Thursday 9 December 2021

वाघ, वने आणि वनविभाग !

 




























माझ्या पल्लवित झालेल्या आशा दर सरत्या मिनिटागणिक मावळू लागल्या होत्या, माझ्या मनावरचा ताण खांद्यावरील रायफलचे ओझे असह्य होऊ लागले होते, तेवढ्यात मला गर्द झाडीच्या वरच्या बाजूला एक काडी मोडल्याचा आवाज ऐकू आला. वाघाची जंगलातील हालचाल कशी असते याचे हे एक उदाहरण झाले. तिने जो आवाज केला होता त्याद्वारे मला तिचे नेमके ठिकाण कळले होते, मी माझे डोळे त्या जागेवर रोखले होते तरीही ती आली, तिने मला पाहिले, ती काही काळ मला पाहात राहिली त्यानंतर ती निघून गेली पण मला एकही पान किंवा अगदी गवताचे पातेही लवताना दिसले नाही.” … जिम कॉर्बेट

वाघ, जर जखमी सेल किंवा नरभक्षक असेल तर त्याचा अपवाद वगळता, एकूणच अतिशय शांत प्राणी असतो...क्वचित एखादा वाघ बछड्यांच्या किंवा तो राखण करत असलेल्या शिकारीच्या अतिशय जवळ गेल्यास त्यास हरकत घेतो. ही हरकत हमखास गुरगुरण्याचे स्वरूप घेते हे परिणामकारक नसेल तर त्यानंतर हादरवून सोडणाऱ्या डरकाळ्या फोडल्या जातात. जर या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले, तर काहीही इजा झाल्यास संपूर्ण दोष घुसखोरी करणाऱ्याचा असतो"- जिम कॉर्बेट

ही दोन्ही एकाच माणसाची अवतरणे आहेत जी एकाच प्राण्याच्या म्हणजेच वाघाच्या वर्तनाचे वर्णन करतात. जर ही अवतरणे या माणसाची नसती जो वाघांसोबतच जगला, मला माहितीय अनेक जणांचा वाघांविषयीच्या वरील अवतरणांच्या मतितार्थावर विश्वास बसला नसता. माझा हा लेख, जंगलात होऊ शकणाऱ्या एका अतिशय दुःखद घटनेविषयी आहे, ती म्हणजे एका वनरक्षकाचा मृत्यू, ते देखील एका महिला वनरक्षकाला जंगलातील दुसऱ्या महिलेने म्हणजेच वाघिणीने ठार केले. वाघिणीचे नाव आहे माया, जी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील अतिशय प्रसिद्ध वाघीण आहे. सर्वप्रथम मी या घटनेमध्ये मरण पावलेल्या वरनरक्षक सौ. स्वाती ढुमणे यांना मनःपूर्वक श्रद्धांजली वाहतो. ज्याप्रकारे एका रागवलेल्या वाघिणीच्या स्वरूपात त्यांना मृत्यूने गाठले, त्यामुळे त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांना किती धक्का बसला असेल त्यांच्या कुटुंबियांनी ही बातमी कशी स्वीकारली असेल याची मी कल्पनाही करू शकत नाही. मात्र म्हणूनच मी या संपूर्ण घटनेबद्दल तसेच आपण ज्याला वन विभाग म्हणतो त्या यंत्रणेबद्दल, ज्याचा वाघ अविभाज्य घटक आहे, माझ्या भावना लिहीण्याचे ठरवले!

