Friday, 14 June 2024

ताडोबा नावाचे इच्छापूर्तीचे झाड, भाग १ !!






























ताडोबा नावाचे इच्छापूर्तीचे झाड, भाग १ !!

जंगल हे असे ठिकाण आहे जे तुम्हाला दररोज, नवीन प्रकारे आश्चर्यचकित करतेमी.


भारतीय पुरणांमध्ये अनेक विस्मकारक व अद्भुतरम्य गोष्टी आहेत, ज्यामध्ये अनेक रोचक प्राणी किंवा गोष्टींचा समावेश होतो. त्यापैकी एक म्हणजे, “कल्पवृक्ष, तुम्ही ह्या वृक्षाच्या छायेत बसल्यास तो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. मला अशा गोष्टी फार आवडतात एक म्हणजे आपल्या पूर्वजांच्या अनुभवातून त्या येतात जे आपले विज्ञान कदाचित मान्य करणार नाही किंवा आपल्या तथाकथित तर्कशुद्ध विचार करणारे मन ते स्वीकारणार नाही. तरीही अशा अनेक गोष्टी आहेत ज्या विज्ञानाला अजून समजलेल्या नाहीत व तुम्ही या चमत्काराला किंवा वस्तुला काहीही नाव देऊ शकता, परंतु तुम्हाला हे गूढ अनुभवायला मिळेल. आता तुम्ही बुचकळ्यात पडला असाल की ही शब्दांची रेलगाडी कोणत्या दिशेने जात आहे. तर ती ताडोबाविषयी आहे, ज्यामुळे मला जणू कालची जादू अनुभवता आली..!! असे पाहिले तर मी प्रत्येक वेळी जंगलात जाताना काहीतरी इच्छा सोबत घेऊन जातो व बहुतेकवेळा जंगल माझी ती इच्छा पूर्ण करते. मी खरोखरच सांगतो, की मी हावरट नाही कारण जंगलात अनेकदा जाऊन आल्यामुळे मी संयम शिकलो आहे, तरीही एकाच सफारीमध्ये तुम्ही तुमच्या इच्छांच्या यादीतून कशाची पूर्तता झाली यावर खूण करायला सुरुवात करता. प्रत्येक सफारीच्या वेळी, माणसाच्या मनात हाव निर्माण होते व आश्चर्य म्हणजे माझ्या यावेळच्या भेटीमध्ये जंगलाने माझी हाव सुद्धा पूर्ण केली व माझ्या यादीतील इतरही बऱ्याच इच्छा पूर्ण करता आल्या, त्यामुळे काही काळ तरी माझी कोणतीही इच्छा शिल्लक राहिली नव्हती, म्हणून माझ्या कोण-कोणत्या इच्छा पूर्ण झाल्या याच्या गोष्टी येथे सांगत आहे...


इच्छापूर्ती १. खेळाच्या पहिल्या मिनिटातच गोल.

मी जंगलात अनेकदा वाघ पाहिले आहेत. तरीही जेव्हा तुम्हाला वाघ आजूबाजूला असल्याचे जाणवते तेव्हा तो थरारक अनुभव असतो. मी जेव्हा प्रवेशद्वारापाशी वाघाविषयी गोष्टी ऐकल्या, तेव्हा मलाही असे वाटत होते की जंगलाच्या प्रवेशद्वारापाशीच कधीतरी मला वाघ दिसावा. यावेळी ताडोबाच्या अलिझांझा बफर क्षेत्रामध्ये, अर्थात मला प्रवेशद्वारापाशी काही वाघ दिसला नाही. परंतु आमच्या चालकाने जवळीलच पाणवठ्यावर तपासायचे ठरवले जे प्रवेशद्वारापासून जेमतेम शंभऱ मीटरवर होते, तिथे काही हालचाल दिसते आहे का हे पाहायचे होते. आमच्या जिप्सीने ज्याक्षणी वळसा घेतला व पाणवठा दृष्टीपथात आला तेव्हा एक वयात येऊ घातलेला एक वाघ तेथे बसून आमच्याकडे पाहात होता. जणूकाही तो आम्हाला विचारत असावा, ३ वाजले का?” (दुपारच्या सफारीमध्ये प्रवेशाची वेळ). मला जंगलामध्ये एवढ्या लवकर वाघ दिसण्याची ती पहिलीच वेळ होती, म्हणजे प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर एक मिनिटात तो दिसला होता. हे म्हणजे एखादा फुटबॉलचा सामना सुरू झाल्यानंतर पहिल्याच मिनिटाला लगेच गोल पाहायला मिळण्यासारखे होते व माझी एक इच्छा पूर्ण झालेली होती!


इच्छापूर्ती २. पाण्यात ही कोण आहे, जी माझ्याकडे बघतेय?


