वन्य जीवनाचे संरक्षण आणि आपले शिक्षण !
“जगात कुणा ही पेक्षा गेंड्याला ,गेंड्याच्या शिंगाची जास्त गरज आहे
''
… पॉल ऑक्स्टन.
“तुम्ही जग बदलण्यासाठी शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र वापर शकता.” … नेल्सन मंडेला
लेखाची
सुरुवात दोन अवतरणांनी केली आहे व या दोन्हींमधील साम्य म्हणजे ती दोन्ही अशा उपखंडातील आहेत जो वन्यजीवनाच्या बाबतीत अतिशय समृद्ध आहे. होय ही दोन्ही अवतरणे आफ्रिका खंडातील आहेत. पॉल हे युरोपीय आहेत परंतु त्यांना आफ्रिकेच्या जंगलांमध्ये जीवनाचा उद्देश सापडला. तर मंडेला यांचा जन्म आफ्रिकेत झाला व ते लहानाचे मोठेही तेथेच झाले. दुसरे एक साम्य म्हणजे मंडेला यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य मानवी हक्कांसाठी लढण्याकरता समर्पित केले, तर पॉल हे मानवांव्यतिरिक्त
अन्य प्रजातींच्या हक्कांसाठी लढत आहेतव विरोधाभास म्हणजे दोन्ही युद्धे एकाच भूमीत लढली जात आहेत. हा
लेख लिहीण्याचे व वन्यजीवनासाठी असे शब्द वापरण्यामागचे कारण म्हणजे (पुन्हा एकदा,काही पुणेरी वाचकांच्या कपाळाला आठ्या पडतील) वन्यजीवन संवर्धन, मात्र एखाद्या वन्यजीवनस्वयंसेवी
संघटनेच्या किंवा वनाधिकाऱ्याच्या
किंवा संशोधकाच्या भूमिकेतून नाही तर शालेय शिक्षकांच्या दृष्टिकोनातून. याचे निमित्त होते जंगल बेल्सने तीन नामांकित शाळांमधील शिक्षकांसाठी एका वेबिनारचे आयोजन केले होते. अगदी विषय निवडण्यापासून सहभागी शिक्षक
थोडेसे साशंक होते कारण ते वन्यजीवन संवर्धन या विषयावर काय बोलणार किंवा सांगणार, कारण हे वर नमूद केलेल्या यादीतील व्यक्तींचे (वनाधिकारी, स्वयंसेवी संस्था, संशोधक इत्यादी) काम नाही का असे त्यांना वाटत होते. त्याचप्रमाणे माझी मैत्रीण हेमांगी
हिने वेबिनारच्या सुरुवातीला त्याच्या विषयाबद्दल थोडी प्रस्तावना केली तेव्हा शहरी शाळेतील काही शिक्षक वन्यजीवन संवर्धनाविषयी काय बोलणार असा या शिक्षकांच्या मनामध्ये छुपा प्रश्न होता! मात्र आज समाजाच्या प्रत्येक घटकाचा पाठिंबा ही वन्यजीवनाची गरज आहे व शाळा व महाविद्यालयांव्यतिरिक्त
यासाठी दुसरा अधिक चांगला मंच कोणता असू शकतो कारण इथेच आपल्या समाजाची भावी पिढी घडतेय. शाळांमध्ये जागरुकता मोहीम राबवल्यामुळेच केवळ पुणेच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये दिवाळीच्या वेळी फटाके वाजविण्यास आळा बसला होता व वायू व ध्वनी प्रदूषणात घट झाली होती हे
आपण कसे
विसरू शकतो.
नेमक्या याच कारणामुळे जंगल बेल्सने वन्य जीवन संवर्धनामध्ये शिक्षकांनाही सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला कारण कुणीतरी सुरुवात करणे आवश्यक आहे, बरोबर? मला सुदैवाने हा
वेबिनार ऐकण्याची संधी मिळाली व त्यामुळे मला अनेक नवीन कल्पनाही सुचल्या ज्या वन्यजीवनाची आशा आहेत. या उपक्रमाचा मूळ उद्देश हा होता, की या कल्पना अशा लोकांच्या हाती जातील ज्या हजारोतरुणांना त्या सांगतील व त्यांच्यासोबत त्या राबवतील ज्याच्या कित्येक पट अधिक परिणाम होईल, जी वन्यजीवनासाठी काळाची गरज आहे जर आपल्याला ते वाचवायचे असेल.
