Wednesday 18 October 2023


भावना आणि तथ्य आणि योग्य घराची निवड !
















भावना आणि तथ्य आणि योग्य घराची निवड !


तथ्ये तुमच्या भावनांची काळजी करत नाहीत. ”  बेन शेपिरो

"मुला, कधीही सर्वसामान्य समजुतीवर विश्वास ठेवू नकोस, तर स्वतः तपशील व तथ्यांवर लक्ष केंद्रित कर." — आर्थर कोनान डॉयल 

     मला हा लेख लिहीताना अतिशय आनंद होत आहे तो केवळ त्याच्या विषयामुळे नव्हे तर अवतरणांमुळे किंबहुना त्या व्यक्तींमुळे ज्यांची अवतरणे ( सरतेशेवटी ) मी माझ्या लेखासाठी वापरू शकत आहे. श्री. शेपिरो यांच्याविषयी पूर्णपणे आदर आहे जे एक महान विचारवंत आहेत परंतु दुसरे नाव माझ्यासाठी देवासमान आहे (कोणत्याही धर्माच्या कुणाही अनुयायांविषयी अनादर न ठेवता ) व त्यांच्या निर्मितीचेही तेच स्थान आहे ; होय, त्यांचे नाव आहे सर आर्थर कोनान डॉयल ज्यांच्या शब्दांमधून शेरलॉक होम्स साकार झाला, म्हणूनच मी त्याला सर डॉयल यांचा शब्द-पुत्र (मी या शब्दाची निर्मिती केलीय आहे) म्हणतो, मला आज त्यांचे अवतरण वापरायची संधी मिळतेययाचे कारण म्हणजे, या माणसाचे, म्हणजेच श्री. होम्स यांचे विचार अतिशय स्पष्ट व तर्कशुद्ध आहेत, तर आमच्यासारख्या  उद्योगांमध्ये म्हणजे म्हणजेच रिअल इस्टेटमध्ये नेहमीच या दोन गुणवैशिष्ट्यांची वानवा राहिलेली आहे. त्यामुळे मला ही अवतरणे वापरण्याची संधी क्वचितच मिळते, परंतु आजचा विषय तथ्ये मांडतो व म्हणूनच तथ्यांविषयी टिप्पणी करण्यासाठी होम्सपेक्षा दुसरे आणखी चांगले कोण असू शकते. श्री. शेपिरो यांनी म्हटले आहे की तथ्ये तुमच्या भावनांची काळजी करत नाहीत, शेरलॉक होम्स तथ्यांचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करतो, मग ते एखाद्या गुन्ह्याचा उलगडा करणे असो किंवा संपूर्ण जगाने ज्याच्यावर दोषी म्हणून शिक्का मारला आहे त्याला निर्दोष सिद्ध करणे असो, श्री. होम्स यांच्या माध्यमातून नेहमी तथ्येच तुमचा बचाव करण्यासाठी येतात व योग्य घराची निवड करतानाही तीच तुमच्या मदतीला येतात , हा माझा आजचा विषय आहे !

