Sunday, 9 April 2023

रानडुक्कर, नगरविकास आणि वन्यजीवन !

 














                                                                       

                                                                      





















वन्यजीवनाचे भविष्य ते ज्या अधिवासावर अवलंबून आहेत तो नष्ट केला जात आहे. आपण आता निसर्ग त्यामध्ये राहणाऱ्या सर्व सौंदर्याला प्राधान्य देण्याची वेळ आली आहे.” …  पॉल ऑक्स्टन

भारतातील शहरीकरण म्हणजे त्यातील खेडी ग्रामस्थांचा हळूहळू परंतु निश्चित विनाश” … महात्मा गांधी.

 ही दोन्ही अवतरणे, आपल्याला आपली प्रगती होत असताना इतरांबाबत असलेल्या आपल्या कर्तव्याची जाणीव करून देतात. ही अवतरणे ज्यांची आहेत त्या दोन्ही व्यक्तींना एक सामाईक पार्श्वभूमी आहे, ती म्हणजे त्या दोघांनीही आपल्या सामाजिक कारकिर्दीची सुरुवात दक्षिण आफ्रिकेमध्ये काम फरक इतकाच की केली. पॉल हे विकसित पाश्चिमात्य जगातील आहेत गांधीजी विकसनशील आशियातील होते. कदाचित म्हणूनच पॉल आपल्याला वन्यजीवनाविषयीच्या कर्तव्याबाबत इशारा देतात, तर बापू आपल्याला तथाकथित विकसित शहरी माणसांपासून वेगळ्या असलेल्या माणसांविषयी म्हणजे ग्रामस्थांविषयी इशारा देतात. या दोन्ही वर्गवाऱ्यांमध्ये समानता आहे, पॉल वन्यजीवनाविषयी माणसांव्यतिरिक्त इतर प्रजातींविषयी बोलतात बापू माणसांविषयी बोलतात तरीही ही माणसे त्यांची जीवनशैली अधिवासाच्या बाबतीत आपल्यासारख्या शहरी माणसांपेक्षा वेगळी आहेत. बापूंनी ज्या माणसांचा उल्लेख केला आहे त्यामध्ये शेतकरी, आदिवासी गावातील स्थानिकांचा समावेश होतो, ते आपापल्या गावात बहुतेकवेळा निसर्गाच्या सान्निध्यात राहात असतात. त्यामुळे खरेतर हे दोघेही आपल्याला एकाच गोष्टीविषयी इशारा देतात, की तुमची प्रगती किंवा विकास होत असताना निसर्गाचा विसर पडू देऊ नका (त्याकडे दुर्लक्ष करू नका), ज्यामध्ये माणसे, वन्यजीवन, जंगले अशा प्रत्येक गोष्टीचा समावेश असतो. बापूंनी आपल्याला जवळपास सत्तर वर्षांपूर्वी हे सांगितले तर पॉल हे आपल्याला आजही सांगत आहेत, हीच आपल्या तथाकथित वाढीतील किंवा विकासातील विसंगती ( किंवा शोकांतिका म्हणा ) आहे !

 

