Thursday, 3 September 2020

स्टॅम्प ड्युटी बचत महा सेल

 









सरकारच्या अर्थव्यवस्थेविषयीच्या दृष्टिकोनाचा सारांशकाही वाक्यात देता येईल: ती गतिमान असेल, तर तिच्यावर कर लावा. ती गतिमान राहिली तर ती नियमित करा. तिची गती थांबली तर तिला अनुदान द्या... रोनाल्ड रिगन.

या नावाची ओळख करून द्यायची गरज नाही. परंतु जगाशी अनभिज्ञ असलेल्या काही लोकांच्या माहितीसाठी सांगतो, रोनाल्ड विल्सन रिगन हे अमेरिकी राजकीय नेते होते ज्यांनी १९८१ ते १९८९ पर्यंत अमेरिकेचे ४०वे अध्यक्ष म्हणून काम केले. ते आधुनिक पुराणमतवादाचा अतिशय प्रभावी आवाज झाले. अध्यक्षपदावर निवड होण्याआधी ते हॉलिवुडचे अभिनेताहोते व कॅलिफोर्नियाचे ३३वे गव्हर्नर म्हणून सेवा देण्यापूर्वी कामगार नेतेही होते. मला आनंद वाटतोय किंबहुना रिअल इस्टेटशी संबंधित बहुतेक लोकांना आनंद होईल की शेवटी आपल्या देशातील शासनकर्त्यांनी श्री. रिगन यांचाच राग आळवायला सुरूवात केली आहे.होय, मी जमीन/सदनिका/दुकाने किंवा कोणतीही स्थावर मालमत्ता ज्याला आपण रिअल इस्टेट म्हणतो त्यावरील मुद्रांक शुल्काविषयी आणि कदाचित सध्याचा  सर्वात मोठ्या व सकारात्मक बातमीविषयी (म्हणजे पावलाविषयी) बोलतोय. ही किती मोठी बातमी आहे हे महत्त्वाचे नाहीतर गेल्या काही काळापासून रिअल इस्टेटसाठी दुर्मिळ झालेले सरकारचे सकारात्मक पाऊल किंवा बातमी आहे हे जास्त महत्त्वाचे आहे.

