Friday 28 May 2021

जागतिक जैवविविधता दिन,मानव व बांधकाम व्यवसाय!

 




















 














प्राणी संग्रहालयामध्ये केवळ काही प्रजातींचे संरक्षण करून किंवा हरित पट्टे किंवा राष्ट्रीय अभयारण्ये सुरक्षित ठेवून जैव विविधता राखता येत नाही. निसर्गाचे कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी याहूनही अधिक काही हवे असते. तो स्वतःची काळजी घेऊ शकतो, त्यासाठी त्याला कोणत्याही मानवी हस्तक्षेपाची, प्राणी संग्रहालयाच्या व्यवस्थापकांची, वनसंरक्षकांची, वन्यप्रेमींची किंवा जनुक संग्रहाची गरज नसते. त्याला त्यासाठी निसर्गात केवळ स्वतः च्या थोड्या जागेची गरज असते”.... डॉनेला मेडोज

डॉनेला हॅगर डॅना ही एक अमेरिकन पर्यावरण वैज्ञानिक, शिक्षणतज्ञ लेखिका होती. ती लिमिट्स टू ग्रोथ अँड थिंकींग इन सिस्टीम: प्रायमर नावाच्या पुस्तकाची मुख्य लेखिका म्हणून ओळखली जाते. म्हणूनच तिने वरील अवतरणातून माणसांकडूनच जैव विविधतेला असलेल्या धोक्याविषयी अतिशय सोप्या सरळ शब्दात सांगितले आहे यात आश्चर्य नाही. तर आज २२ मे आहे, जागतिक जैवविविधता दिवस म्हणून हा दिवस साजरा करतात. मला कल्पना आहे की अनेक जणांना त्यात काही विशेष वाटणार नाही, हा सुद्धा वन्यजीवन दिवस, जंगल दिवस किंवा व्याघ्र दिवस यासारखाच आणखी एक दिवस आहे असे त्यांना वाटेल. नेहमीप्रमाणे प्रसिद्ध व्यक्ती किंवा नेते, समाज माध्यमांवर प्राणी पक्ष्यांची काही चित्रे किंवा छायाचित्रे टाकतील. सध्या संपूर्ण देशात लॉकडाउन आहे त्यामुळे सरकारी कार्यालयांमध्ये किंवा आपल्या लोकप्रतिनिधींद्वारे वृक्षारोपण नामक फॅशन शो होणार नाही. शालेय विद्यार्थी आनंदात असतील कारण त्यांना वृक्षारोपण कार्यक्रमाचे पाहुणे येईपर्यंत असह्य उकाड्यात ताटकळत बसावे लागणार नाही. जैवविविधता किंवा प्राणी किंवा निसर्गाशी संबंधित आणखी एका दिवस असाच आला आणि गेला. मी सामान्य लोकांना दोष देत नाही कारण ज्या देशामध्ये जिवंत माणसांच्या सार्वजनिक आरोग्याकडे इतके दुर्लक्ष केले जाते की लोक ऑक्सिजनची कमतरता, खाटांचा अभाव यामुळे मरताहेत, तिथे काही झाडे, पक्षी, प्राणी किंवा त्यांच्या निवासस्थानाची काळजी कुणाला असेल, नाही का? मात्र या साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर जैवविविधता दिवसाचे आणखीनच महत्त्व आहे. साथीच्या रोगाने आपल्याला जीवनाचे अनेक रंग दाखवले (म्हणजे शिकवले) त्यातला एक म्हणजे आपली रोगप्रतिकार क्षमता किंवा प्रतिकार शक्ती नेमके याचसाठी जैवविविधता दिवसासारखे दिवस पूर्वीपेक्षाही अतिशय महत्त्वाचे आहेत. मला माहिती आहे की आता बऱ्याच लोकांच्या कपाळाला आठ्या पडतील कुणा वेड्या पर्यावरणवाद्याचा किंवा निसर्गप्रेमी माणसाचा आणखी एक तर्क असे ते म्हणतील. मी अजूनही अशी शेरेबाजी करणाऱ्यांना दोष देत नाही कारण सर्वप्रथम वर्षानुवर्षे शतानुशतके आपल्या शासनकर्त्यांनी जैवविविधतेच्या बाबतीत आपली फसवणूक केली आहे (आपणही आपली केली आहे). आता आपण अचानक तिचे संवर्धन करण्याविषयी बोलतोय (केवळ बोलतोय).

