Thursday, 5 November 2020

ये दिवाली टुगेदरनेसवाली !

 























!! श्री !!

नोव्हेंबर २०२०

 

काही वेळाइतरांशी संवाद साधू आणि कुणाचा तरी हात हातात घेऊन एका प्रवासाला सुरुवात होते. तर इतर वेळादुसऱ्या कुणाला री तुमचा हात हातात घेऊ देऊन या प्रवासाची सुरुवात होऊ शकते.”...वेरा नाझेरियन

प्रिय मित्रांनो,

वेरा नाझेरियन ही एक अमेरिकी-रशियन लेखिका आहेती प्रामुख्याने काल्पनिक कथावैज्ञानिक कथालोककथा  मिथकांवर आधारित गोष्टीज्याला मिथपंक असे म्हणतात इत्यादी लेखन करतेतिची नोरिलाना बुक्स नावाची प्रकाशन संस्थाही आहेतिला खऱ्या अर्थाने काल्पनिक कथा लेखिकाच म्हणता येईल कारण तिचे वरील शब्द कल्पनाच वाटताततुम्हाला असे वाटत असेल की मी उपहासाने बोलतोयतर आपल्या भोवताली एक नजर टाकातुम्हाला बऱ्याच वेळा फक्त  हावस्वार्थीपणाअहंकारवादवंशभेद हेच आजूबाजूला  दिसेलएकोप्याची भावना मात्र फार कमी सापडेलअगदी एखाद्याला मदत करायची असेल तरीही ती व्यक्ती माझ्या जातीची किंवा धर्माची किंवा माझ्या समुदायाची आहे का किंवा त्याला किंवा तिला मदत केल्यानंतर मला काय फायदा होईल याचा विचार करून मगच दत दिली जाते तसेच ती किती द्यायची हे ठरतेतुम्हाला असे वाटत असेल की यापुढचे माझे शब्द वाचायची गरज नाही कारण मी म्हणतोय हे खोटे आहे तर तुम्ही खरोखर काल्पनिक जगात राहता असे मी म्हणे.

परंतु भोवताली किती नकारात्मकता आहे हा या पत्राचा विषय नाही  नकारात्मकतेवर मात कशी करायची याविषयी आपण बोलणार आहोतनकारात्मकतेवर मात करण्याचा एकच उपा आहे ती म्हणजे एकोपा किंवा सहजीवनएकोपा हा केवळ शब्द नाही तर ती एक भावना आहे जी तुम्हाला अशा अनेक गोष्टी करायला भाग पाडेल ज्या तुम्ही एरवी कधीच करणा नाहीएकोप्यासाठी आवश्यक असलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनातले बोलून मोकळे व्हामनातले बोलल्याने जगातील बहुतेक सर्व अडचणी दूर होतातएवढी प्रचंड ताकद त्यामध्ये आहेतुम्हाला पटत नसेल तर हे करून बघातुम्ही जेव्हा निराश होतादुःखी असता किंवा भविष्याची भीती वाटत असतेतेव्हा तुम्ही काय करताआपण सगळेच कधीना कधी अशा मनस्थितीतून जात असतोअशावेळी तुम्हाला फक्त कुणाचीतरी साथ हवी असते  मनातले बोलायचे असतेतुम्ही खरोखर मनातले बोलून पाहा  त्यानंतर तुम्हाला कसे वाटते ते सांगा१०० पैकी ९९ लोकांना त्यांच्या मनातील भीती किंवा दुःख यासारख्या नकारात्मक भावना बोलून दाखवल्यावर बरे  हलके वाटलेत्यांना आपले ओझे कुणीतरी वाटून घेतले आहे असे वाटलेतुम्हीसुद्धा ज्यांच्यावर तुमच्यापेक्षा जास्त भार आहेअशा कुणाचेतरी ओझे हलके करण्याचा प्रयत्न कराएकोप्याच्या भावनेतून तुम्हाला  गाला हे सहज साध्य होऊ शकेल.

