Thursday 23 February 2023

वाघ खरच वाचवायचे असल्यास !

 







































मी जंगलांमध्ये जो काही वेळ घालवला आहे त्यातून मला निखळ आनंद मिळाला आहे, तो आनंद आता मी इतरांना देणार आहे. सर्व वन्य जीवन हे नैसर्गिक वातावरणात असते त्यामुळेच हा आनंद मिळतो असे मला वाटते. निसर्गामध्ये दुःख नाही पश्चातापही नाही. एखाद्या थव्यातील पक्ष्याला किंवा एखाद्या कळपातील प्राण्याला, एखादा बहिरी ससाणा किंवा एखादा मांसाहारी प्राणी उचलून घेऊन जातो जे उरलेले आहेत ते त्यांची वेळ आली नव्हती यातच आनंद मानतात, तिथे उद्याचा विचार नसतो.” … जिम कॉर्बेट.

वन्यजीवनाशी एवढी एकरूप झालेली फार कमी नावे अशी आहे की त्यांचा फक्त उल्लेख करताच तुम्ही मनाने जंगलात जाता. मला खात्री आहे की या देशामध्येही जेथे वाद घालण्याचीच वृत्ती आहे सध्या जोरात आहे येथे सुद्धा कोणीही जिम कॉर्बेटचे नाव जंगलाविषयी सर्वात वरचे आहे याविषयी प्रतिवाद करणार नाही एवढे या माणसाने आपल्या देशातील वन्यजीवनासाठी योगदान दिलेले आहे. दुर्दैवाने, या लेखाचे मूळ किंवा विषय कॉर्बेट यांची भूमीच आहे, त्यामुळे तुमची उत्सुकता आता ताणत नाही सरळ विषयाकडेच जातो (दुर्मिळ गोष्ट, हशा) तर ही बातमी जवळपास प्रत्येक वर्तमानपत्रात होती तिचा मथळा वाचून माझ्या पोटात गोळा आला एवढा त्याचा संपूर्ण वन्यजीवनावर हानीकारक परिणाम होणार होता (नेहमीप्रमाणे). या बातमीचा सारांश असा होता की माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीने वन्यजीवन पर्यटनाविषयीचा आपला अहवाल सादर केला आहे अभयारण्यांच्या कोअर क्षेत्रातील वन्यजीवन पर्यटनावर एकतर बंदी घालण्यात यावी किंवा ते थांबवण्यात यावे किंवा ते कमी (तुम्ही त्याला काहीही म्हणा परिणाम सारखाच असतो) करण्यात यावे (काही वर्तमानपत्रांमध्ये तर बफऱ क्षेत्रातही सफारी नकोत असे म्हटलेले होते), तसेच प्राणी संग्रहालयासारख्या उपक्रमांना अभयारण्यांच्या बफर क्षेत्रातही परवानगी देऊ नये असे या अहवालात म्हटलेले होते. उत्तराखंड वन विभागाने (शासकीय) कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाच्या बफर क्षेत्रामध्ये प्राणी संग्रहालय सुरू करण्याची परवानगी मिळावी अशी विनंती केली होती, त्यानंतर या समितीची स्थापना करण्यात आली होती या समितीने वर नमूद केलेले निष्कर्ष मांडले होते. तर सर्वप्रथम, मी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समिती स्थापन करण्याच्या निर्णयाचा आदर करतो, मात्र तेवढ्याच आदराने मी या समितीच्या निष्कर्षांशी असहमत असल्याचे तसेच समितीच्या सदस्यांविषयी माझ्या मनात चिंता (म्हणजेच शंका) असल्याचे नमूद करतो. या समितीचे सदस्य कोण आहेत हे मला माहिती नाही तसेच त्यांना जे काम नेमून दिले होते ते करण्यासाठी ते किती योग्य आहेत हे मला माहिती नाही. तरीही ज्याप्रकारे माध्यमांमध्ये हे मुद्दे छापून आले त्यातून या समितीकडे जी विनंती करण्यात आली होती किंवा तिच्या हेतूमध्ये काहीतरी गंभीर त्रुटी असल्याचे दिसून येते. उत्तराखंड सरकारने बफर क्षेत्रामध्ये प्राणी संग्रहालयाची सुरुवात करण्याची परवानगी मागितली आहे, अशावेळी कोअर किंवा संरक्षित जंगलांमधील सफारी थांबवण्याचा प्रश्न कुठे येतो त्यासाठी दिले जाणारे कारण म्हणजे, अशा पर्यटनामुळे किंवा उपक्रमांमुळे संरक्षित जंगलातील वन्यजीवनामध्ये अडथळा येतो. त्याही पुढे जाऊन या अहवालामध्ये देशातील सर्व जंगलांमध्ये सर्वच संरक्षित जंगलांमधील पर्यटनावर बंदी घालण्यात यावी अशी टोकाची भूमिका घेण्यात आली आहे, उत्तम, माझा त्या समितीला साष्टांग नमस्कार! ही समिती माननीय सर्वोच्च न्यायालयाने तयार केली असली तरीही मी उपरोधिकपणे बोलण्याचे धाडस करत आहे. माझी माननीय सर्वोच्च न्यायालयाला प्रामाणिक विनंती आहे की या अहवालाची दुसरी बाजूही पाहावी त्यानंतरच काय कारवाई करायची आहे याचा निर्णय घ्यावा. मी समितीचा अहवाल वाचला नाही कारण तो उपलब्ध नाही पण वर्तमान पत्रात अहवालातील काही मुद्दे छापून आले आहेत

