Thursday 1 April 2021

आग, पूर, कोरोना आणि आपत्तीची पुनरावृत्ती !

 

















ज्या ज्ञानामुळे चमत्कार घडतात त्याचे काळजीपूर्वक संरक्षण केले पाहिजे. जर असे ज्ञान चुकीच्या हातात पडले तर, चमत्कारांची आपत्ती व्हायला वेळ लागत नाही.”...पवन मिश्रा

 

पवन मिश्रा हे एक पारितोषिक-विजेते लेखक, निर्माते, दिग्दर्शक आर्थिक तंत्रज्ञान उद्योगातील प्रणेते आहेत. हफिंग्टन पोस्टने जानेवारी २०१७ मध्ये त्यांच्या कॉईनमॅन: ॲन अनटोल्ड कॉन्स्पिरसी ला २०१६ वर्षातील सर्वोत्तम स्वतंत्र प्रकाशित कादंबरी म्हणून घोषित केले  गेले ! ते आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या आघाडीच्या भारतीय लेखकांपैकी एक आहेत, त्यांचे वरील शब्द जुन्या हिंदू तत्वज्ञानाविषयी आहेत यात आश्चर्य नाही, ज्याचे संपूर्ण जगाकडून (मला शंका वाटते) कौतुक केले जाते, आपण भारतीय मात्र त्याकडे सोयीस्करपणे काणाडोळा करतो. आपल्यावर एकामागून एक वेगवेगळ्या प्रकारच्या  आपत्ती आदळत असतात आता आपल्याला त्याविषयी ऐकण्याची, वाचण्याची अशा आपत्तींमध्ये त्रास सहन करण्याचीही इतकी सवय झाली आहे की येणारा प्रत्येक दिवस हा चमत्काराप्रमाणे वाटतो. मी उत्तरांचलमध्ये झालेले भूस्खलन पुराविषयी लिहायला सुरुवात केली (म्हणजे अलिकडे झालेल्या), जे आपल्यापासून हजारो किलोमीटर अंतरावर आहे माझे लिहून पूर्ण होईपर्यंत अगदी आपल्या नाकाखाली म्हणजेच आपल्या स्मार्ट पुणे शहरात, फॅशन स्ट्रीटवरील ६०० हून अधिक दुकाने आगीत जळून खाक झाली, यात झालेल्या नुकसानामुळे हजारो कुटुंबे अक्षरशः भिकेला (पुन्हा एकदा) लागली आहेत. त्यातल्या त्यात दिलासा म्हणजे ही आग रात्री लागल्याने जीवितहानी झाली नाही. जर शनिवारी संध्याकाळी गर्दीच्या वेळी आग लागली असती तर या सध्याच्या कोव्हिडमय वातावरणात काय झाले असते याचा विचारही करवत नाही.

आपत्तीची ली पुनरावृत्ती, उत्तरांचलचा पूर !

