Monday, 9 June 2014

वरिष्ठपणा समजावुन घेताना !

मित्रांनो,

मागील दिवसात माझ्या हे लक्षात आले आहे की बोलण्यापेक्षा लेखन हे संवादाचे जास्त प्रभावी साधन आहे. व्हॉट्स-अप आणि फेसबुकच्या काळात आपण आपल्या अगदी जवळच्या व्यक्तींना देखील लिहिणे विसुरून गेलो आहोत. काहीतरी लिहिणे म्हणजे आपल्याला थोडा वेळ काढायला हवा आणि विचार करायला हवा आणि ते आपण विसरत चालले आहोत. मी थोडासा वेळ काढण्याचा प्रयत्न करतो आणि माझे विचार लिहून काढतो आणि विशेषकरून तुम्ही जेव्हा आपल्या टीमला एक बॉस/मालक किंवा एक प्रमुख म्हणून संबोधित करीत असता, तेव्हा लिखाण तुमचे काम सोपे बनविते.

या काळात, आपण आपल्या सभोवती पाहत असलेली व्यवसाय जॉब बद्दल असुरक्षिता असताना, बॉस/मालकास त्याच्या टीम बद्दल तसेच संस्थेच्या मूल्यांविषयी काय वाटते, हे त्याच्या टीमला समजणे अतिशय महत्त्वाचे आहे. मी एक मोठा विचारवंत किंवा ज्ञानी नाही परंतु मी माझ्या आधीची संस्था किंवा संजीवनीमध्ये असतानाचा एक भाग म्हणून मी माझ्या ह्या प्रवासात जे थोडे काही शिकलो आहे त्यावरून मी हे सांगू शकतो की एक बॉस बनणे अतिशय कठीण काम आहे! तुमच्याकडे दुसऱ्यावर अवलंबून राहण्यास आणि त्यांच्याकडून अपेक्षा करण्यास कोणीही नसते परंतु यांमध्ये आपल्या सभोवती असलेल्या प्रत्येकाच्या, कदाचित ते आपले क्लायंट किंवा ka^nT^/kTr आणि शेवटी आपल्या टीममधील सहकारी असतील, त्यांच्या अपेक्षांप्रती आपल्याला उभे राहावे लागते. टीममधील सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन आणि त्यांना समजणाऱ्या भाषेमध्ये आपल्या अपेक्षा व्यक्त करणे, हे त्यांच्यावरील दबाव कमी करण्यास मदत करू शकते असे मला वाटते. आणि अशा अपेक्षा शेअर करण्यासाठी वार्षिक मूल्यमापनापेक्षा चांगली वेळ कोणती असेल! तुम्ही पैशांच्या स्वरुपात किती कमावले किंवा किती उलाढाल केली परंतु आपल्या टीमच्या सहकायाच्या बाबतीत तुमची वार्षिक उलाढाल किती कमी आहे हे कोणत्याही संस्थेचे यश ठरवीत असते आणि त्यासाठी बॉसला खूप महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागते. रिअल इस्टेटच्या उद्योगात केवळ व्यक्ती असल्या तरीही तो उद्योग त्याच्या मानवी संबंधांविषयी त्याच्या मूल्यांसाठी कधीही प्रसिद्ध नव्हता किंवा नाही आणि त्यामुळे येथे सहकायांना एक व्यक्ती म्हणून घडविणे थोडे जास्तच अवघड आहे.

अशाच एका प्रयत्नात आपल्या मर्जीनुसार किंवा वैयक्तिक मतानुसार वेतन वाढ देण्यापेक्षा, मी टीममधील सहकाऱ्यांविषयी त्याचप्रमाणे ते ज्या टीम चा भाग आहेत त्यांविषयी काही गोष्टी लिहिण्याचा आणि वेतन वाढ केल्या गेलेल्या सर्व भागाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. आपण एका वेळी सर्वांना समाधानी करू शकत नाही आणि त्यामुळे टीम आणि तिच्या प्रमुखामधील संवाद हा अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून माझ्या टीमला त्यांच्या वेतनवाढीच्या मर्यादेसह लिहित आहे आणि आपल्या सर्वांशी शेअर करीत आहे.

