Sunday, 31 October 2021

नॉर्मलवाली दिवाळी !

 


























खरं म्हणजे आपल्या लक्षात एखादी तारीख, महिना, किंवा वर्ष नाही तर आपल्याला आपण जगलेले ते क्षण, त्या घटना लक्षात राहतातसिझर पेव्हेसी.

 

सिझर पेव्हेसी हे इटालियन कादंबरीकार, कवी, लघुकथा लेखक, अनुवादक, साहित्य समीक्षक निबंधलेखक होते. त्यांचे वरील अवतरण वाचल्यानंतर कलाकार (कवी किंवा लेखक) सामान्य माणसापेक्षा वेगळे का असतात याची कल्पना येते कारण कलाकारांचा बांधिलकी दिवस, तारीख, वर्ष अशा आकडेवारीशी नसते, तर ते ज्या क्षणात जगतात त्याच्याशी असते. या दिवाळीत आपणही कलाकारांचा हाच दृष्टिकोन (किंवा विचार प्रक्रिया) अंगिकारला पाहिजे, कारण लॉकडाउनचे युग अजूनही संपलेले नाही अज्ञात शत्रूच्या धोक्याची टांगती तलवार अजूनही आपल्या डोक्यावर आहे. लॉकडाउनमध्ये किती महिने किंवा आठवडे वाया गेले किंवा या महिन्यांमध्ये आपला किती तोटा झाला यावर काथ्याकूट करत बसण्यात आता काहीच अर्थ नाही. आपण जिवंत आहोत आयुष्य हळूहळू सामान्य होत आहे यातच आनंद मानण्याची ही वेळ आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये, आपल्यापैकी बहुतेकांनी जवळच्या कुणालातरी गमावले किंवा व्यवसायात नुकसान सहन करावे लागले किंवा करिअरच्या आघाडीवर फटका बसला किंवा इतर कुठल्यातरी स्वरुपात फटका बसला. विशेषतः, विद्यार्थांसाठी हा अतिशय खडतर काळ होता, शाळा, महाविद्यालये बंद होती, मित्र-मैत्रिणींना भेटता येत नव्हते, त्यांची मनस्थिती कशी असेल याचा मी विचारही करू शकत नाही. मात्र हे नुकसान केवळ आपणच सहन करत नसून, पहिल्यांदाच हे युद्ध खऱ्या अर्थाने जगव्यापी आहे अनेक देशांमध्ये, प्रदेशांमध्ये अजूनही उलाढाल सुरूच आहे ही वस्तुस्थिती आहेआपल्या देशाला एकप्रकारे विजिगीषु वृत्तीचे वरदानच लाभलेले आहे, आणि  आपल्यामध्ये विपरित परिस्थितीतही चिकाटीने लढण्याचा गुण जन्मजातच आहे, कारण साथीच्या रोगाचे संकट असो अथवा नसो आपल्याला दैनंदिन जीवनातही खूप संघर्ष करावा लागतो. मी कुणाचीही बाजू घेत नाही, मात्र लसीकरण मोहिमेमुळे केंद्र तसेच राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे (मात्र काही राजकीय नेत्यांचा अपवाद वगळता) तसेच आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे, आपले जीवन झपाट्याने पूर्वपदावर येऊ शकले. यासाठी आपण देवाचे नाही तर किमान एकमेकांचे तरी आभार मानले पाहिजेत. आपल्या देशवासियांची चांगली गोष्ट म्हणजे आपण संकटाचे दिवस अतिशय चटकन विसरून जातो वाईट गोष्ट म्हणजे त्या संकटाच्या दिवसापासून आपण जो धडा घेतला तोही विसरून जातो. रोगाची साथ तसेच लॉकडाउनचा काळ पण आपल्या या सामाजिक नियमाला अपवाद नाही. एकीकडे, काही लोक अजूनही विषाणूमुळे किंवा त्याच्या विविध उत्परिवर्तनांमुळे काळजीत आहेत, त्यांना त्याची भीती वाटते तर दुसरीकडे बहुतेक लोकांनी युद्ध केवळ संपलेच नाही तर ते जिंकल्याप्रमाणे वागायला सुरुवात केली आहे. मी विषाणूंविषयी किंवा रोगाविषयी बोलायला कुणी तज्ञ किंवा अधिकारी व्यक्ती नाही, मात्र जोपर्यंत युद्धामध्ये शत्रूचा शेवटचा सैनिक मारल्याचे किंवा पकडला गेल्याचे दिसत नाही तोपर्यंत युद्ध संपल्याचे जाहीर केले जाऊ शकत नाही हा साधा तर्क आहे. युद्ध जिंकण्याची किंवा समाप्त होण्याची माझी हीच तर्कसंगत व्याख्या आहे, मात्र इथे तशी परिस्थिती नाही, बरोबर? म्हणूनच, नंतर पश्चात्ताप करण्याऐवजी आधीच काळजी घेतलेली बरी. म्हणूनच ही दिवाळी विशेष आहे कारण आपण ती सावधपणे साजरी कणार आहोत, मात्र याचा अर्थ असा होत नाही की त्यातली सगळी मजा घालवून टाकायची. आपण शहरात कार चालवताना सुद्धा सीट बेल्ट लावतो किंवा मजेसाठी बोटीतून फेरफटका मारताना अंगावर लाईफ जॅकेट चढवतो, तसेच हेदेखील आहे!!

