Monday, 13 December 2021

वाघाला समजावून घेताना! (भाग १)

 


































 

 

माणूस हा असा एकमेव हिंस्र प्राणी आहे जो आपल्या जीवलगांचीच शिकार करतो.” … केनिथ एड

 

केन गॉर्डन ईडे हे एक अमेरिकन वकील, पर्यावरणवादी राजकीय कार्यकर्ते राजकीय न्यायव्यवस्थेशी संबंधित थरारक कांदबऱ्यांचे लेखक आहेत. बऱ्याच जणांना असे वाटेल की या अवतरणामध्ये एका कार्यकर्त्याचा दृष्टिकोन ठासून भरलेला आहे. मात्र जेव्हा विषय वन्यजीवन वाघ असतो, तेव्हा मानवाशी तुलना करताना वरील शब्द कितीही कटू वाटत असले तरीही ते सत्य आहेत. तुमचा माझ्यावर विश्वास बसत नसेल, तर वाघांचा किंवा कोणतीही हिंस्र श्वापदे (जी प्रजाती शिकार करते किंवा आपले अन्न मिळविण्यासाठी इतर प्राण्यांना मारते) विरुद्ध माणूस असा विचार करता तुम्ही कधी वाघांनी वाघांना किंवा बिबट्यांनी बिबट्यांना किंवा एखाद्या गरुडाने दुसऱ्या गरुडाला, केवळ मारायचे म्हणून किंवा काहीतरी मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या वाघाच्या किंवा बिबट्याच्या मालकीचे काहीतरी हिसकावण्यासाठी किंवा केवळ रागाच्या भरात मारल्याचे कधी ऐकले आहे का? दोन वाघांमध्ये (तेही बहुतेकवेळा नरांमध्ये) लढाई होते हे मान्य आहे मात्र ती अस्तित्वासाठीची लढाई असते म्हणजे त्यांचा प्रदेश सुरक्षित ठेवण्यासाठी ती असते बहुतेक वेळा भांडण टाळले जाते किंवा फक्त गुरगुरून लुटुपुटीचा हल्ला करून ते मिटवले जाते, अर्थात दोघेही अडून बसले असतील तर याला अपवाद असतो. माणूस मात्र दुसऱ्या माणसाला कोणत्याही कुठल्याही कारणाने मारतो तरीही जेव्हा वाघासारखा एखादा हिंस्त्र प्राणी माणसावर हल्ला करतो तेव्हा मोठा गदारोळ होतोअशा एका घटनेमध्ये एका वाघिणीने (माया नावाच्या) महिला वन रक्षकाला ठार केले, त्यानंतर वन्यजीवन मानवी जीवनाचे संरक्षण करण्याविषयीच्या सकारात्मक नकारात्मक पैलूंविषयी संपूर्ण वन्यजीवन जगताविषयी जोरदार चर्चा सुरू झाली. मी या घटनेविषयी एक लेख लिहीला होता त्यासंदर्भात मला फेसबुकसारख्या समाज माध्यमांवरील वन्यजीवप्रेमींच्या गटांमधून संमिश्र प्रतिसाद मिळाले. म्हणून त्यातील काही इथे द्याव्यात असा मी विचार केला, त्याचसोबत मी माझे मतही इथे व्यक्त करत आहे, कारण या संवादातून एक वेगळीच जागरुकता मोहीम सुरू झाली आहे, म्हणूनच ती येथे देत आहे … (मी या प्रतिक्रिया जशाच्या तशा त्यांची नावे भाषेसकट येथे देत आहे त्या फेसबुकच्या समूहांमधून कट-पेस्ट केल्या आहेत, म्हणून कृपया चूक-भूल माफ करा)

सुनंदो रॉय:

सुंदर लेख आहे. मला त्याशिवाय असे सांगावेसे वाटते की, त्यांचे टी# पदनाम, वापरण्याऐवजी त्यांचे नाव वापरल्याने हे वन्य प्राणी आपल्या विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या पाळीव प्राण्यांसारखे वाटू लागतात. मात्र दुर्दैवाने ते खरोखर हिंस्र, अतिशय शक्तिशाली निःसंशयपणे भीतीदायक असतात याकडे दुर्लक्ष केले जाते. या वाघिणीने याआधीही माणसांवर हल्ले केले हे स्पष्ट आहे या लेखातील वर्णनाच्या आधारे, तिने जाणीवपूर्वक या गटाचा पाठलाग केला गटात सर्वात मागे असलेल्या व्यक्तीला पकडले, जी एक महिला वनरक्षक होती. तिने आत्तापर्यंत ज्यांच्यावर हल्ले केले त्या सर्व महिला होत्या याचा विचार करता, तिने विशेषतः त्या महिला वन रक्षकावरच हल्ला केला किंवा त्या गटात जो कुणी मागे राहणार होता तोच बळी पडणार होता याचे कुतुहल वाटते. म्हणून, या प्राण्यांना पाळीव प्राण्यांसारखी अनौपचारिक स्वरुपाची नावे देणे थांबवावे केवळ टी# पदनामांचाच वापर करावा. हे सर्व वाघ, त्यांची नावे कितीही गोंडस असली तरीही, निसर्गतःच अतिशय हिंस्र असतात. ही वस्तुस्थिती वनरक्षक, गाईक किंवा पर्यावरणस्नेही-पर्यटकांना विसरून चालणार नाही.

