Thursday 16 June 2022

जागतिक पर्यावरण दिवस, बारावीचे विद्यार्थी आणि आव्हान भविष्याचे!


 





























जागतिक पर्यावरण दिवस, बारावीचे विद्यार्थी आणि आव्हान भविष्याचे!

मी एक लहान मुलगीच आहे, तरीही मला हे कळते की सगळ्या युद्धांवर खर्च झालेला सर्व पैसा पर्यावरणाच्या समस्यांवरील उत्तरे शोधण्यासाठी, दारिद्र्य निर्मुलनासाठीव बंधनकारक करार करण्यासाठी वापरण्यात आला असता, तर ही पृथ्वी किती सुंदर जागा झाली असती.” … संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीमध्ये एक लहान मुलगी.

मला या मुलीचे नाव माहिती नाही, तसेच तिच्याविषयी कोणतेही तपशील उपलब्ध नाहीत, तरीही तिच्या या निरागस शब्दांमध्ये एवढी ताकद आहे की त्यामुळे कुणाचेही मन हेलावून जाईल (म्हणजे शहाण्या माणसाचे असे मला म्हणायचे आहे). म्हणून जागतिक पर्यावरण दिनाच्या (पुन्हा एकदा) निमित्ताने लिहीलेल्या या लेखासाठी मी तिचेच अवतरण वापरले आहे. मला जेव्हा सिम्बायोसिस कॉलेजमधून नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला १२वीच्या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी कॉल आला व तो योगायोगाने जागतिक पर्यावरण दिन होता, तेव्हा मला दोन गोष्टींचा आनंद झाला. एक म्हणजे जवळपास तीन वर्षांनी मला मुलांशी असा प्रत्यक्ष संवाद साधता येत होता (लॉकडाउनची कृपा) व दुसरे म्हणजे सिम्बायोसिसचा हा किवळे येथील कॅम्पस मी अगदी मोकळी जमीन असल्यापासून ते आता जेवढा कीरवाईने विकसित झाला आहे तिथपर्यंतचा सगळा प्रवास पाहिला आहे. अशा जागांना भेट देणे नेहमीच आनंददायक असते कारण त्यामुळे तुमच्या मनाला सकारात्मकता मिळते विशेषतः जेथे उत्साही तरुणाई असते. अडचण अशी आहे की पर्यावरण हा गुंतागुंतीचा विषय आहे व इयत्ता १२वी च्या वयोगटातील मुलांना लवकर कंटाळा येतो. त्यातच मुले तब्बल दोन वर्षांच्या खंडानंतर प्रत्यक्षात एकत्र येणार होती. किंबहुना या बॅचचा हा कॉलेज जीवनाचाच पहिला दिवस होता, कारण त्यांनी ११वीचे अख्खे वर्ष ऑनलाईनच काढले. त्यामुळेच मी हा विषय व त्याचे सादरीकरण याविषयी अतिशय काळजी घेणे आवश्यक होते. या पिढीला अतिशय लवकर कंटाळा येत असल्यामुळे त्यांचे लक्ष या विषयावर गुंतवून ठेवणे हे पर्यावरण संवर्धनापेक्षाही अवघड काम होते!

पण हेच तर खरे शिकवणे असते, की विद्यार्थ्यांना शिकवणे हा तुमचा उद्देश असला तरीही तुम्ही त्यांच्याशी गप्पा मारताय असे त्यांना वाटले पाहिजे, एक चांगला शिक्षक नेमके हेच करतो, नाही का? मी खरोखरच अतिशय सुदैवी आहे की माझ्या आयुष्यात मला काही चांगले शिक्षक मिळाले ज्यामुळे मला शिकवण्याचा हा सोपा नियम समजला. अर्थात मला तसे करणे प्रत्यक्षात कितपत जमते हे सांगणे कठीण आहे, हा भाग वेगळा. तर मी त्या मुलांच्या संस्थेविषयी म्हणजे सिम्बायोसिसविषयी माझ्या आठवणी सांगून बोलायला सुरुवात केली व मी जे काही बोललो ते येथे देत आहे

खरेतर, माझी पिढी ही अतिशय नशीबवान आहे (म्हणजे जे सध्या ४५ हून वयोगटामध्ये मोडतात) कारण आम्हाला कधीच एवढे दिवस साजरे करावे लागत नव्हते किंवा त्यासोबत येणाऱ्या औपचारिकतांचे पालन करावे लागत नव्हते. आमच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये फक्त ट्रॅडिशनल डे, रोझ डे, व्हॅलेंटाईन्स डे साजरा केला जात (त्यातही आमचे शेवटचे दोन दिवस तर फक्त इतर नशीबवान मुले ते साजरे करत असताना पाहण्यासाठीच होते) व सुदैवाने आम्हाला पर्यावरण दिनी कुणाचे व्याख्यान ऐकावे लागत नसे, वसुंधरा दिनाच्या निमित्ताने झाडे लावावी लागत नसत किंवा मदर्स डे, सिस्टर्स डे अथवा तत्सम कोणत्याही डेच्या निमित्ताने शुभेच्छा कार्डे पाठवावी लागत नसत. जागतिक पर्यावरण दिनाविषयी बोलायचे झाले, तर आमच्या पिढीकडे जे सुदैव होते त्याचा आम्ही योग्य प्रकारे वापर केला नाही, म्हणून तुमची ही पिढी दुर्दैवी ठरली आहे कारण तुम्हाला जागतिक पर्यावरण दिन साजरा करावा लागतोय. म्हणूनच मी सिम्बायोसिसच्या व्यवस्थापनाचे अशा कार्यक्रमाने शैक्षणिक वर्षाची सुरूवात केल्याबद्दल अभिनंदन करतो, कारण असे केले तरच काहीतरी आशा आहे. नाहीतर ही पिढीदेखील आम्ही पर्यावरणाविषयी जेवढे अडाणी होतो तशीच झाली तर या पुढच्या पिढ्यांसाठी हा दिवसही साजरा करण्यासाठी उरणार नाही.

