"वाघ हा संपूर्ण जगात सर्वात रुबाबदार प्राणी आहे. “… जॅक हॅना
वाघाच्या हल्ल्याच्या परिणामाची तुलनातुमच्या
डोक्यावर दुसऱ्या मजल्याच्या खिडकीतून पियानो पडण्याशी करता येऊ शकते. परंतु
पियानो हे वाद्य आहेत,वाघाची जडणघडणच हे सगळे करण्यासाठी झालेली असते, व त्याचा परिणाम ही केवळ सुरुवात असते."... जॉन व्हॅलियंट
जॅक बुशनेलहॅना हे अमेरिकेतील प्राणीसंग्रहालयाचे
निवृत्त संचालक, कोलंबो प्राणी संग्रहालय व मत्स्यालयाचे माजी संचालक
आहेत. ते "जंगल जॅक" म्हणूनही ओळखले जातात व ते १९७८ ते १९९२ पर्यंत
प्राणीसंग्रहालयाचे संचालक होते व प्रामुख्याने त्याचा दर्जा व नावलौकिक
वाढविण्यासाठी त्यांना जबाबदार मानले जाते. जॉन व्हॅलियंट हे अमेरिकी-कॅनडियन लेखक व पत्रकार
आहेत ज्यांच्या कामाची द न्यूयॉर्कर, द अटलांटिक, नॅशनल जिओग्राफिक व आउटसाईड यांनीही दखल घेतली आहे. माझ्या वाचकांना अलिकडे वाटू लागले असेल की मला वाघांच्या विचारांनीच आहे व मी
त्यांना दोष देत नाही मात्र
मला जंगलांनी
नक्कीच पछाडलेले आहे
(म्हणजे भारतीय जंगलांनी). म्हणजे जसे
तुम्हाला मद्यालयाने (परमिटरूम) पछाडलेले असेल तर तुम्ही देवदासला म्हणजे
दारूचे सर्वाधिक व्यसन असलेल्या माणसाला त्यापासून लांब कसे ठेवू शकता, तुम्हाला लास
व्हेगासने (म्हणजे जुगाराच्या अड्ड्याने) पछाडलेले
असेल तर तुम्ही एखाद्या अट्टल जुगारी माणसाला त्यापासून लांब कसे ठेवू शकाल? मल माहिती आहे की हा अतिशय
वाईट विनोद किंवा तुलना आहे परंतु आपल्या सुपरस्टारने म्हणजेच खुद्द अमिताभ बच्चन
यांनीही त्यांचा सुप्रसिद्ध चित्रपट शराबीमध्ये अशाच प्रकारची तुलना केली आहे
(गेहूँ को गेहूँ नही तो क्या जवारी कहोगे, शराबी को शराबी नही तो क्या
पुजारी कहोगे), आता मला याचा अनुवाद करण्यास सांगू नका, ही तुलना मी केलेल्या तुलनेपेक्षाही वाईट आहे, हाहाहा, त्यामुळे असो.थोडक्यात सांगायचे तर, तुम्हाला भारतीय जंगलांमध्ये जायला आवडत असेल तर
तुम्ही वाघांपासून लांब राहू शकत नाही असाच याचा अर्थ होतो. अर्थात इतर सर्व प्रजातींविषयी
मला पूर्णपणे आदरच वाटतो आणि ज्यांच्यावर माझे
तितकेच प्रेम आहे व त्यांच्या अधिवासांना भेट द्यायला आवडते व तिथे वाघ दिसत नाहीत, उदाहरणार्थ गवताळ प्रदेश किंवा पश्चिम
घाटांचा काही भाग जेथे तुम्हाला वाघ दिसत नाही परंतु इतर अनेक प्रजाती दिसतातव अशी
इतर बरीच ठिकाणे आहेत तेथे वन्यजीवन वाघाशिवाय अस्तित्वात असते, तरीही कुणीही वाघाचे महत्त्व नाकारू शकत नाही. मी
वारंवार म्हटल्याप्रमाणे, तुम्ही जेव्हा
एखाद्या वाघाला आपणहून जगायला मदत करता, तेव्हा तुम्ही अप्रत्यक्षपणे संपूर्ण निसर्गाची परिसंस्था जगवत असता, अशाप्रकारे मी वाघांकडे पाहतो. आता या विषयाची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो, तुमच्यापैकीबऱ्याच जणांना व्याघ्र प्रकल्पाविषयी