 

 

 

 

कौशिक बॅनर्जी:

मला खरोखरच आश्चर्य वाटले नाही ... हे लोक वाघ असलेल्या जंगलात पायी चालत का गेले? मायाने केलेला हल्ला स्वाभाविक होता ... तिने हल्ला केला नसता तरच तिचे वागणे विचित्र वाटले असतेमी ताडोबा आणि रणथंबोरमध्येही वनरक्षकांना चालत जाताना पाहिले आहे ... हे थांबवले पाहिजे!!!!!

 

लावण्या शिवकुमार:

"मायाचे अचानक आक्रमकपणे वागणे..."

एका वाघिणीने पाळीव मांजराप्रमाणे वागावे तुमच्या कॅमेऱ्यापुढे रोज पोझ देऊन उभे राहावे अशी त्यांची अपेक्षा आहे का? निव्वळ वेडेपणा आहे!! अगदी पाळीव मांजरीही, चिडलेल्या असतील तर तुमचे तोंड बोचकारतात. वाघही राजेशाही परंतु हिंस्र प्राणी आहेत. तुम्हाला जिवंत राहायचे असेल, तर त्यांच्यापासून अंतर राखून राहा. मनुष्य प्राण्यांमधील संघर्षाच्या वारंवार येणाऱ्या बातम्या वाचणे अतिशय त्रासदायक आहे, बिचाऱ्या प्राण्याला नरभक्षक ठरवले जाते शेवटी त्याला मारले जाते

 

के हॅसल तिवारी:

संजय देशपांडे आपण पाठवलेल्या प्रत्युत्तरासाठी आपले आभार. मी माझ्या आवडीमुळे नोंदींसाठी १९९३ पासून बऱ्याच छायाचित्रांची नावे लिहून ठेवत आलोय. डिजिटल फोटोग्राफी सुरू झाल्यापासून पर्यटनामध्ये प्रचंड वाढ झाल्यापासून अनेक गाईड, चालक, निसर्गप्रेमी छायाचित्रकारांना पर्यटन क्षेत्रातील वाघांबद्दल वन विभागापेक्षा जास्त माहिती असते ते त्याविषयी आपल्याकडे वैयक्तिक नोंदी ठेवतात. वनविभागाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना प्रगणनेच्या ओळख पटविण्याच्या कामामध्ये मदत व्हावी यासाठी पर्यटनाचा वापर करायला काय हरकत आहे जसे ते काही वर्षांपूर्वी करत असत. दुसरीकडे वाहनांची ये-जा वाघाच्या मागावर जाताना भरधाव वेगाने वाहने चालवणे अशा प्रकारांना काहीतरी करून आळा घातला पाहिजे, मात्र ते कसे होईल हे देवालाच माहिती.

 

गुड्डी दी लेशराम:

हा जंगलाचा कायदा आहे, ही वन्यजीवनाची तत्वे आहेत....मृत व्यक्ती तिच्या कुटुंबाविषयी अतिशय वाईट वाटते. प्राण्यांची हद्द ठरलेली असते, अगदी पाळीव प्राण्यांचीही.

 

राम जोसियुला:

अतिशय सुंदर लेख मृत व्यक्तीला मनःपूर्वक आदरांजली ….. मात्र त्याचवेळी आपण शांत वन्यप्राण्यांचा त्यांचाच घरात आदर केला पाहिजे …. कारण आपण आपल्या घरामध्ये कुणाही घुसखोराला सहन करणार नाही, तसेच तेही करणार नाहीत …. म्हणूनच या सुंदर प्राण्याला नरभक्षक वगैरे नावे देऊ नका लक्ष्य करू नकाअशी नम्र विनंती आहे …..

 

धीरज मीरजकर:

खरोखरच, ही घटना अतिशय दुर्दैवी आहे.

