Monday, 18 October 2021

थैलवा, अर्थात महेंद्रसिंग धोनी !

 










मित्रांनो, महेंद्र सिंग धोनीचे कौतुक करायला काही शब्द लिहिले आहेत, तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर ही वाचू शकता आवडल्यास शेअर करा...

https://visonoflife.blogspot.com/2021/10/tribute-to-thaliava-msd.html

 

 

टिकाकार होते, आहेत आणि कायम असतील पण तुम्हाला बाद ठरवण्यासाठी त्यांचे जे शब्द आहेत, ते खोटे ठरवण्याची तुमच्यात अजूनही क्षमता आहे, याची तुम्हाला जाणीव करून देण्याकरिताच त्यांचे अस्तीत्तव असते ! ”…

जोपर्यंत तुम्ही हा लेख वाचत असाल तोपर्यंत आयपीएल २१ नावाचा उत्सव संपलेला असेल भारतीय टी२० प्रीमअर लीगला नवीन विजेताही मिळाला असेल किंवा नऊ वेळा अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जच्या गळ्यात चौथ्यांदा विजेतेपदाची माळही पडली असेल.( सिएसके चौथ्यांदा विजेते झालेत.) निकाल काहीही आला तरीही सीएसकेचा संघ आधीच अंतिम सामन्यात पोहोचला आहे उर्वरित तीन संघांमधून त्यांचे प्रतिस्पर्धी कोण असतील याची वाट पाहात आहे, ज्यांच्यात या अंतिम सामान्यातील हॉट सीटसाठी लढत होईल. तुम्ही भारतात असाल अजूनही वरील नावांविषयी नावे कोणाची आहेत असा विचार करत असाल तर ती क्रिकेटच्या खेळाशी संबंधित आहेत मर्यादित २० षटकांचा इंडियन प्रीमिअर लीग सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळला जात आहे (आपल्या देशामध्ये कोव्हिड असल्यामुळे) वरील सर्व त्यामधील संघांची नावे आहेत (ज्याप्रमाणे फुटबॉलमध्ये क्लब असतात). मात्र हा लेख सामन्याविषयी किंवा आयपीएल किंवा टी२० (खेळाचा २० षटकांचा संक्षिप्त प्रकार) विषयी नाही तर तो अशा व्यक्तीविषयी आहे जो सीएसकेचे (एक फ्रेंचाइजी किंवा क्लब किंवा संघ) नेतृत्व करत आहे आत्तापर्यंत १३ वेळा झालेल्या या स्पर्धेमध्ये वेळा त्याने आपल्या संघाला अंतिम फेरीत पोहोचवले आहे. मी एम एस धोनीविषयी बोलतो आहे जो भारतीय संघाचा (अर्थातच क्रिकेट संघ) कर्णधारही होता!

मी क्रिकेटप्रेमी आहे मी खेळापेक्षाही त्यातील खेळाडू ज्याप्रकारे हा (किंवा खरेतर कोणताही खेळ) खेळ खेळतात त्याचा चाहता आहे मी आता जवळपास चार दशकांपासून क्रिकेट पाहात आलोय त्याविषयी वाचत, ऐकत आलोय (माझ्या शालेय दिवसांमध्ये केवळ रेडिओच असायचा). या कालावधीत अनेक खेळाडू होऊन गेले, त्यापैकी काही आता इतिहासजमा झाले आहेत अनेकजण या खेळाच्या इतिहासामध्ये एक दंतकथाच होऊन गेले आहेत. या सर्व नावांविषयी अतिशय आदरच वाटतो, मात्र तरीही त्यातील एका नावाचे वेगळेपण उठून दिसते ते म्हणजे एमएसडी, महेंद्र सिंग धोनी तोच या लेखाचा विषय आहे. असेही कोणत्याही खेळामध्ये करिअर घडवणे सोपे नसते कारण तेंडुलकर कपिल देवसारख्या महान खेळाडूंनाही जाहिरातदार कंपन्या विसरतात ज्यांचे ते ब्रँड अँबेसिडर असतात येथे सिनेमासारखे नाही (अर्थात तुम्ही यशस्वी झाला तर) खेळामध्ये तुमच्यावर पडणारा प्रकाशझोत अतिशय लवकर संपतो.)  वयाच्या ७९ वर्षी अजूनही अमिताभ बच्चन रोज नविन जाहिराती करताना दिसतात बच्चन महानायक असले तरीही पन्नाशी पार केलेली खान गँग अजूनही बॉलिवुडवर वर्चस्व गाजवते. मात्र दुसरीकडे एकेकाळी भारतीय संघाचा स्टार असलेल्या इरफान पठाणसाठी आता कुठल्याच संघात जागा नसल्यामुळे त्याला वयाच्या  तिशीतच निवृत्ती जाहीर करावी लागते. या पार्श्वभूमीवर कुणीही गॉडफादर नसताना, झारखंडच्या एका लहान शहरातून येऊन वयाच्या ४० व्या वर्षीही १३० कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशात सर्वाधिक चर्चित खेळाडू होण्याची किमया एमएसडीच साध्य करू शकतो. मात्र त्याच्याविषयी सर्वाधिक बोलले जाते म्हणून तो विशेष आहे असे नाही, अगदी श्री. मोदींच्या निवृत्तीविषयी ज्याप्रकारे बोलले जाईल (काही जणांनी आधीच चर्चा करायला सुरुवातही केली आहे) त्याप्रकारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धोनीच्या निवृत्तीविषयी सर्वाधिक चर्चा करण्यात आली. इन्स्ट्ग्रामवर त्याचे आजही ३५ दशलक्ष फॉलोअर्स आहेत त्याच्या क्लबचे किंवा आयपीएलमधल्या संघाचे म्हणजेच सीएसकेच्या पेजचे दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत त्यापैकी बहुतेक जण एमएसडी सीएसकेचे नेतृत्व करतो म्हणून सीएसकेला फॉलो करतात हे पण सगळ्यांना माहित आहे.

