Saturday 28 October 2023

                

एका मृत झाडाची गोष्ट !

                        

 











एका मृत झाडाची गोष्ट !


“आपण आपल्या आजूबाजूच्या  झाडांच्या बाबतीत जे काही करत आहोत ते आपण स्वतःच्या व इतरांच्या बाबतीत काय करतोय याचेच प्रतिबिंब आहे.” क्रिस मेसर

 क्रिस मेसर हे लेखक, आंतरराष्ट्रीय व्याख्याते, सल्लागार असून सामाजिक-पर्यावरणाशी संबंधित चिरस्थायित्वासाठी सुविधा प्रदाते आहेत. त्यांनी नैसर्गिक इतिहास व पर्यावरणशास्त्र या विषयात संशोधन वैज्ञानिक म्हणून २० वर्षांहून अधिक काळ काम केले आहे. ते सध्या कॉरव्हॅलिस, ऑरिगॉन, यूएसए येथे राहतात. निसर्गाशी एवढी जवळीक असल्यामुळे ते माणसांच्या वर्तनाचा संबंध झाडांशी लावू शकतात   (म्हणजे एकूणच निसर्गाशी ) व त्याचा परिणाम आपल्याला आपल्याभोवती सगळीकडे पाहायला मिळतो आहे. आपल्यामुळे आपल्या निसर्गाचा कसा ऱ्हास होतो आहे व त्याचे संवर्धन याविषयी रडगाणे गाणारा हा आणखी एक लेख आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अगदी बरोबर आहात व ज्यांना त्याचा कंटाळा आला असेल ते वाचन थांबवू शकतात व इन्स्टाग्रामवर रिल्स पाहू शकतात (कुजकटपणा). परंतु ज्यांना निसर्गाच्या संवर्धनामध्ये थोडाफार रस आहे व त्यासंदर्भात त्यांची काही जबाबदारी आहे असे वाटत असेल ते पुढे वाचू शकतात (त्यांनी वाचला पाहिजे).मी आज जे काही सांगणार आहे ते वृक्षतोड किंवा झाडांची संख्या कमी होत असल्याबद्दलचे (शीर्षकावरून ते काय आहे याचा अंदाज तुम्ही लावला असेल) अजुन एक बोधामृत नाही, तर आपल्या भोवती घडणाऱ्या घडामोडी व आपल्याला  त्यासंदर्भात काय करता येईल व त्यापेक्षाही एखादे झाड वाचवून किंवा अगदी वठलेल्या का होईना एखाद्या झाडाच्या अस्तित्वामुळे आपल्या कंटाळवाण्या आयुष्यात कसे सौंदर्य निर्माण करता येईल याविषयी हा लेख आहे !

   शीर्षकामध्ये म्हटल्याप्रमाणे हा लेख एका वठलेल्या झाडाच्या गोष्टीविषयी आहे व ते देखील सुबाभळीचे झाड जे या देशात कुठेही उगवते. माझ्या माहितीप्रमाणे ते देशी झाड नाही तरीही ते आपल्या भोवताली सगळीकडे दिसते,अर्थात आपण ज्याला आपले शहर म्हणतो त्या काँक्रिटच्या जंगलात झाडेच फारशी दिसत नाहीत, असो. तर त्या वठलेल्या सुबाभूळच्या झाडावर तांबट पक्ष्यांची एक जोडीही बसत असे त्याविषयी हे आहे. मी एरंडवणे या उपनगरातल्या  पटवर्धन बाग या परिसरात राहतो. हा पुण्याचा मध्यवर्ती भाग मानता येईल व सुदैवाने इमारतीच्या समोरून मुठा नदीच्या समांतर रस्ता आहे व तेथे अजूनही बरीच झाडे शिल्लक आहेत. माझ्या इमारतीच्या कुंपणाच्या भिंतीला लागून असलेल्या अशोक, अमलताश, कडुनिंब यासारख्या हिरव्यागार झाडांच्या सोबतीला एक सुबाभळीचे वठलेले झाड होते. आत्तापर्यंत या काळ्या व करड्या रंगाच्या वठलेल्या झाडाकडे माझे कधीही लक्ष गेले नव्हते परंतु एके दिवशी सकाळी मी हॉलमध्ये असताना मला अचानक  कुक कुक कुक असा एक ओळखीचा आवाज ऐकू आला. हा नक्की कुठला आवाज आहे याविषयी कुतुहल वाटून मी हॉलला लागून असलेल्या गच्चीमध्ये गेलो व हा आवाज कुठून येत आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करू लागलो. आश्चर्य म्हणजे मला  वठलेल्या  सुबाभळीच्या करड्या फांदीवर रंगीबेरंगी पक्ष्यांची एक जोडी दिसली. या झाडाकडे आत्तापर्यंत माझे कधीच लक्ष गेले नव्हते, परंतु याच झाडाच्या शेंड्यावर बसून तांबट पक्ष्यांची एक जोडी एकत्रितपणे गात होती. मी माझा कॅमेरा घेण्यासाठी पटकन आत गेलो व तांबट पक्ष्याच्या जोडीची काही सुंदर छायाचित्रे मला घेता आली जी मला अगदी जंगलातही मिळाली नसती. याचे कारण म्हणजे ते झाड वठलेले होते व तांबट पक्षी सामान्यपणे अशा झाडाच्या शेंड्यावर बसतात व माझी सदनिका नवव्या मजल्यावर असल्याने मला तांबट पक्ष्यांची जोडी अगदी वरून आणि जवळून पाहता आली, जे जंगलामध्ये शक्य झाले नसते व त्यामुळे मी अतिशय आनंदित झालो होतो.