तुम्ही मला नावं ठेवण्याआधी किंवा मला काही विशिष्ट उपाधी (दुराग्रही किंवा दुतोंड्या किंवा तत्सम काहीतरी) देण्याआधी किमान जैवविविधता याचा नेमका काय अर्थ होतो हे समजून घेऊ त्यानंतर तुम्ही त्याचे महत्त्व किंवा आत्ताच्या साथींविषयीचा माझा तर्क तिचा आपल्या एकूणच जीवनावर होणारा परिणाम तसेच तिचे संवर्धन करण्याचे आपले कर्तव्य याविषयी ठरवू शकता. याआधी, मी तुम्हाला दहा प्रश्न विचारणार आहे हे प्रश्न विशेषतः चाळीशी पार केलेल्यांसाठी आहेत. कारण या शतकात जन्मलेल्या, अँड्रॉईड वायफायचे बाळकडू घेतलेल्या मुलांनी केवळ मानवनिर्मित उद्यानांमध्येच जैवविविधता पाहिली असल्याने त्यांना माझे प्रश्न समजणारही नाहीत. चला तर मग सुरुवात करुयात... मी माझ्या प्रश्नांची उत्तरे प्रश्नाच्या खालीच लिहीली आहेत, तुम्ही तुमच्या उत्तरांची तुलना त्यांच्याशी करून पाहू शकता, कारण त्यामधील अनुभव किंवा आठवणी हीच खरी उत्तरे आहेत...

१.     1. .तुम्हाला शाळेत जाताना रस्त्याच्या दुतर्फा तेरडा, झिनिआ झेंडू यासारखी हंगामी फुले पाहिल्याचे आठवते आहे का तुम्ही ती फुले तोडून कधी घरी आणली आहेत का? 

माझे उत्तर : मी आठवते आहे, मला दररोज शाळेत जाताना रस्त्याच्या कडेला अशी फुले दिसत.

 2. तुम्ही या फुलांवर बसलेल्या फुलपाखरांच्या मागे धावला आहात का तुम्ही एखादा सुरवंट पाहिला आहे का तो काडेपेटीत ठेवला आहे का?

माझे उत्तर: मला आठवते आहे मी अनेकदा सुरवंटाच्या केसाळ लव असलेल्या त्वचेला स्पर्श करायचा प्रयत्न केलाय, मला त्यामुळे संसर्ग होईल अशी भीती वाटायची, पण मला कुठला संसर्ग कधी झाला नाही.

३.    3.पटांगणावर अनवाणी पायाने खेळत असताना कधी तुमच्या पावलात काटा रुतलाय का?

माझे उत्तर: माझ्या रुतलाय दर आठवड्याला माझ्या पावलात रुतलेला काटा सुईने काढणे हे माझ्या बाबांचे कामच असे ते ज्याप्रकारे तो काढत असत त्यामुळे तो अनुभव वेदनादायी होतो.

.   4.  तुम्ही कधी जांभळे, बोरे किंवा आंबे (मी कवठ, रामफळ किंवा जंगली चिक्कू यासारख्या फळांविषयी किंवा महुआच्या फुलांविषयी विचारण्याचे धाडसही केलेले नाही) यासारख्या शेतातील रस्त्यांवरील झाडांवरून फळे तोडली आहेत का किंवा दगड फेकून ही फळे तोडण्याचा प्रयत्न केला आहे का?

माझे उत्तर: होय, मी केला आहे प्रत्येक हंगामात आजूबाजूच्या झाडांवरून वेगवेगळी फळे मिळत असत.

५.    5. तुम्ही एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारणाऱ्या माकडांच्या झुंडीचा पाठलाग केला आहे का, जे धान्याची किंवा तुमच्या आईने तुमच्या घराच्या किंवा इमारतीच्या गच्चीत घातलेल्या वाळवणाची नासधुस करत असत?

माझे उत्तर: मी केलाय, माझ्या बालपणीचा तो सर्वात आवडता उद्योग होता, अर्थात आईला ते अजिबात आवडायचे नाही.

