Wednesday 14 December 2022

कचरा शहर आणि नागरिक !




                                              

























आपण आपल्या मागे जेवढा गोंधळ (कचरा असे वाचावे) मागे सोडतो, त्यावरून आपल्याला इतरांविषयी किती आदर आहे हे दिसून येते.” … स्ट्युअर्टस्टॅफॉर्ड

स्ट्युअर्ट हे अतिशय प्रतिभावान लेखक आहेत व द व्होरबिंग सारख्या पुस्तकाचे लेखन त्यांच्या खाती जमा आहे. आहेत. चांगल्या लेखकांच्या बाबतीत त्यांचे शब्दांवरील प्रभुत्व ही नव्हे तर ते ज्याप्रकारे त्यांच्या भावना शब्दांमधूनव्यक्त करतात ते अधिक रोचक असते. म्हणूनच कचरा या विषयावरील माझ्या लेखासाठी मला स्ट्युअर्ट यांचे वरील शब्द अतिशय चपखल वाटतात. अलिकडे आपले प्रिय शहर (खरेतर संपूर्ण जग) अनेक आघाड्यांवर समस्यांना काळजीने पोखरले आहे ते म्हणजे जातीय द्वेष, दहशतवाद, अंमली पदार्थ, पिण्याचे पाणी, प्रदूषण, जंगलतोड, वाहतुकीची कोंडी, लोकसंख्या वाढ व महामारी, मात्र या सगळ्या पैलूंमध्ये एक महत्त्वाची बाब आपण विसरतोय जी आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूशी निगडित आहे. वरकरणी निरोगी दिसणाऱ्या आपल्या शरीरामध्ये आतमध्येज्याप्रकारे कर्करोगाच्या पेशी वाढत असतात व अचानक या जीवघेण्या आजाराने तिसरा टप्पाही ओलांडला असल्याचे निदर्शनास येते व तोपर्यंतसर्वकाही संपलेले असते,त्याचप्रमाणे मी वर नमूद केलेला घटकही आपल्या सामाजामध्येशांतपणे वाढतोय. तसेच, आपण पायाभूत सुविधांच्या आघाडीवर लढत आहोत जे आपल्याला सकृतदर्शनी दिसत आहे. हा आपल्याला विकासाचा परिणाम आहे ज्याला आपल्यापैकी बहुतेकजण वाढ असे म्हणतात. मात्र या वाढीच्या आवरणाखाली एक मूक जीवघेणा आजार ठाण मांडून बसलेला आहे जो आपले स्मार्ट शहर नावाच्या तथाकथित निरोगी शहरामध्ये अतिशय सक्रिय व जिवंत आहे. हा घटक म्हणजे दुसरे तिसरे काही नसून कचरा आहे. ज्याप्रकारे आपलेच शरीर कर्करोगाच्या पेशी तयार करते त्या पेशींचं कालांतराने आपले आयुष्य संपवतात, त्याचप्रकारे कचराही आपणच तयार करतो.

