परिकथा उमरेड
करंडलाच्या वाघिणीची..!!
“तुम्हाला तुमची मुले हुशार असावीत
असे वाटत असेल, तर त्यांना परीकथा वाचून दाखवा. ते खुप हुशार व्हावेत असे तुम्हाला वाटत असेल, तर
त्यांना आणखी भारत परीकथा वाचून दाखवा.”
― अल्बर्ट
आइस्टाईन.
आईनस्टाईन यांची काही ओळख करून देण्याची गरज
नाही, या जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती असण्यासोबतच ते एक तत्वज्ञ सध्या होते, अतिशय संवेदशील होते तसेच एक चांगली व्यक्ती होते व त्यांचा
परीकथांसारख्या गोष्टींवर विश्वास होता. मी त्यांचे विद्वत्तापूर्ण
शब्द अनेकदा वापरले आहेत परंतु वरील शब्द या लेखासाठी अगदी चपखल आहेत जो
पऱ्यांविषयी, म्हणजेच येथे वाघीणींविषयी (दुसरे काय) आहे, आता एखादाजण (किंबहुना
अधिक) कदाचित असे म्हणू शकतो की वाघासारख्या भीतीदायक,
हिंस्र, धोकादायक प्राण्याला कुणीही परी कसे म्हणू शकते! परंतु अशा कुणाही व्यक्तींना
(म्हणजे माणसांना) एकतर परीची संकल्पना समजली नाही किंवा वन्यजीवन समजलेले नाही, असेच
मी म्हणेन! तर, हा लेख वन्यजीवनाविषयी, वाघिणीविषयी व जंगलाभोवतालच्या लोकांविषयी आहे (काळजी करू नका, तो
ताडोबाविषयी नाही) व यावेळी जंगल आहे उमरेड कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्य जे
यूकेडब्ल्यूएस म्हणून ओळखले जाते, परंतु ते अलिकडे का चुकीच्या कारणांसाठी बातम्यांमध्ये आहे.
तुमच्यापैकी बहुतेकांनी समाज मध्यमाथून एका ध्वनीचित्रफित पाहिली असेल ज्यामध्ये एक वाघीण तिच्या पाच बछड्यांसोबत जिप्सींच्या गर्दीतून चालत जात असल्याचे दिसत आहे ज्यासाठी असा मथळा देण्यात
आला होता की ताडोबातील सहा वाघांचे दुर्मिळ दृश्य. या ध्वनीचित्रफितीतून अधिकाऱ्यांनी
चुकीचा निष्कर्ष काढला की बछड्यांसोबत चाललेल्या वाघीणीचा रस्ता पर्यटकांच्या
वाहनांमुळे अडवला गेला वगैरे वगैरे. अर्थात हा लेखाचा विषय नाही कारण मी याविषयी
आधीच माझे मत व्यक्त केले आहे, परंतु विषय आहे त्या ध्वनीचित्रफितीतील वाघीण, तिचे
नाव एफ२, वन विभाग व स्थानिक तिला फेअरी २ नावाने ओळखतात, म्हणून परीकथांचा संदर्भ
दिला आहे!
