एका पाळीव कुत्र्याने
शिकवलेला धडा!
२१ जून १४- २१
जून २२
“एका पाळीव आणि प्रेमळ कुत्र्याकडून
तुम्हाला मिळालेली सर्वोत्तम भेट म्हणजे, कुणावरही निस्वार्थी
प्रेम कसे करायचे याची शिकवण”…
हे कुणा निस्सीम श्वान
प्रेमी व्यक्तीचे शब्द नाहीत तर माझेच शब्द आहेत. सर्वप्रथम मी हे कबूल करतो की
मला काही कुत्र्यांचे फार वेड नाही मात्र तुमच्या घरात जेव्हा एक जिवंत प्राणी
राहात असतो, तुम्ही
भोवती असताना तुमच्याकडे बघत राहतो, तुम्ही घरात येताच तुमच्याकडे बघून आनंदाने
शेपटी हलवतो, तेव्हा
तुम्हाला त्याचा लळा लागला नाही तर एकतर तुम्ही संत आहात किंवा मशीन आहात व मी
दोन्हीही नाही.
आमच्याकडे घरी दोन कुत्री
आहेत किंवा होती म्हणा कारण त्यातील २१ जून २०२२ रोजी एक बिगल जातीचा ओरिओ, तर दुसरा
काळ्या रंगाचा पग जातीचा बगिरा. ओरिओ आज हे जग सोडून निघून गेला, नेमका
आजच्याच दिवशी आठ वर्षांपूर्वी त्याचा जन्म झाला होता. तो आमच्यासोबत फार काळ
नव्हता, तरीही
त्याने मला जे काही शिकवले ती माझ्यासाठी सर्वोत्तम भेट असणार आहे. जेव्हा
कुणाचातरी वयोमानामुळे मृत्यू होतो, मग तो अगदी तुमचा कुत्राही असेल ज्याचे आयुष्य
माणसापेक्षाही कमी असते, तो
निसर्गनियम असला तरीही तुम्हाला ते स्वीकारणे जड जाते आणि आठ वर्षे हे काही
नैसर्गिकपणे मृत्यू होण्याचे वय नाही, मग तो मृत्यू मधुमेहामुळे झाला असेल किंवा
त्यामुळे उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांमुळे, जे ओरिओच्या बाबतीत झाले.
सर्वात पहिली गोष्ट म्हणजे
विशेषतः जो कुत्रा आकाराने लहान असतो त्याला आपुलकी व काळजीची जास्त गरज असते, विशेषतः
त्यांना जवळ घेणे कुरवाळणे,
यामुळे
त्यांना शांत किंवा आनंदी वाटते. तुम्ही तसे करू शकत नसाल, तर कृपया
तुम्ही घरात कुत्रा ठेवू नका. कारण अशा कुत्र्यांकडे लक्ष द्यावे लागते व त्यांना
त्यांच्याभोवती माणसे हवी असतात. नाहीतर ती दुःखी किंवा निराश होतात, त्यामुळे
चिडचिडी होतात व भुंकत राहातात. अशावेळी बहुतेक लोकांना असे वाटते की ती भुकेली
आहेत, म्हणून
त्यांना खाऊ घातले जाते त्यामुळे त्यांचे जास्त खाणे होते व याचा परिणाम म्हणजे
मधुमेहासारखा आजार. दुसरी गोष्टी म्हणजे जर कुत्रा आजारी असेल तर कुटुंबातील
एखाद्या माणसापेक्षाही त्याची जास्त काळजी घ्यावी लागते कारण त्याला काय होते आहे
हे तो सांगू शकत नाही व शांतपणे त्रास सहन करत राहतो किंवा भुंकत राहातो. त्याचे
भुंकणे थांबवे यासाठी आणखी खायला घातले जाते, जे विषासारखे काम करते. बहुतेक कुटुंबांमध्ये
मुलांच्या इच्छेखातर किंवा आग्रहामुळे कुत्रे पाळले जाते, मात्र
नंतर त्या मुलांना कुत्र्याविषयी आपुलकी दाखवणे, त्याला जवळ घेणे यासारख्या त्याच्या
मूलभूत गरजांचा विसर पडतो आणि इतर मोठ्यांना तो जाच वाटतो व त्यामुळे असे कुत्रे
निराश होते.