तुम्हाला असे वाटत असेल की मी अतिशयोक्ती करतोय, तर कृपया तुमचे डोळे उघडा (तुम्ही ते उघडले नाही तरीही तुम्ही वास घेऊच शकता) व तुम्ही या शहरामध्ये व भोवताली फिरत असताना आजूबाजूला पाहा व तुम्हाला काय दिसते ते मला सांगा. तुम्ही तुमच्या घरातून (म्हणजेच सदनिकेतून) बाहेर पडता तिथपासून ते पायऱ्यांच्या लॉबीमध्ये कचऱ्याचे डबे व त्यातून डोकावणारी खोकी दिसतील, त्यातून तुम्हाला गेल्या रात्री कोणत्या सदनिकेतून काय खाण्याचे पार्सल मागवण्यात आले होते हे सुद्धा समजू शकेल. तुम्ही जेव्हा तळमजल्या पर्यंत उतरता तेव्हा तुम्हाला प्रवेशद्वारापाशी आणखी मोठा कचऱ्याचा डब्बा दिसेल. पुणे महानगरपालिकेच्या कचरा संकलन करणाऱ्या ट्रकची तो वाट पाहात असतो. त्यामध्ये सगळे काही असते, शिल्लक अन्नापासून, ते गृहसजावटीच्या साहित्याच्या कचऱ्यापासून ते खराब झालेल्या मोबाईल चार्जर पर्यंत सर्व काही. त्यानंतर तुम्ही तुमच्या संकुलातील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या गांडुळ खताच्या चरांकडे  पाहता जे तयार करणे पुणे महानगरपालिकेच्या नियमांनुसार बंधनकारक आहे. तुम्हाला दिसून येईल की त्यामध्ये तुमच्या सोसायटीतील झाडांचा वाळलेला पालापाचोळा व अशाच काहीबाही गोष्टी आहेत, पण त्यात ओला कचरा नाही व इमारत ताब्यात घेतल्यापासून या  चरांचा वापरच केला गेलेला नाही. त्यानंतर तुम्ही रस्त्यावर येता व तुम्हाला तथा कथित सार्वजनिक कचरा पेट्या दिसतात त्यादेखील कचऱ्याने ओसंडून वाहत असतात. लोक येथे सार्वजनिक कचरा पेटी आहे या फलकाकडे पाहात नाहीत, कारण त्याभोवताली सगळीकडे सगळ्या प्रकारचा कचरा अस्ताव्यस्त पणे विखुरलेला असतो. डुकरे तसेच कुत्री उर्वरित घाण करून ठेवतात व हा कचरा आणखी पसरवतात. एवढेच पुरेसे नाही म्हणून की काय तुम्ही चालायला सुरुवात करता (आणि वास घ्यायलाही) तसे तुम्हाला पद पथांवर सगळीकडे कचरा विखुरलेला दिसतो. त्यामध्ये उरलेल्या अन्नाची पाकिटे तसेच बियरच्या रिकाम्या बाटल्या बँडेज व त्याव्यतिरिक्त बांधकाम साहित्याचा कचरा यासगळ्याचा समावेश असतो. यापुढे जाऊन तुम्ही शहराच्या मध्यवर्ती भागातून बाहेर पडलात व बाह्यवळण मार्गावर गेलात तर तुम्हाला रस्त्याच्या दुतर्फा अशा कचऱ्याचे अक्षरशः ढीग दिसतील. कारण कचरा टाकण्यासाठी जेवढी जास्त जागा उपलब्ध होईल (म्हणजे सार्वजनिक जागा) तेवढे कचऱ्याचे प्रमाण अधिक असते, हे कचरा साचण्याचे साधे सूत्र आहे व कोणतेही खेडे, गाव किंवा शहर कचऱ्याच्या या नियमाला अपवाद नाही. तुम्हाला मी नमूद केलेल्या कोणत्याही जागेभोवती काहीही कचरा दिसत नसेल तर आधी तुमची दृष्टी (नाकही) तपासाकिंवा तुम्ही नक्कीच पुण्यामध्ये किंवा आपल्या राज्यातल्या कोणत्याही खेड्यामध्ये किंवा गावामध्ये किंवा शहरामध्ये नाही, तुम्ही कदाचित विदेशामध्ये आहात. महाराष्ट्राविषयी जाज्वल्य अभिमान बाळगणाऱ्यांनो माझ्या या विधानामुळे तुम्ही दुखावला गेला असाल तर मला माफ करा मात्र तुमचे प्रेम, आपुलकी (व माझ्या शब्दांविषयीचा राग) आजूबाजूचा परिसर कचरामुक्त ठेवण्यासाठी वापरा, मला दुषणे देण्यामध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका, यामुळे आपल्या प्रिय राज्याला अधिक मदत होईलमी जाणीवपूर्वक कचरामुक्त असा शब्द वापरला, स्वच्छ परिसर असा शब्द वापरला नाही, कारण स्वच्छतेची आपली व्याख्या आहे, आपला कचरा शेजारच्या जागेत सरकवणे (म्हणजे फेकणे किंवा टाकून देणे), जेथे आपण स्वतःच निर्माण केलेला कचरा पाहू शकत नाही किंवा त्याचा वास आपल्यापर्यंत येणार नाही.                                         

                                                                                                                          

