Wednesday 15 September 2021

रस्ते, वन्यप्राणी व मानव नावाचा दैत्य!

 

























वन्यजीवनाचा वापर केला जात असताना, त्याला त्रास दिला जात असताना त्याचे शोषण केले जात असताना मानवता शांतपणे पाहात उभी राहू शकत नाही. आपण सगळ्यांनी एकजूट होऊन उभे राहिले पाहिजे, वेळ निघून जाण्याआधी जे मूक आहेत त्यांचा आवाज व्हायला पाहिजे. कारण नामशेष होणे हे कायमस्वरूपी असते.” …पॉल ऑक्स्टन.

पॉल हा वाईल्ड हॉर्ट वाईल्डलाईफ फाउंडेशनचा संस्थापक आहे वन्यजीवनाचे भविष्य आपल्या हातात आहे हे त्यांच्या मोहिमेचे घोषवाक्य आहे. जोहॅनसबर्ग, दक्षिण आफ्रिका येथे असलेले हे वाईल्डहार्ट वाईल्ड लाईफ फाउंडेशन ही एक ना नफा तत्वावर चालविली जाणारी संघटना आहे (सामाजिक विकास विभागाकडे नोंदविण्यात आलेली). या क्षेत्रात मोठा परिणाम घडविण्यासाठी आम्हाला जे काही शक्य आहे ते आम्ही करत आहोत असे ते सांगतात. आम्ही ज्या वन्यजीवांना धोका आहे त्यांना मदत करण्यासाठी जगतो. आम्हाला प्राण्यांसाठी काम करायला आवडते आम्ही प्रत्येक प्राण्याला मदत करण्यासाठी आमच्यापरीने शक्य ती सर्व मदत करतो.” मी पॉलचे असे अनेक शहाणपणाचे शब्द एकदा नाही तर अनेकदा वापरले आहेत विशेषतः वन्यजीवन याविषयी लेख लिहीताना हा विषयही याला अपवाद नाही. या प्रस्तुत लेखाचा विषय, रस्त्यावरील अपघात हा असला तरी त्याचे कारण आहे मी नुकतीच ताडोबाच्या जंगलाला दिलेली भेट. यावर अनेक जण (म्हणजे जे वन्यजीवप्रेमी नाहीत) नेहमीप्रमाणे म्हणतील की, अरे देवा पुन्हा ताडोबा!”. लोकहो आता यावर काही उपाय नाही, लॉकडाउन न्यू न्यूनॉर्मलनंतर प्रवास करणे विशेषतः आपल्या राज्याबाहेरील प्रवास अवघड झाला आहे. माझे मित्र अनुज खरे मला ताडोबाअभयारण्यांच्या नव्या प्रवेशद्वारांच्या परिसरात भटकंती करायची होती म्हणूनच मी ताडोबाला जायचे ठरवले. मलापुण्याहून रस्त्याने ताडाबोला जायला नेहमीच आवडते, कारण वाटेत मला शेगावला श्री गजानन महाराजांचे दर्शन घेता येते.

