Wednesday, 28 October 2020

बंदुकीच्या टोकावर बांधकाम व्यवसाय..!













 

 

 

इथल्या न्यायामध्ये कायद्याला ढवळाढवळ करून देण्याचे मला काही गरज वाटत नाही. आम्ही आधी कधीही मान्य केले नाही.”...  सिड  फ्लेशमन

अल्बर्ट सिडने फ्लेशमॅन किंवा सिड फ्लेशमॅन हे युक्रेनियन वंशाचे अमेरिकी लेखक होते ज्यांनी पटकथा, प्रौढांसाठी कादंबऱ्या रंगमंचावरील जादूविषयी ललित लेखन केले. त्यांचे वरील शब्द वाईल्ड वाईल्ड वेस्ट या पाश्चिमात्य चित्रपटाच्या पटकथेतील आहेत त्यातून अमेरिकेतली १८०० व्या शतकाचा अखेरचा काळ १९०० व्या शतकाची सुरुवात या काळातील संस्कृती दिसते, जेव्हा न्याय  हातोहात दिला जायचा कारण तेव्हा प्रत्येकच हात  बंदुकधारी होता, हा काळ खरोखरच रक्त रंजित म्हणावा असाच होता. अमेरिका हा पूर्वीही बंदुकप्रेमी देश होता आजही आहे, तसेच सिडचे वरील शब्द त्यांच्या रक्तातच आहेत. या बंदुकीवरील प्रेमाची त्यांनी अतिशय मोठी किंमत मोजलीय. आपल्याला आजही अमेरिकेत सार्वजनिक ठिकाणी बंदुकीने हल्ला झाल्याच्या अनेक घटना दिसून येतात. अमेरिकेमध्ये, त्या काळात सगळीकडे नैराश्य होते, लोकांना वाद (जे अगदी लहानसहान कारणावरून व्हायचे) मिटवण्याचा एकच मार्ग आहे असे वाटायचे तो म्हणजे दुसऱ्या व्यक्तीवर गोळ्या झाडणे त्यालाच ते न्याय म्हणत कारण अर्थातच मृत व्यक्ती दावा करू शकत नाही किंवा न्याय मागू शकत नाही. कायद्याविषयी बोलायचे झाले तर तुम्ही कोणताही कायदा तयार करू शकता, मात्र तुमच्याकडे लोकांना त्या कायद्याचा आदर वाटेल (किंवा भीती) ते त्याचे पालन करतील अशी यंत्रणा असल्याशिवाय; नुसता कायदा करून उपयोग होत नाही.  अमेरिकेमध्येही तत्कालीन परिस्थितीही अगदी तशीच होती, कायदे होते मात्र कायद्याची अंमलबजावणी करणारी कोणतीही यंत्रणा नव्हती. परिणामी प्रत्येकाच्या हातात बंदूक होती ज्याच्या (किंवा जिच्या) हातात बंदूक होती त्यांना कायदा आपल्याच हातात आहे न्याय मिळवून देण्याचा बंदूक हाच एकमेव मार्ग आहे असे वाटत असे.