या समितीसंदर्भातही काही  मला प्रश्न आहेत, उदाहरणार्थ, या समितीचे सदस्य कोण होते त्यांनी कशाच्या आधारे सफारीवर निर्बंध घालण्याचा किंवा त्या थांबवण्याचा निष्कर्ष काढला (आपण प्राणी संग्रहालयाच्या मुद्द्याविषयी स्वतंत्रपणे बोलू). पर्यटनामुळे वन्यजीवनावर अयोग्य परिणाम होतो असे त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे ते अतिशय ढोबळ विधान आहे, त्यासाठी समितीने कोणत्या पर्यटनाचा अभ्यास केला त्यामुळे संबंधित वन्यजीवनावर चुकीच्या प्रकारे किंवा त्रासदायक प्रकारे कसा परिणाम होतो, यावर समिती प्रकाश टाकेल का? वाघ रस्त्यावरून चालत असताना किंवा बसलेला असताना पर्यटकांचे एखादे वाहन तेथे थांबल्यामुळे किंवा लावण्यात आल्यामुळे वाघावर किंवा एकूणच वन्यजीवनावर परिणाम होतो असा अर्थ होत नाही. माझ्याकडे ताडोबातील माया तारासारख्या वाघिणींची छायाचित्रे आहेत, ज्या जवळपास वीस वाहनांच्यामधून, त्यांच्याकडे ढुंकूनही पाहता आरामात चालत जात आहेत. या वाघिणींनी आई म्हणूनही त्यांची जबाबदारी पार पाडली आहे एकूण वीस पेक्षा अधिक बछड्यांना जन्म दिलेला आहे जे त्यांचे निसर्गाप्रती कर्तव्य होते. तरीही आपण वन्यजीवनामुळे चुकीचा परिणाम होतो असे म्हणते, ते कसे? तारा माया या वाघिणींनी बछड्यांना जन्म देऊन ताडोबा जंगलात भोवताली राहणाऱ्या उपजीविकेसाठी किंवा जगण्यासाठी पूर्णपणे वन्यजीवन पर्यटनावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांना वाचविण्यास मदत केली आहे. जर पर्यटकांना तारा माया यांना त्यांना पाहण्याची परवानगी दिली नसती (म्हणजे कोअर क्षेत्रामध्ये वन्यजीवन पर्यटनावर बंदी घालण्यात आली असती), तर हजारो कुटुंबे बेरोजगार झाली असती वाघांचे शत्रू झाली असती. माणूस वाघाच्या युद्धामध्ये शेवटी कोण जिंकते हे आपण जाणतो, बरोबर? केवळ माया ताराच नव्हे, तर सोनम, शर्मिली, छोटी मधू, सोनम तसेच रुद्र, तारू, छोटा मटका इतरही बरेच आहेत (ही सगळी ताडोबामधील भोवतालच्या वाघांची टोपणनावे आहेत), जे ताडोबाभोवतालच्या जंगलांचे मुख्य आकर्षण आहेत पर्यटकांना अतिशय आनंद देतात. ते माणसांना वन्यजीवनाशी जोडणारा मुख्य दुवा आहेत. एक वाघ म्हणजेच संपूर्ण जंगल नाही मात्र तुम्हाला कोणत्याही उत्पादनासाठी एखादी प्रसिद्ध व्यक्ती किंवा ब्रँड दूत हवा असतो. त्याचप्रकारे आपण जोपर्यंत जंगलाला एखाद्या उत्पादनाप्रमाणे ओळख देत नाही तोपर्यंत आपण त्याला वाचवू शकणार नाही, हे समजून घेण्यात किंवा पचविण्यात समिती अपयशी ठरली हे कटू सत्य आहे. मी माननीय सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो, परंतु तुमचा अनादर करणे हा माझा हेतू नाही, मी केवळ तुम्हाला वन्यजीवन संवर्धनाविषयीची तथ्ये दाखवण्याचा प्रयत्न करतोय.