एका रेषेत चालत जाऊन सर्वेक्षण करण्यासाठी एखाद्या हिंस्र श्वापदाने हल्ला केल्यास त्याला प्रतिकार करण्यासाठी सोबत शस्त्रधारी रक्षक पुढे असावा.

वरील बाबींशिवाय, आपण या गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे की वाघ किंवा हत्तींच्या प्रदेशात जाणे हे धोकादायकच असते प्राण्यांनी हल्ला केल्यास सफारीसाठी वापरली जाणारी वाहनेही पूर्णपणे सुरक्षित नसतात.

नेहमी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.

तसेच वाघांचे नाव ठेवण्याच्या बाबतीत, ते अनावश्यक आहे या दाव्याला वैज्ञानिक आधार काय आहे? काहीच नाही.

 

 

 

अभी वेलिंगकर:

मला मायाचे अचानक आक्रमकपणे वागणे हे अधिकाऱ्यांनी केलेले विधानच समजले नाही. जणू काही ती अचानकपणे आक्रमक झाली असावी.

ती एक अत्यंत्य हिंस्र प्राणी आहे, ती वन्य मांसाहारी प्राणी आहे. ती मारणारच. ती काही पाळीव कुत्रा किंवा मांजर नाही. ते सुद्धा चावू शकतात.

 

वाघिणीने तिचे शरीर खेचत जंगलात नेले.

ही ओळ अतिशय विचलित करणारी आहे

 

प्रमीक कन्नन:

अडचण अशी आहे की सध्यातरी एका रेषेत चालत जाऊन केले जाणारे सर्वेक्षण हाच झाडेझुडुपे वनस्पतींच्या दर्जाविषयी अचूक माहिती मिळवण्याचा खुर असलेल्या प्राण्यांची नेमकी संख्या मिळवण्याचा सर्वात अचूक मार्ग आहे. अवैध शिकारीला आळा घालण्यासाठीही हाच सर्वात परिणामकारक मार्ग आहे. कॅमेरा लावून ठेवल्यास, त्यांचा उपयोग होईल यात शंका नाही मात्र त्यांचे दृष्टिक्षेत्र मर्यादित असतेकेवळ १० मीटर किंवा त्याच्या जवळपास, कॅमेरा लावलेल्या जागेचे किंवा केवळ एकाच दिशेतील दृश्य दिसते कारण ते एकाच ठिकाणी बसवलेले असतात. म्हणूनच कॅमेरा लावून केलेली प्रगणना केवळ विविध प्रकारचे वन्यजीवन मोजण्यासाठी उपयोगी ठरतेउदाहरणार्थ जमीनीवरील मोठे मांसाहारी प्राणी ज्यांची निवासस्थाने १० चौरस किलोमीटरच्या टप्प्यात असतात. तुम्हाला त्यासाठी फार कॅमेरे बसविण्याची गरज नाही, मांसाहारी प्राण्यांची अचूक संख्या मिळण्यासाठी प्रत्येक - चौरस किमीवर कॅमेरा बसवला तरीही पुरेसे आहेम्हणजे ताडोबासारख्या मोठ्या अभयारण्यामध्ये साधारण ६०० ते ७०० जागी कॅमेरे लावावे लागतील. दुर्दैवाने हरिण, डुक्कर, काळवीट यासारख्या खुर असलेल्या प्राण्यांच्या निवासस्थानांचा टप्पा लहान असतो, म्हणजे जेमतेम किलोमीटर किंवा अगदी काही किलोमीटरपर्यंतच असतो. म्हणूनच कॅमेरे लावून त्यांच्या संख्येचा घनतेचा अचूक अंदाज लावायचा असेल तर तुम्हाला प्रत्येक अभयारण्यामध्ये हजारो कॅमेरे लावावे लागतील त्यांची देखभाल करणे हे देखील जवळपास अशक्य काम आहे. मी वन्यजीव जैववैज्ञानिक म्हणून सांगत आहे कारण मी अनेक वर्षे विविध प्रकारच्या भौगोलिक प्रदेशांमध्ये कॅमेरे लावण्याचे काम केले आहे एका रेषेत केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणांमध्ये सहभागी झालो आहे. द्रोन हे नक्कीच अतिशय चांगले तंत्रज्ञान आहे, मात्र दुर्दैवाने त्याचा अतिशय जास्त आवाज होतो घनदाट जंगलांमध्ये मोठे द्रोन चालवणेही अतिशय त्रासदायक असते. म्हणूनच आजही मानवी सर्वेक्षण हाच सर्वोत्तम पर्याय आहे, अर्थात संभाव्यपणे धोकादायक वन्यप्राण्यांपासून मानवी जीवनाला अतिशय जास्त धोका असतो हे अशा अनेक प्रकरणांमधून सिद्ध झाले आहे. जर एखादा लहान द्रोन ज्याचा आकार एखाद्या मोठ्या कीटकाएवढा किंवा पक्ष्याएवढा असेल जो एकाच रेषेत उडू शकेल, गस्त घालणाऱ्या किंवा एका रेषेतील सर्वेक्षण करणाऱ्या रक्षकासारखेच काम करू शकेल, ज्यावर अर्थातच कॅमेरा बसवलेला असेल, ज्याचा कमीत कमी आवाज होईल म्हणजे ज्यामुळे वन्यजीवनाला अडथळा येणार नाहीअसेल तर तो पायी चालत जाणाऱ्या माणसाला उत्तम पर्याय होऊ शकेल त्यामुळे मानवी जीवनाला असलेला धोकाही टाळता येईल.