तर आता या विषयावर बोलूयात, तुम्ही पर्यावरण हा विषय आकड्यांमध्ये, सूत्रांमध्ये किंवा तारखांमध्ये मांडू शकत नाही. जागतिक पर्यावरण दिनाची सुरूवात १९७४ साली झाली जेव्हा तुमच्यापैकी कुणाचा जन्मही झाला नव्हता, कदाचित तुमच्यापैकी बऱ्याचशा मुलांच्या पालकांचाही झाला नसेल. तरीही प्रत्येक सरत्या वर्षागणिक जागतिक पर्यावरण दिनाची गरज वाढतेय हे दुःखद वास्तव आहे. प्रत्येक जागतिक पर्यावरण दिनाची एक संकल्पना असते ज्यावर आधारित जागरुकता मोहिमा संपूर्ण वर्षभर चालविल्या जातात व यावर्षी जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना आहे एक वसुंधरा! आता, तुमच्यापैकी बरेच जण (म्हणजे अगदी मोठेही) “एक वसुंधराम्हणजे काय, आपण सगळे प्रत्यक्षात एकाच पृथ्वीवर राहात नाही कातर, “एक वसुंधराम्हणजे प्रत्येक या पृथ्वीवरील प्रत्येक सजीव एकमेकांशी जोडला गेला आहे व आपल्या कृती कितीही वैयक्तिक असल्या तरीही त्यांचा कुठे ना कुठे इतर सजीवांवर परिणाम होतोच. निसर्ग हवा, पाणी, जमीन, जंगले व इतरह अनेक स्वरूपात आहे, आपण सगळे खरेतर एकत्रितपणे एकच प्रजाती आहोत, असा या एक वसुंधराचा अर्थ होतो. सर्वात प्रगल्भ व बुद्धिमान प्रजाती म्हणून आपले (माणसांचे) कर्तव्य आहे की आपण पुढाकार घेऊन पृथ्वीचे रक्षण केले पाहिजे. जागतिक पर्यावरण दिन २२ ची एक वसुंधरा संकल्पनाही आपल्याला हेच सांगते. तुम्हा मुलांना अवतार हा इंग्रजी चित्रपट आठवतोय का?, ज्याला तब्बल दहा ऑस्कर पुरस्कार मिळाले होते. त्या चित्रपटामध्ये एका काल्पनिक ग्रहावर एक जीवनादायी झाड दाखवण्यात आले होते, जे त्या ग्रहाच्या उर्जेचा स्रोत होते, ते झाड त्या ग्रहावरील सर्व सजीवांशी जोडलेले होते. एक वसुंधरेचाही हाच अर्थ आहे कारण आपण इतर प्रजातींच्या गरजांना प्रतिसाद देणे आवश्यक आहे जे आपल्याशी एका अदृश्य बंधाने जोडलेले आहेत, हाच बंध आपल्याला अनुभवायचा आहे व अधिक दृढ करायचा आहे.

आपल्याला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याची गरज वाटू लागली त्यापूर्वी कशी परिस्थिती होती हे आपण समजून घेऊ. काही वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या नद्या आणि तलावांमध्ये स्वच्छ पाणी होते, आपली हवा शुद्ध होती व भरपूर ऑक्सिजन मिळत होता, आपल्या भोवतालच्या आवाजाच्या पातळ्या ६० डेसिबलपेक्षा जास्त नव्हत्या (माणसाच्या कानांना सहज सहन होईल असा आवाज), आपल्या समुद्रामध्ये भरपूर मासे होते, आपली जंगले बरीच विस्तारलेली होती ज्यामुळे माणसांव्यतिरिक्त हजारो प्रजातींसाठी जागा होती. मात्र हळूहळू सर्व गोष्टींचा ऱ्हास होऊ लागला, आपली लोकसंख्या सतत वाढत राहिली व आपली जीवनशैली व आपली हावही वाढत राहिली. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत आपल्याला शहरांमध्ये रस्त्याच्या कडेने जंगली फुले व फुलपाखरे दिसायची, तसेच आपल्या अवतीभोवती अनेक पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत असे. आता ते सगळे नाहीसे झाले आहे व आता आपल्याला फक्त नद्यांमध्ये प्रदूषित पाणी, अवतीभोवती कचऱ्याचे ढीग व काँक्रीटचे रस्ते पाहायला मिळतात. आता फुलपाखरांऐवजी आपल्याला झुरळे दिसतात, जंगली फुलांची जागा आता वाढदिवसांच्या फलकांनी घेतली आहे ज्यावर बटबटीत चेहरे झळकत असतात ज्यांना आपण स्थानिक नेते म्हणतो. आकाश धुराने भरलेले असते व आपल्या अवतीभोवती वाहनांचे कर्कश्श हॉर्न वाजत असतात भरीतभर म्हणून चौकाचौकात ध्वनीक्षेपकावर डिजेचे कानठळ्या बसविणारे संगीत ऐकू येत असते. आपण जी काही परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे, त्यामुळे केवळ वन्य प्राणीच नव्हे तर अनेक माणसांनाही एक पेलाभर शुध्द पाण्यासाठी वणवण करावी लागते व आपल्याला ही परिस्थिती बदलायची आहे.

