Monday 26 October 2020

निसर्गाचा कोप की माणसाचा मूर्खपणा!


































 पृथ्वी, जल, अग्नि वायू. जिथे ऊर्जा असते तेथे जीवन असते.”... सुझी कासीम

 

सुझी कासीम ही इजिप्शियन वंशाची एक अमेरिकी लेखिका, कवयित्री, तत्ववेत्ती बहु आयामी कलाकार आहे. ती कैरोमधील १९व्या शतकातील एका सुप्रसिद्ध संतांची नात आहे. तिच्या वाहिन्यांमधून जसे नाईल नदीचे पाणी वाहते, तसाच गूढवाद विद्वत्ताही रक्तातच आहे. आपले पूर्वज कुठलेही असले तरीही त्यांनी वर नमूद केलेल्या निसर्गातील सर्व घटकांचा नेहमी आदरच केला अनेक संस्कृतींमध्ये निसर्गातील या घटकांना देवाचा दर्जा देण्यात आला आहे, कारण निसर्गाची शक्ती ते जाणतात. सुझी कासीम यांनी त्यांच्या अवतरणामध्ये निसर्गातील सर्व तत्वांमधील उर्जेचा जो उल्लेख केलाय ती एक प्रकारची शक्तीच तर आहे. वर्षानुवर्षे (म्हणजे हजारो वर्षांपासून) माणूस, तसेच झाडे, पक्षी, मासे इतरही लाखो प्रजाती निसर्गाच्या या उर्जेवरच जगत आल्या आहेत. पण माणसाकडे बुद्धी आहे या बुद्धीसोबतच अहंकार येतो. या अहंकारामुळेच माणसाला असे वाटते की त्याला निसर्गाच्या तत्वांमधील ऊर्जा समजली आहे किंवा निसर्गाच्या शक्तीचे रहस्य समजले आहे. म्हणूनच माणसाने धरणे बांधायला सुरुवात केली ज्यात पाणी साठवता येईल, माणसाने विमाने अवकाशयाने तयार करायला सुरुवात केली जी आकाशावर विजय मिळवतील, माणसाने स्वतःच्या फायद्यासाठी आगीवर नियंत्रण मिळवायला सुरुवात केली, माणसाने जमीनीचा वापर कसा केला जाईल हे ठरवायला त्यायोगे जमीनीवर नियंत्रण ठेवायला सुरुवात केली. कालांतराने माणूस स्वतःलाच देव निसर्गाहून अधिक शक्तीशाली समजू लागला. 

माझा हा लेख माणसाच्याच या वागणुकीविषयी आहे मला अलिकडेच मुंबई पुण्यात पावसाने जो कहर केला त्याविषयी कुणीतरी चित्रित केलेल्या दोन व्हिडिओ क्लिप वॉट्सॲपवर मिळाल्या होत्या (त्या फॉरवर्ड करण्यात आल्या होत्या हे वेगळे सांगण्याची गरज नाही). मुंबई-पुणेच कशाला आपल्याला अशाप्रकारचे हजारो व्हिडिओ येत असतात अनेकजण म्हणतील की त्यात काय मोठेसे. पाऊस पडणे ही अगदी सामान्य गोष्ट आहे मुसळधार पाऊस पडत असेल तरी आपण तक्रार करतो पाऊस पडला नाही तरीही आपल्याला तक्रार करायची सवयच असते नाही का? हे मान्य आहे नेमके याचमुळे मला असे वाटते की आपण ग्रीन हाऊस परिणाम, ग्लोबल वॉर्मिंग, प्रदूषण, निसर्गाला पर्यावरणाला असलेली भीती, वितळत असलेला आर्टिक (हिमनग किंवा पृथ्वीवरील बर्फाचे आवरण), समुद्राच्या वाढत्या पातळ्या अशा सर्व बातम्या बऱ्याच काळापासून ठळक मथळ्यांनी छापल्या जात आहेत. अनेक गाजलेल्या हॉलिवुडपटांमध्येही हा आवडता विषय आहे. मात्र केवळ काही संशोधक, वैज्ञानिक काही आरडा ओरडा  करणारे (त्यांचा उल्लेख तसाच केला जातो) पर्यावरणवादी सोडले तर यावर कुणाचाही विश्वास बसत नाही उर्वरित जगाला असे वाटते की त्यांना याच्याशी काही घेणे देणे नाही निसर्गापेक्षा त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये काळजी करण्यासारख्या इतर बऱ्याच गोष्टी आहेत. मी संपूर्ण जगाला दोष देत नाही कारण या जगावर साथीच्या रोगाचे संकट येईपर्यंत संपूर्ण जग अक्षरशः थगीत होईपर्यंत कुणाचाही असे काही होऊ शकते यावर विश्वास नव्हता, परंतु असे झाले, हो नाजगातच कशाला, मी पुण्यामध्ये गेली ३० वर्षे राहतोय गेल्या काही वर्षांमध्ये इथल्या पावसाचे स्वरूप ज्याप्रमाणे बदलले आहे तो एकप्रकारे इशाराच आहे. मी जेव्हा हा लेख लिहायला सुरुवात केली तेव्हा मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती, जे पूर्वी कधीही झाले नव्हते. शहरामध्ये ज्याप्रकारे पाऊस पडला त्याविषयी माझ्या एका मित्राने दिलेली प्रतिक्रिया (वॉट्सॲपवर) होती,हा नुसता पाऊस नाही, निसर्गाचा कोप आहे.

