Friday 7 May 2021

अजून एका वाघिणीची शिकार !

 















तू स्वतःसाठी शिकार करू शकतोस, तुझ्या मित्रमंडळींसाठी शिकार करू शकतोस तुझ्या बछड्यांसाठी सुद्धा शिकार करू शकतोस कारण त्यांना त्याची गरज असते; मात्र कधीही केवळ शिकारीच्या आनंदासाठी शिकार करू नकोस सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सात वेळा सांगतोय, कधीही माणसाला मारू नकोस.”... रुडयार्ड किपलिंग

मला आज अनेक दिवसांनी या महान माणसाचे अवतरण वापरता आले शिकार हा विषय असल्यामुळे ते अतिशय समर्पकही आहे. रुडयार्ड किपलिंग यांनी मोगली जंगलबुक यासारख्या त्यांच्या अतिशय लोकप्रिय पुस्तकातून जगाला भारतीय जंगलांची ओळख करून दिली. जंगलबुकाच्या कथानकाला मध्य भारतातील जंगलांची (कान्हा पेंच दोन्ही आमचेअसा दावा करतात) पार्श्वभूमी आहे. किपलिंग यांना कोणत्याही माणसापेक्षा वन्य जीवनाची भाषा अधिक चांगल्याप्रकारे कळते यात शंका नाही. त्यांचे वरील शब्द हे कुणा माणसाचे नाहीत तर बघिरा या चित्त्याचे आहेत, जो जंगलबुकमधील वन्य प्राण्यांमध्ये वाढलेल्या मोगली नावाच्या मुलाचा मार्गदर्शक असतो. तोच त्याला जंगलात जगण्याचे नियम शिकवतो. जंगलबुक साधारण पन्नास वर्षांपूर्वी लिहीले होते. त्यावेळीही माणसे प्राण्यांमध्ये संघर्ष होताच. मात्र तेव्हाही प्राण्यांकडे जी बुद्धिमत्ता होती ती माणसाकडे अजूनही नाही ही दुःखद गोष्ट आहे वन्य जीवन संवर्धनातील मुख्य समस्या आहे.  बघिरा मोगलीला म्हणतो की शिकारीच्या आनंदासाठी कुणालाही मारू नकोस माणसाची शिकार कधीच करू नकोस (सात वेळा लक्षात ठेव म्हणजे कधीही विसरू नकोस) आजही वाघ, साप किंवा बिबट्या अथवा कोणताही प्राणी जोपर्यंत त्यांच्या जिवावर बेतत नाही (मग शिकारीमुळे किंवा भुकेमुळे किंवा काही बाबतीत अपघाताने) तोपर्यंत कधीच आपणहून माणसाची शिकार करत नाहीत, मानवी अवयवयांच्या तस्करीसाठी तर निश्चितच नाही.

