"मोठ्या
शहरात फिरण्यासाठी , पाहण्यासाठी, मोकळ्या जागांच्या तसेच विशिष्ट ठिकाणांच्या रूपरेखा
आखल्या जातात आणि बांधल्याही जातात.सार्वजनिक ठिकाणी असल्या मुळे रुपरेखांचा बराच भाग
आणि हेतू ती ठिकाणे आतील बाजूस असल्यामुळे खाण्यासाठी, झोपण्यासाठी, चालण्यासाठी ,प्रेम
करण्यासाठी ,गाण्यासाठी असतो. " नागरिक" हा शब्द "नगराशी" निगडीत
आहे. आणि आदर्श नगर हे नागरिकत्वाभोवती -लोकजीवनाच्या सहभागाभोवती संघटित झालेले असते."
_________________________________रेबेक्का सोल्नीत
_________________________________रेबेक्का सोल्नीत
आपल्या विषयाच्या दुसऱ्या भागाकडे
म्हणजेच (शहरांच्या) लगतची गावे महानगरपालिकेत विलीन होणे , याकडे वळताना , एका
महान नगर रचनाकाराने वर उधृत केलेले विधान मला सभोवतीच्या दृश्याबद्दल नक्कीच विचार
करायला लावते. हा प्रश्न केवळ विलीनीकरणाचाच नाही तर प्रश्न हा आहे की आपण कोणत्या
गोष्टींना सामोरे जात आहोत? माझ्या करिअरच्या सुरवातीच्या दिवसातील माझ्या मित्रांनी
सांगितलेला एक किस्सा मला आठवतोय .
एका मोठ्या उद्योगात, तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी
एक कॅन्टीन होत आणि " आमचे कामगार जे
अन्न ग्रहण करतात तेच अन्न आमचे व्यवस्थापक ही ग्रहण करतात! " हे वाक्य लिहिलेला
फलक तिथे लावला होता. एक दिवस कोणीतरी तो फलक बदलून त्या जागी "आमचे व्यवस्थापक
जे अन्न ग्रहण करतात तेच अन्न आमचे कामगार ही ग्रहण करतात ! " असे लिहिलेला फलक
लावला .
या गोष्टीतील विनोद किंवा उपरोध
सोडला तर बरेच जण काय म्हणतील की तोच तर्क इथेही लागू पडेल -जसे " ग्रामस्थांना
त्याच सोयीसुविधा मिळतील ज्या शहरवासी नागरिकांना महानगरपालिकेकडून मिळतात किंवा असेही
असू शकेल की आपल्या महानगरपालिकेकडून नागरिकांना त्याच सोयीसुविधा मिळतील ज्या सोयीसुविधा
सध्या ग्रामस्थांना मिळतात ! " खरी गोष्ट ही आहे की नागरीकरणाबरोबर योग्य
सोयीसुविधांच्या वाढत्या मागण्या पुरविण्याजोगी गावाची किंवा ग्राम पंचायतींची घडण
खात्रीने झालेली नाही आणि ही वस्तुस्थिती कसही करून मान्य करावीच लागेल; परंतु या सगळ्या सुविधा पुरविण्याची निश्चिती देण्यासाठी महानगरपालिका
खरोखर सक्षम आहे काय ? या शहरातील वस्तुस्थिती सुध्दा तशी नाही असेच खेदपूर्वक
म्हणावे लागेल . सद्यस्थितीतील आपली पाण्याची समस्या आणि रहदारीची समस्या पहा म्हणजे
मला काय अभिप्रेत आहे ते तुम्हाला समजेल . जेव्हा एखाद्या शहरी जीवनाच्या अशा समस्यांचा
विचार येतो , तेव्हा ती एखाद्या हिमनगाची वरवर दिसणारी केवळ टोके असतात
! अहमदाबाद किंवा चंदिगढ सारख्या शहरांची काही
उदाहरणे सोडली तर संपूर्ण देशातील दृश्य असेच आहे . वरील ठिकाणी केवळ नागरी व्यवस्थापनच
नाही तर राज्य-शासनानेही , चांगले शहरी जीवन प्रस्तुत करण्याच्या योजनेत आपला हातभार
लावला आहे. त्यांनी काय योजले आहे हे पाहून मगच आपल्याकडे त्यावर कार्यवाही केली पाहिजे.