माझी ही बऱ्याच काळापासूनची इच्छा होती, कारण प्रत्येक वेळी मला जेव्हा कधीही वाघ (किंवा बिबट्या) पाणी पिताना किंवा त्याचे प्रतिबिंब असलेले पोस्ट दिसे तेव्हा, दिसे, मला असे वाटायचे मला या दृश्याचे छायाचित्र काढायला मिळाले नाही तरी ते किमान पाहायला मिळेल का. कारण तुम्ही जेव्हा प्रतिबिंबाचा उल्लेख करता तेव्हा पाणी अगदी स्वच्छ व स्थिर असले पाहिजे, त्याचप्रमाणे प्रकाशाचीही त्यामध्ये महत्त्वाची भूमिका असते. वाघ पाण्यामध्ये शिरून पाणी पिण्यापूर्वीच हे शक्य असते कारण त्यानंतर पाण्यावर उठणाऱ्या तरंगांमुळे प्रतिबिंब हलते. जंगलामध्ये जिथे वाघच नशीबाने दिसतो तिथे वर नमूद केलेल्या सर्व बाबींची पूर्तता होणे किती अवघड आहे याची कल्पना तुम्ही करू शकता. परंतु या सफारीमध्ये जवळपास अशक्य गोष्ट झाली. ती देखील त्याच सफारीमध्ये ज्यामध्ये माझी पहिली इच्छा पूर्ण झाली होती. आम्ही पाणवठ्यापाशी वाट पाहात होतो, जेथे आम्हाला वयात येऊ घातलेला एक बछडा पाहिला व त्याचा भाऊही आजूबाजूला असावा तो तिथे त्याच्यासोबत पाणवठ्यावर येईल असे वाटल्याने आम्ही ही संधी घ्यायचे ठरवले. अचानक काही दूर अंतरावर, हरिणांचे इशारा देणारे चित्कार ऐकू येत आले ज्यामुळे बछड्यांची आई तिथे असावी असे आम्हाला वाटले व आम्ही त्या इशाऱ्यांचा माग घ्यायचे ठरवले. त्या इशाऱ्यांमुळे आम्ही काही किलोमीटर अंतरावर एका पाणवठ्यापाशी येऊन ठेपलो, जेथे पाणी अतिशय स्थिर होते व बऱ्याच पक्ष्यांची लगबग सुरू होती. तिथे एक सांबर व माकडांचा कळप पाणवठ्यापाशी वाट पाहात होता परंतु त्यामध्ये प्रवेश करत नव्हता, याचाच अर्थ जवळपास वाघ होता. म्हणूनच आम्ही थांबायचे ठरवले, मधल्या काळात सांर हरिणाने इशारा देणारा चित्कार केला, म्हणजे त्याला वाघ दिसला होता, जे आमच्या शहरी डोळ्यांना टिपता आले नव्हते. पुन्हा एकदा आम्ही अवतभोवती पाहिले, तर बांधाच्या मागे झुडपामद्धे एक वाघीण गाढ झोपलेली होती असे आमच्या गाईडने सांगितले व अतिशय प्रयत्नपूर्वक मलाही ती दिसली. त्या पाणवठ्यावरील बछड्यांची आई मागे राहिलेली नव्हती तर ही झरनी नावाची दुसरी वाघीण होती व ती अतिशय लाजाळू होती. त्यामुळे त्याने आम्हाला सज्ज राहायला सांगितेले कारण ती पाणवठ्यावर आल्यानंतर फोटो काढायला केवळ काही मिनिटांचाच काळ मिळणार होता व आम्ही थांबायचे ठरवले. तासभऱ होऊन गेला, आम्ही अतिशय संयमाने सांर व माकडांसोबत वाट पाहात होतो व अचानक बांधाच्या कडेला असलेल्या झुडुपांमधून शांतपणे एक चेहरा दिसला वाघीण थेट बांधावर आली, तिला पाण्याकडे पाहिले व काही घोट पाणी प्यायली, त्यानंतर बांधावरून चालत जाऊन ती काही मिनिटे पाण्यात बसली व त्यानंतर दाट झुडुपांमध्ये दिसेनासी  झाली !

ती पाच मिनिटे मला माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी पुरेशी होती, तरीही त्यामध्ये एक लहानशी अडचण होती. माझ्या जागेपासून वाघीणीच्या चेहऱ्याच्या प्रतिबिंबाच्या सरळ रेषेमध्ये गवताचा एक लहानचा पट्टा येत होतात, तरीही एकूण चांगला परिणाम साधला गेला. मी ते प्रतिबिंब दिसणारा एक व्हीडिओही काढला. आशारीतीने एकाच सफारीमध्ये दुसरी इच्छा पूर्ण झाली होती व अशाचवेळी थोडीफार माहिती व संयम कामी येतो. कारण आम्ही प्राण्यांचे इशारा देणारे आवाज ऐकले नसते व सांर हरिणाच्या इशाऱ्याचा आदर केला नसता व संयम राखला नसता; तर हे शक्य झाले नसते व अर्थातच थोडी नशीबाचीही साथ होती!


इच्छापूर्ती . प्रत्यक्ष शिकारीचा साक्षीदार!