अलिकडेच मी ज्यांचा बहुतांश वेळ जंगलातच जातो त्या जंगलातील लोकांचे म्हणजेच वन कर्मचाऱ्यांचे जीवन कसे असते, याविषयी माझे विचार मांडले होते. फरक केवळ एवढाच होता की तो लेख मध्य भारताच्या जंगलातील दुसऱ्या एका महिला वन अधिकाऱ्याने आत्महत्या केली त्यासंदर्भात होता. यावेळी एका महिला वनरक्षकाच्या संदर्भातील घटना आहे. आत्तापर्यंत ज्यांनी जंगलांना भेट दिली आहे किंवा ज्यांना जंगलांविषयी माहिती आहे किंवा ज्यांना जंगलांमध्ये जायला आवडते (वन्यजीवप्रेमी) त्यांना नेमके काय घडले याची तपशीलवार माहिती मिळाली असेल. सर्व वन्यजीवप्रेमी वॉट्सऍप गटांमध्ये याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे आपापली मते फेसबुक, ट्विटर, इन्स्टावर व्यक्त केली जात आहेत, साधारण आठवडाभर हा गदारोळ सुरू राहील त्यानंतर सर्वकाही थंडावेल. याबाबत वन विभागाने (म्हणजेच सरकारने) नेहमीप्रमाणे मौन बाळगले आहे (म्हणजे मूक आहे) केवळ वाघांच्या प्रगणनेची प्रक्रिया महाराष्ट्र राज्यातील जंगलांमध्ये थांबवण्यात आली आहे (म्हणजे असे मी गृहित धरतो). कालांतराने एक तपशीलवार अहवाल सादर केला जाईल जो वाचण्याची तसदीही कुणी घेणार नाही, मात्र अहवाल आवश्यक आहे कारण एका महिला वनरक्षकाचा मृत्यू झाला आहे. तिच्या कुटुंबाला काही नुकसानभरपाई दिली जाईल (मी हा लेख लिहीत असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी मृत वनरक्षकाच्या कुटुंबाला १५ लाख रुपयांची मदत जाहीर केली होती तिच्या नवऱ्याला वन विभागामध्ये नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते), एवढेच केले जाते जंगलातील जीवन पुन्हा एकदा सामान्यपणे सुरू होते. मला संपूर्ण व्यवस्थेला (म्हणजेच समाजाला) एक प्रश्न विचारावासा वाटतो, (ज्याचे उत्तर मला आधीच माहिती आहे) आपण अशा घटनांमधून कधीही काही धडा घेणार आहोत किंवा नाही?

खरोखरच, जंगले ही शांततेतील या युद्ध क्षेत्रासारखी असतात जेथे जगण्यासाठी सतत संघर्ष सुरूच असतो. मात्र बहुतेक वेळा तो प्राण्यांविरुद्ध माणूस असा नसतो तर माणसाविरुद्ध माणूस असाच असतो. म्हणजेच प्राण्यांचे रक्षण करणारी माणसे विरुद्ध प्राण्यांना मारण्याचा (किंवा नष्ट करण्याचा) प्रयत्न करणारी माणसे. प्राणी माणसांना तेदेखील त्यांच्याच संरक्षणासाठी असलेल्या माणसांना क्वचितच मारतात. मात्र आपण प्राण्यांना दोष देऊ शकत नाही, या घटनेमध्ये प्राणी एक वाघीण माया होती. माझा लेख कुणालाही (वाघिणीला तर नक्कीच नाही) दोष देण्यासाठी नाही, मात्र आत्तापर्यंत मायाचे स्थलांतर करण्याच्या किंवा तिला प्राणीसंग्रहालयात स्थलांतरित करण्याच्या मागण्या किंवा आंदोलन करण्यात आली आहेत. मात्र मायाचा कोणताही माणसाला जाणूनबुजून मारण्याचा हा प्रयत्न नव्हता हे नक्की. अनेक लोकांच्या म्हणण्याप्रमाणे वन्यजीवनामध्ये निर्माण होत असलेला अडथळा हा या हल्ल्याचे कारण आहे, मात्र हा चुकीचा दावा आहे कारण गेल्या कित्येक दशकांपासून ताडोबामध्ये त्याच्या आजूबाजूला वाघ माणसे शांतपणे जगत आहेत. अर्थात, ताडोबा जिथे आहे त्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वाघांच्या हल्ल्यांमध्ये जीव गमवावा लागलेल्या माणसांची संख्या सर्वाधिक आहे मात्र त्याचवेळी माणसांमुळे तिथेच वाघांचे सर्वाधिक मृत्यूही झालेले आहेत, म्हणजे नाण्याच्या दोन्ही बाजू सारख्याच आहेत. ताडोबा अभयारण्याच्या अवतीभोवती दोन लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या प्रदेशामध्ये जवळपास १५० वाघ फिरत असतात, त्यामुळे माणूस विरुद्ध प्राणी असा संघर्ष होणारच. मात्र त्या महिला वनरक्षकाच्या बाबतीत जे झाले ते टाळता आले असते असे मला वाटते, म्हणून हा लेख लिहीत आहे कुणालाही दोष देण्याचा त्याचा उद्देश नाही.

