Monday 23 March 2020

भीती, साहस अणि लॉकडाऊन





















धैर्य म्हणजे भीती न वाटणे नाही, तर त्या भीतीवर मात करून जगणे”...

हे मलाच सुचलेलं वाक्य आहे, म्हणून मी ते लिहीलं पण लेखकाचं नाव लिहीलं नाही. स्वतःतल्या तत्वज्ञाचा शोध लागणे हा सुद्धा भीतीचाच परिणाम असावा असं मला वाटतं, अर्थात हा विनोदाचा भाग झाला.आयुष्यात पहिल्यांदा मी माझ्या भीतीला इतक्या जवळून अनुभवलंय. मला खात्री आहे की आपल्यापैकी बहुतेकांना हाच अनुभव आला असेल. आयुष्यात पहिल्यांदाच आपल्याला या भीतीवर कशी मात करायची याची कल्पनाच नाही. ही काही कुणा विषाणूची भीती नाही, तर एखाद्या नावाजलेल्या भयपटामध्ये दाखवतात त्याप्रमाणे एखाद्या पडक्या जागी बंद दरवाजामागे असलेल्या अज्ञात गोष्टींची भीती वाटावी तशी आहे. माझा काही तुम्हाला घाबरवण्याचा हेतू नाही किंवा नकारात्मकता अथवा भीती वाढवण्यासाठी मी हे सांगत नाही. तर मी हे स्वतःसाठी, माझ्या भीतीवर मात करण्यासाठी लिहीतोय कारण तुमच्या भीतीवर मात करण्याचा हाच सर्वोत्तम मार्ग आहे हेच मी वाचलंय आणि मला उमगलंय.
तुम्हाला हा कोणत्या विषयावरचा लेख आहे हे आत्तापर्यंत समजलं असेल व कोरोनाविषयी फॉरवर्ड केलेला आणखी एक संदेश म्हणून वैतागलाही असाल. पण आवर्जुन वाचा कारण मी आजकाल वर्तमानपत्रं, वॉट्सपचे फॉरवर्ड किंवा फेसबुक अथवा इन्स्टावरचे कोरोनाचे पोस्ट वाचणं थांबवलं आहे. मीकुणी महामानव आहे म्हणून नाही तर प्रत्येक गोष्टीला काही एक मर्यादा असते. गंमत म्हणजे माझ्या लहान मुलानं त्याचा डीपी बदलला ज्यात त्यानं लिहीलं होतं, “तुम्हाला कणखर होण्याशिवाय काही पर्याय नसतो तेव्हाच तुम्हाला तुम्ही किती कणखर आहात याची जाणीव होते”!  ही पिढी संकटांविषयी असा विचार करते (म्हणजे डीपीमध्ये वापरलंय म्हणजे किमान त्यांना जाणीव असावी) व त्याला तोंड देते हे विचार करायला भाग पाडतं. आपण मोठ्यांनी खरंतर त्यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. वरवर पाहता ही नव्या शतकात, इंटरनेटच्या युगात जन्मलेली पिढी निष्काळजी, बेजबाबदार किंवा बरेचदा अगदी त्रासदायकही वाटते. पण प्रत्येक वेळी आधीची पिढी ही विशेषणं पुढच्या पिढीला लावत असते.पण गेल्या तीन दिवसांपासून आपण सगळे घरात अडकलेले असताना, तरुण पिढी टाळेबंदीचा काळ माझ्यापेक्षा अधिक सहजपणे घेत आहे हे पाहून मी सुरुवातीला वैतागलो. पण त्यानंतर भोवताली सुरू असलेला गोंधळ ते इतक्या सहजपणे कसा स्वीकारू शकतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करू लागलो. आपली मुख्य अडचण म्हणजे आपण सावधान राहणं व काळजी करणं आणि अविचारीपणा व धाडस यात गल्लत करतो. त्याचवेळी आपण काहीही न करता बसायला शिकलेलोच नाही, आपण त्याला वेळेचा अपव्यय मानतो, किंबहुना आपल्या सगळ्या कृती, मते, हिशेब एकाच गोष्टीवर आधारित असतात, ते म्हणजे अपव्यय. जेव्हा खरेदीवर विनाकारण पैसे खर्च होतात तेव्हा आपण वैतागतो, जेव्हा एखाद्या उपाहारगृहात अन्न वाया जाते तेव्हा आपण वैतागतो, रस्त्यावरील सिग्नलपाशी इंधन वाया जाते तेव्हा आपण वैतागतो, त्यामुळे अर्थातच घरी बसून (सक्तीने) आपण वैतागल्यास आश्चर्य नाही, आपण आपला वेळ वाया जात असल्यामुळे सर्वाधिक वैतागलो आहोत. आपल्याला लहानपणापासून एकच तत्वज्ञान शिकवण्यात आले आहे ते म्हणजे अपव्यय हा वाईट असतो, वेळ हाच पैसा आहे. त्यामुळेच वेळ वाया जात असल्यामुळे आपल्यापैकी बहुतेकजण, विशेषतः पन्नाशीच्या आसपास असलेले सगळे दुप्पट वैतागले आहेत.