खरेतर, जेव्हा कुणीही वाघाने हरिणाला किंवा रानडुकराची शिकार केली असे म्हणते किंवा वाघाच्या अन्नाचा उल्लेख शिकार असा करून, चला वाघ्यांनी केलेल्या शिकारीवर जाऊयात असे म्हणते तेव्हा मला अतिशय विचित्र वाटते. आपण एखाद्याच्या अन्नाला शिकार कसे म्हणू शकतो, विचार करा आपण केएफसीला गेलो किंवा एखाद्या मांसाहारी भोजनालयात गेलो तर आपण त्या शिकारच्या ठिकाणी जाऊयात असे म्हणायला सुरुवात केली तर किती विचित्र वाटेल, नाही का? वाघाला त्याच्या अन्नासाठी एखाद्या जिवंत प्राण्याला मारावे लागते, कारण त्याच्यासाठी त्या प्राण्याची शिकार दुसऱ्या कुणीतरी करण्याची व ते शिजवून त्याला खाऊ घालण्याची सोय त्याला नाही. तरीही आपण वाघाच्या शिकारीचा उल्लेख करताना काही वेगळा शब्द वापरू शकतो असे मला वाटते. प्राण्यांचे जीवन जे वाघाचे भक्ष्य बनते त्याविषयी पूर्णपणे आदर राखत मला वाघ कसा शिकार करतो हे पाहायचे होते. मी वाघांना त्यांची शिकार खाताना पाहिले आहे, परंतु प्रत्यक्ष शिकार करताना व शिकारीनंतर काय होते हे मी पाहिलेले नव्हते. सफारीमध्ये अशाच एक परतीच्या प्रवासात प्रवेशद्वाराकडे माघारी जाताना आम्ही एक मोठे रानडुक्कर पाहिले, ते रस्त्याच्या बाजूला असलेल्या गवताच्या पट्ट्याच्या कडेला उभे होते. आमच्या ड्रायव्हरने विचारले, ‘सर अतिशय जवळ आहे, फोटो घ्यायचा का?” परंतु उशीर होत असल्यामुळे, मी थांबायची गरज नाही, आपण पुढे जाऊ या असे सांगितले, त्यामुळे आम्ही रानडुकराच्या पुढे गेलो. जेमतेम काही पावले पुढे गेलो असू, तेवढ्यात आम्हाला मागून एक कर्कश्श किंकाळी ऐकू आली. ती नक्कीच त्या रानडुकराची होती, तो वेदनेने विव्हळत होता. म्हणजेच रानडुकावर बहुतेक वाघानेच हल्ला केला असावा. मी जिप्सीमध्ये मागे वळलो, आश्चर्य म्हणजे एका वाघीणीने रानडुकरावर झडप घातली होती व त्याचा गळा पकडला होता. आम्ही तात्काळ जिप्सी मागे वळवली, कारण वेळ अतिशय कमी होता व प्रकाश हळूहळू कमी होत चालला होता. तरीही गवतामध्ये आम्ही पाहिले की वाघिणीने त्या रानडुकराला गळयापाशी  घट्ट धरून ठेवले होते व तो जीव वाचवण्यासाठी शेवटची धडपड करत होता. हे सर्व काही सेकंदांमध्ये घडले व मी जंगलातील जीवनाची अनिश्चितता अनुभवली. आम्ही त्या रानडुकराला मागे टाकून पुढे जात असतात ती वाघीण तिच्या जवळच असलेल्या गवताच्या पट्ट्यामध्ये नक्कीच दबा धरून बसली असली पाहिजे व आम्ही रानडुकराची छायाचित्रे काढण्यासाठी थांबलो असतो तर मला प्रत्यक्ष वाघीण त्याच्यावर हल्ला करतानाची छायाचित्रे काढता आली असती किंवा कदाचित तिने वाट पाहिली असती व त्या रानडुकराचा जीव वाचला असता. पण या सगळ्या जर-तरच्या गोष्टी होत्या, तात्पर्य म्हणजे वाघ शिकार कसा करतो हे मला पाहयला मिळाले होते. आम्ही सकाळी परत यायचे ठरवले कारण ते रानडुक्कर अतिशय मोठे होते व वाघीण नक्कीच त्याच्या अवती-भोवती असली असती किंवा शिकार ओढत एखाद्या सुरक्षित ठिकाणी नेली असती. यामुळे मला माझ्या यादीतील चौथी इच्छा त्याच ठिकाणी पूर्ण करता आली.

इच्छापूर्ती ४. शिकारीनंतरची धडपड !