माझे बोलणे, हॉलिवुड चित्रपटांमध्ये सतत लाल झेंडा फडकवणाऱ्या, आकांत करणाऱ्या एखाद्या पर्यावरणवाद्यासारखे वाटत असेल तर मला माफ करा. पण आपण तो अवतीभोवती अनुभत आहोत तो निव्वळ योगायोग नाही, मग मुसळधार पाऊस असेल, अति उष्णता किंवा आर्द्रता (मी गेल्या आठवड्यात रस्त्यावरून चालत असताना गुगलवर पाहिले तर पुण्यातील आर्द्रता ९८% होती), असे पूर्वी कधीच झाले नव्हते, जगातील युरोपसह जगातील अनेक भागांमध्ये अशी परिस्थिती दिसून येत आहे; या सगळ्यातून काय दिसून येते? मला पर्यावरण किंवा विज्ञानाच्या क्षेत्रातील तज्ञांना हेच विचारायचे आहे. खरतर मला तज्ञांपेक्षाही जगाच्या शासकांना हा प्रश्न विचारायचा आहे, कारण संशोधक, वैज्ञानिक, विश्लेषक तुम्हाला नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या संभाव्य हानीची किंवा झालेल्या हानीची आकडेवारी देऊ शकतात. मात्र देशातील किंवा जगातील शासकांनी त्या माहितीच्या आधारे कारवाई करणे अशा आपत्ती टाळणे किंवा त्यामुळे कमीत कमीत नुकसान होईल असा प्रयत्न करणे आवश्यक असते. पुन्हा अनेक जण प्रश्न विचारतील की, हवामानातील हे सर्व बदल निसर्गाचाच भाग नाहीत का, कारण हे पर्यावरणवादी जसे अतिवृष्टीमुळे गळे काढतात तसेच ते अनावृष्टिसाठीही गळे काढतात निसर्गातील इतर बाबींनाही हे लागू होते. जर वाघांची संख्या कमी झाली तर अडचण असते जर ती वाढली तरीही अडचण असते, तुमची नेमकी समस्या तरी काय आहे तुम्ही सतत निसर्गाच्या तथाकथित हानीविषयी ओरड करत असता. सर्वप्रथम मी कुणी पर्यावरणवादी नाही, म्हणजे केवळ पर्यावरणवादी नाही, मी एक अभियंता आहे, एक व्यावसायिकही आहे मला फक्त निसर्गाचा समतोल बिघडला आहे एवढेच निदर्शनास आणून द्यायचे आहे.