समितीचे म्हणणे आहे (म्हणजे माध्यमांच्या म्हणण्याप्रमाणे) की अनियंत्रित वन्यजीवन पर्यटनामुळे वन्यजीवनाचे नुकसान होत आहे त्याला एकांत हवा आहे. वन्यजीवनाला खाजगीपणा हवा आहे परंतु याचा अर्थ असा होत नाही की माणसांशी पूर्णपणे संपर्क तोडून टाकायचा, कारण असे झाले तर माणसांपासून त्याचे संरक्षण कोण करेल? गोंधळात पडला आहात, तर दोन प्रकारची माणसे असतात, एक म्हणजे जी चांगली आहेत किंवा वन्यजीवनाच्या बाबतीत तटस्थ आहेत दुसरी म्हणजे जी वन्यजीवनासाठी वाईट आहेत. हे सर्व नियम पाळणे प्रवेशासाठी तिकीटे, परवानग्या, वन्यजीवन पर्यटनासाठी पैसे खर्च करणे ही चांगली माणसे करतात. या संदर्भात ते पर्यटक आहे जे जंगल किंवा वाघ पाहण्यासाठी किंवा अनुभवण्यासाठी जंगलांना भेट देतात. तर दुसरीकडे वाईट माणसे, म्हणजेच ज्यांना वन्यजीवनासाठी काहीही आदर नाही किंवा प्रेम नाही ज्यांना संरक्षित जंगलांमध्ये प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही परवानगीची गरज नसते (किंवा ते परवानगी मागत नाहीत) याच माणसांना आपण नियंत्रित केले पाहिजे. सच्च्या, निसर्गप्रेमी पर्यटकांना किंवा सामान्य माणसांना नियंत्रित करू नये. त्याचप्रमाणे पर्यटकांच्या आणखी दोन वर्गवाऱ्या आहेत, एक म्हणजे अति महत्त्वाच्या व्यक्ती दुसरी म्हणजे हौशी वन्यजीवन छायाचित्रकार या वर्गवाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. खरे सांगायचे तर आपल्या भारतीयांना या अति महत्त्वाच्या व्यक्तींचा शिक्का अतिशय आवडतो, आपल्या मंदिरांपासून ते जंगलांपर्यंत सर्वत्र या अति महत्त्वाच्या व्यक्ती व्यवस्थेमध्ये घुसखोरी करत असतात जी थांबवली पहिजे. अति महत्त्वाच्या व्यक्तींना अगदी संरक्षित जंगलांमध्येही जाण्यासाठी विशेष परवाना असतो. सामान्य पर्यटकांसाठी जे रस्ते बंद असतात त्या रस्त्यांवरही ही वाहने जाऊ शकतात, तसेच या वाहनांसाठी एकेरी मार्गही नसतात. सर्व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा जंगलाला भेट देण्याचा एकमेव हेतू वाघ पाहणे हा असतो, ते सुद्धा निःशुल्क. यामुळे जो त्रास होतो त्याचा भुर्दंड सामान्य पर्यटकांना तसेच जे वन्यजीवन पर्यटनावर अवलंबून आहेत त्यांना भरावा लागतो, हेच पाहण्यात किंवा याची दखल घेण्यात समिती अपयशी ठरली आहे कारण त्यांनीही निश्चितपणे कोणत्या तरी अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनातूनच जंगलाला भेट दिली असली पाहिजे. दुसरी त्रासदायक वर्गवारी म्हणजे वन्यजीवन छायाचित्रकार वन्यजीवनाची छायाचित्रे काढण्यात काहीच गैर नाही, परंतु एखादे विशिष्ट छायाचित्र मिळवण्यासाठी जीवावर उदार होणे वन्यजीवनाच्या केवळ याच पैलूवर लक्ष केंद्रित करणे या प्रयत्नामध्ये जंगलातील निसर्गाच्या प्रवाहात अडथळा आणणे ही समस्या आहे. म्हणजे मला असे म्हणायचे आहे की एखाद्या प्राण्याचा मार्ग रोखून किंवा एखादा प्राणी नैसर्गिकपणे जी कृती करणार आहे ती बदलायला लावून त्या प्राण्याचा एखादा विशेष क्षण किंवा छायाचित्र टिपण्याचा प्रयत्न केला जातो. समितीने असा दृष्टिकोन किंवा कृतींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. किंबहुना जर सामान्य पर्यटक भोवताली असतील तर ते पाहरा देण्याची भूमिका पार पाडू शकतात. कारण एखाद्या वन्यजीवन छायाचित्रकाराने काहीतरी चूक केली तर ते थांबवू शकतात तसेच समाज माध्यमांवर याचा उल्लेख करू शकतात. याच कारणामुळे वन विभागाला जंगलांमध्ये मोबाईल वापरण्याची भीती वाटते. कारण अति महत्त्वाच्या व्यक्तींची प्रसिद्ध छायाचित्रकारांची कृष्ण कृत्ये प्रकाशात आली तर वन्य विभाग किंवा व्यवस्थेचे अपयशही उघडकीला येईल. परंतु सदर समिती एका महत्त्वाच्या पैलूची दखल घेण्यात अपयशी ठरली की संरक्षित जंगलामध्ये सामान्य पर्यटकांच्या आल्यामुळे सर्व अवैध प्रवृत्तींना आळा बसतो ज्यामुळे वन्यजीवनाचे भलेच होते, त्यामध्ये अडथळा येत नाही.