 

 

के हॅसल तिवारी:

या लेखामध्ये अतिशय नेमके लेखन करण्यात आले आहे, मात्र याचे अजूनही बरेच पैलू आहेत. मी काही लेखक नाही त्यामुळे ते करण्यासाठी काही योग्य व्यक्ती नाही परंतु प्रयत्न करतोय. प्राण्यांचे नाव ठेवणे ही काही फार मोठी समस्या नाही. प्राण्यांच्या वर्तनाविषयी प्रशिक्षण देणे ते समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. येणाऱ्या सर्व पर्यटकांना वाघ किंवा इतर कोणत्याही प्राण्याला त्यांची शांतता भंग केलेली आवडत नाही हे समजून सांगण्याचे प्रशिक्षण गाईड चालकांना दिले पाहिजे. सहज फिरण्यासाठी म्हणून येणाऱ्या पर्यटकांना वाघाने रस्ता ओलांडताना आपण गोंगाट केला तर त्याची काही हरकत नसेल असे वाटते. मात्र हे साफ चूक आहे, वाघ ते सहन करतो कारण त्या जे करायचे असते तेच तो करत राहतो. अनेक वर्षांपूर्वी मी जेव्हा बांधवगढला आलो होतो तेव्हा आमचेच एक वाहन अभयारण्यात दिसत असे. मला क्वचित एखादा हत्ती काम करत असताना दिसे, जंगलातील गाईड सगळीकडे चालत गस्त घालणारे कर्मचारी कुठेच दिसत नसत. यामध्ये जवळपास शतपटीने वाढ झाली आहे. तसेच पर्यटनही वेड्यासारखे वाढले आहे. याचा वन्यजीवनावर ताण पडतो आहे. तुम्ही तुमचे वाहन थांबवले तर एखादे हरिण काय करेल बहुतेकवेळा ते पळून जाईल किंवा तसे झाले नाही तर एक वाहन मागून येईल तुम्हाला पुढे जात प्राण्याचा पाठलाग करेल. अशावेळी प्राणी तेथून निघून जातात. वाघ सामान्यपणे माणसाला टाळण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याचा वावर सहन करतो कारण त्यांना करावाच लागतो. ते मूर्ख नसतात जंगलाच्या मध्यवर्ती भागामध्ये माणसाचा वावर हस्तक्षेप फारसा नसतो हे त्यांना माहिती असते. मात्र वन विभाग संरक्षणाचे वाघांच्या सातत्याने सुरू असलेल्या प्रगणनेचे काम करत असताना दुर्दैवाने प्राण्यांच्या जीवनाशी निगडित प्रत्येक पैलूमध्ये अडथळा येतो, त्यामुळे सगळ्यांसाठीच ही समस्या गुंतागुंतीची होऊन जाते. वाघ एकूणच एकांतप्रिय प्राणी असतो, मात्र त्यांची इच्छा नसताना आपण त्यांच्यावर दबाव टाकला नाही तर तेदेखील आपला आदर करू शकतात. तुम्ही वाघाला एखाद्या पाळीव प्राण्यासारखेही प्रशिक्षित करू शकता. मात्र तुमच्या वागण्या बोलण्यात सातत्य हवे. त्यांना गोंगाट अजिबात आवडत नाही तरीही आपण सतत बोलत असतो आजूबाजूंच्या खेड्यांमध्ये ध्वनिक्षेपकांनाही परवानगी असते. त्यांना अचानक केलेली हालचाल आवडत नाही, तरीही ते दिसल्यावर वाहनांची इंजिने सुरू होतात त्यांचा पाठलाग करू लागतात. वन्यजीवनाला याची गरज नाही किंवा हे अजिबात नको आहे. माणूस प्राण्यांचा आदर करू शकत नसेल तर त्यांना पाहायला जंगलात जाऊ नका. माहिती ठेवण्यासाठी प्राण्यांना नावे दिली जातात. जे लोक या प्राण्यांना समजू शकतात त्यांचा आदर करतात त्यांच्याद्वारे हे केले जाते. त्यांच्या आकडेवारीमध्येही हे नावांचे लेबल असते. सर्वात मोठा प्रश्न आहे की चालत जाऊन प्रगणना करणे अगदीच आवश्यक आहे का? त्यात विशेषतः पाणवठ्यांवर खूप हुलकावणी मिळू शकते. ही प्रगणना पूर्वी वाहनांमध्येच बसून थोडेसे रस्त्यावरून उतरून चालत जाऊन केली जात असे. आणि माझ्या माहितीप्रमाणे पाउलखुणांचा अभ्यास करून वेगवेगळ्याप्रकारचे वाघ जाणून घेणे शक्य आहे. तुम्ही वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना वाघांबद्दल किंवा इतर कोणत्याही प्राण्यांबद्दल जिव्हाळा वाटावा अशी अपेक्षा आपण करू शकत नाही, कारण बऱ्याच जणांसाठी ती केवळ एक नोकरी असते, उपजीविकेचे साधन असते. खऱ्या अर्थाने वन्यजीवप्रेमी व्यक्ती दुर्मिळ आहेत त्यातही सच्च्या व्याघ्रप्रेमी व्यक्ती अतिशय दुर्मिळ असतात. त्यामुळे अशी धोकादायक कामे ज्या लोकांनी त्या प्राण्याचे वर्तन आधी अभ्यासलेले नाही त्यांच्यावर लादणे चुकीचे आहे. ही कामे पूर्ण समर्पित व्यक्तींसाठी आहेत, सामान्य माणसासाठी नाहीत. मला अजूनही असे वाटते की जर संपूर्ण अभयारण्य खुले ठेवून पर्यटन मर्यादित ठेवले असते कॅमेरे, पूर्णपणे समर्पित व्यक्ती किंवा काही माणसे या कामी नेमली असती तर साधारण चार वर्षात कोणतीही दुर्घटना घडता मर्यादित प्रशिक्षणामध्ये या क्षेत्रातील सर्व वाघांची गणना पूर्ण झाली असती. आफ्रिकेमध्ये या विषयातील तज्ञ अशा कामांसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचतात. मला माहिती आहे की भारतामध्ये हे काम प्रामाणिकपणे करणारे लोक आहेत. मग सरकार त्यांना परवानगी का देत नाही. घनदाट जंगलामध्ये चालत जाऊ नये केवळ पदपथ रस्त्यांवर इन्फ्रारेड कॅमेरे लावावेत. माणसांनी वाहनांनीच जावे. पर्यटनाची मदत घ्या. इथे माझ्या प्रतिक्रियेला कुणी दाद देईल का अशी शंका वाटते पण मी माझे विचार मांडत आहे.