एमएसडीविषयी अशा अनेक गोष्टी लिहील्या, बोलल्या चित्रित केल्या गेल्या आहेत. त्याच्यावर एक चित्रपट सुद्धा येऊन गेला ज्याने १०० कोटी रुपयांहुन अधिक गल्ला जमवला. मात्र या गोष्टींमुळेही एमएसडी विशेष होत नाही, मात्र एक खेळाडू म्हणून, एक कप्तान म्हणून, एक नेता म्हणून एक व्यक्ती म्हणून त्याची जी काही प्रतिमा आहे त्यामुळेच तो विशेष नाही तर अतिविशेष ठरतो. मी असे का म्हणत आहे याची काही उदाहरणे आहेत; जवळपास १५ वर्षांपूर्वी २००७ मध्ये जेव्हा टी२० विश्वचषक स्पर्धेमध्ये संघाचे नेतृत्व करण्यासाठी कुणी धजावत नव्हते (एक दिवसीय विश्वचषकातील भारतीय संघाच्या दयनीय कामगिरीनंतर), तेव्हा लांब केसांच्या एका तरुणाला (तेव्हा तो २७ वर्षांचा होता) ही जबाबदारी देण्यात आली. बऱ्याच जणांनी असा विचार केला की हा दौराही अपयशी ठरल्यास (बऱ्याच जणांना तशी आशा होती) ते त्याचे खापर त्याच्यावर फोडतील त्याला डच्चू देतील. कारण तेंडुलकर, गांगुली, द्रविड, सेहवाग, लक्ष्मण इत्यादी खेळाडू त्यांच्या कामगिरीच्या शिखरावर होते तरीही त्यांनी एमएसडीला कप्तान बनवले. त्यानंतर काय झाले हे आपण सगळे जाणतो, मात्र २००७ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे शेवटचे षटक (तेसुद्धा पाकिस्तान विरुद्ध) पूर्णपणे अनोळखी जोगिंदर शर्माला देणे, तसेच २०११ मध्ये एकदिवशीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फॉर्मात असलेल्या युवराज सिंहच्या आधी खेळायला जाणे यासारखे निर्णय घेताना शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून सामना जिंकून दाखवताना आपण काय करतोय हे त्याला माहिती होते त्याचा स्वतःवर नेहमीच विश्वास होता. एवढेच नाही तर भावनांचे प्रदर्शन करणे, माध्यमांसमोर किंवा कॅमेऱ्याच्या पुढेपुढे करता आपल्या संघाला विश्वचषक उचलण्याची संधी छायाचित्रे काढून घेण्याची संधी देऊन स्वतः मागे राहून एमएसडीने विशेष असणे म्हणजे काय याची जाणीव लोकांना करून दिली.