बहुतेक वन्यजीव प्रेमींना (वन्यजीव प्रेमी नसलेल्यांनाही) ताडोबाची ओळख व्याघ्र प्रकल्प म्हणून आहे, इथे येणारे पाहुणे क्वचितच त्या पिवळ्या काळ्या पट्ट्यांच्या प्राण्याचे दर्शन होता परतात एवढे चांगल्या प्रकारे इथे वाघांचे संवर्धन करण्यात आले आहे. मला देखील हिरव्यागार पार्श्वभूमीवर वाघाची छायाचित्रे काढायची होती, जी तुम्हाला ताडोबामध्ये मॉन्सूनच्या काळात काढता येतात. तसेच मी ताडोबामध्ये मॉन्सूनमध्ये म्हणजे पावसाळ्यात कधी गेलो नव्हतो पावसाच्या स्पर्शाने ही भूमी कशी दिसते हे अनुभवले नव्हते. तर या पार्श्वभूमीवर मी अनुज ताडोबाच्या अलिगंजा प्रवेशद्वारापाशी पोहोचलो, तिथेचिमूरकडून जाता येते जे कोअर क्षेत्राच्या कोलारा प्रवेशद्वारापासून जवळ आहे. आता ताडोबाच्या कोअर बफर क्षेत्रात जाण्यासाठी पंधराहून अधिक दरवाजे आहेत पावसाळ्यामध्येबफर क्षेत्राचेच प्रवेशद्वार पर्यटकांसाठी सुरु असते. याचे काय कारण आहे हे मला समजत नाही, पावसाळ्यातही कोअर क्षेत्रातील केवळ मोटरने जाण्यायोग्य रस्ते पर्यटकांसाठी सुरु का ठेवले जात नाहीत ताडोबामध्ये असे रस्ते बरेच आहेत. जास्तीत जास्त लोकांनी जंगलांना ताडोबासारख्या ठिकाणांना भेट देणे आवश्यक आहे, कारण यामुळेच ताडोबासारख्या जंगलांभोवती राहणाऱ्या लोकांची पर्यटनावर उपजीविका चालू शकते. मात्र ज्याप्रकारे सरकार (सर्व राज्ये) पर्यटनावरील शुल्क वाढवत आहे त्यामुळे वन्यजीव पर्यटन केवळ श्रीमंतांपुरते फक्त मौजमजेसाठी एकदाच भेट देणाऱ्यालोकांपुरतेच मर्यादित राहते दोन्ही वर्गवाऱ्या वन्य जीवन संवर्धनासाठी काहीच करत नाहीत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, समाजाच्या ज्या वर्गातील लोक वन्य जीवनाचे संवर्धन करू शकतात किंवा वन्यजीवनाचे संवर्धन करण्यासाठी मदत करू शकतात त्यांना ताडोबासारख्या जंगलांना वारंवार भेट देणे परवडत नाही एवढे इथे येणे महाग झाले आहे. आपण सर्व मोसमांमध्ये आणखी जंगले उघडून सध्या उघड्या असलेला प्रवेशद्वारांचा खर्च कमी करू शकतो जे एकूणच वन्यजीवन संवर्धनासाठी वरदान ठरेल (सरकारमधील कुणीतरी कृपया हे वाचावे त्यावर विचार करावा).

त्याचवेळी आपण जर मॉन्सूनमध्ये अभयारण्ये सुरु ठेवल्यामुळे वन्यजीवनाच्याखाजगीपणावर (म्हणजे वाघांच्या) परिणाम होईल असा विचार करत असू तर बफर क्षेत्रामध्ये सुध्दा वाघांचे प्रजनन सुरू असते ते निरोगी आनंदी असतात म्हणून पावसाळ्यामध्ये जंगले खुली ठेवल्याने वाघांच्या वन्यजीवनाच्या खाजगीपणात अडथळा येईल, हा तर्क येथे लागू होत नाही एवढेच मला सांगावेसे वाटते.आता अलिगंजा प्रवेशद्वाराविषयी सांगायचे झाले, तर तुम्हाला सांगतो की कान्हा किंवा कॉर्बेट या अभयारण्यांमध्ये ज्याप्रकारे झाडे, फुले, पक्षी कीटकांची वैविध्यपूर्ण समृद्ध जैवविविधता आहे त्याप्रमाणेच ताडोबा कधीच निसर्गवैविध्य निसर्ग सौंदर्यासाठी जास्त प्रसिद्ध नव्हते (ताडोबाप्रेमींविषयी पूर्णपणे आदर राखत असे म्हणत आहे). मात्र अलिगंजा प्रवेशद्वाराला भेट दिल्यानंतर हे मत निश्चितच बदलले. ताडोबाच्या या भागाला तुम्ही आवर्जून भेट दिली पाहिजे, म्हणजे तुम्हाला इथे किती समृद्ध जैवविविधता आहे याचा अंदाज येऊ शकेल. तिथे असताना आमच्या जिप्सीभोवती शेकडो फुलपाखरे उडत होती (हे खरेतर वाघांपेक्षाही दुर्मिळ दृश्य आहे), त्यामुळे मला मी डिस्नेच्या ऍनिमेशन पटामध्ये काम करत असल्यासारखे वाटत होते ही नक्कीच जंगलातील समृद्ध जैवविविधतेची खूण आहे.तिथेएका धबधब्याच्या पार्श्वभूमीवर प्राचीन शिव मंदिर आहे, धबधब्यामुळे तिथे पाण्याचा डोह निर्माण झाला आहे. हे दृश्य थेट इंडियाना जोन्ससारख्या एखाद्या हॉलिवुडच्या चित्रपटातील वाटते. शहरी जीवन काँक्रिटची जंगले विसरण्यासाठी कुणालाही आणखीन काय हवे असते, म्हणूनच प्रत्येकाने काही वेळ निसर्गाच्या सान्निध्यात घालवला पाहिजे हेच आपल्याला सुरक्षित ठेवायचे आहे. त्यासाठी अधिकाधिक लोकांना इथे रास्त दरात येता आले पाहिजे.

