Sunday, 26 October 2014

तुमच्या शेजा-यांना जाणून घ्या!





















तुम्ही जर स्वतः एक चांगले शेजारी असाल तरच तुम्हाला चांगले शेजारी मिळतील...हॉवर्ड ई. कोच

हॉवर्ड . कोच हे अमेरिकी नाटककार पटकथालेखक होते, १९५० च्या दशकात त्यांच्या नाटकातून त्यांनी साम्यवादाच्या विचारांचे समर्थन केल्याच्या आरोपावरून हॉलिवुड चित्रपट स्टुडिओच्या बड्या प्रस्थांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता. स्वतःला कायम बरोबर  समजणाया अमेरिकन्सनी कदाचित शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर वरील वाक्याचा चुकीचा अर्थ काढला असेल मात्र सध्या भारतातील सदनिका संस्कृतीला ते अतिशय चपखल लागू होते! माझ्या स्वतःच्या इमारतीमधील सदनिकेत नुकत्याच घडलेल्या एका लहानशा घटनेमुळे मला हे अवतरण आठवले. इतर कोणत्याही गृहसंकुलाप्रमाणे आमच्या इमारतीच्या स्वागत कक्षात सूचना फलक आहे, ज्यावर आमच्या गृहसंकुलाचे कार्यक्षम सचिव सर्वसाधरणपणे पाणी कपात, लिफ्टच्या दुरुस्तीच्या वेळा याविषयी सूचना लिहीतात. अलिकडेच कामावरुन परतताना व्यवस्थितपणे टंकलिखित केलेल्या एका पत्राने माझे लक्ष वेधून घेतले ते वाचण्यासाठी मी क्षणभर थांबलो, कारण ते एखाद्या सूचनेपेक्षा काहीतरी वेगळे वाटत होते. ते माझ्या खालच्या मजल्यावर भाड्याने राहणा-या एका कुटुंबाने सर्व रहिवाशांना उद्देशून लिहीलेली लहानशी टीप वजा पत्र होते, हे कुटुंब नुकतेच ती जागा सोडून दुसरीकडे राहायला गेले होते. त्यांनी आमच्या इमारतीमध्ये जवळपास चार वर्षांच्या वास्तव्यात आलेल्या अविस्मरणीय अनुभवांविषयी लिहीले होते. आता ते दुसरीकडे राहायला जात असून त्यांना इथल्या लोकांची आठवण येईल त्यांचे इथले वास्तव्य एक सुंदर अनुभव बनविण्यासाठी त्यांनी सर्व रहिवाशांचे आभार मानले होते! त्यांची ही कृती अगदी साधी तरीही अतिशय भावस्पर्शी होती, मी त्या पत्राचे मोबाईलमध्ये एक छायाचित्र घेतले, त्या गृहस्थांना पत्राविषयी संदेश पाठवावा असा मनात विचार आला, मात्र मग मला जाणवले की माझ्याकडे त्यांचा मोबाईल क्रमांकही नव्हता किंवा त्यांचा नवीन पत्ताही नव्हता! मी त्या कुटुंबातील सदस्यांना दिवसातून अनेकदा लिफ्टमध्ये, पार्किंगमध्ये, इमारतीच्या स्वागतकक्षात भेटलो असेन. आम्ही लिफ्टमधून खाली किंवा वर जाताना हवापाण्याच्या गप्पा मारल्या आहेत, स्मितहास्य केलं आहे, मात्र त्यांच्याकडून मी कधी त्यांचा साधा मोबाईल क्रमांकही घेतला नाही म्हणून मला अपराध्यासारखं वाटलं किंवा खरतर लाज वाटली; कारण एक शेजारी म्हणून मी त्यांच्याशी फारच परक्यासारखा वागलो होतो!