मी नमूद केल्याप्रमाणे आदल्यादिवशी संध्याकाळी त्या वाघीणीने मोठ्या रानडुकराची शिकार केली होती व ती शिकारीच्या जवळपासच असण्याची शक्यता होती, त्यामुळे ती अन्न (माफ करा, शिकार) कसे हाताळते हे मला पाहायची इच्छा होती. आम्ही सकाळी त्या जागी परत गेलो (दरम्यानच्या काळात माझी पाचवी इच्छा पूर्ण झाली होती, त्याची गोष्ट मी पुढे सांगेनच). आम्हाला काही वाहने रस्त्यावर वाट पाहताना दिसेली, इथे रस्ता अरुंद होता व एका बाजूला केवळ जिप्सी लावणे शक्य होते. परंतु आमचा चालक व गाईड अतिशय अनुभवी होते व त्यांनी गवताळ पट्ट्याच्या विरुद्ध बाजूला वाट पाहायचे ठरवले जेथे काल संध्याकाळी आम्ही शिकार पाहिली होती.
ते म्हणाले, ती जागा व आम्ही जेथे उभे होतो त्याच्या मधोमध पाणवठा होता व वाघीण रानडुकराचे धड पाण्याजवळ ओढत नेण्याचा प्रयत्न करेल कारण त्यामुळे त्याचे मांस थोडे नरम होईल. नेमके तसेच घडले, वाघीणीने त्या रानडुकराचे धड गवतातून ओढत बाहेर काढले व जवळच असलेल्या पाण्याच्या डबक्यात टाकले. त्यानंतर आमचा चालकाने सांगितले, ती आता परत जाईल, थोडा वेळ विश्रांती घेईल कारण वाघीणीला या कामामुळे श्रम झाले होते. त्यामुळे तिला विश्रांतीची तसेच मांस नरम होण्यासाठी वेळ हवा होता म्हणून आता आपण परत त्या ठिकाणी जाऊ. तोपर्यंत दुसरी वाहने तिथून निघाली होती व आम्ही आमची जिप्सी बाजूला लावली व वाट पाहिली. काही वेळाने वाघीणी ताजी-तवानी होऊन बाहेर आली व पाण्यामध्ये टाकलेल्या तिच्या शिकारीकडे गेली व पुन्हा ती बाहेर काढली व पाणवठ्या पलीकडे असलेल्या गवताच्या दुसऱ्या पट्ट्याकडे ती ओढत नेली. मला ही संपूर्ण प्रक्रिया तपशीलाने पाहता आली (व छायाचित्रे काढता आली), उदाहरणार्थ जेव्हा वाघ शिकार घेऊन जात असताना, ओढत असताना, किंवा शिकारीचे धड उचलत असताना वाघाची शेवटी कशाप्रकारे आधार म्हणून काम करते व त्यामुळे शिकार ओढत नेल्याचा माग काढता येत नाही, त्यामुळे मेलेल्या प्राण्यांवर जगणारी श्वापदे अथवा पक्षी त्यांच्या मागे जाऊ शकत नाहीत, असे चोख काम करण्यात आले होते व ते पाहण्याची आणखी एक इच्छा पूर्ण झाली होती!

इच्छापूर्ती ५. मी इतका नशीबवान कसा झालो !

बऱ्याच दिवसांपासून आणखी एक इच्छा होती ती म्हणजे, एक नर वाघ त्याच्या अधिवासाच्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळावा व डोळ्यांच्या पातळीवर त्याचे संपूर्ण रूप न्याहाळता यावे (छायाचित्रे घेता यावीत). ही देखील, महत्वाकांक्षी इच्छा होती, कारण नर वाघाचे कार्यक्षेत्र वाघिणीपेक्षा पाचपट व्यापक असते व तो जंगलामध्ये कुठेही असू शकतो. तरीही जंगल तुम्हाला काही वेळा आश्चर्यचकित करते व तुम्ही आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन ही म्हण अनुभवता. ताडोबामध्ये आम्ही आमच्यासमोर कॉलरवाली रानडुकराची शिकार करताना पाहिले होते (ही दुसरी गोष्ट आहे) परंतु तेव्हा संध्याकाळी उशीर झाला होता व आम्हाला पुन्हा प्रवेशद्वारापाशी पोहोचणे आवश्यक होते, त्यामुळे आम्ही तिथून निघालो. सकाळी सर्वप्रथम त्या ठिकाणी जाणार होतो कारण आमच्याकडे त्याच झोनचे आरक्षण होते.
आम्ही मोहर्ली येथील एमटीडीसी रिसॉर्टच्या मागे असलेल्या जुनोना गवताळ प्रदेशात पोहोचलो, आम्ही एक वाघ शिकारीपासून लांब चालत जाताना पाहिले. आम्हाला वाटले की वाघीणीने जवळपास आसरा घेतला असावा. परंतु चालत जाणाऱ्या वाघाचा आकार आम्ही आदल्या दिवशी संध्याकाळी पाहिलेल्या वाघापेक्षा बराच मोठा होता. तरीही आम्ही वाहन मागे वळवण्याचे ठरवले व आम्ही कुरण पार करून अगदी वेळेत त्याच्या जवळ पोहोचलो तेव्हा वाघ आमच्या समांतर चालत होता. आश्चर्य म्हणजे तो एक मोठा नर वाघ होता, त्याचे नाव होते छोटा दढियाल, त्याने ती शिकार ओढत आणली असावी कारण कारण हा त्याचा प्रदेश होता व त्याचा कॉलरवाली वाघीणीशी समागम सुरू होता. त्याचे ते महाकाय शरीर पाहणे हा अवर्णनीय अनुभव होता. जिप्सी गाडी पळत असल्यामुळे व वाघही त्याच्या वेगाने चालत असल्यामुळे (व माझ्या यथा-तथा छायाचित्रण कौशल्यामुळे) सुस्पष्ट छायाचित्र मिळणे नेहमी अवघड असते, तरीही त्याला पाहणे हा एक अतिशय आनंददायक अनुभव होता. आम्ही त्याला शोधतही नसताना आम्हाला तो दिसला हा सर्वात मोठा आश्चर्याचा भाग होता, परंतु ताडोबा हे असेच आहे, आश्चर्यांनी भरलेले!


