Wednesday, 25 January 2012

घर बनविताना


 

 

 

 

जर आपण हृदयापासून काही घडवलं तर सर्व काही सुरळीत होतं आणि डोक्याने घडवलं तर काहीच नी होत नाही... प्रचलित वाक्प्रचार

प्रत्येक वेळी एखाद्या नव्या काँप्लेक्स किंवा इमारतीचे नियोजन करताना, यासाी खरंतर घर हा अधिक योग्य शब्द आहे, विचार करतो की मी कशाला सर्वाधिक प्राधान्य द्यायला हवं? क्लब हाउसला किंवा पार्ी लॉनला का स्विमिंग पूलला किंवा प्रवेशाच्या लॉबीला ज्यामुळे काँप्लेक्स अधिक विक्रीयोग्य होतो किंवा त्याची किंमत वाढते किंवा लोकांच्या दृष्ीने ते जे घर खरेदी करणार ते अधिक सोयीचे होण्यासाी नियोजन करावे? लोक घर खरेदी करताना नेमकं त्यामध्ये काय पाहतात हा अतिशय गुंतागुंतीचा प्रश्न आहे!

अगदी तसेच जसे स्त्रिचं मन जाणून घेणं अतिशय अवघड असतं, जे  कदाचित देवही करु शकणार नाही!
विनोदाचा भाग सोडला तर वर्तमानपत्रं उघडून पहा आणि मी वर उल्लेख केल्याप्रमाणे कुल्याही गृहनिर्माण प्रकल्पामध्ये अधिकाधिक सुविधा देण्याची स्पर्धा लागलेली दिसून येते, त्यामध्ये योगासाी स्वतंत्र खोली वगैरेसारख्या नाविन्यपूर्ण सुविधांचाही समावेश असतो! ग्राहकांसाी हे नक्कीच चांगलं आहे, मात्र अशा जाहिराती देणाऱ्या सर्वांबद्दल पूर्ण आदर राखून मला सांगावंसं वातं की आपली उत्पादने विकण्यासाी हे आवश्यक असलं तरी त्यामुळे कुेतरी घराऐवजी इतर गोष्ींवर अधिक लक्ष दिलं जातं! कारण सरते शेवी व्यक्ती त्या चार भिंतीमध्ये राहणार असते ज्याला ती घर म्हणते आणि त्या गृहनिर्माण प्रकल्पातील इतर सुविधांमध्ये राहणार नसते हे तथ्य आपण समजून घेणे अतिशय आवश्यक आहे. एक  खरोखर आरामदायक घर म्हणजे ज्या घरात तुम्हाला खरोखरच आरामदायक वातं, आराम म्हणजे हिवाळ्यासारखा असतो तो तुम्ही अनुभवावा लागतो त्याचं शब्दात वर्णन करता येत नाही! हा अनुभव कसा देता येईल याचा आपण विचार करु शकतो आणि इथेच घरांचं नियोजन करण्याची वेळ येते. आपल्याला घरातील प्रत्येक खोली कशी वापरली जाणार आहे आणि तिचा इतर खोल्यांशी काय संबंध आहे हे समजून घेणं आवश्यक आहे, कारण त्यांचा एकत्रित परिणाम साधला जाऊन घर चांगलं किंवा वाई बनतं.
यािकाणी घरासाी नियोजनाचा प्रश्न येतो. प्रत्येक खोलीचा हेतू जास्तीत जास्त पूर्ण झाला पाहिजे, झोपण्याच्या खोलीचे उदाहरण घ्या ती फार लहान नको फार मोी नको, पण त्यामध्ये योग्य आकाराचा पलंग मावला पाहिजे, आणि त्याच्या आजूबाजूला पुरेशी जागा सोडता आली पाहिजे. बसण्यासाी जागा किंवा इतर सुविधा वगैरे बाबी नंतर येतात, तुम्ही कुल्या श्रेणीतील ग्राहक बघत आहात यावर ते अवलंबून असतं. मात्र बहुतेक ग्राहकांच्या वर उल्लेख केल्याप्रमाणे किमान अपेक्षा असतात आणि हो व्यवस्थित नैसर्गिक सूर्यप्रकाश आणि खेळती हवा घरातील प्रत्येक खोलीसाी हवी असते. थोडासा एकांतही आवश्यक असतो कारण वाड्यातून सदनिकेमध्ये राहायला आल्यानंतर सामाजिक जीवनातही फरक पडतो, त्यामुळेच आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घराबद्दलच्या अपेक्षाही बदलतात. आपले घर आपल्या संस्कृतीचे प्रतिबिंब असते, शहराच्या जुन्या भागात आपण पाहायचो की एकत्रपणाला सर्वाधिक महत्व दिलं जायचं त्यामुळेच वाडा किंवा चाळीच्या प्रवेशापासून ते कपडे धुण्याची जागा आणि मध्यभागी असलेल्या चौकापर्यंत, बहुतेक जागा ही सामायिक वापरासाी असायची! आता दिवस बदलले आहेत आणि आपल्या घराकडून असलेल्या अपेक्षाही बदलल्या आहेत आणि सध्याच्या घरांचे नियोजन करताना हे दिसून आले पाहिजे.