या
वेबिनारमधील तीन शिक्षक वेगवेगळ्या प्रकारच्या
शाळांमधील होते
ही सुद्धा उत्तम बाब होती कारण संपूर्ण समाज वन्यजीवन संवर्धनामध्ये सहभागी व्हावा अशीच आपली इच्छा आहे. त्यातील श्रीमती भावना मॅडम या सिम्बॉयसिस, किवळे येथील कनिष्ट महाविद्यालयाच्या
मुख्याध्यापिका
आहेत, श्रीमती विनिता या मिलेनियम स्कूल, कोथरुड येथील आहेत तसेच श्रीमती अँटोनेटे या सर्वात जुन्या कॉन्व्हेंटपैकी
एक मानल्या जाणाऱ्या सेंट जोसेफच्या मुख्याध्यापिका
आहेत. यातील सर्वोत्तम बाब म्हणजे, या तिन्ही संस्थांच्या आवारात भरपूर झाडे लावलेली आहेत व हिरवाई
आहे.
त्याचशिवाय
श्रीमती भावना या चंद्रपूरच्या आहेत जेथे ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्यांचा शहरी वन्यजीवनाशी संपर्क आला आहे. इथे
मला तुम्हाला सांगावेसे वाटते की वन्यजीवन संवर्धन व या हेतूने प्रत्येक नागरिकाला वैयक्तिक जबाबदारीविषयी जागरुक करण्यातील सर्वात मोठी अडचण म्हणजे बहुतेक विद्यार्थी तसेच मोठ्यांचाही कधीच खऱ्या अर्थाने वन्यजीवनाशी संपर्क आलेला नसतो. म्हणूनच वन्यजीवन म्हणजे काय हे त्यांना समजून सांगणे प्रामुख्याने अवघड असते. दुर्दैवाने आपल्या देशामध्ये चांगल्या शिक्षणाची व्याख्या म्हणजे ज्यामुळे तुम्हाला चांगले गुण मिळतात, तसेच नंतर तुम्हाला चांगले पैसे मिळवण्यासाठी या
गुणांचा उपयोग
होतो. त्यामुळे शिक्षणाच्या या व्याख्येमध्ये वन्यजीवन बसत नाही,किमान सध्याच्या स्थितीत तरी बसत नाही. वन्यजीवनाचा विचार विद्यार्थ्यांमध्ये
रुजवताना शिक्षकांना ही मुख्य समस्या जाणवते.
तिन्ही
शिक्षिकांनी त्यांचे विचार मांडले तसेच वन्यजीवनाविषयी
विद्यार्थ्यांना
जागरुक करण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत हे सांगितले, यामध्ये जवळच्या
वन्य परिसरातील छोट्या
क्षेत्र सहली, तसेच निसर्गाशी संबंधित प्रकल्प, विद्यार्थ्यांसाठी
वन्यजीव तज्ञांची व्याख्याने आयोजित करणे तसेच संस्थेच्या आवारामध्ये देशी झाडांची लागवड करणे यांचा समावेश होतो. तरीही त्याचवेळी त्यांनी मान्य केले की वन्यजीवन संवर्धनासाठी केले जाणारे प्रयत्न किंवा पुढाकार जास्तीत जास्त विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांपर्यंत विस्तारणे आवश्यक आहे हेदेखील या सगळ्यांना पटले. त्यासाठी या शिक्षकांनी जंगल बेल्सकडून सूचना घेण्याची तसेच वन्यजीवनाशी संबंधित स्वयंसेवी संस्थांना सहकार्य करण्याचीही तयारी दाखवली कारण एकत्रितपणे उद्दिष्ट साध्य करणे अधिक सोपे होईल, हा महत्त्वाचा मुद्दा होता. अनेक व्यावसायिकदृष्ट्या