केदारनाथविषयी म्हणजेच उत्तरांचलमध्ये झालेले भूस्खलन पुराविषयी आधीच बरेच काही लिहीले गेले आहे नेहमीप्रमाणे त्यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. सरकारने निसर्गाला दोष दिला (हे सोप्पे आहे नाही का), पर्यावरणवाद्यांनी सरकारला उद्योगधंद्यांना दोष दिला (सुदैवाने त्यात बांधकाम व्यावसायिकांचे नाव नव्हते), स्थानिक लोकांचे म्हणणे होते की त्यांनी अधिकाऱ्यांना अशी दुर्घटना होऊ शकेल असा इशारा दिला होता मात्र अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले (नेहमी प्रमाणे) त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांनी स्थानिकांना जंगलतोड करण्यासाठी शेतीसाठी डोंगर फोडून जमीन सपाट करण्याबद्दल दोष दिला. माझ्या मामाचं पत्रं हरवलं या खेळाप्रमाणे आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरूच राहिलीसर्वोत्तम बाब म्हणजे निसर्ग कुणालाही दोष देत नाही तर तो केवळ प्रतिक्रिया देतो. तो त्याच्या वाटेत येणाऱ्या प्रत्येकाविरुद्ध प्रतिक्रिया देतो, मग तो माणूस असेल, जनावर किंवा अगदी एखादा वीजप्रकल्प, या सगळ्यांना आपल्या प्रवाहात वाहूत नेतो. या घटनेनंतर पुन्हा एकदा किती कार्यक्षमपणे बचावकार्य करण्यात आले याबद्दल बातम्या आल्या, पुराच्या पाण्याने भरलेल्या बोगद्याच्या तोंडाशी एक इमानदार कुत्रा आपल्या मालकाची, बोगद्यातून सुटकेची कशी वाट पाहात होता याचे एक छायाचित्र पण प्रसिद्ध झाले, सर्वोच्च न्यायलयानेही या आपत्तीची कशी आपण होऊन दखल घेतली त्याच्या कारणांची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले याविषयी सुद्धा बातम्या होत्या. तोपर्यंत उत्तरांचलमध्ये कोणत्याही नदीमध्ये उत्खननाला परवानगी नाकारण्यात आली आहे, म्हणजे उदाहरणार्थ वाळू उपसा वगैरे करण्यासाठी.

बचाव कार्यामध्ये अतिशय साहसपूर्ण कामगिरी करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा व जवानांचा आदर राखत मला एवढेच म्हणावेसे वाटते की छान, फारच छान, आपत्ती व्यवस्थापनाचा भाग म्हणून केल्या जाणाऱ्या गोष्टी जरूर करत राहा. पण बॉलिवुडच्या चित्रपटांमध्ये ज्याप्रमाणे पोलीस नेहमी शेवटच्या मारामारीच्या नंतरच येतात, तसेच आपत्ती व्यवस्थापनाचा भाग म्हणून केल्या जाणाऱ्या कृतीही या नंतरच्या शवविच्छेदनासारख्या असतात, त्यात पुढची आपत्ती टाळण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले जात नाहीत, जी लवकरच येते आणि आपण आधीची आपत्ती विसरून जातो.

आपत्तीची री पुनरावृत्ती, फॅशन स्ट्रीटची आग !