फेअरी २ हे नाव तिला तिच्या वारश्यावरुन देण्यात आले कारण तिच्या आईचे नाव फेअरी होते, या वाघीणीने उमरेड कऱ्हांडला
वन्यजीव अभरण्याला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवले. जवळपास आठ वर्षांपूर्वी पहिल्यांदा अशी वेळ
होती, जेव्हा एक वाघीण पाच बछड्यांना बेधडकपणे उमरेड कऱ्हांडला वन्यजीव
अभयारण्यातील चिंचोळ्या रस्त्यांवरून (हे तपशील लक्षात ठेवा) जात असतानाची छायाचित्रे समाज माध्यमांवर दिसली होती,
त्या काळी केवळ फेसबुक होते. दुर्दैवाने आपले (भारतातील) वन्यजीवन व्याघ्र केंद्रित आहे
व ते योग्य किंवा अयोग्य याचा निवाडा मी करत नाही परंतु त्याने वस्तुस्थिती बदलत
नाही. अभयरण्यात जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पक्षी निरीक्षण किंवा अभयारण्यातील
जलचरांचा अपवाद वगळता वाघच पाहायचा असतो व तुम्हाला सहा वाघ एकत्र आहेत हे दृश्य वारंवार पाहायला मिळत नाही. यामुळे केवळ उमरेड
कऱ्हांडला वन्य अभयारण्य केवळ वन्यजीवनाच्या नकाशावरच आले नाही तर त्यामुळे इथले
संपूर्ण समाज जीवनच बदलले कारण त्याने इथे येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढला व
त्यांच्यासोबत पैसा आला. तुम्हाला उमरेड कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्याच्या भौगोलिक
स्थानाविषयी माहिती नसेल (तुमच्यापैकी बहुतेकांना नसेल) उमरेडमधील जमीन ही खनिज
समृद्ध म्हणून ओळखली जाते. परंतु आता अनेकांना माहिती आहे की जंगलांचे पट्टे
वर्षानुवर्षे ताडोबा किंवा आंध्र प्रदेशातील जंगलांना किंवा अगदी मध्य प्रदेशातील
जंगलांना जोडतात. इथे वाघ नेहमीच असायचे परंतु त्यांच्यापैकी बहुतेक
स्थलांतर करताना इथे येत असत व ते क्वचितच या जंगलांमध्ये वास्तव्य करत असत.
म्हणूनच उमरेड कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्याचे स्थान वन्यजीवप्रेमींसाठी कधीही
आवर्जून पाहण्यासारख्या ठिकाणांच्या यादीत वरचे नव्हते. परंतु इथे फेअरीने प्रवेश केला व इथली
परिस्थिती बदलली... याचे कारण म्हणजे भोवताली जिप्सींचा वावर असतानाही बेधडपणे
दिमाखात चालत येणारी ही वाघीण व तिचे झपाट्याने वाढणारे बछडे. जवळच्याच ताडोबाच्या जंगलामध्ये बछडी
त्यांच्या आईपासून दीडवर्षातच वेगळी होत असताना, इथे मात्र भोवताली अनेक नर वाघ
असल्यास त्या सगळ्यांना योग्य येणारा ताण नव्हता, त्यामुळे ही बछडी जवळपास
अडीच वर्षे फेअरीसोबत राहिली. रातगावर ठेवण्यासाठी आणि या सगळ्यांना एकत्र पाहणे म्हणजे
सहा मोठे वाघ घोळक्याने चालत असल्याप्रमाणे दृश्य होते. पर्यटक हे दृश्य पाहून
आश्चर्यचकित होत असत व मीसुद्धा त्यापैकीच एक होतो. मी फेअरीला तिच्या पाच
बछड्यांसोबत पाहिले आहे जेव्हा तिची बछडी दीड वर्षांची होती व उमरेड कऱ्हांडला
वन्यजीन अभयारण्यातील रस्त्यांशी जुळवून घेताना सुद्धा पाहिले आहे !