ही बातमी म्हणजे रिअल इस्टेटमधील अनेक लोकांसाठी (बांधकाम व्यावसायिकांसाठी) रणरणत्या उन्हात वाऱ्याची झुळूक असावी तशी आहेव नेहमीप्रमाणे माध्यमांनी रिअल इस्टेटसाठी वरदान व बांधकाम व्यावसायिकांसाठी उचलेले पाऊल म्हणून तिचे कौतुक केले. खरोखर मुद्रांक शुल्क हे खूप मोठे पाऊल आहे व जे यामुळे अतिशय आनंदात आहेत त्यांच्याविषयी पूर्ण आदर राखत असे सांगावेसे वाटते की हे केवळ तीन महिन्यांसाठी आहे व त्यानंतर २१ मार्चपर्यंत ते ३.असेलम्हणून जवळपास सहा महिने घर किंवा जमीन किंवा कोणतीही मालमत्ता खरेदी करण्याची धामधूम असणार आहे.(अशी अपेक्षा आहे)  मी टीका करत नाही परंतु मला सांगावेसे वाटते की सरकारने जाहीर केलेल्या उपाययोजनांपैकी ही केवळ एक आहे, तसेच ही बांधकाम व्यावसायिकांसाठी नाही तर सदनिकाधारकांसाठी आहे. परंतु त्यामुळे अधिक ग्राहक घर घेण्यासाठी पुढे येतील व घर घेण्याचे निश्चित करतील. मात्र यातून घराच्या ग्राहकांची बचत होईल, बांधकाम व्यावसायिकांची नाही हे लक्षात ठेवा. यातही बरेच जण म्हणतील (अगदी माझे सहकारी बांधकाम व्यावसायिकही) की आता मी का रडतोय, मी रडत नाही, तर मी फक्त व्यवसायातील वस्तुस्थिती सांगतोय. यामुळे उलाढाल नक्कीच वाढेल जो मंदीचा (लॉकडाउनचा) एक पैलू होताराज्य सरकारने उचललेले हे पाऊल स्वागतार्ह आहे कारण त्यामुळे त्यांच्या खिशाला बराच खड्डा पडणार आहे मात्र एखादा मोठा कपड्यांचा ब्रँड जसा“ तीन दिवसांचा सेल जाहीर करतो, अगदी त्याच प्रकारे हे मोजूनमापून उचललेले पाऊल आहे, केवळ इथे मोठ्या ब्रँडच्या जागी मायबाप सरकार आहे. आत्तापर्यंत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सरकार दोन व्यक्ती मध्ये होणाऱ्या स्थावर मालमत्तेच्या कोणत्याही व्यवहारावर मुद्रांक शुल्क नावाचा अधिभार (तो कर नाही हे लक्षात ठेवा) किंवा शुल्क किंवा सेवा शुल्क किंवा तुम्हाला त्याला जे काही म्हणायचे असेल ते आकारते. हा व्यवहार दोन बांधकाम व्यावसायिकांमध्ये असू शकतो, बांधकाम व्यावसायिक-जमीन मालकांमध्ये असू शकतो, बांधकाम व्यावसायिक-सदनिका ग्राहकांमध्ये असू शकतो किंवा अगदी दोन सदनिका ग्राहकांमध्येही असू शकतो म्हणजे सदनिकांच्या पुनर्विक्रीचे व्यवहारआत्तापर्यंत हे शुल्क संपूर्ण व्यवहार मूल्याच्या जवळपास ७पर्यंत किंवा रेडी रेकनरदराएवढे यापैकी जो अधिक असेल त्यानुसार होते. म्हणजे तुम्ही १ कोटी रुपये मूल्याची एखादी जमीन किंवा सदनिका किंवा दुकान खरेदी केल्यास तुम्हाला राज्य सरकारला या व्यवहारावर मुद्रांक शुल्क म्हणून जवळपास ७ लाख रुपये भरावे लागायचेआता या “महा सेल ऑफरमुळे”, ते २० डिसेंबरपर्यंत केवळ लाख रुपये असेल व त्यानंतर २१ मार्चपर्यंत ३. लाख रुपये असेल.  (अर्थात, मी हे लिहायला सुरुवात केली तोपर्यंत नेहमीप्रमाणे नवीन शासनादेश म्हणजेच जीआर आला होता व त्यानुसार पुणे महानगरपालिका/पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत महा सेल ऑफर” मध्ये जाहीर करण्यात आलेले २% मुद्रांक शुल्क वाढवून 3% करण्यात आले व पुणे महानगरप्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीत ते ३.%  असेल, सरकार अशाच प्रकारे काम करते)