काही वेळा थोडा विराम घेण्याला अपव्यय म्हणत नाहीत आणि वेळ वाया जात नाही तर आपण त्याचा वापर कसा करतो यावरून तो वाया गेला का हे ठरतं. ( आता हेसुद्धा माझंच तत्वज्ञान आहे! ). मी रोज स्वतःसाठी काहीतरी कोरोना डायरीज म्हणून लिहायला सुरुवात केली, पण नंतर मी विचार बदलला. मी त्याला म्हणून  लॉकडाऊन डायरीज असं नाव दिलं. मी त्यात रोज असं काहीतरी लिहायचा प्रयत्न केला ज्यामुळे मला माझ्या मनातली भीती अधिक चांगल्याप्रकारे जाणून घेता येईल. घरात बंद झाल्यामुळे अपराधी वाटणार नाही किंवा मी वैतागणार नाही. मी जे काही लिहीले ते इथे देतोय, तुमची इच्छा असेल तर वाचा, नाहीतर डिलिट करून टाकाJसंजय



कोरोनाचे धन्यवाद!!

काही वेळा वाईट गोष्टीसुद्धा आपल्याकडून सर्वोत्तम काम करून घेतात...

आपण सगळेजण (मी सुद्धा) या कोरोना विषाणूमुळे आतून धास्तावलो आहोत. ज्यांना या विषाणूमुळे खरंच त्रास होतोय व ज्यांना कोव्हिडमुळे आपल्या प्रियजनांना गमवावं लागलं त्यांच्याविषयी पूर्णपणे आदर राखत असं म्हणावसं वाटतं की कोव्हिडनं आपल्याला राष्ट्रीयत्व, रंग, जात, लिंग तसंच सामाजिक दर्जा या पलिकडे जाऊन माणसाविषयी अनेक गोष्टींची जाणीव करून दिली आहे.

यामुळे आपल्याला जाणीव झाली की आपण आधी माणूस आहोत व त्यानंतर इतर काही. पहिल्यांदाच असं झालंय की संपूर्ण जग युद्ध लढतंय पण शत्रू कुणी माणूस नाही, पण तरीही तो सगळ्यांसाठी सारखाच आहे. यामुळे आपल्याला जाणीव झाली की एकजूट होऊनच आपण कोणतीही समस्या सोडवू शकतो. आपण खरंतर स्वतःच तयार केलेल्या सीमा विसरून एकत्र येऊ शकतो. 

