ्रष्टाचाराविरुद्ध मोर्चा काढतील अशी अपेक्षा आहे.

हे बरं आहे. अशा प्रकारच्या मोर्चामुळे भ्रष्ट लोकांना ते निर्दोष असल्याचा निर्वाळा मिळेल.
 अतुल ठक्कर:  क्रेडईमध्ये त्यांच्या सदस्यांना त्यांच्या प्रकल्पांमध्ये काळा पैसा रोखण्यास सांगायची धमक आहे का?
 भाऊसाहेब तपकीर:  हे सगळं यांनीच सुरु केलं आहे त्यांनी आधीच जर पैसे चारले नसते तर आज अशी परिस्थिती झाली नसती
केवळ सीबीआयच नाही, तर ईडीने प्रत्येक बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयावर छापा घातला पाहिजे म्हणजे कोणत्या राजकारण्याने कोणत्या प्रकल्पामध्ये गुंतवणूक केली आहे व कुणी शेतजमीन बिगर शेत जमीनीत रुपांतरित केली आहे व त्यासाठी किती किंमत मोजली आहे
चेतन लिगाडे:   ही बांधकाम व्यावसायिकांची लॉबी आजारी मनोवृत्तीची आहे........ ते सध्या स्वतःच्या कर्मची फळे भोगत आहेत....
 यशोधरा भालेरा:  टीएमसी कर्जतचा बांधकाम व्यावसायिक/विकासक या निदर्शांमध्ये सहभागी झाला होता का...?हा ढोंगीपणाचा कळस आहे
चंद्र कुमार गुप्ता:  ते स्वतःच केलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध निदर्शने करताहेत का..... ?
 अतुल ठक्कर: संजय नमस्कार.. सूरजविषयी ऐकून वाईट वाटले. मृताच्या आत्म्याला शांती मिळो. बांधकाम समुदायाला पाठिंबा देण्याचा हा चांगला प्रयत्न आहे. मी तुमचा दृष्टिकोन जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तो चांगला आहे व बांधकाम व्यावसायिकांची परिस्थिती दर्शवितो. मात्रा, बांधकाम समुदायाला या देशातील नागरिकांचा दृष्टिकोन समजतो का याविषयी मला शंका वाटते. तुम्हाला समजावून घ्यायचा प्रयत्न करायचा असेल तर, करा. . रिअल इस्टेट, विशेषतः व्यावसायिक व निवासी अगदी सहजपणे उपलब्ध आहे व माझ्या मते सध्या काळा पैसा खपविण्यासाठी हा एकमेव पर्याय आहे. बांधाकाम व्यावसायिकांचा समुदाय या कामाला पाठिंबा देत आहे. यामुळे सर्वात मोठे नुकसान भारतीय समाजाचे होत आहे. . बांधकाम व्यावसायिक समुदाय सध्या याच समुदायाने तयार केलेल्या परिस्थितीत अडकला आहे. त्यांनी कोणत्याही आधाराशिवाय जमीनीच्या किमती वाढविण्याचे हे दृष्ट चक्र सुरु केले आहे. आता तेच यात अडकले आहेत. . जे सरकारी अधिकारी बांधकाम व्यावसायिकांकडून लाच मागतात त्यांना त्यांच्याकडे देण्यासाठी भरपूर काळा पैसा आहे हे माहिती असते. व ते कोणतेही आढेवेढे न घेता ते पैसे देतील. याच कारणाने त्यांनी हा संघ तयार केला आहे. मी इथे कोणत्याही प्रकारे भ्रष्टाचाराला पाठिंबा देत नाही, मात्र बांधकाम व्यावसायिक त्यांच्याच कर्माची फळे भोगत आहेत एवढंच मला म्हणायचं आहे. त्यांनी प्रस्थापित कायद्यांना बगल देण्यासाठी अगदी लहान सहान गोष्टींसाठी अधिकाऱ्यांना लाच द्यायला सुरुवात केली आता त्या लहान लहान रकमाही प्रमाण झाल्या आहेत. . शेवटी, गेल्या १२-१५ वर्षात, या देशातल्या बांधकाम व्यावसायिकांनी त्यांची समाजित पत पूर्णपणे गमावली आहे. भारतीय समाज त्यांचा कधीच आदराने विचार करु शकणार नाहीत. प्रामाणिकपणे बोलायचं तर, आम्हाला पुढील व्यक्तिंविषयी कधीही सहानुभूती वाटणार नाही दहशतवादी, गुंड, बलात्कारी, राजकारणी (कोणत्याही पक्षाचे) व बांधकाम व्यावसायिक.
येझदी मोतीवाला:   एक जुनी इंग्रजी म्हण आहे की तुम्हाला घट्ट पादत्राणे चावू लागले की तुम्ही ओरडायला सुरुवात करता हाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहा. मात्र त्या बांधकाम व्यावसायिकांना माझ्यासारख्या सामान्य माणसाची वेदना व दुःख जाणवत नाही मला बांधकाम व्यावसायिकांनी फार त्रास दिला आहे अजूनही त्यांची हिटलरशाही सुरु आहे दुसऱ्यांदा विक्रीसाठी एनओसी देत नाहीत जय हिंद
संजय देशपांडे:  नमस्कार अतुल, तुमचे सर्व मुद्दे मान्य आहेत मात्र भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्याला पाठिंबा न दिल्याने समस्या सुटणार नाही! हा लढा तुम्ही ज्यांच्या उल्लेख केला आहे त्या बांधकाम व्यावसायिकांसाठी नाही, ज्या मूठभर लोकांना काही तरी चांगले करावेसे त्यांचा हा प्रयत्न आहे व अजूनही असे काही लोक आहेत! या लढ्यात सहभागी न झाल्याने रिअल इस्टेट उद्योगात उरलेली मूठभर चांगली माणसेही हा उद्योग सोडून जातील मग त्या ग्राहकांचं व रिअल इस्टेट उद्योगाचं देवच रक्षण करो!!

