Sunday, 2 November 2014

आपले माननीय मुख्यमंत्री !


एक नेता मार्ग जाणतो, त्या मार्गावरुन चालतो आणि मार्गदर्शन करतो .       
                                                                                 …जॉन सी. मॅक्सवेल

जॉन कॅल्व्हिन मॅक्सवेल हे अमेरिकी लेखक, वक्ते प्रिस्ट आहेत, ज्यांनी ६०हूनही अधिक पुस्तके लिहीली आहेत जी प्रामुख्याने नेतृत्व या विषयावर केंद्रित आहेत. आपल्या लाडक्या महाराष्ट्र राज्याला मुख्यमंत्री म्हणून तरुण नेतृत्व मिळाले असताना या लेखासाठी वरील अवतरण माझ्या मदतीला धावून आले! अनेकांसाठी ही लोकशाहीतील नित्याची बाब आहे, ते काही आपले पहिले मुख्यमंत्री नाहीत किंवा शेवटचे मुख्यमंत्री होणार नाहीत, तर मग त्यात असे काय विशेष आहे त्यामुळे राज्यात, रिअल इस्टेटसाठी किंवा, समाजासाठी काय बदल होणार आहे? अनेकांची विशेषतः थोड्याफार भपकेबाज शपथग्रहण सोहळ्यानंतर अशीच प्रतिक्रिया आहे; क्षणभर माझ्या मनातही असाच विचार आला की ही गाडीही याआधीच्या राज्यकर्त्यांच्याच मार्गाने चालली आहे का? मात्र श्री. देवेंद्र फडणवीसांसाठी काहीही टिप्पणी करणे फार लवकर होईल, अजून त्यांनी बहुमतही सिद्ध केले नसले तरीही त्यांच्यापुढील महाकाय आव्हानांविषयी आत्ताच चर्चा सुरु झाली आहे!

मला आपल्या नव्या मुख्यमंत्र्यांविषयी दोन बाबींचा आवर्जुन उल्लेख करावासा वाटतो, एक म्हणजे मी ज्या भागातला आहे त्या विदर्भातीलच ते पण रहिवासी आहे  दुसरी म्हणजे त्यांचे वय. आणखी एक बाब जिचा मला उल्लेख करायला आवडत नाही ती म्हणजे मी माझ्याप्रमाणे अनेकांसारखी त्यांची मध्यवर्गीय ब्राह्मण कुटुंबाची पार्श्वभूमी! आत्तापर्यंत नागपुरचा उल्लेख झाला की आठवतं ते सावजी मटण ही सांगड इतकी घट्ट आहे की पुण्या-मुंबईच्या लोकांना असं वाटतं की सावजी ही नागपुरवर राज्य करणारी कुणी व्यक्ती आहे! विदर्भातील मुख्य शहर असलेल्या राज्याची दुसरी राजधानी असलेल्या शहराची ही परिस्थिती आहे! आता मात्र आम्ही म्हणू शकतो की आमचे मुख्यमंत्री नागपुरचे आहेत! म्हणूनच हा लेखप्रंपच ….