ज्याप्रकारे शीत पेय उत्पादक कंपन्या त्यांच्या पेयांची जाहिरात झिरोशुगर किंवा झिरोकॅलरी अशी करतात व आपण ती पिऊन आरोग्यदायक जीवनशैलीचा अवलंब करत असल्याचा विचार करून आनंदी होतो, हेच तत्व आपण आपल्या स्वच्छतेच्या व्याख्येसाठी वापरत असतो, आपण आपला कचरा फेकून देऊन केवळ आपल्या दृष्टीआड करत असतो. याच कारणाने मी कचऱ्याची समस्या कर्करोगाइतकी धोकादायक असल्याचे म्हणतो. संथपणे, कुठेतरी हा सर्व साचलेला कचरा आपल्या पर्यावरणाचे शक्यत्या सर्व स्वरूपात प्रदूषण करत असते, मग ते जलस्रोत प्रदूषित होणे असो किंवा मातीचा दर्जा खालावणे असो किंवा दुर्गंधीयुक्त वायूंनी हवा प्रदूषित करणे असो. आपल्याला असे वाटते की आपण आजूबाजूला कचरा दिसत नसल्यामुळे आपण निरोगी जीवनशैली जगत आहोत. तसेच हे कचऱ्याचे ढीग म्हणजे जीवाणू, विषाणू व डासांचे तसेच अशा अनेक कीटकांचे माहेरघर असते. त्याशिवाय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आपल्याकडे अत्यंत नाविन्यपूर्ण मार्ग  आहे, तो म्हणजेकचरा जाळणे. ज्यामुळे खरेतर कचऱ्या ऐवजी आपणच नष्ट होतो. परंतु मग कचऱ्यामुळे आपल्या आयुष्याचे जे नुकसान होऊ शकते व होत आहे ते आपण आधीपासूनच जाणतो, नाही का? असे असताना, मी माझे शब्द का दवडतोय, कारण काहीवेळा वारंवार कडू औषध द्यावे लागते तरच ते प्रभावी ठरते. कचरा नावाच्या कर्करोगाविषयी मी नुकताच आपला दृष्टीकोन कसा आहे हे नमूद केले त्यालाही हे लागू होते.

आता आपल्या नेहमीच्या प्रश्नासंदर्भात बोलू, जेव्हा प्रश्न पायाभूत सुविधा देण्याचा किंवा कचऱ्यासारख्या सार्वजनिक समस्या हाताळण्याचा असतो तेव्हा, “सरकार कचऱ्याच्या या समस्येविषयी नेमके काय करतेय, आम्ही आमचे कर देत नाही का, असे असताना आम्हाला कचऱ्याच्या समस्येला तोंड का द्यावे लागावे?” असे आपण म्हणतो.  होय, कचऱ्याची समस्या हाताळण्यासाठी सरकार जबाबदार आहेत व तुम्ही करही भरता, त्यासाठी तुमचे आभार मात्र खरा प्रश्न असा आहे की, हा कचरा तयार कोण करते व तो इतस्ततः कोण पसरवते?” या प्रश्नाचे उत्तर असे आहे की,दररोज आपल्यापैकी प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या प्रकारचा कचरा तयार करते.मात्र एखाद्या अनौरस मुलाला त्याचे पालक सोडून देतात (अनाथ करतात) त्याचप्रमाणे हा कचराही आपण टाकून देतो! मी अतिशय कडवट शब्दात ही तुलना करतोय म्हणून मला माफ करा, मात्र आपण तयार केलेल्या कचऱ्याची वस्तुस्थिती हीच आहे. कारण आपण दिवसाच्या प्रत्येक तासाला हरतऱ्हेचा कचरा निर्माण करतो, मात्र आपण त्या कचऱ्याची जबाबदारी कधीच घेत नाही, बरोबर? खरेतर  या कचऱ्याची जबाबदारी कुणीच घेत नाही, नागरी किंवा शहरी भागातील पायाभूत समस्यांच्या बाबतीत क्रमवारी ठरवायची असेल तर कचऱ्याची समस्या अतिशय धोकादायक होण्याचे हेच सर्वात मोठे कारण आहे. कारण प्रत्येक जण कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी दुसऱ्या कुणाकडे तरी बोट दाखवतो व तो फक्त वाढतच राहतो व आपले नुकसान करत राहतो. म्हणूनच आपण कचऱ्याची समस्या न हाताळण्यासाठी फक्त सरकारला दोष देऊ शकत नाही कारण सरकार जबाबदार आहेच मात्र कचऱ्याच्या समस्येची जास्त जबाबदारी प्रत्येक व्यक्तीची आहे.आपण जो काही कचरा करून ठेवला आहे तो सरकारने स्वच्छ करावा अशी अपेक्षा आपण कशी करू शकतो कारण आपण आपल्या घराचा, कामाच्या ठिकाणचा कचरा आपल्या इच्छेने, कोणतीही प्रक्रिया न करता किंवा तो वेगळाही न करता सार्वजनिक ठिकाणी फेकतो, त्यानंतर आपण त्यासाठी सरकारला दोष देतो. आपण कचरा सार्वजनिक कचरा पेट्यांपर्यंत नेण्याची तसदीही घेत नाही. आपण सरळ आपल्या इमारतीच्या बाहेर पदपथाला लागून तो फेकणे किंवा टाकून देणे पसंत करतो. त्यानंतर सरकार शहर स्वच्छ ठेवत नसल्याबद्दल आपण त्यांच्या नावाने खडे फोडतो. आपण आपल्या घरातील तसेच मंदिरातील देवांची पूजा करतो व आपण आदल्यादिवशीची वाळलेली फुले व अर्पण केलेला प्रसाद वगैरेसारख्या वस्तू नदीमध्ये टाकून देतो व त्यानंतर आपण सरकार नद्या प्रदूषित असल्याबद्दल काहीच करत नाही म्हणून त्यांना नावे ठेवतो. आपण आपला औद्योगिक/बांधकाम साहित्याचा कचरा भोवतालच्या गवताळ भागांमध्ये किंवा टेकड्यांवर टाकून देतो व आपल्याला असे वाटते की सरकार या जमीनी पुन्हा हिरव्या बनवेल. आपल्या चुकांची यादी लांबलचक आहे मात्र आपण आपल्या चुकांसाठी सरकारकडे बोट दाखवतो, आपण खरोखरच अतिशय दुटप्पी आहोत.

