Friday 5 June 2020

जागतिक पर्यावरण दिन नामक विनोद!































जागतिक पर्यावरण दिन नामक विनोद!

“जर तुम्हाला सकाळी उदास आणि निराश वाटत असेल तर थोडा वेळ निसर्गाबरोबर घालवा आणि जर सकाळी तुम्ही उल्हासी आणि आनंदी असाल, तरीही निसर्गाबरोबर काही वेळ घालवा”...
तर,माझ्या लॉकडाऊनमुळे झालेल्या मानसिक परिणामातून वरील तत्वज्ञान आले आहे, मात्र येथे मी लॉकडाऊनशी संबंधित कुठलीही गोष्ट सांगत नाहीच, तरीही विषयच असा आहे की जीवनाचा कोणताही पैलू त्यापासून सुटका करून घेऊ शकत नाही, होय, पर्यावरण!तर, पुन्हा एकदा 5 जून आला आहे आणि हा कोणता विशेष दिवस, असा आश्चर्याने विचार करणाऱ्यांसाठी, ही कोणत्याही महत्त्वाच्या व्यक्तीची जन्मतारीख किंवा मृत्यूची तारीख (जयंती किंवा पुण्यतिथी) नाही, त्यामुळे आज ड्राय डे नाहीये (उपरोधासाठी क्षमस्व,पण नाईलाज आहे माझा). दरवर्षी आपल्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि कृती करण्यासाठी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. 1974 मध्ये पहिल्यांदा हा दिन साजरा करण्यात आला होता, तेव्हापासून, पर्यावरणीय समस्यांपासून सागरी प्रदूषणापर्यंत, मानवी लोकसंख्या आणि जागतिक तापमानवाढ, ते पर्यावरणीय जीवनशैली आणि वन्यजीव गुन्ह्यांबाबत जनजागृती वाढवण्यासाठी ही आघाडीची मोहीम राहिली आहे.जागतिक पर्यावरण दिन हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जागतिक व्यासपीठ बनले आहे, त्यामध्ये दरवर्षी 143 पेक्षा जास्त देश सहभागी होतात. दरवर्षी, जागतिक पर्यावरण दिनाची नवीन संकल्पना असते, पर्यावरणासंबंधी मुद्द्यांचा प्रसार करण्यासाठी महत्त्वाचे उद्योग, एनजीओ, समुदाय, सरकारे आणि जगभरातील मान्यवर व्यक्ती त्याचा स्वीकार करतात. या वर्षी (2020) शुक्रवारी, 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जात आहे. “जैवविविधता साजरी करा” ही या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना आहे. विरोधाभास असा की  मी जेव्हा जागतिक पर्यावरण दिनावर हा लेख लिहायला सुरुवात केली तेव्हा माझ्या खिडकीबाहेर निसर्ग चक्रीवादळाच्या रुपाने  राज्याचा पश्चिम भाग आणि किनारपट्टीचा भाग धुवून (झोडपून म्हणायला हवे) काढत विनाश घडवण्याच्या मनस्थितीत आहे. तर  व्हॉट्सअॅप फॉरेस्टर फ्रेंड्स ग्रुपमध्ये माझ्या मैत्रिणीने एका दक्षिणी राज्यामध्ये एक गर्भवती असलेल्या हत्तीणीला कशी वागणूक देण्यात आली त्याची बातमी पोस्ट केली आहे, त्या हत्तीणीला फटाके भरलेले अननस कथितरित्या खाऊ घातल्यामुळे हत्तीण मरण पावली आणि मनुष्य इतके दुष्ट कसे असू शकतात असे तिने ग्रुपवर आम्हाला विचारले होते!

