Thursday 17 December 2020

लॉग हाऊस , निसर्ग आणि मनुष्य !

 

























माणूस सर्वात क्रूर प्राणी आहे.”... फ्रेड्रिक नीट्शे 

नीट्शे हा एक जर्मन तत्त्ववेत्ता, निबंध लेखक सांस्कृतिक समीक्षक होता. पाश्चिमात्य तत्त्वज्ञानावर बौद्धिक इतिहासावर त्याने सत्य, नैतिकता, भाषा, सौंदर्यशास्त्र, सांस्कृतिक सिद्धांत, इतिहास, शून्यवाद, शक्ती, चेतना अस्तित्वाचा अर्थ अशा विविध विषयांवर केलेल्या लेखनाचा फार मोठा प्रभाव आहे. मला नीट्शेचे नाव त्याने केलेल्या विविध लेखानाद्वारे माहिती आहे, मात्र आपल्यापैकी अनेकांना हे नाव विशेष माहिती नाही. नीट्शेसारख्या व्यक्तिमत्त्वांमुळेच पाश्चिमात्य जगात विशेषतः युरोपला समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे. मला खात्री आहे की पाश्चिमात्य देशाविषयीच्या माझ्या विधानामुळे अनेक जणांच्या कपाळाला आठ्या पडतील. ज्या देशाला हजारो वर्षांचा समृद्ध वारसा, संस्कृती तत्त्वज्ञान आहे तिथे आपल्याकडच्या महान व्यक्तिमत्त्वाऐवजी मी नीट्शेसारख्या पाश्चिमात्य व्यक्तीचे कौतुक कसे करू शकतो म्हणून अनेकांना रागही येईल. मी त्यांच्याशी वाद घालणार नाही किंवा अशा लोकांना प्रत्युत्तर देणार नाही. आपला देश सांस्कृतिकदृष्ट्या खरोखरच अतिशय समृद्ध आहे अनेक बुद्धिमान लोकांनी आपल्यालाजीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले आहे किंवा शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याकडे एवढी तथाकथित बुद्धिमान माणसे त्यांची शिकवण असूनही आपण आज २०२० मध्ये कुठे येऊन पोहोचलो आहोत हे पाहिल्यावर मला युरोप त्यांच्या संस्कृतीचे कौतुक केल्यावाचून राहावत नाही.

आता हे पुन्हा नैराश्यातून आलेले बोल आहेत, मात्र ते लॉकडाउनमुळे नाहीत. लॉकडाउन केवळ सरकारसाठी लोकांच्या मनात अस्तित्वात आहे. तसेच हॉटेल, पर्यटन, मॉल, सिनेमा हॉल, तसेच शाळा यासारख्या दुर्दैवी व्यवसायांसाठी आहे. या सगळ्यांना अशी आशा वाटतेय (किंवा ते प्रार्थना करताहेत) की कधीतरी लॉकडाउन संपेल त्यांचे आयुष्य पुन्हा पूर्वपदावर येईल. मित्रहो तुम्हा सगळ्यांना त्यासाठी माझ्या शुभेच्छा, मी सुद्धा त्या सर्व शक्तिमान परमेश्वराकडे त्यासाठीच प्रार्थना करतो. असो, तर आता पुन्हा नीट्शेबद्दल त्याने माणसांबद्दल जे उद्गार काढले आहेत त्याविषयी बोलू. तो मानवाविषयी नाही तर केवळ माणसाविषयी बोलत होता. त्याच्याशी अनेकजण असहमत असतील कारण शेवटी मानवता या शब्दामध्येच मानवाचा समावेश होतो, म्हणूनच माणूस हा जगातील सर्वात क्रूर गोष्ट कशी काय असू शकतो. किंबहुना या महामारीमध्ये आपण माणसाच्या दयाळूपणाची अनेक उदाहरणे पाहिली आहेत, नाही का? हे खरे आहे मी काही प्रतिवाद करत नाही परंतु त्याचवेळीनफेखोरीची, अगतिक गरजू लोकांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याची उदाहरणेही पाहायला मिळाली, पण हे जग असेच चालते.तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हे काय आहे या सगळ्यात निसर्ग कुठून आला जे या लेखाचे शीर्षक आहे. आजूबाजूला एवढ्या नकारात्मक गोष्टी घडत असताना केवळ निसर्गाच्या रुपातच थोडा विरंगुळा मिळतो याबद्दल मात्र बहुतेकजणमाझ्याशीसहमत होतील. आता सहा महिन्यांहून अधिक काळ लोटलाय आपण आपली घरे कार्यालयांमध्येच अडकून बसलोय. अनावश्यक जमाव गर्दी टाळण्यासाठी हे आवश्यकच आहे. मात्र माणूस (म्हणजे मानव) सामाजिक प्राणी आहे शरीरासाठी जशी ऑक्सिजन पाण्याची गरज असते त्याच प्रमाणे लोकांना भेटणे, फिरायला जाणे ही आपल्या मनाची गरज असते. आम्हा वन्यजीवप्रेमी मित्रांचा एक गट नेहमी विविध जंगलांमध्ये भटकंती करत असतो. या वातावरणातून असाच थोडा विरंगुळा मिळावा निसर्गाच्या सान्निध्यात जाता यावे म्हणून आमच्यापैकी एकाच्या फार्म हाऊसला भेट द्यायचे ठरले.