त्याशिवाय, अजूनही काही जंगलातील माझ्या इच्छा पूर्ण झाल्या, परंतु त्याविषयी दुसऱ्या लेखात लिहीन, नाहीतर माझ्या लेखाचे वाचन थांबवण्याची इच्छा तुम्हाला होईल. प्रत्येकाची इच्छा पूर्ण होत असताना मी हे शिकलो की, जंगलामध्ये तुम्ही अगदी लहानशा तपशीलाचा आदर केला पाहिजे व हे घटनाक्रम लक्षात ठेवून सफारीचे नियोजन केले पाहिजे, तसेच चालक व गाईडच्या अनुभवाता आदर केला पाहिजे. कारण दूरवरून येणाऱ्या इशारे देणाऱ्या आवाजांकडे आम्ही लक्ष दिले नसते, कर आम्ही झरणी वाघीण जिथे झोपली होती तिथे पोहचलो नसतो, त्याच वेळी तुमचा गाईड काय सांगतो ते ऐकणेही महत्त्वाचे असते, कारण या लोकांना प्राण्यांच्या हालचाली माहिती असतात. विशेषतः वाघ हा सवयींनी बांधलेला प्राणी आहे व सामान्यपणे ठरलेल्या मार्गानेच जातो. त्याशिवाय नशीबाचा भागही असतो, परंतु त्या नशीबाची चाचणी घएण्यासाठी तुम्ही जंगलाला भेट देणे आवश्यक आहे, बरोबर? माझे नशीब पुन्हा लवकरच आजमवण्याचे आश्वासन देऊन व इच्छांची नवीन यादी तयार करण्यासाठी स्वतःला थोडा वेळ द्यायचे ठरवून मी अतिशय समाधानाने व असंख्य आठवणी घेऊन ताडोबातून बाहेर पडलो!


संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स

कृपया पुण्यात हक्काचे घर/ऑफिस शोधण्याबाबतचे माझे शेअरिंग खालील YouTube लिंकवर पहा आणि आवडल्यास शेअर करा..

https://youtu.be/27j3I3rwGPQ?si=-ODYBxVI2Dl_C345





Wednesday, 29 May 2024

"शहर, रस्त्यावरील अपघात व मामाचे पत्र खेळ !!










































"शहर, रस्त्यावरील अपघात व मामाचे पत्र खेळ!!

 सरकारमध्ये सहभागी होण्यास नकार देणाऱ्या शहाण्या लोकांना होणारी शिक्षा म्हणजे, वाईट व्यक्तींच्या शासनाखाली जगावे लागणे” … प्लेटो.

 अनेकांना वरील नाव माहिती नसेल परंतु तो एक महान विचारवेत्ता व ग्रीक तत्वज्ञ होता. त्याची विद्वत्ता तेव्हाही काळाच्या पुढे होती. अशा पुरुषांनी नेहमीच त्या अभिशापाची किंमत चुकवावी लागते, प्लेटोलाही लागली व त्याला आयुष्याचा उत्तरार्ध तत्कालीन रोमन सरकाराच्या बंदीवासात घालवावा लागला. शासनकर्ते प्लेटोकडे नेहमी शंकेने बघत कारण त्यांना अशी भीती वाटत असे की त्याच्या तत्वज्ञानामुळे व ज्ञानामुळे नागरिकांना त्यांच्या हक्कांची जाणीव होईल, जे कुणाही शासनकर्त्याला आवडत नाही. गंमत म्हणजे काही हजार वर्षांनंतरही परिस्थिती बदललेली नाही, अर्थात आपल्याकडे आत्ता  भोवताली फारसे प्लेटो नाहीत ही वस्तुस्थिती आहे. लेखाची अशी तत्विक सुरुवात करण्याचे कारण म्हणजे एक घटना (अपघात) जो आता राष्ट्रीय मुद्दा झाला आहे व समाज माध्यमांचे आभार मानले पाहिजेत, की हा मुद्दा कदाचित आंतरराष्ट्रीय मुद्दाही होईल. पुण्यामध्ये नुकत्याच झालेल्या एका घटनेत अल्पवयीन मुलगा दारुच्या नशेत गाडी चालवून, दुचाकीवर जाणाऱ्या दोन व्यक्तींना धडकल्याने त्या व्यक्तींचा जीव गेला. प्रत्येक प्रकारातील सर्व माध्यमांमध्ये (सोशल मीडिया सुद्धा) या घटनेशी संबंधित अनेक बातम्या देण्यात आल्या. या घटनेविरोधात आवाज उठवणाऱ्यांमध्ये अनेक बड्या व्यक्ती सहभागी झाल्या यात आश्चर्य नाही. अर्थात त्यांना ज्या व्यक्तींचा जीव गेला त्यांच्याविषयी फार काही सहानुभूती होती असे नाही तर त्यापैकी बहुतेकांना त्यांचे अस्तित्व जाणवून द्यायचे होते व बऱ्याच जणांनी या संधीचा वापर हिशोब चुकते करण्यासाठी पण केला. त्याचा हेतू काहीही असो, अगदी माझ्या लेखाचा समावेशही यापैकी एका वर्गवारीत केला जाईल व असे झाल्यास मी त्याला दोष देणार नाही. परंतु एक लक्षात ठेवा ही निश्चितच अशाप्रकारची पहिली  शेवटची घटना नव्हती. परंतु आपल्याला भविष्यात अशाप्रकारची जीवितहानी टाळायची असेल, तर आपण त्यातून काय शिकणार आहोत? अपघातात मरण पावलेल्या तरुणांच्या पालकांविषयी अतिशय सहानुभूती वाटते कारण कोणत्याही शब्दांनी त्यांची मुले परत येणार नाहीत. हा लेख लिहीताना केवळ एकच इच्छा आहे की इथून पुढे एखाद्या मुलाचे आयुष्य वाचावे व कुणाही पालकांना अशा दुःखाला सामोरे जावे लागू नये. हे जो मुलगा पोर्शे चालवत होता त्याच्या पालकांनाही लागू होते, कारण तेदेखील पालक आहेत व दोषी असतील किंवा नसतील (म्हणजे बरोबर किंवा चूक) कुणाही पालकांना ते त्यांच्या मुलांना वाढवत असताना आपण काही चूक करतोय असे वाटत नाही. तरीही मुलांकडून चुका घडतात व त्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू होतात, हा माझ्या लेखाचा मुद्दा आहे. त्याचशिवाय, मी सुद्धा तरुण मुलांचा वडील आहे व मला या पिढीला हाताळताना येणाऱ्या समस्यांची व आपल्याला त्यांच्याकडून असलेल्या व समाजाला पालक म्हणून आपल्याकडून असलेल्या अपेक्षांची जाणीव आहे (असे मला तरी वाटते).