यशस्वी कंपन्याचा वन्यजीवनासंदर्भात
नकारात्मक दृष्टिकोन असताना या पार्श्वभूमीवर शिक्षकांनी वन्यजीवन संवर्धनाबाबत दाखवलेली तयारी अतिशय महत्त्वाची आहे, जे मी स्वतः खूप अनुभवले आहे. बहुतेक व्यावसायिक कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तीवर किंवा गर्दी खेचणाऱ्या एखाद्या कार्यक्रमाला प्रायोजित करताना अगदी आनंदाने सढळ हाताने खर्च करतात. परंतु जेव्हा वन्यजीवनाशी संबंधित खर्च करायचा असतो तेव्हा त्यांच्याकडे खर्च न करण्यासाठी शेकडो कारणे असतात किंवा ते सरळ टाळतात. मला असे वाटते की हे वन्यजीवन
संवर्धकांचे
अपयश आहे, कारण आपण (मी जाणीवपूर्वक
माझा या वर्गामध्येच
विचार करतोय),
कारण आपण वन्यजीवन
महत्त्वाचे
आहे व त्याचे संवर्धन
करतानाही
पैसे मिळू शकतात व वन्यजीवनावर
लक्ष केंद्रित
करून त्यासोबतच
पैसे कमावणे गैर नाही हे लोकांना
पटवून देण्यात
अपयशी ठरलो आहोत. इथेच या शैक्षणिक संस्था बदल घडवू शकतात, कारण जर वन्यजीवन हा अभ्यासक्रमाचाच
एक भाग झाला व चांगले गुण मिळवण्यामध्ये त्याचाही समावेश करण्यात आला तर ते विद्यार्थ्यांसोबतच
राहील. ते आपापल्या व्यवसायामध्ये जेव्हाभरपूर पैसे मिळवतील तेव्हा कालांतराने त्यातील काही भाग हा वन्यजीवनातून संवर्धन येऊ शकतो, वन्यजीवनासाठी थोडा वेळ दिला तरीही काही हरकत नाही.आणि यासाठीच, या तिन्ही शिक्षकांनी शिक्षणाच्या प्रत्येक पातळीवरील अभ्यासक्रमामध्येच
वन्यजीवनाचा समावेश केला पाहिजे याबद्दल सहमती दर्शवली. मग ते प्राथमिक शिक्षण असो, माध्यमिक
शिक्षण असो किंवा कनिष्ट महाविद्यालय असो, त्यासाठी
शाखा किंवा तुकडी असा भेद केला जाणार नाही. त्यासाठी आधी आपण शिक्षकांना प्रशिक्षित करून वन्यजीवन म्हणजे काय हे त्यांना समजावून सांगणे आवश्यक आहे, ज्याविषयी
वेबिनारमध्ये चर्चा करण्यात आली.
या संदर्भात
जंगल बेल्ससारख्या संघटना व शैक्षणिक संस्था वन्यजीवन संवर्धनासाठी संघटितपणे कार्य करू शकतात.
सध्या वन्यजीवनाच्या
तीन वर्गवाऱ्या
आहेत, एक म्हणजे शहरी वन्यजीवन, दुसरे म्हणजे ग्रामीण
वन्यजीवन
व तिसरे म्हणजे जंगलातील
किंवा प्रत्यक्ष
वन्यजीवन.