मी आत्ता पर्यंत कचऱ्या संदर्भात जे काही सांगितले ते तुम्हाला पटले असेल तर यासाठी काय करणे ही काळाची गरज आहे हे पाहू. तर कचऱ्याच्या दृष्टीने काळाची गरज आहे की प्रत्येकाने आदर पूनावाला झाले पाहिजे. तुम्हाला असे वाटत असेल की मला वेड लागले आहे, कारण जेव्हा कधीही स्वच्छता मोहिमेचा उल्लेख केला जातो तेव्हा लोक (म्हणजेच आपले नेते) महात्मा गांधी किंवा गाडगेबाबांचे (एक सच्चे समाजसेवक) नाव घेतात. होय, ही नावे महत्त्वाची आहेतच मात्र ती भूतकाळ आहेत व आपण त्यांचा वापर त्यांच्या कृतींचे अनुकरण करण्याऐवजी केवळ प्रसिद्धीसाठी करतो. आता तुम्ही विचाराल की अदर पूनावाला का, कारण तुम्हाला शहरात सगळीकडे कचरा दिसत असेल तर तुम्हाला कचरा उचलणारे व्हॅक्यूम क्लिनर तसेच काही ट्रक व गणवेश घातलेली माणसे दिसतील. या सगळ्यांवर अदर पूनावाला फाउंडेशनचा लोगो असेल, म्हणूनच आपण सगळ्यांनी त्यांचे अनुकरण

                                                                                                                                 

करणे आवश्यक आहे. पूनावाला अब्जाधीश आहेत व साथींच्या रोगांवर लसी बनविण्या सोबतच ते त्यांच्या शहराचीही काळजी घेतात व त्यांनी कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठीपुणे महानगरपालिकेला कोट्यवधी रुपयांचे योगदान दिल आहे.आपण कदाचित पैशांच्या स्वरूपात देणगी देऊ शकणार नाही मात्र आपण महानगरपालिकेला दोन आघाड्यांवर

वैयक्तिक मदत करू शकतो, एक म्हणजे कमी कचरा तयार करण्याचा प्रयत्न करणे व दुसरे म्हणजे स्वतःतयार केलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यास (फेरप्रक्रिया) मदत करणे.म्हणूनच, आपण कचऱ्याच्या बाबतीत अदर  पूनावालायांच्या सारखाच दृष्टीकोन ठेवणे, कचऱ्याची जबाबदारी घेणे आवश्यक आहे, हीच काळाची गरज आहे.