   त्या दिवशीच्या सकाळनंतर रोज पहाटे वेळी ते कुक कुक संगीत ऐकणे व सकाळच्या सूर्यप्रकाशात न्हाणारी व शहराचा दिवस सुरू होत असताना भोवताली काय चालले आहे हे निरखून पाहणारी व हिरव्या झाडांच्या सावलीत उडून जाणारी तांबट पक्ष्यांची जोडी न्याहाळणे हा नित्यनियमच झाला.अगदी दुपारच्या वेळीही तांबट पक्षी या वठलेल्या झाडावर येऊन बसत असत व ते दुपारच्या कडकडीत उन्हात असे उघड्यावर येऊन काय करतात याचे मला कुतुहल होते. मी जेव्हा माझ्या कॅमेऱ्याच्या टेलीलेन्सनी जवळून पाहिले तेव्हा समजले की तांबट पक्षी वठलेल्या झाडाच्या फांद्यांमध्ये कीटकांच्या स्वरूपातील अन्नाचा शोध घेत होता, म्हणजे ते वठलेले झाडही त्या तांबट पक्ष्यांना केवळ सूर्यप्रकाशात न्हाण्यासाठी जागाच देत नव्हते तर अन्नही देत होते. त्यानंतर एकेदिवशी सकाळी तांबट पक्ष्यांच्या कुक कुक गाण्यामध्ये आणखी एक मोठा किलबिलाटीचा सूर मिसळला व मला पाहून आनंदाचा धक्का बसला कारण त्या वठलेल्या झाडावर तांबट पक्ष्यांच्या जोडीसोबत धनेश पक्ष्यांची एक जोडी बसली होती. ते अतिशय सुंदर दृश्य होते कारण त्या झाडावर एकही हिरवे पान नव्हते त्यामुळे ते तांबट पक्षी त्या झाडावरील पालवीसारखे भासत होते व काळसर  करड्या रंगाचे धनेश पक्षी त्या वठलेल्या झाडाच्या पसरलेल्या फांद्यांप्रमाणे वाटत होते. ते धनेश पक्षी तेथे अन्नाच्या शोधात आले होते परंतु त्यांना त्या वठलेल्या झाडाच्या फांद्या अतिशय सुरक्षित वाटल्या व या अधिवासाच्या भोवतालचा भाग न्याहाळण्यासाठी  बसण्यासाठी खुली जागाही मिळाली, त्या सकाळनंतर ती  धनेश जोडी सुद्धा तिथे नियमितपणे येणारे पाहुणे झाले व तांबट पक्ष्यांचा त्याला काहीही आक्षेप दिसला नाही.

  आश्चर्य म्हणजे करड्या रंगाची शहरी कबुतरे ज्यांनी आजकाल शहरांमध्ये उच्छाद मांडला आहे व घारी या झाडावर येऊन अजिबात बसले नाहीत, ही खरेतर चांगली गोष्ट आहे, कारण त्यांनी नक्कीच तांबट पक्ष्यांना हुसकावून लावले असते. परंतु त्यांच्याशिवायही तांबट पक्ष्यांच्या या नेहमीच्या झाडावर बुलबुल, राघू (ज्यांना शहरातील बहुतेक लोक चुकून पोपटच समजतात) व मैना यासारखे पाहुणेही येतात. लॉकडाऊन नंतर, मला भोवताली राघूंच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे, याचे कारण काहीही असो परंतु ही वस्तुस्थिती आहे व त्यामुळे तांबट, चिमण्या यासारख्या इतर लहान पक्ष्यांच्या समतोल बिघडू नये एवढीच माझी चिंता आहे. जेव्हा सूर्य मावळतो, तेव्हा या वठलेल्या झाडावर घुबड व वटवाघुळासारखे काही निशाचर पक्षीही येऊन बसतात असे माझ्या निदर्शनास आले, सुदैवाने माझ्या भागात हे पक्षी अजूनही शिल्लक आहेत. त्याचशिवाय पिंगळा तसेच पांढरे घुबड हे निशाचर पक्षी व वटवाघुळेही दिसून आली आहेत, ओमकारेश्वराच्या मंदिराजवळ कर्वे रस्त्यावर झालेली वृक्षतोड हे त्याचे कारण आहे. तेथे वटवाघुळांची मोठी वसाहत होती, तेथे गृहनिर्माण संकुलांसाठी (दुसरे काय) झाडे तोडल्यामुळे ती नाहीशी झाली, या सगळ्या झाडांवरील वटवाघुळांनी आमच्या इमारतीच्या रस्त्याला लागून असलेल्या झाडांवर आसरा घेतला आहे.माझे कॅमेरा कौशल्य फार उत्तम नसल्यामुळे, मला अजूनही त्या वठलेल्या झाडावर निशाचर पक्ष्यांची रात्रीच्या वेळेस छायाचित्रे घेता आलेली नाहीत, परंतु मी त्यांना पाहू शकलो व त्यापेक्षा मला रात्री झाडावर त्यांचे अस्तित्व अतिशय ठळकपणे जाणवले.

   जवळपास तीन वर्षे (लॉकडाऊनच्या कृपेने) त्या सुबाभळीच्या वठलेल्या झाडावर येणारे तांबट व इतर पक्षी पाहणे हा माझा सर्वोत्तम काळ वेळ असायचा (केवळ विरंगुळा नव्हे), परंतु एकेदिवशी ते कुक कुक संगीत थांबले.आता आयुष्य पुन्हा नव्याने, सामान्यपणे सुरू झाले होते व मी सुद्धा माझ्या काँक्रिटच्या जंगलामध्ये दैनंदिन जीवनात पुरता बुडून गेलो होतो. तरीही मला सकाळचे कुक कुक हे संगीत ऐकू येत नसल्याचे जाणवल्याने मी बाहेर जाऊन खाली पाहिले व आश्चर्य म्हणजे (खरेतर धक्का बसला) ते वठलेले झाड तेथे नव्हते, ते नाहीसे झाले होते. मला खाली चालताना याची जाणीव झाली नाही परंतु मला वरून अगदी स्पष्टपणे दिसले की त्याच्या करड्या काळ्या वाळलेल्या फांद्या आता नाहीत ज्यावर तांबट पक्षी बसत असत व म्हणूनच कुक कुक संगीत थांबले. त्या दिवशी मी ऑफिसला जाताना माझ्या इमारतीच्या वॉचमनला विचारले, त्या वठलेल्या  झाडाचे काय झाले, ते पावसात पडले का, त्यावर तो म्हणाला, “नाही साहेब, महापालिकेचे लोक आले होते, ते झाड धोकादायक झाले होते म्हणून तोडून टाकले” (पुणे महानगरपालिकेच्या लोकांनी ते झाड तोडून टाकले).ते झाड वठलेले होते व त्याच्या फांद्या त्याच्या खाली पदपथावरून चालणाऱ्या व्यक्तींसाठी धोकादायक ठरू शकतात असे काही माणसांना वाटले असावे.हा धोका हाताळण्यासाठी एकमेव तर्कसंगत मार्ग म्हणजे ते तोडून टाकणे, कारण असेही ते सुबाभळीसारख्या निरुपयोगी प्रजातीचे वठलेले झाड आहे, नाही का? दुखःद भाग म्हणजे, माणसांच्या या जगात, जेव्हा काही माणसांना असे वाटते की काहीतरी माणसांसाठी धोकादायक आहे, तेव्हा त्यावर तोडगा काढताना केवळ माणसांचाच विचार केला जातो (असे आम्हाला वाटते).परंतु ते झाड तांबट किंवा धनेश किंवा वटवाघुळांसाठी काय होते हे विचारण्याची तसदी कोण घेईल, हेच माझ्या या लेखाचे कारण आहे. आपल्याला ते“धोकादायक झाड” बुंध्यापासून तोडणे टाळता आले असते,जो बऱ्यापैकी मजबूत वाटत होता,त्याचा एकमेव धोका म्हणजे त्याच्या फांद्या पडल्या असत्या, म्हणनूच ज्या फांद्या तुटण्यासारख्या आहेत त्या तोडून टाका. तसेच अशा झाडाखालून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांसाठी झाडावर एखादी जाळी लावा.मला माहितीय दररोज सकाळी तांबट पक्ष्यांची जोडी तसेच त्यांचे बुलबुल,राघू यांच्यासारखे मित्र दुसऱ्या एखाद्या झाडाच्या शेंड्यावर विश्रांती घेत असतील,कारण सुदैवाने अवतीभोवती अनेक झाडे आहेत. परंतु माझ्यासाठी माझ्या भोवतालचा परिसर व सकाळ ते वठलेले झाड व त्यावर बसलेली तांबट पक्ष्यांची जोडी पाहिल्याशिवाय आता कधीही परत तशी होऊ शकणार नाही.