मला माहिती आहे की हे सगळे रडगाणे नेहमीचेच आणि कंटाळवाणे आहे तुम्हाला कदाचित असे वाटत असेल की आपण विकासाच्या नावाखाली कशा चुका करत आहोत निसर्गाचा विध्वंस करत आहोत याविषयीच पुन्हा बोलले जात आहे. कारण वर्तमानपत्रांमध्ये जंगले कशी नष्ट होत चालली आहेत, माणूस प्राण्यांमध्ये होणारा संघर्ष आपण जलस्रोत डोंगरांसह निसर्गाचा कसा विध्वंस करत आहोत वगैरे, वगैरे बातम्यांनी रकानेच्या रकाने भरलेले असतात. मात्र हीच वर्तमानपत्रे या बातम्यांसाठी कारणीभूत असलेल्या उत्पादनांच्या पूर्ण पानी जाहिरातींनी भरलेली असतात. दुसरीकडे याच वर्तमानपत्रांमध्ये फक्त निसर्गाच्या ऱ्हासाविषयी बातम्या असतात ज्यामध्ये इमारती (म्हणजे सदनिका, कार्यालये इत्यादी), ऑटोमोबाईल, तेल वायू इतरही अनेक बाबींचा समावेश होतो, म्हणूनच निसर्ग किंवा वन्यजीवन किंवा जे काही असेल ते वाचविण्याविषयी एवढा फापटपसारा वाचून काय उपयोग आहे, मी तुम्हाला दोष देत नाही. केवळ वर्तमानपत्रेच नाहीत तर संपूर्ण समाज (म्हणजे जग) हा रिअल इस्टेट, ऑटोमोबाईल किंवा तेल किंवा प्रत्येक उद्योगाने निर्माण केलेल्या पैशांवर जगत असतो. याच पैशातून आपल्याला आपले अन्न, वस्त्र आपला निवारा मिळतो ज्याला आपण घर म्हणतो. आपल्याला आयुष्यातील सर्व सुखसोयी आराम मिळतात, त्यामुळे या प्रक्रियेमध्ये वन्यजीवनावर थोडा परिणाम झाला तर काय हरकत आहे! मान्य आहे, पॉल बापूंनी आपल्याला नेमक्या याविषयीच इशारा दिला आहे. कारण थोड्याशा विकसित माणसांनी फक्त आपल्याच सुख-सोयींसाठी जर अशा गोष्टी करायला सुरुवात केली तर इतरांची आयुष्ये थोडी आरामदायक बनविण्याविषयी कोण विचार करेल किंवा आपण थोडे हे दुसऱ्या शब्दात मांडू. आपले आयुष्य आरामदायक बनविण्यात काहीच गैर नाही परंतु जर ते  आयुष्य हजारो इतर जीवांना मारून बनविलेले असेल, तर असा आराम खरोखरच काय कामाचा, हा प्रश्न मला आपल्या सगळ्यांना विचारावासा वाटतो, म्हणूनच हा लेखप्रपंच. जर आपण स्वतःला विकसित बुद्धिमान मानत असू तर आपल्यासोबत सगळ्या नाही परंतु बहुतेक

जीवांनाआरामात जगता यावे यासाठी उपाययोजना शोधण्याची जबाबदारी कुणाची आहे, त्याचसाठी हा लेख लिहीत आहे.आता तुम्ही माझ्याशी सहमत असाल पुढे वाचण्याची तयारी असेल तर या शहरी जीवन विरुद्ध वन्यजीवनावरील या लेखासासाठी एका बातमी (नेहमीप्रमाणे) कारणीभूत (दररोज काहीना काही कारण घडतच असते) ठरली. ही बातमी पुण्याच्या उपनगरामध्ये रिक्षाची धडक एका रानडुकराशी होऊन रिक्षातील एक प्रवासी  ठार झाला इतर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले अशी होतीही बातमी स्थानिक वर्तमानपत्राच्या तिसऱ्या पानावर होती बरीच मोठी होती कारण असेही दररोज किमान पाच ते सहा लोक केवळ पुणे शहर आजूबाजूच्या भागातील रस्ते अपघातामध्ये आपला जीव गमावतात. परंतु सामान्यपणे माणसा-माणसांची धडक होऊन हे अपघात होतात, रानडुकरासारख्या एखाद्या वन्य प्राण्याशी धडक होऊन नव्हे. कारण एखादा मूर्ख प्राणी असे कसे करू शकतो, सर्वप्रथम त्याला माणसांनी त्यांच्या प्रवासासाठी बांधलेल्या रस्त्यांवर येण्याचा हक्कच नाही, दुसरे म्हणजे एखाद्या माणसाच्या वाहनाला आडवे जाताना तो हॉर्न का वाजवत नाही किंवा इंडिकेटरचा लाईट का दाखवत नाही शेवटचा मुद्दा म्हणजे माणसांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारी लहान वाहने ढकलण्याचा हक्क त्याला कुणी दिला, त्या रानडुकराला निष्काळजीपणे वाहन चालविण्यासाठी किमान सात वर्षांची शिक्षा झाली पाहिजे. (माफ करा खवचटपणा होता हा सगळा ) त्याचशिवाय आपल्या स्मार्ट झपाट्याने विकसित होत असलेल्या पुणे शहरामध्ये अशाप्रकारचा हा पहिलाच अनुभव असला, तरी दक्षिण भारतामध्ये महामार्गांवर जंगली हत्ती बरेचदा कारचा पाठलाग करत असल्याच्या बातम्या येतात बऱ्याच प्रकरणांमध्ये कारचे नुकसान होते प्रवाशांना इजा होते, या सर्व वन्य प्राण्यांना मोटर वाहन कायद्यांतर्गत शिक्षा झाली पाहिजे, मला खरोखरच आश्चर्य वाटते की एखाद्या स्वयंसेवी संस्थेने असे करण्यासाठी अजून जनहित याचिका कशी दाखल केलेली नाही. एवढेच पुरेसे नाही म्हणून की काय पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये (जुन्नर, नारायणगाव), बिबटे रस्त्यावरील प्रवाशांना त्रास देत आहेत, दुचाकींवरील प्रवाशांवर हल्ला करत आहेत, त्यांना जीवाच्या आकांताने पळायला लावत आहेत या वेड्या बिबट्यांच्या पाठलागामुळे वाहने घसरून त्यांना इजा होते, जे केवळ मजेसाठी हा पाठलागाचा खेळ खेळत असतात, आणखी काय? या बिबट्यानांपण शिक्षा झालीच पाहिजे, ( अजून थोडा खवचटपणा )