माहिती असेल. परंतु अनेक जणांना ते वाघाशी संबंधित काहीतरी आहे एवढे माहिती असते, मात्र त्याचा नेमका अर्थ काय होतो हे माहिती नसते व
त्यांच्यासाठी तेवढे पुरेसे असते. तसेच अगदी काही
देशवासीयांनाच वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे याची जाणीव असेल व मी इतरांना दोष
देत नाही. ज्या देशामध्ये दैनंदिन जगणे हीच बहुतेक माणसांसाठी एक मोठ्ठी समस्या
असते, तिथे व्याघ्र प्रकल्पाविषयी कोण काळजी करत बसेल. ही
आपल्या राष्ट्रीय प्राण्याशी संबंधित काहीतरी राष्ट्रीय मोहीम असावी इतपतच माहिती
असते. म्हणूनच व्याघ्र प्रकल्पाचे यश अधिक लखलखीत आहे. कारण
जेव्हा नागरिकांना एखाद्या मोहिमेविषयी माहिती असते तेव्हा ती यशस्वी होणे सोपे
असते, कारण मग ते मनापासून त्या मोहिमेला पाठिंबा देतात.
मात्र जेव्हा जवळपास ९०% नागरिकांना (ही आकडेवारीही मी अतिशय उदारपणे देतोय) तुमच्या मोहिमेचा
उद्देश माहिती नसतो व तुम्ही यशस्वी होता, तेव्हा ती काही गंमत किंवा योगायोग नसतो हे आव्हान स्वीकारण्यासाठी मी
व्याघ्र प्रकल्पामध्ये सहभागी असलेल्या संपूर्ण यंत्रणेचे अभिनंदन करतो
(प्रामुख्याने संबंधित वन विभाग). आपल्या देशामध्ये एकेकाळी वाघांची संख्या चार
आकड्यांपेक्षाही कमी झाली होती (म्हणजे १००० पेक्षाही कमी) व आपल्या राष्ट्रीय
प्राण्याचे भवितव्य आपल्याला पूर्णपणे
अंधकारमय होते (म्हणजे नामशेष होण्याच्या मार्गावर).
अशावेळी व्याघ्र प्रकल्पामुळे आपल्या देशातील वाघांचे संरक्षण करण्यात व त्यांची
संख्या वाढविण्यातही व्याघ्र प्रकल्पामुळे मदत झाली. १९७३ साली म्हणजे, पन्नास वर्षांपूर्वी तत्कालीन माननीय पंतप्रधान (आणखी
कोण) श्रीमती इंदिरा गांधी यांनी वन्यजीवन क्षेत्रातील मोठी नावे म्हणजे डॉक्टर
करण सिंह, बेलिंडा राईट, बिट्टू सेहेगल व अशा इतरही अनेक जणांच्या मदतीने या
प्रकल्पाची कल्पना साकार केली. व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघांचे अधिवास निश्चित
करण्यात आले व कायद्यांनुसार व संबंधित संस्थांच्या संरक्षणांतर्गत त्यांचे
संवर्धन करण्याची योजना राबवण्यात आली. यामध्ये एनटीसीए म्हणजेच राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन
प्राधिकरणाची स्थापना करण्याचाही समावेश होता ज्याद्वारे व्याघ्र प्रकल्पाची
देखरेख, व्याघ्र उद्याने किंवा अभयारण्ये घोषित करणे अपेक्षित
होते. त्यासोबतकोअर क्षेत्र तसेच कोअर क्षेत्राच्या आजूबाजूला असलेले बफर क्षेत्र
यासारख्या संकल्पनाही तेव्हा पहिल्यांदाच वापरण्यात आल्या.या प्रकल्पाचा मसुदा
खालीलप्रमाणे होता…पहिल्या टप्प्यामध्ये देशामध्ये विविध व्याघ्र अभयारण्यांची‘कोअर-बफर’धोरणानुसार निर्मिती करण्यात आली, याचाच अर्थ कोअर क्षेत्र म्हणून घोषित करण्यात