किपलिंग यांनी जे काही लिहीले आहे त्याचे वन्य प्राणी वैयक्तिकपणे तसेच सामूहिकपणेही पालन करतात. मात्र माणसे स्वतःचे नियम बनवतात, त्यांच्या वैयक्तिक इच्छेनुसार त्याची अंमलबजावणी केली जाते कारण आपल्या नियमांना क्वचितच कायद्याचे स्वरूप येते या कायद्यांचे पालन ही दुर्मिळ बाब असते, विशेषतः जेव्हा ते इतर प्रजातींशी संबंधित असतात. माझा आजचा लेख (पुन्हा पुन्हा) वाघाच्या विशेषतः एका वाघिणीच्या शिकारीबद्दल आहे. ती गरोदर होती तिच्या गर्भात चार बछडी होती, मात्र माणसांची तिची निर्घृण शिकार केली. यावर अनेक जण म्हणतील की शिकार झालेला वाघ होता किंवा वाघीण होती, ती गरोदर होती किंवा नव्हती याने काय मोठासा फरक पडतो. मला या प्रश्नामुळे आश्चर्य वाटणार नाही कारण जो समाज (यामध्ये आपल्या प्रत्येकाचा समावेश होतो) साथीच्या रोगांविषयीपण अतिशय निष्काळजी किंवा अज्ञानी आहे, ज्यामुळे लाखो लोकांचा जीव जात आहे, त्याच्याकडून जंगलातल्या गुहेत राहणाऱ्या, जगण्यासाठी शिकार करणाऱ्या वाघासारख्या प्राण्याविषयी एवढे तपशील माहिती असण्याची अपेक्षा करणे म्हणजे दिवास्वप्न पाहण्यासारखे आहे किंवा हा माझा मूर्खपणा आहे, एवढे मला आत्तापर्यंत समजले आहे.  मात्र तरीही मला सांगावेसे वाटते की माझ्यासारखे काही वेडे आहेत ज्यांना अजूनही इतर प्राण्यांची विशेषतः वाघाची काळजी वाटते. कारण आपल्या संपूर्ण देशाची लोकसंख्या जवळपास अब्ज ३५ कोटी एवढी आहे, मात्र वाघांची संख्या जेमतेम ३५०० आहे. वर नमूद केल्याप्रमाणे ज्या वाघिणीची शिकार झाली तिला चार बछडी झाली असती तर तिच्यासकट ते एकूण पाच वाघ झाले असते या पाच वाघांच्या मृत्यूची तुलना जवळपास १९ - २८ -५७१ माणसांच्या मृत्यूशी करता येईल, ही आकडेवारी देण्यासाठी मला माफ करा, मात्र माझे बोलणे खोटे वाटत असेल तर स्वतः हिशेब करून पाहा. यातला अगदी एखादा आकडा इकडे तिकडे केला तरीही जवळपास पाच वाघांचा मृत्यू ,९२,८५७ माणसांच्या मृत्यूएवढा आहे (मात्र  माझी आकडेवारी बरोबर आहे). माणसांच्या मृत्यूची अशी आकडेवारी समोर आल्यावर आपण संपूर्ण देशात सहा महिन्यांसाठी लॉकडाउन लावतो, सर्वोच्च न्यायालय आपणहून दखल घेत हस्तक्षेप करते सरकारला याप्रकरणी लक्ष घालण्याचे आदेश देते. पुन्हा मी अशी मूर्खासारखी तुलना करत असल्याबद्दल लोक हसतील, मात्र नक्की कोण मूर्ख आहे हे काळच सांगेल. जेव्हा आपल्या देशात एकही वाघ शिल्लक राहणार नाही तेव्हा निसर्ग बिबट्या आपले भविष्य ठरवेल. मात्र मी वर म्हटल्याप्रमाणे मी एकटाच वेडा नाही, माझ्यासारखे इतरही काही शिल्लक आहेत त्यामुळे वाघांसाठी आशा आहे मी केवळ वाघांचाच उल्लेख करत असल्याबद्दल तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, पण वन्य जीवनाच्या साखळीमध्ये वाघ हा शिखर स्थानी असतो कोणत्याही जंगलामध्ये वाघ (किंवा बिबट्या किंवा लांडगा) जिंवत राहिला तर वन्यजीवनाची संपूर्ण साखळी सुरक्षित राहते.

ओह मला माफ करा, माझा हा सगळा उद्वेग फेसबुकवर टाकण्यात आलेल्या एका बातमीमुळे होता. ही बातमी माझा निस्सीम वन्यजीवप्रेमी मित्र सरोश लोढी याने टाकली होती, तो फेसबुकवर क्लॉ नावाच्या वन्यजीव गटाचा संस्थापक सदस्य आहे. या बातमीच्या छायाचित्रात वाघिणीचा अंशतः जळालेला मृतदेह होता, महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये पांढरकवडा गावाजवळ एका गुहेमध्ये वाघिणीचे हे अवशेष आढळून आले, याचा अर्थ या गुहेत तिचे वास्तव्य होते. एक वनरक्षक दैनंदिन गस्त घालत असताना त्याला वाघीण गुहेत मृतावस्थेत आढळली. नेहमीप्रमाणे सर्वप्रकारचे दावे प्रतिदावे करण्यात आले होते, स्थानिक अधिकाऱ्यांची निवेदने तर अतिशय विनोदी होती (त्यांच्या मोठ्या कामाविषयी पदाविषयी पूर्णपणे आदर राखत हे विधान करतोय), सोबत जोडलेले बातमीचे कात्रण पाहा. अधिकाऱ्याला ती गरोदर आहे किंवा नाही याची खात्री नव्हती, तिची शिकार झाली किंवा तिचा नैसर्गिक मृत्यू झाला हे माहिती नव्हते, बातमीमध्ये असेही म्हटले होते की वाघिणीचे पंजे तोडून नेले होते. गुहेच्या तोंडाशी आग लावलेली होती तसेच वाघिणीच्या अंगावर तसेच मानेभोवती भोसकल्याच्या स्पष्ट खुणा होत्या. शवविच्छेदन अहवाल नक्कीच आवश्यक असला तरीही महिनाभर स्थानिकांनी या वाघिणीला आजूबाजूला फिरताना पाहिले होते वनरक्षकांना गरोदर वाघीण कशी ओळखायची हे नक्कीच समजते कारण तिच्या पोटात चार बछडे होते. मात्र तरीही आपण तिला काहीही संरक्षण दिले नाही कारण हे संरक्षित जंगल नव्हते त्यामुळे इथे मानवी हस्तक्षेप होणे अपरिहार्य होते, नाही का? हा केवळ वाघिणीच्याच नाही तर आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेचाही मुद्दा आहे कारण सुदैवाने सकृतदर्शनी तरी हे अवैध शिकारीचेच प्रकरण दिसत आहे. मात्र हा अपघातही होऊ शकला असता, कारण वाघिणीने चुकून एखाद्या निष्पाप व्यक्तीवर हल्ला केला असता उदाहरणार्थ लाकूडफाटा गोळा करायला येणारी बाई किंवा गुहेच्या अगदी जवळ गाईचे शेण गोळा करायला गेलेले एखादे लहान मूल किंवा वाघीण पाणवठ्यावरून येत असताना तिच्या वाटेत आल्याने ते मारले गेले असते. अशा वेळी त्या मृत व्यक्तीच्या नवऱ्याने किंवा वडिलांनी चिडून वाघिणीची शिकार करण्यासाठी तिचा शोध घ्यायचा प्रयत्न केला असता तर मी त्यांना दोष दिला नसता, त्याची परिणतीही शेवटी तशीच झाली असती केवळ तिच्या अवयवांची विक्री झाली नसती, जी या प्रकरणामध्ये झाली आहे.