याच कारणाने या वाघीणीला फेअरी हे नाव देण्यात आले
असावे कारण उमरेड कऱ्हांडला वन्य अभयारण्य हे अतिशय गरीब अभारण्य आहे कारण त्याचे
ठिकाण विकसित शहरी जगापासून तुटलेले आहेत, इथे पैसाही तुरळक होता व वाघ
दिसण्याचे प्रमाणही कमी होते परंतु फेअरीमुळे हे दृश्य एका रात्रीत बदलले. ज्या
ठिकाणी निवासासाठी एक चांगले हॉटेलही नव्हते तिथे आता एमटीडीसीसह जवळपास वीस
रिसॉर्ट आहेत. आता तुम्हाला लोक तिला प्रेमाने फेअरी म्हणून का ओळखतात यामागच्या भावना कळल्या असतील, कारण तिने इथल्या हजारो लोकांच्या आयुष्याचे
भले केले, तिच्या केवळ अस्तित्वाने त्यांच्या कुटुंबांमध्ये आनंद आणला. ज्या
लोकांना उमरेड कऱ्हांडलाचे तपशील माहिती नसतील, त्यांच्यासाठी सांगतो की इथे कऱ्हांडला
व गोठणगाव असे दोन विभाग आहेत त्यांचे आणखी एक
प्रवेशद्वारे म्हणजे पवनी जे महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला आहे. परंतु फेअरीने
गोठणगाव व कऱ्हांडला या विभागांना फेरीने घर बनवले, हा संपूर्ण भाग फक्त तिचाच होता . ही
झाली फेअरी १ची
गोष्ट व यातील समस्या अशी आहे की एकदा बछडी मोठी झाली व आपापल्या क्षेत्राच्या
शोधात विखुरली की अचानक ते कमी नजरेस पडतात व यामुळे पर्यटकांची संख्या रोडावते,
विशेषतः जेव्हा तुमच्या जंगलाचा विस्तार उमरेड कऱ्हांडला वन्य अभयारण्याइतका लहान
असतो. फेअरीने
एक अतिशय अभूतपूर्व अशी गोष्ट केली ते म्हणजे तिने तिच्या दोन बछड्यांना संपूर्ण
जंगलातील दोन भाग देऊन टाकले, त्यातील एक बछडी फेअरी २ आहे. आता उमरेड कऱ्हांडला वन्य अभयारण्यामध्ये तीन
वाघीणी व त्यांचे बछडे आहेत, तर कऱ्हांडाला विभागातील व वाघीणीला एक्स१ म्हणून ओळखले जाते, तर गोठणगावाच्या
भागावर एफ२चे म्हणजेच फेअरी२ चे राज्य आहे. फेअरीने जंगलाच्या एका कोपऱ्यामध्ये
आसरा घेतला आहे जे पवनीचे प्रवेशद्वार आहे व अगदी बफर क्षेत्रापर्यंतही विस्तारले
आहे.
या परीकथेची सर्वोत्तम बाब म्हणजे एफ२ही ही
परंपरा पुढे चालवत आहे, जो सर्व वन्यजीव प्रेमींसाठी आश्चर्याचा सुखद धक्का आहे, काही महिन्यांपूर्वी एफ२ ही
वाघीण उमरेड कऱ्हांडला वन्य अभयारण्याच्या चिंचोळ्या रस्त्यांवर (इथे पुन्हा एकदा
तपशीलांकडे दुर्लक्ष करू नका) तिच्या पाच बछड्यांसह दिसून आली व पाहिले तर स्थानिकांना असे वाटले की फेअरी स्वतःच पुन्हा अवतरली आहे. हेच दृश्य पाहण्यासाठी पर्यटक या ठिकाणी
गर्दी करत असत व अनेक दिवस वाट पाहात असत. पर्यटकांनी