६.    6.तुम्ही तळ्यात किंवा डबक्यात पावसानंतर चिखलात खेळला आहात का पावसानंतर सर्वात ओळखीचा आवाज कोणता असायचा?

माझे उत्तर: मी पावसामुळे तयार झालेल्या डबक्यात मनसोक्त खेळलोय, ज्यामुळे माझे कपडे चिखलाने बरबटून जायचे मला पावसानंतर आठवणारा सर्वात सुंदर आवाज म्हणजे बेडकाची डराँव डराँव”!

७.    7. तुम्ही पावसाळ्याला सुरुवात झाल्यावर आळ्या लाल रेशमी किड्यांचे निरीक्षण केले आहे का यामुळे शाळेत जायला उशीर झाला आहे का?

माझे उत्तर: मी असा प्रत्येक किडा पकडण्याचा प्रयत्न केला आहे अशा निरर्थक गोष्टींमध्ये वेळ घालवल्याबद्दल वर्ग शिक्षकांनी मला शिक्षाही केली आहे (आजच्या मुलांसाठीही ही सामान्य गोष्ट आहे).

८.     8.तुमची शाळा तुम्हाला शेत, जंगल, जलाशय किंवा तत्सम ठिकाणी सहलीसाठी घेऊन गेली आहे का?

माझे उत्तर: होय मी शाळेच्या अशा सहलींना आवर्जून गेलो आहे या सहलींमध्ये आम्हाला किडे, झाडे, गवत, चिखल यासारख्या गोष्टींमध्ये मनसोक्त वावरण्याची मुभा असायची.

९.     9. तुम्ही विहीर, तळे किंवा नदी यासारख्या नैसर्गिक स्रोतांमधून थेट पाणी प्यायले आहे का (ॲक्वा गार्ड किंवा उकळते पाणी यासारख्या गोष्टींचे नाही)?

माझे उत्तर: मी प्यायलोय कारण माझ्या घरी एक विहीर होती आमची पाण्याची गरज ही विहीरच भागवायची. आम्ही आधी बादलीने नंतर विजेवर चालणाऱ्या पंपाने पाणी काढत असू.

१110.तुम्ही किमान एक तरी झाड लावले आहे का त्याला मोठे होताना पाहिले आहे का?

माझे उत्तर: होय मी एकच नाही तर अनेक झाडे लावली आहेत ती मोठी होताना पाहिली आहेत. तो केवळ माझा व्यवसाय (बांधकाम व्यावसायिक म्हणून) असल्यामुळे नाही, तर एक व्यक्ती म्हणूनही मी झाडे लावली आहेत. 

