Tuesday 21 September 2021

योग्य घराची निवड!

 











































































तुम्ही नशीब आजमावण्यासाठी घरातून बाहेर पडता मग जेव्हा तुमची भरभराट होते आणि तुम्ही घरीच परत येता सगळ्या कुटुंबासोबत त्याचा आंनद घेता” … अनिता बेकर.

अनिता डेनिस बेकर ही एक अमेरिकी गीतकार आहे. ती १९८० च्या दशकात क्वाएट स्टॉर्म हा सांगितिक कार्यक्रमांचा प्रकार लोकप्रियतेच्या शिखरावर असताना भावस्पर्शी गायन करणारी एक अतिशय लोकप्रिय गायिका होती. घर कुटुंबाविषयीच्या भावनांची इतकी उत्तम समज असणाऱ्या अनिताच्या गीतांनी लाखो हृदयांचा ठाव घेतला यात काहीच आश्चर्य नाही. मी जाणीवपूर्वक घर कुटुंब याविषयी भावना हे शब्द वापरले. कारण घर काँक्रिट, विटा, लाकडापासून उभारलेले असू शकते, मात्र कारण कोणतीही इमारत त्यापासूनच तयार होते, मात्र त्या इमारतीशी निगडित भावनांमुळेच तर त्याचे घर होते! सजीव प्रजातींच्या कोणत्याही समूहाला आपण जथ्था, कळप, झुंड अशी विविध नावे देऊ शकतो, मात्र जोपर्यंत या जथ्थ्यातील, कळपातील किंवा झुंडीतील प्राणी (म्हणजे कोणतेही सजीव) भावनांनी एकमेकांशी बांधलेले नसतात तोपर्यंत त्यांना कुटुंब म्हणता येणार नाही. त्यामुळेच एखाद्या घरामध्ये कुटुंब राहात असेल तरच त्याला पूर्णत्व येते असे मला वाटते. म्हणूनच घर बांधतांना किंवा ते खरेदी करताना प्रत्येकाने त्यामध्ये राहणाऱ्या आपल्या संपूर्ण कुटुंबाचा विचार केला पाहिजे. मी माझ्या लेखाच्या सुरुवातीला उपदेशाचे एवढे डोस का पाजतोय असा विचार तुम्ही करत असाल तर सांगतो की माझा शाळेतील एक मित्र त्याच्या मुलासोबत नुकताच भेटायला आला होता, ज्याला पुण्यामध्ये स्वतःसाठी घर खरेदी करायचे होते त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मला हा लेख लिहावासा वाटला.

मी घर कुठे खरेदी करू असा प्रश्न मला कुणीही विचारताच, मला अतिशय संतुलित उत्तर द्यावे लागते. कारण एक बांधकाम व्यावसायिक असल्यामुळे मी जर माझ्या प्रकल्पांमध्ये घर खरेदी करा असे उत्तर दिले तर मी सर्वात मोठा मूर्ख ठरेन. मी आधी व्यावसायिक आहे त्यानंतर व्यापारी आहे (बांधकाम व्यावसायिक) हे विसरून चालणार नाही. लोकांना (म्हणजे ग्राहकांना) त्यांच्यासाठी योग्य घर म्हणजे काय याची जाणीव करून देण्यासाठी मार्गदर्शन करणे हे माझे काम आहे त्यानंतर माझा प्रकल्प त्यांच्यासाठी योग्य आहे का हे ठरविणे त्यांचे काम आहेया लेखामागचा मूळ विचार हाच आहे, कारण चांगले घर किंवा वाईट घर असे काहीही नसते, लोक मला नेहमी याविषयी विचारतात. कोणतेही घर वाईट नसते, घर हा शब्द कधीही वाईट असूच शकत नाही, फक्त कदाचित फक्त तुमच्यासाठी ते योग्य घर असणार नाही. म्हणून, मला तुम्हाला सर्वप्रथम हे सांगायचे आहे की तुम्ही घर शोधताना त्याला योग्य किंवा अयोग्य ही मोजपट्टी वापरा, चांगले किंवा वाईट अशी मोजपट्टी लावू नका. इथे बरेच जण गोंधळात पडतील की चांगले किंवा वाईट घर योग्य किंवा अयोग्य घर यामध्ये काय फरक आहे? त्यासाठी तुम्हाला घराचे विविध निकषांवर विश्लेषण करावे लागेल तुम्हाला केवळ तुमचा नाही तर संपूर्ण कुटुंबाचा घराविषयीचा दृष्टिकोन विचारात घ्यावा लागेल.