मी सिड यांचे वरील शब्द निवडण्याचे कारण म्हणजे, आपला देश कितीही शांतताप्रिय असला तरीही (खरोखर आहे का) आपण अगदी तशाच नाही पण जवळपास तशाच परिस्थितीत आहोत. इथे कायदे अस्तित्वात आहेत, त्यांची अंमलबजावणी करणारी संस्थाही आहे, परंतु जनतेला (म्हणजे सामान्य माणसाला) असा विश्वास वाटत नाही की या कायद्याने त्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थेद्वारे त्याला किंवा तिला न्याय मिळेल. मी या यंत्रणेचा भाग असलेल्या माझ्या मित्रांविषयी पूर्णपणे आदर राखत हे विधान करतो, जिला आपण सरकार, पोलीस, न्यायव्यवस्था किंवा महसूल अशी वेगवेगळी नावे देतो. अर्थात आपण सामान्य माणसेही त्या यंत्रणेचाच भाग असल्याचे सोयीस्करपणे विसरतो. कुठल्याही कायद्याचे पालन केवळ त्याची अंमलबजावणी करून होत नाही, तर जनतेचीही कायद्याचे पालन करायची मानसिकता किंवा इच्छाही असावी लागते. आपण नेमके हेच विसरतो जेव्हा एखादी हिंसक घटना घडते तेव्हा केवळ आरोप प्रत्यारोप करत राहतो. अशा घटनांमुळे आपण कायद्याचे पालन करणाऱ्या तथाकथित सुसंस्कृत समाजामध्ये जगत आहोत हा आपला गैरसमज अचानक दूर होतो. खरे पाहता आपल्याभोवती कायद्याचे उल्लंघन करण्याच्या अनेक घटना सतत होत असतात. उदाहरणादाखल, एका ट्रॅफिक सिग्नलपाशी शंभर एक वाहने उभी असतील त्यातील दोन किंवा तीन वाहने सिग्नल मोडून पुढे गेली तरी आपण कायद्याचे पालन करणारा समाज आहोत असे म्हणता येईल. मात्र जर केवळ दोन किंवा तीन वाहने सिग्नलचे पालन करत असतील इतर सर्व सिग्नल मोडून पढे जात असतील तर, तुम्ही त्या समाजाला काय म्हणालजर शंभरातील नव्वद लोक लाल सिग्नल मोडून पुढे जात असतील तर तम्ही त्याला न्याय म्हणाल का? कायदा हा न्याय अन्यायातील सीमारेषा ठरवतो (किमान मला तरी असे वाटते)   कायदा हा जनतेसाठी बनवला जातो, म्हणूनच जर लोक कायद्याचे पालन करत नसतील किंवा त्याचे उल्लंघन करत असतील तर त्याला न्याय म्हणायचे काआता हे सांगणे थोडे अवघड आहे, कारण न्यायाची व्याख्या करण्यासाठी तुम्ही जनतेच्या किंवा समाजाच्या एकूण भल्यासाठी काय योग्य काय अयोग्य याची आधी व्याख्या केली पाहिजे. त्यानंतरच तुम्हाला त्या आधारे कायदे करता येतील या योग्य अयोग्यच्या व्याख्येआधारेच सुसंस्कृत समाज जनावरांमध्ये फरक करता येतो (माफ करा, अनेकदा समाज म्हणून जनावरेसुद्धा आपल्यापेक्षा बरी असतात)!

आता हा लेख कुठल्या दिशेने चालला आहे यामध्ये रिअल इस्टेट कुठे आहे असा विचार तुम्ही करत असाल तर मी तुम्हाला सांगतो की सध्या रिअल इस्टेटची परिस्थिती वाईल्ड वाईल्ड वेस्टसारखीच आहे. वर कायद्याविषयी एवढी चर्चा करायचे कारण म्हणजे आपल्या शांत, सुसंस्कृत, स्मार्ट पुणे शहरामध्ये एका बांधकाम व्यावसायिकाची (म्हणजे आणखी एका)जमीनीच्या वादातून प्रतिस्पर्ध्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस आयुक्तालया शेजारी दिवसा-ढवळ्या ह्त्या करण्यात आली. यानंतर माझ्या एका बांधकाम व्यावसायिक मित्राने मला विचारले की बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेली क्रेडाई या घटनेसंदर्भात काय करत आहे? क्रेडाई यासंदर्भात पोलीसांना जाब विचारू शकते, पोलीस उलटपक्षी बांधकाम व्यावसायिकांना विचारतील की त्यांनी असे काय केले की जमीन ताब्यात घेण्यासाठी वाद निकाली काढण्यासाठी प्रतिस्पर्धी इतक्या हातघाईवर आला. सामान्य माणूस म्हणेल की बांधकाम व्यावसायिकांची पैसे जमीनीसाठी असलेली हाव पाहता हे एक दिवस होणारच होते, कारण या दोन्ही गोष्टींचे साटेलोटे असते. एखाद्या वादातून कुणा बांधकाम व्यावसायिकाची किंवा जमीन अथवा रिअल इस्टेटशी संबंधित व्यक्तीची हत्या होण्याची ही पहिली वेळ नाही. तसेच जोपर्यंत आपण व्यवसाय करताना सुसंस्कृत म्हणजे काय तसेच आपल्यासाठी काय चांगले काय वाईट हे ठरवत नाही तोपर्यंत ही शेवटची वेळ असणार नाही, असे मला स्वतःला वाटते. या घटनेनंतर क्रेडाईचे पदाधिकारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना जाऊन भेटले त्यांना सुरक्षिततेचे नेहमीचे आश्वासन मिळाले. ज्या विकासकाचा जीव गेला त्याच्याविषयी त्याच्या कुटुंबाविषयी पूर्णपणे आदर राखत मी केवळ याच नाही तर रिअल इस्टेटमधील अशा अनेक प्रकरणांविषयी मी माझे मत मांडणार आहे. मला सर्वप्रथम हे स्पष्ट करावेसे वाटते की एखाद्या वादातून कुणाची हत्या करण्याचे कुठल्याही प्रकारे समर्थन करता येणार नाही तसेच त्याला कायद्यानेही संमती नाही! तरीही कुणीतरी एका जिवंत माणसाची व्यवसायातील एखाद्या व्यवहारावरून हत्या करते तेव्हा इतरांनी म्हणजे किमान त्या व्यावसायिक समुदायाने तरी आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे.