सध्याचा काळात प्रत्येक रुपया महत्त्वाचा  आहे अशा काळात विशेषतः ज्यांना खरोखर सदनिका किंवा कार्यालय खरेदी करायचे आहे त्यांच्यासाठी ही मोठी बचत असणार आहे. परंतु घराच्या  ग्राहकांनी   (म्हणजे मालमत्ता खरेदीदाराने) हे  समजून घेतले पाहिजे की हा त्याच्यासाठी थेट सरकारने दिलेला लाभांश आहे व सरकारने दिलेल्या मुद्रांक शुल्क सवलतीच्या सेलमधून बांधकाम व्यावसायिकांना एक रुपयाही मिळणार नाही. माध्यमांसोबतच अनेक इच्छुक ग्राहक या परिस्थितीचे चित्र रिअल इस्टेटचे अच्छे दिन पुन्हा आले आहेत असे रंगवत आहेत. सरकारच्या मुद्रांक शुल्क कमी करायच्या निर्णयामुळे केवळ बांधकाम व्यावसायिकांना फायदा होईल असे वाटते; नाही साहेब, असे अजिबात नाही व बांधकाम व्यावसायिकांनीही हे समजून घेतले पाहिजे. मुद्रांक शुल्कात कपात झाल्यामुळे लोकांना घर किंवा कार्यालय किंवा दुकान घेण्याचा त्यांचा निर्णय निश्चित करता येईल व मालमत्तेच्या खरेदी मूल्यावर बचत करता येईल. यामुळे रिअल इस्टेटच्या बाजाराला गती मिळेल व पैसा खेळता राहील, जो बांधकाम व्यावसायिकांना वापरता येईल असा तर्क त्यासाठी दिला जातो. मी बांधकाम व्यावसायिकांना जाणीवपूर्वक इशारा देतोय जे सामान्यपणे विक्रीलाच आपला नफा समजून बसतात. ग्राहक आता पूर्वीसारखे अजाण व मूर्ख राहिलेले नाहीत, शार्क माशाला रक्ताचा वास येतो त्याप्रमाणे त्यांनाही लगेच परिस्थितीचा सुगावा लागतो. अर्थात त्यात चुकीचे काहीच नाही कारण वर्षानुवर्षे याच्या उलट परिस्थिती होती, म्हणून आता परिस्थिती बदलली आहे.आता ग्राहक जास्तीत जास्त फायदेशीर व्यवहार पदरी पडावा यासाठी घासाघीस करतील. सरकार जर त्यांच्या उत्पन्नामध्ये तोटा सहन करून शकते तर बांधकाम व्यावसायिक का करू शकत नाहीत असा विचार ते करतील. म्हणून आता बांधकाम व्यावसायिकांच्या तसेच ग्राहकांच्या संयमाची परीक्षा आहे. कारण एकाला त्याचे उत्पादन विकायची नितांत गरज आहे व दुसऱ्याला त्याची ही गरज माहिती आहे. आत्तापर्यंत ग्राहकांना घर घेण्याची घाई नव्हती मात्र त्यांना सरकारद्वारे आपल्या बचतीतून कमवायचे असेल तर वेळेची मर्यादा आहे, हा त्यांच्यासाठी इशारा आहे.

मला असे वाटते सरकारने अनेक वर्षांमध्ये पहिल्यांदाच चांगले पाऊल उचलले आहे कारण मालमत्ता नोंदणीवरील मुद्रांक शुल्क हा त्यांच्या महसूलाचाही स्रोत आहे व राज्य सरकारला दरवर्षी अंदाजे ३०,००० कोटी रुपये (२०२० याचे अपेक्षित उत्पन्न ) त्यातून मिळतात. आता मुद्रांक शुल्काच्या बाबतीत सरकारला उच्च विक्री मूल्यामुळे काहीच उलाढाल न होण्यापेक्षा विक्री मूल्य कमी करून कमविणे हा अधिक चांगला मार्ग आहे हा अगदीच बनियाप्रमाणे विचार आहे (म्हणजे मारवाडी विचार आहे, यात कुणालाही दुखवायचा हेतू नाही खिलाडू वृत्तीने घ्या). मुद्रांक शुल्क कमी करण्याच्या निर्णयाबाबत सगळ्यात चांगली बाब म्हणजे मायबाप सरकारने पहिल्यांदाच शहाणपणाचा किंवा तर्कसंगत विचार केला आहे व महसूल कमविण्यामध्ये रिअल इस्टेट उद्योग (म्हणजे बांधकाम व्यावसायिक) हा आपला भागीदार आहे हे स्वीकारले आहे, कारण जर रिअल इस्टेट उद्योगाचे नुकसान झाले तर सरकारचेही नुकसान होईल.