 “
तुमचा नेता बरोबर असेल तेव्हा त्याला  साथ द्या, त्याच्या सोबत रहा मात्र तो जेव्हा चूक असेल तेव्हा त्याची साथ सोडा.” ...अब्राहम लिंकन

प्रिय,
संजीवनी टिम,

आत्तापर्यंत तुमच्या बॉसला वेगवेगळ्या प्रसिद्ध व्यक्तिंची, बुद्धिवंतांची, आपली हुशारी सिद्ध केलेल्यांची अशी वाक्ये किती आवडतात हे तुम्हाला समजलेच असेल! मला खात्री आहे की अमेरिकेच्या दिवंगत महान राष्ट्राध्यक्षांच्या वरील अवतरणामध्ये थोडासा बदल केला तर ते माझ्या तत्वज्ञानाला अगदी अनुकूल आहे, मात्र जर तुम्हाला तुमचा नेता काही चांगल्या गुणांसाठी आवडत असेल तर त्याला सोडून जाण्यापूर्वी त्याला बदलण्याचा प्रयत्न करा! कुणालाही सोडून जाणे अगदी झटपट व सोपा मार्ग आहे, मात्र एखाद्याशी मतभेद असताना त्याच्यासोबत राहण्यातच आपल्या कर्तव्याची तसेच धैर्याची खरी कसोटी लागते.
तुमच्यापैकी ब-याचजणांना कदाचित मी या पत्राद्वारे काय लिहीले आहे ते समजणार नाही किंवा बरेचजण आपल्या बॉसला कुठल्याही प्रसंगी लिहायची सवय आहे म्हणून सोडून देतील, मात्र मी जे लिहीतो ते तुमच्यासमोर मांडणे मला आवश्यक वाटते व मी पोकळ शब्द लिहू शकत नाही कारण मी जो विचार करतो तोच कागदावर मांडतो! आपल्या वार्षिक कामगिरीचे विश्लेषण करण्याचा आजचा दिवस आहे, आपण त्याला पगारवाढ किंवा बढती म्हणतो मात्र त्याचा खरा अर्थ होतो की संस्थेला म्हणजेच संजीवनीच्या टिमला आपला नेमका किती उपयोग होतो याचा स्वतः अभ्यास करणे.

टिममध्ये एखाद्या व्यक्तिच्या वैयक्तिक योगदानाचे विश्लेषण करणे अवघड असते, कारण आपल्या शरीरामधील अवयवांप्रमाणे टिममध्ये प्रत्येक व्यक्तिचे एक कार्य असते. उदाहरणार्थ आपण जर म्हणालो की मेंदू हा शरीराचा सर्वात महत्वाचा अवयव आहे, मात्र बोटांसारखे आपले अवयव नसते तर मेंदुने कुणाला सूचना दिल्या असत्या, मग भलेही ती आपले लक्षही जात नाही अशी पायाच्या करंगळी का असेना पण तिचाही उपयोग असतोच व आपल्या दैनंदीन कामात तिचाही   समावेश होतो! त्याचप्रकारे आपल्याकडे विभागप्रमुख व अधिकारी असतात व सर्वात शेवटच्या स्तरात शिपाई व चालक असतात, मात्र शरीरातील प्रत्येक अवयवाप्रमाणेच सर्वांची मिळून संस्था तयार होते, इथे प्रत्येक घटकाची भूमिका महत्वाची आहे, म्हणूनच या टिममध्ये माझे योगदान किती आहे हे सर्वप्रथम समजून घ्या? त्याचवेळी प्रत्येकाने स्वतःच्या विकासात किती योगदान दिले आहे याचेही विश्लेषण करणे आवश्यक आहे, कारण ज्येष्ठत्व केवळ तुम्ही संस्थेत किती वर्षे काम केले आहे यातून ठरत नाही; तर माझ्या मते आपण काय शिकलो व जे शिकलो त्याचा वापर कसा केला यातून ज्येष्ठत्व समजते. हे केवळ आपल्या कार्यालयातल्याच नाही तर घरातल्याही दैनंदिन कामांमधून दिसून आले पाहिजे, यातूनच व्यक्तिचे ज्येष्ठत्व सिद्ध होते. नाहीतर तुम्ही केवळ वयानेच मोठे व्हाल बाकी काही नाहीकेवळ आदेश स्वीकारणे व त्याची अचूकपणे अंमलबजवाणी करणे हा एक गुण आहेच पण त्यामुळे तुम्ही केवळ एक चांगले ज्येष्ठ यंत्रमानव व्हाल, मात्र आपण स्वतःला एक व्यक्तिम्हणून विकसित केले पाहिजे जी स्वतः आदेश देऊ शकेल केवळ इतरांच्या आदेशांचे पालन करणार नाही!

