Saturday, 28 July 2012

नमुना फ्लॅट



 
 
 
 
                                      

                                       
                                       "तुमचे घर सजवा , जीवन
                                 प्रत्यक्षात जेवढे आहे त्यापेक्षा
                                अधिक आनंददायक /चित्तवेधक
                                असल्याचा ते आभास निर्माण
                                करते”                      … चार्लस एम शुल्झ



 
खरच!आजच्या विषयाच्या पार्श्वभूमीवर हे शब्द किती मार्मिक आहेत ! बऱ्याच डेव्हलपर्स ना ते त्यांच्या प्रकल्पाच्या ठिकाणी जे काही करतात त्याची तुलना केलेली आवडत नाही . पण खरंतर  नमुना फ्लॅटची संकल्पना किंवा शो फ्लॅट म्हणून लोकप्रिय असलेल्या फ्लॅटचा उद्देश तोच आहे ! पूर्वीपासून स्थावर मालमत्ता उद्योगात नमुना फ्लॅटची संकल्पना मूळ प्रतिकृतीच्या रुपात तयार करणे ,खूप कठीण आहे ,तसे दुसऱ्या कोणत्याही उद्योगात नसेल. आणि आपल्या स्वत:च्या घराला समजणे, आणि घराची नेमकी प्रकृती अनुभवणे ,यासाठी ग्राहकास घराचा ताबा मिळण्यास काही वर्षे वाट पहावी लागते ! जर स्वयंचलित ( वाहनासाठी )किंवा जसे ,वातानुकुलित यंत्रे (ए. सी. ) शीतकपाट (फ्रीज ) यांच्या बाबतीत तुम्ही एखादी नमुना प्रतिकृती प्रत्यक्ष शो-रूम मध्ये पाहू शकता , तिच्या वैशिष्ट्यांचे निरीक्षण करू  शकता , त्यांची क्षमता तपासू  शकता ,त्यांच्या अनुभव घेऊ शकता आणि मगच तुम्ही जे काही खरेदी करू इच्छिता त्याची निवड करू शकता. मात्र संपूर्ण आयुष्यभरातील सर्वात महागडी वस्तू खरेदी करताना तुमच्या जवळ फक्त एक माहिती-पुस्तिका (ब्रोशर ) असते, काही कल्पनाचित्रे असतात, आणि काही वेळेस इमारतीची प्रतिकृती असते आणि ती सुध्दा एका लघुरुपातील (लहानशी प्रतिकृती ) ! तुम्ही कधीही घराच्या अंतर्भागाचा अनुभव घेऊ शकत नाही !