आता तुम्ही विचाराल (१२वीतील विद्यार्थी म्हणून) की ही माझी महत्त्वाची वर्षे आहेत व चांगले महाविद्यालय मिळावे यासाठी चांगले गुण मिळवणे आवश्यक आहे, म्हणजे मला पुढे जाऊन चांगली नौकरी मिळू शकते, मला ज्ञानार्जनासोबतच थोडेफार पैसेही कमवायचे आहेत व माझे करिअर घडवायचे आहे, या सगळ्यात माझ्याकडे पर्यावरणाविषयी विचार करायला वेळ कुठे आहे. मी तुमच्या वयाचा असताना मला, पर्यावरण संवर्धन वगैरे तर सोडाच पर्यावरणाविषयी फारशी माहितीही नव्हती. म्हणूनच तुमची पिढी दुर्दैवी आहे कारण तुम्हाला ज्ञान मिळवावे लागते, पैसा कमवावा लागतो व त्याचसोबत पर्यावरणही वाचवावे लागते,तो तुमच्या पिढीला लागलेला शाप आहे, मात्र तुम्हाला त्याचेच रुपांतर एका संधीत करायचे आहे. प्रत्येक दशकामध्ये एखाद्या विषयाचे किंवा शाखेचे किंवा उद्योगाचे वर्चस्व राहिले आहे व केवळ हेच दशक नव्हे तर संपूर्ण शतकावर पर्यावरणाचे वर्चस्व राहील, ज्याचा तुम्ही तुमच्या करिअरसाठी जास्तीत जास्त वापर करू शकता (किंवा करून घ्यावा लागेल), ज्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन होईल व त्यालाच मी शाश्वतता असे म्हणतो. कुणीही व्यक्ती उपाशी पोटी पर्यावरणाचे रक्षण करू शकत नाही किंबहुना माणसाचे रिकामे पोट हा पर्यावरणाचा सर्वात मोठा शत्रू आहे.

नाहीतर ऍव्हेंजर्स एंड गेममधील (हा मार्व्हल स्टुडिओजचा चित्रपट आहे) थॅनोसने पर्यावरण संवर्धनाचा सर्वोत्तम (व सर्वात सोपा) मार्ग दाखवला आहे, तो म्हणजे, एका चुटकीसरशी सध्याच्या लोकसंख्येपैकी निम्मी लोकसंख्या हटवून टाकायची, यामुळे पर्यावरणाचे रक्षण होईल, मात्र आपल्यापैकी बहुतेक जण असे करू शकत नाहीत, बरोबर? म्हणूनच, दुसरा मार्ग म्हणजे तुमच्या संबंधित क्षेत्रातील किंवा विषयातील ज्ञानाचा उपयोग करणे व पर्यावरणासाठी त्याचा वापर करणे, हा शाश्वत मार्ग आहे. उदाहरणार्थ तुम्ही कला शाखेचे विद्यार्थी असाल तर तुमच्या कलात्मक निर्मितीमध्ये निसर्ग हा आधार असू द्या मग ती चित्रे असतील, एखादे सादरीकरण, लेख किंवा चित्रपट. म्हणजेच तुम्हाला या कलात्मक निर्मितीमधून पैसेही मिळू शकतात व तुम्ही लोकांना जागरुकही करू शकता तसेच तुमच्या ग्राहकांच्या ब्रँडची उत्तम प्रसिद्धीही होईल. तुम्ही विज्ञानाचे विद्यार्थी असाल, तर पर्यावरण संवर्धनाशी संबंधित तंत्रज्ञान हा आजकाल परवलीचा शब्द झाला आहे. आज जगातील सर्वात श्रीमंत माणूस आहे इलॉन मस्क, जो हरित उर्जेवर चालणारी वाहने तयार करतो. तुमचे करिअर संतुलित ठेवण्यासाठी व पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी याहून अधिक चांगले कोणते उदाहरण असू शकते.हे जग अधिक चांगले व्हावे यासाठी तुमच्या ज्ञानाचा वापर करा, पर्यावरणास पूरक तंत्रज्ञानांचा शोध लावा, तुम्ही अशा कितीतरी गोष्टी करू शकता. तुम्ही आयटी (माहिती तंत्रज्ञान) क्षेत्रात काम करत असाल तर मला तुम्हाला सांगावेसे वाटते, की पर्यावरण संवर्धनातील सर्वात महत्त्वाचादुवा म्हणजे डेटा व तो प्रचंड मोठ्या प्रमाणावर आवश्यक असतो. म्हणजे अभियंत्यांना त्यांची उत्पादने नेमक्या गरजांनुसार तयार करता येतील कारण कोणत्याही शाश्वत उत्पादनासाठी अचूक डेटा हा अत्यावश्यक असतो. सरतेशेवटी, तुम्ही तुम्ही वाणिज्य शाखेचे असाल व एक लेखापाल पर्यावरणासाठी काय करू शकतो असा विचार करत असाल, तर कोणत्याही निधीवर तुमचे नियंत्रण असते, बरोबर? तुमचे पैसे योग्य पर्यावरण पूरक उत्पादनांमध्ये तसेच संशोधन व विकासामध्ये गुंतवा, कारण निधीच्या अभावामुळेच पर्यावरण संवर्धन अतिशय मागे पडते.