बऱ्याचदा आपण गच्ची असलेल्या सदनिकांची जाहिरात देतो आणि आजकाल बहुतेक सदनिकांना बेडरुम किंवा लिव्हिंगला जोडून एक लहानशी गच्ची असते. ती अतिशय आवश्यक आहे कारण तुमच्या घराला जोडून अशी एखादी जागा असणे आवश्यक आहे जिथून तुम्ही निवांतपणे आकाश न्याहाळू शकाल. मात्र आपण त्याचा उपयोग पाहतो का म्हणजे तिथे तुम्हाला एकांत मिळतो आहे का नाहीतर तुम्ही गच्चीवर सकाळी चहाचा कप घेऊन उभे आहात आणि संपूर्ण इमारत तुम्हाला पाहू शकते!
तुम्हाला असं आवडेल का? मला तर नक्कीच आवडणार नाही आणि जेव्हा नियोजक अशा बारकाव्यांकडे लक्ष देतात तिथेच त्यांचे कौशल्य दिसून येते आणि ते गच्ची अशा प्रकारे बांधतात की तुम्हाला थोडासा एकांत मिळेल. यामुळे ज्या हेतूने गच्ची बांधण्यात आली आहे तो पूर्ण होतो.
घरातील खोल्यांचा परस्पर संबंधही असाच एक घक आहे. प्रत्येक खोलीमध्ये एकांत मिळावा आणि ती इतर खोल्यांशी सहजपणे जोडलेली असावी.
हे थोडेसे अवघड आहे आणि यातच नियोजनातील खरे आव्हान आहे. सतत वाढत्या किंमतींमुळे सदनिकेचा प्रत्येक चौरस इंच महत्वाचा असतो, कारण त्याला/तिला त्यासाी पैसे खर्च करावे लागतात. हे तथ्य लक्षात ेवून आपल्याला घराची रचना करावी लागते म्हणजे आपण खरेदीदाराला त्याने घरासाी खर्च केलेल्या प्रत्येक रुपयाचे मूल्य देऊ शकू! घराच्या या घकाविषयी ग्राहकाला जागरुक करणे, त्याला माहिती देणे अतिशय महत्वाचे आहे. त्यासाी विकासक म्हणून आपण एक गोष् लक्षात घेतली पाहिजे की आपण एक असे बांधकाम करणार आहोत ते अनेकांचे घर असणार आहे! विविध सुविधा आणि वैशिष््यांच्या अनुषंगाने घराची रचना व्हायला नको, तर घराच्या अनुषंगाने सर्व सुविधांची निर्मिती व्हायला हवी. खरेदीदार म्हणून व्यक्तिने विचार करायला हवा की तो/ती जे घर खरेदी करणार आहेत त्यामध्ये ते काय पाहताहेत, सुविधा की एक निव्वळ घर ज्यामध्ये तुमचा सर्वाधिक काळ तुम्ही घालवणार आहात आणि हे सर्व खरेदी करण्यासाी तुम्ही काय किंमत मोजताहात! घर हा प्रकल्पाचा आत्मा हवा आणि आता त्यातील अंतर्गत नियोजन ग्राहकाचा वापर डोक्यात ेवून करण्यात यावे केवळ घराचा परिसर आणि घरातील बारकावे यांच्याकडे लक्ष देऊन चालणार नाही!
सर्वात शेवचे म्हणजे घर तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल एवढे मोे हवे आणि तुम्हाला त्याची देखभाल करता येईल आणि त्याचा पुरेपूर वापर करता येईल एवढे लहान हवे! त्याचसाी व्यक्तिने वरील अवतरणात म्हल्याप्रमाणे केवळ डोक्याने नाही तर हृदयाने विचार करायला हवा. कारण हेच एक असे उत्पादन आहे ज्यामध्ये पिढ्यान् पिढ्या भावना जपल्या जाणार आहेत ज्या केवळ हृदयानेच समजून घेता येतील आणि डोक्याने त्याची अंमलबजावणी करता येईल! विकासकाचे हेच काम आहे!

संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

एन्व्हो-पॉवर समिती, सीआरईडीएआय, पुणे