Thursday 28 July 2022

बांधकाम व्यवसाय, सुसंकृत समाज आणि पुणे !

 






 







 




















                                                                            



                                               बांधकाम व्यवसाय, सुसंकृत समाज आणि  पुणे !


समाज लोकांना घडवत नाही  लोक समाज  घडवतात” ...  चिमामांडा नागोझी आदिची

माझे बाबा म्हणत असत की लहानपणी सांगितलेल्या गोष्टी या मनुष्यजातीकडे असलेला सर्वात अनमोल ठेवा आहे.” ... ताहीर शाह


चिमामांडा नागोझी आदिची ही एक नायजेरियन लेखक आहेत जीच्या लेखनामध्ये कादंबऱ्या, लघुकथा ललित लेखनाचा समावेश होतोताहीर शाह हे पन्नासहून अधिक पुस्तकांचे लेखक आहेत, ज्यापैकीबऱ्याच पुस्तकांमध्ये त्यांनी आफ्रिका, आशिया अमेरिकेमध्ये केलेल्या विलक्षण प्रवासांचे वर्णन आहे.मी जेव्हा नायजेरियासारख्या ठिकाणी राहणाऱ्या आदिंची सारख्या लोकांकडून असे प्रभावी विचार ऐकतो तेव्हा मला नेहमी आश्चर्य वाटते कारण अशी ठिकाणे ज्ञान सोडून इतरच अनेक गोष्टींसाठी ओळखली जातात. परंतु अतिशय खडतर परिस्थितीत राहताना माणसांना कदाचित लवकर शहाणपण येते असे मला वाटते.ताहीर हा ज्ञानाच्या देशातील आहे त्याची पाळेमुळे मध्यपूर्वेतील आहेत. म्हणूनच जेव्हा संस्कृती, शहर लोक असा विषय होता, तेव्हा मी या दोघांची विद्वत्ता एकत्रितपणे वापरली.

अलिकडेच शहरे रिअल इस्टेट त्यांची वाढ यासंदर्भातील एक चर्चा माझ्या ऐकण्यात आली. त्यामध्ये एका तरुण बिल्डरने पुण्याला स्थायिक होण्यासाठी सर्वोत्तम पर्याय त्याचवेळी रिअल इस्टेट समुदायाने अधिक चांगल्या नागरी सुविधा (पायाभूत सुविधा) उपलब्ध करून देण्यास चालना द्यावी असा मुद्दा मांडला. नेहमीप्रमाणे फारशा (म्हणजे, काही ज्येष्ठ विकासकांनी) या मुद्द्याकडे लक्ष दिले नाही मी त्यांना दोष देत नाही. वर्षानुवर्षे पुण्यातील रिअल इस्टेट उद्योग झपाट्याने होत असलेली वाढ अनुभवतोय, मात्र अलिकडे या  व्यवसायात तग धरून राहणे सोपे नाही ही देखील वस्तुस्थिती आहे.

 

मात्र ती चर्चा माझ्या मनामध्ये बराच काळ रेंगाळत होती कारण आपण जेव्हा पुण्याची प्रसिद्धी करतो तेव्हा आपण कशाची प्रसिद्धी केली पाहिजे, त्यात पाण्याचा दर्जा (तसेच प्रमाणही) किंवा येथील सिम्बायोसिस म्हणजे शिक्षणाच्या संधी किंवा येथील माहिती तंत्रज्ञान तसेच सेवा क्षेत्राच्या वाढीवर लक्ष केंद्रित करावे किंवा उद्योगांवर चांगल्या हवामानावर भर द्यावा (पुन्हा, हसू), पुण्याची प्रसिद्धी करताना कोणता मुद्दा केंद्रस्थानी असावा असा विचार मनात आला? मला असे वाटते एखाद्या शहराची वाढ का होते यामागे बरीच कारणे असतात. तेथील भौगोलिक तसेच सामाजिक स्थिती जीवनाशी निगडित अनेक पैलू असतात, मात्र पुण्याविषयी बोलायचे (किंवा कोणत्याही शहराविषयी) तर मला असे वाटते कोणत्याही शहराच्या संस्कृतीमुळे ते स्थायिक होण्यासाठी सर्वोत्तम शहर होते. मला माहितीय, अनेक लोकांच्या कपाळाला आठ्या पडतील संस्कृतीचे आयुष्यात स्थायिक होण्याशी काय घेणेदेणे आहे असा प्रश्न विचारला जाईल. त्यामुळे आम्हाला अधिक चांगले शिक्षण मिळण्यास मदत होईल का किंवा संस्कृतीमुळे आम्हाला भरभक्कम पगार मिळेल का म्हणजे आम्हाला आमचे आयुष्य मनासारखे उपभोगता येईल किंवा संस्कृतीमुळे आम्हाला अधिक चांगल्या पायाभूत सुविधा मिळतील का असे प्रश्न विचारले जातीलतर, याचे उत्तर हो नाही असे दोन्हीही आहे, कारण एकीकडे संस्कृतीमुळे तुम्हाला पगार, पाणी, रस्ते असा थेट काही लाभ होणार नाही मात्र दुसरीकडे संस्कृतीमुळे तुम्हाला असे काही मिळू शकते जे पैसा किंवा सत्ता खरेदी करू शकत नाही ते म्हणजे समाधान शांती. समाधानाविषयी बोलायचे, तर प्रत्येकाचा जीवनाविषयीचा दृष्टिकोन वेगळा असतो, मात्र  सुसंकृत पण तुम्हाला समाधान म्हणजे काय याची व्याख्या करायला मदत करतो. म्हणूनच मी कोणत्याही शहराचा स्थायिक होण्याच्या दृष्टिकोनातून विचार करतो तेव्हा मी शहराच्या संस्कृतीला सर्वाधिक गुण देतो.