    दुसरा एक मुद्दा आहे तर्क, जेव्हा तुमच्याकडे तथ्ये नसतात तेव्हा तर्काचा वापर करा व योग्य घर या चौथ्या भागामध्ये ( होम्स विरुद्ध होम, पीजेसाठी माफ करा ) रिअल इस्टेटविषयी आणखी एक पैलू मला सांगायचा होता तो म्हणजे घराविषयी योग्य तथ्ये जाणून घेणे. आता कुणी म्हणेल की योग्य तथ्ये असा शब्द कसा असू शकतो, तथ्ये ही केवळ तथ्ये असतात. तुमचे म्हणणे बरोबर आहे, परंतु ज्या देशामध्ये पितळही सोने म्हणून दाखवले जाऊ शकते कारण दोन्ही धातू पिवळे असतात (जी वस्तुस्थितीही आहे), तिथे तुम्ही तुमचे योग्य घर निवडत असताना, लोकांना योग्य तथ्य व चुकीचे तथ्य यातील फरक समजून सांगण्याची अतिशय गरज आहे. किंबहुना तुम्हाला   योग्य तथ्ये ही संकल्पना समजल्यानंतर तुम्हाला जाणीव होईल की तुम्ही घराविषयी ज्यांचा विचार तथ्ये म्हणून करत आहात ती प्रत्यक्षात मिथके आहेत ज्यांना आपण चुकीची तथ्ये म्हणू शकतो. सुरुवात करायची झाली तर मी तुम्हाला साधी उदाहरणे देतो; अनेक लोक सगळ्यात वरच्या इमारती मधील मजल्यावरच्या घराला प्राधान्य देत नाहीत (पुण्यामध्ये) कारण उन्हाळ्यामध्ये तो अतिशय तापतो व मुंबईमध्ये पावसाळण्यात गळण्याची शक्यता असते ( पुण्यातही ती असते ) व या समस्या आहेत ही वस्तुस्थिती आहे यामुळे सगळ्यात वरच्या मजल्यावरच्या सदनिका ही चुकीची घरे मानली जातात. परंतु योग्य तथ्ये म्हणजे, पुण्यामध्ये वरचा मजला तापतो हे मान्य असले तरीही, नियोजन व बांधकामामध्ये विकासकाने योग्य ती काळजी घेतली नाही तरच असे होते. कारण सगळ्या खोल्यांमध्ये हवा खेळती राहीलीतर, हवा एकाच जागी राहून सदनिका गरम होत नाही. जर गच्चीच्या स्लॅबची  रचना योग्य प्रकार ( म्हणजे अधिक योग्य प्रकारे ) करण्यात आली असेल, विटांचा थर देऊन जाडी योग्य  राखण्यात आली असेल व पृष्ठभागावर उष्णता परावर्तित करणारा रंग देण्यात आला असेल, तसेच गच्चीवर स्लॅबच्या पातळीजवळ हवा खेळती राहण्यासाठी गच्चीच्या भिंतीमध्ये (पॅरॅपेट बॉल ) मध्ये जागा (छिद्रे) ठेवण्यात आली असतील, तर खालच्या मजल्यांपेक्षा वरचा मजला तापण्याची समस्या निर्माण होणार नाही. सर्वात वरचा मजल्याचे छत गळण्याच्या समस्येचेही असेच आहे, गच्चीवरतील छाताला योग्य उतार देण्यात आला असेल, तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा करणारे पाईप बसविण्यात आले असतील तर गच्चीच्या छतावर पाणी साचून राहणार नाही, पाणी साचले तरच ते खाली गळते. त्याचप्रमाणे सदनिकेचा ताबा दिल्यानंतर कोणत्याही कारणामुळे छताच्या स्लॅबचे कोणत्याही कारणाने तोडफोड केली जाऊ नये उदाहरणार्थ गच्चीवर सावलीसाठी मंडप उभारणे किंवा सोलर पॅनल किंवा एसी युनिट बसविणे किंवा अशी कोणतीही कृती ज्यामुळे पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात अडथळा येईल तसेच गच्चीच्या स्लॅबवरील वॉटरप्रूफिंगचे नुकसान होईल. तुम्ही याची काळजी घेतलीत, तर छताची स्लॅब गळण्याची काळजी करण्याचे कारण नाही. मी स्वतः एका इमारतीच्या सगळ्यात वरच्या मजल्यावरील घरात  राहतो जी आम्हीच बांधली आहे. यालाच मी तुमच्या घराविषयी योग्य तथ्ये जाणून घेणे       असे म्हणतो.