   आता लेखाच्या मूळ मुद्याकडे येऊ,आपण बेसुमार वृक्षतोड चालवली आहे जी केवळ शहरे किंवा गावांपुरतीच मर्यादित नाही तर उत्तरांखंडमधील नेहमी हिरवेगार वाटणारे डोंगरही माणसाच्या तावडीतून सुटलेले नाहीत.अलिकडेच एक वन्यजीवप्रेमी श्री. बिट्टू सेहगल यांनी सिमला येथील (हिमालयातील एक गाव) व तेथील वृक्षतोडीचे एक छायाचित्र शेअर केले होते. त्यांचे असे म्हणणे होते की, “मी इथे जन्मलो व पहा आता त्यांनी माझ्या शहराचे काय केले आहे”! मला मान्य आहे, आपल्याला (म्हणजे माणसांना) जागा हवी आहे व त्यासाठी झाडे तोडणे आवश्यक आहे परंतु यामध्ये दोन गोष्टी आहेत,आपण जी प्रत्येक इमारत बांधतो तिची रचना करताना आहे त्या झाडांसकट का करू शकत नाही व दुसरे म्हणजे आपण बांधतो त्या प्रत्येक इमारतीमध्ये मोठी झाडे का लावू शकत नाही. कारण ज्याप्रमाणे आपल्याला जागा हवी असते त्याचप्रमाणे तांबट पक्ष्यांच्या जोडीलाही जागा हवी असते, बरोबर? आणि  मग तांबट पक्ष्यांसाठी धोकादायक असलेल्या इमारती कोण हटवणार आहे,ते केवळ लहान पक्षी आहेत व ते प्रतिकार करू शकत नाहीत म्हणून आपण त्यांच्या विश्रांतीच्या जागेला धोकादायक ठरवून,ती तोडून टाकत आहोत,आपल्याला हा हक्क कुणी दिला? मला माहितीय, नेहमीप्रमाणे माझ्यावर कट्टर आणि वेडा निसर्गप्रेमी असा शिक्का मारला जाईल, पण मला केवळ एकच गोष्ट माहितीय, आपण प्रत्येक झाडाचा विचार केला पाहिजे जे अनेक प्रजातींसाठी जीवन आहे व आपण ते केले नाही तर आपल्याला सर्वात बुद्धिमान प्रजाती म्हणवून घेण्याचा काहीही हक्क नाही, किंबहुना ती वर बसलेली अज्ञात शक्ती आपल्याला सर्वात मूर्ख प्रजाती ठरवेल, जी आपल्या तोडण्याच्या क्षमतेपेक्षा कितीतर श्रेष्ठ आहे !

  मित्रहो,दररोज सकाळी मला अनेक पक्षी तारांवर बसलेले दिसतात, आपल्या शहराच्या आकाशात एका इमारतीपासून दुसऱ्या इमारतीपर्यंत जाणाऱ्या अशा अनेक तारा तुम्हाला दिसतील व तरीही हे पक्ष आनंदात असतात की त्यांना बसण्यासाठी काहीतरी आहे. परंतु तुम्ही हा प्रश्न स्वतःलाच विचारा, तुम्हाला पक्षी कुठे बसलेले पाहायला आवडेल,एखाद्या झाडाच्या फांदीवर (मग ते वठलेले का असेना) किंवा एखाद्या विजेच्या किंवा 4 जीच्या तारांवर ; कारण या प्रश्नाच्या उत्तरामध्ये केवळ पक्ष्यांचेच नव्हे तर पुढच्या पिढीचे भवितव्यही सामावलेले आहे. त्यानंतरच आपण वठलेल्या झाडांचाही आदर (व काळजी) करू,तोपर्यंत देव (केवळ तोच करू शकतो) आपल्या शहरातील तांबट व धनेश पक्ष्यांचे भले करो,एवढीच प्रार्थना मी करेन !

 

संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स  

smd156812@gmail.com

कृपया पुण्यात हक्काचे घर/ऑफिस शोधण्याबाबतचे माझे शेअरिंग खालील YouTube लिंकवर पहा आणि आवडल्यास  शेअर करा..                   

https://youtu.be/27j3I3rwGPQ?si=-ODYBxVI2Dl_C345

Wednesday 18 October 2023


भावना आणि तथ्य आणि योग्य घराची निवड !
















भावना आणि तथ्य आणि योग्य घराची निवड !