स्थानिक संस्थांमध्ये तसेच सोसायट्यांमध्ये, आपण प्रत्येक नागरिकाला जागरुक करण्यासाठी मोहिम सुरू केली पाहिजे,की तो किंवा ती कचऱ्याविरुद्धच्या लढाईमध्ये कशाप्रकारे योगदान देऊ शकतात. या आघाडीवर मला अलिकडेच झालेल्या स्वच्छ सोसायटी नमो कप (नावावर जाऊ नका) या कार्यक्रमाचा उल्लेख करावासा वाटतो, यामध्ये एका राजकीय पक्षाने माझ्या परिसरामधील इमारतींसाठी एका स्पर्धेचे आयोजन केले होते, ज्यामध्ये लोकांनी त्यांच्या इमारती स्वच्छ ठेवायच्या होत्या. यातील राजकीय पैलू बाजूला ठेवू मात्र हा अतिशय महत्त्वाचा पुढाकार आहे, कारण कोणतेही सरकार किंवा विभाग एकट्याने शहर तर सोडाच एक प्रभागही स्वच्छ ठेवू शकत नाही. केवळ कचरा फेकण्याविरोधात कायदे करून काहीही होत नाही, हे आपण पाहिले आहे. अर्थात याचा अर्थ असा होत नाही की हे कायदे हटवून टाका, तर जागरुकता व कायद्याची अंमलबजावणी यांचा समतोल साधला पाहिजे. तसेच ज्या सोसायट्यांना गांडुळखत निर्मिती करण्याच्या अटींवर मंजूरी देण्यात आली आहे तेथून ओला कचरा संकलित करणे थांबवा. जेथे अशा प्रकारची यंत्रणा तयार करण्यात आलेली नाही, त्यांना आता करायला लावा व ती निर्धारित वेळेत झाली पाहिजे, त्यांनी तसे केले नाही तर त्यांना दुप्पट मालमत्ता कर आकारा. त्याचवेळी स्थानिक, राज्याच्या तसेच केंद्राच्या अर्थसंकल्पामध्ये गांडुळ खत निर्मिती किंवा ओला कचरा प्रक्रिया प्रकल्पांसाठी निधीची तरतूद करा. त्याचप्रमाणे कचरा उघड्यावर किंवा सार्वजनिक जागी टाकणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी पथके असली पाहिजेत. अशा लोकांना मोठा दंड आकारला पाहिजे म्हणजे ते असे कृत्य करण्याचे धाडस पुन्हा करणार नाहीत (मी दिवास्वप्न पाहतोय, मला माहितीय). सर्वात महत्त्वाचे म्हणजे, शाळा व महाविद्यालयांमध्ये कचऱ्याच्या समस्यांविषयी सतत जागरुकता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले पाहिजे, कारण हे दीर्घ काळात अतिशय प्रभावी माध्यम आहेवैयक्तिक पातळीवर आपण कचरा निर्मिती कमी करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करण्याचा विचार केला पाहिजे. त्यासाठी नेहमी कापडी पिशवी सोबत ठेवणे हा सर्वात सोपा व परिणामकारक मार्ग आहे. कारण आपण प्रत्येक वस्तू खरेदी करताना जे पॅकेजिंग किंवा कॅरी बॅगवापरतो त्यामुळे सर्वाधिक कचरा होतो. तसेच आपण जेवढे खाऊ शकतो तेवढेच अन्न मागवणे व दुसरा मुद्दा म्हणजे ते व्यवस्थित पुन्हा पॅक करून गरजूंना देणे. येथे महानगरपालिका उरलेले अन्न संकलित करण्याची यंत्रणा तयार करण्याचा व ते गरीबांमध्ये पुन्हा वितरित करण्याचा विचार करू शकते, ही केवळ एक कल्पना आहे व आपल्याला अशा अनेक कल्पनांची गरज आहे.

एक लक्षात ठेवा पाणी, वाहतूक, घरे, नोकऱ्या, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य या सगळ्या गोष्टी आपण निर्माण किंवा तयार करू शकतो मात्र कचऱ्याची समस्या पूर्णपणे वेगळी आहे कारण ती निर्माण करण्याशी संबंधित नाही तर आपण जे निर्माण केले आहे ते हाताळण्याशी संबंधित आहेआपणएकाच पृथ्वीवरराहातो व ती गोल आहे, म्हणूनच आपण जे काही दूर ढकलतो, ते एक दिवस पुन्हा आपल्या स्वतःच्याच परसदारात येऊन पडते (अनेक पट अधिक) व भौतिकशास्त्राच्या या नियमालाकचऱ्याचाही अपवाद नाही,एवढेच सांगावेसे वाटते.

संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स

ईमेल आयडी - smd156812@gmail.com