बर्फाच्या पातळ थरावर स्केटिंग करताना आपली सुरक्षा आपल्या
वेगावर अवलंबून असते....... राल्फ वाल्डो इमर्सन
जेव्हा मी सुरक्षा शब्दाचा विचार करतो तेव्हा मला नेहमी हे शब्द आठवतात, या बुद्धिवान माणसाने किती नेमक्या शब्दात त्याची व्याख्या केली आहे! सुरक्षेचा विचार करताना आपला वेग हाच सर्वात महत्वाचा घटक असतो. आता बरेच जण बुचकळ्यात पडतील की रिअल इस्टेटच्या सुरक्षेसंदर्भात ही व्याख्या कशी लागू होईल? त्यासाठी, पुण्यात नुकत्याच झालेला अपघात किंवा दुर्घटनेविषयीची बातमी वाचा, तळजाईतील एक इमारत कोळसली व अधिका-यांनी त्यासाठी दिलेली कारणे पाहा म्हणजे तुम्हाला माझे म्हणणे लक्षात येईल. प्राथमिक अहवालानुसार विकासक किंवा तो जो कुणी असेल त्याने असा दावा केला की इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करणे हे त्यामागचे कारण होते. त्याने इमारतीची रचना मजबूत होण्यास पुरेसा वेळ दिला नाही, तो केवळ घाईघाईने काम पूर्ण करण्याच्या मागे होता. बांधकामातील प्रत्येक टप्प्यासाठी आवश्यक असलेला पुरेसा वेळ देण्याकडे त्याने दुर्लक्ष केले. पायाचे बांधकाम, वरील बांधकामाचा भार पेलण्यास तयार होण्यापूर्वीच तो एकावर एक स्लॅब चढवत गेला व त्याचा परिणाम काय झाला हे आपण पाहिले! याचा तपशीलवार अहवाल यायचा असला तरीही तो बांधकामात अत्यंक घाई करत होता व त्यामध्ये त्याने व्यवस्थित काळजी घेण्याकडे दुर्लक्ष केले हे तथ्य आहे.
ती बातमी वाचल्यानंतर ज्या लोकांनी एखाद्या इमारतीमध्ये सदनिका आरक्षित केली आहे किंवा जे एखाद्या इमारतीमध्ये राहात आहेत त्यांच्या पोटात स्वत:च्या घराच्या सुरक्षेचा विचार करुन भीतीने गोळा आला असेल! आणि त्यासाठी त्यांना दोष कसा देणार? तळजाईमधील एखादी इमारत जर अशा रीतीने पडत असेल, तर इतर इमारती का पडू शकणार नाहीत? पण मग त्यासाठी कुणाला दोष द्यायचा? कायदेशीर बाबींचा विचार सोडला तर अशा प्रकरणांमध्ये सर्व संबंधित व्यक्ती जबाबदारी झटकून एकमेकांवर आरोप करतात! यात दोष कुणाचा आहे? बांधकाम व्यावसायिकाचा ज्याने अवैध बांधकाम केलं, झटपट पैसे कमावण्यासाठी सुरक्षेचे सर्व नियम डावलले, का तिथे काम करणारे लोक ज्यांना आपण चुकीच्या निरीक्षकांखाली किंवा चुकीच्या सूचनांनुसार काम करत आहोत याची जाणीव नव्हती किंवा बिचारे ग्राहक ज्यांनी विकासकाच्या दर्जाविषयी शहानिशा न करता सदनिका आरक्षित केली व त्याच्यावर विश्वास ठेवला, की पीएमसीचा, जी इमारतीमध्ये लोक राहायला येईपर्यंत कारवाई करायची वाट पाहात होती किंवा पोलीस/ लोक प्रतिनिधी जे कायदेभंग करणा-या, इमारतीच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणा-या प्रत्येकावर वचक ठेऊ शकत नाहीत? किंवा अगदी प्रसार माध्यमे जी अशी दुर्घटना झाल्यानंतरच जागी होतात व काही दिवसातच त्याविषयी विसरुन जातात व सामान्य माणसाला अशा प्रवृत्तींविषयी जागरुक करण्याचे थांबवतात? असं पाहिलं तर ही यादी न संपणारी आहे ज्यामध्ये राजकारणी, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणारे कार्यकर्ते जे वेळीच आवाज उठवू शकले नाहीत अशा व्यक्तिंचाही समावेश होतो!