यामुळे आपल्याला जाणीव झाली की आपण विज्ञानात कितीही प्रगती केली असली तरीही निसर्ग आपल्यापुढे ज्या समस्या उभ्या करतो त्यातल्या प्रत्येकीसाठी आपल्याकडे काही झटपट तोडगा नसतो. यामुळे आपल्याला जाणीव झाली की जेव्हा आपल्यावर एखादी आपत्ती ओढवते तेव्हा आपण एकमेकांवर दोषारोप न करता, एकजुटीनेच आपत्तीला तोंड देऊ शकतो. यामुळे आम्हाला जाणीव झाली (अशी आशा वाटते) की शांतपणे जगण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे निरोगी राहणे, कारण तुम्ही श्रीमंत आहात किंवा एखाद्या देशाचे पंतप्रधान आहात म्हणून कोरोना तुम्हाला सवलत देणार नाही. 

यामुळे आम्हाला जाणीव झाली की एकमेकांचा द्वेष करून नाही तर एकमेकांना मदत करून आपण खऱ्या अर्थानं माणूस होऊ. जगा व जगू द्या याच मंत्रामुळे सगळे टिकून राहू शकतील, हे प्रत्येक प्रजातीला लागू होतं. यामुळे आपल्याला इतर प्रजाती जगाव्यात यासाठी आपलं काय कर्तव्य आहे याची जाणीव झाली पाहिजे. कारण इतर प्रजातींसाठी आपण माणसे कोरोना सारखीच आहोत.

शेवटी कोरोनावर मात केल्याच्या यशोगाथा ऐकताना आपल्याला जाणीव झाली की आपण सगळे एकजुटीने अगदी महाशक्तिशाली शत्रूचाही नायनाट करू शकतो.

कोरोना तू आम्हाला पुन्हा एकदा माणूस बनवल्याबद्दल तुझे आभारा. मित्रांनो असेच राहा आपण सगळे मिळून कोरोनाविरुद्धची लढाई लढू व लढाई जिंकल्यानंतर आपण शिकलेला धडा विसरायला नको..!!

मित्रांनो

आपल्यापैकी बहुतेकांसाठी व्यवसाय, घर व अगदी सामाजिक आघाडीवर कठीण काळ आहे. आपण सगळे थोडा धीर येण्यासाठी एकमेकांकडे पाहतोय, आपल्यापैकी बहुतेकांना कोरोना नावाच्या अदृश्य भीतीमुळे आपल्या व्यवसायाचं किंवा तब्येतीचं काय होईल याची धास्ती वाटतेय.वाट पाहात बसू नका, पुढाकार घ्या आणि स्वतःला आणि इतरांना धीर द्या... मी असं करायचा प्रयत्न करतो... म्हणूनच तुम्हाला काहीतरी सांगतोय...

हे करू नका
अशावेळी नकारात्मक बातम्या किंवा टीव्हीवर हिंसक किंवा मारामारीचे कार्यक्रम पाहणे टाळा, ज्या फॉरवर्डमुळे तुम्हाला माहिती मिळण्यापेक्षाही भीती वाटते ते डिलिट करा किंवा ते इतरांना पाठवू नका. व्यवसायांचे किती नुकसान होतंय तसंच त्यामुळे आपल्या कामावर किंवा उद्योगांवर व आरोग्यावर कसा परिणाम होतोय याविषयी फारशी चर्चाही करू नका. परिस्थिती किती वाईट आहे याऐवजीतुम्ही आणखी किती चांगलं काम करू शकता याविषयी बोला. थोडासा खोकला आला किंवा सायनसचा त्रास झाला तर लगेच आभाळ कोसळल्यासारखी धावपळ करू नका, अर्थात त्याकडे दुर्लक्षही करू नका केवळ तुमच्या डॉक्टरांशी शांतपणे बोला.

हे करा...