वरील प्रश्नांची तुमची पन्नास टक्के उत्तरे माझ्याशी जुळत असतील तर तुम्हाला जैवविविधता म्हणजे काय हे समजेल कारण तुम्हाला फक्त ती माहितीच नसेल तर तुम्ही ती प्रत्यक्ष जगला असाल. जैवविविधता ही झेनतत्वज्ञानासारखी असते, ती तुमच्या अवतीभोवती सदैव असते त्यामुळे तुम्ही त्यात जगत आहात याची तुम्हाला जाणीवही नसते. असो, तर आता या लेखाच्या शीर्षकात म्हटल्याप्रमाणे बांधकाम व्यवसाय, माणसे जैवविविधता एकमेकांशी कसे निगडित आहेत असा प्रश्न अनेकांना पडला असेल (विशेषतः बांधकाम उद्योगाशी संबंधित व्यक्ती). इथेही नेहमीप्रमाणे नाण्याच्या दोन बाजू आहेत किंवा पक्ष आहेत, एक सगळ्या गोष्टींचे खापर रिअल इस्टेटवर फोडेल दुसरा निसर्ग प्रेमी किंवा तथाकथित पर्यावरणवाद्यांवर. म्हणूनच आपण जैवविविधता म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे, जैवविविधतेच्या शेकडो व्याख्या असतील, मात्र माझ्या मते जैवविविधता म्हणजे निसर्गामध्ये असलेली विविधता जी आपल्याला वेगवेगळ्या जीवांच्या स्वरुपात निःशुल्क उपलब्ध असते ( जी आपण वाया घालवतो ). मग ती काहीही असू शकते एखादा किडा, पक्षी किंवा मासा सुद्धा. तसेच आपण माणसेही या जैवविविधतेचाच एक भाग आहोत आपल्यातही अनेक रंग, आकार विचार दिसून येतात! म्हणूनच एक लक्षात ठेवा जेव्हा आपण जैवविविधतेचे संवर्धन करण्याविषयी बोलतो तेव्हा केवळ माणूस नावाची प्रजातीच नाही तर प्रत्येक प्रकारच्या जीवाचे संवर्धन करणे असा त्याचा अर्थ होतो. इथेच विज्ञानाची माणसाची भूमिका महत्त्वाची आहे. आपण एकमेव अशी प्रजाती आहोत जिच्याकडे प्रगल्भ बुद्धिमत्ता आहे (किमान असा समज आहे) आपण ही बुद्धिमत्ता आपले आयुष्य अधिक सुखकर होण्यासाठी इतर प्रत्येक प्रजातींपेक्षा श्रेष्ठ होण्यासाठी वापरली. ज्याप्रमाणे निसर्गाने सजीवांमध्ये जैवविविधता निर्माण केली, त्याचप्रमाणे आपण यंत्रांची जैवविविधता निर्माण केली. तुमचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नसेल तर मायक्रोचिप्सपासून ते विमानापर्यंत मानवनिर्मिती गोष्टी काय आहेत, त्या सगळ्या जसे निसर्गाने अगदी किड्या मुंग्यांपासून ते महा:काय देवमाशापर्यंत ज्याप्रमाणे जैवविविधता निर्माण केली आहे त्याचप्रमाणेच नाहीत का? माणसाने आपला आराम, आपले घर, आपले संवर्धन यासारख्या गोष्टींच्या नावाखाली या वस्तू तयार केल्या आजही करत आहे, म्हणूनच जैवविविधतेच्या संदर्भात रिअल इस्टेटची भूमिका महत्त्वाची आहे. हा उद्योग माणूस नावाच्या प्रजातीसाठी घरे बनवतो या प्रक्रियेमध्ये जाणतेपणी किंवा अजाणतेपणी आपण इतर प्रजातींची घरे नष्ट केली आहेत करत आहोत यामुळे संपूर्ण जैवविविधतेचे संतुलन बिघडले आहे. याचा परिणाम म्हणून आज आपल्याला रोगप्रतिकारक्षमता ऑक्सिजनच्या पातळीविषयी काळजी करावी लागतेय, जी समस्या पूर्वी कधीच नव्हती. मी साथीच्या रोगाचा संबंध जैवविविधेशी लावत नाही मात्र आपण निसर्गाचा समतोल बिघडवल्यामुळे आपल्याला कुठल्या ना कुठल्या स्वरुपात त्रास होईल एवढा साधा तर्क त्यामागे आहे, बरोबरमी बांधकाम व्यावसायिकांना दोष देत नाही (मीही बांधकाम व्यावसायिकच आहे हे विसरून चालणार नाही) मात्र मी संपूर्ण रिअल इस्टेट उद्योगाला तसेच ग्राहकांनाही, तुम्ही जेव्हा घरे बांधता किंवा तुमचे घर खरेदी करता तेव्हा जैवविविधतेच्या या पैलूकडेही लक्षं द्या एवढेच आवाहन करेन.