अशीच एकदा गर्दी केलेली असताना आधी नमूद केलेली ध्वनीचित्र व्हायरल झाली व ती वन
विभाग तसेच स्थानिकांसाठीही डोकेदुखी होऊन बसली. आता फेअरी होण्याची काय किंमत मोजावी लागते
याविषयी, ज्यात अनेक पर्यटकांना रस नसतो परंतु ती खरोखरच मोजावी लागते जे मी
गोठणगावला अलिकडेच दिलेल्या भेटीत पाहिले. एकाच वेळी पाच बछड्यांना जन्म
देणे व त्यांचे पालनपोषण करणे हे किती कठीण काम आहे याची कल्पना आपल्या मानवी
बुद्धीला करताच येणार नाही. एकतर या बछड्यांना एकटीने जन्म द्यायचा, त्यानंतर त्या
बछड्यांची देखभाल करण्यासाठी सोबत कुणी नोकर-चाकर नसतात व त्यानंतर त्यांची भूक व
तहान यासारख्या मूलभूत मागण्या पूर्ण करायच्या. जेव्हा पाच बछडी असतात तेव्हा वाघीण त्यांना
फार काळ स्तन्यपान देऊ शकत नाही कारण त्यामुळे तिची सगळी शक्ती नष्ट
होते. त्याचवेळी, दररोज तुम्हाला सहा पोटे भरायची
असतात तीसुद्धा वाघांची, त्यामुळे गररोज एफ२ ला (व त्याआधी एफ म्हणजे
फेअरीला) शिकारासाठी भटकंती करावी लागत असे व या काळात तिच्या सर्वत्र बागडणाऱ्या
लहानग्या बछड्यांचे रक्षण करण्यासाठी कुणी नसताना त्यांना एकटे सोडून शिकारीला जात
असल्याचा ताण असे. ताडोबाच्या
उलट उमरेड कऱ्हांडला वन्य अभायारण्यामध्ये सुदैवाने इतर हिंस्र श्वापदे व नर वाघ
कमी आहेत तरीही बछड्यांना सर्प दंश व जलाशयात पडणे यासारखे कितीतरी धोके असतात. आईला स्वतःला सुरक्षित व तंदुरुस्त ठेवावे
लागते, कारण तुम्ही जंगलाची राणी असलात करीही, ते केवळ एक बिरुद आहे इथे तुम्हाला
आयते जेवण देण्यासाठी कुणीही नोकर चाकर नसतात. अलिकडेच एफ२ ला एका रात्री अपरात्री शिकार करताना इजा झाली व तिचे नाक सुजलेले होते
व त्याला जखमही झालेली होती, जी मी तिचे जे छायाचित्र काढले त्यात स्पष्टपणे दिसून
येत होती. तिला वेदना होत होत्या परंतु तिची पाच बछडी खेळत होती व
आईला तिच्या वेदना बाजूला ठेवून तिचे आईपणाची काम
करावे लागत होते. बिचारी राणी थोडा वेळ बछड्यांसोबत खेळली व गाईडने मला
सांगितले की तिने आधीच्या शिकारीतून फारसे काही खाल्लेले नव्हते कारण ते हरिणाचे
एक छोटेसे पाडस होते जे तिच्या बछड्यांसाठी जेमतेम पुरेसे होते, त्यामुळे तिला भूक
लागलेली होती. परंतु ती केवळ थोडा वेळ बछड्यांपासून बाजूला गेली व तिच्या
वेदनेपासून आराम मिळावा यासाठी जलाशयात विश्रांती घेतली. ती जखम तिच्या नाकावर असल्याने
ती चाटूही शकत नाही, जे वन्य प्राण्यांसाठी सर्वोत्तम औषध असते व तरीही ती तिच्या
बछड्यांसाठी धीर धरून होती, फेअरी अशीच आहे.