आता याचा अर्थ असा होत
नाही की कुत्रे पाळूच नका,
याचा
अर्थ असा होतो की कुत्रे ठेवणे किंवा पाळणे हे एखाद्या व्यक्तीशी लग्न करून
आयुष्यभर सोबत राहण्यासारखे असते व तुम्हाला सर्व आघाड्यांवर त्या व्यक्तीची साथ
द्यावी लागते. मी हे विशेषतः कुटुंबातील ज्येष्ठांसाठी सांगत आहे, ते
कुत्र्याला वाढविण्यासाठी जे काही कष्ट लागतात त्यासाठी नंतर लहान मुलांना दोष
देतात. ओरिओच्या घरात असण्यामुळे तसेच त्याच्या अवचित जाण्यामुळे मी अनेक गोष्टी
शिकलो ज्यामुळे आपले माणसांसोबतचे सामान्य नातेसंबंध तसेच माझा जीवनाविषयीचा
दृष्टिकोन यासंदर्भात डोळे उघडले. अनेक जण विचार करतील की मी हा विषय जरा जास्तीत
संवेदनशील होऊन लिहतोच मात्र मी तुमचे विचार नियंत्रित करू शकत नाही, पण
त्यामुळे वस्तुस्थिती बदलत नाही, नाही का? जर तुम्ही तुमच्या पाळीव कुत्र्याची जबाबदारीने काळजी
घेत नसाल तर तुम्ही तुमच्या अवतीभोवती असलेल्या व्यक्तींशी जबाबदारपणे वागाल व
त्यांची काळजी घ्याल व तुमचे कामही जबाबदारपणे कराल अशी अपेक्षा कशी करता येईल? एक
पाऊल पुढे जात, ज्या
लोकांना कुत्र्यांची आवड नाही, तरीही त्यांच्याकडे कुत्रे असेल तर तुम्ही त्या
कुत्र्याला कसे वागवता यावरून तुम्ही तुमची जबाबदारी असलेले कुठलेही काम कसे करता
हे ठरते, कारण
ते तुम्हाला आवडत नसले तरीही ते तुमच्या कर्तव्याचा भाग असते, बरोबर?
शेवटी तुमच्या कुत्र्याला
फक्त तुम्ही त्याच्यासोबत थोडा वेळ घालवावा, त्याची पाठ थोपटावी व एखादे हाड किंवा बिस्कीट
देऊन त्याचे लाड करावेत एवढीच अपेक्षा असते, तेवढ्यानेही ते अतिशय खुष होते. आयुष्यातील
अडीअडचणींना तोंड देताना व तुमच्या मनाप्रमाणे न झालेल्या शेकडो गोष्टींविषयी
तक्रार करताना तुम्हीही याच दृष्टिकोनातून विचार करू शकता. आपल्या भोवती आनंद
देणारे शेकडो लहान-सहान क्षण असतात, ते गोळा करायचे की सतत दुःखीच राहायचे हे
तुम्हीच ठरवायचे असते. मला असे वाटते इतक्या स्वस्तात तुम्हाला इतका चांगला धडा
मिळणार नाही, आणि तुमचा कुत्रा
तुमच्या अवतीभोवती राहून तुम्हाला ते शिकवण्यासाठी सतत तयार असतो.
ओरिओ, तू मला
जे काही शिकवून गेलास त्यासाठी मी तुझे जितके आभार मानावे तितके कमीच आहेत. आयुष्याविषयी
तुझ्या वर्गामध्ये मलाच फारसा वेळ देता आला नाही याचे मनापासून वाईट वाटते रे.
कधीतरी, कुठेतरी
पुन्हा कदाचित आपली गाठभेट होईलच, तोपर्यंत तू जिथे आहेस तिथे आनंद देत राहा…
संजय, रोहित, रोशन, निखिल, केतकी व
संजीवनीचा चमू
संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलोपर्स
ईमेल आयडी - smd156812@gmail.com
No comments:
Post a Comment