आलेल्या भागामध्ये कोणत्याही मानवी हस्तक्षेपाला परवानगी दिली जाणार नाही व
संपूर्ण नियंत्रण वनविभागाला देण्यात येईल ज्यामुळे वाघांचे म्हणजेच कोअर
क्षेत्राचे संरक्षण होईल. कोअर क्षेत्राला संरक्षण देण्यासाठी त्याच्याबाहेर बफर
क्षेत्र तयार करण्यात आले जेथे मानवी वसाहतींना जगण्यासाठी मर्यादित कामे करण्याची
परवानगी देण्यात आली.:
कोअर क्षेत्र: कोअर क्षेत्रामध्ये माणसांना कोणत्याही प्रकारचे काम
करता येत नाही व त्याला राष्ट्रीय उद्यान किंवा वन्यजीवनअभयारण्याचा कायदेशीर
दर्जा असतो. हे क्षेत्र कोणत्याही जैव अडथळ्यांपासून व वन्य
क्षेत्रातील कामांपासून मुक्त ठेवले जाते उदाहरणार्थ किरकोळ वन्य उत्पादनांचे
संकलन, चरणे व इतर मानवी हस्तक्षेपाला या क्षेत्रात परवानगी
नसते. यामध्ये कोअर क्षेत्रातील गावकऱ्यांचे स्थलांतर
करण्याचाही समावेश होता व हा सर्वात आव्हानात्मक भाग होता कारण लोक येथे
शतकानुशतकेराहात होते व त्यांना शेकडो मैल लांब जायला सांगणे हे सोपे काम नव्हते!
बफर क्षेत्र: बफर क्षेत्रामध्ये ‘जमीनीचा वापर
संवर्धनाशी-संबंधित कामांसाठी’ केला जातो. यामध्ये वन व वनेतरजमीनीचा समावेश होतो. हे बहु-उपयोगी क्षेत्र असते ज्यामध्ये कोअर संवर्धन
क्षेत्रातील अतिरिक्त वन्य प्राण्यांना आणखी जागा उपलब्ध करून देणे व आजूबाजूच्या
गावांचा परिणाम कोअर क्षेत्रावर होऊ नये यासाठी विशिष्ट क्षेत्रासाठी आवश्यक
विकास-पूरक कामे करण्याचा समावेश होतो. हे अगदी सोपे वाटत असले तरीही प्रत्यक्षात बफर
क्षेत्राचे व्यवस्थापन करणे हे अधिक आव्हानात्मक असते. कारण वन विभागाचे कोणत्याही
कामांवर पूर्णपणे नियंत्रण असते तर बफर क्षेत्रामध्ये माणसे व वन्य प्राण्यांच्या
सहजीवनामुळे संघर्ष होणे अपरिहार्य असते व या संघर्षामध्ये संतुलन साधता न
आल्यामुळे व्याघ्र प्रकल्पाचा हेतूच अपयशी ठरतो.
वरील उद्दिष्टे साध्य
करण्यासाठी कृती योजनेसाठी पुढील उपाययोजना ठरविण्यात आल्या:
संरक्षण वाढविणे/देखरेख यंत्रणेचे जाळे तयार
करणे.
कोअर क्षेत्रातून/वाघांचा अधिवास असलेल्या
महत्त्वाच्या क्षेत्रातून लोकांचे स्वेच्छेने स्थलांतर करणे जेणेकरून वाघांसाठी
कुणाचाही हस्तक्षेप नसलेली जागा उपलब्ध होईल.
वन्य जीवनाशी
संबंधित गुन्हे रोखण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणे.
माणूस-वन्यजीवनातील
संघर्ष हाताळणे.
वन क्षेत्रात काम
करणाऱ्याकर्मचाऱ्यांची क्षमता वाढवणे.
महत्त्वाच्या जागी कॅमेरा लावून काढलेल्या वाघांच्या छायाचित्रांचा
त्यांच्या ओळख क्रमांकासह एक राष्ट्रीय संग्रह तयार करणे .
एनटीसीएची
प्रादेशिक कार्यालये सशक्त करणे.
नवीन व्याघ्र
अभयारण्ये घोषित करणे व ती बळकट करणे.
नवीन व्याघ्र
अभयारण्ये तयार करण्यासाठी जंगलांबाबत जागरुकता निर्माण करणे.
जंगलांविषयी
संशोधन.