त्यानंतर मुद्दा येतो तो वन्यजीवन पर्यटनातून उत्पन्न मिळवण्याचा जो तथाकथित निसर्ग संरक्षकांच्या (स्वघोषित) नेहमीच रडावर राहिलेला आहे अशा सर्व लोकांच्या संवेदनांविषयी पूर्णपणे आदर राखत, ज्यामध्ये स्वयंसेवी संस्था, वन्यजीवन संशोधक (अगदी मोजके) महान माध्यमांचाही समावेश होतो ते नेहमी वन्यजीवन सफारी किंवा पर्यटन कसे अपायकारक आहे कारण त्याचा उद्देश केवळ पैसे मिळवणे हा असतो हे सिद्ध करण्याच्या मागे लागलेले असतात. मला या सर्व घटकांना केवळ एकच प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे तुमच्या सगळ्या वन्यजीवन वाचवण्याच्या घोषणा देणे पुणे, दिल्ली किंवा जबलपूरसारख्या शहरांमध्ये तुमच्या आरामशीर घरांमध्ये किंवा कार्यालयांमध्ये बसून मथळे लिहीणे सोपे आहे, परंतु तुमच्यापैकी कुणीही करिअर म्हणून  एखाद्या संरक्षित जंगलांमध्ये जाण्याचा तिथे राहण्याचा कधीही विचार केला आहे का? त्यानंतर अशा ठिकाणी पर्यटक जे पैसे खर्च करतात त्यानुसार तुमच्याकडे दैनंदिन उत्पन्नाचे इतर कोणते पर्याय आहेत याचा विचार करा. जर या पर्यटकांना वाघाची एक झलक पाहायची असेल, तर त्यात काहीही गैर नाही कारण वाघ दिसणे दुर्मिळ आहे. म्हणूनच प्रत्येकाला तो पाहायचा असतो, या निसर्गाचा नियम आहे की माणसाचे मन नेहमी त्याला सहजपणे जे उपलब्ध होत नाही त्याच्या मागे धावते. अर्थातच, पर्यटन हे वाघ केंद्रित नसावे, जंगलामध्ये वाघाव्यतिरिक्त कितीतरी चांगल्या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. परंतु पर्यटकांना हे कोण समजून सांगणार? जर गाईड, राहण्याच्या सुविधांच्या स्वरूपात चांगल्या पायाभूत सुविधा असत्या तर तेथे जागरुकता मोहिमा राबविण्यात आल्या असत्या, परंतु त्याच व्यवस्थित नाहीत. जर आपण संरक्षित जंगलांमध्ये पर्यटनावरच बंदी घातली तर पर्यटकांना जंगलांमध्ये वाघांव्यतिरिक्त पाहण्यासारखे काय आहे हे कसे समजेल?