वर्तमान पत्रांमध्ये साधारण तीन वर्षांपूर्वी आपल्या स्मार्ट शहरातील अग्निशमन दलाकडे साधनासामग्रीचा अभाव आहे कर्मचाऱ्यांची कमतरता आहे याविषयी एक लेख आला होता. अशा परिस्थितीतही धाडसाने (काही जण त्याला मूर्खपणा म्हणतात) केवळ एक काठी पाण्याच्या पाईपने, ज्यामध्ये क्वचितच पाणी असते आगीला तोंड देणाऱ्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचे मला अतिशय कौतुक वाटते. त्यांच्याकडे अग्निरोधक पोषाख नसतो, मास्क नसतात, अत्याधुनिक साधनसामग्री नसते, फोम सिलेंडर किंवा गॅस गन सारखी साधने असे काहीच नसते. नशिबानेच आत्तापर्यंत तरी शहरावर प्रचंड मोठी आपत्ती (म्हणजे खऱ्या अर्थाने जीवघेणी) आलेली नाही. ज्या व्यक्ती आपल्या कार्याला प्रसिद्धी मिळवतात त्यांच्याच मागे हा देश धावतो, मात्र अग्निशमन दलाला एवढे महाकाय काम करावे लागत असूनही क्वचित ते बातम्यांमध्ये येते. केवळ एखाद्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होते तेव्हा त्यांच्याकडील पायाभूत सुविधांची आठवण होते, नाहीतर एरवी त्याविषयी कुणालाही काहीच वाटत नाही. फॅशन स्ट्रीटवर लागलेल्या आगीनंतरही असेच झाले. इथे भेट दिल्यावर थोडीशी विवेकबुद्धी असलेला कुणीही या सांगू शकतो की ही जागा म्हणजे एखादा जिवंत बाँब आहे, केवळ शंभर स्टॉल उभे राहू शकतील एवढ्या जागेत जवळपास सहाशे स्टॉल दाटीवाटीने उभे आहेत या स्टॉलमध्ये तात्पुरती प्लयवूडची भिंत घालण्यात आली आहे, ज्या चटकन पेटू शकतात. या दुकानांमध्ये सर्व प्रकारचे अग्निजन्य सामान भरण्यात आले आहे, केवळ एक ठिणगी पडण्याचा अवकाश की आगीचा भडका उडू शकतो. गेल्या शनिवारी रात्रीही नेमके हेच झाले (त्याने काही फरक पडतो का!), मात्र शहराचे, नागरिकांचे अग्निशमनदलाचेही सुदैव म्हणजे आग रात्री उशीरा लागली. त्यामुळे बाजार मोकळा होता, मात्र या आगीमध्ये हजारो कुटुंबांकडे होते नव्हते ते सर्व जळाल्याने त्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. ही केवळ एखाद्या यंत्रणेची किंवा अग्निशमन दलाची समस्या नाही तर संपूर्ण शहराची समस्या आहे, या दुकानांमध्ये खरेदीला जाणाऱ्या लोकांची व्यापाऱ्यांचीही समस्या आहे. सरकारला तुमच्या सुरक्षिततेची फिकीर नाही हे मान्य आहे, मात्र आपल्याला आपल्या जिवाची काळजी आहे का नाही, हा प्रश्न मला सतत भेडसावत असतो. या प्रश्नाचे उत्तर नाही असेच द्यावे लागेल, आपण नागरिकच आपल्या जिवाची काळजी करत नाही तर मग सरकारला किंवा एखाद्या अग्निशमनदलाला दोष का द्यायचा. ज्या शहरामध्ये नागरिकांना डोक्याचे संरक्षण करण्यासाठी हेल्मेटची सक्ती करावी लागते, तेच नागरिक आगीसारख्या आपत्तीपासून सुरक्षित राहण्याची तसदी घेतील असा अविचार करण्याचे धाडसही आपण कसे करू शकू? दक्षिण मुंबईतील एका उच्चभ्रू भागातील एका उंची उपाहारगृहात काही वर्षांपूर्वी आग लागून तीस लोक ठार झाले होते, हे सर्व सधन वर्गातील लोक होते. सगळ्या शहरातील प्रत्येक प्रभागीय कार्यालय त्यानंतर तातडीने कामाला लागले अशा प्रकारच्या आस्थापनांचे सर्वेक्षण केले त्यांना अग्निसुरक्षा लेखापरीक्षण करून घेण्याचे आदेश दिले ही कारवाई तेवढ्यापुरतीच मर्यादित राहिली. फॅशन स्ट्रीटवरील दुर्घटनेनंतरही अग्निशमन दलाने नोटीसा पाठवल्या आहेत, संबंधित अधिकाऱ्यांना अग्निसुरक्षा लेखापरीक्षणाबद्दल इशारा दिला आहे सुरक्षा उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. आता तुम्ही कुणाला जबाबदार धराल काम थांबवण्याचे आदेश द्याल हे पाहायला मला नक्कीच आवडेल.

आपत्तीची ३री पुनरावृत्ती; कोव्हिड आणखीन काय!