ब-याच जणांना स्वतःचे  पृथक्करण करणारा हा फॉर्म भरणे म्हणजे माझीच अजून एक काहीतरी विचित्र आयडिया वाटली असेल, मात्र टिमविषयी, स्वतःविषयी, तसेच तुमच्या सहका-यांविषयी तुम्ही जेवढे अधिकाधिक लिहाल, तेवढी तुम्हाला तुमची संस्था एक टिम म्हणून व त्यातील तुमची भूमिका अधिक चांगल्याप्रकारे समजेल. लक्षात ठेवा तुमचे वेतन केवळ तुम्हाला इथे किती वर्षे झाली यावर अवलंबून नाही, तर त्याचे इतरही बरेच मापदंड आहेत उदाहरणार्थ तुमच्या कंपनीची उलाढाल, बाजारातील परिस्थिती, उद्योगाचे भविष्य व तुमची कंपनी तुम्हाला किती स्थैर्य देते यावर अवलंबून असते. कमी मात्र निश्चित वेतन हे अधिक मात्र बेभरवशाच्या वेतनापेक्षा कधीही चांगले अशी माझी विचारसरणी आहे व आपण बांधलेली घरे विकतानाही मी त्याचा वापर करतो. अधिक नफ्यासाठी वाट पाहून विक्री रोखून ठेवण्यापेक्षा मी थोड्या कमी किमतीस ती विकण्यास प्राधान्य देतो, यामागे थोडासा सामाजिक दृष्टिकोनही आहे कारण आपण इथे केवळनफा कमावण्यासाठी आलेलो नाही! त्यानंतर सर्वात शेवटचे म्हणजे मी माझ्या टिम मध्ये तसेच स्वतःमध्ये काय मूल्यवर्धन केले आहे! काळ बदलतोय व आपले ग्राहक खर्च केलेल्या प्रत्येक पैशाचा जास्तीत जास्त मोबदला कसा घ्यायचा हे जाणतात, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याताना आपली खरी कसोटी आहे व त्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने दोन गोष्टी शिकणे आवश्यक आहे, पहिली म्हणजे स्पष्टपणे आश्वासन देणे व दुसरी म्हणजे तुम्ही जे आश्वासन दिले आहे त्यावर कायम राहून ते पूर्णत्वाला नेण्यास झटणे !

तुमचा बॉस म्हणून वागताना मी तुम्हाला काही पर्याय नाही म्हणून माझ्यासोबत काम करण्याची सक्ती मी कधीच करणार नाही; लक्षात ठेवा आपण निवडलेले पर्यायच आपल्याला घडवत असतात व हे जग भरपूर मोठे आहे जेथे तुम्हाला केवळ जगण्याच्याच नाही तर समृद्ध होण्याच्या अनेक संधी मिळतील. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्या क्षमतांचींच तुम्हाला मदत होईल. तुमच्या कामगिरीचा आलेख केवळ संजीवनीच्या सीमांपुरताच मर्यादित ठेवू नका त्या विस्तारु द्या, उंच भरारी घेण्यासाठी इथला pla^Tफॉर्म म्हणून वापर करा. हीच तुम्हाला मिळालेली व मी देऊ शकतो अशी सर्वोत्तम पगारवाढ असेल!

 असे म्हणतात की कोणतीही नवीन सुरुवात करण्यासाठी शुभ दिवस किंवा तारीख नसते व वर्षातील हा काळही असाच होऊ शकतो व टिमचा नेता म्हणून मलाही ते लागू होते. मी कधीही दावा करणार नाही की मी सर्वोत्तम नेता आहे मात्र त्यासाठी नेहमी प्रयत्न करतो! आपल्यापैकी प्रत्येकामध्ये एक नेता असतो, आपण त्यास ओळखले पाहिजे व त्यास नेतृत्व करु दिले पाहिजे. चला तर मग ज्येष्ठ या शब्दाचा खरा अर्थ जाणून तसे होण्यासाठी प्रयत्न करा याच माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत! या प्रवासात माझ्यासोबत राहिल्याबद्दल तुमचे आभार, आपली टिम  अधिक चांगली व्हावी म्हणून येत्या वर्षासाठी शुभेच्छा.

संजय व नितीनसंजीवनी टिम,