 

सुनंदो रॉय:

के हॅसेल तिवारी, मी मान्य करतो की, असे पाहता, तुम्ही अगदी बरोबर म्हणालात की नाव ठेवणे ही इथे खरी समस्या नाहीत. मला असे वाटते माया असे तिचे नाव होते, यामुळे तो प्राणीव प्राणी असल्याचा आभास निर्माण होतो, ज्यामुळे लोक त्याला अधिक सहजपणे घेतात, तो अतिशय हिंस्र प्राणी आहे हे विसरतात

 

देवयानी वसा:

हा फोटोतील माणूस असा जंगलात पायी का असावा?

 

 

जय मोहन:

आता या वाघिणीचे उदात्तीकरण थांबवा. तिने तिसऱ्या व्यक्तीला मारल्याचे सिद्ध झाले आहे. हे वागणे सामान्य नाही.

 

जय मोहन पर्यटक इतर माणसे या प्राण्याला सतत न्याहाळत असतात. ती जे काही करते म्हणजे अगदी मीलनाचा काळ किंवा ती तिच्या बछड्यांची काळजी घेत असताना, सगळे काही अगदी जवळून पाहिले जाते. वन्य प्राण्यासाठी हे काही सामान्य वातावरण नाही म्हणून कदाचित ती वारंवार चिडत असेल

जय मोहन:

स्ट्रे असिस्ट या घटनेची तथ्ये पूर्णपणे वेगळी आहेत. मी या वाघिणीला केल्या अनेक वर्षांपासून ओळखतो आहे. माझ्या पुस्तकातही तिच्यावर स्वतंत्र प्रकरण आहे. तिचे वागणे नरभक्षकाचे आहे. यापूर्वीही तिने एका माणसाला ठार केले होते मात्र ती घटना तुरळक घटना मानण्यात आली होती.