एक गोष्ट निश्चित आहे की आपल्या देशात रिअल इस्टेट किंवा बांधकाम उद्योगामध्ये सुरक्षा विशेषतः मानवी जीवनाची सुरक्षितता हा सर्वात दुर्लक्षित घटक आहे कारण आपल्या आजूबाजूला अनेक जणांना बांधकामावरील अपघातांमध्ये जीव गमवावा लागल्याचे आपण वाचतो/पाहातो. याचे कारण म्हणजे आपण आपल्या बांधकामा बाबतच्या या महत्वाचा घटकाचा फारसा विचार करत नाही. सर्वसाधारणपणे आरसीसीचे म्हणजे रिइन्फोर्स्ड काँक्रीट, स्ट्रक्चरचे आयुष्य ६०-७० वर्षे असते, ज्यामध्ये आजकाल बहुतांश इमारती बांधल्या जातात. या कालावधीमध्ये दोन पिढ्या या घरात राहाणार असतात, या बाबीचा विचार करुन आपण किती काळजीपूर्वक घर खरेदी करतो? दुर्दैवाने माझ्या २० वर्षांच्या रिअल इस्टेट व्यवसायाच्या कारकिर्दीत बांधकामा संदर्भात सुरक्षाविषयक नियमांच्या बाबतीत प्रश्न विचारणारे ग्राहक हाताच्या बोटावर मोजण्याइतकेही नसतील, त्यामुळे त्यांनी बांधकामाची पाहाणी करुन सुरक्षाविषयक नियमांचे पालन होत आहे किंवा नाही हे स्वतः तपासणे ही तर दूरची बाब झाली! सुरक्षानियमांविषयी बोलायचं झालं तर ते दोन प्रकारचे असतात एक म्हणजे बांधकामाच्या ठिकाणी काम करणा-यांची सुरक्षितता व दुसरे म्हणजे जी इमारत बांधली जात आहे तिची सुरक्षितता.
बांधकामाच्या ठिकाणी एक चक्कर मारली तरी तुमचे डोळे उघडतील व तुम्हाला
सुरक्षेविषयी ब-याच गोष्टी व त्याविषयी विकासकाचा दृष्टीकोन समजेल. एक व्यक्ती
म्हणून किंवा एक संस्था म्हणून ते बांधकामाच्या ठिकाणी त्यांच्या स्वतःच्या
कामगारांविषयी निष्काळजीपणा दाखवत असतील तर इमारतीविषयीही त्यांचा तसाच दृष्टीकोन
नसेल याची काय खात्री? बांधकामाच्या
ठिकाणी दुर्घटना झाल्याच्या व लोकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या अनेक घटना
घडल्या आहेत, विकासकाने त्याच्याकडून सुरक्षेची पुरेशी काळजी न घेणे हे देखील
त्यामागचे एक कारण असते. बांधकामाच्या ठिकाणी केवळ अपघात टाळण्यासाठीच नाही तर
दर्जेदार बांधकामासाठीही सर्व सुरक्षा उपाययोजनांची खात्री करणे आवश्यक असते,
यामुळे इमारत अधिक टिकाऊ बनते. विकासक बांधकामाचे कोणते तंत्र वापरत आहे हे माहिती
असणे अतिशय महत्वाचे आहे व ग्राहकाने प्रकल्पातील सोयीसुविधांसह बांधकामाचे
तपशीलही विचारावेत. इथे तपशील म्हणजे प्रकल्पाचे तांत्रिक तपशील सर्व बारकाव्यांसह
सांगणे. उदाहरणार्थ कोणत्या प्रकारचे काँक्रीट वापरले जात आहे म्हणजे काँक्रीटची
क्षमता, बांधकामाचा मूलभूत आराखडा तयार करताना वापरलेल्या प्रक्रिया. प्रत्येक स्लॅब व कॉलम टाकल्यानंतर त्याला दिलेला आधार
ठराविक काळानंतर काढावा लागतो. बांधकामाच्या
मूलभूत आराखड्यात संपूर्ण बांधकामाचे वजन पेलण्याची क्षमता असेल याची खात्री
करण्यासाठी असे करावे लागते. काँक्रीटच्या
प्रत्येक खांब किंवा स्लॅबला थर दिल्यानंतर मजबूत होण्यासाठी ठराविक काळ देणे
अतिशय आवश्यक आहे व याचे बांधकामाच्या ठिकाणी पालन झाले पाहिजे. वाळवीने घर केल्यामुळे सबबेस (पायाचा दुसरा थर) खचू नये
म्हणून वाळवी-रोधक उपाय करणे व नोंदणीकृत संरचनात्मक अभियंत्याकडून स्तर तपासणी
प्रमाणपत्र (स्ट्राटा चेकिंग सर्टिफिकेट) घेणे आवश्यक आहे. या बाबी अतिशय लहान व निरर्थक वाटू शकतात. मात्र ज्या
पायावर संपूर्ण इमारत उभी आहे त्या पायामध्ये एवढा भार उचलण्याची क्षमता आहे का
याची खात्री करणे आवश्यक असते.