    रिअल इस्टेटमध्ये अशी अनेक चुकीची तथ्ये आहेत ज्यांना आपण मिथके म्हणतो, यातील काही वास्तुशास्त्राची कृपा पण आहे (ज्यांचा वास्तुशास्त्रावर विश्वास आहे त्यांच्याविषयी मनात काहीही कटुता नाही किंवा त्यांचा अनादर करण्याचा हेतू नाही), यासंदर्भातले अनेक तथाकथित तज्ञ भूखंडाच्या एका कोपऱ्यामध्ये अग्नि असावा तर दुसऱ्या कोपऱ्यामध्ये पाण्याची टाकी असावी (पाणी) अशा प्रकारचे सल्ले देतात, परंतु तुमच्या घराच्या वापराशी याचा प्रत्यक्षात काहीही संबंध नसतो. ही यादी लांबलचक आहे व अशा शेकडो गोष्टी आहेत ज्यामुळेच मी शेपिरो यांचे अवतरण वापरले, तथ्ये तुमच्या भावनांची काळजी करत नाहीत; इथे मला अतिशय नम्रपणे शेपिरो यांना दुरुस्त करावेसे वाटते की विशेषतः विषय जेव्हा तुमच्या घराचा असतो तेव्हा योग्य तथ्ये तुमच्या भावनांची काळजी घेतील हे जास्त योग्य विधान आहे.” माझा वास्तुशास्त्रावर विश्वास नाही ( म्हणजे मी डोळे उघडे ठेवून विश्वास ठेवतो ) कारण कोणतेही शास्त्र म्हणजेच विज्ञान केवळ तथ्यावरच आधारित असले पाहिजे, एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक अनुभवावर आधारित असू नये, मग त्या कितीही महान किंवा चांगल्या का असेनात. तरीही वास्तुच्या तांत्रिक पैलूंवर माझा विश्वास आहे जो थेट पर्यावरण विज्ञानाशी निगडित आहे. तरीही मी योग्य घर निवडताना तथ्ये व वास्तुशास्त्राचा तो मुद्दा बाजूला ठेवेन कारण जेव्हा प्रश्न श्रद्धेचा व विश्वासाचा असतो तेव्हा बरोबर किंवा चूक अशी कोणतीच तथ्य समोर ठेवून उपयोग नाही. त्यामुळे, एखाद्या घरासाठी (कार्यालय किंवा दुकानासाठी) योग्य तथ्यांच्या मुद्द्याविषयी बोलायचे झाले तर योग्य तथ्ये जाणून घेण्याचा किंवा निश्चित करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुम्हाला ज्या बाबींची काळजी वाटतेय त्याविषयी योग्य प्रश्न विचारणे व त्यानंतर त्या उत्तरांचे तर्कसंगतपणे व ठोस पुराव्यांसह विश्लेषण करणे. कारण तथ्य हे तर्कसंगत असते व ते भौतिक जगात वारंवार सिद्ध केले जाऊ शकते, तो केवळ एखादेवेळी होणारा निव्वळ योगायोग असू शकत नाही. उदाहरणार्थ घराविषयी आणखी एक चुकीचे तथ्य म्हणजे, टॉयलेटमधे / बाथरुममध्ये पाय घसरणार नाही अशा टाईल्स बसविल्यामुळे, विशेषतः वयोवृद्ध व्यक्ती ओल्या  जागेत पडून अपघात होणार नाहीत. परंतु योग्य तथ्य म्हणजे, जर बाथरूममध्ये योग्य उतार दिला तर जमीनीवर पाणी साचणार नाही, तसेच तुम्ही पाण्याचा वापर केल्यानंतर  पृष्ठभागकोरड्या/रबर मॉपने पुसून घेतला तर अशा पृष्ठभागांवर घसरून पडण्याची शक्यता अतिशय कमी असते, मग ग्रॅनाईटची फरशी का असेना जिचा पृष्ठभाग काचेसारखा गुळगुळीत असतो. त्याचप्रमाणे पाय घसरणार नाही अशा टाईल्स लावल्या ज्यांचा पृष्ठभाग खरबरीत असतो, त्या कोरड्या ठेवल्या तरच त्यामुळे अपघातामुळे पडण्याचे प्रमाण कमी होऊ शकते (टाळता येत नाही). खरबरीत पृष्ठभागांवर साबणाच्या पाण्यामुळे एक थर तयार होतो व तो अधिक निसरडा होतो. केवळ मी म्हणतो म्हणून हे योग्य तथ्य आहे असे नाही, तर तुम्ही तुमच्या घराच्या बाथरूममध्येही हे करून पाहू शकता. त्यानंतर जर तुम्ही तुमच्या फरशीच्या निसरडेपणाच्या निकालाबद्दल समाधानी असाल तर ते योग्य तथ्य होते.