 

मी भारतीय:

काहीही संरक्षण घेता, चालत गस्त घालणे, ते देखील पहाटे वाजता...तुम्ही याला कर्तव्य म्हणाल का???

ज्येष्ठ अधिकाऱ्यांना आदेश देणे किती सोपे असते ते क्षेत्र कर्मचाऱ्यांना धोकादायक विभागात जाऊ देतात.

 

मी भारतीय:

कोणतेही प्रशिक्षण पुरेसे अचूक नसते, मरण पावलेल्या स्वाती ढुमणे अप्रशिक्षित नव्हत्या. जवळपास वर्षे वन कर्मचाऱ्यांना शूज गणवेश देण्यात आलेला नाही. ते कसे काम करतात याची तुम्हाला कल्पना आहे का? वन रक्षकांना त्यांचे वरिष्ठ अधिकारी एकएकटे गस्त घालायला सांगतात हे मी पाहिले आहे. महिला रक्षकांनाही वन मजूर किंवा कुणी मजूर सोबत दिला जात नाही...वन क्षेत्र कर्मचारी अतिशय कठीण परिस्थितीत काम करतात.

 

 

या थोड्याच प्रतिक्रिया आहेत, याशिवायही बऱ्याच प्रतिक्रिया आल्या होत्या. मला आनंद वाटतो की त्यातून या सगळ्यांना वन्य जीवनाविषयी वाटणारी काळजी दिसून येते. त्यातील काही प्रतिक्रिया एखाद्याला बालिश वाटू शकतात त्यातून त्यांना विषयाची जाणीव नसल्याचे दिसून येते मात्र मी प्रतिक्रिया देणाऱ्या व्यक्तीला दोष देणार नाही तर परिस्थितीला दोष देईन. सर्व प्रतिक्रिया वाचल्यानंतर मी त्यावरील माझे मत व्यक्त केले आहे, बहुतेक मुद्द्यांचा सारांश खाली घेतला आहे

-

माया वाघीण!

मित्रांनो, मी माया वाघीण ताडोबामध्ये महिला वन कर्मचाऱ्याच्या मृत्यूच्या घटनेविषयी लिहीलेल्या लेखाला तुम्ही सक्रियपणे प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे आभार. मायाच्या भवितव्याविषयी जी काळजी व्यक्त करण्यात आली त्यासंदर्भात, तसेच वन रक्षकांना मिळणाऱ्या पायाभूत सुविधा, चालत गस्त घालण्याची गरज तसेच पर्यटनाविषयी माझे उत्तर खाली दिले आहे, जे सुदैवाने या दुर्दैवी घटनेचे कारण नव्हते असणारही नाही!!

मित्रांनो, तुम्ही दिलेल्या मूल्यवान प्रतिक्रियांसाठी तुमचे शतशः आभार, मी या गटाच्या पर्यवेक्षकांना आवाहन करतो की त्यांनी सर्व सूचना संकलित करून त्या अधिकाऱ्यांना पाठवाव्यात, कदाचित त्यामुळे काहीतरी बदल घडेल!

प्रिय सुनंदो, के तिवारी, कन्नन इतर, माझ्या मते वाघांना नाव देण्याविषयी वाद असू शकतात कारण तुम्ही त्यांना कोणत्या नावाने हाक मारत आहात हे वाघांना माहिती नसते, त्यामुळे त्याला एखाद्या नावाने हाक मारल्यामुळे त्याला पाळीव प्राण्याचा दर्जा मिळवण्याची वाघाच्या बाबतीत हलगर्जीपणा केला जाण्याची अजिबात शक्यता नाही, असो, तुम्ही त्याला क्रमांकाने हाक मारा किंवा नावाने तो प्रत्येक व्यक्तीचा त्याच्या किंवा तिच्या स्वतःच्या सुरक्षिततेबाबतचा दृष्टिकोन असतो, तुम्ही वाघाला काय म्हणता याविषयीचा नाही. वन रक्षकांना दिल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांविषयी बोलायचे झाले तर ते पुरेसे नाही ही वस्तुस्थिती आहे त्यापैकी बरेच जण ही नोकरी स्वीकारतात कारण त्यांना सरकारी नोकरीची सुरक्षितता स्थैर्य हवे असते या नोकरीमध्ये जिवाला असलेला धोका ते विसरतात. दुर्दैवाने इथे सरकारी नोकरीत रुजू होण्याचे निकष वेगळे असतात ते समर्पण किंवा माहिती यासारखे नसतात. त्याचवेळी जंगलामध्ये चालत गस्त घालणे अत्यावश्यक आहे, त्यासाठी केवळ एकच गोष्ट अत्यावश्यक आहे ती म्हणजे सुरक्षा उपाययोजना, खबरदारी प्रशिक्षण, जे पुरेसे दिले जात नाही. अशा दुर्घटना टाळल्या जाऊ शकतात, हेच मला सांगायचे होते!  ...