ठीक आहे तर आता ताडोबा पुराण पुरे झाले, आता मुख्य विषयाबद्दल म्हणजेच रस्त्यावरील अपघातांमध्ये मारल्या जाणाऱ्या प्राण्यांच्या बोलूया.वन्यजीवनाचा आणखी एक पैलू मला पुन्हा एकदा मांडावासा वाटण्याचे कारण म्हणजे ताडोबाहून वरोरामार्गे नागपुरला परत येतानाचा रस्ता अनेक लहान लहान गावांमधून, अनारक्षित जंगलांमधून शेतांमधून जातो. या रस्त्यावर आम्हाला एक कस्तुरी मांजर मृत अवस्थेत आढळून आले, त्याला एखाद्या भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने धडक दिली असावी हे वेगळे सांगायची गरज नाही. त्याकडे फारसे कुणाचेही लक्ष नव्हते कारण सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून ते एखाद्या पाळीव मांजरासारखेच दिसत होते. ज्या देशामध्ये लाखो लोक रस्त्यांवरील अपघातामध्ये आपला जीव गमवतात तिथे रस्त्यावर एखाद्या मांजरीचा मृत्यू झाला मग ती अगदी कस्तुरी मांजर असेल तरी त्याची चिंता कोण करणार. जे वाचक वन्यजीवप्रेमी नाहीत त्यांना मला सांगावेसे वाटते की, मी जवळपास पंचवीस वर्षे जंगलांना भेट देत आहे या एवढ्या वर्षात मी एकदाही जिवंत कस्तुरी मांजर पाहिलेले नाही, मात्र मी वाघ किमान पाचशे वेळा तरी पाहिलेला आहे. यावरून तुम्हाला कल्पना करता येईल की हा प्राणी दृष्टीस पडणे किती दुर्मिळ आहे, कारण त्यानंतरच तुम्हाला समजेल की रस्त्यावरील अपघातामध्ये मरण पावलेले कस्तुरी मांजर पाहून मी इतका का अस्वस्थ झालो.कस्तुरी मांजर हा पूर्णपणे निशाचर प्राणी आहे ते केवळ रात्रीच शिकारीसाठी किंवा अन्नाच्या शोधात बाहेर पडते. त्यातच निर्जन रस्त्यावरील वाहनांच्या प्रखर प्रकाशझोतामुळे बिचाऱ्याकस्तुरी मांजराचे डोळे दिपून गेले असतील. त्याचप्रमाणे माणसांव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रजातींना वाहतुकीचे नियम शिकवणारी कोणतीही शाळा नाही. अर्थात त्यामुळे काहीच फरक पडत नाही कारण शिकली सवरलेली सर्व नियम माहिती असलेली माणसेही इतर माणसांसाठी वाहतुकीच्या कोणत्याही नियमांचे पालन करत नाहीत, अशावेळी कस्तुरी मांजरासारख्या प्राण्याची चिंता कोण करेल, नाही का?