आता रिअल इस्टेटने (म्हणजे सदनिका ग्राहक तसेच बांधकाम व्यावसायिक दोघांनीही) या उद्योगाच्या इतर आघाड्यांवरही आणखी काही धाडसी व तर्कसंगत निर्णयांची अपेक्षा करावी व त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे पायाभूत सुविधांचा विकासआम्ही वर्षानुवर्षे शहरातील केवळ काही जागी किंवा भागांमध्येच नाही तर सर्व उपनगरांमध्ये सातत्याने व संतुलित पायाभूत सुविधांचा विकास व्हावा अशी मागणी करत आलो आहोत ज्यामध्ये रस्ते, पाणी, सांडपाणी व सार्वजनिक वाहतूक यांचा समावेश होतो. यामुळे ग्राहकाला घर घेण्यासाठी पर्याय मिळतो तसेच या सगळ्या गोष्टी असताना त्याचा किंवा तिचा स्वतःचे घर घेण्याचा आत्मविश्वास वाढतो, कारण बांधकाम व्यावसायिक एकटा आपल्या प्रकल्पाभोवती या सुविधा कधीच विकसित करू शकत नाही. पायाभूत सुविधांमुळे विकासासाठी अधिक जमीन उपलब्ध होते व अशाप्रकारे अंतिम उत्पादनाचे म्हणजे घराचे दर बांधकाम व्यावसायिक व घराचे ग्राहक या दोघांसाठीही नियंत्रणात राहतात. इतर कोणत्याही खाजगी संघटनेप्रमाणे सरकारच्या निधी पुरवठ्याविषयी मर्यादा आहेत व मुद्रांक शुल्काच्या उत्पन्नात झालेली घट पाहून त्याला संपूर्ण रिअल इस्टेट उद्योग तोट्यात जाण्याचा धोका असल्याचे पहिले लक्षण असल्याची जाणीव झाली. परंतु मी म्हटल्याप्रमाणे इतर उपाययोजनाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत व पायाभत सुविधा विकसित करण्यासोबतच अवैध घरे किंवा झोपडपट्ट्यांवरही निर्बंध घातले पाहिजेत. त्यामुळे दोनप्रकारे फटका बसतो एक म्हणजे त्यामुळे सरकारी तिजोरीत शून्य रुपये जमा होतात व दुसरे म्हणजे प्रामाणिक मार्गाने पैसा कमविणाऱ्या रिअल इस्टेटसाठी ते धोका आहेत. म्हणूनच, या सर्व गोष्टींचा विचार करून सरकार जो योग्य विचार करत आहे तोच कायम राहील अशी आशा करूया.

त्याचप्रमाणे पूर्ण झालेल्या घरावर जीएसटी नाही यासारख्या धोरणांचाही फेरविचार केला पाहिजे कारण तो एक मोठा अडथळा आहे. यामुळे घराचा ग्राहक घर खरेदी करण्याचा निर्णय लांबणीवर टाकतो कारण असेही दर वाढत नाहीत. म्हणूनच तयार किंवा बांधकाम सुरू असलेल्या कोणत्याही प्रकारच्या घरावर सारखाच जीएसटी आकारला पाहिजेत्याचप्रमाणे घराच्या ग्राहकाने समजून घेतले पाहिजे की ते ताबा मिळण्यासाठी तयार घराकरता थांबले तर त्यांना मुद्रांक शुल्काच्या सवलतीवर पाणी सोडावे लागेल कारण मुद्रांक शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव मर्यादित काळासाठी आहे. मी रिअल इस्टेटच्या बाबतीत कधीही घाई करा, मर्यादित साठा आहे वगैरेसारखा सल्ला देणार नाही, किंबहुना रिअल इस्टेट आहे म्हणूनच तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या व सजगपणे निवड करा. पण आधी तुम्ही, आधी तुम्ही करता करता, लखनौच्या दोन नवाबांची गाडी त्यांना प्लॅटफॉर्मवरच सोडून निघून गेली होती” या प्रसिद्ध हिंदी म्हणीप्रमाणे योग्य वेळी निर्णय घेण्यालाही अतिशय महत्त्व आहे.

