आशियन गेम्स २३ आणि भारतीय आशेची १०० पदके !
“आम्ही निःशब्द आहोत ; या स्पर्धेपर्यंत पोहोचण्याचा प्रवास खडतर होता. आमचा खेळ सर्वोत्तम होत नव्हता,आम्ही जागतिक विजेतेपदाच्या सामन्यात उपांत्यपूर्व फेरीतच हरलो, आम्ही चायना ओपनच्या पहिल्या फेरीतच हरलो.आमच्यासाठी हा सर्वात निराशाजनक काळ होता असे आम्ही म्हणू शकतो. जेव्हा आम्ही घरी परतलो,तेव्हा आम्ही रविवारीही सराव करत असू. आमच्यासमोर केवळ एकच उद्दिष्ट होते की सरावादरम्यान स्वतःला पूर्णपणे झोकून द्यायचे व आशियाई क्रीडास्पर्धांमध्ये देवाला आमच्याकडून काय अपेक्षित आहे हे देवालाच ठरवू दे”… चिराग शेट्टी व सात्विकराज रांकीरेड्डी,पुरुष बॅडमिंटन दुहेरीचे सुवर्णपदक विजेते,आशियाई क्रीडा स्पर्धा २३,भारत.
आता देवाला चिराग व सात्विककडून काय हवे होते हे मला माहिती नाही परंतु प्रत्येक भारतीयाला त्यांच्याकडून सुवर्णपदक हवे होते व त्यांनी देवाला ते त्यांना द्यायला लावले, असे मला वाटते!आत्तापर्यंत (मी ८ ऑक्टोबरला हा लेख लिहायला सुरुवात केल्यापासून, चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांच्या शेवटच्या दिवसापर्यंत) आपल्या वॉट्सॲपच्या चॅट बॉक्समध्ये मेसेज (म्हणजेच फॉरवर्ड)ओसंडून वाहात असतील,ज्यामध्ये आपण भारतीयांनी आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये १०० हून अधिक पदके जिंकल्याबद्दल आपले (भारतीयांचे ) अभिनंदन करण्याची चढाओढ लागली असेल.आपण आशियाई क्रीडा स्पर्धा १९५१ मध्ये सुरू झाल्यापासून या खेळांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी कामगिरी केली आहे. खरेतर मेसेज फॉरवर्ड करण्यासाठी ऑलिम्पिक्स किंवा आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये एखादा खेळ असता तर निश्चितपणे सगळे पदके भारतीयांना गेली असती.तरीही हा लेख पुढे वाचा कारण तो फॉरवर्ड केलेला नाही व तो भारताचे अभिनंदन करण्याविषयी व आपल्याला कसा अभिमान असला पाहिजे वगैरे सांगणाऱ्या इतर फॉरवर्डसारखा नाही.त्यामध्ये अभिनंदन तर निश्चितच आहे,परंतु त्यापेक्षाही शंभराहून अधिक पदके जिंकण्याचे कारण किंवा त्याचे महत्त्व काय आहे याविषयी आहे. विशेषतः बॅडमिंटनमध्ये पुरुषांच्या दुहेरीमध्ये सुवर्ण पदक,कारण मी स्वतः या खेळाचा निस्सीम चाहता आहे, तसेच थोडेफार खेळतोही म्हणजे हा खेळ खेळताना माझा उजवा खांदा व डाव्या गुडघ्याला दुखापत पण करून घेतली आहे व मी जे काही थोडेफार खेळतो तेवढे खेळण्यासाठी सुद्धा आयुष्यभर फिजिओथेरपी करून घ्यावी लागणार आहे.याचा अर्थ असा होत नाही की आपण ज्या इतर सर्व खेळांमध्ये पदके जिंकली आहेत व ज्या खेळांमध्ये जिंकू शकलो नाही ते कमी महत्त्वाचे आहेत,मी फक्त बॅडमिंटनमधील सुवर्णपदकाचे वैयक्तिक माझ्यासाठी तसेच एकूणच आपल्या समाजासाठी काय महत्त्व आहे ते सांगणार आहे व त्यानंतर मी इतर खेळांविषयी सांगेन.