 ज्या व्यक्तींना या घटनेविषयी माहिती आहे ते या प्रस्तावनेकडे दुर्लक्ष करू शकतात, परंतु ज्यांना ही घटना माहिती नाही (जे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे) त्यांच्यासाठी सांगतो. १८ मे रोजी शनिवारी संध्याकाळी एका तरुण मुलाने त्याचा १२वीचा निकाल त्याच्या मित्रांसोबत साजरा केला, मद्यपान केले (जे या वयाची मुले सर्रास करताना दिसतात, ही कटू सामाजिक वस्तुस्थिती आहे) व त्याच्या वडिलांची उंची गाडी चालवली. याच गाडीने तो पार्टीसाठी आला होता. पुण्याच्या पूर्वेकडील उपनगरामध्ये तो गाडी चालवत असताना, त्याचे वेगावर नियंत्रण राहिले नाही व पहाटे ३च्या सुमाराला बाईकवरून चाललेल्या एका जोडप्याला तो धडकला, ते सुद्धा एका पार्टीतून परत येत होते. त्या जोडप्याचा जागीच मृत्यू झाला व गाडी चालवणाऱ्या मुलाला रस्त्यावरील जमावाने पकडले व थोडी मारहाण केल्यानंतर त्याला पोलीसांच्या हवाली केले.

 खरी गोष्ट येथून सुरू होते, हा मुलगा एका मोठ्या व्यावसायिकाचा (ते देखील बांधकाम व्यावसायिक) मुलगा होता, तो अल्पवयीन होता व त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नव्हता. कळस म्हणजे त्या उंची कारची आरटीओकडे नोंदणीही झालेली नव्हती किंवा तिच्यावर नंबरप्लेट नव्हती. पोलीसांनी गुन्हा दाखल केला व संबंधित दंड संहितेअंतर्गत कलमे लावली. अशाप्रकारच्या प्रकरणांमध्ये सामान्यपणे जे होते तेच येथे झाले. परंतु  इथून पुढे जे घडले त्यामुळे प्रचंड गदारोळ झाला, हा माझ्या लेखाचा विषय आहे. कारण यानंतर जे काही झाले त्यामुळे केवळ मरण पावलेल्या तरुण जोडप्याचे नातेवाईकच नव्हे तर संपूर्ण समाजाला धक्का बसला व ज्याप्रमाणे निर्भया प्रकरणामध्ये समाजामध्ये आक्रोश होता (काही वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये झालेली घटना) त्याचप्रमाणे तो या प्रकरणातही वाढत गेला. इन्स्टाग्राम, फेसबूक आणि ट्विटर यांचे आभार, कारण यावेळी या घटनेची इतकी चर्चा झाली की शेवटी देशाच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारालाही त्याची दखल घ्यावी लागली व त्यावर टिप्पणी करावी लागली. माननीय उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृह विभाग आहे त्यांना एक पत्रकार परिषद घ्यावी लागली. शहराचे माननीय पोलीस आयुक्त जे गुन्हे हाताळण्याच्या बाबतीत अतिशय कठोर अधिकारी मानले जातात त्यांना असे म्हणावे लागले, की पोलीसांनी गुन्हा नोंदवतांना लावलेली कलमे चुकीची असल्याचे आढळले तर ते जाहीरपणे माफी मागतील. व्वा, ही म्हणजे कमालच झाली. कुणालाही आश्चर्य वाटेल की ज्या शहरामध्ये जिथे दररोज चार-पाच लोकांचा अपघाती मृत्यू होतो तिथे या अपघाताने एवढे लक्ष का वेधले, हा माझ्या लेखाचा विषय आहे.