प्रिय देवेंद्र,

मुख्यमंत्री म्हणून तुझ्याकडे पाहताना तुला नावाआधी सर/साहेब, बाबा, दादा किंवा भाऊ असे काही संबोधन जोडण्याची औपचारिकता करावीशी वाटत नाही, एखादा मित्र दुस-या मित्राला ज्या मोकळेपणाने अभिवादन करतो तसेच फक्त देवेंद्र म्हणावेसे वाटते, मला वाटतं तुलाही त्यात हरकत नसेल. माझा स्वतःचा जात व्यवस्थेवर विश्वास नाही, मात्र मी ज्या क्षेत्रात आहे तिथे मला त्यामुळे फारसा फरक पडत नाही, मात्र राजकारणासारख्या क्षेत्रात जेव्हा प्रत्येक निर्णय जातीच्या अनुषंगाने घेतला जातो तेव्हा तिचा विचार करणे भागच पडते. आणि म्हणुन मी तु मुख्यमंत्री होण्यातली तुझी ब्राम्हण असण्याची गोष्ट ही विशेष बाब असे म्हणालो ! आत्तापर्यंत प्रत्येक वृत्तपत्राने माध्यमांनी देवेंद्रच्या बालपणापासून ते त्याच्या लहान  मुलीपर्यंत प्रत्येक तपशीलाविषयी लिहीलंय; खरच, सत्ता आणि प्रसिद्धीमुळे तुमच्या आयुष्यात खाजगी काहीच उरत नाही! मी कालच मार्शल आर्टवरील एक चित्रपट पाहात होतो त्या चित्रपटामध्ये गुरु त्याच्या शिष्यांना सांगत असतोसत्तेला जबाबदारीची जोड असेल तरच ती चांगली असते”!  नागपुरातील अगदी सामान्य मध्यमवर्गीय घरातून आलेल्या एका मुलाच्या बाबतीत हे विधान किती खरं आहे, ज्याच्या हाती आता संपूर्ण राज्याची सत्ता आहे! -याचदा आपण मध्यमवर्गीय मानसिकता हा शब्द वापरतो मात्र त्याचा नेमका काय अर्थ होतो? मी त्यातून गेलो असल्याने मला असे वाटते की याचा अर्थ म्हणजे तुम्हाला ज्या मानसिकतेतून वाढवले जाते, तुम्ही केवळ अभ्यास करुन एक चांगली नोकरी मिळवावी एवढीच अपेक्षा असते, तिथे चांगलं काय वाईट काय हे स्पष्टपणे सांगितलेले असते, त्यात कोणतीही अस्पष्टता नसते! तुम्ही अभियंते किंवा डॉक्टर, वकील किंवा चार्टड अकाउंटंट होऊ शकता, पण संरक्षण दलासारख्या क्षेत्रांमध्ये जायलाही परवानगी दिली जात नाही राजकारण हा शब्दच वर्ज्य असतो! समाजसेवा हा शब्द अनाथालयांना देणगी देणे किंवा वृद्धाश्रमांना मिठाई पाठवणे इथपर्यंतच मर्यादित असते. निवडणुका या केवळ मतदान करण्यासाठी असतात, लढविण्यासाठी  कधीच नसतात, अगदी सोसायटीच्या निवडणुकीतही कुणी उभे राहात नाही! मध्यमवर्गीय मानसिकता ही अशी असते तुझ्याही भावना अशाच असतील. तू विदर्भासारख्या प्रदेशातून आला आहेस जो पश्चिम महाराष्ट्राला भौगोलिकदृष्ट्या जोडलेला असला तरीही भावनेने किंवा मनाने कधीही जोडला गेला नाही. या महाराष्ट्रामध्येच अनेक लहान महाराष्ट्र आहेत ज्यावर केवळ तीन किंवा चार जिल्ह्यांची सत्ता आहे, कारण सरकारने दिलेले अधिकार केवळ या जिल्ह्यांमध्येच केंद्रित झाले. त्यात काही गैर नाही कारण शेवटी हा या राज्याच्या जनतेनेच घेतलेला लोकशाही निर्णय होता. मात्र तरीही त्याचे राज्याच्या एकूणच विकासावर वेगळे परिणाम झाले, हे पण सत्य आहे आणि त्या पार्श्वभुमीवर कुणी कितीही नकार देवो तुझे मुख्यमंत्री होणे हा या सत्ता केंद्रातील बदल आहे!