यासारख्या दृश्य घटनाक्रमाची
पार्श्वभूमी असताना बरेचजण असे म्हणतील की जर सध्या अस्तित्वात असलेल्या शहरवासीयांना
आपण योग्य त्या सेवा पुरवू शकत नाही ,तर मग लगतची गावे किंवा नवीन गावे प्राप्त करण्याची
किंवा शहरात विलीन करण्याची काय गरज आहे? खरतर असे वक्तव्य करणे ही एक वेगळी गोष्ट
आहे आणि हे तर्कशास्त्र स्वीकारणे म्हणजे आपण स्वत:ला कुविख्यात असलेला
" शेखचिल्ली" बनवणे , जो झाडाची तीच फांदी कापत होता ज्यावर तो बसलेला होता
! कारण आज जी आजुबाजुची गावे आपण म्हणतोय त्यालाच उद्या आपण शहर म्हणणार आहोत! जरा
सभोवती पहा ज्याला आपण आपले शहर म्हणतो आणि त्याच्या आराखड्याची योजना पहा नंतर नवीन
डीपी म्हणजेच जुन्या शहराचा विकास आराखडा तयार होत आहे आणि तो लवकरच शहराच्या चालकासमोर
ठेवला जाईल . या आराखाड्याने वेळेची काळमर्यादा ओलांडली आहे,पण उशिरा का होईना , निदान
आता त्याचा कच्चा आराखडा तयार आहे . आपण बऱ्याच
महत्वाच्या व्यक्तिंच्या तोंडून जे या शहराचे नागरिक आहेत हे बोललेले ऐकले आहे की शहरासाठी कमीतकमी १०० वर्षांची
विकास योजना आपण आखली पाहिजे . खरतर हे म्हणायला अगदी सोपे आहे कारण शब्द काही किंमत
मागत नाहीत पण शहर कधीही स्थिर रहात नाही ,ते सतत वाढत असते. या त्याच्या वाढीमुळेच
समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत काही योजना आखणे की जी पुढील १०० वर्षांसाठी
स्थिर असेल , हे विकासाच्या कल्पनेसाठी सर्वथैव अतार्किक आहे. त्याऐवजी नागरी विकासाचा
विचार करणाऱ्या , खऱ्या अर्थाने अनुभवी असणाऱ्या व्यक्तिंची मते घ्या ,जी विपुल
प्रमाणात आपल्या देशात उपलब्ध आहेत. हा एक असा घटक आहे की जो आपण कधीही जमेस धरला नाही
,आणि ते जे सुचवतील ते १०० वर्षांच्या विकास संकल्पनेसाठी स्थिर असेल आणि या तत्वाभोवती
थोड्या कालावधिसाठी म्हणजेच २० वर्षांसाठी विकास आराखड्याचे आयोजन करा आणि पुढे चला
.यामुळे आयोजनाच्या पायाभूत तत्वांची हमी मिळेल आणि वाढीच्या समस्यांकडे जाण्याचा मार्गही
तोच राहील ,विकासाच्या दिशेकडे नेणारा प्रवास स्थिर होईल. यानंतर बाकी काय राहील तर
त्याच्या अल्प काळासाठीच्या कार्यवाहीची निश्चिती पण ज्याकडे अगदी वार्षिक कालावधी
करिता सुध्दा लक्ष पुरवणे गरजेचे आहे.