 

लोकहो माफ करा, फारच उपरोधिक बोलतोय (आणि माझ्यामध्ये तो ठासून भरलाय), परंतु वरील सर्व घटनांमध्ये जे जीव गेले त्यांच्याविषयी पूर्णपणे आदर राखत असे सांगावेसे वाटते की मी केवळ याचप्रकारे स्वतःला व्यक्त करू शकतो. बापूंनी आपल्याला अनेक दशकांपूर्वी दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्याचा हा परिणाम आहे असे मला वाटते आपण स्वतःला याची आठवण करून देण्यासाठीच हा लेखप्रपंच. बिबटे, हत्ती, जंगली अस्वले, वाघ माणसांवर हल्ले करत आहेत, (सुदैवाने पुण्याभोवतालच्या भागामध्ये अजून वाघ नाहीत) आता पुढे काय, जहाजांवर हल्ले करणारे व्हेल मासे किंवा विमानांवर हेलिकॉप्टरवर हल्ले करणारे गरूड; आपण या प्राण्यांच्या घरांवर (म्हणजे त्यांच्या अधिवासांवर) सातत्याने हल्ले केल्यामुळे ते जगण्यासाठी प्रतिहल्ला करत असल्याचे आपण पाहात आहोत. रानडुकराच्या धडकेमुळे झालेल्या अपघातात माणूस ठार झाला तर ती मोठी बातमी होते परंतु एखाद्या रानडुकराचा अवजड वाहनाखाली आल्याने मृत्यू झाल्यास ती छापण्यायोग्यही मानली जात नाही, हे कटू सत्य आहे. विचार करा ऑटो रिक्षाच्या जागी एखादा ट्रक किंवा एखादे मोठे वाहन असते तरीही ते रानडुक्कर त्याला धडकले असते तर काय झाले असते, कारण तुमच्या माझ्यासारखे त्याने वाहन चालवण्याचा परवाना घेतलेला नाही (त्या मूर्ख प्राण्याचा आणखी एक अपराध) त्याला कुणी वाहतुकीचे नियमही शिकवलेले नाहीत, अशा परिस्थितीत त्या रानडुकराचा मृत्यू झाला असता, बस्स! दुर्दैवाने, त्याची धडक एका रिक्षाशी झाली ज्यामध्ये एका माणसाचा मृत्यू झाला. मला खरोखरच कुतुहल वाटते की त्या रानडुकराचे पुढे काय झाले असेल याचा कुणीच विचार केला नसेल का (मी कुणाला मूर्ख बनवतो आहे). मला माहिती आहे बरेच (म्हणजे बहुतेक माणसे) जण मला विचारतील की मरण पावलेला माणूस माझा नातेवाईक असता तर मी असा लेख लिहीला असता का? मी मान्य करतो की मी कदाचित असे लिहीले नसते परंतु त्यामुळे वस्तुस्थिती बदलत नाही याचा आपण विचार केला पाहिजे, बरोबर? मृत व्यक्तीचे कुटुंब त्या रानडुकरावर चिडलेले असेल कदाचित त्यांना या संपूर्ण प्रजातीवर किंवा किमान त्या परिसरामध्ये राहणाऱ्या डुकरांच्यापण कुटुंबावर सूड उगवावासा वाटत असेल. अशाप्रकारे सूड उगवणे ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे. परंतु याच निसर्ग नियमाने दररोज हजारो वन्य प्राण्यांचा आपण त्यांच्या घरांवर अतिक्रमण केल्यामुळे मृत्यू होतो त्याचे काय? त्यांनी कुणावर कशाप्रकारे सूड उगवावा असा प्रश्न या लेखाद्वारे मला विचारावासा वाटतो. काही महिन्यांपूर्वी सुमारे १२ काळविटांचा पुणे-सोलापूर महामार्गावरील उड्डाणपुलावरून उडी मारल्याने मृत्यू झाला. ती अपघाताने या रस्त्यावर आली बाहेर पडण्याचा मार्ग सापडल्याने घाबरली. ही काळवीटे मूर्ख आहेत, एखाद्या काँक्रिटच्या महामार्गावर एवढे घाबरून जाण्यासारखे काय होते, त्यांनी रस्ता मोकळा होईपर्यंत वाट पाहायला काय हरकत होती किंवा ते अशा महामार्गांवर लावलेले आणीबाणी क्रमांक वाचू शकत नाहीत का, त्यांनी तो क्रमांक डायल केला असता मदत मागितली असती. नाही का ?

