२०२३ मध्ये योग्य घर निवडताना !!
“आत्मसन्मान वाढविण्यासाठी महाविद्यालयात किंवा माध्यमिक शाळेमध्ये किंवा प्राथमिक शाळेमध्ये कोणतेही अभ्यासक्रम नसतात. घरातूनच ही मूल्ये लहानपणापासूनच तुमच्यामध्ये रुजवली गेली नाही तर, तर ती तुमच्यामध्ये असू शकत नाहीत” …टी. डी. जेक्स
“आपल्या मुलांना यश मिळावे, त्यांचे घर असावे, त्यांना महाविद्यालयीन शिक्षण मिळावे, ही व इतर उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे एक सुरक्षित नोकरी असावी हेच अमेरिकन स्वप्न आहे” … लिओनार्ड बॉसवेल
मला अमेरिकेविषयी नेहमी कुतुहल वाटते, ते त्यांची प्रगती किंवा तंत्रज्ञान किंवा स्वप्नवत वाटणारी अमेरिकन जीवनशैली जगत असल्यामुळे नाही तर त्यांच्या विचारवंतांचे (म्हणजेच लेख, नेते, प्रसिद्ध व्यक्ती इत्यादी) गहन विचार व त्यांचा दुहेरी आचार यामुळे ! कारण एकीकडे अमेरिकी समाजातील हे विचारवंत त्यांच्या कौटुंबिक नातेसंबंधांविषयी व मूल्यांविषयी बोलतात, त्याचवेळी दुसरीकडे त्यांचे कौटुंबिक जीवन असे असते की मुले १८ वर्षांची होताच घरातून बाहेर पडतात (किंवा कदाचित १६ व्या वर्षीही) व लहान मुले जर पालकांनी त्यांच्यावर अभ्यास किंवा शिस्तीच्या बाबतीत सक्ती केली तर पोलीसांची मदत घेण्यासाठी १०० क्रमांक डायल करतात. अशा प्रकरणांमध्ये कायदा मुलांच्या बाजूने असतो व पालकांना असे करण्यासाठी त्यांना शिक्षा देतो. तरीही ते घराच्या संकल्पनेविषयी जे लिहीतात किंवा सांगतात (किंवा कामाच्या जागेविषयीही, त्याविषयी नंतर सविस्तरपणे सांगेन), ते विचार करण्यासारखे असते मग ती अमेरिका असो किंवा आपला परंपराप्रिय देश भारत. घर ही प्रत्येकासाठीच अतिशय विशेष गोष्ट असते, म्हणूनच इतर उत्पादनांप्रमाणे त्याच्यासाठी एखाद्या दुकानातील वस्तूसारखा न्याय खरेदीसाठी लावता येत नाही. कारण घर हे अतिशय वेगळे (म्हणजे विशेष) असते, त्यामुळे घराचे चांगले घर किंवा वाईट घर असे वर्गीकरण सहज करता येत नाही, तर या दोन निकषांव्यतिरिक्त इतरही शेकडो निकष असू शकतात. म्हणजे मला असे म्हणायचे आहे की बांधकाम व्यावसायिकाच्या दृष्टिकोनातून चांगले घर म्हणजे जे विकले जाते व त्यातून बांधकाम व्यावसायिकाला पैसे मिळतात पण अगदी घरांच्या निर्मात्यांसाठीही (म्हणजेच बांधकाम व्यावसायिक) ही चांगल्या घराची अचूक व्याख्या नाही! त्याचवेळी, चांगले घर कदाचित सहजपणे ग्राहकाच्या बजेटमध्ये बसणार नाही (म्हणजे स्वस्त असणार नाही) तरीही त्याच्यादृष्टीनेही तो चांगला व्यवहार आहे असे त्याला वाटले पाहिजे; कोणत्याही उत्पादनाची हीच मूलभूत संकल्पना आहे, की ग्राहक-विक्रेता दोघेही या व्यवहाराबाबत आनंदी असले पाहिजेत. अर्थातच व्यवहार घराचा असला तरीही दोन्ही बाजूंसाठी पैसे कमावणे व पैसे वाचवणे हा महत्त्वाचा पैलू आहे, तरीही या विशिष्ट उत्पादनाच्या म्हणजेच घराच्या इतरही अनेक बाजू आहेत व माझ्या लेखाचा हाच उद्देश आहे!