महाविद्यालयातील कार्यकर्ता ते विरोधी पक्षनेता ते मुख्यमंत्री, तू खरच  एक लांबचा पल्ला गाठला आहेस. तू गेली पंधरा वर्षे सत्ताधा-यांविरुद्ध जी लढाई लढत होतास ती आता जिंकली आहेस, मात्र आता तुझी भूमिका नेमकी विरुद्ध असणार आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री म्हणून तू घेणार असलेल्या निर्णयांचे ठामपणे समर्थन करण्याची. देवेन, आज तू ज्या पदावर आहेस तिथे अपेक्षांचे प्रचंड ओझे आहे मात्र तुझ्या बाबतीत ते थोडे जास्तच आहे; कारण वर्षानुवर्षे राज्यातील जनता विशेषतः सामान्य माणूस प्रत्येक आघाडीवर नाडला गेला आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रतिनिधी नाही त्यामुळे मी कोणत्याही पक्षावर टीका म्हणून हे बोलत नाहीये  माझी अशी ठाम खात्री आहे की तुम्ही राज्य चालवताना प्रत्येक व्यक्तिला आनंदी करु शकत नाही, मात्र जेव्हा आपण लोकांना सर्वसाधारणपणे समाधानी ठेवण्यात अपयशी ठरतो तर ते निश्चितपणे एक शासनकर्ता म्हणून आपले अपयश असते. येथे  कुणीही मोफत घरे किंवा चांगली सरकारी नोकरी अशा अपेक्षा ठेवत नाही किंवा येथे स्वतःची कार, स्वस्त विमान प्रवास यासारख्या सवलती मिळतील अशी ही कोणाची समजुत नाही. एक समाज म्हणून आता आपण बरेच परिपक्व झालो आहोत या निवडणुकीतील मतदानाने ते सिद्ध झाले आहे. रोजच्या जगण्यासाठी सतत झगडावे लागू नये एवढीच लोकांची सरकारकडून अपेक्षा आहे. एकीकडे असा वर्ग आहे जो बीएमडब्ल्यू किंवा ऑडी यासारखी कोणतीही महागडी गाडी खरेदी करु शकतो त्याला हवा तेव्हा प्रवास करु शकतो दुसरीकडे दिवाळीसाठी नागपूरला जायला रेल्वे आरक्षण किंवा बस आरक्षणासाठी रात्रभर रांगेत वाट पाहात उभे राहणारे लोक आहेत! त्यानंतरही आरक्षण संपल्याचे फलक पाहायला मिळतात खाजगी बसचे तिकीट त्यांनी ठरवलेल्या दराने खरेदी करावे लागते! आता संपूर्ण राज्यातील रस्त्यांच्या परिस्थितीविषयी थोडंसं; एकेकाळी मी नागपूरहून रस्त्याने कान्हा अभयारण्यात जात असे, तेव्हा खडबडीत रस्ता सुरु झाल्यावर आम्ही म्हणत असूआलं एमपी” म्हणजेच आता आपण मध्यप्रदेशात प्रवेश केला आहे! आता नेमकी उलट स्थिती आहे खडबडीत रस्ता संपुन चांगला रस्ता सुरु झाला म्हणजे आपण मध्यप्रदेशात आहोत हे जाणवतं!  ही परिस्थिती सामान्य माणूस स्वतः पाहू शकतो अनुभवू शकतो आता !

