Sunday, 20 November 2011

सायकल ट्रक्स आणि सायकल ट्रप्स 

 

 

या शहराला सायकली किंवा सायकलींसाी वेगळे मार्ग नाही तर पादऱ्यांसाी वेगळे चौक असण्याची गरज आहे!

बऱ्याच जणांच्या भुवया उंचावतील आणि म्हणतील एका बिल्डरकडून आपण आणखी काय अपेक्षा करु शकतो! मात्र मी हे एक बिल्डर किंवा व्यावसायिक म्हणून नाही तर एक नागरिक म्हणून म्हणतोय, जो उघड्या डोळ्यांनी शहरात फिरतो. शहरातील रस्त्यांवर फिरताना मला जे अनुभव आले त्यातून मी हे म्हणतोय! जेव्हा आपण म्हणतो की मला काहीतरी हवे आहे, ते आपल्या कृतीमधूनही दिसायला नको का? आपली कृती ही आपल्या गरजेनुसार असावी उदाहरणार्थ एखादे लहान मूल जेव्हा एक खेळणे बघते तेव्हा ते मिळेपर्यंत पालकांकडे ह करते. जेव्हा त्याला ते खेळणे मिळते मुलाला ते खेळणे कुणालाही द्यायचे नसते, अगदी झोपेतही ते खेळणे आपल्यापाशी ेवते. ही मालकीची भावना असते आणि मुलाला ते खेळणे हवे आहे हे यातून दिसते. ते खेळणे मुलाकडून घेण्याचा विचार केलात तर ते मूल तुम्हाला ाम विरोध करेल!
हे झाले लहान मुलांचे त्यांना माहिती असते आपल्याला काय हवे आहे, मात्र आपण पुणेकर सज्ञान नागरिक असूनही आपल्या सायकल मार्गांचे काय केले आहे ते पहा! आपल्या कुल्याही कृतीतून असे दिसत नाही की आपल्याला ते हवे आहेत! माझ्या कामामुळे गेल्या सहा महिन्यांपासून मी चांदणी चौक आणि पौड रस्त्यामार्गे घरी येत आहे. संध्याकाळच्या वेळी संपूर्ण शहर कामावरुन परतत असते आणि पौड रस्ता कोथरुडचा मुख्य रस्ता आहे आणि यावेळी सर्वप्रकारच्या वाहनांनी आणि रहदारीने गजबजलेला असतो, यातच रस्त्याचे कामही सुरु असते! याच प्रचंड रहदारीमध्ये सायकलस्वारही रस्ता काढत असतात. मला या गोष्ीचं जरा आश्चर्य वालं कारण चांदणी चौक ते आनंदनगर या जवळपास किलोमीरच्या रस्त्यावर रुंद पादचारी पथ आणि त्या लगत सायकलस्वारांसाी मार्ग आहे, किमान बऱ्याच भागात तरी तो आहे. मात्र एकही सायकलस्वार त्याचा वापर का करत नाहीत आणि जीव धोक्यात घालतात?

मी दररोज या रस्त्यावरुन व्यायामासा किलोमीर चालत असे त्यामुळे माझ्यासमोर सायकल मार्गाच्या बाबतीत बऱ्याच गोष्ी उलगडल्या! एक गोष्ट मला समजली नाही ती म्हणजे सायकल मार्ग रस्त्याच्या एकाच बाजूला का आहेत, विरुद्ध दिशेने जाणाऱ्या लोकांचं काय, संपूर्ण रस्त्यावर डिव्हायडर असल्यामुळे फक्त चौक सोडला तर ते रस्ता पार कसा करणार. सायकल मार्ग, पौडच्या दिशेने रस्त्याच्या डाव्या बाजूला आहे, ज्यामुळे सकाळच्या वेळी शहराच्या दिशेने रहदारी जास्त असताना तो वापरणे गैरसोयीचे आहे. दुसरं म्हणजे जर दोन्ही बाजूने येणाऱ्या सायकलस्वारांसाी तो असेल तर त्याची रुंदी त्याप्रमाणे ेवण्यात आली आहे का? तर तसे निश्चितच करण्यात आलेले नाही! संध्याकाळी यािकाणी मुले क्रिके खेळत असतात, वाहनांची दुरुस्ती करणारी गॅरेज, चांभार, मासे विक्रेते, चहाच्या पऱ्या, फर्निचर विक्रेते यांनी हा भाग गजबजतो! तसंच काही िकाणी पीएमपीएमएलच्या बसची तिकी विक्री केंद्र आहेत, एमएसईबीचे वितरण बॉक्स आहेत, वाहने लावलेली असतात, लोक रोपं विकत असतात, ऊसाचा रस विकणाऱ्या पऱ्या असतात! बऱ्याच िकाणी मोी कआउ्स लावलेली असतात आणि त्यांना चुकवत जावं लागतं. या कआउ्सचे समोरुन छायाचित्रं घेण्याची माझी हिम्मत झाली नाही कारण कार्यकर्ते कआउ्स बदनामी करण्यासाी वापरले म्हणून माझ्या मागे लागले असते! पौड रस्त्यावरील सायकल मार्गाची प्रत्येक खूण हवण्यात आली आहे. याविषयी आपल्याला काय वातं यावर आपल्याला थोडी लाज वाते का किंवा आपण निर्लज्ज आहोत हे अवलंबून आहे! त्यामुळे कोण म्हणतं इथे सायकल मार्ग आहे असं म्हणायला आपण मोकळे आहोत!