दोन वर्षांहून अधिक काळाची अनिश्चितता संपली आहे, तरीही अधून-मधून आपण भीतीने पछाडले जातो (समाज माध्यमांची कृपा) व आपल्याला आपल्या इच्छेप्रमाणे हव्या त्या गोष्टी करण्याची भीती वाटते किंवा आपण त्या करायच्या टाळतो. याचे कारण म्हणजे जगभरातील करोना साथीच्या तांडवाने समाजामध्ये बरेच काही बदलले आहे (म्हणजे आपण शिकलो आहोत). सुदैवाने, भारतीयांनी आपल्या अंगभूत चिकाटीमुळे करोनाला अतिशय धाडसाने तोंड दिले व आता आयुष्याला सामोरे जाताना सामान्यपणे जीवन जगत आहेत. अर्थात मी म्हटल्याप्रमाणे अनेक आघाड्यांवर अनेक पैलू बदलले आहेत व रिअल इस्टेटही (म्हणजे घर व व्यावसायिक जागा ) या बदलांनाअपवाद नाही.
मला (किंवा रिअल इस्टेट उद्योगामध्ये कोणत्याही भूमिकेतील कुणाही व्यक्तीला) विचारला जाणारा सर्वात सामान्य प्रश्न म्हणजे, “रिअल इस्टेटका पुणे में क्या फ्यूचर है?”
म्हणजेच, पुण्यामध्ये रिअल इस्टेटचे काय भवितव्य आहे व सामान्यपणे हा प्रश्न सदनिकांची/कार्यालयांची विक्री व भविष्यातील दर यासंदर्भात असतो. इथे (खरे सांगायचे) तर रिअल इस्टेट हे काही रॉकेट विज्ञान नाही व विचारण्यात आलेल्या बहुतेक प्रश्नांची उत्तरे प्रश्नकर्त्यांना माहिती असतात किंवा त्यांनी त्यांचा निर्णय घेतलेला असतो, तरीही ही मानवी प्रवृत्ती आहे की माणसाला त्याच्या निर्णयाविषयी इतरांना विचारायला आवडते (तसे उघडपणे मान्य न करता) व त्याचा निर्णय बरोबर आहे हे इतरांच्या तोंडून ऐकताना त्याला अतिशय आनंद होतो किंवा तो त्यासाठी उत्सुक असतो. जेव्हा घरासाठी गुंतवणूक किंवा आयुष्यात एकदाच घेतली जाणारी गोष्ट असते तेव्हा हा इतरांना विचारण्याचे प्रमाण जास्त असते व विशेषतः जेव्हा सगळीकडे अनिश्चितता असते तेव्हा त्यांच्या मताविषयी सगळ्यांचा काय कौल आहे हे प्रत्येकालाच जाणून घ्यायचे असते किंवा आधीच जाणून घेतलेले असते, रिअल इस्टेटही त्याला अपवाद नाही.
मला तुम्हाला या लेखाच्या सुरुवातीलाच (म्हणजे मध्येच) असे सांगावेसे वाटते की, चांगले घर हे अपघाताने मिळत नाही तर ज्या व्यक्तीला त्यांचे उत्पादन समजले आहे त्यासाठी नियोजनबद्ध व शिस्तबद्धपणे प्रयत्न करावे लागतात व घर म्हणजे संपूर्ण रिअल इस्टेटचे प्रतिनिधित्व करते म्हणजेच कार्यालय, दुकान, भूखंड व इतरही एखादा भाग. त्याचवेळी चांगले घर (किंवा योग्य घर) जेव्हा ग्राहकाला त्याची संकल्पना समजलेली असते किंवा ते कसे तयार होते हे समजलेले असते तेव्हाच शक्य होते. पूर्वी अर्थातच चांगल्या घराचे मोजमाप त्यातून मिळणाऱ्या पैशांच्या आधारे केले जायचे. पूर्वी अपघाताने चांगले घर ( बिल्डरना व ग्राहक या दोगांनाही)मिळायचे मात्र आता असे अपघात होणार नाहीत किमान रिअल इस्टेटच्या क्षितिजावर नजीकच्या भविष्यात तरी असे अपघात होणार नाहीत असे माझे वैयक्तिक मत आहे. तुम्ही गोंधळून गेला असाल व हा काय शब्दांचा खेळ चालवला आहे असे तुम्हाला वाटत असेल तर मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की बांधकाम व्यावसायिकांसाठी, तुम्हाला