मुलांनो, पर्यावरणाच्या बाबतीत तुमची पिढी कदाचित आमच्यापेक्षा कमनशीबी असेल, मात्र तुम्ही कमनशीबीच राहायचे ठरवले तर, मुलांनो,मुलांनो पर्यावरणाच्या बाबतीत तुमची पिढी कदाचित आमच्यापेक्षा कम नशिबी असेल, मुलांनो, पर्यावरणाच्या बाबतीत तुमची पिढी कदाचित आमच्यापेक्षा कमनशीबी असेल, मात्र तुम्ही पण कमनशीबीच राहायचे ठरवले तर, त्यासाठी तर पुढची पिढी तुम्हालाच दोष देईल हे लक्षात ठेवा. तुम्हाला तुमच्या भविष्यातील करिअरसाठी मनःपूर्वक शुभेच्छा, एवढे बोलून रजा घेतो!

संजय देशपांडे      

संजीवनी डेव्हलोपर्स

ईमेल आयडी - smd156812@gmail.com


Saturday 11 June 2022

माझा वाघ दिवस; बांधवगड डायरी !!

 

























माझा वाघ दिवस; बांधवगड डायरी !!

नशीब तुम्हाला साथ देईल असे कधीही गृहित धरू नका, मात्र एखादा दिवस असा असतो की तुम्हाला नशीब तुमच्या बाजूने आहे याची जाणीव होते, अशावेळा मात्र नशिबाला जास्तीत जास्त फायदा करून घ्या

वरील शब्द माझेच आहेत व बांधवगढ राष्ट्रीय अभयारण्यातील दिवसभराच्या सफारीनंतर मी काढलेल्या छायाचित्रांवरून नजर टाकत असताना (तेथे अनेक छायाचित्रे काढली) व आम्हाला किती वाघ दिसले हे मोजत असताना माझ्या मनात हा विचार आला. मी जंगलात अनेक वाघ पाहिले आहेत (अर्थात ते कधीही पुरेसे नसते) व मला माहितीय निस्सीम वन्यजीवप्रेमी (म्हणजे वन्यजीवन छायाचित्रकार नाही तर अशा व्यक्ती ज्यांना वन्यजीवन समजले आहे व त्यांची संख्या खरोखर अतिशय कमी आहे) म्हणतील की केवळ वाघ म्हणजे जंगल नाही व तुम्ही वन्यजीवनाचा सर्वसमावेशक विचार केला पाहिजे व जंगलातील प्रत्येक प्रजाती तितकीच महत्त्वाची असते, वगैरे, वगैरे! मला अश्या कोणत्याही जंगलात भटंकती करायला आवडते, मग तिथे वाघ असोत किंवा नसोत हे पण खरे आहे. मात्र तुम्ही जेव्हा हे काळे-पिवळे पट्टे जंगलातील घनदाट हिरवाईच्या पार्श्वभूमीवर तुमच्या दिशेने चालत येताना (किंवा तुमच्यापासून लांब जाताना) पाहता तेव्हा काहीतरी वेगळेच घडते. तुमच्या अंगातील रक्त सळसळू लागते व वाघाच्या दर्शनाने केवळ तुमचाच उत्साह वाढतो असे नाही तर संपूर्ण जंगलाचेच स्वरूप बदलते, काही वेळा हरिणे व लंगूरांचे चित्कार ऐकू येतात, तर काहीवेळा निरव शांतता असते. सगळ्यांचे डोळे वाघावरच केंद्रित असतात, अशी या प्राण्याची ताकद आहे. मी अनेक जंगले पाहिली आहेत, मात्र मी कबूल करतो की मी आजही वाघ पाहिल्यानंतर स्तब्ध होतो, कारण मीही माणूसच आहे व मला याचा आनंद आहे. आणि मग तुम्हाला जेव्हा एका दिवसात बछड्यांसह २१ वाघ दिसतात (होय तुम्ही अचूक आकडा वाचला आहे, २१ वाघ), तेव्हा तुम्ही म्हणू शकता की एखाद्या वन्यजीव प्रेमी व्यक्तीसाठी किंवा कोणत्याही माणसासाठी यापेक्षा अधिक मोठा भाग्याचा दिवस असू शकत नाही, बांधवगढच्या जंगलातील माझा दिवस तसा होता.