शेवटी आता मुद्रांक कमी करण्यासाठी राज्य सरकारचे आभार मानण्यासोबत रिअल इस्टेट ही बांधकाम व्यावसायिक, घराचे ग्राहक व सरकार यातिघांची शर्यत आहे हे स्वीकारूयात; आपल्याला अंतिम रेषा योग्य वेळी गाठायची असेल तर तिन्ही घटकांनी सोबत, एकाच दिशेने व एकमेकांना मदत करत धावले पाहिजे, एकमेकांना आपापल्या दिशेने खेचून उपयोग नाही हे नेमके लक्षात ठेवा, सर्वांना अनेक शुभेच्छा!

 

संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

smd156812@gmail.com

 

 























Thursday, 27 August 2020

तुमची घर नावाची संपत्ती!





























कल्पना करा  जर आपल्याकडे शिशिर ऋतू  नसता तर, वसंत ऋतुचे  आगमन एवढे आल्हाददायक वाटले  नसते: जर आपल्याला कधी  संकटांना तोंड द्यावे लागले नाही, तर समृद्धीचा खरा  आनंद आपण कधीच समजु शकणार नाही."... ॲनी ब्रॅडस्ट्रीट.

 

ॲनी ब्रॅडस्ट्रीट या उत्तर अमेरिकेतील सुरुवातीच्या काळातल्या अतिशय नामवंत कवयित्री होत्या इंग्लडच्या उत्तर अमेरिकी वसाहतींमधील पहिल्या लेखिका होत्या ज्यांचे लेखन प्रकाशित झाले. त्या अमेरिकी साहित्यातील पहिल्या तत्वनिष्ठ व्यक्ती होत्या त्यांनी विपुल कविता लेखन केले, तसेच त्यांचे बरेच वैयक्तिक लेखन मरणोत्तर प्रकाशित झाले. खरोखर, त्यांचे शब्द सभोवतालच्या अंधारामय वातावरणात प्रकाश दाखवतात. मात्र नेहमीप्रमाणे रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती असे साहित्य कधी वाचत नाहीत किंवा समजावुन घेत नाहीत, कारण आपल्याला वाचनाची किंवा साहित्यची दखलच नाही किंवा इतर कोणत्याही अशा  सांस्कृतिक गोष्टीची सवयच नसतेपण मला नेहमी असे वाटते, की रिअल इस्टेटची (म्हणजे बांधकाम व्यावसायिकांचीसमाजात एकूणच प्रतिमा फारशी चांगली नाही किंवा त्यांना आपल्या शासनकर्त्यांच्या, माध्यमांच्या किंवा सामान्य माणसाच्या नजरेत आदर मिळत नाही याचे कारण आयुष्यातील आजुबाजुला घडणाऱ्या अनेक लहानसहान गोष्टीं आहेत ज्याकडे रिअल इस्टेटमध्ये काम करणारे आपण नेहमी दुर्लक्ष करतो. कारण आपली प्रतिमा शक्तिशाली, गडगंज श्रीमंत  पैशाच्या जोरावर काहीही करू शकतात अशी आहे. माफ करा मित्रांनोहे जरा फारच बोचणार वाक्य असेल पण हेच सत्य आहेतुमच्या मित्रमंडळींना किंवा तुमच्याभोवती असलेल्या कुणालाही विचारा, त्याने किंवा तिने मनमोकळे उत्तर द्यायचे धाडस केले, तर मी असे का म्हटले हे तुम्हाला समजेल! जाऊ दे, बांधकाम व्यावसायिकांवर किंवा रिअल इस्टेटवर टीका करणे हा माझा उद्देश नाही. तर रिअल इस्टेटची म्हणजेच घरांची घर घेऊ इच्छणाऱ्या ग्राहकांची परिस्थिती काय आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे, कारण ते रिअल इस्टेटचे ग्राहक आहेत. म्हणून मला वाटले आपण आधी कोणत्या परिस्थितीत आहोत किंवा आपल्या त्रुटी समजून घेणे महत्त्वाचे आहे त्याच गोष्टींची खरी अडचण आहे नेहमी त्रास होतो. कारण आपण कधीही मोकळेपणानी आपल्या त्रुटी स्वीकारत नाही. आता आपण लॉकडाउनच्या शेवटच्या टप्प्यात आहोत, अर्थात विषाणूची, साथीची भीती अजूनही आहेच. परंतु लोकांनी आता विषाणूला स्वीकारले आहे व ही साथ आपल्यासोबतच असणार आहे याचा स्वीकार करून हळूहळू आयुष्याची गाडी रुळावर येतेय (अर्थात तिचा वेग फारच मंद आहे).