मला फार्म हाऊस किंवा सुट्टीच्या दिवशी जाऊन राहता येईल अशा घराची विशेष ओढ नाही. मला असे वाटते ज्यांच्याकडे भरपूर वेळ पैसा आहे त्यांच्यासाठीच या गोष्टी आहेत.तुम्ही जेव्हा असे एखादे घर बांधता तेव्हा त्याचा वापर व्हावा यासाठी तुम्हाला तिथे नेहमी जावे लागते. अशा फार्महाउसच्या बाबतीत आणखी एक अडचण म्हणजे, तुमच्या घरापासून त्याचे अंतर. जर ते एका तासाहून अधिक असेल तर नेहमी तिथे जाण्यासाठी वेळ काढणे राहणे खरोखरच त्रासदायक होते. आपल्याला या सगळ्या गोष्टींविषयी कितीही माहिती आहे असे वाटत असले तरीही, आपले नेहमी बरोबरच असते नाही. माझेही या सुट्टीच्या घराविषयी असेच झाले, जेव्हा मी माझ्या मैत्रिणीच्या अशा एका घराला भेट दिली ज्याला ती कौतुकाने लॉग-हाउस किंवा लाकडीघर म्हणते. तिने (म्हणजे तिचा नवरा तिने) संपूर्ण लाकडापासून ते बनवले आहे ते दोघेही अमेरिकेतून परत आले आहेत हे सांगायची गरज नाही. ते घर अतिशय सुंदर आहे तिथे गेल्यानंतर मी सुट्टीचे घर किंवा फार्महाउसविषयीचे (म्हणजे विरुद्ध बोललेले) माझे सगळे शब्द मागे घेतले. याची तीन कारणे होती; तिथे जायला शहरातून (पुणे) जेमतेम पन्नास मिनिटे लागली, दुसरे म्हणजे त्याची अतिशय व्यवस्थित देखभाल केलेली होती तिसरे म्हणजे आजूबाजूला सुंदर निसर्ग होता. हा शेवटचा मुद्दाच या लेखाचा मुख्य विषय आहे. आम्ही पुण्याचे पश्चिम उपनगर असलेल्या सुसवरूनहिंजवडीला वळसा घालून पुढे गेलो तसा अचानक भोवतालचा परिसर बदलत गेला. डोंगर हिरवेगार, झाडा-झुडुपांनी आच्छादित होते, हवा थंड होती, इंद्रायणी नदीचे पाणी स्वच्छ वाहते होते आणि अनेक पक्षांचे आवाज ऐकू येत होते. मला एका झाडावर बया म्हणजेच सुगरण पक्ष्यांची शेकडो घरटी पाहायला मिळाली. सर्वोत्तम वास्तुविशारद अभियंता असलेला हा पक्षी घरटे बांधतानाची काही उत्तम छायाचित्रे काढता आली. गंमत म्हणजे सुगरण पक्षाचा नर सर्व बांधकाम करतो मादी केवळ कामावर देखरेख ठेवते, माणसांनीही यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे!