आता पर्यटन व त्यामुळे येणारा तथाकथित अडथळा,
या बाबी मी लेखात टाळू शकत नाही. आम्ही
संपूर्ण दिवसाची सफारी घेतली होती याचाच अर्थ असा होतो की सकाळच्या सफारीनंतर
संपूर्ण जंगलामध्ये केवळ दोनच वाहने होती पूर्ण दुपारभर आम्ही एफ२ ला विश्रांती घेताना पाहिले व तिची
बछडी तिच्या भोवती खेळत होती व परंतु वाघीण गाढ झोपलेली होती. दुपारची सफारीची वाहने ज्या
क्षणी जंगलात आली ती आपणहून उठली व रस्त्यावर आली, जणूकाही ती पर्यटकांना आपला कार्यक्रम
दाखवण्याचीच ती वाट पाहात असावी. तिला जणू स्थानिक लोकांप्रति असलेली तिची
जबाबदारी माहिती असावी, कारण त्यांचे उत्पन्न (म्हणजेच जीवन) पर्यटकांना वाघ
दिसण्यावर अवलंबून असते. मी काही भावनिक माणूस नाही व वन्यजीवन किती खडतर असते हे
जाणतो परंतु मी जेव्हा एफ२ ला माझ्या कॅमेऱ्याच्या लेन्ससाठी धाडसाने तिची सर्व
वेदना व अडी-अडचणी बाजूला ठेवून सर्व आघाड्यांवर तोंड देताना पाहिले, माझे डोळे
नकळत पाणावले. उमरेड कऱ्हांडला वन्य अभयारण्याची राणी होण्यासाठी तिला होत असलेले
त्रास व तोंड द्याव्या लागत असलेल्या अडीअडचणी पाहून मी तिला मनःपूर्वक सलाम केला.
त्याचवेळी जे म्हणतात की वन्यजीव पर्यटन हा वाघांसाठी अडथळा आहे त्यांच्याविषयी
पूर्णपणे आदर राखून असे म्हणावेसे वाटते की एफ२ ला तिच्या अवती-भोवती माणसांचा
वावर आवडत
असावा व तिला
त्यांच्या हजेरीत, पर्यटकांच्या, गाईड व जिप्सी चालकांच्या नजरेसमोर तिची बछडी
सुरक्षित आहेत असे वाटत असल्यासारखे वाटते. याचे कारण म्हणजे आमच्या पुढ्यात तिचे
बछडे सोडून ती शिकारीसाठी गेली, हे माझे प्रत्यक्ष जंगलातील निरीक्षण आहे एखाद्या
कार्यालयामध्ये बसून चॅट-जीपीटीवर लिहीलेला लेख नाही. त्याचवेळी मला एफ२ चे हे
वर्तन कदाचित अपघाताने जाणवले असावे परंतु गाईड व जिप्सी चालकांनीही ती नेहमी अशीच वागत असल्याची खात्री
केली. याचाच अर्थ असा होतो की सफारीच्या वाहनांमुळे वैतागण्याऐवजी किंवा
भेदरण्याऐवजी ही वाघीण त्यांच्यासोबत सहजपणे तिथे वावरते. तिला पर्यटक घुसखोर वाटत
नाही तर त्यांच्या उपस्थितीत तिला तिचे बछडे सुरक्षित वाटतात. माझ्या
विधानाची खात्री करणारा आणखी एक तर्क म्हणजे जर एफ२ ला ती तिच्या बछड्यांसोबत चालत
असताना जिप्सींनी तिची वाट अडवत असल्याचे वाटत असते तर तिने तिच्या बछड्यांना
आजूबाजूला वाहने असताना बाहेरही पडू दिले नसते. परंतु परिस्थिती वेगळीच आहे, दररोज ती
जिप्सी भोवती असताना त्यांना रस्त्यावर आणत असते, यातून काय दिसून येते असा प्रश्न
मला ज्यांना वन्य पर्यटन हा वन्यजीवनासाठी अडथळा आहे असे वाटते त्या सगळ्यांना
विचारासा वाटतो. एक कारण म्हणजे, एफ२ ला अगदी ती बछडी असल्यापासून
सफारीची वाहने व तिच्या प्रत्येक हालचालीवर रोखलेले पर्यटकांचे कॅमेरे ओळखीचे आहेत
व तिची त्याला काहीच हरकत नाही, आता याला आपण सहजीवनाशिवाय दुसरे काय म्हणू शकतो.
