Wednesday 18 December 2019

सासवडचे गवती जंगल आणि लांडग्याचे दबलेले रुदन !



















झाड हे खरंतर एक सैनिक आहे आणि जंगल हे सैन्य या सैन्याविरुद्धच्या आपल्या सर्व लढायांमध्ये आपण पराभूत होवोत अशी आपण अपेक्षा व्यक्त करू!”… मेहमत मुरात इल्दान.

खरंतर मी कितीतरी वेळा मेहमत यांची अवतरणं माझ्या लेखांमध्ये उद्धृत केली आहेत. कमीत कमी शब्दात नेमका उपदेश करण्याचं त्यांचं सामर्थ्य मला नेहमी थक्क करून जातं, विशेषतः जेव्हा विषय निसर्ग हा असतो. आपल्या देशामध्ये हिवाळ्याचं आगमन झालंय, म्हणजे किमान कॅलेंडरवरचा महिना तरी तसं सांगतोय. मात्र उन्हाळ्याच्या सुरवातीला जेवढा उकाडा असतो तसाच आता जाणवतोय. माझ्या मनाला जंगलात जायची ओढ लागली होती. मी कान्हाच्या  जंगलात जाण्यासाठी तिकीटंही काढून ठेवली होती. मात्र कामाचा ताण असल्यामुळे जाणं रहित केलं. आपण कामाचा ताण विसरायचा कितीही प्रयत्न केला तरीही तो मात्र आपल्याला विसरत नाही. कान्हाला जातं आलं नाही तरीही मन काँक्रिटच्या जंगलापासून दूर जाण्याचा काहीतरी मार्ग शोधत होतं. मग मला जाणवलं, जंगलं म्हणजे केवळ व्याघ्र प्रकल्प नाही, पुण्याच्या भोवताली अशा कितीतरी लहान जंगलरूपी नैसर्गीक वसाहती आहेत, त्यातल्या काही ठिकाणी मी बरेच दिवसात गेलो नव्हतो, सासवडचा गवताळ भाग त्यापैकीच एकपुण्याच्या पूर्वेला साधारण 60 किलोमीटरवर असलेला हा भाग अनेक पक्षी, चिंकारा  भारतीय लांडग्यांसाठी उत्तम निवासस्थान आहे. दुर्दैवानं हे ठिकाण नेहमीप्रमाणे चुकीच्या कारणांमुळे (विकासाला पाठिंबा देणाऱ्या सर्व लोकांनी माफ करा) प्रकाशझोतात आलं आहे, इथे पुण्याचं नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे (प्रस्तावित आहे)होय, सासवडच्या भोवती असलेल्या या गवताळ भागावरच हे विमानतळ होणार आहे, अशा बातम्यांमुळे इथल्या जमीनींना सोन्याचे भाव आले आहेत, मात्र दुर्दैवानं माणसांना सोन्याचे भाव परवडू शकतात. मात्र जे चिंकारा, लांडगे इतरही अनेक प्रजाती इथे राहतात त्यांना मात्र आपल्या घराला मुकावं लागणार आहे.