ही देवाण-घेवाण केवळ नकारात्मक भावनांपुरतीच मर्यादित ठेवू नकातुम्ही तुमच्याकडे जे काही चांगले आहे ते इतरांना देऊ शकतानातल्या भावना बोलल्याने जशी नकारात्मकता कमी होते तसेच काहीतरी चांगले इतरांना दिल्याने आनंद  समाधान द्विगुणित होतेगंमत म्हणजे तुम्हाला आनंद मिळवण्यासाठी  तो इतरांना देण्यासाठी पैसेच लागतात असे नाहीआयुष्यात पैसा अर्थातच महत्त्वाचा आहेकारण तुम्ही केवळ आनंदाने पोट भरू शकत नाहीआनंद काही तुम्ही कपड्यांसारखा अंगावर घालू शकत नाहीतसेच तो तुमचे घर

 कर्जाचे मासिक  हप्तेही भरू शक नाहीपरंतु त्याचवेळी तुमच्या खिशात कितीही पैसे असले तरीही तुम्ही त्यातून आनंद विकत घे शकत नाही हे देखील सत्य आहेतुम्हाला हे संतुलन ठेवता आले पाहिजे  त्यासाठी एकोपा आवश्यक सतोकारण तुमच्यासोबत कुणीच नसे तर पैसा असो किंवा आनंद तुम्ही तो इतरांना दिला पाहिजे हे तुम्हाला कोण सांगेल किंवा कोणासोबत शेअर कराल हे सगळे!

मित्रांनोआपल्याभोवती अनेक सुदैवी लोक आहेत हे मान्य आहेमात्र आपल्याभोवती आपल्यापेक्षा नेक दुर्दैवी लोकही आहे, म्हणूनच दिवाळीचे महत्त्व आहेया दिवाळी ला आपल्या मनातील कुणाशीतरी बोलून नकारात्मकतेचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न करा तसेच कुणाचेतरी दुःख कमी करायचा प्रयत् करातुमच्याकडे जे काही चांगले आहे ते देताना हात आखडता घे नकाकारण तुमच्या या देण्यामुळे कदाचित कुणाचीतरी दिवाळी जळून निघेलआनंदात जाईलयालाच आपण एकोप्याची दिवाळी किंवा टुगेदरनेसवाली दिवाली म्हणूमी म्हटल्याप्रमाणे हा अतिशय खडतर काळ आहेआपल्यापैकी अनेकजण २०२० हे वर्ष विसरू शकणार नाहीत  त्याची कारणेही बहुतेक वाईटच असतील. या पार्श्वभूमीवर ही दिवाळी सगळ्यांनी एकत्रितपणे साजरी करून नवीन सुरूवात करणे महत्त्वाचे हे असे मला वाटते.

आणि यासाठी तुम्ही कुणाला महागड्या भेटवस्तूच द्यायची गरज नाहीसाधे  तुम्ही रस्त्यावर झाडू मारणाऱ्या महापालिकेच्या सफा कर्मचाऱ्याला मिठाईचा डबा देऊ शकता ज्याच्या आयुष्यात दिवाळीमुळे काहीच फरक पडत नाहीतुम्ही तुमच्या सोसायटीच्या वॉचमनला पायमोजे देऊ शकता जो दिवाळीमध्येही तुमच्या घराची राखण करत असतोतुम्ही एखाद्या स्वयंसेवी संस्थेद्वारे वनरक्षकांना स्वेटर देऊ शकता जे एखाद्या दुर्गम भागातील आपल्या गावी कुटुंबाला सोडून जंगलात दिवाळीला एकटेच असतातुम्ही तुमच्या समोरच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या वृद्ध जोडप्याला हातानी बनवलेले शुभेच्छापत्र देऊ शकता ज्यांचा मुलगा परदेशात आहे  या दिवाळीला घरी ये शकत नाहीआणि होतुम्ही ज्या कुणाला भेटाल त्यांच्याकडे पाहून दिवसातून किमान एकदा स्मित हास्य नक्कीच करू शकताचला तर मग वाट कशाची पाहतायआपण सगळे मदतीचा हात पुढे करू आणि एकोप्याने दिवाळी साजरी करू, “ये दिवाली टुगेदरनेसवाली”!

आम्हा सगळ्यांतर्फे तुमच्या कुटुंबाला आणि मित्र परिवाराला दिवाळीच्या अनेक शुभेच्छाएकत्र राहाआनंदात राहा!


संजय देशपांडे आणि टीम संजीवनी

आम्ही ही एकोप्याची भावना वृद्धिंगत व्हावी यासाठी संजीवनी तर्फे नेहमीच हात पुढे करत असतोतुम्हालाही त्यात सहभागी व्हायचे असेल तर तुमचे स्वागतच आहेअधि माहितीसाठी कृपया आम्हाला पुढील पत्त्यावर ईमेल पाठवा.

Email Id: smd156812@gmail.com /sales@sanjeevanideve.com / junglebelles.pune@gmail.com         

Web Site :  www.sanjeevanideve.com

Phone No: 02025434021 / 08380073013




--





No comments:

Post a Comment