जंगलामध्ये वनरक्षकांना चालतच गस्त घालावी लागते, म्हणूनच घडलेल्या घटनेबद्दल मायाला दोष देता येणार नाही मात्र वन रक्षक तसेच अधिकारी चालत गस्त घालून वन्य जीवनाचे संरक्षण करत असताना त्यांच्या सुरक्षिततेसाठी काही गंभीर पावले उचलली पाहिजेत, म्हणूनच हा लेख लिहीत आहे! मायावर कुणीही नरभक्षक म्हणून शिक्का मारत नाहीये! मात्र वनरक्षक तसेच अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्षक करता येणार नाही, एवढाच माझा मुद्दा होता. किंबहुना हाच मुद्दा आहे, कोणत्याही वन्य प्राण्याला सामोरे जाताना आधी तो काय आहे हे तुम्ही समजून घेतले पाहिजे तो जे काही आहे त्यासाठी त्याचा आदर केला पाहिजे, हाच कच्चा दुवा आहे, वन विभागाने ते समजून घेतले पाहिजे!

कृपया माझ्या ओळी वाचा... "या घटनेचा पहिला मुद्दा म्हणजे, जंगलातील लोकांचे वन्य प्राण्यांशी अतिमैत्रीपूर्ण वागणे. मला पूर्णपणे आदर ठेवून असे सांगावेसे वाटते की केवळ ताडोबाच नाही तर इतरही काही व्याघ्र प्रकल्पांमध्ये, कनिष्ठ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना (विशेषतः वनरक्षक) वाघांच्या वर्तनाबाबत अतिआत्मविश्वास असतो ते त्यांना गृहित धरतात. केवळ चालत त्यांच्या अतिशय जवळ जातात किंवा वन्य प्राणी अवतीभोवती असतानाही गांभीर्याने घेत नाहीत. नेमकी इथेच यंत्रणा (म्हणजे वनविभाग) त्यांच्या कर्मचाऱ्यांना जंगलामध्ये पालन करण्याची आचारसंहिता शिष्टाचार याविषयी प्रशिक्षित करण्यात कमी पडते. अनेकजणांना हे विधान अतिशय उद्धट किंवा फटकळ वाटेल, मात्र तुम्ही जंगलामध्ये कितीही काळ घालवला असेल तरीही कधीही सहजपणे वावरून चालत नाही. खुद्द जिम कॉर्बेट यांनीही हे वारंवार नमूद केले आहे, ज्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य वाघांनी भरलेल्या जंगलांमध्येच घालवले आहे!

आपण मायाला नरभक्षक म्हणू शकतो का याची मला शंका वाटते कारण ती इतर कोणत्याही वाघापेक्षा नियमितपणे ताडोबा तलावाच्या जवळ असलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या वसाहतीभोवती फिरताना आढळून आली आहे. तिने वनरक्षकावर हल्ला केला ठार मारले ही देखील वस्तुस्थिती आहे मात्र मायाच्या आयुष्याच्या वर्षात अशा फक्त घटना झाल्या आहेत आणि त्या प्रत्येक वेळी ती माणसांपर्यंत गेली नाही तर माणसे जेव्हा निष्काळजीपणे तिच्यापर्यंत गेली तेव्हाच असे झाले, ही वस्तुस्थिती आहे.

अर्थात हा माझा तर्क आहे मी या विषयातील कुणी तज्ञ नाही. आता मायाचे काय होईल, तर मायाचे सध्या काहीच होणार नाही मात्र वन विभाग तिचे निरीक्षण करेल तिच्यापासून सुरक्षित अंतर राखलेलेच बरे, असे पाहिले तर सर्व वाघांपासूनच सुरक्षित अंतर राखण्याची सवय असली पाहिजे.

लोकहो, जंगलातील सर्व भागांमध्ये जिप्सीने गस्त घालता येत नाही ही समस्या आहे. आपण वन रक्षकांना व्यवस्थित प्रशिक्षण देऊ शकतो तसेच त्यांच्यासाठी पुरेशा सुरक्षा उपाययोजनाही अत्यावश्यक आहेत.