 शहराच्या मध्यवर्ती भागापासून केवळ तीस मिनिटांच्या अंतरावर किती सुखद वाटते, तुम्ही प्रदूषित हवा, रहदारी, गजबजलेल्या वसाहती, गर्दी एकूणच शहरी जीवनाचा कोलाहल मागे सोडता, ज्यामुळे आपले आयुष्य जाचक होते, ज्यात खरेतर आपलाही काही वाटा असतो. मी पुण्याला लागून असलेल्या या भागात कधीच आलो नव्हतो जो पौड रस्ता म्हणजेच मुळशी मुंबई द्रुतगती मार्गाच्या मध्यावर आहे. माझ्यामते हा पश्चिम घाटाचा भाग आहे मी इथे अजूनही टिकून असलेल्या समृद्ध जैव विविधतेनेआश्चर्यचकित झालो (गुंग झालो). माझ्या मैत्रिणीचे फार्म हाऊस डोंगरात वसलेले आहे विकासकाचे आभार म्हणजे त्याने तिथे केवळ रस्ता करण्यासाठी काही झाडे वगळता इतर सर्व झाडे तशीच ठेवली आहेत. अर्थात शेतकऱ्यांच्या शेतांनीही इथल्या निसर्ग सौंदर्याला हातभार लावलाय ही खूप दिलासादायक बाब आहे. आम्ही फार्महाउसवर पोहोचलो तेव्हा सूर्य आधीच मावळला होता ढगाळ वातावरण होते. मी हातात टॉर्च घेऊन डोंगरावर जाणाऱ्या एका रस्त्यावर चालायला सुरुवात केली. असे चालत जाणे भीतीदायक होते, या भागात फार मोठी जंगली श्वापदे नाहीत हे माहिती असूनही, तुम्ही तुमच्या वसतिस्थानी म्हणजे काँक्रिटच्या जंगलात नसता तेव्हा अंधाराची भीतीच वाटते. निसर्गामध्ये जेव्हा ढगाळ वातावरण असते तेव्हा रात्री मिट्ट काळोख असतो कारण आपल्या डोळ्यांना हजारो दिव्यांच्या कृत्रिम प्रकाशझोताची सवय झालेली असते, त्यांचा झगमगाट तिथे नसतो. विविध किडे पक्ष्यांच्या आवाजामुळे एखाद्या भयपटाचा ४डी इफेक्ट असल्यासारखे वाटत असते. परंतु मला जंगलात भटकंतीची सवय असल्यामुळे मी त्या काळोख्या डोंगराळ रस्त्यांवर आनंदाने भीत-भीत चालत होतो, असा अनुभव शहरी जीवनात दुर्मिळच. दुसऱ्या दिवशी पहाटे माझी मैत्रिणी आम्हाला डोंगर माथ्यावर घेऊन गेली आणि मी खरेच सांगतो ते दृश्य कोणत्याही हिलस्टेशन किंवा युरोपीय देशातील ग्रामीण भागापेक्षा निसर्गरम्य होते. जांभळ्यापासून ते पिवळ्यापर्यंत प्रत्येक रंगाची जंगली फुले होती, अनेक पक्षी होते. त्यात रानकोंबड्यापासून ते मलबारी चंडेलपर्यंत शहरात तुम्हाला कधीही पाहायला मिळणार नाहीत असे पक्षी पाहायला मिळाले. हवा अगदी स्वच्छ होती क्षणभर मी स्मार्ट शहर माझ्या कामाविषयी सगळे काही विसरलो, यालाच तुम्ही खऱ्या अर्थाने सुट्टी म्हणता, नाही का?

 