तुमच्याकडे असलेल्या वेळेचा सदुपयोग करा....पुस्तके किंवा कादंबऱ्यांमधून प्रेरणादायक कथा वाचा.
डिस्ने/ड्रिम वर्क्स यांचे हलकेफुलके किंवा चांगला संदेश देणारे चित्रपट तुमचा टीव्ही, नेटफ्लिक्स किंवा हॉटस्टारवर पाहू शकता... टॉय स्टोरी, आईस एज, मादागास्कर, कोको, क्लॉज, मार्व्हल एंड गेम असे काही चित्रपट मी सुचवतो. यामुळे खरंच तुमचा चांगुलपणावर, एकीवर व नात्यांवर विश्वास बसेल.
नॅशनल जिओग्राफिक किंवा निमल प्लॅनेट पाहा जिथे निसर्गात अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही टिकून राहणं महत्त्वाचं असतं हे दिसतं.

घरात काही वेळ वाचन, लेखन, चित्रकला असा तुम्हाला आवडेल तो छंद जोपासा, एक व्यक्ती म्हणून स्वतःला सुधारण्याचा तो सर्वोत्तम मार्ग आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे सॅनिटायझर वापरून, स्वच्छता राखून जास्तीत जास्त काळजी घ्या. तुम्ही व्यायाम करत नसाल तर करायला सुरुवात करा, तुम्ही आधीपासून व्यायाम करत असाल तर तो वाढवा. खुल्या हवेत चालणे किंवा धावणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे तसंच घरी शरीराला ताण देणारे व्यायाम करा. व्यायामामुळे तुम्ही शरीराने तंदुरुस्त राहता, तुमची रोगप्रतिकारक्षमता चांगली होते, त्याचशिवाय तुमचं मन सकारात्मक राहतं. व्यायाम केवळ आत्ताच नाही तर नियमितपणे करा!..

केवळ वाचू नका तर ते आचरणातही आणा व तुमच्या कुटुंबाला व मित्रमंडळींनाही पाठवा... *संजय देशपांडे व टीम संजीवनी*

हे कोरोनाविषयी नाही!


आपण आजकाल रोज सकाळी उठल्यावर आपल्याला थोडंसही चक्कर आल्यासारखं वाटत असेल किंवा घसा खवखवत असेल, नाक चोंदलं असेल किंवा अगदी जरासं डोकं दुखत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करत नाही. चला आणखी एक दिवस उगवला असं म्हणून दिवसाची सुरूवात करतो.आपल्या आजूबाजूला कुणी शिंकलं तर आपणहसून तुला माफ केलं असं म्हणत नाही, एखाद्याला खोकला आला तर आपण त्याच्या पाठीवरूनहात फिरवत नाही किंवा पाणी देत नाही तर त्याच्यापासून दूर होतो, एखाद्या व्यक्तीनं सांगितलं की त्याला ताप आला आहे तर आपण त्याची काळजी घेण्याऐवजी त्याच्यापासून शांतपणे लांब राहण्याचा निर्णय घेतो.रस्त्यावर पदपथावरून चालताना आपण अगदी ओळखीच्या लोकांकडेही पाहणं टाळतो, किराणामालाच्या दुकानात थोडीशीही गर्दी असेल तर आपण स्वतःला तसंच गर्दीलाही उगीच दूषणं देतो. आपण डॉक्टरांकडे जाणं टाळतो कारण तिथे प्रतीक्षा कक्षात आलेल्या रुग्णांना न जाणो कोणता संसर्ग असेल अशी भीती आपल्याला वाटते. आपण प्रवासाचे आधीचे सगळे कार्यक्रम रद्द केले आहेत व नवे कार्यक्रम लांबणीवर टाकले आहेत. सर्वात शेवटचे म्हणजे आपल्याला अनपेक्षित पाहुण्यांनी येऊन आपल्या दरवाजावरची बेल वाजवलेलं अजिबात आवडत नाही, विशेषतः जे परदेशातून प्रवास करून आलेले असतील.