 या अपघाताने सर्वांचे लक्ष वेधण्याचे कारण म्हणजे, ज्याप्रकारे अपघातानंतर यंत्रणेच्या हालचाली झाल्या त्यामुळे मद्यपान केलेल्या तरुणाने मद्यपान केले नसल्याचे आढळून आले (वैद्यकीय चाचणीमध्ये,

आता तर अस समोर आलेय की डॉक्टरांनी ते रक्ताचे नमूनेच बदलले) त्यामुळे त्या मुलांच्या रक्त चाचणीमध्ये मद्याचा अंश आढळून आला नाही, परंतु समाज माध्यमांवरील रिल्समध्ये तो त्याच्या मित्रांसोबत रात्री उशीरापर्यंत एका परमिट रूममध्ये दारू पित असल्याचे आढळून आले आहे. जेव्हा पोलीसांनी त्या मुलाला बाल न्याय मंडळासमोर हजर केले. त्या दिवशी रविवार असूनही अटकेनंतर दोन तासात त्याला जामीन मंजूर झाला. जामीन मंजूर करताना माननीय न्यायालयाने त्या मुलाला अपघाताविषयी ३०० शब्दांचा निबंध लिहा, पंधरा दिवस आरटीओसोबत वाहतूक व्यवस्थापनासाठी काम करावे लागेल व समुपदेशन घ्यावे लागेल, त्याचशिवाय इतरही काही अटी घातल्या त्या अजून जाहीर झालेल्या नाहीत, त्यामुळे मी त्यावर टिप्पणी करू शकत नाही. त्यामुळे जो मुलगा दोन तरुणांच्या मृत्यूस कारणीभूत झाला, त्या तरुणांच्या कुटुंबांना त्यांच्या लाडक्या मुलांचे मृतदेह ताब्यात मिळण्याआधीच, त्याला जामीन मिळाला. जामीनासाठीच्या अटीही निबंध लिहीणे वगैरेसारख्या होत्या. या बातमीमुळे अभूतपूर्व आक्रोश निर्माण झाला, ज्याची कुणी कधीही अपेक्षा केली नसेल. मी "भारत छोडो" आंदोलन पाहिलेले नाही परंतु ते कसे असेल याची मी कल्पना करू शकतो. प्रत्येक मंचावरील प्रत्येक व्यक्तीच्या मनात एकंदरच यंत्रणेविषयी राग व आक्रोश होता, हा माझ्या लेखाचा विषय आहे!

 तर यंत्रणेने (म्हणजे सरकारने) असे काय चूक केले ज्यामुळे जनतेमध्ये एवढा आक्रोश होता. याचे उत्तर म्हणजे प्रत्येकाला ज्या तरुणांना अपघातात जीव गमवावा लागला त्यांच्याविषयी आपल्या कुटुंबाप्रमाणे सहवेदना होती. कारण या शहरात जवळपास चाळीस लाख दुचाकी आहेत, त्यामुळे प्रत्येक कुटुंबातील कुणी ना कुणी व्यक्ती दिवसातील कोणत्याही वेळी रस्त्यावरच असते. अशी अपघाताची घटना आपल्यासोबतही होऊ शकते, हे तथ्य पचवणे अवघड आहे. त्याशिवाय जे चित्र रंगवण्यात आले की त्या मुलाला अवघ्या काही तासात जामीन मंजूर झाला, प्रत्येकाचा सरकारी यंत्रणेशी (विशेषतः पोलीसांशी) संपर्क येतोच, तिथे सामान्य माणसाला कशी वागणूक मिळते हे सर्व जाणतात. मी हे पोलीस खात्यात माझे अनेक मित्र असूनही म्हणतोय जी चांगली माणसे व चांगले अधिकारी सुध्दा आहेत. तरीही पोलीसांची जनमानसात अशी प्रतिमा का आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे (हे बांधकाम व्यावसायिकांनाही लागू होते). त्यानंतर न्यायालयाने जो निकाल दिला त्याविषयी, सुविद्य माननीय न्यायाधिशांनी कायद्यातील तरतुदींप्रमाणेच निकाल दिला असेल, परंतु याच तरतूदी जेव्हा एखादा आरोपी सामान्य कुटुंबातील असतो तेव्हा का लावल्या जात नाहीत व या प्रकरणात एवढी घाई का करण्यात आली. अशाप्रकारच्या लाखो प्रकरणांमध्ये लोकांना कुप्रसिद्ध “तारीख पे तारीख” चा अनुभव घ्यावा लागतो, हे या आक्रोशामागचे आणखी एक कारण होते. या प्रकरणामध्ये खरी गंमत नंतर सुरू झाली ज्यामुळे मला आमच्या लहानपणी खेळला जाणारा एक खेळ आठवला, तो म्हणजे “मामाचे पत्र”. या खेळामध्ये (हा खेळण्यासाठी अगदी कमीत कमी साधने लागतात), सर्व खेळाडू सरळ एका रांगेत बसतात व ज्याच्यावर राज्य असते तो त्यांच्याभोवती धावत असतो, त्याच्या हाती एक कागदाचा किंवा कापडाचा तुकडा असतो व तो मोठ्याने “माझ्या मामाचं पत्रं हरवलं” असे म्हणत असतो व बसलेले खेळाडू “आम्हाला नाही सापडलं” असे उत्तर देत असतात, तो मुलगा ते पत्र बसलेल्या एखाद्या व्यक्तीच्या मांडीवर टाकत असे जो खेळातून बाद मानला जाई व इतरांनी दिलेले एखादे काम त्याला शिक्षा म्हणून करावे लागे. पुण्यातील घटनेनंतरही विविध संस्थांमध्ये (म्हणजे सरकारी) हाच खेळ सुरू झाला, त्या तरुणाला मद्य कुणी दिले इथपासून ते असे बार बंद होण्याच्या वेळेनंतरही कसे सुरू होते, तसेच पोर्शे गाडी नोंदणीशिवाय रस्त्यावर कशी होती, आरोपीला देण्यात आलेली अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसारखी वागणूक व मृत तरुण जोडप्याच्या पालकांचा चौकशी अधिकाऱ्यांकडून केला जाणारा छळ, म्हणजे ते जोडपे (जे मित्र होते) इतक्या उशीरा रात्री  का आणि कुठे चालले होते व त्यांचे एकमेकांशी काय नाते होते अशाप्रकारचे प्रश्न (मृताच्या नातेवाईकांनी सांगितल्याप्रमाणे) व यंत्रणेने इतक्या झटपट कारवाई कशी केली व त्या मुलाला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले व जामीन मिळाला; मला असे वाटते की यंत्रणा समाजाचा मूलभूत नियम समजून घेण्यात अपयशी ठरली, की जेव्हा न्याय समान वेगाने व पद्धतीने सगळ्यांना दिला जातो तेव्हाच तो जनतेला मान्य होतो, आणि तो न्याय पद्धतीने देण्यात आला असला तरीही तो एकाला वेगळा आणि दुसऱ्याला वेगळा गतीने दिला तर तो न्याय राहत नाही.  