वाघांची संख्या कमी होणे ही एक समस्या आहे परंतु वाघांची संख्या जास्त होणे हीसुद्धा एक समस्याच आहे, कारण निसर्गामध्ये कमी वाघ किंवा जास्त वाघ असे काही नसते केवळ तुम्ही निसर्गाला त्याचे काम करू दिले पाहिजे. हे संतुलनच एक समस्या आहे कारण अग्नि, वायू, आकाश, पृथ्वी जल या पंचतत्वांमध्ये आपल्या (माणसांच्या) सततच्या हस्तक्षेपामुळे असंतुलन निर्माण झाले आहे आपण त्यासाठी निसर्गाला दोष देतो. वाघाचेच उदाहरण घेऊ, वन्य जीवनाच्या साखळीमध्ये वाघ सर्वोच्च स्थानी असतो लोकांना वाघाविषयी बोलायला आवडते म्हणून वाघाचा उल्लेख करत आहे. हजारो वर्षे वाघ पृथ्वीवर मुक्तपणे संचार करत होते, निसर्गात होणाऱ्या बदलांशी स्वतःला जुळवून घेत होते इतर अनेक प्रजातींप्रमाणे टिकून राहिले. या काळात भूकंप झाले, हिम युग आले, ज्वालामुखींचे स्फोट झाले, महासागरांमध्ये बदल झाले, भूसांरचनिक बदल झाले, मुसळधार पाऊस, चक्रिवादळे, दुष्काळ पडून गेले कारण या सगळ्या नैसर्गिक घटना आहेत पृथ्वीवरील जीवनाचा एक भाग आहेत. या सगळ्यात वाघ जगला विकसित होत गेला, कारण ते काम निसर्ग करत होता. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये (खरतर फक्त १०० वर्षात) माणसाने निसर्गाची शक्ती आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर, त्याने ही शक्ती केवळ आपल्या सुखसोयींसाठी फायद्यांसाठी वापरायला सुरुवात केली. आपण एकीकडे म्हणतो की  वाघ वाचवा मात्र आपण कुणापासून वाघाला वाचवणे अपेक्षित आहे; त्याचे उत्तर माणसापासून असेच होईल! जेथे वाघ राहायचे शिकार करायचे ती जंगले आपण तोडली, आपण त्याचे पाण्याचे स्रोत प्रदूषित केले तसेच त्याच्या घरातून रस्ते तयार करून त्याच्याकडून त्याचे अन्न हिरावून घेतले, आपल्याला पिण्यासाठी किंवा उद्योगांची पाण्याची गरज भागविण्यासाठी जंगले धरणाच्या पाणलोटक्षेत्रात बुडवली, जंगलांच्या जमीनीवर आपली घरे बांधली शेती करायला सुरुवात केली. आपण आपली घरे बांधण्यासाठी किंवा आपल्या अन्नासाठी वाघांचे घर म्हणजे जंगलाच्या जमीनी बळकावल्या. आपण संरक्षित जंगलांद्वारे त्या वाचवण्याचे काहीही प्रयत्न केले नाहीत. आता वाघांची संख्या वाढल्यानंतर आपण त्यांना जगण्यासाठी आवश्यक असलेली जमीन देत नाही. जेव्हा ते माणसांवर आपल्या जनावरांवर हल्ला करतात तेव्हा आपण पुन्हा वाघांविरुद्ध ओरडतो. निसर्गाने वाघांचे भवितव्य ठरवले असते तर असे असंतुलन कधीच होऊ दिले नसते वाघांची संख्या वाढली असती किंवा कमी झाली असती तरीही कधीच काही समस्या झाली नसती. 

हे केवळ वाघ नावाच्या एकाच प्रजातीचे उदाहरण आहे, अशा घटना हजारो प्रजातींबाबत घडत आहेत, ज्या माणसाचा हस्तक्षेप होईपर्यंत निसर्गाचे नियंत्रण असलेले संतुलित जीवन आनंदाने जगत होत्या. आपण केवळ इतर प्रजातींचे जीवन नियंत्रित करण्यापर्यंतच थांबलो नाही,आपण शेती किंवा वीज निर्मिती या नावाखाली आपल्या फायद्यासाठी नद्यांचा मार्ग बदलण्याचा प्रयत्न केला, आपण आपल्या पाणी पुरवठ्यासाठी धरणे बांधली तलाव बांधले. आपण गोड्या पाण्याच्या तलावांना होणारा पाणी पुरवठा थांबवला, आपल्या हव्यासाला गरजेचे नाव देऊन हे तलाव प्रदूषित केले, आपण टेकड्या फोडल्या आपली घरे किंवा फार्म होऊसेस बांधण्यासाठी डोंगरांवरही अतिक्रमण केले, आपण खनिजांसाठी जमीन खणली, आपण हजारो विमाने उडवून आकाशही जिंकले शेवटी आपल्या जेट इंजिनांच्या प्रदूषणाने आकाशही प्रदूषित केले, आपण पृथ्वीचा नैसर्गिक पृष्ठभागकाढून टाकला त्याऐवजी आपल्या सोयीसाठी त्याचे काँक्रिटीकरण केले, ज्यामुळे जमीनीची पाणी शोषून घेण्याची क्षमता कमी झाली भूजल पातळी खालावली, आपण नगर विकासासारखी खाती तयार करून जमीनीचा वापर ठरवायला सुरुवात केली. एवढेच नाही तर आपण समुद्रालाही मागे ढकलण्याचा प्रयत्न केला ज्याने पृथ्वीच्या पृष्ठभागाचा जवळपास ऐंशी टक्के भाग व्यापलेला आहे. आपली अशी भावना होती की आपण पंचतत्वांवर विजय मिळवला आहे स्वतःच देव झालो आहोत.  ही किती हास्यास्पद गोष्ट आहे, स्वतःला देव समजून माणूस स्वतःलाच मूर्ख बनवत आहे. परिणामी निसर्गाचा संयम संपला, खरेतर निसर्ग कुणालाही शिक्षा देत नाही केवळ आपल्या कृतींवर प्रतिक्रिया देतो. मग निसर्गाने काय केले, त्याने बर्फाचे आवरण वितळवले ज्यामुळे अकाली पूर आला, यामुळे ऋतूमान बदलले, आपल्या पिकांवर परिणाम झाला, यामुळे तापमान वाढू लागले, सार्वजनिक आरोग्य डळमळले, सलग अनेक दिवस अथवा आठवडे मुसळधार पाऊस पडू लागला यामुळे आपली तथाकथित स्मार्ट शहरे ठप्प झाली. तसेच काही वेळा पाऊस पडलाच नाही ज्यामुळे स्मार्ट शहरांमधल्या नागरिकांवर मूलभूत गरज असलेल्या पाण्यासाठी वणवण फिरायची वेळ आली. निसर्गाने भूस्खलन, ढगफुटी, चक्रिवादळ, त्सुनामी घडवले, ज्यासाठी आपण काहीही करू शकत नाही केवळ आपल्या कृतींसाठी एकमेकांना दोष देऊ शकतो. 