तर, माझे उत्तर असे होते की बहुतांश माणसे (मनुष्य) दुष्ट असतात, पण फार थोडी माणसे द्रुष्टनाचे प्रदर्शन करतात, इतर लोक समाजाला आणि तथाकथित कायद्याला घाबरतात त्यामुळे त्यांचा दुष्टपणा लपलेला असतो, पण संधी मिळाली की तो वर येतो, अन्यथा आपल्याला कायदे, न्यायालये, तुरुंग आणि पोलीस अशांसारख्या गोष्टींची गरज पडली नसती,कारण विश्वातील इतर कोणत्याही प्रजातींना स्वतःच्या जगण्यासाठी या गोष्टींची गरज नसते!  ज्याप्रमाणे अगदी गेल्याच वर्षी दोन वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांनी (माफ करा, पण तेसुद्धा दक्षिणी राज्यांतून होते) एका भटक्या कुत्र्याचे हाल केले आणि त्याला इमारतीच्या वरच्या मजल्यावरून खाली फेकले आणि या कृत्याची व्हिडीओ क्लिप केली! व्वा, काय ती धैर्य आणि शौर्याची कृती, त्यांनी तो व्हिडिओ अभिमानाने त्यांच्या मित्रांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोस्ट केला! नेमके याच कारणामुळे  ठिकाणी जागतिक पर्यावरण दिनाच्या सोहळ्याला मी हसतो आणि कृपया मला माफ करा, कारण मी सच्च्या पर्यावरणतज्ज्ञांची तसेच निसर्गप्रेमींची टर उडवू इच्छित नाही पण इतर कोणत्याही प्रजातीला पर्यावरण किंवा वन्यजीव प्रकारचे दिन साजरे करावे लागत नाही कारण ते इतर प्रजातींविरोधात दुष्ट कृत्ये करत नाहीत जे मनुष्यप्राणी करतात आणि त्यानंतर आम्ही जैवविविधता साजरी करण्याच्या संकल्पनेसह तों दिवस साजरा करतो, भारीच नाही का! 
आणि केवळ इतर प्राण्यांविरोधातच कशाला, आपण माणसे स्वतःच्याच प्रजातीविरोधात सर्वात दुष्ट कृत्ये करतो, मग एखाद्या हत्ती किंवा कुत्र्याची कोण फिकीर करेल! ठीक आहे, आता देशात तसेच आपल्या सभोवताली जैवविविधतेच्या आघाडीवरील पर्यावरणाच्या स्थितीविषयी केल्याने! अगदी काहीच महिन्यांपूर्वी मी जैवविविवधतेसंबंधी एका चर्चासत्राला उपस्थित होतो, तिथे अनेक वरिष्ठ लोक उपस्थित होते, आणि त्यापैकी एक होते डॉ. एस डी महाजन, पुण्यातील एक विख्यात वनस्पतिशास्त्रज्ञ, ते सांगत होते की साधारण पन्नास वर्षांपूर्वी ते प्रत्यक्षात (मुठा) नदीत पोहत असत आणि ते पुणे शहरातील नद्यांचे पाणी प्यायला वापरात  असत !  आजच्या पिढीतील कोणालाही सांगा (तिशी किंवा चाळीशीतील) आणि ते तुमच्याकडे अशा नजरेने पाहतील की जणू काही त्यांनी टाईम ट्रॅव्हल मशीनमधील माणसाला पाहिले आहे. आणि मी त्यांना दोष देणार नाही कारण जेव्हा मी तीस वर्षांपूर्वी या शहरात आलो ते पुणे मला आठवते आणि त्या काळी या शहरामध्ये उन्हाळा नाही असे मी तेव्हा विदर्भात राहणाऱ्या माझ्या आईला पत्रात लिहिले होते!आणि आज या शहरामधून वाहणाऱ्या या नद्यांकडे पाहा आणि एप्रिल/मे महिन्याच्या कोणत्याही दिवशी दुपारी या या शहरातील रस्त्यांवरून चालण्याचा प्रयत्न करा! आणि आपण पर्यावरणाचं काय भज करून ठेवलाय ते कळेल! अगदी अलिकडे एका वेबिनारमध्ये (हल्ली बरेच वेबिनार होतात) वरिष्ठ वन्यजीव अधिकाऱ्यांनी वन्य जीवन संवर्धनाचा गंभीर विषय मांडला की, वन अधिकाऱ्यांचे कोणतेही सरकारी विभाग (म्हणजे संपूर्ण यंत्रणा) ऐकत नाही किंवा वने आणि त्यांच्या संवर्धनाविषयी फिकीर बाळगत नाहीत!
ठीक आहे, अजूनही पटले नसेल तर, जैवविविधतेबद्दल आपल्या दृष्टीकोनाविषयी आणखीही बरेच काही आहे. गेल्या एका वर्षात फक्त भारतात जवळपास ऐंशी वाघ आणि तीनशेपेक्षा अधिक बिबटे आणि शंभरपेक्षा अधिक हत्ती मरण पावले आहेत. आणि हे केवळ मोठ्या जनावरांबदद्ल आहे; रस्त्यांवरील अपघात, शिकार, केवळ मजा म्हणून किंवा अन्नासाठी केलेली शिकार यामुळे दररोज हजारोंच्या संख्येने मारल्या जाणाऱ्या साप, माकडे, हरिण, तरस, पक्षी, कासव, आणि इतर शेकडो प्रजाती मी मोजतही नाही आहे. आणि हो, इतर प्रजातींना मूकपणे आणि हळूहळू विष दिल्याप्रमाणे मारण्याचा आणखी एक मार्ग आहे आणि तो म्हणजे वने नष्ट करून त्यांना बेघर करणे. हे आपण आपली घरे, रस्ते, विमानतळे, उद्योग, खाणी बांधण्यासाठी करतो, तसेच इतर प्रजातींच्या जीवनाचे उगम असलेले नैसर्गिक पाणवठे, वायू यासारखे नैसर्गिक स्रोत प्रदूषित करून आणि त्यांची अन्नसाखळी नष्ट करून आपण हे करतो, त्यामुळे त्यांना खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी किंवा श्वास घेण्यासाठी काहीही शिल्लक न राहिल्यामुळे या प्रजाती मरण पावतात! आणि तरीही आपण जागतिक पर्यावरण दिन साजरा करतो, आपण मनुष्य प्रजाती खरोखर अद्भूत आहोत, नाही का!