मात्र वय हा एक अजब शत्रू आहे, एकीकडे तो तुम्हाला अनुभव नावाची ताकद  देतो तर दुसरीकडे तो ही अनुभव रुपी ताकद वापरण्याच्या संधी तुमच्याकडून हिरावून घेतो अगदी एमएसडीही वयाच्या या नियमाला अपवाद नाही. असे असहूनही तो वयाच्या ४०व्या वर्षीही जबरदस्त लढा देतो म्हणूनच तो विशेष आहे. जवळपास १४ वर्षांपूर्वी टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापासून ते अगदी कालपर्यंत म्हणजे २०२१ मध्ये आयपीएलमध्ये जेव्हा जगातील सर्वात संतुलित संघाविरुद्ध नेतृत्व करण्याची वेळ आली तेव्हा त्याने अतिशय खंबीर नेतृत्व केले आपल्या सर्व क्लुप्त्या वापरल्या यालाच आपण अनुभव असे म्हणतो. धोनी यासाठी विशेष आहे की गेल्या वर्षी आयपीएलमध्ये सीएसके गुणतालिकेमध्ये तळाशी होती पात्रता फेरीत पोहोचू शकलेला पहिला संघ होता यावर्षी हाच संघ पात्रता फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला ते हे साध्य करू शकतील याची कप्तानाला खात्री होती. या हंगामातील सर्व साखळी सामन्यांमध्ये फलंदाज एमएसडी धावा करण्यासाठी धडपडत होता, मात्र कप्तान एमएसडीच्या नेतृत्वाखाली संघ जिंकत होता फलंदाज एमएसडीच्या भविष्याविषयी कुजबुज सुरू होती हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मात्र फलंदाज किंवा कप्तान या दोघांचे शरीर मन एकच असते एमएसडीही तोच आहे ज्या दिवशी त्याची सर्वाधिक आवश्यकता होती त्याने ते दाखवून दिले. पात्रता फेरीमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाविरूद्धचा सामना जेव्हा अगदी अटीतटीचा होता तेव्हा एमएसडी फॉर्मात असलेल्या जडेजासारख्या खेळाडूच्या आधी खेळायला आला कमाल म्हणजे त्याने त्याच्या वयस्कर म्हणून  हिणवल्या जाणाऱ्या खेळाडूंच्या संघाला सामना एकहाती जिंकून दिला अंतिम सामन्यात स्थान मिळवले. म्हणूनच एमएसडी विशेष आहे, कारण वयाच्या ४०व्या वर्षीही, त्याच्यामध्ये काय करण्याची क्षमता आहे याची त्याला जाणीव आहे त्याला आव्हानांशी चार हात करण्याची भीती वाटत नाही आणि अजूनही तो खंबीरपणे नेतृत्व करतो. तो ज्याप्रकारे आव्हानांचा सामना करतो त्याआधारे त्याला कमी लेखू नका, तो अतिजोखीम घेणारा जुगारी नाही, मात्रा काही वेळा तो बेफिकरीने खेळतो असे वाट असले तरीही ! अतिशय थंडपणे, कोणत्याही भावभावनांचे प्रदर्शन करणाऱ्या या सदस्यामागे  अतिशय कठोर, धूर्तपणे चालणारा मेंदू आहे ज्याला आपण नेमके काय करत आहोत हे कायम माहिती असते. मग आपला प्रिय सहकारी रैनाला महत्त्वाच्या सामन्यात विश्रांती देणे असेल किंवा कायम वगळण्यात आलेल्या उथ्थप्पाला योग्य संधी द्यायची असेल, निर्णय घेताना त्याचा मेंदू मन यांचा अचूक ताळमेळ असतो शरीर त्या सूचनांचे पालन करत असते. मी काही याला कालचक्र उलट्या दिशेने फिरवणे असे म्हणणार नाही किंबहुना कालचक्रावर आरूढ होऊन ते थांबवणे असे म्हणेन. कारण तुम्ही जेव्हा एखाद्या वस्तुच्या वेगानेच चालत किंवा धावत असाल तर ती वस्तू स्तब्ध असल्यासारखी वाटते; एमएसडीनेहीकाळाच्या बाबतीत हेच केले आहे.