अगदी खात्रीने ती फार कठीण परिस्थिती होती आणि हा उद्योग (बांधकाम उद्योग ) तिच्याबरोबर चालूच राहिला पण अखेरीस ९० सालच्या शेवटी शेवटी जेव्हा एकापेक्षा जास्त इमारतींचे प्रकल्प सुरु झाले ,नंतर मोठ्या संख्येने विक्री करण्यासाठी टाउनशिपची संकल्पना आली
तेव्हा डेव्हलपर्सना असे खर्या अर्थाने जाणवू लागले की त्यांना ज्यांची विक्री करायची आहे अशी घरांची संपूर्ण जीवनशैली  व्यक्त करणारी प्रतिकृती असावी. खूप मोठ्या संख्येच्या विक्री बरोबरच ग्राहकांना आकर्षून घेण्यासाठी ,इतरांच्या तुलनेत त्यांना काहीतरी जास्त देण्याची निकड ,तसेच घराची निवड करताना आयुष्यापेक्षा काहीतरी भव्य असलेल्याची आपण निवड करत असल्याची भावना ग्राहकांमध्ये निर्माण करण्याची निकड तीव्रतेने भासू लागली . एका दृष्टीकोनातून हि एक विपणनाची चाल सुध्दा होती .तसेच जेव्हा इमारतीची उंची ४-५ मजल्यापर्यंतच मर्यादित होती तेव्हा एक फ्लॅटलवकर पूर्ण करणे हे तांत्रिकदृष्ट्या शक्य नव्हते परंतु नंतर बदलत्या तंत्रज्ञानानुसार इमारतींची उंची १०-११ मजल्या पर्यंत वाढली तेव्हा पहिल्या मजल्याचे संपूर्ण बांधकाम -स्थापत्य पूर्ण करणे व प्रदर्शनासाठी तयार करणे शक्य झाले. प्रकल्पात होणाऱ्या नियमित- प्रमाणित सुख-सुविधांसह पूर्ण केलेल्या फ्लॅटपासून याची सुरवात झाली . नंतर हळूहळू काही डेव्हलपर्सनी  खोलीची कल्पना देण्यासाठी त्यात फर्निचरची मांडणी करण्यास सुरवात केली आणि सध्या आपल्याकडे शो-फ्लॅटसारखेच विशेषतेने योजलेले ,आराखडा काढून तयार केलेले फ्लॅट आहेत . ते बऱ्याच वेळा प्रमाणित सुख-सुविधांशी जुळणारे नसतात परंतु स्वयंचलित वाहनांच्या जाहिरातीनुसार ,त्या ठिकाणी एक गर्भित सूचना असते की जास्त पैसे दिल्यानंतर ग्राहकांना शो-फ्लॅटसारखा फ्लॅट बनवून मिळेल.