उड्डाणपुलावरून उडी मारायची काय गरज होती (उपहास)?

 या घटनांचा खरा गुन्हेगार किंवा त्यांचे कारण म्हणजे, आपण  गेल्या दहा वर्षात जवळपास .५० लाख हेक्टर जमीनीवरील जंगल गमावले आहे ही अधिकृत आकडेवारी आहे, म्हणजे प्रत्यक्ष आकडेवारी काय असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. बऱ्याच ठिकाणी लोकांना ( सरकारला) जाणीवही होत नाही की हे जंगल आहे त्यामुळे ते नाहीसे झाले तरी त्याची कुणालाही फिकीर नसते. केवळ रानडुकरेंच नाही तर बिबटे, हत्ती, कोल्हे, लांडगे, चिंकारा इतरही अशा हजारो प्रजातींना दररोज त्यांचे घर गमवावे लागत आहे. यासाठी आपण कुणाला दोष देणार आहोत कारण आपल्या तथाकथित विकासामध्ये लक्षावधी लोकांना अवैध घरांमध्ये राहावे लागत आहे जे नरकप्राय आहे, अशा परिस्थितीत चार पायी प्राण्यांच्या घरांची चिंता कोण करेल. बापूंनी म्हटल्याप्रमाणे जीवनशैलीमध्ये तफावत असल्यामुळे, खेडेगावात राहणारे लोक पुण्यासारख्या शहरी केंद्रांकडे धाव घेतात त्यामुळे माणसे प्राणी अशा दोघांसाठी अधिवासांच्या संतुलनाबाबत पूर्णपणे गोंधळ होतो. एकीकडे जंगले अतिक्रमणाचे सहज लक्ष्य ठरत आहेत तर पुण्यासारख्या शहरी केंद्रांमध्ये सर्व बाजूंनी स्थलांतर होत असल्यामुळे त्यावरील ताण अतिशय जास्त वाढत आहे, यामुळे येथील वन्यजीवन नष्ट होत चालले आहे. ताडोबासारख्या जंगलामध्ये, वाघांची संख्या वाढणे हे चांगले लक्षण असले तरी, या वाघांच्या वाढत्या संख्येसाठी पुरेसे जंगल नाही ज्यामुळेच माणूस प्राण्यांमधील संघर्ष वाढत असून त्यामध्ये माणसे तसेच वाघांचा (म्हणजे वन्यजीवनाचा) मृत्यू होत आहे. दक्षिण भारतातील जंगलांमधील हत्ती गव्यासारख्या प्राण्यांना मोठी जागा तसेच जास्त अन्न लागत असल्यास, त्यांना सर्वाधिक त्रास होतोय परिणामी मानवी वसाहतींवर अधिक हल्ले होत आहेत. त्याचशिवाय, वन विभागाच्या प्रयत्नांविषयी पूर्णपणे आदर राखून असे सांगावेसे वाटते की, वन विभागाला (संपूर्ण देशभरात) पुरेसा निधी मिळत नाही त्यामुळे वन्यजीवनाचे संरक्षण करताना त्यांची स्थिती सुळे पंजाची नखे नसलेल्या वाघासारखी होते, ही वस्तुस्थिती आपल्या महान मायबापांनी (केंद्र सरकारने) समजून घेतली पाहिजे त्यानुसार कृती केली पाहिजे.