हे केवळ कोरोनाविषयी नाही तर आपण ज्याप्रकारचे वैयक्तिक आयुष्य जगतोय त्याविषयी आहे. यामुळे मला कोरोना विषाणूपेक्षाही स्वतःचा तिरस्कार वाटतो. कुठेतरी खबरदारी घ्यायच्या नावाखाली आपण दुःखी होतोय व भोवतालच्या प्रत्येक गोष्टीविषयी शंका घेतोय. अज्ञाताच्यास्वार्थी भीतीमुळे अगदी कणखर मनाचेही काय होऊ शकते हे याचे उदाहरण आहे. खरी लढाई कोरोनाविरुद्ध नाही तरस्वतःचं मनःस्वास्थ्य कायम राखण्यासाठी आहे.

याचा अर्थ असा होत नाही की, निष्काळजीपणे वागाव काहीच झालं नसल्याप्रमाणे सगळीकडे फिरा. याचा अर्थ असा होतो की सतत भीतीखाली वावरताना जगणं सोडून देऊ नका, याला संतुलित मनानं तोंड देता येऊ शकतं.

ही परिस्थिती एका अर्थानं आपल्यासारख्या अनेकांसाठी वरदानच आहे, जे स्वतःकडे पद, प्रतिष्ठा, ज्ञान मिळवल्यामुळे स्वतःला यशस्वी समजतात, पण आपल्या आकलनापलिकडच्या किंवा आपल्या पैशांनी खरेदी करता येणार नाही अथवा आपल्या यशानं ज्यावर मात करता येणार नाही अशा एखाद्या भीतीला तोंड देणं आपण विसरून गेलो आहोत. 

ही काही फक्त एखाद्या विषाणूजन्य संसर्गाची चाचणी नाही आपण आतून कसे आहोत याचीच चाचणी आहे. करोनावर केवळ एकाच गोष्टीने मात करता येऊ शकते ती म्हणजे संतुलित व आनंदी मनाने तसंच एकजूट होऊन त्याला तोंड देऊन, अर्थात हे प्रत्येक आपत्तीच्या बाबतीत खरं आहे.

अजून काही जग संपलेले नाही!

माझी पिढी, जी आता पन्नाशीत आहे ती खरंच सुदैवी आहे कारण आम्ही शाळेत असताना पटकी, देवी, पोलिओ अशा कितीतरी लसी घेतल्या असतील. तसंच आम्ही आपल्या डोक्यावर स्कायलॅब पडेल या भीतीनं झालेला गोंधळही अनुभवला आहे, त्यावेळी लोक रात्रभर आकाशाकडे पाहात जागे होते. त्या काळी तर फारसे टीव्हीही नव्हते आणि आता आपण अशा युगात आहोत जेव्हा आपल्याला जगाच्या अगदी कानाकोपऱ्यात म्हणजे आर्क्टिकमध्ये किंवा अमेझॉनच्या जंगलात काय चाललंय याची थेट दृश्यं पाहता येतात.

पण या माहितीच्या क्षमतेतून आपल्याला काय मिळालं किंवा आपण काय शिकलो असा प्रश्न मी स्वतःला रोज विचारत असतो. आपल्यासाठी खरंच प्रचंड माहिती उघड झाली आहे ज्याला आपण ज्ञान समजतो. पण आपण विश्लेषणाची क्षमता गमावलीय. अगदी सूर्यापेक्षाही प्रचंड शक्तीशाली असामाहितीचा अखंड स्रोत माध्यमांच्याद्वारे२४x७ आपल्यावर आदळत असतो, त्याच्या ओघात आपणही तर्कशुद्ध विचार करणं सोडून दिलंय. या माहितीच्या लाटा टीव्ही, मोबाईल व त्यावरील इन्स्टा, वॉट्सप अशी प, वर्तमानपत्रे, आपल्या पीसी किंवा लॅपटॉपवरील इंटरनेट, ट्विटर किंवा फेसबुकच्या माध्यमामातून आपल्या मनाच्या पटलावर आदळत असतात. आपलं मन त्याविरुद्ध खंबीर राहू शकत नाही कारण आपण फार पूर्वीच त्याला अशाप्रकारे प्रशिक्षित करायला किंवा खंबीर बनवायला विसरलो आहोत. 