माझी त्या मृत वाघिणीला, अशा वाघिणीच्या अवतीभोवती लागणाऱ्या लोकांना पूर्णपणे सहानुभूती आहे माझी वन कर्मचाऱ्यांना अंशतः सहानुभूती आहे जे व्याघ्रप्रकल्पाबाहेर काम करतात, मात्र तरीही त्यांना वाघांसंदर्भातील मुद्दे हाताळावे लागतात. मी अंशतः सहानुभूती असे म्हटले आहे कारण एक म्हणजे वन विभागाला नेहमी माय बाप सरकारकडून सावत्रपणाची वागणूक दिली जाते विशेषतः लाडक्या व्याघ्र प्रकल्पातील वगळता इतर कर्मचाऱ्यांना. विचार करा तुम्ही वन रक्षक आहात तुमचे काम केवळ वाघांचे माणसांपासून रक्षण करणेच नाही तर माणसांचेही वाघांपासून रक्षण करणे हे आहे तुमच्याकडे ते करण्यासाठी अधिकार किंवा क्षमता (किंवा यंत्रणा) दोन्हीही नाहीत, अशावेळी तुम्ही काय कराल? तुम्ही नेहमी घालता तशी ही गस्त नसते, तुम्हाला एका वाघिणीचे रक्षण व निरीक्षण करायचे असते जी गरोदरही आहे, तिला स्वतःची पोटातील बाळांची भूक भागवायची आहे. तुमच्याकडे स्वसंरक्षणासाठी एखादी बंदुकही नसते किंवा ती ज्या जागी लपलेली आहे तो भाग वन रक्षकांनी वेढण्याएवढे त्या जागेच्या साधारण अर्ध्या किलोमीटरच्या टप्प्यात कुणालाही जाण्यापासून रोखण्याएवढे मनुष्यबळही नाही ही परिस्थिती दिवसाढवळ्या आहे. रात्री तुम्ही काहीच पाहू शकत नाही तुम्हाला माहितीय वाघीण अंधारामध्ये स्पष्टपणे पाहू शकते, प्राण्यांना त्रास होऊ नये म्हणून तुम्ही विजेरीही वापरू शकत नाही, तसेच शिकाऱ्यांची संख्या किती आहे, ते कोणत्या हत्यारांनी सज्ज आहेत हे तुम्हाला माहिती नसते. वाघ तसेच शिकारी तुम्ही त्यांच्या कामात अडथळा आणला तर तुमच्यावर हल्ला करायला तयार असतात. अशा परिस्थितीमध्ये आपल्यापैकी कितीजण वाघिणीला संरक्षण देण्याचे काम पूर्णपणे समर्पित होऊन करतील? त्यानंतर मुद्दा येतो तो कारवाईचा, कारण या अवैध शिकाऱ्यांना अटक झाली ही सुद्धा बातमी आली होती. मी माननीय न्याय व्यवस्थेला विनंती करतो की कृपया पोटात चार बछडे असलेल्या गरोदर वाघिणीची शिकार करणाऱ्या अवैध शिकाऱ्यांवर कारवाई करताना मी वर नमूद केलेली वाघ विरुद्ध माणसांच्या संख्येची आकडेवारी लक्षात घ्या तोच तर्क माणसांद्वारे मारल्या जाणाऱ्या इतर वन्य प्राण्यांसाठीही वापरा. तुमच्या कायद्याच्या पुस्तकांमध्ये जे काही लिहीले आहे त्याच्या पलिकडे तुम्हाला जाता येत नसेल तर ते कृपया कायदे बदला !