अनेक वाचकांना कदाचित माहिती नसेल,बॅडमिंटन ज्याला शटलचा खेळ असे म्हणतात ( बॅडमिंटनशिवाय इतर कोणत्याही खेळामध्ये शटलचा वापर केला जात नाही )त्याची सुरुवात ब्रिटीशांनी पुण्यामध्ये केली,नंतर संपूर्ण युरोपात त्याचा प्रसार झाला परंतु प्रामुख्याने पूर्व आशियामध्ये तो खेळला जातो.अनेक दशकांपासून त्यावर चिनी,इंडोनेशियन,मलेशियन,थाई व जपानी खेळाडूंचे वर्चस्व राहिले आहे.माझी पिढी (ज्यांचे वय ४५ हून अधिक आहे) रुडी हर्टिनो,आयक्यूक सुगियांतो,अँड्रे व्हिरांता,सुन जुन,डाँग जियांग,लिम स्वे किंग,हान जियान, झो जिन्ह्युआ यांची एकेरीमध्ये तसेच काई यंग – फे हेफेंग यांची पुरुषांच्या दुहेरीमध्ये नावे ऐकतच मोठे झालो. तुम्ही या यादीतील कुठलेही एक नाव वाचल्यानंतर हे खेळाडू कोणत्या देशांमधील आहेत हे तुमच्या लक्षात येईल,प्रामुख्याने चीनचे या खेळावर गेल्या दशकापर्यंत अतिशय वर्चस्व होते.अर्थात मेरियन फ्रॉस्ट,आपले प्रकाश पदुकोण व गोपीचंद अशी काही नक्कीच नावे आहेत,परंतु त्यांच्यापैकी कुणीही कोणत्याही वर्गवारीमध्ये गेल्या ६१ वर्षात आशियाई खेळांमध्ये बॅडमिंटनचे सुवर्ण पदक जिंकू शकले नव्हते व म्हणूनच चिराग व सात्विकचे सुवर्ण पदक विशेष महत्त्वाचे आहे.मित्रांनो,ज्यांचे या खेळावर प्रेम आहे त्यांचे कदाचित यासंदर्भात वेगळे मत असू शकते.परंतु त्यांच्याविषयी पूर्णपणे आदर राखत असे सांगावेसे वाटते की माझ्यामते दुहेरी खेळणे हे एकेरीपेक्षा अधिक अवघड आहे. म्हणूनच सात्विकराजचे वडील जे स्वतः एक बॅडमिंटन खेळाडू आहेत व प्रशिक्षक आहेत त्यांना सात्विकराजने दुहेरीमध्ये करिअर घडविण्याची फारशी इच्छा नव्हती कारण एकेरीमधील करिअर वैयक्तिक कौशल्यावर व तुमचा जोम यावर अवलंबून असते,परंतु दुहेरी हा सांघिक खेळ असल्यामुळे असे नसते.दुहेरीमध्ये तुम्हाला प्रत्येक फटका चारही बाजूंचा विचार करून घ्यावा लागतो म्हणजेच तुमच्या जोडीदाराची जागा तसेच क्षमता व दोन्ही प्रतिस्पर्धी तसेच जेव्हा ते तुमच्या फटक्याला प्रत्युत्तर देतील,तेव्हा स्वतःचाही विचार करावा लागतो व हे सगळे क्षणार्धात करावे लागते,कारण या खेळाचा वेगच तेवढा प्रचंड असतो. बॅडमिंटनच्या दुहेरी खेळाच्या या वैशिष्ट्यामुळेच माझेच खेळावर निस्सीम प्रेम आहे(व आदरही),यामुळे माझ्या दैनंदिन जीवनात काम करतानाही मला बरेच काही शिकवले आहे.काम काहीही असले तरीही मला केवळ माझाच नव्हे तर सगळ्या बाजूंनी विचार करावा लागतो व बॅडमिंटनमध्ये दुहेरी खेळल्यामुळे मला तो दृष्टिकोन अंगी बाणवण्यास मदत होते.या खेळावर पौर्वात्य खेळाडूंचे (चीनी) वर्चस्व होते व आम्ही थक्क होऊन त्यांचा वेग व तंदुरुस्ती पाहात असू,आपले खेळाडू त्यांच्या तुलनेत कुठेही नव्हते,परंतु आता अशी परिस्थिती नाही !