तथ्ये तुमच्या भावनांची काळजी करत नाहीत. ”  बेन शेपिरो

"मुला, कधीही सर्वसामान्य समजुतीवर विश्वास ठेवू नकोस, तर स्वतः तपशील व तथ्यांवर लक्ष केंद्रित कर." — आर्थर कोनान डॉयल 

     मला हा लेख लिहीताना अतिशय आनंद होत आहे तो केवळ त्याच्या विषयामुळे नव्हे तर अवतरणांमुळे किंबहुना त्या व्यक्तींमुळे ज्यांची अवतरणे ( सरतेशेवटी ) मी माझ्या लेखासाठी वापरू शकत आहे. श्री. शेपिरो यांच्याविषयी पूर्णपणे आदर आहे जे एक महान विचारवंत आहेत परंतु दुसरे नाव माझ्यासाठी देवासमान आहे (कोणत्याही धर्माच्या कुणाही अनुयायांविषयी अनादर न ठेवता ) व त्यांच्या निर्मितीचेही तेच स्थान आहे ; होय, त्यांचे नाव आहे सर आर्थर कोनान डॉयल ज्यांच्या शब्दांमधून शेरलॉक होम्स साकार झाला, म्हणूनच मी त्याला सर डॉयल यांचा शब्द-पुत्र (मी या शब्दाची निर्मिती केलीय आहे) म्हणतो, मला आज त्यांचे अवतरण वापरायची संधी मिळतेययाचे कारण म्हणजे, या माणसाचे, म्हणजेच श्री. होम्स यांचे विचार अतिशय स्पष्ट व तर्कशुद्ध आहेत, तर आमच्यासारख्या  उद्योगांमध्ये म्हणजे म्हणजेच रिअल इस्टेटमध्ये नेहमीच या दोन गुणवैशिष्ट्यांची वानवा राहिलेली आहे. त्यामुळे मला ही अवतरणे वापरण्याची संधी क्वचितच मिळते, परंतु आजचा विषय तथ्ये मांडतो व म्हणूनच तथ्यांविषयी टिप्पणी करण्यासाठी होम्सपेक्षा दुसरे आणखी चांगले कोण असू शकते. श्री. शेपिरो यांनी म्हटले आहे की तथ्ये तुमच्या भावनांची काळजी करत नाहीत, शेरलॉक होम्स तथ्यांचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करतो, मग ते एखाद्या गुन्ह्याचा उलगडा करणे असो किंवा संपूर्ण जगाने ज्याच्यावर दोषी म्हणून शिक्का मारला आहे त्याला निर्दोष सिद्ध करणे असो, श्री. होम्स यांच्या माध्यमातून नेहमी तथ्येच तुमचा बचाव करण्यासाठी येतात व योग्य घराची निवड करतानाही तीच तुमच्या मदतीला येतात , हा माझा आजचा विषय आहे !

    दुसरा एक मुद्दा आहे तर्क, जेव्हा तुमच्याकडे तथ्ये नसतात तेव्हा तर्काचा वापर करा व योग्य घर या चौथ्या भागामध्ये ( होम्स विरुद्ध होम, पीजेसाठी माफ करा ) रिअल इस्टेटविषयी आणखी एक पैलू मला सांगायचा होता तो म्हणजे घराविषयी योग्य तथ्ये जाणून घेणे. आता कुणी म्हणेल की योग्य तथ्ये असा शब्द कसा असू शकतो, तथ्ये ही केवळ तथ्ये असतात. तुमचे म्हणणे बरोबर आहे, परंतु ज्या देशामध्ये पितळही सोने म्हणून दाखवले जाऊ शकते कारण दोन्ही धातू पिवळे असतात (जी वस्तुस्थितीही आहे), तिथे तुम्ही तुमचे योग्य घर निवडत असताना, लोकांना योग्य तथ्य व चुकीचे तथ्य यातील फरक समजून सांगण्याची अतिशय गरज आहे. किंबहुना तुम्हाला   योग्य तथ्ये ही संकल्पना समजल्यानंतर तुम्हाला जाणीव होईल की तुम्ही घराविषयी ज्यांचा विचार तथ्ये म्हणून करत आहात ती प्रत्यक्षात मिथके आहेत ज्यांना आपण चुकीची तथ्ये म्हणू शकतो. सुरुवात करायची झाली तर मी तुम्हाला साधी उदाहरणे देतो; अनेक लोक सगळ्यात वरच्या इमारती मधील मजल्यावरच्या घराला प्राधान्य देत नाहीत (पुण्यामध्ये) कारण उन्हाळ्यामध्ये तो अतिशय तापतो व मुंबईमध्ये पावसाळण्यात गळण्याची शक्यता असते ( पुण्यातही ती असते ) व या समस्या आहेत ही वस्तुस्थिती आहे यामुळे सगळ्यात वरच्या मजल्यावरच्या सदनिका ही चुकीची घरे मानली जातात. परंतु योग्य तथ्ये म्हणजे, पुण्यामध्ये वरचा मजला तापतो हे मान्य असले तरीही, नियोजन व बांधकामामध्ये विकासकाने योग्य ती काळजी घेतली नाही तरच असे होते. कारण सगळ्या खोल्यांमध्ये हवा खेळती राहीलीतर, हवा एकाच जागी राहून सदनिका गरम होत नाही. जर गच्चीच्या स्लॅबची  रचना योग्य प्रकार ( म्हणजे अधिक योग्य प्रकारे ) करण्यात आली असेल, विटांचा थर देऊन जाडी योग्य  राखण्यात आली असेल व पृष्ठभागावर उष्णता परावर्तित करणारा रंग देण्यात आला असेल, तसेच गच्चीवर स्लॅबच्या पातळीजवळ हवा खेळती राहण्यासाठी गच्चीच्या भिंतीमध्ये (पॅरॅपेट बॉल ) मध्ये जागा (छिद्रे) ठेवण्यात आली असतील, तर खालच्या मजल्यांपेक्षा वरचा मजला तापण्याची समस्या निर्माण होणार नाही. सर्वात वरचा मजल्याचे छत गळण्याच्या समस्येचेही असेच आहे, गच्चीवरतील छाताला योग्य उतार देण्यात आला असेल, तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा करणारे पाईप बसविण्यात आले असतील तर गच्चीच्या छतावर पाणी साचून राहणार नाही, पाणी साचले तरच ते खाली गळते. त्याचप्रमाणे सदनिकेचा ताबा दिल्यानंतर कोणत्याही कारणामुळे छताच्या स्लॅबचे कोणत्याही कारणाने तोडफोड केली जाऊ नये उदाहरणार्थ गच्चीवर सावलीसाठी मंडप उभारणे किंवा सोलर पॅनल किंवा एसी युनिट बसविणे किंवा अशी कोणतीही कृती ज्यामुळे पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात अडथळा येईल तसेच गच्चीच्या स्लॅबवरील वॉटरप्रूफिंगचे नुकसान होईल. तुम्ही याची काळजी घेतलीत, तर छताची स्लॅब गळण्याची काळजी करण्याचे कारण नाही. मी स्वतः एका इमारतीच्या सगळ्यात वरच्या मजल्यावरील घरात  राहतो जी आम्हीच बांधली आहे. यालाच मी तुमच्या घराविषयी योग्य तथ्ये जाणून घेणे       असे म्हणतो.