 

मी दिलेल्या तर्कामुळे तुमचे अजूनही समाधान झाले नसेल तर मी काही गोष्टी किंवा घटना तुम्हाला सांगतो. या शहराने अनुभवलेल्या काही घटना सांगतो त्यानंतर मी रिअल इस्टेटमध्ये समाजाच्या (किंवा शहराच्या) सुसंस्कृतपणाचे काय महत्त्व आहे अधिक सविस्तरपणे सांगेन. गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये एका संध्याकाळी वादळी पाऊस पडत असताना प्रत्येक जण घरी जाण्यासाठी किंवा कुठेतरी आसरा घेण्यासाठी धडपडत असताना, एक वाहतूक हवालदार, सुजित वाघमारे गुडघाभर पाण्यामध्ये उभे राहून वाहतुकीची कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करत होते. माध्यमांनी त्यांच्या धाडसी प्रयत्नांची आपल्या कर्तव्याप्रती समर्पणाविषयी लिहीले. त्यानंतर एका रिक्षावाल्याची बातमी होती ज्याने एका अनोळखी प्रवाशाची दागिन्यांनी भरलेली पिशवी जीवाचा आटापीटा करून त्याला परत केली. लक्षात ठेवा, तो रिक्षावाला आपल्या रिक्षासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते कसे भरायचे या विवंचनेत असतानाही त्याने लाखो रुपयांचे दागिने मूळ मालकाला परत केले. त्याचप्रमाणे, मला कुणा सुधीर कुलकर्णींविषयी समजले ज्यांची दोन्ही मुले अमेरिकेत स्थायिक झालेली आहेत. ते दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला रोज भेट देतात ज्या रुग्णांना कुणीही भेटायला जात नाही त्यांना बरे वाटावे म्हणून रोज भेटायला जातात, कारण एकटेपणाची भावना कशी असते हे आपण जाणतो असे ते म्हणतात. गेल्याच आठवड्यात पीएमटीच्या (माफ करा पीएमपीएमएलच्या) बस चालकाची वाहकाची, श्री. अरुण श्री नागेश यांची बातमी आली होती, ज्यांनी मध्यरात्री त्यांची शेवटची फेरी पूर्ण केल्यानंतर एका महिला प्रवाशाला घरापर्यंत सोडले, कारण ती एकटीच असल्याने सुरक्षितपणे घरी जावी हा त्यांचा उद्देश होता.दररोज मध्यरात्री, संचेती पुलावर इतर काही ठिकाणी एक व्हॅन येते जी शहरातील अनेक उपहारगृहांमधील शिल्लक अन्न गोळा करते ते पदपदावर राहणाऱ्या उपजीविकेचे कोणतेही साधन नसलेल्या किंवा अपंग असलेल्या लोकांना वाटले जाते. याच शहरामध्ये पुनावाला नावाचे एक सुसंकृत धनाढ्य आहे त्यांनी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री कचरेवाल्यांच्या स्वच्छतेसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत हे कुणीही त्यांच्यावर लादलेले नाही. मी अशा चांगुलपणाच्या, दयाळूपणाच्या, सर्वांची काळजी घेण्याच्या भावनेच्या अनेक गोष्टी सांगू शकतो ज्या आजकालच्या व्यावसायिक जगात दुर्मिळ होत चालल्या आहेत. ही कामे करणाऱ्या अनेक पुरुष महिलांचे चेहरे अनोळखी असले तरी ते याच शहराचे नागरिक आहेत. एक लक्षात ठेवा यापैकी बहुतेक कामे करणाऱ्या लोकांना नागरिक ओळखतही नाहीत यालाच मी शहराची संस्कृती म्हणतो.