सर्वप्रथम रिअल इस्टेटचे स्वरूप समजून घेणे महत्त्वाचे आहे, वर्षानुवर्षे या उद्योगाने प्रसिद्धी पैसा उपभोगलाय. या दोन्ही गोष्टी गुन्हेगारीला जसे लोखंडाला चुंबक आकर्षित करते तसेच आकृष्ट करतात ही वस्तुस्थिती आहे. त्याचवेळी तुम्ही मानवी इतिहासाचे कोणतेही पान उघडा बहुतेक रक्त सांडले(युद्धे) केवळ दोन कारणांमुळे झाल्याचे दिसून येईल एक म्हणजे स्त्री दुसरे म्हणजे पैसा आणि रिअल इस्टेटमध्ये जमीनीच्या स्वरुपात पैसा आहे. सध्याचा काळ अतिशय अडचणीचा काळ आहे, अनेक उसळत्या रक्ताच्या निरुद्योगी तरुणांना नैराश्याने ग्रासले आहे. ते एवढ्या तेवढ्या कारणावरून हिंसक प्रतिक्रिया देतात अगदी किरकोळ पैशात निर्घृण कृत्ये करायलाही तयार असतात. सरतेशेवटी या तरुणांना त्यांच्या निर्घृण कृत्यांची फार मोठी किंमत मोजावी लागते, मात्र तोपर्यंत त्यांच्यासाठी तसेच पीडितासाठीही फार उशीर झालेला असतो. नेमका इथेच ( यासाठीच) रिअल इस्टेटमधील लोकांनी नम्र पारदर्शक दृष्टिकोन ठेवून हव्यास कमी करून परिस्थिती हाताळली पाहिजे, नाहीतर भविष्यात त्याचे हिंसक परिणाम दिसू शकतील. त्याचप्रमाणे तुम्ही कोणताही जमीनीचा व्यवहार करताना किंवा त्यानंतर बांधकाम किंवा पुढच्या कायदेशीर प्रक्रिया करतांना कुणाशी हातमिळवणी करताय याची काळजी घेतलीच पाहिजेकारण सहजपणे मिळणाऱ्या पैशामुळे (अनेकांना असे वाटते) अनेक चुकीच्या संस्थांनी सुरक्षा सेवा किंवा लायझनिंग सल्लागार इत्यादींच्या बुरख्याखाली रिअल इस्टेटमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. या संस्था अजिबात व्यावसायिक नाहीत किंवा एकनिष्ट नाहीत हे वेगळे सांगायची गरज नाही. किंबहुना त्यांची निष्ठा किंवा प्रेम केवळ एकाच गोष्टीसाठी असते ते म्हणजे पैसा.