    रिअल इस्टेटमध्ये अशी अनेक चुकीची तथ्ये आहेत ज्यांना आपण मिथके म्हणतो, यातील काही वास्तुशास्त्राची कृपा पण आहे (ज्यांचा वास्तुशास्त्रावर विश्वास आहे त्यांच्याविषयी मनात काहीही कटुता नाही किंवा त्यांचा अनादर करण्याचा हेतू नाही), यासंदर्भातले अनेक तथाकथित तज्ञ भूखंडाच्या एका कोपऱ्यामध्ये अग्नि असावा तर दुसऱ्या कोपऱ्यामध्ये पाण्याची टाकी असावी (पाणी) अशा प्रकारचे सल्ले देतात, परंतु तुमच्या घराच्या वापराशी याचा प्रत्यक्षात काहीही संबंध नसतो. ही यादी लांबलचक आहे व अशा शेकडो गोष्टी आहेत ज्यामुळेच मी शेपिरो यांचे अवतरण वापरले, तथ्ये तुमच्या भावनांची काळजी करत नाहीत; इथे मला अतिशय नम्रपणे शेपिरो यांना दुरुस्त करावेसे वाटते की विशेषतः विषय जेव्हा तुमच्या घराचा असतो तेव्हा योग्य तथ्ये तुमच्या भावनांची काळजी घेतील हे जास्त योग्य विधान आहे.” माझा वास्तुशास्त्रावर विश्वास नाही ( म्हणजे मी डोळे उघडे ठेवून विश्वास ठेवतो ) कारण कोणतेही शास्त्र म्हणजेच विज्ञान केवळ तथ्यावरच आधारित असले पाहिजे, एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक अनुभवावर आधारित असू नये, मग त्या कितीही महान किंवा चांगल्या का असेनात. तरीही वास्तुच्या तांत्रिक पैलूंवर माझा विश्वास आहे जो थेट पर्यावरण विज्ञानाशी निगडित आहे. तरीही मी योग्य घर निवडताना तथ्ये व वास्तुशास्त्राचा तो मुद्दा बाजूला ठेवेन कारण जेव्हा प्रश्न श्रद्धेचा व विश्वासाचा असतो तेव्हा बरोबर किंवा चूक अशी कोणतीच तथ्य समोर ठेवून उपयोग नाही. त्यामुळे, एखाद्या घरासाठी (कार्यालय किंवा दुकानासाठी) योग्य तथ्यांच्या मुद्द्याविषयी बोलायचे झाले तर योग्य तथ्ये जाणून घेण्याचा किंवा निश्चित करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुम्हाला ज्या बाबींची काळजी वाटतेय त्याविषयी योग्य प्रश्न विचारणे व त्यानंतर त्या उत्तरांचे तर्कसंगतपणे व ठोस पुराव्यांसह विश्लेषण करणे. कारण तथ्य हे तर्कसंगत असते व ते भौतिक जगात वारंवार सिद्ध केले जाऊ शकते, तो केवळ एखादेवेळी होणारा निव्वळ योगायोग असू शकत नाही. उदाहरणार्थ घराविषयी आणखी एक चुकीचे तथ्य म्हणजे, टॉयलेटमधे / बाथरुममध्ये पाय घसरणार नाही अशा टाईल्स बसविल्यामुळे, विशेषतः वयोवृद्ध व्यक्ती ओल्या  जागेत पडून अपघात होणार नाहीत. परंतु योग्य तथ्य म्हणजे, जर बाथरूममध्ये योग्य उतार दिला तर जमीनीवर पाणी साचणार नाही, तसेच तुम्ही पाण्याचा वापर केल्यानंतर  पृष्ठभागकोरड्या/रबर मॉपने पुसून घेतला तर अशा पृष्ठभागांवर घसरून पडण्याची शक्यता अतिशय कमी असते, मग ग्रॅनाईटची फरशी का असेना जिचा पृष्ठभाग काचेसारखा गुळगुळीत असतो. त्याचप्रमाणे पाय घसरणार नाही अशा टाईल्स लावल्या ज्यांचा पृष्ठभाग खरबरीत असतो, त्या कोरड्या ठेवल्या तरच त्यामुळे अपघातामुळे पडण्याचे प्रमाण कमी होऊ शकते (टाळता येत नाही). खरबरीत पृष्ठभागांवर साबणाच्या पाण्यामुळे एक थर तयार होतो व तो अधिक निसरडा होतो. केवळ मी म्हणतो म्हणून हे योग्य तथ्य आहे असे नाही, तर तुम्ही तुमच्या घराच्या बाथरूममध्येही हे करून पाहू शकता. त्यानंतर जर तुम्ही तुमच्या फरशीच्या निसरडेपणाच्या निकालाबद्दल समाधानी असाल तर ते योग्य तथ्य होते.