माणसे विकासाच्या नावाखाली त्यांच्या वसाहतींच्या अगदी जवळ असलेले हरित पट्टे कसे धडाधड नष्ट करत आहेत, याचे सासवड येथे होऊ घातलेले विमानतळ हे उत्तम उदाहरण आहे. पुण्याच्या या पूर्वेकडील भागात अगदी दशभरपूर्वीपर्यंत शेतीचे सुंदर लांबच लांब पट्टे होते, लहान टेकड्या, खिंडी विस्तीर्ण गवताळ भाग होता. हा गवताळ भाग, त्यांच्या पार्श्वभूमीवरील टेकड्या त्यावरील झाडाझुडुपांमध्येच, भारतीय लांडग्यांचे वर्षानुवर्षे वास्तव्य राहिले आहेलांडगे किंवा कोणत्याही हिंस्र पशूंचे अस्तित्व म्हणजे इथे घोरपड, ससे, चिंकारा, गवताळ जमीनीवरील पक्षी इतरही बरेच जैव विविधतेचे खात्रीशीर अस्तित्वच आहे. कारण नैसर्गीक अन्नाची मुबलकता असेल तरच हिंस्र पशू जगू शकतात  येथे कोठल्याही शिकारी प्राण्याला हे अन्न काही ताटात वाढून मिळत नाही, हे लक्षात ठेवा. तरीही लांडगे (हो तसंच तरसंही) जगले कारण त्यांना गेल्या दशकापर्यंत थोडफार भक्ष्य मिळत होतं. तसंच मानवी हस्तक्षेप त्यासोबत येणाऱ्या वाईट गोष्टी नव्हत्या. आता बरेच जण प्रश्न विचारतील की माणसांनी काय वाईट केलं  आपली घरं बांधणं चूक आहे का. मानवी वसाहती उभारणं नक्कीच चूक नाही, मात्र आपण ज्याप्रकारे त्या उभारतो ते मात्र नक्कीच चुकीचे आहे. सासवड तिथल्या मानवी वसाहतींचे उदाहरण घ्या. जोपर्यंत इथे गावं शेती होती, तोपर्यंत लांडगे, चिंकारा, तरस टिकून होते. त्यांना शिकारीसाठी, लपण्यासाठी प्रजननासाठी एकांत होता. मात्र आता घरे बांधण्यासाठी शेतांचे भूखंड पाडुन त्याचे आराखडे तयार करण्यात आले आहेत. हा संपूर्ण प्रदेश कुक्कुटपालन उद्योगासारख्या कृषी संबंधित व्यवसायांसाठी अतिशय चांगला आहे. या वसाहतींमध्ये सगळीकडे आता अनेक कुक्कुटपालन केंद्रे सुरु झाली आहेत. गावांचे शहरीकरण होत आहे कुक्कुटपालन केंद्रातला कचरा म्हणजे मृत कोंबड्या (रोगट झालेल्या) पुरेशी काळजी घेता कुठेही टाकून दिल्या जातात, जे लांडग्यांचे खाद्य होत आहे. इथे केवळ लांडगे हेच हिंस्र पशू नाहीत, तर भटक्या कुत्र्यांची संख्या (आपल्याकडे त्यांची संख्या मोठी आहे) लांडग्यांपेक्षाही झपाट्यानं वाढतीय. ही कुत्रीसुद्धा या मृत कोंबड्यांवर जगतात. ती लांडग्यांना पळवून लावतात. इथे लांडग्यांऩा भटक्या कुत्र्यांपासून दोन प्रकारे धोका असतो, एक म्हणजे ते त्यांना अन्नापासून लांब ठेवतात दुसरे म्हणजे भांडणात ही कुत्री लांडग्यांवरही हल्ला करतात. या लांडग्यांसाठी श्वानदंश घातक ठरून, त्यांचा रेबीजमुळे मृत्यू होऊ शकतो. ही कुत्री चिंकारावरही हल्ला करतात त्यांना पळवून लावतात. त्याचशिवाय कुक्कुटपालन केंद्राभोवती इतस्ततः फेकून दिलेल्या मृत कोंबड्या  खाण्यामुळे सुद्धा  लांडग्यांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे त्यांचा मृत्यू होऊ शकतो किंवा ते नामशेष होऊ शकतात.