कोणत्याही घरासाठी पूर्वापार चालत आलेला सर्वात महत्त्वाचा निकष म्हणजे, घराचे ठिकाण किंवा स्थान किंवा पत्ता !. मी त्यांना आयफोनचे उदाहरण देतो, तुम्ही जेव्हा आयफोन खरेदी करता तेव्हा तुम्ही कुठल्याही ठिकाणाहून किंवा शहरातून खरेदी केलात तरीही तुम्हाला त्याच्या किमतीपासून ते कॅमेऱ्याच्या दर्जापर्यंत सारखीच सेवा किंवा परिणाम मिळतो, बरोबरम्हणजेच, तुम्ही आयफोन मुंबईतून खरेदी करा किंवा रायपूरमधून किंवा सिवनीमधून (एमपी) किंवा सोलापूरमधून, त्याची किंमत जवळपास सारखीच असेल आयफोनद्वारे तुम्हाला मिळणारी सेवाही सगळीकडे सारखीच असेल. मात्र हा नियम घर नावाच्या इमारतीला मात्र लागू होणार नाही, तुम्ही ते घर कुठे खरेदी करत आहात यावरून ते तुमच्यासाठी योग्य आहे किंवा अयोग्य हे ठरणार आहे. इमारतीच्या बांधकामाचा खर्च इतर तपशील तुम्ही कोणत्याही शहरात, कोणत्याही ठिकाणी सारखाच (जवळपास) ठेवू शकता, मात्र त्यामध्ये राहणाऱ्या लोकांना त्याचा किती उपयोग होईल यात नक्कीच फरक असेल. उदाहरणार्थ विदर्भातील किंवा मराठवाड्यातील एखाद्या दुर्गम भागात बांधलेले घर, मुंबईच्या धारावीतील झोपडपट्टी, पुण्यातील बाणेर किंवा हडपसर यासारखी विपसित उपनगरे किंवा दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू वस्ती किंवा पुण्यातील प्रभात रोडवरील घर तुम्हाला सारख्याच प्रकारे उपयोगी पडेल का, याचे उत्तर अर्थातच नाही असे आहे. याचा अर्थ ती इमारत अशा ठिकाणी बांधल्यामुळे चांगली नाही असा होतो का, नाही, मात्र तो योग्य पर्याय ठरणार नाही कारण आपण घर म्हणून जी इमारत शोधत आहोत तिचा वापर ठिकाणानुसार बदलतो, तसेच त्याची किंमतही बदलते, म्हणूनच रिअल इस्टेट ही इतर कोणत्याही उत्पादनापेक्षा अतिशय वेगळी ठरते. तुम्ही जेव्हा घर शोधत असता, तेव्हा तुम्ही योग्य ठिकाणची निवड केली पाहिजे जेथे भूतकाळ, वर्तमानकाळ भविष्यकाळातील पायाभूत सुविधा, दळणवळण, भोवतालचा परिसर किंमत या सगळ्यांचे योग्य संतुलन असले पाहिजे तसेच तुम्हाला ते घर अतिशय उपयोगी ठरेल.

त्यानंतर घराचा सर्वात महत्त्वाचा सर्वात दुर्लक्षित भाग येतो तो म्हणजे, घराचे नियोजन, मी जेव्हा नियोजन म्हणतो तेव्हा त्यात अंतर्गत बाह्य नियोजन या दोन्हीचा समावेश होतो. अंतर्गत नियोजनामध्ये घरातील एकमेकांना जोडलेल्या खोल्या, खोल्यांचा योग्य आकार तसेच ये-जा करण्यासाठी कमीत कमी जागा वाया घालवणे, असे असले तरीही प्रत्येक खोलीचा खाजगीपणा टिकून राहिला पाहिजे त्यात नैसर्गिक प्रकाश तसेच खेळती हवा असली पाहिजे, जे एका निरोगी घरासाठी अतिशय आवश्यक आहे. बाह्य नियोजनामध्ये प्रत्येक मजल्यावर सदनिकांना जोडणारा सामाईक पॅसेज मार्गिकांचा समावेश होतो. तसेच पायऱ्यांचा टप्पा पर्यंत ठेवण्यास कायद्याने परवानगी आहे मात्र सहजपणे चढता यावे यासाठी तो पर्यंतच असला पाहिजे, अशा अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात ज्या तुम्ही नंतर बदलू शकत नाही. या साथीच्या रोगानंतर संपूर्ण शहर आपापल्या संकुलामध्ये बंद झाल्यानंतर, इमारतींभोवताच्या मोकळ्या जागा, तसेच वरील सामाईक गच्ची अतिशय महत्त्वाची झाली आहे कारण आपण त्यांचा वापर चालण्यासाठी किंवा खुले व्यायामशाळा वगैरेसाठी करू शकतो. त्याशिवाय तुमच्याकडे तळघर असेल तर तिथे तसेच रँप पार्किंगच्या भागात नैसर्गिक प्रकाश आला पाहिजे ज्यामुळे तुमच्या सामाईक विजेच्या बिलात बचत होईल. पार्किंगचे रँप तसेच बाजूला सोडलेल्या जागाही तपासून घ्या कारण कोणतीही कार आरामात वळवता यावी यासाठी, किमान १४ फुटांची जागा बाजूला सोडणे आवश्यक आहे. अगदी शौचालयाचा आतील भागही महत्त्वाचा असतो जेथे ओला भाग (अंघोळ करण्याचा भाग) कोरड्या भागापासून पूर्णपणे वेगळा केलेला असतो, ज्यामुळे शौचालयाची साफसफाई वापर सहजपणे करता येतोमी अनेक ग्राहक पाहिले आहेत जे वास्तु शास्त्रानुसार नियोजन केले जावे अशी मागणी करतात (माझा त्यावर विश्वास नाही परंतु अनेकांसाठी तो भावनिक मुद्दा आहे, ज्याचा मी स्वागतच करतो) मात्र ते नियोजनाच्या मूलभूत घटकांकडे दुर्लक्ष करतात जे तुमचे आयुष्य तसेच कोणतेही घर आरामदायक बनविण्यासाठी जबाबदार असतात, जो योग्य घर ठरविण्यामध्येही अतिशय महत्त्वाचा घटक आहे.