     मी घर बांधणीसंदर्भात म्हणजेच रिअल इस्टेट संदर्भात अशी शेकडो उदाहरणे देऊ शकतो कारण एक म्हणजे मी अभियंता आहे व दुसरे म्हणजे, मी जे काही बांधतो त्यासंदर्भात योग्य तथ्यांचा विचार करतो, आम्हाला हेच शिकविण्यात आले आहे. माझ्याकडूनही अंमलबजावणी करताना चुका होऊ शकतात कारण घर बांधणी क्षेत्रातील बांधकामाशी संबंधित बहुतेक कामे अजूनही हाताने केली जातात, तरीही मी योग्य तथ्यांचे (म्हणजे कारागिरीसंदर्भात) पालन केले तर चुकीचे घर बांधले जाण्याच्या शक्यता कमी आहेत. म्हणूनच तुम्ही तुमच्या घरांच्या निर्मात्यांना (म्हणजे बांधकाम व्यावसायिकांना) जास्तीत जास्त प्रश्न विचारले पाहिजेत, जर अशा प्रत्येक पैलूविषयी योग्य तथ्ये काय आहेत याची तुम्हाला खात्री नसेल. मग ती खोल्यांची लांबी-रुंदी असो, कारण ग्राहकांकडून मला एक चुकीचे तथ्य नेहमी ऐकायला मिळते ते म्हणजे खोल्यांचा आकार अतिशय लहान किंवा अतिशय मोठा आहे, परंतु तुम्ही नियोजनाच्या तथ्यांचा विचार केल्यास त्या खोल्यांचा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे वापर व्हावा यासाठीकाय योग्य आहे यानुसार तुम्हाला खोल्यांच्या आकाराचे विश्लेषण करता येईल. कारण लहान किंवा मोठे हे तुमच्या भावनेनुसार तसेच तुमच्या खिशानुसार बदलू शकते, परंतु तुमच्या बेडरूमचा वापर काय आहे व तुमच्या जीवनशैलीप्रमाणे तुम्हाला कोणत्या प्रकारचे फर्निचर हवे आहे (व जे तुम्हाला परवडू शकते) व तुम्ही त्या खोलीमध्ये किती वेळ घालवणार आहात हे तुम्ही समजून घेतल्यास, तुम्ही खोलीचा योग्य आकार ठरवू शकता, जे तथ्य आहे. त्यानंतर तुम्ही बांधकाम व्यावसायिक जी लांबी-रुंदी देऊ करतोय त्याच्याशी ही तथ्ये पडताळून पाहू शकता. कार पार्किंगच्या आकाराला हे लागू होते, तुम्ही ड्राईव्ह वे किती असेल किंवा गाडी वळवून घेण्यासाठी किती जागा मिळेल याची कल्पना करू शकत नसाल तर बांधकाम व्यावसायिकाला पार्किंगची जागी तयार करताना त्याने कोणत्या आकाराची कार गृहित धरली होती हे विचारा, तुमच्या कारशी (तसेच तुम्ही भविष्यात जी खरेदी कराल तिच्याशीही) त्याची तुलना करून पाहा व त्यानंतर पार्किंगची जागा तुमच्यासाठी योग्य आहे किंवा नाही याचा निर्णय घ्या. तुमच्या घराविषयी योग्य तथ्ये ठरवताना तुम्ही काय वाचले आहे किंवा ऐकले आहे किंवा तुमचा कशावर विश्वास आहे यावर जाऊ नका, कारण नेमके हेच केले जाते, बांधकामाच्या प्रक्रियेमागील विज्ञान व तर्काचा अभ्यास करा तसेच तुम्ही जे घर पाहताय त्याच्या नियोजनाचा विचार करा व त्यानंतर तुमच्या योग्य तथ्यांशी ते पडताळून पाहा व माझ्यावर विश्वास ठेवा त्यानंतर १०० पैकी ९० वेळा तरी तुम्हाला असे योग्य तथ्यांवर आधारित घर खरेदी करण्याच्या तुमच्या निर्णयाचा कधीच पश्चात्ताप होणार नाही.

   सरतेशेवटी मी असा सल्ला देईन की; एक घर हे  जवळपास तीनशेहून अधिक वस्तुंपासून बनते त्यामध्ये तीसहून अधिक व्यवसायांचा सहभाग असतो ज्यामध्ये फिटरपासून गवंड्यापर्यंत, टायलरपासून ते प्लंबरपर्यंत सगळ्यांचा समावेश होतो.ही सगळी अभियांत्रिकी आहे(म्हणजे विज्ञान आहे) अभियांत्रिकीतील सर्व काही तथ्यांवर चालते,ज्यातूनच बांधकामाचे कायदे नियम तयार होतात, म्हणूनच तुम्ही जेव्हा तुमचे घर खरेदी करता ते योग्य तथ्यांनी म्हणजेच योग्य अभियांत्रिकीने बांधलेले असले पाहिजे,हे फक्त लक्षात ठेवा !


संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स

smd156812@gmail.com

तुम्हाला शहराविषयी कोणत्याही तक्रारी असल्यास,खालील दुव्यावर लॉग इन करा

https://youtu.be/27j3I3rwGPQ?si=-ODYBxVI2Dl_C345



Saturday 14 October 2023

                   आशियन गेम्स २३ आणि भारतीय आशेची १०० पदके !

                   









आशियन गेम्स २३ आणि भारतीय आशेची १०० पदके !


आम्ही निःशब्द आहोत ; या स्पर्धेपर्यंत पोहोचण्याचा प्रवास खडतर होता. आमचा खेळ सर्वोत्तम होत नव्हता,आम्ही जागतिक विजेतेपदाच्या सामन्यात उपांत्यपूर्व फेरीतच हरलो, आम्ही चायना ओपनच्या पहिल्या फेरीतच हरलो.आमच्यासाठी हा सर्वात निराशाजनक काळ होता असे आम्ही म्हणू शकतो. जेव्हा आम्ही घरी परतलो,तेव्हा आम्ही रविवारीही सराव करत असू. आमच्यासमोर केवळ एकच उद्दिष्ट होते की सरावादरम्यान स्वतःला पूर्णपणे झोकून द्यायचे आशियाई क्रीडास्पर्धांमध्ये देवाला आमच्याकडून काय अपेक्षित आहे हे देवालाच ठरवू दे”… चिराग शेट्टी सात्विकराज रांकीरेड्डी,पुरुष बॅडमिंटन दुहेरीचे सुवर्णपदक विजेते,आशियाई क्रीडा स्पर्धा २३,भारत.