आपल्या आपत्ती व्यवस्थापनाविषयीचा दृष्टिकोनच या आपत्तीमधून दिसून येतो. जवळपास आठ महिने लॉकडाउन सहन केल्यानंतर, आपल्याला असे वाटले आपण जिंकलो, कोरोना गेला दुसऱ्या लाटेसाठी किंवा अशाप्रकारच्या दुसऱ्या कुठल्याही साथीच्या रोगासाठी सज्ज होण्याऐवजी आपण कोव्हिडसाठी नव्याने उभारलेल्या सर्व वैद्यकीय सुविधा बंद केल्या विजयोत्सव साजरा करू लागतो. परिणाम पुन्हा एकदा वर्षभरापूर्वी आपल्या डोक्यावर जे संकट घोंघावत होते तशीच परिस्थिती आहे, म्हणजे रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे (पहिल्या लाटेपेक्षाही झपाट्याने) आपण पुन्हा एकदा तेच तुणतुणे वाजवत आहोत लोकांची पुन्हा तशीच दुर्दुशा झाली आहे. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनसारख्या सुविधांनी सुसज्ज पुरेशा खाटा नाहीत, पुरेसे प्रशिक्षित कर्मचारी नाहीत, लस नाही, मास्क नाही, सामाजिक अंतर राखले जात नाही, हात धुवायचा प्रश्नच येत नाही कारण प्रत्येक जण घरी परत गेल्यावर काय करतो हे आपण पाहू शकत नाही, यावर उपाय म्हणजे पुन्हा एकदा लॉकडाउन करायचा एवढेच आपल्याला माहिती आहे. आपत्ती व्यवस्थापनाविषयी आपल्या निरुपयोगी, मूर्खपणाच्या निष्काळजी दृष्टिकोनाशिवाय आपत्तीच्या पुनरावृत्तीचे आणखी चांगले उदाहरण काय असू शकते मी जेव्हा आपला दृष्टिकोन असे म्हणतो, तेव्हा त्यामध्ये केवळ सरकारच नाही तर आपल्या सर्वांचा समावेश होतो. कारण सरकारने वैद्यकीय सुविधांच्या आघाडीवर काही तयारी केली नाही तसेच जनतेनेही या रोगाच्या दुसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी कोणतीही स्वयंशिस्त लावून घेतली नाही, आता कुणी कुणाला दोष द्यावा!

देजा व्हू म्हणजे आपण सद्यस्थिती यापूर्वी अनुभवल्याची भावना ज्याला आपण पुनरावृत्ती असे म्हणू शकू म्हणूनच आपण ज्या आपत्ती सध्या अनुभवत आहोत त्यासाठी मी हा शब्द वापरला! निसर्गनिर्मित असो किंवा मानवनिर्मित आपत्ती कधीही अपघाताने येत नाही, ती खरेतर आपल्या आपल्या भूतकाळाविषयीच्या दृष्टिकोनाचा (दुर्लक्ष करण्याच्या किंवा अहंकाराच्या) परिपाक असते. पूर असो किंवा आग किंवा महामारी या सर्वांची पहिली वेळ असतेच, मात्र आपण पहिल्या आपत्तीला तोंड देताना काय शिकलो आपण जे काही शिकलो त्यातून आपण कसे वागतो यावरून आपण काय आहोत हे ठरते. आपण सध्या जे काही करत आहोत त्यावरून आपत्तींची पुनरावृत्ती झाल्यास आश्चर्य वाटायला नको, या आपत्तीच आपल्याला सोबत करणार आहेत, आपली खरेतर तीच लायकी आहे. एकशे तीस कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या आपल्या देशातील लोक चमत्कारांवर विश्वास ठेवतात (जगतात), हाच एक चमत्कार आहे, त्यामुळे आश्चर्य करत राहा, येणाऱ्या प्रत्येक दिवशी जिवंत राहिल्याबद्दल देवाचे आभार माना पुनरावृत्तीची जादू अनुभवत राहा!

 

आपण हा लेख इंग्रजीमध्ये वाचु शकता खालील लिंकवर / you can read this sharing in English on link below:

http://visonoflife.blogspot.com/2021/03/deja-vu-disaster.html

 

संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स

smd156812@gmail.com

 

















No comments:

Post a Comment