कच्चा माल निवडण्यापासून तुम्हाला काळजीपूर्वक योग्य निर्णय घ्यावे लागतात. म्हणजेच तुमच्या प्रकल्पासाठी योग्य जमीन निवडणे ज्यावर तुम्ही घरे बांधून ती विकणार आहात व त्यानंतर त्याची योग्य ती रचना करणे आवश्यक असते तरच ते घर तुमच्यासाठी चांगले होईल अशी शक्यता असते. त्यासाठी पुणे निश्चितच चांगले ठिकाण आहे परंतु पुण्यातही तुम्ही मागणी व पुरवठ्याचे स्वरूप कसे आहे हे पाहिले पाहिजे तसेच ग्राहकांचा दृष्टिकोन व त्यांच्या गरजा काय आहेत हेदेखील समजून घेतले पाहिजे. मॉडेल कॉलनीसारख्या उच्चभ्रू भागात केवळ पत्त्यावर जाऊ नका कारण मुख्य रस्त्याला लागून वाहतुकीचा गोंगाट असतो, अशा ठिकाणी मॉडेल कॉलनीतील ग्राहक घर खरेदी करणार नाहीत. कारण तुम्ही एक किंवा दोन करोड रुपये खर्च करणार असाल तर तुम्ही केवळ उंची सुखसोयी व एकूणच ठिकाणाकडे पाहणार नाही, तर तुम्हाला घर खरेदी करताना सोबत शांतता व खाजगीपणाही हवा असेल. संपूर्ण राज्यातून व मध्य भारतातूनही बहुतेक कुटुंब आजकाल स्थायिक होण्यासाठी पुण्याला प्राधान्य देताहेत, बहुतेक कुटुंबांसाठी घर खरेदी करण्यामागे त्यांच्या भावी पिढीचे करिअर हा मुख्य उद्देश असतो. करोनाच्या लाटांनंतर मोठ्या घरांची मागणी वाढली आहे व याचा अर्थ केवळ मोठ्या खोल्या असे होत नाही, तर याचा अर्थ जास्त खोल्या, मग त्या लहान मुलांसाठी असो किंवा पालकांसाठी किंवा भेट देणाऱ्या पाहुण्यांसाठी (किंवा अगदी विलगीकरणासाठी), एक अतिरिक्त खोली अडीअडचणीच्या वेळी कामी येते हे नक्की, हा धडा अनेक कुटुंबांनी घेतला आहे व या सर्वांना स्वतःचे ,मोठे घर घ्यायचे आहे, आणि ही बाजारपेठ मोठी आहे, तरीही त्यातून मिळणारा नफा हा फार मोठा नसेल हे लक्षात ठेवा .ग्राहक (म्हणजे अलिकडच्या काळात) घर ठरवताना सर्वाधिक महत्त्व कोणत्या गोष्टीला देतो हे विकासकांच्यादृष्टीने नेहमी एक कोडे आहे व माझ्यामते तुम्ही काहीही म्हणालात तरीही बजेटलाच प्राधान्य दिले जाते कारण परवडणाऱ्या घरांच्या बाबतीत तुम्ही बजेटच्या बाहेर जाऊ शकत नाही व या घरांचे ग्राहक बहुतेकवेळा पगारदार असतात. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की त्या क्षेत्रातही अनेक व्यावसायिक आहेत (म्हणजे अनेक पर्याय आहेत) व आता कमीत कमी बजेटमध्ये तुम्ही जास्तीत जास्त किती जागा, आणि सुविधा म्हणजे आरामदायक सुख सोई देऊ शकता यासाठी स्पर्धा आहे. बांधकाम व्यावसायिकाच्या दृष्टिकोनातून चांगले घर ठरविणे हा सर्वात अवघड भाग असतो, म्हणूनच सहकारी बांधकाम व्यावसायिकांनो अतिशय काळजीपूर्वक व्यवहार करा एवढाच सल्ला मी देईन. यासाठी तर्कशुद्ध उत्तर म्हणजे बाजाराचा सखोल अभ्यास करणे जो रिअल इस्टेटमध्ये केला जातोच पण आता आपण तो केलाच पाहिजे. त्याचवेळी तुमच्या सध्याच्या ग्राहकांच्याही संपर्कात राहा, त्यांच्याश संवाद साधा व त्यांनी तुमच्याच प्रकल्पामध्ये त्यांचे घर का घेतले हे जाणून घ्या, त्यातून तुम्हाला तुमच्या नवीन प्रकल्पाच्या नियोजनासाठी व विक्रीसाठी कल्पना मिळतील.