प्रत्येक
शिक्षकाने
या तिन्ही वन्यजीवनाचा
अनुभव घेतला पाहिजे व नंतर हा अनुभव प्रत्येक
विद्यार्थ्यापर्यंत
पोहोचवला
पाहिजे. शहरी वन्यजीवन म्हणजे शहरांमध्ये किंवा गावांमध्ये किंवा भोवताली झाडांची व प्राण्यांची (पक्ष्यांची) जैवविविधता, उदाहरणार्थ पाषाण टेकडी जी सेंट जोसेफ शाळेच्या शेजारी आहे. तसेच सिम्बॉयसिस, किवळे व मिलेनियम शाळेने जे काही घनदाट वृक्षारोपण केले आहे ते देखील उद्याचे शहरी वन्यजीवनच आहे. पुणे-पिंपरीचिंचवड महानगरपालिकेच्या
हद्दीमध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत जी पाहिली पाहिजेत म्हणजे आपल्या परसदारी आपल्याला कशाचे संवर्धन करायचे आहे हे आपल्याला समजेल. त्यानंतर ग्रामीण वन्यजीवन म्हणजे गावे व शहरांच्या भोवताली असलेली जैवविविधता उदा. पुण्याच्या बाह्यभागात अग्नेयेला असलेली कुरणे किंवा मुळशी (पश्चिम घाट) भागातील देवराया व झाडे-झुडुपे व यामध्ये शेतजमीनींचाही समावेश होतो. या वन्यजीवन अधिवासांविषयी तथ्ये (म्हणजेच त्यांना असलेले धोके) जाणून घेण्यासाठी एका दिवसाच्या क्षेत्र सहली किंवा रात्रभर निवासाच्या सहली आयोजित करता येतील. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे जंगलातील किंवा प्रत्यक्ष वन्यजीवन ज्याला सामान्य माणूस व्याघ्र प्रकल्प किंवा जंगले म्हणून ओळखतो. जेथे तुम्ही मोठे हिंस्र प्राणी पाहू शकता कारण वाघ वाचवा असे म्हणणे किंवा सुरक्षितपणे वाहनात बसून त्याची छायाचित्रे काढणे सोपे आहे. परंतु त्या वाघांच्या सान्निध्यात राहणाऱ्यांचे व त्यांच्या खडतर जीवनाचे काय, तुम्ही
जोपर्यंत ते समजून घेत नाहीतोपर्यंत तुम्ही त्याचे जतन कसे कराल किंवा सुरक्षित कसे ठेवाल ! याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे जंगलाशेजारील शाळांमधील विद्यार्थी (उदाहरणार्थ ताडोबा, मेळघाट) व पुण्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची देवाणघेवाण करणे.
मला माहिती आहे की हा जरा जास्तच कल्पनाविलास
झाला. परंतु त्याविषयी
आवर्जून
विचार करा, जर आपण विदेशातील
विद्यार्थ्यां
ची त्यांची
संस्कृती
जाणून घेण्यासाठी
देवाणघेवाण
करू शकतो तर त्याचप्रकारे
आपली स्वतःची
जंगले समजून घेण्यासाठी
असाच प्रयोग करायला काय हरकत आहे, नाही का? योग्य लोकांच्या पाठिंब्याने व योग्यप्रकारे झाले तर हे निश्चितपणे करण्यासारखे आहे. केवळ आपण त्याचे नियोजन योग्यप्रकारे केले पाहिजे, आणि हो पालकांना विश्वासात घ्या, तेसुद्धा काहीवेळा त्यांच्या मुलांसोबत येऊ शकतात. हा वर्षभर राबवला जाणारा कार्यक्रमच असला पाहिजे असे नाही तो उन्हाळ्याच्या किंवा हिवाळ्याच्या सुट्ट्यांमध्येही
राबवला जाऊ शकतो. शहरी विद्यार्थ्यांना
प्रत्यक्ष जंगलामध्ये राहणाऱ्यांच्या
अडचणी व आव्हाने समजावीत व तरीही त्यांना वन्यजीवनाविषयी
प्रेम वाटावे हे यामागचेउद्दिष्ट
असले पाहिजे.शिक्षण व वन्यजीवनाची याप्रकारे सांगड घालणे व यासंदर्भात इतरही अनेक मुद्द्यांविषयी
चर्चा करण्यात आली. वैयक्तिक पातळीवर सांगायचे तर वेबिनारची सांगता अतिशय सकारात्मक व आशादायी चर्चेने झाली. एकत्रितपणे काम करण्यासाठी अशाप्रकारचे आणखी उपक्रम राबण्याचा निश्चय करण्यात आला. मला असे वाटते यातच वन्यजीवनाचे हिरवे व उज्ज्वल भवितव्य आहे!
संजय देशपांडे, हेमांगी वर्तक , आरती कर्वे , अनुज खरे
जंगल बेल्स व संजीवनी ग्रुप .
ईमेल आयडी - smd156812@gmail.com
PH –
09822037109
तुम्हाला थोडा मोकळा वेळ मिळाल्यास कृपया खाली दिलेल्या यूट्यूबच्या दुव्यावर ताडोबाच्या यशोगाथेविषयीचे सादरीकरण पाहा..
No comments:
Post a Comment