वन विभागाने रानडुकरे बिबट्यांच्या हल्ल्यांच्या प्रवण क्षेत्रामध्ये येणाऱ्या रहिवाशांसाठी सूर्यास्तानंतर रात्री उशीरा घराबाहेर फिरू नये असे एक परिपत्रक काढले आहे. परंतु त्याची अंमलबजवाणी किंवा सक्ती कशी करायची, याचे आपल्याकडे काही उत्तर नाही. पुण्यासारख्या शहरामध्ये ज्यांच्याकडे चालक परवाना आहे अशा सर्व वयोगटातील व्यक्ती जर आजूबाजूला वाहतूक पोलीस नसेल तर लाल सिग्नल तोडतात. अशावेळी ज्या वनविभागाच्या हातात कोणतेही अधिकार नाहीत त्यांच्या रात्री रस्त्यावर बाहेर पडू नये यासारख्या मार्गदर्शक तत्वांचे लोक पालन करतील अशी अपेक्षा करून, आपण इतरांना नाही तर स्वतःलाच मूर्ख बनवत आहोत. लोक किती रात्री घरी बसतील रस्त्यांचा वापर करणार नाहीत. वन्यजीवनासाठी योग्य अधिवास उपलब्ध करून देणे हाच यावरील तोडगा आहे. माणसांना तसेच वन्य प्राण्यांनाही पाळता येणार नाही असे काहीतरी विचित्र नियम करून उपयोग होणार नाही. माणूस-प्राण्यांमधील संघर्षाचे कारण, केवळ वन्यजीवन हाताळण्यातील आपली असमर्थता एवढेच नसून, विकासाबाबत आपल्याला पुरेशी समज नसणे हेदेखील एक कारण आहे ज्यामध्ये माणसांनाही चांगली घरे मिळत नाहीत जे काही वन्यजीवन उरले आहे तेदेखील नष्ट होत आहे. जर आपल्याला वन्यजीवन टिकवायचे असेल तर आपण ही वस्तुस्थिती स्वीकारणे आवश्यक आहे. नाहीतर देवही रानडुकरे, बिबटे, हत्ती या प्राण्यांच्या आयुष्याचा भाग असलेली माणसे सुद्धा अशा सर्व प्रजातींना वाचवू शकणार नाही, तथास्तु!

 

संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स,

Smd156812@gmail.com

 

कृपया पुण्यातील रिअल इस्टेटविषयी माझा लेख खालील यूट्यूबच्या दुव्यावर

https://www.youtube.com/watch?v=g4xX7eopH5o&t=5s






      




No comments:

Post a Comment