धोनी आता बघताना टोळीचे मला दीवार चित्रपटातील (आता हे काय असे विचारू नका, हा बच्चन यांचा एक चित्रपट आहे) एक दृश्य आठवते आहे, ज्यामध्ये टोळीचा म्होरक्या इफ्तेकार तरुण बच्चनला पोलीसांच्या तसेच शत्रू टोळीच्या तावडीतून टोळीचे काही लुटीचे मौल्यवान सामान वाचवून आणायचे काम देतो, बच्चन ते करून दाखवतो. त्यानंतर जेव्हा इफ्तेकार त्याच्या सहकाऱ्यासोबत बच्चनला भेटायला जातो, बच्चन त्याच्या केबिनमध्ये खुर्चीमध्ये आरामात बसलेला असतो. हे दृश्य बाहेरून पाहून इफ्तेकार त्याच्या सहकाऱ्याला म्हणतो, इस लडके को देख रहे हो, ये एकदिन जरूर कुछ बनेगा, इसलिए नही की जो काम मैने इसे बताया वो उसने कर दिखाया, पर इसलिए की उसे मालून था की वो यह काम पुरा करेगा. सलीम-जावेद यांच्या या संवादांचा मराठीत अनुवाद थोडा अवघड आहे पण थोडक्यात तो असा होईल, या मुलाला पाहतोयस, हा एकदिवस नक्की काहीतरी बनेल, मी त्याला जे सांगितले ते त्याने करून दाखवले म्हणून नाही तर तो हे करू शकतो हे त्याला आधीच माहित होते. इफ्तेकार बच्चनचे कौतुक केवळ त्याने काम पूर्ण केले म्हणून करत नाही तर बच्चनला तो काम पूर्ण करू शकेल हा आत्मविश्वास असतो म्हणून करतो.

कालच्या दिल्ली विरुद्धच्या सामन्यानंतर जेव्हा माध्यमांनी सीएसकेचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांना माध्यमांनी, फॉर्मात नसलेल्या धोनीला जडेजाच्या आधी पाठवण्याच्या निर्णयाविषयी प्रश्न विचारला. त्यावर फ्लेमिंग यांनी माध्यमांना उत्तर दिले, म्ही (ते धोनी) त्याविषयी चर्चा केली जेव्हा एमएसडी तो आधी फलंदाजीसाठी जाईल असे म्हणाला तेव्हा मी त्याच्या डोळ्यात पाहिले, त्याचे डोळे मला सांगत होते की तो आम्हाला सामना जिंकून देईल”, एमएसडी का विशेष आहे याबद्दल मी आणखी काही लिहायची गरज आहे का?

तुमच्यापैकी बरेचजण म्हणतील की हे जरा अति उदात्तीकरण होते आहे शेवटी हा फक्त एक खेळ आहे, माझ्यासारख्या ५० ओलांडलेल्या माणसाने यावर माझा वेळ का वाया घालवावा इतरांनी जवळपास निवृत्तीला पोहचलेल्या एखाद्या खेळाडूंच्या खेळांविषयी वाचण्यावर का वेळ वाया घालवावा. याबाबत माझी काहीच हरकत नाही, तुम्हाला असे म्हणण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र मला तुम्हाला सांगावेसे वाटते की एमएसडीसारख्या माणसांना पाहणे, त्यांच्याविषयी वाचणे त्यांचे निरीक्षण करणे हे आयुष्याच्या व्यवस्थापनाच्या खुल्या वर्गामध्ये बसण्यासारखे आहे. लोक नामांकित बिझनेस स्कूलमधून व्यवस्थापनाची पदवी मिळवण्यासाठी लाखो रुपये बरीच वर्षे खर्च करतात, त्यांच्याविषयी पूर्णपणे आदर राखून सांगावेसे वाटते की एमएसडी स्वतःच एखाद्या बिझनेस स्कूलसारखा आहे. मी एमएसडीविषयी वर जे काही लिहीले आहे ते केवळ त्याने षटकारासाठी फटकावलेला चेंडू पाहून केलेला विरंगुळा नाही (हे अंशतः खरे आहे) मात्र तो ज्याप्रकारे स्वतःसह आपल्या संघाला नियंत्रणात ठेवतो ते पाहून मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, अर्थात त्यातील एक तृतीयांश गोष्टींचाही मी स्वतः अंगीकार करू शकलो नसलो, तरीही मी अजून प्रयत्न करतोय. असे लाखो चाहते एमएसडीला सामन्यामध्ये कप्तान म्हणून, फलंदाज म्हणून, यष्टीरक्षक म्हणून पाहतात, त्यांच्या संघाचा विजय साजरा करतात आनंदाने घरी जातात सामन्यानंतर टीव्ही बंद करून टाकतात. मात्र खरा एमएसडी माझ्यासारख्या लोकांच्या मनात हृदयात कायमचे घर करतो,आता क्रिकेट खेळू शकत नाही, मात्र आमच्या या आवडत्या खेळाडूकडून आम्हाला जीवनाच्या सामन्यासाठी मार्गदर्शन मिळत असते, जो सतत सुरूच असतो; म्हणूनच माझ्यासाठी एमएसडी अतिशय विशेष आहे!

 

संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स 

smd156812@gmail.com

 

 

 

 

 

 

 











No comments:

Post a Comment