मंगेश भुसारी: सर्वप्रथम तुम्ही तुमच्या सदनिका/अपार्टमेंट किंवा इमारती पूर्ण नसताना अंशतः भोगवटा प्रमाणपत्राची परवानगी देण्यासारख्या सवलतींसाठी सरकारी कर्मचारी किंवा यंत्रणेला गळ का घालता. २रे म्हणजे तुम्ही देयकांमध्ये फसवणूक करता बांधकामाच्या आंतरराष्ट्रीय मानकांचे उल्लंघन करता हजारो इमारती अवैधपणे बांधलेल्या आहेत... तुमच्या बांधकाम उद्योगाने किंवा तुमच्या तथाकथित समुदायाने ही समस्या निर्माण केलेल्या अशा भ्रष्ट बांधकाम व्यावसायिकांवर कधी कारवाई केली आहे का.. आंबेगावमध्ये गेल्यावर्षी झालेली घटना आठवतेय का. बीआयए किंवा क्रेडेईने या हसणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध/गुठ्यांवर डोळा ठेवून असलेल्या मंत्र्यांविरुद्ध कधी कारवाई केली आहे का किंवा एखादा एफआयआर तरी दाखल केला आहे का... आता तुम्ही नागरिकांकडून पाठिंबा मागताय तुम्ही तर प्रशासनाची व्यवस्थाच तुमच्या फायद्यासाठी तुम्हाला हवी तशी करुन घेतली आहे.. श्री. मिस्त्री यांनी म्हटल्याप्रमाणे नागरीक आकाशाला भिडलेल्या दरांसाठी निदर्शने करतील. हा लढा कुणा व्यक्तीविरुद्ध नाही तर यंत्रणेविरुद्ध आहे. वर्षानुवर्षे बांधकाम/इमारत उद्योगाचा ज्या प्रकारे विकास झाला आहे व वाढ झाली आहे त्यांना आता त्याची झळ जाणवतेय, ती त्यांच्यापर्यंत पोहचती आहे.. तुमच्या सहकाऱ्यांना भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देण्यापासून रोखा..
 संजय देशपांडे:  प्रिय मंगेश पूर्वी काही चुकीचे झाले असेल व वर्तमानकाळातही झाले असेल मात्र याचा अर्थ असा नाही की आपणही त्याच मार्गाने जायला पाहिजे असे नाही! जे काही झाले त्याचे कुणीही समर्थन करत नाही तो केवळ यंत्रणेचा दोष होता, मात्र हाच तर्क ग्राहकांना लागू होते जे वाईट पार्श्वभूमी असलेल्या बांधकाम व्यावसायिकांकडे केवळ काही रुपये वाचविण्यासाठी सदनिका आरक्षित करतात! त्यामुळे पूर्वी कुणी चूक केली यावर चर्चा करण्याऐवजी आता एकत्रितपणे काय चांगले करता येईल यावर लक्ष केंद्रित करु! काय म्हणता?”…
वरील सगळा मजकुर हा फक्त संवादाचाच एक भाग आहे, एफबीवर ही शाब्दिक लढाई सुरुच राहील व मी केवळ काहीच प्रतिक्रिया दिल्या आहेत मात्र त्या जाणून घेणे अतिशय आवश्यक होते असे मला वाटले, ज्यामुळे आपल्याला बांधकाम व्यावसायिंकानी भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्याविषयी लोकांच्या काय भावना आहेत या आपल्याला समजावून घेता आल्या. या प्रतिक्रियांमधून आपल्याला सामान्य माणसाचा यंत्रणेविरुद्धचा नाही तर बांधकाम व्यावसायिकांविरुद्धचा राग दिसून येतो, या यंत्रणेविरुद्धच तथाकथित बांधकाम व्यावसायिकांची लॉबी लढा देणार आहे! बहुतेक सामान्य माणसे जी या ना त्या बांधकाम व्यावसायिकाची किंवा रिअल इस्टेटची ग्राहक आहेत ती त्यांना योग्य वागणूक न मिळण्यासाठी यंत्रणेला नाही तर बांधकाम व्यावसायिकांना दोष देतात, हे धोकादायक आहे! एक मजेशीर गोष्ट सांगतो व्यक्ती जी उत्पादने वापरते त्यांच्या ब्रँडशी अतिशय प्रामाणिक असते उदा. टोयोटा