माझा हा लेख त्या वाघांविषयी व मला त्यांच्याकडून काय शिकायला मिळाले याविषयी आहे, केवळ वाघ दिसण्याचे उदात्तीकरण करणे हा त्याचा हेतू नाही मग मला कितीही आनंद झालेला असू दे. आपण सगळे जण जाणतो जंगलात एकही वाघ दिसणे किती अवघड (तसेच त्यासाठी नशीबही लागते) असते. जर तुम्हाला एकाच दिवसात २१ वाघ दिसत असतील व तुम्ही त्यातूनही काही शिकणार नसाल तर तुम्ही खरोखरच मूर्ख आहात, नाही का? मी ज्या सफारीसाठी गेलो होतो ती पूर्ण दिवसाची होती, म्हणजे त्यामध्ये दुपारच्या वेळी अभयारण्यातून बाहेर जावे लागत नाही. म्हणजे तुम्हाला एकाच जिप्सीमध्ये साधारण चौदा तास अभयारण्यात भटकंती करता येते. पण मी तुम्हाला सांगतो मध्य भारतामध्ये भर उन्हाळ्यात हे काही फार आनंददायक काम नाही, तुम्ही निस्सीम वन्यजीवप्रेमी असल्याशिवाय तसेच तुम्हाला त्याचे दर परवडत असल्याशिवाय ते शक्य नाही कारण त्यासाठी सामान्य सफारीपेक्षा तब्बल दहापट अधिक पैसे चुकवावे लागतात. मात्र त्यामुळे तुम्हाला सर्व विभागांमध्ये जाता येते. म्हणजे उदाहरणार्थ बांधवगढमध्ये ताला, मगधी व खतौली या तीन स्वतंत्र प्रवेशद्वारांसह तीन विभाग आहेत, जे तुम्ही पूर्ण दिवसाच्या सफारीमध्ये पाहू शकता व वाघ दिसण्याच्या दृष्टीने ते अधिक फायद्याचे ठरते. मात्र जास्त तास मिळूनही, तसेच उपलब्धता असूनही तब्बल ८०० चौरस किलोमीटरहून अधिक क्षेत्र असल्यामुळे व चाळीसहून अधिक वाघ असले तरीही ते कुठेही असू शकतात. त्यामुळे ते दिसण्यासाठी नशीबाशिवायच संयम, थोडा तर्कसंगत विचार व जंगलांविषयीचे ज्ञानही आवश्यक आहे.

आम्ही ताला प्रवेशद्वारातून पहाटे ५.१५ वाजता प्रवेश करून सफारीला सुरुवात केली. पहिल्या दोन तासात फारसे काहीच नव्हते, कसलीही हालचाल नव्हती. आमच्या निराशेत भर घालण्यासाठी आभाळात काळे ढगही दाटून आले होते व हवामान अचानक थंड झाले. वाघ दिसण्याच्यादृष्टीने हा अपशकून होता, कारण गारव्यामुळे वाघ जेथे आहेत तेथेच आरामात असतात, त्यांना उघड्यावर किंवा पाणवठ्यावर यायची गरज वाटत नाही. मात्र आम्ही जेव्हा ताला विभागातून बाहेर पडून मगधी विभागात प्रवेश केला तेव्हा आम्हाला जिप्सींची रांग एका मोठ्या कुरणाभोवती उभी होती व याचाच अर्थ तिथे वाघ होता. तर तेथे स्पॉटी ही वाघीण व तिची मध्यम वयातील बछडी होती व गवतातून त्यांच्याकडे पाहणाऱ्यांशी लपंडाव खेळत होती, ते अतिशय अद्भूत दृश्य होते. सूर्य अजूनही ढगांच्या आडच होता व आम्ही अभयारण्यामध्ये येऊन जवळपास चार तास उलटून गेले होते. तेव्हा आणखी एक जिप्सी जवळ आली व आम्हाला एक तरूण वाघीण कजरी व तिची तीन महिन्यांची छोटीबछडी त्याच विभागामध्ये मात्र कुरणाच्या दुसऱ्या बाजूला दिसल्याचे सांगितले.