अर्थात याचा अर्थ असा होत नाही की आम्ही
वाघांचा मार्ग अडवू शकतो किंवा त्यांना अडथळा येईल असे करू शकतो किंवा कोणत्याही
वन्य प्राण्याला जंगलातील त्याच्या हक्कांपासून वंचित ठेवू शकतो. परंतु काही
मूलभूत नियमांचे पालन केल्याशिवाय हे साध्य होणार नाही जे प्रत्येक अभयारण्यामध्ये
संबंधित जंगलाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार वेगळे असू शकतात. उमरेड कऱ्हांडला वन्य
अभयारण्यातील रस्ते अतिशय चिंचोळे आहेत व आपण ते थोडेसे रुंद करू शकतो किंवा आपण स्वयं-शिस्तीचे
पालन करू शकतो ज्याद्वारे प्रत्येकाला आळीपाळीने वाघ पाहता येईल व सर्वोत्तम
छायाचित्रे घेता यावीत यासाठी आपली हाव बाजूला ठेवली पाहिजे. तेथील परिस्थिती अशी
आहे की जर एफ२ किंवा कोणताही वाघ रस्त्यावर असेल तर केवळ दोन किंवा तीन जिप्सीतील
पर्यटक वाघाला पाहू शकतात व जे मागे उरतात त्यांना केवळ वाघांचा केवळ काही भागच
समोर दिसतो व जर त्यांनी अशाप्रकारे वाघ दिसल्याची छायाचित्रे काढली तर ते
वाघांसाठी किंवा वन्य प्राण्यांसाठी अडथळा असल्याचा शिक्का बसतो जी प्रत्यक्षात
परिस्थिती नसते. वन विभागाने आता तज्ञांची एक समिती तयार करण्याची वेळ आली आहे अशी एखादी घटना घडल्यास जी
वन्यजीव पर्यटनाच्या कोणत्याही पैलूविषयी पक्षपातीपणे धोरणे तयार करणार नाही व योग्य प्रकारे चुकीची वन्यजीव
पर्यटन आनंदादायक होईल व त्याच्याशी संबंधित सर्वांना सहजीवनाचा मार्ग खुला होईल. जर वन विभागाला यासंदर्भात काही समस्या
असतील, तर माननीय उच्च न्यायालयाने कृपया आपणहून हस्तक्षेप केला पाहिजे व प्रत्येक
जंगलासाठी तसेच एकूणच सर्वांसाठी योग्य मार्गदर्शक तत्वे तयार केली पाहिजेत.परंतु
त्यासाठी वन्यजीवनाच्या एखाद्याच पैलूविषयी नव्हे तर एकूणच वन्यजीवनाविषयी योग्य
मानसिकता असली पाहिजे आणि कोणत्याही घटकावर अन्या होऊ
नये हीच त्यामागची अपेक्षा .
सरतेशेवटी माझ्या बारा वर्षांच्या
लेखनाच्या कार्यकाळामध्ये पहिल्यांदाच लेखाचा शेवट करण्यासाठी मी एखादया अवतरणाचा वापर करतो
“परीकथा
या वास्तवापेक्षाही बरेच काही असतात: केवळ
ड्रॅगन अस्तित्वात असतात असे त्या आपल्याला सांगतात म्हणून नव्हे, तर ड्रॅगनचा
पराभव केला जाऊ शकतो असेही त्या आपल्याला सांगतात म्हणून.”― नील गेमन; उमरेड कऱ्हांडला वन्यजीव
अभयारण्यातील फेअरीच्या गोष्टीमध्ये, ड्रॅगन म्हणजे आपल्या संपूर्ण
वन्यजीवनाविषयीचा चुकीचा दृष्टीकोन असेच मला म्हणावेसे वाटते, व त्यांचा पराभवर हाच उमरेड कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्यातील
फेअरीच्या कथेचा योग्य शेवट किंबहुना योग्य सुरुवात असेल, एवढे सांगून निरोप घेतो!
या परिकथेतील काही बहुमूल्य क्षण सोबतच्या लिंक वर पाहू शकता
https://www.flickr.com/photos/65629150@N06/albums/72177720323886782/
संजय देशपांडे
www.sanjeevanideve.com
www.junglebelles.in