हे सर्व काय दर्शवते मित्रांनो; हे असे दर्शवते की आपण एखाद्या दिनाच्या संकल्पनेची घोषणा करण्याशिवाय जैवविविधतेबद्दल जराही काळजी करत नाही, हे आता तरी स्वीकारा! खरोखर काही लोक किंवा काही गट म्हणा, आपापल्या  मार्गाने पर्यावरण वाचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत पण हे एखाद्या जगाला लागलेली आग विझवण्यासाठी काही बादल्या पाणी ओतण्यासारखे आहे, कारण आधीच इतके प्रचंड नुकसान झालेले आहे आणि रोज होत आहे, की प्रत्येक मनुष्य जैवविविधता वाचवण्यासाठी एकत्र आला नाही तर हा विनाश थांबणार नाही. आणि आपल्या स्वतःच्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणे ही पहिली पायरी आहे, कारण इतर प्रजातींना तो सर्वात मोठा धोका आहे. आपण मनुष्यप्राणी पृथ्वी नावाच्या देहामध्ये कॅन्सरच्या पेशींप्रमाणे वाढत आहोत, इतर सर्व प्रजातींना मारून (इथे खाऊन असे वाचा) मग ते मासे असो वा सस्तन प्राणी किंवा पक्षी किंवा अगदी एखादे झाडही! आणि ही अशी एक गोष्ट आहे की कोणत्याही देशाचा कोणताही नेत त्यावर एकही शब्द उच्चारत नाही पण ते किंवा त्या जैवविविधता वाचवण्याबद्दल मात्र भरपूर बोलतात, कदाचित त्यालाच राजकारण म्हणत असतील. आणि विनोद असा की हा मानवी लोकसंख्येचा कॅन्सर केवळ इतर प्रजातींना मारून टाकत नाही तर हळूहळू स्वतःच्या प्रजातीलाही मारूनन टाकत आहे, अगदी पंचतंत्रामधील साप आणि बेडकांप्रमाणे. आपल्या प्रतिस्पर्ध्याला मारण्यासाठी बेडूक राजा ते राहत असलेल्या विहिरीत एका सापाला बोलावतो आणि एकेक करून प्रतिस्पर्धी बेडकाला मारल्यानंतर साप राजा तसेच त्याच्या कुटुंबालाही मारतो आणि खातो! त्याच मार्गाने आज मानवी लोकसंख्या इतर प्रजातींना मारत असेल आणि त्यांचे घरे बळकावत असेल (अधिवास असे वाचा) मात्र इतर सर्व प्रजाती नष्ट झाल्यानंतर काय (जिंकून घेतल्यानंतर, असे वाचा), तेव्हा आपण कोणाला खाणार आहोत किंवा कोणावर अतिक्रमण करणार आहोत?