     आता देवाला चिराग सात्विककडून काय हवे होते हे मला माहिती नाही परंतु प्रत्येक भारतीयाला त्यांच्याकडून सुवर्णपदक हवे होते त्यांनी देवाला ते त्यांना द्यायला लावले, असे मला वाटते!आत्तापर्यंत (मी ऑक्टोबरला हा लेख लिहायला सुरुवात केल्यापासून, चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांच्या शेवटच्या दिवसापर्यंत) आपल्या वॉट्सॲपच्या चॅट बॉक्समध्ये मेसेज (म्हणजेच फॉरवर्ड)ओसंडून वाहात असतील,ज्यामध्ये आपण भारतीयांनी आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये १०० हून अधिक पदके जिंकल्याबद्दल आपले (भारतीयांचे ) अभिनंदन करण्याची चढाओढ लागली असेल.आपण आशियाई क्रीडा स्पर्धा १९५१ मध्ये सुरू झाल्यापासून या खेळांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी कामगिरी केली आहे. खरेतर मेसेज फॉरवर्ड करण्यासाठी ऑलिम्पिक्स किंवा आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये एखादा खेळ असता तर निश्चितपणे सगळे पदके भारतीयांना गेली असती.तरीही हा लेख पुढे वाचा कारण तो फॉरवर्ड केलेला नाही तो भारताचे अभिनंदन करण्याविषयी आपल्याला कसा अभिमान असला पाहिजे वगैरे सांगणाऱ्या इतर फॉरवर्डसारखा नाही.त्यामध्ये अभिनंदन तर निश्चितच आहे,परंतु त्यापेक्षाही शंभराहून अधिक पदके जिंकण्याचे कारण किंवा त्याचे महत्त्व काय आहे याविषयी आहे. विशेषतः बॅडमिंटनमध्ये पुरुषांच्या दुहेरीमध्ये सुवर्ण पदक,कारण मी स्वतः या खेळाचा निस्सीम चाहता आहे, तसेच थोडेफार खेळतोही म्हणजे हा खेळ खेळताना माझा उजवा खांदा डाव्या गुडघ्याला दुखापत पण करून घेतली आहे मी जे काही थोडेफार खेळतो तेवढे खेळण्यासाठी सुद्धा आयुष्यभर फिजिओथेरपी करून घ्यावी लागणार आहे.याचा अर्थ असा होत नाही की आपण ज्या इतर सर्व खेळांमध्ये पदके जिंकली आहेत ज्या खेळांमध्ये जिंकू शकलो नाही ते कमी महत्त्वाचे आहेत,मी फक्त बॅडमिंटनमधील सुवर्णपदकाचे वैयक्तिक माझ्यासाठी तसेच एकूणच आपल्या समाजासाठी काय महत्त्व आहे ते सांगणार आहे त्यानंतर मी इतर खेळांविषयी सांगेन.

    अनेक वाचकांना कदाचित माहिती नसेल,बॅडमिंटन ज्याला शटलचा खेळ असे म्हणतात ( बॅडमिंटनशिवाय इतर कोणत्याही खेळामध्ये शटलचा वापर केला जात नाही )त्याची सुरुवात ब्रिटीशांनी पुण्यामध्ये केली,नंतर संपूर्ण युरोपात त्याचा प्रसार झाला परंतु प्रामुख्याने पूर्व आशियामध्ये तो खेळला जातो.अनेक दशकांपासून त्यावर चिनी,इंडोनेशियन,मलेशियन,थाई जपानी खेळाडूंचे वर्चस्व राहिले आहे.माझी पिढी (ज्यांचे वय ४५ हून अधिक आहे) रुडी हर्टिनो,आयक्यूक सुगियांतो,अँड्रे व्हिरांता,सुन जुन,डाँग जियांग,लिम स्वे किंग,हान जियान, झो जिन्ह्युआ यांची एकेरीमध्ये तसेच काई यंग  फे हेफेंग यांची पुरुषांच्या दुहेरीमध्ये नावे ऐकतच मोठे झालो. तुम्ही या यादीतील कुठलेही एक नाव वाचल्यानंतर हे खेळाडू कोणत्या देशांमधील आहेत हे तुमच्या लक्षात येईल,प्रामुख्याने चीनचे या खेळावर गेल्या दशकापर्यंत अतिशय वर्चस्व होते.अर्थात मेरियन फ्रॉस्ट,आपले प्रकाश पदुकोण गोपीचंद  अशी काही नक्कीच नावे आहेत,परंतु त्यांच्यापैकी कुणीही कोणत्याही वर्गवारीमध्ये गेल्या ६१ वर्षात आशियाई खेळांमध्ये बॅडमिंटनचे सुवर्ण पदक जिंकू शकले नव्हते म्हणूनच चिराग सात्विकचे सुवर्ण पदक विशेष महत्त्वाचे आहे.मित्रांनो,ज्यांचे या खेळावर प्रेम आहे त्यांचे कदाचित यासंदर्भात वेगळे मत असू शकते.परंतु त्यांच्याविषयी पूर्णपणे आदर राखत असे सांगावेसे वाटते की माझ्यामते दुहेरी खेळणे हे एकेरीपेक्षा अधिक अवघड आहेम्हणूनच सात्विकराजचे वडील जे स्वतः एक बॅडमिंटन खेळाडू आहेत प्रशिक्षक आहेत त्यांना सात्विकराजने  दुहेरीमध्ये करिअर घडविण्याची फारशी इच्छा नव्हती कारण एकेरीमधील करिअर वैयक्तिक कौशल्यावर तुमचा जोम यावर अवलंबून असते,परंतु दुहेरी हा सांघिक खेळ असल्यामुळे असे नसते.दुहेरीमध्ये तुम्हाला प्रत्येक फटका चारही बाजूंचा विचार करून घ्यावा लागतो म्हणजेच तुमच्या जोडीदाराची जागा तसेच क्षमता दोन्ही प्रतिस्पर्धी तसेच जेव्हा ते तुमच्या फटक्याला प्रत्युत्तर देतील,तेव्हा स्वतःचाही विचार करावा लागतो हे सगळे क्षणार्धात करावे लागते,कारण या खेळाचा वेगच तेवढा प्रचंड असतो. बॅडमिंटनच्या दुहेरी खेळाच्या या वैशिष्ट्यामुळेच माझे खेळावर निस्सीम प्रेम आहे( आदरही),यामुळे माझ्या दैनंदिन जीवनात काम करतानाही मला बरेच काही शिकवले आहे.काम काहीही असले तरीही मला केवळ माझाच नव्हे तर सगळ्या बाजूंनी विचार करावा लागतो बॅडमिंटनमध्ये दुहेरी खेळल्यामुळे मला तो दृष्टिकोन अंगी बाणवण्यास मदत होते.या खेळावर पौर्वात्य खेळाडूंचे (चीनी) वर्चस्व होते आम्ही थक्क होऊन त्यांचा वेग तंदुरुस्ती पाहात असू,आपले खेळाडू त्यांच्या तुलनेत कुठेही नव्हते,परंतु आता अशी परिस्थिती नाही !