कार वापरणारी व्यक्ती दुसरीही टोयोटाच कार घेईल किंवा नाईके शूज वापरणारी व्यक्ती बहुतेक दुसरे नाईके शूजच वापरेल किंवा अगदी डीओ म्हणजे बॉडी फ्रेशनरच्या बाबतीत लोकांना विशिष्ट ब्रँड किंवा वासाची सवय होते व ती व्यक्ती जे उत्पादन वापरत आहे त्या ब्रँडविषयी तिला अभिमान असतो व त्याचे समर्थ करते! मात्र माणसाची मूलभूत गरज असलेल्या उत्पादनाविषयी म्हणजेच घराविषयी बोलायचे झाले अतिशय कमी लोक एकाच ब्रँडवर कायम राहतात मग त्यांनी जे घर विकत घेतले आहे त्याच्या निर्मात्याविषयी म्हणजेच बांधकाम व्यावसायिकाविषयी अभिमान वगैरे वाटणे तर दूरच! मला असे वाटते रिअल इस्टेटमधील लोकांनी या घटकाची दखल घेतली पाहिजे. ही भावनाच एफबीवरील संपूर्ण संवादातून दिसून येते व म्हणून मी हा लेख लिहीत आहे किंवा माझे विचार मांडत आहे!
मान्य आहे की काही बांधकाम व्यावसायिकही भ्रष्टाचार करत होते व तथाकथित यंत्रणेला त्यांच्या हव्यासापोटी स्वतःला हवे तसे वापरुन घेत होते मात्र हे काही फार काळ चालणार नाही कारण हेच सत्य आहे, तुम्ही जे झाड लावली आहेत त्याची फळे तुम्हाला चाखावी लागतील व भ्रष्टाचारही या नियमाला अपवाद नाही! जमीनींचे दर वाढायला सुरुवात होण्यापूर्वी व बांधकाम व्यावसायिक जे काही बांधत होते ते विकले जात होते तोपर्यंत सर्वकाही चांगले होते व कुणालाही भ्रष्टाचाराची किंवा त्याच्या परिणामांची काळजी नव्हती. मात्र काही वर्षांपूर्वी सगळीकडे असलेल्या मंदीचा फटका रिअल इस्टेट उद्योगालाही बसला व अचानक जमीनीचे दर स्थिरावले, विक्री कमी झाली व घरांची मागणी किंवा सदनिकांची विक्री थंडावली! मात्र तथाकथित यंत्रणा हा बदल स्वीकारायला तयार नव्हती, तिला पैशाची चटक लागली होती... ती पैसे मागतच राहिली आता बांधकाम व्यावसायिकांना तिच्या मागण्यांना तोंड द्यावे लागत आहे, या उद्योगात पैशाचा ओघ कमी झाला आहे, तर आता काय? याचा आणखी एक पैलू आहे, अनेक संघटनांमध्ये बांधकाम व्यावसायिकांची पुढची तरुण पिढीही व्यवसायात उतरली आहे, ही पिढी  सुशिक्षित आहे, तिला असा विश्वास वाटतो की पैसे कमावण्यासाठी केवळ लोकांना लुबाडणे हाच एक मार्ग नाही तर चांगले बांधकाम करुन, ग्राहकांना पारदर्शकपणे सेवा देऊन व आश्वासनांची पूर्तता करुनही पैसा तसेच नावही कमावता येईल! बांधकाम व्यावसायिकांच्या या पिढीलाही वर्षानुवर्षे चालत आलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध व फसवणुकीविरुद्ध चीड आहे, त्यांचा या यंत्रणेमध्ये अधिक कोंडमारा होतो व आपण रस्त्यावर जी निदर्शनं पाहिली ती काही चांगले बांधकाम व्यावसायिक तसंच तरुण पिढीची होती ज्यांना ही यंत्रणा स्वच्छ करायची आहे.