आता मुद्दा असा आहे की, आपल्या पुणे शहराभोवती हजारो किलोमीटर अशी वसतिस्थाने आहेत मला खात्री आहे की इतर शहरांच्या बाबतीतही अशीच परिस्थिती असेल, पण आपण त्यांच्या संवर्धनासाठी काय करत आहोतसुदैवाने या शेतजमीनींचा विकास करणाऱ्या माणसाने थोडी दूरदृष्टी दाखवली आहे हे वसतिस्थान सुरक्षित ठेवले आहे. मात्र भोवताली झपाट्याने शहरीकरण होत असताना सगळीकडे अशी परिस्थिती नाही. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे (वनविभागाच्या तुटपुंज्या पायाभूत सुविधांची पूर्णपणे जाणीव राखून हे बोलतोय), मला जैवविविधतेचा स्वर्ग असलेल्या याठिकाणी कोणत्याही सरकारी संस्थेचे निसर्ग संवर्धनाचे प्रयत्न दिसून आले नाहीत. त्याचवेळी या समृद्ध निसर्गाचा योग्य उपयोग करून घेण्याचाही कुणी प्रयत्न करताना दिसत नाही. केवळ निसर्गाच्या कुशीत तुमचे घर बांधा अशा आशयाच्या पाट्या लावलेले भूखंड तयार झालेले दिसतात. अशा विकासावर कुणाचेच नियंत्रण नाही, एकेदिवशी इथे घरे असतील पण त्यातून तुम्हाला बघता येईल असा निसर्गच उरणार नाही ही वस्तुस्थिती आहे. मला खरोखरच प्रश्न पडतो की आपण कशा प्रकारचा समाज किंवा सरकार आहोत (म्हणजे लोक) आहोत, कारण एकीकडे आपण निसर्गाचे संवर्धन करा असे ओरडून सांगतो दुसरीकडे निसर्ग निकोपपणे टिकून असताना आपण त्याकडे काणाडोळा करतो, आपण खरोखरच अतिशय विचित्र आहोत. आपण शहरात आपल्या अगदी जवळपास असलेल्या निसर्गाचे संरक्षण करू शकत नाही (पर्वती टेकडी किंवा कर्जतची टेकडी किंवा पौड रोडची टेकडी). आपल्या शहराच्या अवतीभोवती जी काही जैवविविधता आहे तिच्याविषयी आपण काळजीच करत नाही आणि आपण स्वतःला विकसित बुद्धिमान प्रजाती म्हणजे माणूस म्हणवून घेतो. आपण रोज काही झाडे तोडतो, आपण काही पाण्याचे स्रोतप्रदूषित करतो, आपण एका प्रजातीला नामशेष करतो म्हणजे या पृथ्वी तलावरून नष्ट करतो त्यानंतर आपण जे नष्ट आहे त्याचे संवर्धन करायचा प्रयत्न करतो. परंतु ज्या देशामध्ये लोक गेल्यानंतर त्यांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात किंवा त्यांना पुरस्कार दिला जातो किंवा सन्मान दिला जातो, परंतु ते जिवंत असताना मात्र दिला जात नाही अशांकडून आणखी काय अपेक्षा करता येईलआपल्या भोवतालच्या जैवविविधतेचे पुनरुज्जीवन झाले नाही तरी आहे ती टिकेल यासाठी तरी धोरणे आखण्याची वेळ झालीय. त्यासाठी आपण वनविभाग, पर्यावरण विभागासारख्या विभागांना दुय्यम किंवा निकृष्ट विभाग मानण्याऐवजी जास्त अधिकार दिले पाहिजेत. त्याचवेळी जंगलांचे खाजगीकरण करण्याचा किंवा जंगलाचा भाग सुरक्षित ठेवून जैवविविधतेने समृद्ध जमीनी विकसित करण्याचा विचार करा, यासाठी टाटा किंवा विप्रो यासारख्या नैतिकता जपणाऱ्याउद्योगसमूहांचा विचार करता येईल. त्याशिवाय जंगलाच्या जमीनी ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या किंवा स्वयंसेवी संस्था निसर्गाची काळजी घेतात त्यांना दत्तक देण्याचा विचार करा कारण आपल्याकडे अजूनही मोठा भाग जंगलाने व्यापलेला आहे एखादा सरकारी विभाग त्याची काळजी घेऊ शकणार नाही ही वस्तुस्थिती आहे. असो, अलिकडेच एका महिलेवर बलात्कार जीवघेणा हल्ला झाल्याची बातमी आली नेहमीप्रमाणे माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाली. याच पार्श्वभूमीवर मी निसर्गावर होणाऱ्या हल्ल्याविषयी लेख लिहायला सुरूवात केली, मी जे लिहीले ते इथे देत आहे कारण शेवटी माझ्या लेखाला त्या हल्ल्याचा संदर्भ आहे...

 

आणखी एक हल्ला!

 

प्रत्येक वेळी एखाद्या महिलेवर कुणा गुंडाने बलात्कार जीवघेणा हल्ला केल्यावर, मेणबत्त्या लावल्या जातात, मोर्चे काढले जातात, लोकप्रिय व्यक्ती उसने शब्द घेऊन इन्स्टाग्रामवर आपला राग व्यक्त करतात, वृत्त माध्यमे त्याविरुद्ध जळजळीत लिहीतात त्यानंतर सगळे विसरून जातात.. ज्या देशातील बहुसंख्य जनता गझनी आहे (स्मृतिभ्रंश झालेली) आहे त्यांचे असेच होणार!!