म्हणून अर्थातच प्रत्येक घटकाला (म्हणजे व्यवसायाला) आता एकच गोष्ट जाणून घेण्यात रस आहे, ती म्हणजे माझ्या व्यवसायाचे भविष्य काय असेल मी किंवा आपण गेल्या सहा महिन्यात झालेले नुकसान कसे भरून काढणार आहोत?  खरे पाहता, रिअल इस्टेटसाठी लॉकडाउनची सुरुवात 20 मार्चपूर्वीच झाली होती, जर लॉकडाउन हा शब्द जाचक वाटत असेल तर आपण त्याला लॉकडाउन (मंदी) म्हणू शकतो. मी नेहमी सांगतो तसे ही परिस्थिती म्हणजे युद्धासारखी होती आणि आता आपण युद्धानंतरची परिस्थिती पाहात असताना, युद्धाने रिअल इस्टेटच्या (बांधकाम व्यावसायिक) त्यांचे ग्राहक अशा दोन्ही बाजूंचे काय नुकसान केले आहे ते पाहू. कारण तरच आपण नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःला तयार करू शकू त्यानंतरच आपण फायदा  कमावण्याचा विचार करू शकतो हे अगदी घराच्या ग्राहकांसाठीही खरे आहे.  आता, घराचे ग्राहक विचारतील, मला घर खरेदी करून फायदा कसा कमवता येईल, मला माझी आयुष्यभराची कमाई यासाठी खर्च करावी लागणार आहे, त्यानंतर माझ्यासाठी काय फायदा राहील? ही केवळ बांधकाम व्यावसायिकांचीच नवीन क्लुप्ती दिसते, अशीही टिप्पणी फ्लॅट खरेदी करणारा एखादा (खरेतर अनेक) पुणेकर करू शकतो आणि मी त्यांना दोष देत नाही. तर आता खरच  घराच्या खरेदीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायची वेळ आली आहे; कारण मला तुम्हाला विचारावेसे वाटतेआपण सोने का खरेदी करतो, जी आपल्या मध्यम किंवा उच्च मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये अगदी महत्वाची गोष्ट आहे. सोने हे लग्नासाठी किंवा एखाद्या आप्तकालीन परिस्थिती साठी असते व जेव्हा खरोखर एखादी अशी परिस्थिती येते, तेव्हा बहुतेक लोक सोने विकण्याऐवजी कर्ज घेतात ही वस्तुस्थिती आहे, म्हणूनच थोडक्यात आपण आपल्या मानसिक समाधानासाठी खरेतर सोने खरेदी करतो. त्यामुळे आपल्याला कोणतीही आणीबाणी आली त्याला तोंड देता येईल हे मानसिक बळ मिळते उदा. आजारपण, नोकरी गेली, लग्नाचा खर्च इत्यादी. आपण कधीच असा विचार करत नाही की सोन्याचे दर गेल्या चार वर्षांपासून स्थिर आहेत व मध्ये तर थोडे कमीही झाले होते. अर्थात आता पुन्हा ते दर आकाशाला भिडले आहेत, केवळ पाच महिन्यांच्या काळात जवळपास दुप्पट झाले आहेत व आपल्या सगळ्यांना त्याचे कारण माहिती आहे ती म्हणजे भोवतालची अनिश्चितता. आता मला सांगा केवळ किंमत दुप्पट झाली म्हणून कोणत्या मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय कुटुंबाने त्यांचे सोने विकले, मला खात्री आहे कुणीच विकले नसेल कारण हा सर्व नफा सोन्यातील गुंतवणूकदारांनी मिळवला असेल. रिअल इस्टेटमध्येही अशीच परिस्थिती आहे, जे घर (म्हणजेच फ्लॅट/प्लॉट/दुकान/कार्यालय) विकण्यासाठी त्यात गुंतवणूक करतात ते त्यातून नफा मिळवतात, कारण कुणीही राहण्यासाठी घर खरेदी केले असेलतर तो किंवा ती ते विकण्याचा विचार कधीच करणार नाहीहे सोन्याप्रमाणेच सत्य आहे.