सर्वप्रथम, बहुतेक लोकांना म्हणजे अगदी वन्यजीवप्रेमींनाही जंगलातील वन्यप्राण्यांच्या प्रगणनेमध्ये संक्रमण रेषा सर्वेक्षणाविषयी माहिती नसेल, ज्यामध्ये प्रगणना करण्यासोबतच त्यांच्या निवासस्थानाचे तपशीलही नोंदवले जातात. वन्यप्राण्यांची प्रगणना करण्याचे अनेक मार्ग आहेत बहुतेक लोकांना माहिती असलेला प्रकार म्हणजे पाणवठ्याजवळ मचाण बांधून एक चमू निरीक्षण करत असतो पाणी पिण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांची गणना करतो. त्याशिवाय कॅमेरे बसविलेले असतात त्यामध्ये वर्षभर वन्यप्राण्यांच्या हालचालींविषयी माहिती चित्रित होत असते. सर्वात जुनी अतिशय मूलभूत पद्धत म्हणजे, संक्रमण रेषा पद्धत. या पद्धतीमध्ये संपूर्ण जंगल वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागलेले असते एका जागी तीन किंवा चार लोकांचा चमू नेमून दिलेला असतो. हा चमू एका बिंदूपासून सुरुवात करतो एका विशिष्ट दिशेने चालत जातो जंगलामध्ये चार किलोमीटरपर्यंत एका रेषेमध्ये सरळ चालत जातो साधारण प्रत्येक २०० मीटर अंतरावर त्या भागातील आजूबाजूच्या वन्यजीवनाविषयी डेटा संकलित करतात तो नोंदवतात. यामध्ये वन्य प्राण्यांची विष्ठा गोळा करणे, झाडे, झुडुपे प्राण्यांविषयी नोंदी करणे, तसेच वन्यजीवनाच्या अस्तित्वाच्या सर्व खुणा नोंदवणे यांचा समावेश होतो उदाहरणार्थ वाघ किंवा अस्वलाच्या झाडावरील खुणा किंवा वाघांच्या डरकाळ्या अर्थातच प्राणी प्रत्यक्ष नजरेस पडणे. मी माझ्या कुठल्याही लेखामध्ये माझे स्वतःचे उदाहरण कधीच देत नाही, तरीही इथे मला वाचकांना सांगावेसे वाटते की मी वन विभागासाठी स्वयंसेवक म्हणून कान्हाच्या जंगलातील कोअर क्षेत्रात राहून ही संक्रमण रेषा प्रगणना केली आहे. मला आठवते की या प्रगणनेदरम्यान कोणत्याही वन्य प्राण्याने हल्ला केल्यामुळे काही दुर्घटना झाल्यास त्यासाठी मी स्वतःच पूर्णपणे जबाबदार असेन असा एक अर्ज भरला होता. म्हणूनच मला माहिती आहे की ताडोबामध्ये जी घटना घडली तशी होऊ शकते या  जंगलामध्ये वाघ हत्तीसारखे प्राणी असल्यामुळे कुठेही असे होऊ शकते, तर अशाप्रकारे ही प्रगणना केली जाते.