तसेच अनेक लोक घराच्या सुविधांचे तपशील विचारतात, घरात बसविल्या जाणाऱ्या बांधकाम साहित्यासाठी अक्षरशः हजारो पर्याय उपलब्ध असतात त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांसाठी तसेच वास्तुविशारदासाठी सगळ्यांना आवडेल असे साहित्य निवडणे हे अवघड काम असते. हे साहित्य निवडण्याचा माझा मुख्य निकष म्हणजे नळजोडणीसाठी वापरले जाणारे साहित्य, इलेक्ट्रिकल स्विच, दरवाजे तसेच इतरही अनेक गोष्टींच्या बाबतीत त्या किती टिकाऊ आहेत हाच असतो. घर तुमच्यासोबत पन्नासहून अधिक वर्षे राहणार असते त्यामुळे एवढा काळ घर तंदुरुस्त निरोगी राहावे यासाठी जबाबदार असलेले सर्व छुपे घटकही टिकाऊ असले पाहिजेत. दरवाजे बसविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बिजागऱ्या तसेच वॉश बेसिन किंवा कमोड बसविण्यासाठीच्या कड्या, तुमच्या डोळ्याला दिसत नाही त्यापेक्षाही महत्त्वाच्या असतात. म्हणूनच केवळ महागड्या किंवा आकर्षक सामग्रीमुळेच चांगले घर होते असे नाही तर घर बांधताना वापरलेल्या साहित्याचा टिकाऊपणा किंवा दणकटपणामुळे चांगले घर बांधले जाते. तुम्ही घराची सजावट करताना तुम्ही महागडे किंवा आकर्षक साहित्य वापरू शकता. मात्र ज्याप्रमाणे आपले सौष्ठव रोगप्रतिकार क्षमतेमुळे आपले शरीर तंदुरुस्त होते, केवळ आपली त्वचा, रंग किंवा आपण घातलेल्या कपड्यांमुळे नाही. त्याचप्रमाणे चांगले घरही दणकट टिकाऊ साहित्यावर अवलंबून असते त्याचसाठी तुम्ही तुमच्या बांधकाम व्यावसायिकांना त्यांच्या चमूला महत्त्वाच्या म्हणजेच कारागिरी बांधकामाच्या प्रक्रियांविषयी प्रश्न विचारणे आवश्यक आहे.