मी अलिकडे वाघाची एवढी लहान बछडी पाहिली नव्हती, म्हणूनच आम्ही कजरी वाघीण दिसते का याबाबत आमचे नशीब आजमावण्याचे ठरविले. कारण एवढी लहीन बछडी सांभाळत असताना वाघीण अतिशय काळजी घेते व तिचा संचार तुलनेने मर्यादित क्षेत्रात असतो मात्र ती कोणत्याही सजीव प्रजातींपासून लांब राहणेच पसंत करते जे अगदी स्वाभाविक असते. आम्ही साधारण सकाळी १०.३० वाजता तेथे पोहोचलो, आकाश अजूनही ढगाळच होते, वातावरण थंड होते, तेथेही काही वाहने वाघीणीची एक झलक दिसावी यासाठी वाट पाहात होती. आम्हाला एका गाईडने सांगितले की वाघीण त्याच भागामध्ये होती व आम्ही ज्या रस्त्यावर उभे होतो त्याला समांतर वाहणाऱ्या नाल्याजवळ असलेल्या झुडुपांमध्ये विश्रांती घेत होती. म्हणजे जवळच कुठेतरी बछड्यांचे दर्शन होण्याची तितकीच संधी होती.यामुळे आमचा मूड थोडा चांगला झाला व आम्ही त्याच जागी वाट पाहायचे ठरवले व अशी वाट पाहण्यात तासभर गेलावाघासाठी वाट पाहतानाची एक चांगली गोष्ट म्हणजे, तुम्ही वाट पाहात असताना आजूबाजूला अनेक गोष्टी घडताना पाहू शकता, उदाहरणार्थ तेंदूच्या झाडाखाली भारतीय पिटा (नवरंग) पक्ष्यांची जोडी दाणा टिपत असताना दिसली, मी त्यांची काही अतिशय उत्तम छायाचित्रे काढू शकलो. तसेच लंगूर म्हणजेच माकडांमुळे अतिशय छान मनोरंजन होते व आजूबाजूला वाघ असल्यास त्यांच्याविषयी इशारा देण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची असते, आपल्या तीक्ष्ण नजरेने ते झाडावरून दुरून सुद्धा वाघाला पाहू शकतात. सकाळचे १०.३० वाजले होते व बहुतेक जिप्सी परतीच्या मार्गावर होत्या कारण सकाळच्या सफारीसाठी ११ वाजता अभयारण्यातून बाहेर पडायची वेळ होती, त्यामुळे आता पूर्ण दिवसाच्या सफारीसाठी केवळ दोन जिप्सी उरल्या होत्या. प्रतीक्षा सुरूच होती व दुसरी जिप्सी इतर ठिकाणी काही दिसते आहे का (अर्थातच वाघ) हे पाहण्यासाठी निघून गेली, तरीही वाघीण तिथेच असल्याच्या माहितीवर विश्वास ठेवून, आम्ही तिथेच वाट पाहायचे ठरवले. आता १२ वाजले होते व सुदैवाने ढग पांगून आकाश निरभ्र झाले होते व सूर्य डोक्यावर आला होता व आम्हाला एक हरिण नाल्याच्या दिशेने पाणी पिण्यासाठी अतिशय काळजीपूर्वक जाताना दिसले, जेथे वाघीण जांभळाच्या झाडाच्या सावलीत विश्रांती घेत होती. हे एका अर्थाने चांगलेच होते कारण यामुळे वाघीणीची झोपमोड होईल व ती उठेल व त्यामुळे आपल्याला तिचे दर्शन होईल असा विचार आम्ही केला व वाट पाहिली. हरिणाला वाघीण दिसली नाही मात्र त्याला तिचा वास आला असावा व ते अतिशय घाबरत होते हे आम्हाला दिसत होते (व समजतही होते). एखाद्या स्लो-मोशनमध्ये सुरू असलेल्या चित्रपटाप्रमाणे वाटावे अशाप्रकारे हरिण जलाशयाच्या दिशेने जात होते व जांभळाच्या झाडापासून साधारण ३० फूट अंतरावर हरिणाला वाघीण दिसली व त्याने इशारा दिला यामुळे वाघीणीला जाग आली व ती झुडुपांबाहेर आली व हरिण पळून गेले. आम्ही मात्र आमचे कॅमेरे सरसावून उभे होतो. कजरी वाघीण संथ पावले टाकत उघड्यावर आली, तिच्या मागे धावत तिची तीन छोटी बछडी आली ज्यांना ती रस्ताच्या पलिकडे असलेल्या गुहेत घेऊन चालली होती, जेथे आम्ही उभे होतो. मागे तीन बछडी धावत असताना वाघीण शिकार करणे किंवा मारणे शक्य नव्हते व त्यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाणे तिच्यासाठी महत्त्वाचे होते व तेथे आम्हाला जंगलामध्ये आपल्या बछड्यांची अतिशय उत्तम काळजी घेणारी आई पाहायला मिळाली!