आता मला सांगा, सध्या स्थितीतील जर तुम्हाला नोकरीची, व्यवसायाची किंवा उत्पन्नाची काळजी असेल मग ते पगारातून मिळणारे असेल, व्यापारातून किंवा व्यवसायातून अशावेळी तुमचे खरे बलस्थान काय, कारण ही वेळ तुमच्यासाठीच नाही तर सगळ्यांसाठीच कठीण आहे. तुम्हाला भाड्याच्या घरात जास्त चिंता नब्बरत राहता येईल का  जिथे नियमितपणे एक  ठराविक रक्कम द्यावीच लागते का तुम्हाला स्वतःच्या घरात किंवा कार्यालयात जागा हवी जिथून तुम्हाला कुणीच कधीच काढू शकत नाहीशिवाय तुम्ही जर ते घर विकायचा निर्णय घेतला तुम्हाला दुसऱ्या एखाद्या ठिकाणी जायचे असेल तर खरे पाहता तुम्हाला फारशी तडजोड करता फायदेशीर व्यवहार करता येईल, याचा विचार करा. आता पुन्हा एकदा अनेक जण म्हणतील आम्हीचं  का तडजोड करायचीघर विकतांनी पण ? मग तुम्ही सोने विकताना (विकलेच तर) घडणावळीचे पैसे किंवासोन्याच्या दागिन्यांची वाढ-घट स्वीकारत नाही काइथेही तसेच आहे, एक चांगले घर किंवा कार्यालय घेताना तुमच्या अपेक्षेच्या तुलनेत तुम्हाला कदाचित थोडा तोटा होऊ शकतो. मात्र तुम्ही ज्या किमतीत खरेदी केले ज्या किमतीला विकले याची तुलना केली तर तुमचा फायदाच झाला हे दिसून येईल. तसेच तुम्ही तुमच्या विक्रीतून जेव्हा दुसरे घर खरेदी करणार असता तेव्हा त्या विक्रेत्याशी वाटाघाटीही करू शकता, नाही का?  तुमच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता असणे महत्त्वाचे आहे ज्यामुळे आयुष्यातील कोणत्याही विपरित परिस्थितीला तुम्ही आरामात तोंड देऊ शकाल  यासाठी तुमचे स्वतःचे घर किंवा कामाचे ठिकाण याहून अधिक चांगला पर्याय असू शकत नाही.