निसर्गामध्ये माणसांमध्ये नेमका हाच फरक आहे, निसर्ग प्रत्येक सजीवाला स्थान देतो, माणूस मात्र केवळ स्वतःचाच विचार करतो म्हणून आपणच (माणूसच) आता जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी पूर्णपणे जबाबदार आहोत. जैवविविधतेचे जे अनेक दशकांपासून नुकसान झाले आहे ते भरून काढण्याचे महाकाय काम करण्यात रिअल इस्टेट उद्योगाशिवाय दुसरे कोण पुढाकार घेऊ शकेल? मी काही एखाद्या शहरातील कुणा ठराविक बांधकाम व्यावसायिकांना उद्देशून बोलत नाहीये तर जगभरातल्या रिअल इस्टेटशी म्हणजेच बांधकाम उद्योगाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीला उद्देशून बोलतोय. कारण लक्षात ठेवा जेव्हा आपण आपले घर, उद्योग, रस्ते, धरण किंवा पूल बांधताना पाया खणायला सुरुवात करतो तेव्हापासूनच इतर प्रजातींचे जीवन उध्वस्त करायला सुरुवात करतो, आपण एकप्रकारे त्यांच्या घरांवर अतिक्रमण करायला सुरुवात करतो. म्हणूनच असे नुकसान झाल्यास संतुलन साधण्याची या प्रजाती जगवण्याची, म्हणजेच त्यांच्यासाठी दुसरे वसतिस्थान (घर) तयार करण्याची जबाबदारी आपली आहे. विचार करा एखादे धरण, रस्ता किंवा विमानतळ बांधण्यासाठी जेव्हा फक्त काही लोकांचे स्थलांतर करायचे असते तेव्हा आपल्याला किती विरोध होतो इथे तर आपण हजारो प्रजातींचे स्थलांतर करण्याविषयी बोलत आहोत ज्यामध्ये झाडे गवताचाही समावेश होतो कारण या सगळ्यांची मिळून जैवविविधता तयार होते. हे या प्रजातींचे स्थलांतर करून किंवा त्यांच्यासाठी दुसरी जागा देऊन संवर्धन झाले, त्याचप्रमाणे जैवविविधतेचे पुनःस्थापन करण्याचीही गरज आहे आहे. त्यासाठी आपण इतर प्रजातींसाठी जागा ठेवून आपली घरे बांधली पाहिजेत. म्हणूनच मी वरील प्रश्न विचारले कारण जैवविविधता समजून घेण्यासाठी किंवा जगण्यासाठी तुम्हाला जंगलात जायची किंवा शहराबाहेर जायची आवश्यकता नाही, ती तुमच्या घरामध्ये किंवा त्याभोवतीही असू शकते, हे खऱ्या अर्थाने जैवविविधतेमध्ये जगणे झाले!

आपण कार, बाईक, जनरेटर, ट्रान्सफॉर्मर, मोबाईल टॉवर, ट्रान्सफॉर्मरसाठी खोली अशा अनेक निर्जीव गोष्टींसाठी जागा करून देतो, जेणेकरून आपल्या यंत्राची जैवविविधता सुरक्षित राहावी आपण त्यासाठी लाखो रुपये खर्च करू शकतो. मात्र आपण झाडासाठी जागा देऊ शकत नाही जो विशाल वृक्ष होतो अनेक सजीव प्रजातींची जैवविविधता तिथे रहिवास करू शकते. अर्थात याचा अर्थ असा होत नाही की कार खरेदी करू नका किंवा तुमच्या मोबाईल फोनशिवाय जगा. माझे केवळ एवढेच म्हणणे आहे की जेव्हा आपण आपल्या घरांचे नियोजन करतो तेव्हा अगदी मुंग्या फुलपाखरांसह इतर प्रत्येक सजीव प्रजातींसाठीही सोय करा, जैवविविधता दिवस साजरा करण्याचा हाच खरा मार्ग आहे. अगदी लहान गोष्टींमुळे सुद्धा मोठा फरक पडू शकतो, उदाहरणार्थ प्रकल्पाच्या जमीनीवर सध्या उभी असलेली झाडे कापणे टाळा, पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी जागा ठेवा, पक्ष्यांना दाणा-पाण्यासाठी जागा ठेवा, फळझाडे लावा ( ती वाढवा), आजूबाजूला लहानसा नैसर्गिक पाणवठा असू द्या नैसर्गिक जमीनीचे आच्छादन आपल्याला शक्य होईल तितके तसेच राहू द्या. रिअल इस्टेटमधील सहकाऱ्यांनो, आपण माणसांसाठी अतिशय उत्तम घरे बांधत असल्याचा आपल्याला (आपल्यापैकी बहुतेकांना) अभिमान वाटतो. मात्र हे करताना इतर सजीव प्रजातींचे घर सुरक्षित ठेवण्याची आपली जबाबदारी आहे. एक लक्षात ठेवा, घर ही अशी जागा असते जिथे प्रत्येकाला प्रेमाने सामावून घेतले जाते, काळजी घेतली जाते समजून घेतले जाते यातली प्रत्येकालाची व्याख्या समजून घेणे हे पहिले पाऊल आहे, जे जैवविविधतेचे आपलेही भवितव्य ठरवेल!


संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स 

smd156812@gmail.com