किंबहुना रस्त्यावरील अपघातात मरण पावलेली ही कस्तुरी मांजर मला ताडोबाच्या सफारीमध्ये स्थानिकांकडून जे काही सांगण्यात आले किंवा समजले त्याचा कळस होता. जंगलाच्या कोणत्याही सफारीमध्ये, तुम्ही गाईड, जिप्सी चालक, स्थानिक उपहारगृह चालक रिसॉर्टमधील कर्मचारीवर्गाशी गप्पा मारल्या पाहिजेत कारण ते तुम्हाला जंगलाविषयी अनेक गोष्टी सांगतात ज्या समाज माध्यमांपर्यंत कधीच पोहोचत नाहीत. अशीच एक गोष्ट ऐकायला मिळाली की एक छोटा मटकासूर नावाच्या वाघाला दुसऱ्या एका तरूण नर वाघाने कोलरा प्रवेशद्वाराच्या (ताडोबा जंगलातील आणखी एक विभाग) बाजूने त्याच्या हद्दीतून हुसकावून लावले. आता हा छोटा मटकासूर नावाचा वाघ जवळपासच्या गावांमधील गाई-गुरांची शिकार करत आहे, याचे प्रमाण एवढे वाढले आहे की त्याने एकावेळी तब्बल सहा गुरांनाही ठार मारले आहे.एका सफारीमध्ये मोहार्ली चंद्रपूर रस्त्यावरून परत येताना एका स्थानिक क्रमांकाची प्लेट असलेली कार जोरजोरात हॉर्न वाजवत आमच्यापुढे सुसाट वेगाने गेली, जणूकाही एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घेत असावी. या भागामध्ये घनदाट जंगल आहे, ज्यामध्ये अनेक प्राणी दिसून येतात.आमचा गाईडत्या गाडीवाल्याला शिव्या घालत म्हणाला,या लोकांमुळे आम्हाला त्रास  भोगावे लागते! , वनविभागाचे अधिकारी आम्हाला रात्री घरातून गाडी बाहेर काढू देत नाहीत, एका महिन्यात वाघ, बिबट्या चितळ या चंद्रपूरवाल्या गाड्यांखाली मारली गेली आहेत”! त्याच्या म्हणण्याचा मतितार्थ असा होता की आजूबाजूच्या गावांमधील वाहनचालक (म्हणजे कार मालकांमुळे) भरधाव वेगाने बेदर कारपणे वाहने चालवतात त्यामुळे अतिशय त्रास होतो. याच कारणाने वनविभाग स्थानिक गावकऱ्यांवर वाहतुकीचे कडक निर्बंध घालतो, मात्र ते बिचारे सर्व नियमांचे पालन करतात.प्रत्यक्षात, ताडोबा जंगलातून चंद्रपूरला जाणाऱ्या रस्त्यावर सगळीकडे रस्त्याच्या कडेने वाहने काळजीपूर्वक सावकाश चालविण्यासाठी वन्य प्राणी रस्ता ओलांडत असतील तर काळजी घेण्यासाठी खुणा लावल्या आहेत. प्राणी या वाहतुकीच्या खुणावाचू शकत नाही माणसे त्याकडे काणाडोळा करतात, यामुळे आपणच या भूतलावरील सर्वात मठ्ठ (म्हणजेच निरुपयोगी प्रजाती) ठरतो. मात्र आपण एक गोष्ट विसरतो की आपल्या निष्काळजीपणामुळे इतर अनेक प्रजातींचा जीव जातो हे अतिशय दुर्दैवी आहे.

महामार्गांवर काही ठिकाणी जंगलांजवळ उदाहरणार्थ नागपूर-पेंच या पट्ट्यामध्ये, वन्य प्राण्यांना रस्ता ओलांडण्यासाठी मार्गिका पूलाखालून रस्ता उपलब्ध करून देण्यात आला आहे त्यामुळे खरोखर काही प्राण्यांचा जीव वाचला आहे. अडचण अशी आहे की जिल्ह्यांना जोडणारे मार्ग किंवा राज्य महामार्ग उदाहरणार्थ नागपूर, वरोरा-मोहर्ली (ताडोबा), स्थानिक किंवा पर्यटकांकडून जवळपासच्या गावातून अभयारण्यापर्यंत येण्यासाठी वापरले जातातया रस्त्यांवर फारसा प्रवास होत नाही तसेच त्यावर कुठेही वाहतुक नियमांच्या खुणाही लावण्यात आलेल्या नाहीत (केवळ काही ठिकाणे वगळता), हे रस्ते अरुंद आहेत, तेथे फारशी रहदारी नसते. त्यामुळे बहुतेक वेळा व्यावासायिक किंवा स्थानिकांच्याच गाड्यांची वर्दळ असते हे दोघेही अधिकारी किंवा वन्यजीवनाविषयी किंवा एखादी कस्तुरीमां  किंवा कोल्हा किंवा साळींदर किंवा साप मारला गेल्यास त्याची पर्वा करत नाहीत. त्यामुळे मी अशा रस्ते अपघातामध्ये किती प्राणी मरण पावले हे मोजणे थांबवले आहे (उपहासाने बालतोय).