     यासाठी अतिशय तंदुरुस्त असणे,तीक्ष्ण बुद्धिमत्ता मनाच्या वेगापेक्षाही चपळाईने हालचाल करणारे शरीर हवे ज्याला आपण प्रतिक्षिप्त क्रिया (Reflexes) असे म्हणतो.हे सगळे केवळ कौशल्यामुळे साध्य होत नाही तर त्याच्या जोडीला अत्यंक खडतर प्रशिक्षणही लागते. जे चिराग सात्विकने घेतले त्यांच्या पौर्वात्य स्पर्धकांना पराभूत केले किंवा त्यांच्यावर वर्चस्व गाजवले जे आत्तापर्यंत कुणाही भारतीय बॅडमिंटनपटूला आशिय गेम्समध्ये साध्य झाले नव्हते(आशियाई खेळांमध्ये)म्हणूनच हे पदक विशेष आहे.त्यानंतर दोघेही सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आले आहेत,जेथे खेळात करिअर करणे हा सगळ्यात शेवटचा पर्याय असतो तेदेखील बॅडमिंटनसारख्या खेळात ज्यामध्ये तुम्ही ३० वर्षांचे होईपर्यंत तुमची कारकिर्द संपुष्टात देखील आलेली असते जेव्हा इतरांच्या करिअरची नुकतीत सुरुवात झालेली असते.त्याचशिवाय या खेळात खूप पैसाही मिळत नाही परंतु हा खेळ खेळण्यासाठी भरपूर म्हणजे ट्रेनिंगसाठी )पैसा लागतो, म्हणूनच चिराग-सात्विकचे सुवर्ण पदक महत्त्वाचे आहे.त्याचप्रमाणे त्यांच्या पालकांनी दाखवलेले धाडस तसेच त्यांनी केलेल्या त्यागामुळे त्यांची मुले असे करिअर घडवू शकली. या देशातील तरुणांमध्ये एकीकडे शिक्षण नोकऱ्यांमधील आरक्षण यासारख्या मुद्द्यांवरून फूट पडतेय (माफ करा मी आरक्षणाच्या धोरणावर किंवा त्याच्याशी निगडित भावनांविषयी कसलेही मतप्रदर्शन करत नाही किंवा समर्थन अथवा विरोधपण नाही ) त्यांचे आयुष्यास आरक्षणामुळे खराब झाल्यामुळे या धोरणांना ( सरकारला ) दोष  देत असताना,या दोन मुलांनी आपल्या करिअरच निवड केली, त्यानं जात कुणीही (आता) विचारणार नाही. त्यांच्याकडे कौशल्य असले तरीही केवळ एकच त्याचा साधन आधार होता,तो म्हणजे खडतर परिश्रमाचा.मला असे वाटते या देशातील प्रत्येक तरुणाने चिराग-सात्विकचा दृष्टिकोन अंगी बाणवला पाहिजे ; केवळ खेळामध्येच नव्हे तर त्यांना जे काही करायचे आहे त्या प्रत्येक गोष्टीमध्ये, तसे झाले तर आपल्या देशाच्या अनेक समस्या सुटतील, म्हणूनच चिराग-सात्विकचे पदक विशेष आहे.

  त्याशिवाय ईतर खेळामध्ये चमकदार कामगिरी करणारे खेळाडूही (म्हणजेच पुरुष महिलामुले मुली)आहेतनेमबाजीमध्ये तीन सुवर्णपदके मिळवणाऱ्या नागपुरच्या देवतळेपासून ते भारतीय जर्सी घालून आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाचे विशेषत्वाने कौतुक झाले पाहिजे,कारण एक म्हणजे ते(त्यांच्यापैकी बहुतेक)अशा कुटुंबातून येतात ज्यांना खेळाची विशेष पार्श्वभूमी नाहीदुसरे म्हणजे,त्यांनी करिअर म्हणून खेळाची निवड केली,आपल्या समाजाच्या मानसिकतेचा विचार करता ते अतिशय अनिश्चित करिअर मानले जाते.तिसरे म्हणजे,त्यांनी कोणतेही आरक्षण मागितले नाही किंवा त्यासाठी वाट पाहिली नाही,तर निव्वळ त्यांच्या कठोर परिश्रमाद्वारे कौशल्याद्वारे राष्ट्रीय संघात स्थान मिळवले.त्यासाठी कोणत्याही राजकीय नेत्याकडून शिफारस घेतली नाही कारण या सगळ्यामुळे त्यांना संघात जागा तर मिळाली असती परंतु देशाकरता पदक मिळवण्यासाठी तेवढे पुरेसे झाले नसते,कारण जागतीक दीनाच्या  क्रीडा स्पर्धेमध्ये केवळ एकच गोष्ट महत्त्वाची असते,ती म्हणजे, तुमचे सर्वोत्तम योगदान द्या.म्हणूनच आशियाई क्रीडा स्पर्धा २३, यासाठीच  विशेष महत्त्वाच्या आहेत कारण आपल्याला १०० हून अधिक पदके मिळाली ही पदके शेकडो धगधगत्या मशालींप्रमाणे आहेत ज्या लक्षावधी भारतीय तरुणांना त्यांच्या कुटुंबांना उजळून टाकतील.ते सुद्धा हा मार्ग निवडू शकतील मग त्यासाठी त्यांना एखाद्या ! आरक्षणाच्या धोरणाच्या कुबडीची गरज पडणार नाही किंवा कुणी गॉडफादर सुद्धा लागणार नाही,म्हणूनच ही पदके महत्त्वाची आहेत.

  सगळ्यात शेवटचा परंतु महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या सरकारचेही कौतुक केलेच पाहिजेकारण आता भारताला केवळ मोठ्या लोकसंख्येचा देश म्हणून बघितले जात नाही, तर आपण केवळ क्रिकेटच नाही तर हळूहळू प्रत्येक खेळामध्ये बळकट होत आहोत हा संदेश आशियाई क्रीडा स्पर्धांमधील पदकांच्या संख्येमुळे संपूर्ण जगापर्यंत पोहोचवण्यात आला आहेम्हणूनच ही पदके अतिशय विशेष आहेतलक्षवधी भारतीय तरुणांना स्वतःवर विश्वास ठेवण्याचे धाडस देण्यासाठी त्यांचा ज्यावर विश्वास आहे ते करिअर निवडण्यासाठीसात्विक-चिरागचे अतिशय आभार !


संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स

smd156812@gmail.com

तुम्हाला शहराविषयी कोणत्याही तक्रारी असल्यास,खालील दुव्यावर लॉग इन करा

https://youtu.be/27j3I3rwGPQ?si=-ODYBxVI2Dl_C345