तुम्हाला जर आता असे वाटत असेल की हे कुणा आकांत करणाऱ्या पर्यावरणवाद्याने लिहीले आहे, तर तुम्हाला काय वाटते याची मला अजिबात फिकीर वाटत नाही, कारण हे जे काही घडते आहे ते आपण पृथ्वीवर कोणत्याही शहरात किंवा गावात राहात असू आपल्याभोवती घडत आहे. यामध्ये निसर्गाची चूक आहे असे तुम्हाला वाटत असेल तो तुमचा मोठा गोड गैरसमज आहे, तुम्हालाच लखलाभ होवो

अजूनही वेळ गेलेली नाही. कारण एक अभियंता म्हणून मी असे कधीही म्हणणार नाही की माणसांसाठी सुखसोयी तयार करू नका. फक्त ह्याची जाणीव ठेवा की माणसासाठी सुखसोयि बांधताना, प्रत्येक प्रजातील पण आपली सुखसोय हवी असते हे. निसर्ग देव आहे कारण तो केवळ एकाच नाही तर प्रत्येक प्रजातीला सुखसोय देण्याचा प्रयत्न करतो. केवळ एका प्रजातीकडे मेंदू आहे त्या मेंदूचा वापर करण्यासाठी हात पाय आहेत म्हणून तिचाच विचार करत नाही. नेमक्या याच कारणाने माणूस कधीच देव बनू शकत नाही, कारण देव म्हणजे संतुलन म्हणूनच पंचतत्वांमधून मिळणारी ऊर्जा कशी वापरायची, सर्व जिवांचे संतुलन कसे राखायचेच हे त्याला (किंवा तिला) माहिती असते. म्हणूनच केवळ देवांकडेच ही शक्ती असली पाहिजे. कुठल्याही हातात कुठलीही शक्ती गेल्यानंतर जर वापरायच संतुलन नसेल तर त्याला राक्षसी रूप येते आणि हे आपण दररोज सिद्ध करत आहोत. मित्रांनो हे आवर्जून लक्षात ठेवा फार उशीर होण्याआधी जागे व्हा, एवढेच मला वन्यजीव सप्ताहाच्या समारोपाला म्हणावेसे वाटते. कारण निसर्गामध्ये, कोप, बदला, शिक्षा असे काहीच नसते. केवळ असंतुलनामुळे घडलेल्या चुकांची दुरुस्ती केली जाते. आपल्याला असे वाटत असेल की या सर्व नैसर्गिक आपत्ती किंवा संकटे निसर्गाच्या कोपामुळे होत आहेत तर मला तुम्हाला बॉलिवुडच्या किंग खानच्या एक प्रसिद्ध संवादाची आठवण करून द्यावीशी वाटते, “ये तो ट्रेलर है, पिच्चर अभी बाकी है मेरे दोस्त!“

 

संजय देशपांडे 

संजीवनी डेव्ह.

smd156812@gmail.com

 

 

 

 

 

 








 

No comments:

Post a Comment