आपल्याकडे पर्यावरण अहवालासारख्या अशाकाही गोष्टी आहेत की ज्या
प्रतिवर्षी छापून प्रसिध्द झालेल्या दिसतात आणि आपण त्याविषयी F]kta बातम्या वाचतो जेव्हा त्या वर्तमानपत्रात छापल्या जातात ,बस्स
इतकेच ! खरतर त्याची अंमलबजावणी महत्वाची आहे आणि ती खुबीने अशी पारदर्शी केली पाहिजे
की शहराच्या उत्तम पर्यावरणासाठी आपण ज्या काही धोरणांचा अवलंब करत आहोत ,त्याचा सामान्य
माणसाच्या जीवनावर होणाऱ्या परिणामाचे खरे मूल्यमापन आपण करू शकू. मी पर्यावरण अहवाल
वाचला नाही परंतु मला याची उत्सुकता आहे की त्यात शहरातील समाजाच्या सर्व थरातील लोकांच्या
मुलाखती आहेत कां? हे शहर त्यांना कशा प्रकारचे जीवन प्रस्तुत करत आहे याविषयी त्यांची
मते त्यात (अहवालात ) आहेत कां ? मला खात्री आहे की यामुळे पर्यावरण अहवाल रोचक होईल
तसेच वास्तववादी होईल . कोणतेही शहर हे F]kta अहवालावर
अवलंबून नसते तर त्यात राहणाऱ्या लोकांवर अवलंबून असते आणि शहरातून त्यांना मिळणाऱ्या
दैनंदिन अनुभवावर अवलंबून असते . आपल्याकडे राखीव हरित पट्टे आहेत पण त्यांचा उपयोग
हिरवाई सोडून इतर सर्व गोष्टींसाठी केला जातो ! आपल्याकडे नद्या आहेत आणि झरे आहेत
पण ते नाल्यांपेक्षाही वाईट अवस्थेत आहेत ! आपल्याकडे टेकड्या आहेत ज्या शहराचे हिरवे
आच्छादन असण्यापेक्षा झोपडपट्ट्यामुळे बेकायदा बांधकामामुळे राखाडी रंगाच्या होऊ लागल्या
आहेत ! शहराविषयक धोरणे निश्चित करताना बऱ्याच गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे आणि
महत्वाची गोष्ट ही आहे की गेल्या ३० वर्षात शहराच्या विकास आराखड्याची पूर्णांशाने
अंमलबजावणी आपण कां करू शकलो नाही? संख्याशात्रानुसार ८७ साली तयार केलेल्या
अखेरच्या विकास आराखड्यापैकी ४०% राखीव जागासुद्धा आपण संग्रहीत करू शकलो नाही आणि
आपल्याकडे त्याची काटेकोर आकडेवारीही नाही की प्राप्त केलेल्या किती राखीव जागा ज्यासाठी
त्या मिळवल्या होत्या ,त्या हेतूसाठी विकसित केल्या गेल्या आहेत ! उत्तम उदाहरण
म्हणजे आपण निर्माण केलेली प्रचंड प्रमाणातील रहदारीची समस्या ! त्यावरच तोडगा
एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला असलेले एच सी एम टी आर म्हणजे हाय कॅpa^सीटी मास
ट्रान्सपोर्ट रूट , जो गेल्या २५ किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांपासून योजण्यात आले
आहे. पण फक्त आराखड्यावर (कागदावर )! या सर्व वर्षात त्याचे एक इंचभरही बांधकाम
झालेले नाही! शहराला भावी काळाकडे नेणारी पुढील हालचाल योजताना , आपल्याकडे असलेली
सध्याची शहर विकासाबाबतची यासारखी उदाहरणे डोळे उघडवणारी असू शकतात ! हे सदर (स्तंभालेख
) सरकारवर किंवा राज्य कारभार करणाऱ्या कुणा पक्षावर आरोप करीत नाही परंतु आपल्या
सभोवतालच्या वस्तुस्थितीचे विश्लेषण करण्यासाठी आहे. आणि आपल्याला समस्या समजल्यानंतरच
त्यावर तोडगा काढता येतो -या पध्दतीने मी त्याकडे पाहतो. वरील संपूर्ण पार्श्वभूमीवर
आपण स्वत:लाच हा प्रश्न गंभीरपणे विचारण्याची गरज आहे , आपला विस्तार करण्यासाठी खरोखर
आपण तयार आहोत कां ? की एक महानगर बनवत असताना
आपण त्या ऐवजी त्याचा एका महा खेड्यात शेवट करीत आहोत ?