यासाठी अतिशय तंदुरुस्त असणे,तीक्ष्ण बुद्धिमत्ता व मनाच्या वेगापेक्षाही चपळाईने हालचाल करणारे शरीर हवे ज्याला आपण प्रतिक्षिप्त क्रिया (Reflexes) असे म्हणतो.हे सगळे केवळ कौशल्यामुळे साध्य होत नाही तर त्याच्या जोडीला अत्यंक खडतर प्रशिक्षणही लागते. जे चिराग व सात्विकने घेतले व त्यांच्या पौर्वात्य स्पर्धकांना पराभूत केले किंवा त्यांच्यावर वर्चस्व गाजवले जे आत्तापर्यंत कुणाही भारतीय बॅडमिंटनपटूला आशिय गेम्समध्ये साध्य झाले नव्हते(आशियाई खेळांमध्ये), म्हणूनच हे पदक विशेष आहे.त्यानंतर दोघेही सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आले आहेत,जेथे खेळात करिअर करणे हा सगळ्यात शेवटचा पर्याय असतो व तेदेखील बॅडमिंटनसारख्या खेळात ज्यामध्ये तुम्ही ३० वर्षांचे होईपर्यंत तुमची कारकिर्द संपुष्टात देखील आलेली असते जेव्हा इतरांच्या करिअरची नुकतीत सुरुवात झालेली असते.त्याचशिवाय या खेळात खूप पैसाही मिळत नाही परंतु हा खेळ खेळण्यासाठी भरपूर ( म्हणजे ट्रेनिंगसाठी )पैसा लागतो, म्हणूनच चिराग-सात्विकचे सुवर्ण पदक महत्त्वाचे आहे.त्याचप्रमाणे त्यांच्या पालकांनी दाखवलेले धाडस तसेच त्यांनी केलेल्या त्यागामुळे त्यांची मुले असे करिअर घडवू शकली. या देशातील तरुणांमध्ये एकीकडे शिक्षण व नोकऱ्यांमधील आरक्षण यासारख्या मुद्द्यांवरून फूट पडतेय (माफ करा मी आरक्षणाच्या धोरणावर किंवा त्याच्याशी निगडित भावनांविषयी कसलेही मतप्रदर्शन करत नाही किंवा समर्थन अथवा विरोधपण नाही ) व त्यांचे आयुष्यास आरक्षणामुळे खराब झाल्यामुळे या धोरणांना ( सरकारला ) दोष देत असताना,या दोन मुलांनी आपल्या करिअरच निवड केली, त्यानं जात कुणीही (आता) विचारणार नाही. त्यांच्याकडे कौशल्य असले तरीही केवळ एकच त्याचा साधन व आधार होता,तो म्हणजे खडतर परिश्रमाचा.मला असे वाटते या देशातील प्रत्येक तरुणाने चिराग-सात्विकचा दृष्टिकोन अंगी बाणवला पाहिजे ; केवळ खेळामध्येच नव्हे तर त्यांना जे काही करायचे आहे त्या प्रत्येक गोष्टीमध्ये, तसे झाले तर आपल्या देशाच्या अनेक समस्या सुटतील, म्हणूनच चिराग-सात्विकचे पदक विशेष आहे.