वन्यजीवनाच्या प्रगणनेची ही संक्रमण पद्धती कदाचित ब्रिटीश काळात सुरू झाली असावी जेव्हा कोणतेही डिजिटल तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. मात्र आता तुमच्या मदतीला ड्रोन कॅमेरा असताना जे तुम्हाला कोणत्याही जंगलाच्या प्रत्येक चौरस इंचाची तपशीलवार माहिती देऊ शकत असताना असे पायी सर्वेक्षण करायची काय गरज आहे असा मला खरोखरच प्रश्न पडतो. तसेच तुमच्याकडे काम करणाऱ्या माणसांनी (म्हणजे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी) हे काम प्रत्यक्ष करावे असे तुम्हाला वाटत असेल तर त्यांना किमान आवाजाचे आगीची फ्लेअर गन किंवा खरी बंदूक यासारखी मूलभूत सुरक्षा साधने तरी द्या जी आणीबाणीच्या परिस्थितीत माणसांचा तसेच प्राण्यांचा जीव वाचवण्यासाठी वापरली जाऊ शकतात. नुकतीच जी दुर्घटना झाली त्यामध्ये वाघ होता, विचार करा जर प्रगणना करणाऱ्या चमूची गाठ टस्करशी (मोठे सुळे असलेल्या हत्ती)  पडली असती, तर संपूर्ण चमू मारला गेला असता, बरोबर? तसेच तुम्ही प्राण्यांना दोष देऊ शकत नाही कारण अगदी तारा मायासारख्या वाघिणी असल्या, ज्या आजूबाजूला माणसे पाहातच मोठ्या झाल्या आहेत तरीही, त्या आधी वन्यप्राणी आहेत हे आपण विसरून चालणार नाही. वन विभागाचा कर्मचारी कर्तव्य बजावत असताना वन्य प्राण्याकडून मारला जाण्याची ही काही पहिली घटना नव्हती. माझ्या माहितीप्रमाणे काही वर्षांपूर्वी वन्यजीवन दिनाच्या दिवशीच, मृदूमलाई जंगलाचे (अभयारण्याचे नाव चुकीचे असेल तर मला माफ करा) क्षेत्र संचालक एका हत्तीच्या पिल्लाच्या मृत्यूसंदर्भात निरीक्षण करण्यासाठी गेले असता जंगली हत्तीणीने केलेल्या हल्ल्यात ठार झाले पूर्वी इतरही जंगलामध्ये अशा घटना होऊन गेल्या आहेत.