त्या जाणीवेतूनच, मी हा लेख लिहीत आहे किंबहुना हाच या लेखाचा विषय आहे, की आपण आपल्या शेजा-यांना किती जाणतो? पुण्यात बालपण घालवलेल्यांना म्हणजे माझ्या पिढीतल्या लोकांना आठवत असेल की तेव्हांच्या वाडा किंवा चाळ संस्कृतीमुळे प्रत्येक जण प्रत्येकाला ओळखत असे! कोणत्या घरात कुणाच्या मुलीचं लग्न कुठे जुळतंय, कोणत्या नवरा-बायकोंचं पटत नाही अशी कुठलीही गुपितं नसत आणि ma^ट्रीकला बसलेल्या मुलाचा निकाल आई-वडिलांपूर्वी अख्ख्या गल्लीला समजायचा! अगदी लहानशी गोष्ट एकमेकांना सांगितली जायची किंवा सार्वजनिक व्हायची, तेव्हाचं सामाजिक जीवनच तसं होतं. लोकांना बाहेरगावी जायची भीती वाटत नसे घराच्या सुरक्षेसाठी कोणतेही सुरक्षा दरवाजे किंवा सीसी टीव्ही कॅमेरे लागत नसत. आपत्कालीन सुरक्षा अलार्म ठेवावा लागत नसे किंवा महत्वाच्या दूरध्वनी क्रमांकांची यादीही नसे तो मोबाईल फोनचा काळ नव्हता त्यामुळे आपत्कालीन वेळेसचे क्रमांक स्पीड डायलिंगवर ठेवायचा प्रश्नच नव्हता! खाजगी सुरक्षा सेवा किंवा सुरक्षा रक्षक हे शब्दही ऐकीवात नव्हते; संपूर्ण मुहल्ला किंवा गल्लीची सुरक्षा एक गुरखा जागते रहो असे म्हणून करत असे.... ते देखील फक्त रात्री! भाडेकरुंनाही कुटुंबाचाच एक भाग म्हणून वागवले जात असे अतिशय आपुलकीची आदराची वागणूक दिली जात असे. गृहनिर्माण संस्था किंवा व्यवस्थापकीय समित्या स्थापन करायची गरज नव्हती; नागरिकांना एकत्र आणण्यासाठी कोणत्याही परिपत्रकाची गरज पडायची नाही कोणताही सूचना फलकही आवश्यक नव्हता. तरीही एकूणच सामुदायिक सुरक्षेच्या दृष्टीने तो सर्वात सुरक्षित काळ होता, कारण प्रत्येक जण दुस-यावर नकळत लक्ष ठेवत असे! पुणे शहरच का लहान शहरातून आलेल्या आपल्या सर्वांचा आपल्या बालपणाविषयी असाच अनुभव असेल, कारण तेव्हा घर म्हणजे केवळ आपण राहात असलेल्या चार भिंतींपुरते मर्यादित नव्हते तर आपला संपूर्ण परिसरच आपले घर होते, म्हणूनच हे शहर देशातील सर्वोच्च शहरांपैकी सर्वात सुरक्षित शहर होते आणि ही फार पूर्वीची गोष्ट नाहीये !अजिबात खाजगी जीवन नसल्याने कधी कधी शेजा-यांची थोडी कटकट वाटायची हे मान्य असले तरीही, आमच्यापैकी ज्यांनी त्याचा अनुभव घेतला आहे ते अगदी छातीठोकपणे सांगू शकतील की त्यात एक धमाल होती ते -या अर्थाने सामुदायिक जीवन होते! मात्र तेव्हा आयुष्याच्या संकल्पनाही वेगळ्या होत्या वाटून घेणे हा जीवनाचा मुख्य उद्देश होता. वाटणे केवळ किराणा सामान किंवा लाकडी सामान यापुरते मर्यादित नव्हते तर भावनांचीही देवाणघेवाण व्हायची, जो जीवनाचा सर्वात महत्वाचा पैलू होता! समस्या ही कोणत्याही वैयक्तिक कुटुंबाची नसायची आनंदही सगळेजण वाटून घेत. सण तसेच कोणतेही कौटुंबिक समारंभ एकत्र साजरे केले जात. कुटुंबातील एखाद्याचे आजारपण सर्वांसाठी चिंतेचा विषय होता वयोवृद्ध तसेच लहान मुले ही संपूर्ण समाजाची जबाबदारी होती! कुणालाही त्याच्या संकटाला तोंड देण्यासाठी एकटे सोडले जात नसे; ती -या अर्थाने सोसायटी होती त्यासाठी कोणत्याही कायदेशीर नावाची गरज नव्हती!