मात्र मी नेहमी नमूद केल्याप्रमाणे बहुतेक ग्राहकांना, पुढच्या काही पिढ्या जे त्यांचे घर होणार आहे त्या इमारतीच्या तपशीलांविषयी माहिती नसते किंवा त्याची फारशी काळजी नसते. मी कुठल्या ब्रँडचे व प्रकारचे सिमेंट वापरत आहे असे माझ्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये क्वचितच एखाद्या सदनिका धारकाने विचारला असेल? मी बांधकामामध्ये वापरलेल्या साहित्याची मजबुती तपासण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या दर्जाविषयक चाचण्या केल्या आहेत का? केल्या असल्यास मी त्या चाचण्यांचे अहवाल दाखवू शकतो का? त्याशिवाय सर्व काम कायदेशीरपणे, पीएमसी किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून आवश्यक त्या सर्व परवानग्या घेऊन करणे अतिशय महत्वाचे आहे. जेव्हा तुम्ही अशा प्रक्रियांचे पालन करता तेव्हा नोंदणीकृत संरचनात्मक रचनाकार (स्ट्रक्चरल डिझायनर) तसेच वास्तुविशारद (आर्किटेक्ट) यांच्याकडून इमारतीच्या कामात नियमांचे योग्य पालन होत असल्याचे प्रमाणपत्र ठराविक कालावधीने घेण्याची तरतूद आहे. एक ग्राहक म्हणून तुम्ही रचनाकार किंवा वास्तुविशारद यांना हक्काने असे प्रमाणपत्र मागू शकता, उदाहरणार्थ भोगवटा/बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मिळवण्यापूर्वी पीएमसी नोंदणीकृती संरचनात्मक रचनाकाराकडून स्थैर्य प्रमाणपत्र (स्टॅबिलिटी सर्टीफिकेट) मागते, ज्यामध्ये इमारतीच्या मजबुतीची हमी असते, मात्र एकाही ग्राहकाने त्याची प्रत कधी मागीतलेली नाही! तुम्ही एखाद्या अवैध इमारतीमध्ये सदनिका आरक्षित केली असेल तर विकासक असे स्थैर्य प्रमाणपत्र वगैरे कधीच घेणार नाही. त्यामुळे अवैध बांधकामांमध्ये अपघात होण्याची शक्यता अधिक असते. लक्षात ठेवा आपण जेव्हा बांधकामाच्या सुरक्षेचा विचार करतो तेव्हा केवळ त्याच्या आराखड्याच्या सुरक्षेचाच नाही तर आग, पूर किंवा भूकंप अशा नैसर्गिक आपत्तींपासून सुरक्षेचा विचार करतो. इमारत या सर्व घटकांचा विचार करुन बांधण्यात आली पाहिजे, मात्र बाहेरुन काचेच्या भिंती, आकर्षक रचना असलेल्या इमारतींमध्ये या बाबींकडे ब-याचदा दुर्लक्ष केले जाते. जेव्हा अशा रचनांचे तोटे आपल्यासमोर येतात तेव्हा वेळ हातातून गेलेली असते. याशिवाय इमारतीतून बाहेर पडण्यासाठी पुरेसे आपत्कालीन मार्ग, अग्निरोधक बांधकाम साहित्य इत्यादी तपासून पाहिले पाहिजे.

लक्षात घ्या एक चांगली, मजबूत, सुरक्षित इमारत आपोआप बांधली
जात नाही, तर दर्जा हेच उद्दिष्ट असलेल्या समर्पित व्यावसायिकांच्या अथक
परिश्रमाचे ते फलित असते. सुरक्षेच्या
घटकाकडे दुर्लक्ष करुन दर्जा राखला जाऊच शकत नाही, त्यामुळे बांधकामाच्या प्रत्येक
टप्प्याला पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे, केवळ हातातले काम लवकर संपवण्यासाठी घाई
करुन उपयोग नाही. त्यामुळेच इतरांवर
आरोप करण्याऐवजी, तुमच्या इमारतीच्या सुरक्षेविषयी तुमची जबाबदारी समजून घ्या व
ज्यांना ती समजते त्यांच्याशीच हातमिळवणी करा, एवढंच मी म्हणेन!
Sanjay Deshpande
Sanjeevani Dev.
Envo-Power Committee, Credai, Pune
Please do visit my blogs to know about our philosophy at Sanjeevani ! (Click the links below)
http://jivnachadrushtikon.blogspot.in/
http://visonoflife.blogspot.com/
Social Side of Sanjeevani ! (Click link below)
http://www.flickr.com/photos/65629150@N06/sets/72157628805700569/
For any of your complaints about city, log in at link below
http://www.punecorporation.org/GRS/Complaint/LaunchComplaintCitizen.aspx
Think Green, Think Life
www.sanjeevanideve.com
No comments:
Post a Comment