 इथे भ्रष्टाचार म्हणजे केवळ ज्यामध्ये सरकारी कर्मचारी व बांधकाम व्यावसायिक सहभागी असतात असे नाही तर अशी प्रत्येक कृती ज्यामुळे सामान्य माणूस किंवा रिअल इस्टेटमधील ग्राहक त्याच्या हक्कापासून वंचित राहतो! सर्वप्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की ही यंत्रणेविरुद्धची लढाई आहे जिला आपण रिअल इस्टेट म्हणतो व ती आतून किडीने पूर्णपणे पोखरली आहे. आज बांधकाम व्यावसायिक रस्त्यावर उतरले आहेत, हा लढा नेमका कशाविषयी आहे हे आपण लोकांना समजावून सांगितले नाही तर बांधकाम व्यवसायिक या लढ्यात एकटे पडतील व मग हा लढा यशस्वी होणार नाही. यासाठीच बांधकाम व्यावसायिकांनी आधी आपले आंगण स्वच्छ केले पाहिजे व ते अतिशय सोपे आहे. तुम्ही बहुतांश प्रतिक्रिया वाचल्या  तर त्यातून लक्षात येईल की लोकांचा राग प्रामुख्याने बांधकाम व्यावसायिक त्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत नाहीत म्हणून आहे. बांधकाम व्यावसायिकांनी ते पूर्ण करु शकतात अशीच आश्वासने द्यावीत, याबाबतीच सलमान खानच्या एका चित्रपटातला संवाद आठवतो, “एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो अपने आप की भी नहीं सुनता”, म्हणजे एकदा आश्वासन दिल्यानंतर काहीही झालं तरी ते पूर्ण करावे हीच ग्राहकांची बांधकाम व्यावसायिकांडून अपेक्षा असते! ग्राहकांची बांधकाम व्यावसायिकांकडून असलेली आणखी एक अपेक्षा म्हणजे पारदर्शकता म्हणजेच ज्याला मंजुरी मिळाली आहे त्याचीच विक्री करा, हे एवढे सोपे आहे. त्याचशिवाय जागेचे तपशील विशेषतः विक्रीयोग्य क्षेत्राचे तपशील व त्यानंतर सामाईक भागांसोबत सर्व वैशिष्ट्ये स्पष्टपणे नमूद करा. सदनिकेच्या कराराचा मसुदा हा अतिशय महत्वाचा घटक आहे व तो सामान्य माणसाला सहजपणे समजेल असा असला पाहिजे व बांधकाम व्यावसायिकाने तो एकतर्फी बनवू नये.
इथे ग्राहकांची जबाबदारीही तेवढीच महत्वाची आहे कारण ग्राहक जे दाखविण्यात आले आहे त्याबाबत समाधानी नसल्यास त्याला कुणीही बळजबरीने करारावर स्वाक्षरी करायला किंवा एखाद्या विशिष्ट बांधकाम व्यावसायिकाकडे सदनिका आरक्षित करायला सांगत नाही लावत नाही! दुर्दैवाने एफबीवरील वादविदात कुणाही ग्राहकाला माझ्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही की ते आता ज्या बांधकाम व्यावसायिकाची चूक दाखवताहेत त्याच्याकडेच सदनिका का आरक्षित केली! मला मान्य आहे की एकटा दुकटा ग्राहक बांधकाम व्यावसायिकांच्या फसवणुकीविरुद्ध अशी भूमिका घेऊ शकत नाही कारण तो म्हणतो की सदनिका आरक्षित करायची असेल तर करा नाहीतर चालते व्हा; मात्र अशा बांधकाम व्यावसायिकांकडे सदनिका न घेणेच योग्य होईल, कारण प्रत्येक ग्राहकाने असेल केले तरच आपली अशा शेफारलेल्या बांधकाम व्यावसायिकांपासून सुटका होईल! लक्षात ठेवा रिअल इस्टेट क्षेत्रातील भ्रष्टाचार किंवा वाईट पद्धतींविरुद्धचा लढा म्हणजे केवळ बांधकाम व्यावसायिक नावाच्या जमातीविरुद्धचा लढा नाही, तो संपूर्ण समाज, बांधकाम व्यावसायिक, ग्राहक व अगदी सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्धही आहे; आपण सर्वजण एकत्रितपणे हा लढा जिंकू शकतो. आपण जिंकलो तर या उद्योगामध्ये केवळ चांगले लोक राहतील व तेव्हाच प्रत्येक सामान्य माणसाचे घर घेण्याचे स्वप्न साकार होण्याची काही आशा आहे!


संजय देशपांडे

sms smd156812@gmail.com


संजीवनी डेव्हलपर्स

No comments:

Post a Comment