या उत्साहात आम्ही सकाळपासून सात तास जिप्सीमध्ये बसण्याचा वैताग व थकवा सगळे विसरून गेलो व आम्ही खतौली विभागामध्ये तपासण्याचे ठरवले, जेथे सहा वाघांचे कुटुंब दिसल्याचे समजले होतो त्यातील मादीचे नाव रा वाघीण व नराचे नाव बजरंग वाघ असे होते. इथेही हे कुटुंब गवताच्या पट्ट्यात विश्रांती घेत होते ज्यामुळे ते दिसणे अशक्य होते, मात्र तरीही आम्ही वाट पाहायचे ठरवले. या ठिकाणी एका लहान नदीच्या काठावर व तिच्या प्रवाहाच्या वरच्या दिशेने साधारण १०० मीटरवर राज्य महामार्गावर एक पूल होता व आम्ही जिथे ठिकाणी उभे होतो तिथे आम्हाला महामार्गावर धावणाऱ्या कार दिसत होत्या व अचानक एक नर वाघ गवतातून बाहेर आला व पाणी पिऊ लागला व त्याने आम्हाला उत्सुकतेने पाहिले व आमच्याकडे पाठ करून झोपून गेला. आणखी एक तास गेला व आता दुपारचे ३ वाजले होते व पुन्हा आमचे नशीब चमकले व एक मोठा रानगवा हिरवे गवत चरत वाघाच्या दिशेने आला. वाघाचे उर्वरित कुटुंब अजूनही झुडुपांमध्ये लपलेले होते व तो भलामोठा रानगवा हळूहळू चालत वाघापासून लांब गेला व जेथे बछडी व मादी झोपलेली होती त्या भागात त्याने प्रवेश केला. रानगव्याच्या आगमनाची कुणकुण लागताच ती सर्व बाहेर आली व एकेक करून नर वाघाच्या भोवती बसली. बछडी आजूबाजूला उड्या मारत होती तर वाघ-वाघीणीचे जोडपे झोपलेले होते, ते अतिशय सुंदर दृश्य होते व एकप्रकारे अशी दृश्येच संपूर्ण वन्यजीवनासाठी आशाच आहेत, असा मी मनातल्या मनात विचार केला. त्यानंतर आणखी एक नाट्यपूर्ण घटना घडली, साधारण मोठ्या लॅब्रेडोर कुत्र्याच्या आकाराचा, जेमतेम सहा महिन्यांचा वाघाचा बछडा त्या रानगव्यावर झेप घेण्याच्या बेतात होता, त्याविषयी मी माझ्या पुढीललेखात लिहीन.

त्यानंतर आम्ही जंगलाच्या खतौली विभागातील इतर भाग पाहायला सुरूवात केली व या कुटुंबापासून थोडे लांब गेलो. एका वळणावर आमच्या चालकाने अचानक ब्रेक लावला व ओरडला, साहेब, पाहा रस्त्यावर वाघ आहे, आश्चर्य म्हणजे, साधारण १०० मीटरवर एक साधारण मध्यम वयाचा नर वाघ रस्त्याच्या मधोमध उभा होता व त्याच्या आगमनाचा इशारा देणाऱ्या हरिणांचे चित्कार ऐकू येत होते. आमची जिप्सी पाहून, तो वाघ रस्त्याला लागून असलेल्या झुडुपांमध्ये शिरला व तिथे धापा टाकत वाट पाहात होता, तो शिकारीसाठी गेला होता व दमलेला होता हे आम्हाला दिसत होते. गाईडने आम्हाला सांगितले की तारा (गाईडने आम्हाला त्याचे सांख्यिक नाव म्हणजेच प्रत्येक वाघाला दिला जाणारा एक क्रमांक सांगितला, मात्र मी त्यांना त्यांच्या नावानेच संबोधतो कारण ज्यामुळे त्या वाघांशी एक भावनिक नाते निर्माण होते) नावाच्या वाघिणीच्या तीन बछड्यांपैकी तो एक होता. ती दुसऱ्या एका नर वाघासाठी बछड्यांना सोडून निघून गेली व आता हे बछडे दोन वर्षांचे झाले आहेत व आपले आयुष्य जगत आहेतत्याचे रिकामे पोट व धापा टाकणारा चेहरा बघून तो किती भुकेला व दमलेला असावा हे मला जाणवत होते व त्या वाघाची मला दया आली कारण आपणहून शिकार करण्याऐवढे त्याचे वय नव्हते तरीही त्यांना शिकार आणून खाऊ घालण्यासाठी कुणीही नव्हते कारण तो एक वाघ आहे व वाघ असण्याचा हा एक शापच आहे, नाही का?  

त्या बछड्याला स्वतः शिकार करण्यासाठी सोडून आम्ही पाणवठ्याकडे निघालो व तिथे आम्हाला एक जिप्सी दिसली (दुसरी पूर्ण दिवसभराच्या सफारीसाठी आलेली). त्यामध्येही कॅमेरे पाणवठ्याच्या दिशेने रोखलेले होते. पाणवठ्यावर कोण आहे याची ती स्पष्ट खूण होती. एक मोठा नर वाघ, ३० फूट खोल दरीतील तळ्यात निवांत पहूडला होता. त्याचे फक्त डोके पाण्याबाहेर होते. गाईडने आम्हाला सांगितले की या छोटा भीम नावाच्या वाघाने जवळपासच शिकार केलेले होती व जेवण झाल्यानंतर गारव्यासाठी पाण्यात बसला होता. वाघ कच्चे मांस खातात, त्यामुळे त्यांच्या शरीरात प्रचंड उष्णता निर्माण होते. त्याशिवाय मे महिन्यात बाहेरही अतिशय उष्णता असते, म्हणून जवळच्याच पाणवठ्यावर विसावा घेणे आवश्यक ठरते. अशा परिस्थितीत ते तासन् तास पाण्यामध्ये बसून राहू शकतात. छोटा भीमची छायाचित्रे काढल्यानंतर, हा दिवसभरात आम्ही पाहिलेला १७ वा वाघ (बछड्यांसह) होता अशी आम्हाला जाणीव झाली व आम्ही अतिशय रोमांचित झालो होतो कारण कोणत्याही जंगलात एवढे वाघ एकाच दिवशी दिसणे ही काही लहान गोष्ट नाही.