रिअल इस्टेट व्यावसायिकांनी अशा सेवा देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था अतिशय काळजीपूर्वक निवडल्या पाहिजेत कारण जे आपल्या सेवा स्वस्तात देतात आपल्या ताकदीच्या जोरावर झटपट परिणाम दाखवण्याचे आश्वासन देतात ते भविष्यात तुमच्या स्वत करिता वा व्यवसायाकरिता चांगले असतीलच असे सांगता येत नाही. असे लोक तुमच्या संपर्कात आले तुमची केवळ पैशांशीच बांधिलकी आहे हे लक्षात आल्यावर आज ना उद्या ते आपल्या बळाचा वापर तुमच्यावर सुद्धा करतील यात शंकाच नाही. त्यावेळी मग तुम्ही पोलीसांना किंवा व्यवस्थेला दोष देऊन उपयोग नसतो ज्यांनी कायद्याची अंमलबजावणी करणे अपेक्षित असते. त्याचप्रमाणे न्यायाची कायद्याची मागणी करताना आधी तुमची भूमिका तपासून पाहा म्हणजे तुम्ही कायद्याच्या कोणत्या बाजूला उभे आहात याचा विचार करा असे मला सहकारी विकासकांना सांगावेसे वाटते. कारण आपल्यापैकी अनेकजणांना ते काही कायदेशीर अडचणीत आल्यावर अचानक नैतिकता, कायदा न्याय यासारख्या शब्दांचे महत्त्व जाणवते.

मला जाणीव आहे की माझ्या व्यवसायातील अनेकजणांना रिअल इस्टेटविषयी माझे हे शब्द आवडणार नाहीत, परंतु कुणालाही जालीम कडू औषध आवडत नाही परंतु काही वेळा ते आवश्यक असते. मात्र रिअल इस्टेटमध्ये सगळे वाईटच आहेत चुकीच्याच गोष्टी करत आहेत असा होत नाही. याचा अर्थ असा होतो की सचोटीने आपला व्यवसाय करत आहेत त्यांनी व्यवस्थेतील समस्यांविषयी उघडपणे बोलले पाहिजे जे सचोटीने व्यवसाय करत नाहीत त्यांनी झालेल्या घटनांमधून धडा घेतला पाहिजे आपला व्यवसाय योग्य मार्गाने केला पाहिजे.

एखाद्या व्यक्तीला हातात बंदूक घेऊन, गोळी झाडून व्यवहार निकाली का काढावासा वाटतो, याचा व्यवस्थेने किंवा त्या व्यवस्थेमध्ये बसलेल्या लोकांनी विचार करण्याची त्याविषयी चिंता करण्याची वेळ आली आहे. कारण आज एक व्यावसायिक जमीनीच्या वादामुळे मारला गेला; उद्या एखाद्या जमीनीच्या मालकीहक्काच्या आदेशावर स्वाक्षरी करणारा महसूल अधिकारी किंवा एखाद्या प्रकल्पाच्या आराखड्यांना मंजूरी देणारा इमारतींचे निरीक्षण करणारा पुणे महानगरपालिकेचा अधिकारी किंवा इलेक्ट्रिक मीटरची जोडणी देणारा विद्युत अभियंता अशा कुणालाही बंदुकीच्या दहशतीला सामोरे जावे लागू शकते. याचे कारण म्हणजे ज्याच्या हातात बंदूक आहे त्याला व्यवस्थेतील जबाबदार  लोकांकडून आपल्याला न्याय मिळणार नाही असे वाटते दुसरे म्हणजे कुणाचातरी खून करूनही याच व्यवस्थेतील अशाच काही लोकांना पैसे चारून तो मोकळा सुटू शकतो हि भावना! कोणतेही कारण असले तरी केवळ एखादा व्यवहार फिस्कटण्याची निष्पत्ति कुणासाठी तरी मृत्यूमध्ये होते. मित्रांनो एक लक्षात ठेवा ते कुणीतरी, कधीतरी, एखाद्या व्यवहारामुळे आपल्यापैकीच कुणी असू शकते त्यानुसार तुम्ही कशाप्रकारे तुमचा व्यवसाय करायचा किंवा कर्तव्य करायचे हे ठरवा.

मी शेवटी पुन्हा एकदा सांगतो, मला कोणताही व्यवहार निकाली काढण्यासाठी बंदुकीच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या प्रत्येकाविषयी सहानुभूतीच वाटते त्यांना निश्चितच न्याय मिळाला पाहिजे, मात्र न्यायासाठी जे कायदे केले जातात त्यांचे आधी आपण पालन करणे ही आवश्यक आहे.

संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स

smd156812@gmail.com



No comments:

Post a Comment