राज्याच्या स्थितीचा हा केवळ एक पैलू झाला, पायभूत सुविधांकडे बघणं म्हणजे शोभादर्शीद्वारे बघण्यासारखे आहे, शोभादर्शीच्या प्रत्येक कोनातून बघताना प्रत्येक वेळी वेगळं चित्र दिसतं मात्र आपल्या परिस्थितीत ते प्रत्येक वेळी अधिक वाईट दिसतं. एमएसईबीच्या मीटरवरील नावात बदल करण्यापासून ते /१२च्या उतारा-यावरील नावात बदल करणे, ते मालमत्ता करावरील नावात बदल करण्यापर्यंत, सामान्य माणसाला अतिशय त्रास होतो अशी परिस्थिती आहे. चित्रपटांपासून ते टीव्हीवरील मालिकांपर्यंत कायदा अंमलबजावणीविषयी म्हणजेच पोलीसांच चित्र अतिशय वाईट  रंगवले जाते, ते प्रत्येक अवैध व्यक्तिशी हातमिळवणी करत असल्याचे दाखवले जाते, समाजाच्या नजरेत त्यांची काय प्रतीमा आहे याचे ते द्योतक आहे. लोकांना पोलिसांकडून न्याय मिळेल असा विश्वास वाटत नाही, एवढेच काय पोलीस ठाण्यात त्यांना साधी चांगली वागणूकही मिळत नाही हे खरे आहे! कायदा सुव्यवस्थेची अशी परिस्थिती असेल तर मग इतर आघाड्यांवर काय अपेक्षा करायची! लोकांनास्मशानातजायची भीती वाटत नाही ईतकी कोणत्याही सरकारी आस्थापनेमध्ये जायची वाटते; ही परिस्थिती सर्वत्र आहे. लोकांना विश्वासच वाटत नाही की कोणत्याही सरकारी आस्थापनेमध्ये त्यांचे काम कोणतीही लाच घेता किंवा सहजपणे होईल, मला असे वाटते की सरकारचे हेच मुख्य अपयश आहे! शेवटी सरकार कशासाठी आहे, सामान्य माणसाचे जीवन अधिक सहज सोपे बनविण्यासाठी नाही का? या आघाडीवर सर्व समान आहेत; मुंबईतच्या लक्षाधीशापासून ज्याला प्रत्येक कायद्याचे पालन करुन पैसा कमवायचा आहे, ते आपल्या जमीनीच्या लहानशा तुकड्यातून थोड्याफार धान्याचे उत्पादन करायची इच्छा असलेल्या  शेतक-यापर्यंत सर्वांची सरकारी आस्थापनांविषयी सारखीच भूमिका आहे; मग एखाद्या उद्योजकाला औद्योगिक परवानगी घ्यायची असो किंवा शेतक-यांना खते पाहिजे  असो! त्यांच्यापैकी प्रत्येक जण सरकारी यंत्रणेकडून मिळालेल्या अनुभवाने वैतागलेला आहे!

देवेन तू आणि तुझा चमू गोपनीयतेची शपथ घेत असताना महाराष्ट्राची तथाकथित सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यामध्ये एक इमारत पत्त्यांसारखी कोसळली! नागरिकांच्या सुदैवाने केवळ एकच मृत्यू झाला, तरी एका दुर्दैवी पालकांनी आपला मुलगा गमावला; वीस कुटुंबे एका रात्रीत रस्त्यावर आली. या कुटुंबांनी त्यांची आयुष्यभराची कमाई स्वतःचं एक साधं घर घेण्यासाठी खर्च केली जे पूर्णपणे उध्वस्त झालं! या घरासोबतच त्यांचा आपण ज्याला न्याय किंवा सरकार म्हणतो त्यावरचा विश्वासही उडाला! आज केवळ वीस कुटुंबांच्या डोक्यावरचं छत गेलं मात्र पुण्याचं उपनगर असलेल्या ज्या आंबेगावमध्ये हा अपघात झाला तिथे अशी लाखो कुटुंब डोक्यावर टांगती तलवार घेऊन जगताहेत, उद्या कदाचित अशाच कारणासाठी त्यांची नावेही वर्तमानपत्रात येतील! त्यांची काय चूक आहे? त्यांच्याकडे एखाद्या तथाकथित चांगल्या बांधकाम व्यावसायिकाकडून अगदी एक बीएचके सदनिका खरेदी करण्यापुरतेही पैसे नाहीत, त्यामुळेच त्यांना अशा इमारतींमधील मृत्यूच्या सापळ्यांना शरण जावे लागते, ही त्यांची चूक आहे का? मी आधी म्हटल्याप्रमाणे कुणालाही मोफत आरामदायक घरे नको आहेत, मात्र कुणालाही झोपड्यांमध्ये किंवा अशा मृत्यूच्या सापळ्यांमध्येही राहावे लागू नये! राज्याचे झपाट्याने शहरीकरण होत आहे या बदलासाठी योग्य असे कोणतेही धोरण अस्तित्वात नाही. शहरे एखाद्या मोठ्या झोपडपट्टीप्रमाणे होत चालली आहेत पर्यावरण तसेच नागरिकांचे जीवन दिवसेंदिवस खालावत चालले आहे!