त्याशिवाय ईतर
खेळामध्ये चमकदार
कामगिरी
करणारे
खेळाडूही (म्हणजेच
पुरुष
व
महिला, मुले
व
मुली)आहेत, नेमबाजीमध्ये तीन सुवर्णपदके मिळवणाऱ्या नागपुरच्या देवतळेपासून ते
भारतीय जर्सी घालून आशियाई क्रीडा
स्पर्धेत
सहभागी
झालेल्या
प्रत्येक
स्पर्धकाचे विशेषत्वाने कौतुक
झाले
पाहिजे,कारण
एक
म्हणजे
ते(त्यांच्यापैकी बहुतेक)अशा
कुटुंबातून येतात ज्यांना
खेळाची
विशेष
पार्श्वभूमी नाही, दुसरे
म्हणजे,त्यांनी
करिअर
म्हणून
खेळाची
निवड
केली,आपल्या
समाजाच्या मानसिकतेचा विचार
करता
ते
अतिशय
अनिश्चित
करिअर
मानले
जाते.तिसरे
म्हणजे,त्यांनी
कोणतेही
आरक्षण
मागितले
नाही
किंवा
त्यासाठी
वाट
पाहिली
नाही,तर
निव्वळ
त्यांच्या कठोर परिश्रमाद्वारे व कौशल्याद्वारे
राष्ट्रीय संघात स्थान
मिळवले.त्यासाठी
कोणत्याही राजकीय नेत्याकडून शिफारस घेतली
नाही
कारण
या
सगळ्यामुळे त्यांना संघात
जागा तर मिळाली
असती
परंतु
देशाकरता
पदक
मिळवण्यासाठी तेवढे पुरेसे
झाले
नसते,कारण जागतीक दीनाच्या क्रीडा स्पर्धेमध्ये केवळ
एकच
गोष्ट
महत्त्वाची असते,ती
म्हणजे,
तुमचे
सर्वोत्तम योगदान द्या.म्हणूनच
आशियाई
क्रीडा
स्पर्धा
२३, यासाठीच विशेष महत्त्वाच्या आहेत कारण
आपल्याला
१००
हून
अधिक
पदके
मिळाली
व
ही
पदके
शेकडो
धगधगत्या
मशालींप्रमाणे आहेत ज्या
लक्षावधी
भारतीय
तरुणांना
व
त्यांच्या कुटुंबांना उजळून
टाकतील.ते
सुद्धा
हा
मार्ग
निवडू
शकतील
व
मग
त्यासाठी
त्यांना
एखाद्या ! आरक्षणाच्या धोरणाच्या कुबडीची गरज
पडणार
नाही
किंवा
कुणी
गॉडफादर सुद्धा लागणार
नाही,म्हणूनच
ही
पदके
महत्त्वाची आहेत.
सगळ्यात शेवटचा परंतु महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या सरकारचेही कौतुक केलेच पाहिजे, कारण आता भारताला केवळ मोठ्या लोकसंख्येचा देश म्हणून बघितले जात नाही, तर आपण केवळ क्रिकेटच नाही तर हळूहळू प्रत्येक खेळामध्ये बळकट होत आहोत हा संदेश आशियाई क्रीडा स्पर्धांमधील पदकांच्या संख्येमुळे संपूर्ण जगापर्यंत पोहोचवण्यात आला आहे, म्हणूनच ही पदके अतिशय विशेष आहेत; लक्षवधी भारतीय तरुणांना स्वतःवर विश्वास ठेवण्याचे धाडस देण्यासाठी व त्यांचा ज्यावर विश्वास आहे ते करिअर निवडण्यासाठी, सात्विक-चिरागचे अतिशय आभार !
संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलपर्स
smd156812@gmail.com
तुम्हाला शहराविषयी कोणत्याही तक्रारी
असल्यास,खालील
दुव्यावर
लॉग
इन
करा
https://youtu.be/27j3I3rwGPQ?si=-ODYBxVI2Dl_C345
No comments:
Post a Comment