त्याच वेळेला गर्भवती हत्तीणीला मारल्याच्या किंवा गावकऱ्यांनी एखाद्या बिबट्याला काठ्यांनी मारणे  किंवा रानडुकराला गावठी बॉम्ब ने मारणे, अशा  कृत्यांचा निषेध करणाऱ्यांना  कोणताही खून हि चूकच आहे! तरीही तुमच्या एक एकर शेतात गवताच्या शाकारलेले छत असलेल्या एका मातीच्या झोपडीत राहण्याचा प्रयत्न करून बघा आणि जेव्हा रानटी हत्तींचा कळप एका रात्रीत शेतातील पिकांसह तुमची झोपडी उद्ध्वस्त करतो आणि तुम्हाला तुमच्या जीवानीशी पळ काढावा लागतो, तेव्हा तुम्ही त्या हत्तीबरोबर काय कराल? तुम्ही स्वतःलाच हा प्रश्न प्रामाणिकपणे विचारा आणि स्वतःला प्रामाणिकपणे उत्तर द्या आणि त्यानंतर जैवविविधता वाचवण्याचा प्रयत्न करा किंवा हत्तीला मारणे हे दुष्ट कृत्य आहे असे म्हणण्याचा प्रयत्न करा! मात्र येथेच मनुष्य आणि प्राण्यामध्ये फरक आहे, कारण आपण विचार करू शकतो, त्यामुळे आपली जबाबदारी अधिक आहे, काही मनुष्यांनी हत्तींना बेघर केले आहे आणि त्यांचे अन्न हिरावून घेतले आहे, केवळ याच एका कारणामुळे हत्ती मनुष्यांच्या घरांवर किंवा शेतावर अतिक्रमण करतात, आणि हत्ती नवीन घर बांधू शकत नाहीत किंवा नवीन अन्न पुरवठा यंत्रणा तयार करू शकत नाहीत पण मनुष्य करू शकतो!

आता अगदी मनुष्यप्राण्यांमध्येही काहीजण मनुष्य आहेत आणि काहीजण (बहुतांश असे वाचावे) प्राणी आहेत, म्हणजे त्यांना अजूनही मनुष्य असण्याचा अर्थ 
समजलेला नाही, त्यामुळे आपण त्यांच्याकडून इतर प्रजातींबद्दल किंवा मनुष्यांबद्दलही दायित्वाच्या भावनेची अपेक्षा करू शकत नाही! येथे कायदा, जनजागृती, यंत्रणा इत्यागी चित्रामध्ये येतात, म्हणजे त्या मनुष्यप्राण्यांना अधिक मानवी करतात! समस्या या मनुष्यप्राण्यांची नाही, समस्या तथाकथित राज्यकर्ते किंवा मनुष्यांची आहे कारण आपल्या राज्यघटनेतच म्हटलेले आहे, “लोकांचे, लोकांकडून आणि लोकांसाठी” (येथे अर्थातच लोक म्हणजे मनुष्य) जे वास्तवात असे असले पाहिजे, “मनुष्यांचे, मनुष्यांकडून आणि जैवविविधतेसाठी”! कारण तेव्हाच आपण खरोखर इतर प्रजातींबद्दल विचार करू शकू आणि आपले धोरण आखू शकू ज्यामुळे मनुष्य आणि इतर प्रजातीदेखील टिकतील आणि आनंदाने वाढतील! मी पुन्हा सांगतो, मी विकासविरोधी नाही, कारण आपल्याला घरांची गरज असते, आपल्याला अन्नाची गरज असते आणि आपल्याला अधिक चांगल्या जीवनाची गरज असते, पण त्याचप्रमाणे बेडूक, मासा, पक्षी, हत्ती आणि वाघाच्याही गरजा असतात, नाही का? मला वाटते केवळ याच वर्षाची नाही तर या दशकाची जागतिक पर्यावरण दिनाची ही संकल्पना असण्याची वेळ आली आहे, कारण तेव्हाच आपल्याला जैवविविधता टिकण्याची आशा बाळगता येईल! अन्यथा जागतिक पर्यावरण दिनाचा सोहळा तर असेल पण पर्यावरण नसेल, जे सध्या स्पष्टपणे दिसत आहे!

संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलपर्स


No comments:

Post a Comment