प्रत्येक व्याघ्र अभयारण्यासाठी, या सर्व उद्देशांच्या आधारे व्यवस्थापनाच्या योजना
तयार करण्यात आल्या होत्या.
(वरील माहितीचा काही भाग विकीपीडियाच्या
संकेतस्थळावरून घेतला आहे, जे मी क्वचितच करतो परंतु व्याघ्र प्रकल्प हा
गुंतागुंतीचा व तांत्रिक विषय असल्याने, मला तो समजावून सांगताना चुकीच्या संज्ञांचा वापर
करायचा नव्हता.)
एवढे नियोजन व पूर्णपणे समर्पित लोकांचा चमू व
यंत्रणेच्या अथक प्रयत्नांमुळे (म्हणजेच सरकारी विभाग व स्वयंसेवी संस्था) आपण आज
म्हणू शकतो की व्याघ्र प्रकल्प हा कोणत्याही देशामध्ये केवळ एका प्रजातीचे संवर्धन
करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या सर्वात यशस्वी उपक्रमांपैकी (किंवा मोहिमांपैकी)
एक आहे. या मोहिमेमध्ये परिसंस्थेतील सर्वात महत्त्वाच्या प्रजातीचे म्हणजे वाघाचे
संवर्धन करण्यात आले, ज्यामुळे केवळ वाघच नव्हे तर त्याच्यासोबत इतरही
हजारोप्रजाती नामशेष होण्यापासून वाचल्या. तसेच हे यश आकडेवारीमध्येही मोजता येऊ
शकते कारण सुमारे पन्नास वर्षांपूर्वी वाघांची संख्या १००० पेक्षा कमी होती जी आज
जवळपास ३२५० आहे व ही
आकडेवारी वस्तुस्थिती आहे. हा पैलू पाहता, दुर्दैवाने आपल्या सरकारला (म्हणजेच सर्व सरकारांना)
एकतर स्वतःचे यश समजलेले नाही किंवा माणसांना भेडसावणाऱ्याइतर अनेक समस्यांच्या
पार्श्वभूमीवर ते तितकेसे महत्त्वाचे आहे असे त्यांना वाटत नसावे, कारण माणसे त्यांची मतदार आहेत, वाघ नव्हे. असे असले तरीही आपण व्याघ्र प्रकल्पाच्या
यशाकडे दुर्लक्ष करू नये व जर (हा ‘जर’ अतिशय
महत्त्वाचा आहे) आपल्याला भविष्यात या यशाची पुनरावृत्ती करायची असेल
तर आपण त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कारणआगामी काळातील आव्हाने वेगळी असणार
आहेत.
कारण, नंतरच्या काळात (म्हणजे दशकभरापूर्वी) आणखी दोन पैलू समोर आलेते म्हणजे,वन्यजीवन पर्यटन, मला खात्री आहे (केवळ अंदाज लावत आहे) की व्याघ्र प्रकल्पाचे नियोजन करताना याचा विचार करण्यात आला नसेल व दुसऱ्या आणखी एका पैलूचा विचार करण्यात आला नव्हता तो म्हणजे प्रचंड वेगाने वाढलेली मानवी लोकसंख्या ( लोकसंख्येचा विस्फोट म्हणा ). पहिला पैलू व्याघ्र प्रकल्पासाठी वरदानच आहे (याविषयी माणसामाणसांमध्ये मतभेद आहेत) जे बऱ्याचस्वयंसेवी संस्था व वन्यजीवप्रेमी मान्य करणार नाहीत व अगदी वन विभागाचे अधिकारीही या मुद्द्यावरून विभागलेले आहेत. माझे मात्र असे अगदी ठाम मत आहे की व्याघ्र प्रकल्पातील दुसरा व फारसा विचार न करण्यात आलेला पैलू म्हणजे माणसांच्या वाढत्या लोकसंख्येमध्ये संतुलन राखून ठेवायचे असेल तर वन्यजीवन पर्यटन (सुयोग्य व्यवस्थापन केल्यास) हीच एकमेव आशा आहे किंवा शस्त्र आहे. तुम्ही बळाचा किंवा कायद्याचा वापर करून कोअर क्षेत्रातील गावे स्थलांतरित करू शकता परंतु बफर क्षेत्रामध्ये सातत्याने वाढत्या लोकसंख्येचे काय? ताडोबासारख्या अधिवासांमध्ये