कुक्कुटपालन केंद्र हे केवळ एक कारण आहे, इतरही बरीच कारणे आहेत. लांडगा हा एकांतप्रिय प्राणी आहे विकासामुळे (म्हणजे वसाहतींमुळे) रस्ते, वाहने, लोक येतात. त्यांना घरे शेते हवी असतात, म्हणजेच यंत्रसामग्री जागा हवी असते. बिचारे लांडगे ते ज्यावर अवलंबून आहेत ती अन्नसाखळी त्यांच्यासमोर हतबल होते त्यांना कुरणे टेकड्यांमध्ये लांबवर कुठेतरी जाण्यावाचून गत्यंतर राहात नाही. ही कुरणे टेकड्यांवरही आता चहुबाजूंनी अतिक्रमण होतंय. आपले रस्ते इमारती बांधण्यासाठी दगड इतर साहित्य हवे म्हणून टेकड्या फोडल्या जात आहेत, त्यामुळे लांडग्यांचे घर त्यांच्यापासून हिरावते आहे. आपल्याकडच्या अत्याधुनिक साधनसामग्रीच्या मदतीनं आपण हे करत आहोत, जे लांडगे करू शकत नाहीत. परिणामी जेव्हा केवळ दशकभरापूर्वी लांडग्याचे मोठे कळप सासवडच्या बाह्य भागात आजूबाजूला दिवसा कोणत्याही वेळी भटकत असताना दिसतात. आता तुम्हाला एखादा लांडगा शोधण्यासाठीही कित्येक तास किंवा दिवसही घालवावे लागतात. चिंकारा शाकाहारी असल्यानं लांडग्यांपेक्षा त्यांची संख्या झपाट्यानं वाढते. त्यामुळे ते अजूनही दिसून येतात. मात्र त्यांचं खाद्यही दिवसेंदिवस कमी होत चाललं आहे. गवताळ भाग शेतीमध्ये रुपांतरित केले जात आहेत. या शेतांना कुंपणं घातलेली असतात त्यामुळे चिंकारांसाठी कमी जमीन उरते. चिंकारा लांडग्यांसारख्या मोठ्या प्राण्यांची ही परिस्थिती आहे, त्यामुळे कृदंत, गोह, ससे यासारख्या प्राण्यांवर परिणाम होणं अपरिहार्य आहे. या लहान प्राण्यांची शिकार आता केवळ लांडगे किंवा तरस करत नाहीत, तर भटकी कुत्री माणसेही त्यांची शिकार करतात, कारण ही काही व्याघ्र प्रकल्पासारखी संरक्षित जंगले नाहीत (किमान मला तरी तशा काहीही खुणा दिसल्या नाहीत). त्यामुळे इथे बेधडकपणे शिकार चालते. म्हणूनच या जमीनीचे खरे मालक असणाऱ्या हिंस्र श्वापदांना इथे पुरेसे अन्न मिळत नाही.

आणि माणसांच्या तावडीतून पक्षीही सुटलेले नाहीत. ससाणा गरुडासारखे शिकारी पक्षी उंच वेगाने उडू शकत असल्याने माणसांची शिकार झाले नाहीत मात्र त्यांना ते ज्या प्राण्यांची शिकार करतात तेच झपाट्याने नामशेष होऊ लागले आहेत त्यांचे घर असलेले मोठे वृक्षही धडाधड तोडले जात आहेत. इथल्या बहुतेक जमीनी खाजगी आहेत, नागरी नियोजन प्राधिकरण वगैरे नाही, त्यामुळे माणसे मनाला येईल तशी झाडे कापतात. त्यामुळे पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी जागा उरत नाही पुन्हा शेती किंवा इमारतींमुळे तितर, कवड्या वटवट्या, मुनिया किंवा लॅप-विंग्ज यासारख्या इतर शेकडो लहान पक्ष्यांची घरे नष्ट होतात. ते अन्नासाठी फार लांबवर उडू शकत नाहीत, तसंच आपण जमीनी खोदल्यामुळे, कीटकांची घरेही नष्ट झाल्याने त्यांना त्यांच्यासारखे अन्नही उपलब्ध होत नाही. विमानतळासाठी जमीन अधिग्रहण सुरु झालं नसताना ही परिस्थिती आहे विचार करा प्रत्यक्ष विमानतळ त्याच्याशी संबंधित काम सुरू झाल्यानंतर काय परिस्थिती असेल. आपण या सगळ्याला विकास म्हणजो आपल्या कामगिरीबाबत अभिमान बाळगतो. मात्र त्याचवेळी आपण केवळ काही प्राणी किंवा पक्षीच नाही तर शेकडो प्रजातींची वसाहतच कायमस्वरूपी नष्ट किंवा विस्थापित केलेली असते.