आपल्याला रस्ते अपघातात वन्य प्राण्यांचे मृत्यू थांबवता आले नाहीत तरी किमान कमी करायचे असतील तर काही गोष्टी करणे आवश्यक आहे. एक म्हणजे जंगलाभोवतीच्या परिसरात नियमित अंतराने सीसीटीव्ही बसवा त्यांच्यावर नजर ठेवा. भरधाव वेगाने जाणारी वाहने शोधा त्यांच्यावर भरपूर दंड आकारा. दुसरे म्हणजे, जंगलातून किंवा जंगलाबाहेरील रस्त्यांवर वाहनांचा वेग तपासण्यासाठी स्पीडगन लपवून ठेवा. तिसरे म्हणजे या रस्त्यांवर चांगल्या वाहनांसह सतत गस्त घालणारे सशस्त्र पथक तैनात करा, त्यांच्याजवळ जखमी प्राण्यांवर उपचार करण्यासाठी प्रथमोपचाराचे साहित्य मोबाईल वैद्यकीय व्हॅन असली पाहिजे. त्याचप्रमाणे भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांना थांबवा जागीच दंड करा. चौथे म्हणजे आपण लहान रस्त्यांच्या खालून जाणारे मार्ग बांधू शकलो नाही तरी आपण रस्त्याच्याच पातळीवर रस्ता ओलांडण्यासाठी विभाग तयार करू शकतो, ज्याचा पृष्ठभाग वेगळ्या साहित्याने तयार करता येईल तसेच त्याभोवती मंद प्रकाशयोजना करता येईल म्हणजे वाहनांना या विभागांमध्ये आपण वेग कमी करायचा आहे हे समजेल (किमान अशी अपेक्षा तरी आहे). शेवटचा मात्र सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विशेषतः व्यावसायिक पर्यकांच्या वाहनांसाठी मालकांसाठी वाहने चालविताना वन्य जीवनाची काळजी घेण्यासाठी एक सर्वसमावेशक जागरुकता मोहिम राबवणे आवश्यक आहे.कारच्या विंडशिल्डवर आम्हाला वन्यजीवनाची काळजी आहे असे स्टीकर लावता येतील, तसेच स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने या रस्त्यांवर रोडशो आयोजित करता येतील हे अशाप्रकारचे उपक्रम सतत सुरू ठेवले पाहिजेत.

एक लक्षात ठेवा, केवळ नियम किंवा कायद्यांनी या प्राण्यांचे आयुष्य सुरक्षित किंवा शांत होणार नाही तर आपला या कायद्यांकडे नियमांकडे पाहण्याचा दृष्टिकोन योग्य असेल तरच त्यामुळे हे शक्य होईल. मानवी  वर्तनाच्या या मूलभूत नियमांना रस्त्यावरील अपघातात होणारे मृत्यू अपवाद नाहीत. तोपर्यंत देव वन्य प्राण्यांचे वाहनरूपी राक्षसांपासून ते राक्षस चालविणाऱ्या दैत्यांपासून (म्हणजे माणसांपासून) रक्षण करो!

 

You can read in English version:

http://visonoflife.blogspot.com/2021/08/road-kills-wild-life-human-named-demons.html  

 

संजय देशपांडे

www.sanjeevanideve.com

 

 




No comments:

Post a Comment