                                         एक अभियंता असल्याने ,मी असे म्हणू शकेन की ग्राहकांपेक्षाही नमुना फ्लॅट हा डेव्हलपर्ससाठी , वास्तुरचनाकारांसाठी आणि  बांधकामाच्या माणसांसाठी खूप जास्त महत्वपूर्ण असतो. एक इमारत ही गुंतागुंतीची गोष्ट असते. आणि अनेक संस्था त्यावर काम करत असतात. इथे ,आपल्या देशात ,बांधकाम ठिकाणावरचे जास्तीत जास्त काम माणसांकरवी पार पडले जाते ; विशेषत: फिनिशिंगशी संबंधित कामे उदा. प्लास्टरिंग, फरशी बसवणे , लाकूडकाम जसे दरवाजे बसवणे ,रंगकाम इ. आता एकाच प्रकल्पावर काम करणारे गवंडी किंवा रंगारी अनेक असू शकतात,म्हणून एखाद्या व्यक्तिगत मजुराचे कामातील कसब किंवा कारागिरीतील कौशल्याच्या गुणवत्तेचे स्वरूप नेमकेपणाने विशद करणे खूप कठीण आहे.           ,
दोन व्यक्तिंमधील कामाचे कौशल्य निरनिराळे असते म्हणून हे अत्यंत महत्वाचे आहे की काम करणाऱ्या सर्व माणसांच्या मनात फिनिशिंगच्या गुणवत्तेबाबत एक पायाभूत माप-प्रमाण असले पाहिजे ,हे नमुना फ्लॅटच्या रुपात आपण त्यांना प्रत्यक्ष दाखवू शकतो. प्लास्टर केलेल्या पृष्टभागाचे फिनिशिंग किंवा रंगाची गुणवत्ता केवळ शब्दात वर्णन करणे शक्य नाही ,एखाद्याला ती समजण्यासाठी प्रत्यक्ष पहावी लागेल . या ठिकाणी नमुना फ्लॅटहा साईटवर कारागिरांसाठी आणि सुपरवायझर साठी एक महत्वाची भूमिका बजावतो कारण फिनिशिंगची गुणवत्ता विशद करण्यासाठी ते सर्वजण एकाच पातळीवर येतात. या खेरीज तिथे कित्येक गोष्टी अशा असतात की ज्या आराखड्यावर लोकांना समजणे शक्य नसते ; उदi. नळ योजनेची तरतूद (प्लंबिंग ) फीटिंग्स यांसारख्या  गोष्टी. एक आदर्श नमुना तयार करणे हे  नेहमी मदत करणारे  ठरते , जसे जर त्या ठिकाणी काही आराखड्यातील चुका असतील तर त्या (चुका ) फक्त नमुना फ्लॅटपुरत्याच मर्यादित राहू शकतात आणि इतर फ्लॅट म्हणजे नमुना फ्लॅट मधील चुका वगळून केलेली सुधारित आवृत्ती असू शकते. एका घराच्या विद्युत व्यवस्थेच्या आणि प्लंबिंग व्यवस्थेच्या बाबतीत हे नेहमी घडते .गोष्टी जशा आराखड्यात दिसतात  त्या पेक्षा वास्तवात त्या खऱ्या अर्थाने निराळ्याच असतात. बऱ्याच वेळा दरवाजांचे आकारमान किंवा खिडक्यांची आखणीची उमज तुमच्या लक्षात चांगल्याप्रकारे येते जेव्हा ते प्रत्यक्ष अस्तित्त्वात असल्यावर त्यांचा तुम्ही अनुभव घेता.
आणि पुढच्या फ्लॅटमध्ये तेच तुम्ही चांगल्या पद्धतीने सुधारू शकता. या प्रक्रियेमुळे कामाची विशेषता अंतिम स्वरुपात निश्चित होते . जमिनीवरील तसेच संडास मधील भिंतीला लावण्याच्या फरशांचे रंग यासारख्या गोष्टी तेव्हाच तुम्ही चांगल्याप्रकारे ठरवू शकता.फक्त उत्पादनाच्या सूचीमध्ये पाहण्यापेक्षा जेव्हा त्या साईटवर प्रत्यक्षात दर्शवल्या जातात . आणि म्हणूनच प्रकल्प कितीही लहान स्वरूपाचा असो, फक्त विपणनाच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर चांगल्या कामाची निर्मिती करण्याचे मनात ठरवले तर तेव्हा सुध्दा नमुना फ्लॅट हा फारच महत्वाचा असतो.
                                     ग्राहकाच्या दृष्टीकोनातून नमुना फ्लॅट मध्ये असलेली वैशिष्ट्ये आणि पुरविण्यात आलेल्या सुख-सुविधा समजून घेणे आणि तरतुदीनुसार त्याच्या स्वत:च्या फ्लॅटसाठी करारानुसार  प्रत्यक्षात त्याला काय मिळते आहे याची खात्री करून घेणे ,फार महत्वाचे आहे. प्रामुख्याने एखाद्यास शो-फ्लॅटपासून काय मिळते तर तो खरेदी करणार असलेल्या फ्लॅटची" जाणीव "! बरेचजण असेही विचारतील की फ्लॅटची" जाणीव " म्हणजे मला नेमके काय अभिप्रेत आहे ? तर फ्लॅटची जाणीव म्हणजे ताबा मिळाल्यानंतर तुम्हाला मिळत असलेल्या जागेच्या उपयोग विषयीची पारख ! म्हणजे खोल्यांचे आकारमान , त्यांचे एकमेकांशी असलेले परस्परसंबंध, प्रत्येक खोलीसाठी उपलब्ध असलेला नैसर्गिक प्रकाश , खिडक्यांच्या व्यवस्थेतून मिळणारी वाऱ्याची दिशा. तसेच कोणीही हे समजून घ्यायला  पाहिजे की नमुना फ्लॅटद्वारा फक्त आतील बाजूची कल्पना मिळू शकते . जेव्हा इमारती बऱ्याच असतात, तेव्हा खरेदीदाराने हे लक्षात घेतले पाहिजे की प्रत्येक खोलीचा बाह्य देखावा प्रत्येक कोपरयासाठी निराळा असेल आणि तुम्हाला फ्लॅटच्या अंतर्गत  व्यवस्थेनुसार प्रत्येक खोलीच्या बाह्यदेखाव्याची कल्पना करावी लागेल. नमुना फ्लॅटशी तुलना केली असता तुमचा फ्लॅट व्यक्तिगत बनवण्यासाठी कोणत्या प्रकारचे बदल करावे लागतील याची विचारणा करा. प्लंबिंग व्यवस्थेत बदल करण्याचे मी नेहमी नाकारतो कारण बहुमजली इमारतीत कालांतराने ते देखभालीविषयी समस्या निर्माण करणारे कारण बनते, म्हणून जर तुम्हाला शो फ्लॅटमधील प्लंबिंग व्यवस्थेविषयी एखादी खरोखर अडचण असेल तर सर्व फ्लॅटमध्ये त्या बाबतीत बदल होऊ शकेल कां या विषयी डेव्हलपरकडे विचारणा करा म्हणजे प्रत्येकाला त्या विश्वासार्ह बदलामुळे फायदा होऊ शकेल !
                                   त्याच बरोबर ह्याकडेही लक्ष्य  द्या की तुमच्या मनात असलेल्या फर्निचरच्या मांडणीसाठी पुरेशी जागा आहे कां आणि खोल्यांच्या आकारानुसार त्यांचा उपयोग सहजसाध्य आहे का ? प्रदर्शित केलेले फर्निचर हे योग्य आहे कां ? जसे, जेवणाच्या टेबलचा आकार आणि पलंगाची मोजमापे , उदा. योग्य आकाराचा पलंग, कपाट आणि एक ड्रेसिंग टेबल कमीतकमी एवढे तरी सामावून घेण्यासाठी पुरेशी मोकळी जागा बेडरूममध्ये असलीच पाहिजे. नमुना फ्लॅट पाहताना हा पैलूही तपासून पहिला पाहिजे. तसेच तुमच्या फ्लॅटच्या प्रत्येक खोलीत प्रकाश आणि खेळती हवा (वायुवीजन ) पुरवणाऱ्या खिडक्यांची रचनाही तपासून पहा. लक्षात ठेवा, नमुना फ्लॅट हा फक्त अंतर्भाग तसेच इमारतीमधील त्याचे स्थान प्रदर्शित करतो. त्याचप्रमाणे संकुलात जास्त संख्येने असणाऱ्या इमारती सुध्दा प्रकाश, वायुवीजन खाजगी जीवन आणि घराचा दर्शनी भाग या बाबतीत महत्वाची भूमिका बजावतात.