आता आपल्या वर्तमानकाळाचा विचार करा, अलिकडेच पुणे पोलीसांच्या एका फलकाने माझे लक्ष वेधून घेतले, त्यावर एक मोठा डोळा रंगविण्यात आला होता खाली मथळा होतातुमची दृष्टी वापरा”, म्हणजेच सतर्क राहा आजूबाजूला काहीही गैर होत असल्यासारखे वाटल्यास पोलीसांना कळवा. पोलीस दलाच्या सद्हेतूविषयी पूर्णपणे आदर राखत मला प्रश्न पडतो की सध्या लोकांची मी, माझे माझे कुटुंब अशी मानसिकता असताना आपल्या आजूबाजूला काही चुकीचे घडते आहे याची किती जण दखल घेतील! आजूबाजूला पाहण्याकडे कुणाला वेळ आहे किंवा तसा कुणाचा दृष्टिकोन आहे? अशी परिस्थिती आहे की आपल्याला जगभरात घडणारे सर्वकाही केवळ एका क्लिकवर उपलब्ध होते मात्र आपल्या शेजारच्या सदनिकेमध्ये राहणा-या कुटुंबाचे नाव आपल्याला माहिती नसते! शेजारची सदनिकाच कशाला आपल्याला शेजारच्या खोलीत आपली मुले काय करताहेत हे देखील क्वचितच माहिती असते जी त्यांच्या स्वतःच्या व्हर्च्युअल विश्वास गुंग असतात! हे वाचायला कदाचित फारच नाट्यमय वाटेल मात्र हेच आधुनिक काळातील वास्तव आहे. नव्याने सुरु होणा-या प्रकल्पांच्या जाहिराती जरी पाहिल्या तरी त्यात उल्लेख केलेला असतो की पूर्णपणे स्वतंत्र तसेच तिन्ही बाजू खुली असलेली घरे, कुणालाही तुमच्या घरात डोकावून पाहता येणार नाही किंवा काहीजण तर त्याही पुढे जाऊन अजिबात शेजार नसलेली घरे सादर करत असल्याची घोषणा करतात! आपल्याकडे काचेच्या खिडक्या असलेल्या गगनचुंबी इमारती असतात त्या आपल्याला क्षितीजाचे १८०-३६० अंशाचे दृश्य दाखवतात मात्र आपण आपल्या शेजारी कोण राहते हे पाहू शकत नाही! आपल्याला आपल्याशेजारी कोण राहते हे पाहता येत नसेल तर त्याच्या किंवा तिच्या गरजा किंवा भावना जाणून घेण्याचा प्रश्नच कुठे येतो, कारण त्याची काळजी कुणाला आहे? आपल्याकडे चकचकीत स्वागत कक्ष आहेत, प्रायव्हसी आहे, अंतर्गत सजावट आहे जगाशी जोडणारी साधने आहेत, मात्र विचार करा तुम्हाला तुमच्या शेजा-यांशी जोडणारे कोणतेही साधन नाही! त्यासाठी केवळ आपल्याला स्वतःच्या दरवाजाबाहेर पाऊल टाकायचे आहे शेजारील दरवाजाची बेल दाबून शेजा-यांना सुहास्य वदनाने अभिवादन करायचे आहे! दुर्दैवाने अनेकांना हे लहानसे पाऊल जागतिक सफरीच्या तिकीटापेक्षाही महाग असल्यासारखे वाटते. दुसरीकडे आपल्याला चोवीस तास सुरक्षा, सीसी टीव्ही, सुरक्षा दरवाजे, सुरक्षा कक्षाला जोडणारा इंटरकॉम, आपल्या शयनकक्षात विविध प्रकारच्या तिजो-या सर्व प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान हवे असते, एकप्रकारे शेजार नसलेल्या घरासाठी आपण ही किंमतच मोजत असतो! अर्थात काही गृहनिर्माण संस्थांनी किंवा संकुलांनी वाडा संस्कृती जपून ठेवली आहे ते एकत्र येऊन संमेलने करत असतात, मात्र आपल्या आजूबाजूला असलेल्या इमारतींच्या तुलनेत अशा इमारतींची संख्या किती आहे असा प्रश्न मला विचारावासा वाटतो?