ग्राहकांच्या दृष्टिकोनातून घर खरेदी करण्यासाठी अतिशय चांगली परिस्थिती आहे कारण अनेक पर्याय उपलब्ध आहेत व बांधकाम व्यावसायिक अगदी मोक्याच्या जागेसाठीही वाटाघाटी करायला तयार आहेत. त्यात काहीच चूक नाही कारण आता रिअल इस्टेट केवळ एकेरी व्यवसाय राहिलेला नाही व पूर्वी हा एकेरी मार्ग कोणत्या दिशेने जायचा हे आपण सगळे जाणतो. परंतु जेव्हा अनेक पर्याय उपलब्ध असतात व ग्राहकांना निवड करण्याची मोकळीक असते तेव्हाच कोणताही चांगला व्यवसाय टिकतो, तरीही आजही ठिकाण हा महत्त्वाचा घटक आहे व तुमच्याकडे ठिकाणासाठीही पर्याय उपलब्धआहेत. जर बाणेर महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल, तर सुसच्या स्वरूपात नवीन बाणेरही आहे व हेच प्रत्येक ठिकाणाला लागू होते. परंतु या नवीन बाणेर, नवीन खराडी अशा पत्त्यांच्या बाबतीत जरा काळजी घ्या व केवळ त्या शिक्क्यावर किंवा किमतीवर जाऊ नका तर पायाभूत सुविधांच्या विकासाचे स्वरूप तसेच बांधकाम व्यावसायिकाची पार्श्वभूमी तपासा, असाच सल्ला मी देईन. मी म्हटल्याप्रमाणे, चांगले घर अपघाताने मिळत नाही, अगदी ग्राहकाच्या दृष्टिकोनातूनही नाही, तर आधी तुम्ही खरेदी करण्यासाठी चांगले घर म्हणजे काय आहे हे समजून घेतले पाहिजे. केवळ गूगल मॅप्स, Insta लाईक्स किंवा प्रतिक्रियांवर जाऊ नका, त्या “दृश्यम”सारख्या चकवू शकतात (तुम्हाला यातील विनोद समजला नसेल तर नेटफ्लिक्सवर या नावाचा चित्रपट आहे तो जाऊन पाहा). चांगले घर हे नेहमीच थोडेसे बजेटबाहेर असतेच व त्यात
काहीच चूक नाही कारण तुम्हाला चांगल्या गोष्टी सहजपणे मिळायल्या लागल्यावर त्या चांगल्या राहणार नाहीत आणि असे मी म्हणत
नाही
तर तो निसर्ग
नियम
आहे ! तुमच्या घराविषयी (किंवा कार्यालय किंवा दुकान) तुमच्या गरजा ठरवून घ्या, सर्व तथ्ये अभ्यासून कोणकोणते पर्याय आहेत ते पाहा व त्यातून निवड करा व बोलणी करायला सुरुवात करा. एक लक्षात ठेवा, कोणताही बांधकाम व्यावसायिक या व्यवसायामध्ये नुकसान सहन करण्यासाठी किंवा राजा हरिश्चंद्र होण्यासाठी आलेला नाही व तुम्हीसुद्धा तसे होण्यासाठी घर खरेदी करत नाही.हा एक शुद्ध व्यवसाय आहे व तो व्यावसायिकपणे व व्यावसायिकता जपणाऱ्या व्यक्तीसोबत (म्हणजे कंपनीसोबत) करा.खरोखर, घर ही अशी गोष्ट आहे, जे केवळ विटा व सिमेंटपासून बनत नाही तर त्याच्याशी भावना निगडित असतात.
त्या सिमेंट व विटांमध्ये भावना टिकवून ठेवण्यासाठी आधी त्या भिंती पुरेशा मजबूत असल्या पाहिजेत. एका चांगल्या घराची निवड करताना तुम्ही हेच पाहिले पाहिजे. ज्या बांधकाम व्यावसायिकाला चांगले घर म्हणजे काय याची जाणीव आहे, केवळ त्याच्याशीच व्यवहार करा व बजेट, ठिकाण, सुविधा, दर्जा, आराम यासारख्या निकषांसोबतच नियोजनाचे घटक तसेच बांधकाम व्यावसायिक व त्याच्या (किंवा तिच्या) टीमचा त्यांच्या कामाविषयीचा व जीवनाविषयीचा दृष्टिकोन कसा आहे हे पाहायलाही विसरू नका. तुमचा बांधकाम व्यावसायिक केवळ घरे बांधण्यासोबत व पैसे कमावण्यासोबत काय करतो हे पाहा, कारण हेन्री फोर्डने एकदा म्हटले होते, “जो व्यवसाय केवळ पैसे कमावतो तो कधीही चांगला व्यवसाय नसतो” व हे चांगल्या घरांना तसेच त्यांच्या निर्मात्यांनाही लागू होते. म्हणूनच, घर घेण्यासाठी उत्सुक असलेल्या प्रिय ग्राहकांनो, तुमचे चांगले घर लवकरात लवकर जरूर निवडा, कारण त्यामुळे तुम्हाला तुमचे व तुमच्या कुटुंबाचे आयुष्य लवकरात लवकर अधिक चांगले बनवता येईल!
संजय देशपांडे.
संजीवनी डेव्हलपर्स.
ईमेल आयडी -smd156812@gmail.com
संपर्क : 91-98220 37109
No comments:
Post a Comment