आपली मतं, आपण जेव्हा इतरांना भेटतो तेव्हा आपलं बोलणं, आपला युक्तीवाद, आपली चुकीची किंवा बरोबर बाजू सगळं काही माहितीरूपी शक्तीवर आधारित असतं, आपल्याकडे जे फेकण्यात आलंय त्याचीच आपण पुनरावृत्ती करतो. 

नेमक्या याच कारणाने आपली पिढी माध्यमांसाठी सोपं लक्ष्य ठरली आहे. एखाद्या विषाणूच्याच बाबतीत नाही तर अगदी पालकत्वापासून, ते आपला नेता निवडण्यापर्यंत, आपल्या प्रत्येक निर्णयावर अप्रत्यक्षपणे माध्यमांचं नियंत्रण असल्यासारखं वाटतं. आपण नकळत त्यांच्यासाठी सावज बनतो.

आपण जेव्हा पूर्वी सगळ्या गोष्टी स्वतः करायचो, केवळ परीक्षेतले प्रश्न सोडवण्यासाठीच नाही तर आपल्या खडूस शेजाऱ्याच्या अंगणात पडलेला क्रिकेटचा चेंडू त्याच्या नकळत परत मिळण्यासाठीही आपण आपले डोके वापरायचो, त्या दिवसांचा विचार करायची वेळ आलीय. 

मित्रांनो, आपण जीवनाचे सर्व पैलू पाहिले आहेत व तरीही आपण सोपा मार्ग निवडला तर आपल्याला स्वतःला परिपक्व म्हणवण्याचाव अगदी रेडिओ सिलोन ते आयफोन दहापर्यंत सगळंकाही पाहिलंय असं म्हणण्याचा काहीही अधिकार नाही. तुम्ही कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवण्याआधी तुमचं डोकं वापरा, विश्लेषण करा व हुशारीनं वागा, आपण हा धडा केवळ आत्ता शिकलोय, कारण "जग अजून संपलेलं नाही

रस्ते बंद करता येतील, मनाची कवाडं उघडा!

दररोज सकाळी अनेक भीतीदायक बातम्या येतात, त्यात रस्ते बंद होणार म्हणजे केवळ पुण्यातच नाही तर देशात जवळपास सगळीकडेच संचारबंदी लागू होणार ही बातमीही आली. पण मनाला कसं टाळेबंद करणार हा मुख्य प्रश्न आहे, विशेषतः नकारात्मक विचार करताना मनाला कोणत्याही सीमा नसतात.

आता कुणा कोरोना विषाणूविरुद्ध व त्यामुळे आपल्या शरीरात होणाऱ्या आजाराविरुद्ध लढाई चाललेली नाही. खरा लढा मानसिक आहे, तो भीती, चिंता तसंच नकारात्मकता नावाच्या विषाणूविरुद्ध आहे. हे सगळे आपल्याच मनाचे खेळ असतात.  मनाला टाळेबंद करणं म्हणजे खरंतर या सगळ्यांना स्वातंत्र्य देणं असा अर्थ होतो, त्याऐवजी आपल्या मनाची कवाडं खुली करा, आनंदाला व उत्साहाला आत येऊ द्या जो भीतीवरचा रामबाण उपाय आहे. लक्षात ठेवा सूर्यप्रकाश कितीही उबदार असला, हवेची झुळूक कितीही आल्हाददायक असली तरीही तुम्ही जोपर्यंत तुमच्या घराची खिडकी उघडत नाही तोपर्यंत ती आत येऊ शकत नाही. मनाचंही असंच असतं.

असो, कोव्हिड१९ नेबाधित पहिले कुटुंब आता संसर्गमुक्त झाले आहे. ते ज्या सोसायटीत राहतात ती त्यांचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. हे खऱ्या अर्थानं आनंदरूपी प्रकाशासाठी मनाची कवाडं खुली करून भीतीरूपी अंधःकाराला दूर सारणं आहे


संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलोपर्स
इमेल: smd156812@gmail.com

No comments:

Post a Comment