मला माहितीय अनेक वन्यजीव प्रेमींना माझा वन विभागाविषयीचा तर्क अजिबात पटणार नाही मात्र त्यामुळे वस्तुस्थिती बदलत नाही, म्हणूनच मी असे म्हटले की मला वन विभागाविषयी अंशतः सहानुभूती वाटते कारण ही परिस्थिती त्यांनी आपणहूनच निर्माण केलेली आहे. ते पुरेसे मनुष्यबळ मिळावे तसेच प्रत्येक वन कर्मचाऱ्याला बंदुका किंवा सुरक्षा आवरणासारखी साधने (केवळ उदाहरणादाखल देतोय) मिळावीत अशी मागणी का करत नाहीत? दुसरीकडे आपण व्याघ्र प्रकल्पाची उपग्रहामार्फत टेहळणी करण्यासारख्या गोष्टींविषयी चर्चा करतो, आपण खरोखरच अतिशय दयनीय आहोत. विचार करा एकटा वनरक्षक जो स्थानिकांमध्ये राहतो, ज्यातील काही अवैध शिकारी असतात त्याचे जवळपास निम्म्या गावकऱ्यांशी नातेसंबंध असतात, अशावेळी तुम्ही एकच वन रक्षक अख्ख्या गावाविरुद्ध जाईल अशी अपेक्षा कशी करू शकतात्याचप्रमाणे, हे जंगलाच्या आसपासचे एक लहान ठिकाण असते (बहुतेक वस्ती किंवा वसाहत असते) अगदी जंगली रानडुक्कराची सुद्धा  शिकार दुर्लक्षित राहात नाही, अशावेळी तुम्ही हे होऊच कसे देता रानडुक्करांसाठी लावलेल्या सापळ्यात अडकून वाघिणीला इजा होण्यासारखे आणखी नुकसान होऊ नये म्हणून तुमच्या वरिष्ठांना का कळवले नाही,( कारण वाघीण अशाच एका सापळ्यात अडकून जखमी झाली असावी, असे एका सन्मानीय वन अधिकाऱ्याचे विधान होते) त्याचप्रमाणे वाघिणीने त्या गुहेमध्ये एका रात्रीत  नक्कीच  राहायला सुरुवात केली नाही, बरोबर? ती किमान काही महिन्यांपासून तरी या गुहेमध्ये राहात असावी जंगलाच्या त्या भागात दिसली असावी, भटकत असावी. वनविभागासह अनेकांना तिच्या अस्तित्वाची कल्पना असावी. या वाघिणीविषयी स्थानिक लोकांमध्ये कोणते जागरुकता कार्यक्रम आयोजित करण्यात आले हे मला जाणून घ्यायचे आहे. त्याचप्रमाणे, सर्व स्वयंसेवी संस्थांच्या कामाबाबत पूर्णपणे आदर राखत मला असे विचारावेसे वाटते की आपण अभयारण्यांना भेटी देणे, छायाचित्रे काढणे, वनरक्षकांना गाईडना टी-शर्ट कॅप (अन्नाची पाकिटेही) वाटणे याव्यतिरिक्त आणखी काय करत होतो किंवा करत आहोत? मात्र त्या गुहेमध्ये वाघिणीचे वास्तव्य आहे ज्याप्रमाणे आपल्याला तिच्यापासून संरक्षण हवे आहे, त्याचप्रमाणे तिलाही आपल्याकडून संरक्षणाची गरज आहे याची भोवतालच्या रहिवाश्यांना जाणीव करून देण्याचे काय; वाघीण मारली जाईपर्यंत आपण कुठे होतोवाघाची शिकार झाल्यानंतरच आपण असे कितीतरी प्रश्न विचारतो ज्याप्रमाणे आपण जंगलातल्या भटकंतीनंतर आपले अद्ययावत कॅमेरे गुंडाळून ठेवतो त्याचप्रमाणे अशा घटनांनंतर आपण आपले प्रश्नही बासनात गुंडाळून ठेवतो पुन्हा एखादा वाघ मारला गेल्यानंतर बॅगेतून कॅमेरा काढावा त्याप्रमाणे हे प्रश्न विचारू लागतो.  म्हणूनच, लोकहो ज्याप्रमाणे वाघ जंगलामध्ये त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी डरकाळी फोडतो त्याचप्रमाणे प्रत्येक वन्य प्राण्याच्या हत्येविषयी किमान प्रश्न विचारत राहा आवाज उठवा, नाहीतर कोणती डरकाळी ही शेवटच्या वाघाने फोडलेली शेवटची डरकाळी होती हे तुम्हाला समजणारही नाही, तोपर्यंत देवच वाघांचे भले करो

 

संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स 

smd156812@gmail.com

 













No comments:

Post a Comment