बफर क्षेत्रातील वाघांची संख्याही झपाट्याने वाढत आहे, तर या वाघांसाठी आपण कुठे जागा उपलब्ध करून देणार आहोत? हाच माझ्या लेखाचा मुख्य मुद्दा आहे, येथे मला माननीय पंतप्रधानांना (विद्यमान पंतप्रधान व संपूर्ण व्यवस्थेला) आवाहन करायचे आहे आता वन्यजीवनाच्या आघाडीवर सध्याच्या परिस्थितीचे बदललेले पैलू विचारात घेऊन व्याघ्र प्रकल्पाचा पुढील भाग सुरू करण्याची वेळ आली आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या पहिल्या भागात आपण वाघांना जगवले व ते नामशेष होण्यापासून त्यांचे संरक्षण केले. ज्यांना वन्यजीवनाविषयी थोडीफार माहिती आहे त्यांना समजू शकेल की जर तुम्हाला जंगलामध्ये वाघाला जगवायचे असेल तर तुम्ही त्याचे संपूर्ण जग जगवणे आवश्यक आहे यामध्ये जंगले, जलस्रोत, इतर प्राणी व संपूर्ण वन्यजीवनाच्याजीवनचक्राचा समावेश होतो. परंतु दुसरी समस्या म्हणजे तुम्ही या हेतूने काही जागा आरक्षित करून (कोअर व बफर जंगले) वाघांना जगवले आहे, परंतु नवीन वाघांचे काय जी पुढची पिढी असेल, या वाघांसाठी जागा कुठे आहे? वाघ हाकळपामध्ये राहणारा प्राणी नाही व प्रत्येक वाघाला त्याची स्वतःची जागा हवी असते, हेच खरे आव्हान आहे व यासाठीच व्याघ्र प्रकल्पाचा भाग २ आवश्यक आहे. एक वाघीण तिच्या १४-१५ वर्षांच्या आयुष्यामध्ये (जंगलामध्ये, वाघाचे आयुष्य नेहमी कमी असते) साधारण चार वेळा गरोदर राहते व प्रत्येक गर्भधारणेमध्ये दोन यानुसार ती अंदाजे आठ बछड्यांना जन्म देते व त्या सगळ्या वाघांना त्यांचे स्वतःचे वन क्षेत्र (प्रदेश) हवा असतो, नाहीतर ते एकमेकांना मारतील किंवा माणसांच्या हद्दीत व शहरांमध्ये प्रवेश करतील व परिणामी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये बहुतेक वाघांचा मृत्यू होईल.व्याघ्र प्रकल्पातीलताडोबासारख्या सर्वाधिक यशस्वी अधिवासांभोवतालच्या भागात नेमके हेच होत आहे, वाघांची संख्या वाढत आहे परंतु त्यांच्यासाठी जे जंगल आवश्यक आहे ते त्याच प्रमाणात वाढत नाही. मी खरोखरच सांगतो हे आव्हान अतिशय अवघड आहे कारण एकीकडे आपण माणसांनाही पुरेशी घरे देऊ शकत नाही (म्हणजे राहण्यायोग्य) व या पार्श्वभूमीवर आपल्याला वाघांसाठी तसेच इतर प्रजातींसाठी घरे (म्हणजेच जंगल) शोधायची आहेत ज्यामुळे वाघांचे घर पूर्ण होईल. मी अतिशयोक्ती करतोय (नेहमीप्रमाणे) असे तुम्हाला वाटत असेल तर या एप्रिल महिन्यातच आपण व्याघ्र प्रकल्पाची ५० वर्षे साजरी करत आहोत. गेल्या पाच वर्षामध्ये वनक्षेत्रात घट झाल्याचे सरकारनेच स्वीकारल्याची बातमी होती व आणखी एक बातमी अशी होती की ताडोबाच्या जवळ स्टील घेऊन जाणाऱ्या एका ट्रकशी धडक होऊन झालेल्या अपघातात एका बिबट्याचा रस्त्यावर मृत्यू झाला. अपघातानंतर तो बिबट्या ३० मिनिटे जिवंत होता परंतु त्याला वेळेवर मदत न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. हेच आव्हान आहे, पन्नास वर्षांपूर्वी वाघांची