या दिवळीतही तुम्हाला हवी तेवढी धमाल करा, मात्र त्यामध्ये फटाक्यांचा समावेश होत नाही कारण आधीच आपल्याकडे एवढे प्रदूषण असताना त्यात आणखी भर कशाला घालायची. म्हणजे मला म्हणायचे आहे की, निसर्गात किंवा मोकळ्या जागी फिरायला जा, भरपूर खरेदी करा, दिखावा करायला नाही तर इतर व्यावसायिकांची दिवाळीही आनंदाची जावी म्हणून. अतिरेकी खर्च करून नव्हे तर विचारपूर्वक खर्च करून बाजारातील उलाढाल वाढवा, म्हणजे प्रत्येकालाच एकमेकांच्या खर्चामुळे लाभ होईल. लॉकडाउनच्या काळात, समाजात झालेले सर्वात मोठे नुकसान म्हणजे, एखाद्या विषाणूमुळे आपण गमावलेले आप्तस्वकीय एवढेच नाही तर माणसाच्या विचारांमध्ये एका प्रकारचा नैराश्यवादी मरगळ आली आहे, जे सर्व प्रकारच्या व्यवसायातील थंडावलेल्या उलाढालीमधून दिसून येत आहे. म्हणूनच ही दिवाळी विशेष आहे कारण आपल्या सर्वांसाठी पुन्हा एकदा आयुष्य सामान्यपणे जगण्याची संधी घेऊन आली आहे. एक लक्षात ठेवा मी जेव्हा सामान्य म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ आपण दोन वर्षांपूर्वी जसे जगत होतो तसेच पुन्हा जगायला सुरुवात करायची असा नाही, तर सामान्य म्हणजे आवश्यक ती खबरदारी घेऊनही आपण मजा करू शकतो आनंद उपभोगू शकतो. इथून पुढे सामान्यपणे जगण्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, व्यवस्थित काळजी घ्या भीती दूर करा. आयुष्य सामान्यपणे जगण्यास पुन्हा सुरुवात करण्यासाठी केवळ प्रकाशाचाच नाही तर एकोपा आनंदाचा सण असलेल्या दिवाळीशिवाय दुसरे अधिक चांगले निमित्त कोणते असू शकते?

मला माहिती आहे अनेकांसाठी आयुष्य आता पूर्वीसारखे कधीच होऊ शकणार नाही कारण युद्धामुळे झालेल्या जखमा बऱ्या झाल्या तरी त्यांचे व्रण तसेच राहतात. मात्र ज्याप्रमाणे एखादा सच्चा सैनिक हे व्रण किंवा अपंगपणा युद्धाच्या पदकाप्रमाणे मिरवतो कारण त्या एक प्रकारे सिनिकांच्या धैर्याच्या लढाऊ वृत्तीच्या  खुणा असतात. त्याचप्रमाणे आपल्यालाही या युद्धात आपले कितीही नुकसान झाले असले तरीही प्रकाशाच्या या सणाचे उत्साहात स्वागत करता आले पाहिजे, त्यालाच मी नॉर्मलवाली दिवाळी ” असे म्हणेन. आणखी एक गोष्ट म्हणजे तुमचा उल्हास, धैर्य, अभिमान, काळजी आनंद इत्यादी गोष्टी तुमच्यापुरत्या किंवा तुमच्या आप्तजनांपुरत्या मर्यादित ठेवू नका किंबहुना तो सर्व दिशांना वाहू द्या, जो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचू द्या तरच ती खऱ्या अर्थाने  नॉर्मलवाली दिवाळी होईल. माझ्या शुभेच्छांच्या अखेरीस, मी मला उमगलेला दिवाळीचा अर्थ सांगतो; जेव्हा आपण दिवाळीचे स्वागत करण्यासाठी आपल्या दरवाजात एखादी पणती किंवा आकाशदिवा लावतो तेव्हा तिच्यामुळे केवळ त्या घरात राहणाऱ्या लोकांचे चेहरेच उजळून निघतात का? तर नाही , त्या पणतीमुळे किंवा आकाशदिव्यामुळे आपल्या घरावरून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा चेहरा उजळतो. तो दिवा व्यक्तीचा चेहरा उजळविताना त्या व्यक्तीचे वय, लिंग, धर्म किंवा जातीचा विचार करत नाही; मी हेच शिकलो प्रकाशाचे हेच तत्त्वज्ञान आपण स्वीकारले, तर ही दिवाळी नक्कीच नॉर्मलवाली, आनंदी पर्यावरणस्नेही होईल. तुमच्यासाठी, तुमचे कुटुंब मित्रपरिवारासाठी ही दिवाळी अशाच प्रकारची होवो ही मंगलकामना!

 

You can read in English version:

http://visonoflife.blogspot.com/2021/10/normalwali-diwali.html

 

 

संजय देशपांडे आणि टीम संजीवनी

smd156812@gmail.com

www.sanjeevanideve.com

 


No comments:

Post a Comment