आता पुन्हा वाघ दिसण्याच्या मुद्द्याकडे येऊ, मला खरोखरच आश्चर्य वाटते की प्रसार माध्यमातील किती (काही वगळता) व्यक्ती प्रत्यक्षात व्याघ्र प्रकल्पाला भेट देतात कोअर क्षेत्रामध्येही वाघ दिसणे किती अवघड आहे हे पाहतात. सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने सध्या कोअर क्षेत्रामध्ये पर्यटन नसावे यावर लक्ष केंद्रित केले आहे या अहवालांमध्ये पर्यटकांची वाहने वाघाचा पाठलाग करत असल्याच्या डाउनलोड करण्यात आलेल्या प्रतिमांव्यतिरिक्त वन्यजीवनाविषयी किती कमी माहिती आहे. त्याचशिवाय, प्रत्येक वाघ किंवा वाघिणीचे स्वतःचे एक क्षेत्र असते, त्यामुळे कोअर, बफर किंवा संरक्षित जंगलाबाहेरील क्षेत्रामध्येही वाघ असू शकतात, कारण दोन वाघ एकाच भागात जगू शकत नाहीत हे वस्तूस्थिती आहेयाचाच अर्थ असा होतो की कोअर बफर वगैरे गोष्टी आपण वनविभागाकडील मनुष्यबळाच्या यंत्रसामग्रीच्या कमतरतेमुळे या अधिवासांच्या सुरक्षिततेसाठी तयार केलेल्या आहेत, वाघांच्या सुरक्षिततेसाठी नव्हे. किंबहुना सर्व जंगलांना कोअर म्हणून घोषित करावे संतुलित पर्यटनासाठी (केवळ नियंत्रित पर्यटनासाठी नव्हे) खुले करावे, जर आपल्याला इतर वन्य प्रजातींसोबत खरोखरच वाघांनाही जगवायचे असेल. या मूलभूत तथ्याकडे आपण (म्हणजे माध्यमे) सोयीस्करपणे काणाडोळा करत आहोत; वन्यजीवनाच्या या पैलूविषयी समितीचे काय म्हणणे आहे, हे मला जाणून घ्यायला आवडेल. माध्यमे (वृत्त माध्यमे) नेहमीच वन्यजीवन पर्यटनाविरुद्ध पक्षापाती राहिली आहेत राहतील असा माझा थेट आरोप आहे. कारण ती कधीही वन्यजीव पर्यटनाविषयी तथ्ये छापत नाहीत (किंवा त्यांना छापायला आवडत नाही) तर केवळ त्याचे नकारात्मक पैलू छापतातत्याऐवजी, प्रत्येक वृत्त माध्यमाने त्यांचा संबंधित वार्ताहर जंगलात पाठवला पाहिजे, त्यांना तेथे राहायला सांगितले पाहिजे, वन्यजीवनाविषयी तथ्ये आकडेवारी मिळवली पाहिजे, स्थानिकांशी बोलले पाहिजे, त्यांच्या उपजीविकेविषयी समजून घेतले पाहिजे त्यानंतर तुमचे वन्यजीवन पर्यटनाविषयी जे मत आहे ते छापले पाहिजे असे मी आज संपूर्ण माध्यम उद्योगाला आवाहन करतो.

आणि त्यानंतर बफऱ क्षेत्रामध्ये प्राणी संगहालय स्थापन करण्याच्या विनंतीविषयी, मी काही इतरांसारखा वन्यजीवन तज्ञ नाही, परंतु त्यामागचा साधा तर्क म्हणजे स्थानिकांसाठी त्यामुळे उत्पन्नाचे आणखी एक साधन उपलब्ध होते. दुसरा मुद्दा म्हणजे, विचार करा कान्हा अभयारण्यातील एखाद्या जखमी वाघाला किंवा हरिणाला शेकडो मैल लांब असलेल्या एखाद्या शहरात उपचारासाठी घेऊन जाण्याऐवजी कान्हा अभयारण्याच्याच जवळपास उपचार करणे पुन्हा त्याच जंगलात सोडून देणे सोपे होणार नाही का? तसेच, एखाद्या प्राण्याला कायमस्वरूपी इजा झाली असेल तर त्या प्राण्याला प्रदूषणाने कोंदटलेल्या शहरी जंगलामध्ये घेऊन जाण्याऐवजी जवळपासच ठेवणे किंवा त्याच्या अधिवासात ठेवणे हा अधिक नैसर्गिक मार्ग नाही का? मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांना कोव्हिडची नुकतीच येऊन गेलेली लाट आठवत असेल त्यावेळी सौम्य लक्षणे असलेल्या बहुतेक रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी डॉक्टरांनी घरीच विलगीकरणामध्ये राहण्याचा सल्ला दिला, म्हणजे रुग्णांना आजाराला तोंड देताना मानसिकदृष्ट्या बरे वाटेल, हाच तर्क प्राण्यांना लागू होणार नाही का जे जंगलांजवळच्या प्राणीसंग्रहालयामध्ये आश्रय घेतील काही लोकांना यातून थोडाफार पैसा मिळणार असेल, जे याच जंगलाचा भाग आहेत, तर त्यात काय चूक आहे?