बेधडकपणे शिकार केली जात असल्यामुळे व्याघ्र प्रकल्प तयार करणे आवश्यक होते, तर आता आपण वाघांचे अधिवास नष्ट करत आहोत व यावेळी आपण केवळ वाघांचेच नाही तर त्यांच्या संपूर्ण घराचे म्हणजे जंगलांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. त्यासाठी केवळ नागरी नियोजन पुरेसे होणार नाही कारण शहरांचा विकास अतिशय झपाट्याने होत आहे, आपण जर वनविभागाला अधिकार व पायाभूत सुविधा (पैसा व मनुष्यबळ) देऊन पुरेशी तरतूद केली नाही तर नव्या वाघांचा मृत्यू होईल व सध्या जे जिवंत आहेत त्यांचा प्रदेशावरून लढाया होऊन मृत्यू होईल. हे केवळ व्याघ्र प्रकल्पाचा भाग २ सारख्या साधनांनीच शक्य होईल, ज्यामध्ये यंत्रणेला पुरेसा निधी तसेच मोहिमेला अधिक पाठबळ मिळते. आपल्याकडे सर्वात मोठे शस्त्र हातात आहे ते म्हणजे वन्यजीवन पर्यटन, ज्यामुळे वाघांशी संबंधित प्रत्येक घटकाला लाभच होईल व काही संघर्षही होणार नाही. वाघांना त्यांची जागा लागते, तसेच माणसांनाही लागते, व्याघ्र प्रकल्पाचा पहिला टप्पा वाघांनावेगळे करणे हा होता (जसे की करोना काळात घरापासून लांब रुग्णालयामध्ये किंवा विलगीकरण केंद्रावरील विलगीकरणाप्रमाणे), आत व्याघ्र प्रकल्पाचा दुसरा टप्पा सहजीवनाचा असेल (म्हणजेच घरातीलच विलगीकरणाप्रमाणे), अशाप्रकारे माणसांना वाघांसोबतच्या सहजीवनामुळे चार पैसे कमावता येतील व हा पैलू माननीय न्यायालये, माननीय स्वयंसेवी संस्था, माननीय पर्यावरणवादी या सगळ्यांनी प्रामाणिकपणे समजून घेतला पाहिजे ही विनंती. वन विभागानेही (ज्यांचे मत वन्यजीवन पर्यटनासाठी अनुकूल नाही)विचार केला पाहिजे व सर्व संबंधितांकडे याचा पाठपुरावा केला पाहिजे. वनविभागाला प्राण्यांना नव्हे परंतु माणसांना हाताळण्यासाठी अधिक मनुष्यबळाची गरज आहे. सध्या वनविभागाकडे अनेक गोष्टींचा तुटवडा असल्यामुळे त्यांचे मत वन्यजीवन पर्यटनास अनुकूल नाही, अशा परिस्थितीमध्ये पर्यटकांची अतिरिक्त जबाबदारी (तेसुद्धा भारतीय पर्यटक, धन्य, प्रिय देशबांधवाना दुखवायचा अजिबात हेतू नाही), वनविभागाला निश्चितच नकोशी वाटते. परंतु मला खात्री आहे की पायाभूत सुविधा बळकट केल्यास वन विभागालाही माणसे व वाघांचे सहजीवन पाहायला आवडेल, वेळ आधीच हातातून चालली आहे व आपण गेल्यावर्षी जवळपास १५० हून अधिक वाघ गमावले आहेत व त्यापैकी फक्त १५% वाघांचा नैसर्गिक मृत्यू झाला होता!
माननीय पंतप्रधान सर, हे सगळे संवर्धन अतिशय वेगाने करणे आवश्यक आहे कारण १९७३ पेक्षाही, व्याघ्र प्रकल्प भाग २ ची गरज आत्ता आहे. आणि यावेळी वाघांना वेगळे ठेवण्यापेक्षाही “वाघांसोबतच्या सहजीवनावर” भर दिला पाहिजे, तरच आपण भविष्यात वाघ जगवू शकू.
संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलपर्स
कृपया पुण्यातील
रिअल इस्टेटविषयी माझे विचार खालील यूट्यूब दुव्यावर पाहा..
https://www.youtube.com/watch?v=g4xX7eopH5o&t=5s
No comments:
Post a Comment