तुम्हाला काय वाटते ज्या पुरुषांनी असे कृत्य करण्याचे धाडस केले त्यांनी भावनावेगात किंवा एखाद्या महिलेला पाहिल्यावर चुकून हे कृत्य केले? तर असे अजिबात नाही, तुम्ही असा विचार करत असाल तर तो मूर्खपणाचा आहे, असे पुरूष एखाद्या महिलेवर बलात्कार करायची हल्ला करायची हिंमत करतात कारण आपण ज्या व्यवस्थेला सरकार किंवा समाज असे म्हणतो त्या व्यवस्थेद्वारे दररोज अनेक महिला पुरुषांचा बलात्कार होताना (सर्रासपणे) जीवघेणा हल्ला होताना त्यानंतरही व्यवस्थेची सहीसलामत सुटका होताना ते दररोज पाहात असतात. मग चुकीचे वीज बिल असो, मालमत्ता कार्डावर नावात बदल करायचा असो, कर विवरणपत्रऑनलाईन भरायचे असो किंवा फक्त पाण्याचा सुरळीत पुरवठा होईल एवढी अपेक्षा असो (मी परवडणारी घरे किंवा शिक्षण किंवा वैद्यकीय मदतीची अपेक्षाही करत नाही), सगळीकडे अशा अर्थाने पुरूष महिलांचा दररोज, दर तासाला, वर्षभर बलात्कार होत असतो हल्ले होत असतात. केवळ हा बलात्कार आर्थिक मानसिक असतो तो दिसत नाही असे आपल्याला वाटते, मात्र त्यामुळे त्रास भोगावाच लागतो. त्याविषयी कुणी चकार शब्दही काढत नाही परंतु तरीही त्याचे व्रण तुमच्या चेहऱ्यावर बलात्काराचीच व्यथा सांगत असतात तुम्हाला मात्र असे वाटते की कुणालाही त्याविषयी माहिती नाही.

या मनोवृत्तीमुळेच काही पुरुष महिलेवर बलात्कार करायची तिला मारहाण करायची हिंमत करतात. यामुळेच काही पुरुष केवळ स्वतःला भाई म्हणवून घेण्यासाठी दारु पिऊन रस्त्यावर वाहनांची नासधूस करतात, यामुळेच काही पुरुषांना असा विश्वास वाटतो की बंदूक चाकूच्या धाकावर ते समाजावर सत्ता गाजवू शकतात कुणालाही धमकावू शकतात.

किंबहुना अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यास जेव्हा लाखो सामान्य माणसे घाबरतात तेव्हाच गुन्हेगारांचे धाडस होते म्हणूनच आपणही गुन्हेगार आहोत आपल्याभोवती घडणाऱ्या अशा प्रत्येक बलात्कारामध्ये सहभागी आहोत.

मित्रांनो जागे व्हा, जोपर्यंत तुम्ही शरीराने जिवंत आहात तोपर्यंत थोडे धाडस दाखवा, यामुळे किमान एखाद्या महिलेचे किंवा पुरुषाचे बलात्कार किंवा हल्ल्यापासून रक्षण होईल, ती व्यक्ती तुमच्या कुटुंबातलीही असू शकते, फार उशीर करू नका...मी सुद्धा दररोज माझ्यापरीने प्रयत्न करतो...

 

आपण प्रत्यक्ष नाही परंतु निसर्गाकडे दुर्लक्ष करून तो नष्ट करतोय, ही वस्तुस्थिती आहे. परंतु आपण जिथे माणसालाच सोडत नाही (म्हणजे महिलांना) तिथे आपण निसर्गालाही आपल्या हल्ल्यापासून (मी इथे बलात्कार हा शब्द वापरणार होतो परंतु स्वतःला आवरले) वाचवू अशी अपेक्षा कशी करू शकतो. पण एक लक्षात ठेवा, निसर्ग म्हणजे कुणी अबला, दुबळी महिला नाही (खरेतर महिलाही अबला नाहीत) ज्यांच्याशी तुम्ही वाट्टेल ते करू शकता त्यांना मरणप्राय यातना भोगण्यासाठी टाकून देऊ शकता व्यवस्थेला पैसे चारून निसटू शकता. निसर्ग माणसाने त्याच्यावर केलेले हल्ले विसरत किंवा माफ करत नाही; किंबहुना निसर्ग आपल्या पद्धतीने बदला घेतो जेव्हा तो असे करतो तेव्हा आपली बुद्धिमत्ता, शस्त्रास्त्रे किंवा पैसा कुणीच आपले रक्षण करू शकत नाही, हे मानवाने लक्षात ठेवावे!

 

 

 

संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स

smd156812@gmail.com


No comments:

Post a Comment