या घटनेचा पहिला मुद्दा म्हणजे, जंगलातील लोकांचे वन्य प्राण्यांशी अतिमैत्रीपूर्ण वागणे. मला पूर्णपणे आदर ठेवून असे सांगावेसे वाटते की केवळ ताडोबाच नाही तर इतरही काही व्याघ्र प्रकल्पांमध्ये, कनिष्ठ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना (विशेषतः वनरक्षक) वाघांच्या वर्तनाबाबत अतिआत्मविश्वास असतो ते त्यांना गृहित धरतात. पायी चालत वाघाच्या अतिशय जवळ जाणं किंवा वन्य प्राणी अवतीभोवती असतानाही वनकर्मचारी गांभीर्याने घेत नाहीत. नेमकी इथेच यंत्रणा त्यांच्या कर्मचाऱ्यांना जंगलामध्ये पालन करण्याची आचारसंहिता शिष्टाचार याविषयी प्रशिक्षित करण्यात कमी पडते. अनेकजणांना हे विधान अतिशय उद्धट किंवा फटकळ वाटेल, मात्र तुम्ही जंगलामध्ये कितीही काळ घालवला असेल तरी कधीही निष्काळजीपणे वावरून चालत नाही. खुद्द जिम कॉर्बेट यांनीही हे वारंवार नमूद केले आहे, ज्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य वाघांनी भरलेल्या जंगलांमध्येच घालवले. दुसरी गोष्ट म्हणजे काळासोबत बदलले पाहिजे, तुम्हाला माहितीय की जंगलात वाघ फिरताहेत अशावेळी पायी गस्त घालणे किंवा प्रगणना करणे सुरक्षित आहे, कितपत याचा विचार करायची वेळ आता आली आहे. विशेषतः मायाने (वाघिणीने) प्रगणनेदरम्यान ती प्रगणना करणाऱ्या कर्मचाऱ्याला मारल्याची घटना ताजी असताना. वन कर्मचाऱ्यांनी त्यांना ज्या प्राण्यांचा सामना करावा लागणार आहे त्यांच्याविषयी अभ्यास करणे जाणून घेणे आवश्यक आहे. वाघीण जेव्हा साथीदाराच्या शोधात असते किंवा समागमादरम्यान किंवा सोबत बछडे असताना तिला थोडेसेही चिथवण्यात आले तर ती हल्ला करू शकते. या अगदी मूलभूत गोष्टी आहेत ज्या अगदी पर्यटकांनाही माहिती असल्या पाहिजेत आपण इथे वन कर्मचाऱ्यांविषयी बोलतोय ज्यांना वाघांसोबत राहूनच त्यांचे कर्तव्य बजावायचे असते, त्यांना असा अडाणीपणा परवडणार नाही, बरोबरसर्व महत्त्वाचे म्हणजे, प्रगणना करणाऱ्या चमूतील तीन किंवा चार जणांनी अशा वेळी एकत्रच असले पाहिजे कारण वाघ कितीही रागवलेला असला तरीही, माणसांच्या समूहावर क्वचितच हल्ला करतो. वाघ जेव्हा तुमच्या दिशेने डरकाळ्या फोडत, गुरकावत येत असतो तेव्हा उडणाऱ्या गोंधळाचा (किंवा भीतीचा) मी पूर्णपणे आदर करतो तो मला समजतो. तत्वतः अशा वेळेस एकत्र राहा किंवा सोबत उभे राहा असे म्हणणे सोपे असते मात्र प्रत्यक्षात वाघांनी हल्ला केल्यावर त्या गटातून मी पहिल्यांदा धूम ठोकली असती. मात्र याचसाठी व्यवस्थित सातत्याने प्रशिक्षण देणे आवश्यक आहे, नाही का?

शेवटचा मुद्दा म्हणजे, ज्या वनरक्षकाचा जीव गेला तिच्याविषयी पूर्णपणे आदर राखत असे वाटते की, दुर्दैवाने आज एका वाघाने एका माणसाला मारले आपण सगळे या घटनेमुळे अतिशय विचलित झाले आहोत. शहरामध्ये मात्र दररोज असंख्य माणसे माणसांना मारत असतात त्याची कुणालाही फिकीर नसते. म्हणूनच, मला प्रत्येक वन्यजीवप्रेमी व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, पर्यावरणवादी, वन विभाग, तसेच मायबाप सरकार त्याहूनही वरचढ म्हणजे न्याय व्यवस्थेला असे आवाहन करावेसे वाटते की, सगळ्यांनी एकजूट होऊन अशी धोरणे तयार करा ज्यामुळे केवळ वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनाच नाही तर अधिकाधिक लोकांना जंगलांची वन्य प्राण्यांची ओळख होईल. त्यानंतर व्यवस्थित एक यंत्रणा तयार करा, ज्यामध्ये वाघ (प्रतिकात्मक) माणूस एकत्रपणे शांततेत नांदू शकतील. माणूस वाघ या दोघांचाही जीव वाचविण्याचा केवळ हाच एक मार्ग आहे आपण वन्यजीवनाचे एवढे तरी देणे नक्कीच लागतो!

 


You can read in English version:

http://visonoflife.blogspot.com/2021/11/tigers-foresters-forest.html

 

 

संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

smd156812@gmail.com

 






No comments:

Post a Comment