मी पर्यटनाद्वारे वन्यजीवनामध्ये अडथळा निर्माण करा असे म्हणत नाही, कुणीही वन्यजीवप्रेमी असे म्हणणार नाही परंतु पर्यटनाला वन्यजीवनाचा शत्रू मानू नका एवढीच माझी विनंती नाही. मी स्वतः शहरामध्ये राहणारी व्यक्ती आहे ते देखील स्थापत्य अभियंता बांधकाम व्यावसायिक (पोटापाण्यासाठी) आहे, त्यामुळे तुम्हाला (विशेषतः माध्यमातील व्यक्तींना) असे वाटत असेल की वन्यजीवन पर्यटनाचा प्रसार करून माझा फायदा होईल तर मला वन्यजीवन पर्यटनाचा प्रसार करण्यात काहीही स्वारस्य नाहीतरीही मी वन्यजीवन प्रेमीही आहे मी आपल्या देशातील अनेक जंगलांमध्ये भटकंतीच केलेली नाही तर या जंगलांवर उपजीविकेसाठी ३६५ दिवस अवलंबून असलेल्या व्यक्तींचे (वन विभागासह) जीवन पाहिले आहे. आपण केवळ या लोकांचे जीवन आरामदायक बनवू शकलो त्यांना जगवू शकलो तर देशातील १५० कोटी लोकसंख्येसाठी (माणसांसाठी) आपल्याला वन्यजीवन टिकवून ठेवता येईल. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने तसेच सर्व माध्यमांनी वन्यजीवनाचा हा पैलू विचारात घेतला आहे का, असा प्रश्न मला या सगळ्यांना विचारावासा वाटतो. सर्वात शेवटी मी केवळ एक गोष्ट सांगेन की, हजारो वर्षे किंवा त्याहून अधिक काळापासून वन्यजीवन अस्तित्वात आहे, काहीशे वर्षांपूर्वी वाघांची संख्या पन्नास हजार होती तर आपली (माणसांची) लोकसंख्या वीस कोटी होती. त्याकाळी वन्यजीवन पर्यटन नव्हते, संरक्षित जंगले नव्हती, कोअर किंवा बफर क्षेत्र नव्हते आता काय झाले आहे की आपली लोकसंख्या दिडशे कोटीहून अधिक आहे वाघांची संख्या केवळ काही हजार झाली आहे, बरोबर? तर, असा एक मार्ग काढू ज्यामुळे प्रत्येक माणसाला वाघ जगणे का महत्त्वाचे आहे हे समजेल, कारण त्यानंतरच दिडशे कोटी जनता वाघांना त्यांच्या अधिवासासह सुरक्षित ठेवण्यासाठी पावले उचलू शकते. परंतु यासाठी वाघ त्यांचे घर (जंगले) या देशातील प्रत्येक सामान्य नागरिकाला पाहता आले पाहिजे. तर, हे व्हावे यासाठी जे काही करता येईल ते करा, परंतु आपण अंधपणे सामान्य माणसाचा आपल्या जंगलांमधील सहजपणे होणारा प्रवेश रोखला तर, आपण या निसर्ग समृद्ध देशामध्ये वन्य जीवनाचे जे भवितव्य ठरवत आहोत. आपण भाषा कोणतीही वापरली तरीही ते भवितव्य तसेच असेल, म्हणजेच ते नामशेष होईल याचाच अर्थ कायमस्वरूपी नष्ट होईल; म्हणूनच माननीय सर्वोच्च न्यायालयाने याचा विचार करावा निर्णय घ्यावा! हि नम्र विनंती.

तुम्हाला थोडा मोकळा वेळ मिळाल्यास कृपया खाली दिलेल्या यूट्यूबच्या दुव्यावर ताडोबाच्या यशोगाथेविषयीचे सादरीकरण पाहा..

https://youtu.be/hR15vYQi72Y

संजय देशपांडे.

संजीवनी डेव्हलपर्स

ईमेल आयडी - smd156812@gmail.com

09822037109

 

 

 














No comments:

Post a Comment