बरेच जण म्हणतील की रिअल इस्टेटला त्यासंदर्भात काय करता येईल? इथे आपण लोकांच्याच गरजेला प्रतिसाद देत आहोत असे वाटत नाही का? आपण आज वाडे किंवा चाळी बांधून लोकांना त्यात राहायला सांगू शकत नाही! मी पुन्हा मागे जाऊन चाळ किंवा वाड्यात राहायला सांगत नाही कारण त्याचेही तोटे आहेत आता काळ बदलला आहे; मात्र त्याचवेळी आपण जेव्हा बदलतो तेव्हा त्याचा अर्थ असा होत नाही की सर्वकाही मागे सोडायचे पुढे जायचे. इथे रिअल इस्टेटची भूमिका अतिशय महत्वाची आहे कारण आपण विकासक आहोत आपण विकासकाचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे! आपण सोसायट्या विकसित करतो त्यामुळे आपण जे बिरुद मिरवतो ते सार्थ ठरवायचे असेल तर त्यासाठी आपण सोसायटी या शब्दाचा खरा अर्थ जाणून घेतला पाहिजे! आपण जिला सोसायटी म्हणतो ती केवळ एक इमारतींचा समूह त्यातील सोयी सुविधा एवढेच नसते तर त्या इमारतींमध्ये राहणा-या लोकांनी सोसायटी बनते! आपण नियोजन करताना ज्यांना आपण सोयीने किंवा चुकीने सोसायटी म्हणून संबोधतो, त्या इमारती विकसित करताना या लोकांचा विचार केला पाहिजे! अजिबात खाजगी आयुष्य नसेल अशी इमारत बांधा असे कुणीच म्हणत नाही कारण आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकालाच स्वतःचे काही शांत निवांत क्षण हवे असतात, मात्र त्याचा अर्थ तुम्ही ज्या लोकांमध्ये राहता त्यांच्यापासून स्वतःला पूर्णपणे तोडणे असा होत नाही. माणूस हा सामाजिक प्राणी आहे म्हणूनच स्वाभाविकपणे आपल्याला त्याची घरे इतर माणसांपासून लांब ठेवता येणार नाहीत! आपण स्वागत कक्षापासून ते जिन्यातल्या pa^सेज पासून मोकळ्या अंगणापर्यंत लोकांना एकत्र येता येईल अशा जागा जास्तीत जास्त उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांना सोसायटीमध्ये राहण्याचा खरा उद्देश समजावून दिला पाहिजे. आपण कुणालाही एकटे राहायला सांगत नाही किंवा कुणाला पदपथावर राहायला सांगत नाही, मात्र दोन्हींचा योग्य समतोल साधला पाहिजे तुमच्या ग्राहकांना तुमच्या प्रयत्नांची जाणीव करुन दिली पाहिजे. यालाच मी ग्राहकांना तुमच्या निर्मितीमागचे तत्वज्ञान समजावून सांगणे असे म्हणतो; कारण तुम्ही तुमच्या ग्राहकाशी चर्चा केल्याशिवाय जीवनाच्या अशा पैलुंची ओळख करुन दिल्याशिवाय त्याला ती परंपरा कशी पुढे नेता येईल तुम्ही तयार केलेल्या इमारतीमध्ये त्याप्रमाणे कसे राहता येईल ? आपल्या इमारतींमध्ये राहणा-या व्यक्तिला सामुदायिक जीवनाचे महत्व समजल्यानंतर, आपल्याला आज भेडसावणा-या अनेक समस्यांची आपोआप काळजी घेतली जाईल. या समस्या सुरक्षेच्या चिंतेपासून ते सोसायटीच्या मासिक देखभाल शुल्काच्या वादापर्यंतच्या आहेत, ज्या आजकालच्या तथाकथित सोसायट्यांसाठी नेहमीची मोठी डोकेदुखी होऊन बसल्या आहेत!
या आघाडीवर रिअल इस्टेटची भूमिका अतिशय निर्णायक असणार आहे, कारण आपण कोणत्या प्रकारची सोसायटी म्हणजेच समाज बनविणार आहोत हे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे त्यासाठी आपण लोकांना एकत्र आणणे आवश्यक आहे. असे झाले तरच चांगल्या समाजाची काही आशा आहे जिथे लोक -या अर्थाने समाधानाने   शांततेने राहतील; कारण जीवनातील हे घटक पैशाने विकत घेता येत नाहीत तर आपल्यालाच ते वागणुकीने कमवावे लागतात !

संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स



No comments:

Post a Comment