एखादा माणूस पुन: एकदा विचारेल , ह्या सगळ्यात स्थावर
मालमत्ता उद्योगाचा संबंध काय ? कोणत्याही मार्गाने का होईना ,तो वाढतोच आहे मग काळजी
कशाला करायची ? खरं आहे ,अज्ञानात आनंद असतो पण दीर्घकाळासाठी नाही ! जेव्हा आपण म्हणतो
स्थावर मालमत्ता उद्योगात वाढ होत आहे तेव्हा ती केवळ किंमती मध्येच नाही
तर आपला जो उद्देश आहे की समाजातील सर्व घटकांना चांगले घर मिळावे याकडे आपण लक्ष दिले
पाहिजे आणि या मोजपट्टीवर आपण कोठे उभे आहोत ? स्पष्टपणे बोलायचं तर अगदी लहान मूल
सुध्दा हे सांगू शकेल की या आघाडीवर आपण किती वाईट रितीने कमी पडत आहोत . बेकायदा बांधकाम
सत्रे , सतत वाढणाऱ्या झोपडपट्ट्या आणि सातत्याने वृद्धिंगत होणारी शहराची सीमा ह्या
सर्व गोष्टी तीच कथा सांगत आहेत की या तथाकथित शहरात , नागरिकांसाठी चांगले ,परवडणारे
घर पुरविण्यात आपण फार फार मागे आहोत ! केवळ अधिकाधिक माणसे इथे येत आहेत आणि या शहरात
राहण्याची आकांक्षा धरून आहेत, म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की सर्व काही व्यवस्थित
आहे ! हे एक प्रकारे येथे राहण्याची सक्ती करण्यासारखे आहे , असे घडू शकते की ज्या
दिवशी त्यांना (लोकांना ) अधिक चांगला पर्याय मिळेल त्या दिवशी ते तोच पर्याय निवडतील
,आणि हे शहर ओस पडेल ! आपण या वस्तुस्थितीला विसरून चालणार नाही ! आपण आपल्या शक्तीस्थानांचे
संरक्षण केले पाहिजे , उपलब्ध साधन संपत्तीच्या ऱ्हासापेक्षा त्यांचे संवर्धन केले
पाहिजे . या बाबतीत डेव्हलपर्सची भूमिका सुध्दा तितकीच महत्वाची आहे . जेव्हा
आपण घरांचे आराखडे तयार करतो करायचे असतात
तेव्हा हे लक्षात ठेवलं पाहिजे की स्थावर मालमत्ता उद्योग ही फक्त पैसा निर्माण करणारी
गोष्ट नसून ती एक समाजसेवासुद्धा आहे ! शहराला महानगरपालिकेची सीमा घाला किंवा ग्रामपंचायतींची
सीमा घाला ,सामान्य माणसाला चांगले घर देणे हे लक्ष्य असले पाहिजे त्यात कदाचित राहण्यासाठी
मुद्दाम सजवलेल्या सुख सुविधा नसतील पण अशा पायाभूत सुविधा असतील की तिथे ते शांती
समाधानाने राहू शकतील आणि एक चांगलं शहर आपल्या रहिवाशांसाठी आणखी काय प्रस्तुत करू
शकते ! त्यासाठी काळाची गरज अशी आहे की आपली इच्छाशक्ती आपल्याला तसे करायला लावेल
; पण तीच कुठे तरी हरवली आहे असे दिसते आणि ही जबाबदारी केवळ सरकारची नाही किंवा शहर
विकास अधिकाऱ्यांची ( टाऊन प्लानिंग ऑफिसर्स ) नाही किंवा व्यवस्थापनाच्या काही विभागांची
नाही तर प्रत्येक नागरिकाची / शहरवासीयांची आहे . जोपर्यंत आपण आपल्या मागण्यांचा जोरदारपणे
राज्यकर्त्यांवर दबाव आणत नाही तोपर्यंत प्रत्यक्षात त्या आपल्याला मिळणार नाहीत .
आपण त्यांचा ठराव तयार केला पाहिजे आणि प्रत्येक व्यासपीठावर तो मांडला पाहिजे तरच
कुठे तरी काही आशा अस्तित्वात आहे ,असे म्हणता येईल .
आपले शहर आदर्श असण्याला पात्र असण्यासाठी
आपण प्रथम आदर्श शहराचे आदर्श नागरिक असणे
गरजेचे आहे आणि ते फक्त आपल्या स्वत:च्या हातातच
आहे!
संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलपर्स
No comments:
Post a Comment