 

यातही, अस्सल पुणेकर विचारतील (होय हेदेखील आपल्याच संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे), यात काय मोठेसे आहे कारण शहरात गुन्हेगारीही झपाट्याने वाढत नाहीये का, तसेच प्रत्येक सरकारी किंवा निम-सरकारी यंत्रणेमध्ये भ्रष्टाचारही बोकाळलेला नाही का, पायाभूत सुविधा तसेच वाहतुकीच्या आघाडीवर पूर्णपणे सावळा गोंधळ आहे, शहरातील वाढती लोकसंख्या पाहावआरोग्य सुविधा तसेच शिक्षणही अतिशय महाग झाले आहे. सगळीकडे अवैध बांधकामांचा सुळसुळाट झालाय सामान्य माणसाचे जगणे त्रासदायक झाले आहे, याच्याशी संस्कृतीचे काय घेणेदेणे आहे? अर्थातच, पुणेकर जे म्हणतात ते खरेच आहे सामान्य माणसाचे जगणे मुश्किल झाले आहे. परंतु ही केवळ पुण्याचीच नाही तर आपल्याभोवती सगळीकडेच, अगदी राहण्यासाठी सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या अमेरिकेतही लाखो लोकांचे जगणे खडतर आहे जगण्यासाठी सतत झगडावे लागते. मात्र तरीही, संस्कृतीमुळे आपण जीवनातील अडीअडचणींवर मात करून जगू शकतो ही वस्तुस्थिती आहे.

 

मी इतर कोणत्याही शहराला किंवा गावाला किंवा प्रदेशाला कमी लेखत नाही. मात्र पुणे हे राहण्यासाठी चांगले नाही असे तुम्हाला वाटत असेल तर या आकाराच्या कोणत्याही शहराला भेट द्या तिथे एखादा महिना जगण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जे अनुभव आले ते लिहून काढा (आवर्जून लिहा, ते महत्त्वाचे आहे कारण त्यामुळे तुम्ही सखोल विचार करता), विशेषतः शहरातील रस्त्यांवर फेरफटका मारताना किंवा नागरिकांशी बोलताना, तसेच मला त्या शहरामध्ये होणाऱ्या सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांविषयी सांगा त्याची तुलना पुण्याशी करा. या शहराची संस्कृती इतर गरजूंशी चांगले किंवा जबाबदारीने वागण्यापुरतीच मर्यादित नाही तर सामाजिक जीवन हा देखील इथल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. इथे गणेशोत्सवाच्या वेळी शेवटच्या दिवशी मिरवणुकीला रस्त्यांवर लाखो लोक एकत्र येतात तरीही तुम्हाला त्या गर्दीची भीती वाटत नाही. या शहरात गेली ४० वर्षे सातत्याने सवाई गंधर्व महोत्सवाचे आयोजन केले जात आहे, ज्यामध्ये देशातील दिग्गज कलाकार हजेरी लावतात ते आपली कला येथे सादर करण्यासाठी उत्सुक असतात, कारण या शहरामध्ये कलेचा आदर करणारी संस्कृती आहे. केवळ कलाच नाही तर क्रीडा किंवा वन्यजीवन संवर्धन असो, पुणेकर जीवनाच्या अशा सर्व सामाजिक पैलूंमध्ये आघाडीवर आहेत. तुम्ही देशातील कुठल्याही व्याघ्र प्रकल्पात किंवा जंगलात जा, तेथील गाईड तुम्हाला पुणेरी पर्यटकांना किती व्यवस्थित माहिती असते वन्यजीवन संवर्धनाविषयी ते किती उत्साही असतात हे सांगतील. इथे गेली २५ वर्षे दर शुक्रवारी, नेचर वॉक तर्फे कट्टानावाचा उपक्रम चालवला जातो, या मंचावर वन्यजीवनाशी संबंधित अनेक व्यक्ती समाजाला आपले अनुभव सांगतात. ज्याप्रमाणे दिवस रात्र हे आपल्या जीवचक्राचा अविभाज्य भाग आहेत तितक्याच नैसर्गिकपणे हे सगळे उपक्रम राबवले जातात, यालाच मी आपल्या शहराची संस्कृती असे म्हणतो.