घरासंदर्भात दुर्लक्षित होणारा आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे त्याचे लहानातले लहान तपशील जे तुम्हाला चकचकित माहिती पत्रकात किंवा घराच्या त्रिमितीय फेरफटक्यामध्ये दिसणार नाहीत. मात्र थोडीशी विवेकबुद्धी तसेच तुम्हाला जगाचा जो काही अनुभव आहे तो वापरून हे तपशील शोधू शकता. सुरक्षा दरवाजा एमएस चौकटीमध्ये बसवलेला असला पाहिजे म्हणजे कुणालाही दरवाजाचे कुलुप कापता येणार नाही. तसेच मुख्य दरवाजाला दोन कोंडे असले पाहिजेत म्हणजे तुम्हाला कुणीही स्वतःच्याच घरात बाहेरून बंद करू शकणार नाही. प्रत्येक मजल्याच्या मार्गिकेमध्ये सीसी टीव्ही असला पाहिजे, तसेच प्रत्येक मजल्यावर महत्वाचे अत्यावश्यक संपर्क दूरध्वनी क्रमांक लावलेले असले पाहिजेत. पाण्याच्या वाहिनी तसेच विद्युत वाहिन्यांवर खुणा केलेल्या असल्या पाहिजेत म्हणजे देखभालीच्या वेळी काही अडचण होणार नाही. त्याचप्रमाणे सर्व अंतर्गत भिंतीही रुंद असल्या पाहिजे म्हणजे एका खोलीतील बोलणे दुसऱ्या खोलीत ऐकू जाणार नाही, अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचे तपशील एका चांगल्या घरासाठी आवश्यक असतात. तसेच तुमच्या बाल्कनीची संरक्षक भिंत, व्हरांडा, गच्ची किंवा अगदी पाण्याच्या टाकीचा सुरक्षा कठड्याची उंची फूटांची असली पाहिजे. तसेच पाण्याच्या टाकीच्या वरच्या भागाचे निरीक्षण करण्यासाठी वर चढण्याकरता एक दणकट शिडी असली पाहिजे, या सगळ्या गोष्टींमुळे अतिशय फरक पडतो मात्र त्याकडे कुणाचेही लक्ष जात नाही. तुम्हाला माहिती आहे का जपानी कार निर्माते किंवा युरोपीय कार निर्माते हे भारतीय कार निर्मात्यांपेक्षा सरस का आहेत, याचे कारण म्हणजे कारच्या निर्मितीमध्ये प्रत्येक बारिक सारिक तपशीलाचा विचार केला जातो तुम्ही जेव्हा गाडी चालवता तेव्हा चालकाला त्या तपशीलांचे महत्त्व समजते, योग्य घरासाठीही हाच तर्क लागू होतो. त्याचप्रमाणे स्वतःच्या डोळ्यांनी खुल्या मनाने पाहा, मात्र बहुतेक ग्राहक केवळ चकचकीत फर्निश केलेला फ्लॅट इटालियन मार्बलच्या मार्गिका पाहतात या सादरीकरणावर भाळून चुकीच्या घराची निवड करतात. याचा अर्थ असा होत नाही की सादरीकरण महत्त्वाचे नाही, ते निश्चितपणे महत्त्वाचे आहे, मात्र योग्य घर निवडताना तुम्हाला काय सादर केले जात आहे हे देखील तपासा.

त्याचप्रमाणे यामध्ये कायदेशीर घटक, तसेच तुम्ही कोणत्या लोकांसोबत व्यवहार करत आहात या बाबीही असतात. तुम्ही समाज माध्यमांवरून याची खात्री करून घेऊ शकता किंवा बांधकाम व्यावसायिकाच्या सध्याच्या ग्राहकांशी संवाद साधू शकता सदर बांधकाम व्यावसायिकाकडून त्यांचा घर खरेदी करण्याचा अनुभव जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे बांधकाम व्यावसायिकाच्या फक्त विक्री किंवा विपणनच नाही तर प्रत्येक बांधकाम स्थळावरील चमूशीही बोला ते त्यांचे काम किती मनापासून करत आहेत हे ठरवा, कारण घर बांधणाऱ्या संपूर्ण टीमचा घराविषयीचा दृष्टिकोन योग्य असेल तरच तुमचे घर योग्य प्रकारे बांधले जाते.

तुमच्यासाठी योग्य घर निवडण्यासाठी वर केवळ काही घटक नमूद करण्यात आले आहेत, मात्र ती परिपूर्ण यादी नाही. घरामध्ये सतत बदल होत असतात, मात्र चूक किंवा बरोबर कधीही बदलत नाही, जर निषकांच्या बाबतीत तुमचे विचार स्पष्ट असतील. वरील सर्व निकष तपासून झाल्यानंतर किमतींकडे पाहा कारण या घटकाच्या बाबतीत तुम्ही योग्य घरासाठी किती किंमत मोजू शकता हे तुम्हीच ठरवू शकता, नाही काचला तर मग, तुमच्यासाठी योग्य घर नेहमीच वाट पाहात असते, त्यासाठी तुम्हाला फक्त योग्य घराची योग्य व्याख्या करावी लागेल!

 

You can read in English version:

http://visonoflife.blogspot.com/2021/09/choosing-right-home.html  

 

संजय देशपांडे,

आणि संजीवनी टीम! 

 

 


No comments:

Post a Comment