    मी
जे  सुचवू शकतो  ते असे की नमुना फ्लॅटवरच फक्त विश्वास ठेवू नका पण तशाच पद्धतीचे फ्लॅट असणारा व पूर्ण झालेला असा  एखादा प्रकल्प असल्यास त्याला भेट द्या. तो तुम्हाला याची  कल्पना देईल की डेव्हलपर्स दिलेल्या आश्वाशनला किती बांधील राहतो, फक्त फ्लॅटच्या अंतर्भागाच्याच बाबतीत नव्हे तर संपूर्ण संकुलाच्या सेटअपच्या बाबतीत सुध्दा ,म्हणजे सभोवतालच्या विकासापासून ते इमारतीच्या आखणी-तरतुदी विषयी आणि इमारतीच्या अंतर्भागातील फ्लॅटचे परस्परसंबंध विषयी कल्पना देईल. यानंतरच तुमच्या बिल्डरचा तुमच्या घराकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाची खऱ्याअर्थाने संपूर्ण कल्पना तुम्हाला येईल आणि नुसत्या "डिझायनर शो फ्लॅट"च्या प्रदर्शनापेक्षा तेच अधिक महत्वाचे आहे!

संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स
एन्व्हो_पॉवर समिती, सीआरईडीएआय, पुणे
संजीवनीची विचारणी जाणून घेण्यासाठी कृपया माझ्या ब्लॉगला भेट द्या!
संजीवनीची सामाजिक बाजू!

No comments:

Post a Comment