 

ठीक आहे, अजूनही जर काही शंकेखोर आत्मे असतील तर त्यांना प्रश्न पडला असेल की या सगळ्याचा रिअल इस्टेटशी काय संबंध, तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही राहण्यासाठी सर्वोत्तम शहर कसे ठरवता? तुम्ही स्वतःच्या क्षेत्रातील यशस्वी व्यक्ती असाल किंवा तुम्ही एखादी तरूण व्यक्ती असाल जी आपले करिअर घडवण्यासाठी धडपडतेय तुमच्याकडे वेगवेगळ्या ठिकाणाचे प्रस्ताव आहेत. मात्र असे एक शहर आहे ज्याच्या रस्त्यांवर फिरताना तुम्हाला घरी असल्यासारखे वाटते, इथले लोक थोडे विचित्र आहे असे तुम्हाला वाटेल, जे ट्रॅफिकच्या  नियमांचे फारसे पालन करत नाहीत मात्र ते एकमेकांची काळजी घेतात. या शहरात तुमची मुलगी किंवा बायको रात्री उशीरा नाटकाचा खेळ संपल्यानंतर एकटी दुचाकीवरून घरी येऊ शकते. या शहरात तुमच्या मुलाला त्याचे किंवा तिचे खेळातील, चित्रकलेतील किंवा गाण्यातील कौशल्य दाखविण्याची संधी आहे त्या मुलाला फक्त परीक्षेतील गुणांवरून जोखले जाणार नाही तर त्याच्या (किंवा तिच्या) या इतर कौशल्यांचीही दखल घेतली जाईल. या शहरामध्ये, तुम्ही निश्चिंत मनाने तुमच्या कामाला जाऊ शकता. तुमला मुलगा शाळेतून लवकर आला तर त्याला घराच्या पायऱ्यांवर रिकाम्या पोटी तुम्ही परत येण्याची वाट पाहात बसावे लागणार नाही, तर तुमचे शेजारी त्याला घरी घेऊन जातील तुम्ही परत येईपर्यंत त्याची काळजी घेतील. या शहरामध्ये तुमचे वृद्ध पालक तुमच्याकडे राहायला आले असतील तर त्यांना कंटाळा येणार नाही, त्यांच्यासाठी जवळपास ज्येष्ठांचे क्लब असतात तुम्ही त्यांना वेळ देऊ शकत नाही म्हणून तक्रार करता स्वतःला रमवून घेऊ शकतात.या शहरामध्ये तुम्हाला जातीय दंगली संचारबंदीसारख्या गोष्टींची काळजी करावी लागत नाही, कारण इथले लोक दिवाळी ईद तितक्याच आनंदाने साजरी करतात, हीच इथली संस्कृती आहे!   

 

वरील सर्व वर्णन वाचून तुम्ही एखाद्या आदर्श शहराचे वर्णन वाचत आहात असेच तुम्हाला वाटेल, बरोबर? हे केवळ पुण्याच्याच बाबतीत नाही, तर माणूस जेव्हा एखादे ठिकाण त्याचे किंवा तिचे घर बनविण्याचा निर्णय घेतो, तेव्हा जीवनाच्या या पैलूंकडे माणूस पाहतो. हे निश्चितपणे असे ठिकाण आहे, जिथे आपल्यापैकी सगळ्यांना स्थायिक व्हावेसे वाटते याच संस्कृतीविषयी आपण बोलत आहोत. कारण आपल्या सगळ्यांना अशा एका शहरात जगायचे आहे ज्यामध्ये एक माणूस दुसऱ्या माणसाला समजून घेतो, तो किंवा ती जशी आहे त्याचा आदर करतो त्यालाच आपण संस्कृती म्हणतो हीच संस्कृती पुण्याच्या रिअल इस्टेटचा कणा आहे असे मला तीव्रतेने वाटते. मी एक बांधकाम व्यावसायिक म्हणून नव्हे तर या शहराचा नागरिक म्हणून हे बोलतोयत्याचवेळी शहराची ही संस्कृती अधिक बळकट करणे हे आपल्यापैकी प्रत्येकाचे कर्तव्य आहे (रिअल इस्टेटमधील मित्रांनो, विशेषतः तुमच्यासाठी), जे केवळ आपापल्या व्यवसायाच्या फायद्यासाठीच नाही तर आपल्या पुढच्या पिढ्यांसाठीही केले पाहिजे, कारण ही जाणीवही आपल्याला ज्या संस्कृतीचे वरदान लाभले आहे तिचाच अविभाज्य भाग आहे, नाही का? एवढे बोलून थांबतो!

*(क्रेडाई पुणेमध्ये आम्ही नागरिकांच्या अशा कार्याची दखल घेतो शहराच्या या संस्कृतीचा आदर करण्याचा ती बळकट करण्याचा छोटासा प्रयत्न म्हणून त्यांचे कौतुक करतो हे सांगावेसे वाटते.)

 

संजय देशपांडे      

संजीवनी डेव्हलपर्स  

ईमेल  - smd156812@gmail.com

 you can read our english version @link below.

https://visonoflife.blogspot.com/2022/07/culture-pune-real-estate.html