त्याचवेळी आणखी एक गोष्टही होतेय मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये डेंगी साथीच्या रोगासारखा पसरतोय. नव्या मुख्यमंत्र्यांना डेंगीसारख्या रोगाशी काय देणेघेणे आहे असा प्रश्न लोक विचारतील. मात्र डेंगीसारखे रोग पसरताहेत यावरुन परिस्थिती किती दयनीय आहे हे दिसून येते; हाताशी सर्व आधुनिक तंत्रे असूनही आपण डेंगीच्या डासांची पैदास नियंत्रित करु शकत नाही सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अकार्यक्षमतेची किंमत हजारो लोकांना चुकवावी लागतेय. आपली परिस्थिती किती दयनीय आहे याची ही केवळ दोन उदाहरणे आहेत! प्रत्येक सरकारी विभाग सामान्य माणसाच्या अगदी मूलभूत अपेक्षा पूर्ण करण्यात वारंवार अपयशी ठरला आहे, ही अपेक्षा घराची असेल किंवा सार्वजनिक आरोग्याची!

अर्थात सर्व काही हातचे निघून गेले आहे असे नाही, आपल्याकडे प्रत्येक विभागात चांगले अधिकारी आहेत मात्र काहीना काही कारणांनी आपल्याला संघटितपणे चांगली कामगिरी करता आलेली नाही; महेंद्रसिंह धोनी भारताचा कर्णधार होण्यापूर्वी जशी परिस्थिती होती तसंच आताचं चित्र आहे. आपल्याकडे चांगली वैयक्तिक कामगिरी करणारे खेळाडू होते मात्र एक संघ म्हणून आपण अपयशी ठरत होतो. मात्र एक चांगला कप्तान संपूर्ण चमूचे मनोधैर्य उंचावू शकतो तोच जमू जगज्जेता होऊ शकतो, आता लोकही तुझ्याकडे याच अपेक्षेने पाहात आहेत! चांगल्या अधिका-यांना आता पाठिंबा दिला पाहिजे नवीन संकल्पनांचे स्वागत केले पाहिजे ज्यामुळे आपला संपूर्ण समाज जगण्यासाठी एक चांगले ठिकाण होईल. या राज्यातल्या सामान्य माणसाला दरडोई उत्पन्न म्हणजे काय किंवा कोट्यवधी रुपयांचे उद्योग राज्यात येण्याने काय होईल हे समजत नाही, ते अर्थातच महत्वाचं आहे मात्र आपल्या दैनंदिन समस्यांहून अधिक नाही. शासन करणे हा पाच दिवसांचा कसोटी सामना आहे, मर्यादित वीस षटकांचा नाही ज्यामध्ये झटपट निकाल लागतो, मात्र कसोटी सामन्यांमध्ये सत्रं असतात प्रत्येक सत्राच्या खेळाचं वेगळं महत्व असतं अंतिम निकालावर लक्ष ठेवून खेळ खेळला जातो. कोणताही चमू सुरुवातीच्या सत्रांमध्ये खराब खेळ करुन अंतिम सत्रात काहीतरी चमत्कार घडेल अशी अपेक्षा करु शकत नाही, हेच फक्त सांगायचं होतं.

एवढं बोलून मी निरोप घेतो, मला फक्त एवढंच सांगायचंय की आता तू फक्त नागपूरकर नाहीस तर संपूर्ण राज्याचा किंवा देशाचा आहेस! सर्व नागपूरकरांना तसंच राज्याला अभिमान वाटेल असं काम कर, आपण ज्याला सरकार म्हणतो त्या यंत्रणेवर लोकांना विश्वास ठेवायला भाग पाड; तेच सर्वोच्च यश असेल जे मिळविण्यात भूतकाळातील प्रत्येक मुख्यमंत्री अपयशी ठरले! आमच्या शुभेच्छा नेहमीच तुझ्या पाठीशी आहेत!


संजय देशपांडे     

संजीवनी डेव्हलपर्स

smd156812@gmail.com
No comments:

Post a Comment