आता म्हात्रे पूल ते राजाराम पूल या किलोमीरच्या प्प्यातील अतिशय चांगला सायकल मार्ग असलेल्या रस्त्यावरील चित्रं पहा. इथे एकही अतिक्रमण नाही किंवा रस्त्यावर दुकाने नाहीत, त्यामुळे इथे कुलाही अडथळा नाही केवळ झाडे आणि व्यायामासाी पायी चालणारे लोक दिसतात. मात्र सायकल मार्गाची परिस्थिती अशी आहे की तो कुणीही तो वापरत नाही. या मार्गाला विविध चौकात येऊन मिळणाऱ्या रस्त्यांची परिस्थिती वाई आहे, बऱ्याच िकाणी रस्त्यांना खड्डे पडले आहेत, त्यामुळे सायकलस्वारांना या मार्गावर प्रवेश करण्यापूर्वी किंवा बाहेर पडताना खाली उतरावे लागते, कारण बऱ्याच िकाणी चौक आहेत. या सायकल मार्गावर गती निरोधक आहेत जे खरंतर रस्त्यावर असायला हवेत! सर्वात मोा विनोद म्हणजे हा रस्ता अचानक म्हात्रे पुलाजवळच्या पीएमसीच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाजवळ संपतो आणि त्यानंतर पुन्हा अतिक्रमण असलेला रस्ता सुरु होतो! आता हा रस्ता कोण आणि कसा वापरेल?

आता रस्त्यावर सायकलस्वार सोडले तर सर्वांना जागा आहे आणि ते मुख्य रस्ता कुलीही तक्रार न करता वापरताहेत आणि म्हणूनच मला असे वाते की आपल्याला सायकल मार्गांपेक्षाही पादचाऱ्यांसाी वेगळ्या मार्गाची आवश्यकता आहे! पादचाऱ्यांसाीच्या मार्गावर ज्या गोष्ी होणे आवश्यक आहे त्या सर्व सायकल मार्गावर होताहेत आणि तरीही कुणीही तक्रार करत नाही याचा अर्थ काय होतो? जर आपल्याला आपल्या सायकली आवडतात आणि आपल्याला आपल्या शहराची काळजी असेल तर आपण एकजू होऊन, रणबीर कपूरने त्याच्या नव्या " रॉकस्ार", या चित्रपात मागितल्याप्रमाणे "साड्डा हक्क इथ्थे रख! " असा सायकल मार्गांसाीचा हक्क का मागत नाही?

हे शहराचे आणि ते चालवणाऱ्या यंत्रणेचे अपयश आहे, ते नागरिकांना त्यांच्या हक्काची जाणीव करुन देण्यात अपयशी ठरले आहेत. सायकल मार्गांसाी विशेष कृतीदलाची अतिशय आवश्यकता आहे ज्यामुळे सर्व प्रकारच्या सायकल मार्गांची देखभाल होईल आणि जे सायकलस्वार सायकल मार्ग वापरत नाहीत त्यांच्यामध्ये जागरुकता मोहीमही राबवता येईल. पौड रस्त्यासारख्या मार्गाचे सर्वेक्षण करुन किती जण सायकली वापरतात हे पाहता येईल आणि जे वापरत नाहीत ते का वापरत नाहीत हे विचारता येईल? आपण रहदारीच्या समस्येसाठी मे्रो तसंच इतर आधुनिक उपाययोजनांविषयी बोलतो मात्र दुसरीकडे आपणच तयार केलेला गुंता आपण सोडवू शकत नाही, आपल्याकडे जे आहे त्याचे आपण काय केले आहे हे पाहू शकत नाही! जे राजकीय पक्ष हरित विकास योजनेविषयी जागरुक असल्याचे दाखवतात ते देखील या समस्येवर मौन बाळगतात आणि फारशा विशेष नसलेल्या समस्येवर लक्ष केंद्रित करतात! कुलाही राजकीय पक्ष मोर्चा काढून अधिकाऱ्यांना एक दिवस सायकलने त्यांच्या कामाच्या िकाणी जाण्याचे आवाहन का करत नाही, असे झाले तरच त्यांना खऱ्या परिस्थितीची जाणीव होईल!
मित्रांनो दररोज अनेक सायकलस्वार प्रचंड रहदारीमध्ये सायकल चालवून स्वतःचा जीव धोक्यात घालतात, त्यांना प्रदूषणाचाही त्रास होतो यामध्ये आपली मुलं, मित्र आणि नातेवाईकही आहेत! आता जागं व्हायची आणि आपल्या शहरात सायकल चालवण्याचा आणि मोकळेपणाने चालण्याचा आपला हक्क मागण्याची वेळ झाली आहे, तसेच झाले तरच आपलं शहर एक चांगलं शहर होईल!
संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स
एन्व्हो-पॉवर समिती, सीआरईडीएआय, पुणे

संजीवनीची विचारसरणी जाणून घेण्यासाठी कृपया माझ्या ब्लॉगला भेट द्या!

संजीवनीची सामाजिक बाजू!

http://www.flickr.com/photos/65629150@N06/sets/72157627904681345/
शहराविषयीच्या तुमच्या कुठल्याही तक्रारींसाठी, खालील लिंकवर लॉग-ऑन करा
http://www.punecorporation.org/GRS/Complaint/LaunchComplaintCitizen.aspx

हिरवाईचा विचार करा, जीवनाचा विचार करा

www.sanjeevanideve.com