संजय देशपांडे (तुम्ही मला व्यक्तीशः smd156812@gmail.com या पत्त्यावर पत्रही लिहू शकता)

खाली दिलेल्या दुव्यावर अधिक वाचा...

https://visonoflife.blogspot.com/2021/11/tigers-foresters-forest.html

……..

तुमच्यामध्ये अजूनही थोडे वाचण्याची ताकद शिल्लक असेल तर तुमच्या संयमाची थोडी परीक्षा घेतो; मित्रांनो, वरील प्रतिक्रिया वाचल्यानंतर (त्यातील काही वन कर्मचाऱ्यांच्याही आहेत, असा माझा अंदाज आहे) एक गोष्ट हमखास जाणवते, ती म्हणजे एकूणच वन्य जीवनाविषयी आपला दृष्टिकोन किंवा मानसिकता निकृष्ट संकुचित आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थित पायाभूत सुविधा देणे तसेच केवळ एखादी दुर्घटना (किंवा चूक) झाल्यानंतरच पावले उचलणे असे करताना आपण कधीही वन्य जीवन संवर्धनासंदर्भात आपण कधीही तर्कशुद्ध दृष्टिकोन ठेवत नाही; मग ते वन्य जीवन पर्यटन असो किंवा वन्य जीवन संरक्षण! जंगलात जेव्हापण एखादी दुर्घटना घडते तेव्हा वन्य जीवन पर्यटनावर सर्व खापर फोडले जाते, सुदैवाने (मृत महिला वनरक्षकाविषयी पूर्णपणे आदर राखत हे सांगावेसे वाटते) माया वाघिणीच्या हल्ल्यात कुणी पर्यटक मारला गेला नाही, नाहीतर संपूर्ण वन्य जीवन पर्यटनावर कायमस्वरुपी बंदी घालण्यात आली असती, हे नक्कीलोकहो, आपण वन्य जीवन पर्यटनाविषयी बोलत आहोत, ते काही प्राणीसंग्रहालय नाही जिथे पर्यटक भेट देत असतात (अगदी प्राणी संग्रहालयामध्येही अपघात झाले आहेत), आपण पर्यटकांकडून एक अर्ज व्यवस्थित भरून घेतला पाहिजे की तुम्ही जंगलातील वन्य जीवनाला भेट देता तेव्हा काही धोके निश्चितच असतात, वाघ किंवा हत्तीसारख्या प्राण्यांच्या हल्ल्यात जीवितहानी होऊ शकते. या घटनेनंतर अचानक ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये जिप्सीची रचना बदलण्याचा विचार समोर आला ज्यामध्ये पर्यटक जंगलामध्ये फिरू शकतात, यामध्ये पर्यटकांना पिंजऱ्याप्रमाणे बंद गाडीतून फिरवायची कल्पना समोर आलीपिंजराबंद जिप्सीमुळे वाघाला रोखता येईल, मात्र हत्ती किंवा गेंड्याने हल्ला केला तर काय, आपण जिथे हत्तींचा वावर असतो तिथे पर्यटकांसाठी सशस्त्र रणगाडे वापरणार आहोत कावन विभागाच्या हेतूविषयी पूर्णपणे आदर राखत असे सांगावेसे वाटते की, गेल्या तीन दशकात वाघाने किंवा बिबट्याने कोणत्याही वाहनावर किंवा जिप्सीवर हल्ला केलेला नाही हीदेखील वस्तुस्थिती आहेकिंबहुना आपल्याला खरोखरच वाघाच्या (वन्य जीवनाच्या) माणसांच्या जीवनाविषयी काळजी असेल तर माणसांना पुरेसे प्रशिक्षण द्या तसेच चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करणे वन्य प्राण्यांसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देणे, यावरच आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. देशातील सर्व जंगले पर्यटकांसाठी खुली करा कारण पर्यटक वन्यजीवनाचे डोळे कान आहेत. त्यांना अडथळा किंवा त्रास मानता त्यांची मदत घ्या त्यानुसार यंत्रणा तयार करा. आपण एकमेकांना दोष देण्याऐवजी हेच केले पाहिजे कारण इतर प्रजाती आपल्यात नेमका हाच फरक आहे, खरेतर त्या सर्व प्रजातीच आपण  माणसांपेक्षा अधिक सुसंस्कृत आहेत!

 


You can read in English version:

http://visonoflife.blogspot.com/2021/12/tigers-tourists-forest-dept-wildlife.html 

 

 

 

संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

smd156812@gmail.com

 




No comments:

Post a Comment