माझा काही विमानतळे, कुक्कुटपालन केंद्रे किंवा मानवी वसाहतींना विरोध नाही, मात्र माणसांच्या या नियोजनामध्ये काही वन्यजीव प्रेमी व्यक्तीचा (केवळ आयएफएसचा शिक्का आहे म्हणून कुणी वनाधिकारी नाही) समावेश करून घ्यायची वेळ आली आहेयासाठी केवळ बुद्धिनं विचार करून चालणार नाही तर लांडग्यांचे रुदन, चिंकारांचं हुंदडणं, ससाण्याच्या घिरट्या इतरही अशा अनेक गोष्टी आपल्या विकासाचा एक भाग होण्याची गरज मनातून जाणवली पाहिले. अशी कुणी व्यक्ती असेल तरच आपण या सर्व प्रजातींना जगवू शकू, विमानतळासोबतच त्यांनाही वाढवू शकू. नेहमीप्रमाणे विमानतळाची घोषणा झाल्यापासून, त्यासाठी जमीन अधिग्रहणाला विरोध करण्यासाठी निदर्शनं (अर्थातच माणसांची) सुरू आहेत. या निदर्शनांमागचा हेतू आपण सगळेच जाणतो, त्या जमीनींना जास्तीत जास्त मोबदला मिळवा एवढाच त्याचा उद्देश आहे त्यात चूक काहीच नाही. आपल्या मायबाप सरकारनंही तात्काळ प्रतिसाद देऊन, प्रत्येक भूखंडासाठी बाजार भावाच्या चौपट मोबदला देऊ केलाय जे विमानतळासाठी अधिग्रहित केले जातील. मला सरकारला जमीन मालकांविषयी वाटणाऱ्या काळजीचं कौतुक वाटतं जी माणसं आहेतमला सरकारला तसंच सासवडमध्ये भोवतालच्या परिसरात राहणाऱ्या जमीन मालकांना एकच प्रश्न विचारायचा आहे की आपल्यामुळे कोल्हे, चिंकारा, मुनिया, अमूर ससाणाघोरपड  इतरही शेकडो प्राणी बेघर होतील अन्नाला मुकतील, त्यांना आपण मदतीचं कोणतं पॅकेज देऊ करणार आहोत! ते मतदान करू शकत नाहीत, त्यांचा कुणी प्रतिनिधी नसतो किंवा ते माध्यमांमध्ये किंवा फेसबुकवर पोस्ट करून निषेध व्यक्त करू शकत नाहीत. मानवी वसाहती उभारल्या जाण्याआधी वर्षानुवर्षे ते ज्या जागेवर राहात होते तिथून हद्दपार केलं जात असल्याबद्दल ते वृत्तपत्रांना मुलाखती देऊ शकत नाहीत; सरकारला त्यांच्या जगण्याची काळजी नाही किंवा ते लांडग्यांना कोणतंही पॅकेज देत नाहीत जे खरंतर सासवड भोवतालच्या कुरणांच्या परिसरात राहणाऱ्या सर्व प्रजातींचे खऱ्या अर्थानं प्रतिनिधी आहेत. या लांडग्यांना काही पैसे किंवा तत्सम स्वरूपाचं पॅकेज नकोय त्यांना फक्त जगण्यासाठी थोडी गवताळ जागा हवीय त्यात त्यांना कोणतेही रस्ते, उद्योग, नोकऱ्या किंवा आरक्षण यासारख्या कोणत्याही सुविधांचीही अपेक्षा नाही. मात्र आपण त्यांना एवढंही देऊ शकत नाहीखरंतर आपण महाभारतातल्या दुर्योधनाहूनही निष्ठूर आहोत. अशा वसाहतींभोवतालच्या स्थानिकांना जंगलाचे संवर्धन करण्याचे महत्व समजून सांगितले पाहिजे पर्यटनाला चालना देण्यासाठी त्याचा वापर केला पाहिजे. तथाकथित विकसित शहरात (खरंतर स्मार्ट शहरात) राहणाऱ्या नागरिकांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे. 

ही केवळ सासवडच्या गवताळ भागाची गोष्ट नाही, आपल्या प्रगतीशील राज्यात हजारो अशा जमीनी आहेत ज्या लांडग्यांसारख्या हजारो प्रजातींचे घर आहेत. मात्र विकासाच्या नावाखाली त्यांना आपल्या घरांना मुकावे लागत आहे, आपण विकास करताना कुठेतरी संतुलन राखले पाहिजे किंवा इतर प्रजातींसाठी जमीन मोकळी ठेवली पाहिजे, नाहीतर माणूस वगळता इतर सगळ्या प्रजाती नामशेष होतील तो दिवस लांब नाही. त्या दिवशी आपण सर्वात मोठे मूर्ख ठरू. मित्रांनो, आपल्या पुराणांमध्ये लांडग्यांचे  रुदन अशुभ मानले गेले आहे  ते काहीतरी संकट येणार असल्याचा संकेत देते. मात्र आपण लांडगे इतर अनेक प्रजातींचे घर असलेल्या सासवडच्या गवताळ पट्ट्यासारख्या इतर जमीनींची जी गत केलीय, त्यामुळे अशुभ काळ फार लांब नाही. मात्र त्याचा संकेत देण्यासाठी कुणी लांडगेच उरणार नाहीतखरंतर तोच सर्वात अशुभ काळ असेल हे लक्षात ठेवा!


संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स