     मी घर बांधणीसंदर्भात म्हणजेच रिअल इस्टेट संदर्भात अशी शेकडो उदाहरणे देऊ शकतो कारण एक म्हणजे मी अभियंता आहे व दुसरे म्हणजे, मी जे काही बांधतो त्यासंदर्भात योग्य तथ्यांचा विचार करतो, आम्हाला हेच शिकविण्यात आले आहे. माझ्याकडूनही अंमलबजावणी करताना चुका होऊ शकतात कारण घर बांधणी क्षेत्रातील बांधकामाशी संबंधित बहुतेक कामे अजूनही हाताने केली जातात, तरीही मी योग्य तथ्यांचे (म्हणजे कारागिरीसंदर्भात) पालन केले तर चुकीचे घर बांधले जाण्याच्या शक्यता कमी आहेत. म्हणूनच तुम्ही तुमच्या घरांच्या निर्मात्यांना (म्हणजे बांधकाम व्यावसायिकांना) जास्तीत जास्त प्रश्न विचारले पाहिजेत, जर अशा प्रत्येक पैलूविषयी योग्य तथ्ये काय आहेत याची तुम्हाला खात्री नसेल. मग ती खोल्यांची लांबी-रुंदी असो, कारण ग्राहकांकडून मला एक चुकीचे तथ्य नेहमी ऐकायला मिळते ते म्हणजे खोल्यांचा आकार अतिशय लहान किंवा अतिशय मोठा आहे, परंतु तुम्ही नियोजनाच्या तथ्यांचा विचार केल्यास त्या खोल्यांचा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे वापर व्हावा यासाठीकाय योग्य आहे यानुसार तुम्हाला खोल्यांच्या आकाराचे विश्लेषण करता येईल. कारण लहान किंवा मोठे हे तुमच्या भावनेनुसार तसेच तुमच्या खिशानुसार बदलू शकते, परंतु तुमच्या बेडरूमचा वापर काय आहे व तुमच्या जीवनशैलीप्रमाणे तुम्हाला कोणत्या प्रकारचे फर्निचर हवे आहे (व जे तुम्हाला परवडू शकते) व तुम्ही त्या खोलीमध्ये किती वेळ घालवणार आहात हे तुम्ही समजून घेतल्यास, तुम्ही खोलीचा योग्य आकार ठरवू शकता, जे तथ्य आहे. त्यानंतर तुम्ही बांधकाम व्यावसायिक जी लांबी-रुंदी देऊ करतोय त्याच्याशी ही तथ्ये पडताळून पाहू शकता. कार पार्किंगच्या आकाराला हे लागू होते, तुम्ही ड्राईव्ह वे किती असेल किंवा गाडी वळवून घेण्यासाठी किती जागा मिळेल याची कल्पना करू शकत नसाल तर बांधकाम व्यावसायिकाला पार्किंगची जागी तयार करताना त्याने कोणत्या आकाराची कार गृहित धरली होती हे विचारा, तुमच्या कारशी (तसेच तुम्ही भविष्यात जी खरेदी कराल तिच्याशीही) त्याची तुलना करून पाहा व त्यानंतर पार्किंगची जागा तुमच्यासाठी योग्य आहे किंवा नाही याचा निर्णय घ्या. तुमच्या घराविषयी योग्य तथ्ये ठरवताना तुम्ही काय वाचले आहे किंवा ऐकले आहे किंवा तुमचा कशावर विश्वास आहे यावर जाऊ नका, कारण नेमके हेच केले जाते, बांधकामाच्या प्रक्रियेमागील विज्ञान व तर्काचा अभ्यास करा तसेच तुम्ही जे घर पाहताय त्याच्या नियोजनाचा विचार करा व त्यानंतर तुमच्या योग्य तथ्यांशी ते पडताळून पाहा व माझ्यावर विश्वास ठेवा त्यानंतर १०० पैकी ९० वेळा तरी तुम्हाला असे योग्य तथ्यांवर आधारित घर खरेदी करण्याच्या तुमच्या निर्णयाचा कधीच पश्चात्ताप होणार नाही.

   सरतेशेवटी मी असा सल्ला देईन की; एक घर हे  जवळपास तीनशेहून अधिक वस्तुंपासून बनते त्यामध्ये तीसहून अधिक व्यवसायांचा सहभाग असतो ज्यामध्ये फिटरपासून गवंड्यापर्यंत, टायलरपासून ते प्लंबरपर्यंत सगळ्यांचा समावेश होतो.ही सगळी अभियांत्रिकी आहे(म्हणजे विज्ञान आहे) अभियांत्रिकीतील सर्व काही तथ्यांवर चालते,ज्यातूनच बांधकामाचे कायदे नियम तयार होतात, म्हणूनच तुम्ही जेव्हा तुमचे घर खरेदी करता ते योग्य तथ्यांनी म्हणजेच योग्य अभियांत्रिकीने बांधलेले असले पाहिजे,हे फक्त लक्षात ठेवा !


संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स

smd156812@gmail.com

तुम्हाला शहराविषयी कोणत्याही तक्रारी असल्यास,खालील दुव्यावर लॉग इन करा

https://youtu.be/27j3I3rwGPQ?si=-ODYBxVI2Dl_C345



No comments:

Post a Comment