मी हे बांधकाम व्यवसायिकांचा प्रतिनिधी म्हणून लिहीत नाहीये, मी स्वतः एक व्यावसायिक आहे तरीही मी जे काही लिहीले आहे ते डोळे झाकून स्वीकारू नका, तुम्ही स्वतःचे डोकेही वापरा, त्याचे विश्लेषण करा तुम्हाला जे वाटते मित्रांशी बोला, त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे कृती करा. मी सोन्याचे उदाहरण जाणीवपूर्वक दिले कारण नाहीतर समभाग, म्युच्युअल फंड यासारखेही पर्याय आहेत पण तुम्ही त्याचा वापर करू शकत नाही. तुम्ही तुमच्याकडे असलेली समभाग प्रमाणपत्रे, मुदत ठेवी किंवा बंधपत्रांमध्ये राहू शकत नाही, केवळ सोने व घराचा  तुम्ही वापर करू शकताइथे पुन्हा एकदा घर सोन्यावर मात करते कारण सोन्याप्रमाणे कुणी तुमचे घर चोरू शकत नाही म्हणूनच घर ही एक गरज तसेच सुरक्षित गुंतवणूक ठरते. घर इतर कोणतीही वस्तू किंवा गुंतवणूकीपेक्षा नेहमी वेगळेच राहील कारण इथे तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्ती  ज्यांना आपण परिवार म्हणतोत्यांच्याबरोबर आयुष्यातील सर्वोत्तम क्षण जगलेले असता, इतर कोणतीही मूल्यवान गोष्ट, अगदी कोहिनूर हिराही तुम्हाला हे समाधान किंवा शांती देऊ शकतो का, हे स्वतःला विचारा.

फक्त स्वतःसाठी घर निवडताना तुम्हाला हुशारीने निवड करावी लागेल, त्यातून योग्य लोकेशन जागा, सुविधा तसेच पुनर्विक्रीसाठी  सुद्धा तुम्हाला पैशांचा पुरेपूर मोबदला मिळेल असे पाहारिअल इस्टेटची (म्हणजे घराची) समस्या अशी आहे की, की त्यावर एम.आर.पी. म्हणजे बाजारातील किरकोळ विक्री मूल्याचा टॅग लावलेला नसतो व संपूर्ण जगभरात अशीच परिस्थिती आहेकोणत्याही दोन घरांची किंमत अगदी सारखी असू शकत नाही किंवा त्यांची तुलना करता येत नाही, कारण जमीनीचे दर, बांधकामचे दर, स्थानिक कायदे नियम असे अनेक घटक घराच्या बांधकामात समाविष्ट असतात ज्यांचा घराच्या मूल्य निर्धारणावर परिणाम होतो. तरीही तुम्ही सर्वसाधारण तुलना करू शकता म्हणूनच बांधकाम व्यावसायिक काय दर सांगतोय यापेक्षाही तुम्ही घरासाठी किती पैसे मोजायला तयार आहात, एका चांगल्या घराचे तुमचे काय निकष आहेत याचा तुम्ही विचार करा असा सल्ला मी देईन. आणि हो, भविष्याचा विचार करता चांगली पार्श्वभूमी असलेला विकासक फार महत्त्वाचा ठरतो ज्याकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात, परंतु हेच लोक भाजी खरेदी करताना ती कुठून आली असेल किंवा कुत्र्यासारखा पाळीव प्राणी आणताना ते कोणत्या प्रजातीचे आहे याचा विचार करतात पण घराच्या बाबतीत हा विचार करत नाहीत.

म्हणूनच मित्रांनो, साथीचे  हे संकट अंतिम टप्यात असले तरीही ते संपुष्टात आलेले नाही, आणि त्यामुळे झालेल्या जखमा लवकर भरून निघणार नाहीत, त्याचे व्रण काही काळ राहतील पण आयुष्य थांबणार नाही ही वस्तुस्थिती आहेॲनी ब्रॅडस्ट्रीट यांनी लिहील्याप्रमाणे, तुम्हाला शांती आणि समृद्धी अनुभवायची असेल तर त्यासाठी आधी थोडी आपत्ती सहन करणे आवश्यक आहेआणि मग येणाऱ्या सुखी काळाचा आनंद घेण्यासाठी स्वतःच्या घराहून अधिक चांगले काय असू शकतेएवढाच विचार करा !

संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स

smd156812@gmail.com