आता, सूर्य मावळतीला लागला होता व आमच्या गाईडने काही भेट न दिलेल्या जागा पाहण्याचे ठरवले. तो आम्हाला मुख्य रस्त्यापासून विरुद्ध दिशेला वळून डोंगरमाथ्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर घेऊन गेला. मी जिप्सीमध्ये मधल्या सिटवर बसलो होतो व आमची जिप्सी दुतर्फा झाडांमुळे तयार झालेल्या मंडपातून जात असताना मला वळणावर एका झाडाच्या बुंध्यापाशी एक वाघीण दिसली, ती सरळ आमच्याकडेच पाहात होती. चालकाने गाडीचा ब्रेक लावला व आमच्याकडे वळून विचारले, साहेब, गाडी पुढे घेऊ का म्हणजे आणखी व्यवस्थित दिसेल?व हळूहळू पुढे जाऊ लागला. मी त्याला कुजबुजत (किंबहुना अस्पष्टपणे ओरडलोच) अबे, और कहाँ आगे लेगा यही रुक (म्हणजे जिप्सी पुढे कुठेही नेऊ नकोस, आपण जेथे आहोत तिथेच थांब). तरीही तो पुढे जाण्याचा आग्रह करत होता, मला अक्षरशः त्याचे खांदे धरून त्याला थांबवावे लागले. मग मला जाणवले की त्याला वाघीण दिसलीच नव्हती कारण त्याच्या बाजूला असलेली झाडे आड येत असल्यामुळे त्याला ती दिसत नव्हती. तर तो त्याच्या बाजूला रस्त्याच्या कडेने बसलेल्या आणखी दोन वाघीणी दाखवत होता, तर गाईड चौथा वाघ दाखवत होता. हे दारा नावाच्या वाघीणीचे कुटुंब होते ज्यामध्ये जवळपास वयात आलेले वाघाचे बछडे होते व ते सगळेच आम्ही अचानक समोर आल्यामुळे तितकेच आश्चर्यचकित झाले होते व आमच्याकडे पाहात होते. हळूहळू वाघ आमच्या मागे असलेल्या नदीच्या दिशेने चालू लागले व आम्हीही परतीला लागलो. दरम्यान आणखी एक जिप्सी आली, ज्यात काही विदेशी पर्यटक होतेपर्यटकांनी आमच्या मागे असलेले वाघ पाहिले नव्हते व आम्ही परतत आहोत असे त्यांना वाटले. मी जेव्हा त्यांच्याकडे हात हलवून त्यांना सांगितले की जिथे आहात तिथेच थांबा, तेव्हा त्यांना जाणीव झाली व एका पाठोपाठ एक चार वाघ जंगलातून उघड्यावर येताना पाहून त्यांना अतिशय आश्चर्य वाटले. मला वाघांपेक्षाही त्या पर्यटकांचे चेहरे पाहून गंमत वाटली असे ते दृश्य होते, ते त्यांच्या देशात जाताना आपल्यासोबत अश्याच सुंदर आठवणी घेऊन जातील!  आम्हाला त्या वयात आलेल्या बछड्यांची नदीमध्ये विविध प्रकारे छायाचित्रे घेता आली, तर वाघीण थोड्या अंतरावर पाण्यात निवांतपणे पहुडली होती.

आमचे घड्याळ आता अभयारण्यातून बाहेर पडायची वेळ झाली आहे असे आम्हाला सांगत होते व त्यानंतर आम्हाला जाणीव झाली की आम्ही जंगलामध्ये १४ तास घालवले व एकाच दिवसात २१ वाघ पाहिले, हा कदाचित एक विक्रम असू शकतो असे आमचा गाईड म्हणाला.तो विक्रम आहे किंवा नाही हे मला माहिती नाही मात्र त्या दिवशी नशीबाची साथ होती. त्याला थोडा संयम व थोडा तर्कसंगत विचार यांची जोड असेल तर तुम्ही त्याचा जास्तीत जास्त लाभ करून घेऊ शकता, हे मी आज जंगल नावाच्या शाळेमध्ये शिकलो. वाघ हा भारतीय जंगलांचा राजा आहे, मात्र त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो काही विशिष्ट सवयी असलेला प्राणी आहे यामुळे इतर प्राण्यांच्या तुलनेत तो अधिक असुरक्षित असतो. आणि जंगलात त्याला कुणाची भीती नसते. संपूर्ण दिवसभर मी विविध वयाचे वाघ पाहात होतो व त्यामुळे वाघ जंगलात कशाप्रकारे वावरतात याविषयी अधिक चांगली दृष्टी किंवा त्यांचे निरीक्षण करायची संधी मिळाली. तो एक अतिशय संस्मरणीय अनुभव होता व तो मी सदैव जतन करून ठेवेन, मला असे वाटते त्या दिवशी मला मिळालेला तो सर्वोत्तम ठेवा होता. त्या समाधानाच्या भावनेनेच (थक्क करून टाकणाऱ्या) मी अभयारण्यातून बाहेर पडलो. पुढील दोन दिवस मला आणखी काही वाघ व अतिशय सुंदर दृश्य पाहायला मिळाली. त्याविषयीपुढील लेखात अधिक लिहीन.

संजय देशपांडे      

संजीवनी डेव्हलोपर्स

ईमेल आयडी - smd156812@gmail.com