आता संपूर्ण यंत्रणा त्यांनी कशी योग्यप्रकारे कारवाई केली आहे व दुसरा विभाग आपले कर्तव्य पार पाडण्यात कसे अपयशी ठरले हे दाखवण्याच्या मागे लागली आहे व सगळेच जण जणू काही  "मामाचे पत्र" हा खेळ खेळत आहेत. माझा मुद्दा असा आहे की हे सगळे कधी थांबणार आहे?

 आणि दररोज प्रत्येक वाहतूक सिग्नलला किंवा रस्त्यावर, याच शहराचे नागरिक वाहतुकीच्या प्रत्येक नियमाचे उल्लंघन करत असतात व नागरिकांना दोष द्यायचा असेल, तर पोलीस केवळ अशा प्रकारे बेदरकारपणे वाहने चालविणाऱ्या चालकांवर केवळ कठोर कारवाई करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे त्यांचे खांदे झटकू शकत नाहीत, हा माझ्या लेखाचा मुद्दा आहे. त्याचवेळी, आपल्याकडे प्रत्येक कायदा व यंत्रणा आहे परंतु त्या यंत्रणेशी संबंधित प्रत्येक घटकाला तिचे संरक्षण करण्याऐवजी तिचे उल्लंघन करण्यात किंवा तिला वाकविण्यात अभिमान वाटतो (व पैसेही घेतो), थोडक्यात सांगायचे तर संपूर्ण समाज समाजाप्रती स्वत:च्या  जबाबदारीविषयी डोळे, कान झाकून घेतो व त्यामध्ये या घटनेच्या निमित्ताने समाज माध्यमांवर सक्रिय असलेल्या बहुतेक व्यक्तींचाही समावेश होतो, किंबहुना आपण त्यासंदर्भात काय करणार आहोत, हा माझ्या लेखाचा विषय आहे!

 शेवटचा मुद्दा म्हणजे, ज्यामुळे मी अतिशय दुःखी झालो (म्हणजे कष्टी झालो, वैतागलो, चिडलो व अस्वस्थ झालो) ती म्हणजे मृत तरुणाच्या काकांनी दिलेली प्रतिक्रिया, “आपल्या तरुण मुलांना करिअरसाठी या शहरामध्ये पाठवावे किंवा नाही याबाबत आता आम्ही साशंक आहोत, जे त्यांच्यासाठी सर्वात सुरक्षित आहे असे आम्हाला वाटत होते!” लोकहो, ही प्रतिक्रिया व त्यामागच्या भावना या शहरातील प्रत्येकासाठी धोक्याचा इशारा आहेत ज्यांना या शहराने आपल्याला जी समृद्धी दिली आहे त्यातून लाभ मिळाला आहे. त्याशिवाय आपल्या केवळ आनंद साजरा करण्याच्या संकल्पनांचाच नव्हे तर एकूणच जीवनाविषयीच्या दृष्टिकोनाची नव्याने व्याख्या करण्याची वेळ आली आहे. एक लक्षात ठेवा, अमेरिका अतिशय समृद्ध देश असेल, परंतु नागरिकांच्या आनंदाच्या मोजपट्टीवर भूतानने अमेरिकेलाही मागे टाकले आहे, कारण आनंद हा मनशांतीचा परिणाम आहे व सुरक्षितता हा त्याचा आधारस्तंभ आहे. आपण सगळे कुणाचा ना कुणाचा मुलगा/मुलगी/बहीण/ भाऊ आहोत व तसेच इतरांचेही आपल्याशी नाते आहे व आपल्याला वरील यादीतील आपल्या कुणाही जिवलगाला

या प्रकारे गमवावे लागले तर आपण अतिशय अस्वस्थ होऊ म्हणूनच आपण सगळ्यांनी एकत्रितपणे निर्णय घेतल्यास व त्यानुसार कृती केल्यास, आपण अपघात कमी करू शकतो जी किमान एखादी हत्या मानली जाणार नाही हे नक्की; एवढे बोलून निरोप घेतो.


 संजय देशपांडे

smd156812@gmail.com