Friday, 7 October 2022

सणासुदीचे दिवस आणि बांधकाम व्यवसाय !















                                            सणासुदीचे दिवस आणि बांधकाम व्यवसाय !

खरतर दिवाळी (लक्ष्मी पूजन/अमावस्या) ही वर्षातील सर्वाधिक काळोख असलेली रात्र असते. आपल्या पूर्वजांनी आपल्याला प्रकाशाने अंधारावर मात करायची शिकवण दिली आहे.

जेव्हा चंद्राचा किंवा सूर्याचा प्रकाश नसतो, आकाशात काळोख असतो; तेव्हा भारत मात्र झगमगत असतो. मला या अतिशय बुद्धिमान उत्तम परंपरेचा भाग असल्याचा अभिमान आहे.
दिवाळी म्हणजे "तमसोमा ज्योतिर्गमय" . . .
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचे जीवन प्रकाशाने उजळून जावो” . .  हरिहर डी. नाईक

सणवार विविधतेला चालना देतात, या निमित्ताने शेजाऱ्यांमध्ये संवाद होतो, कल्पकतेला वाव मिळतो, नागरी अभिमान निर्माण होतो, यामुळे एकूणच आपले मानसिक स्वास्थ्य सुधारते. थोडक्यात, यामुळे शहरे राहण्यासाठी अधिक चांगले ठिकाण होतात” ... डेव्हिड बाईंडर

पृथ्वीच्या दोन वेगवेगळ्या टोकांना दोन पूर्णपणे वेगळ्या संस्कृतींमध्ये राहणाऱ्या लेखकांची ही वरील दोन अवतरणे आहेत. हरिहर हे देसी म्हणजे आपल्या भारतातील आहेत तर डेव्हिड हे पाश्चिमात्य म्हणजे अमेरिकन आहेत. मात्र तरीही सणांविषयी बोलतांना दोघांच्याही भावना सारख्याच आहे, हेच सणांचे खरे सौंदर्य असते. गेल्या दोन वर्षांच्या पार्श्वभूमीवर ही दिवाळी म्हणजे एखाद्या अंधाऱ्या बोगद्यातून स्वच्छ सूर्यप्रकाश असलेल्या रस्त्यावर जाण्यासारखे आहे. म्हणूनच सगळे जण (म्हणजे व्यापारी) अतिशय आनंदी उत्साही आहेत, कारण एरवीही पितृपक्ष संपल्यानंतर ते नवीन वर्ष सुरू होण्यापर्यंतचा सणासुदीचा काळ हा व्यवसायासाठी अतिशय उत्तम मानला जातो. तसेच एका अज्ञात शत्रूविरुद्ध जवळपास दोन वर्षे चाललेल्या जागतिक महायुद्धानंतर (या काळाला तुम्ही दुसरे काय म्हणू शकता) मला असे वाटते की केवळ सणांमुळेच समाजाची गाडी रुळावर येऊ शकते. वर्षाच्या याच काळामध्ये नाताळ दिवाळी दोन्ही सण हातात हात घालून येत असल्यामुळे ही तिमाही जागतिक पातळीवरही खऱ्याअर्थाने सणांचा हंगाम असतो. वर्तमानपत्रे जाहिरातींनी भरून गेलेली असतात (पुन्हा एकदा) खरेदीची वातावरणनिर्मिती करण्यासाठी हा सर्वोत्तम उपाय असतो. कारण तुम्ही जेव्हा वर्तमानपत्राचे कोणतेही पान उघडता तेव्हा तुम्हाला सेलमधील सवलतीच्या दरांचे आकडे दिसत असतात, तुम्ही रस्त्यावरून गाडी चालवत असता तेव्हा रस्त्याच्या कडेला लावलेल्या मोठमोठ्या फलकांवरील हसरे चेहरे तुमच्याकडे पाहून कोणतेतरी उत्पादन विकत असतात, तुम्ही जेव्हा तुमचे फेसबुक किंवा इन्स्टा अकाउंट उघडता तेव्हा तुम्हाला माहितीय काय होते, तुम्ही एखादेवेळी लाईक केलेल्या जाहिरातींचे पॉप अप दिसू लागतात (आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची जादू) शेवटी तुम्ही काहीतरी खरेदी करण्याचा निर्णय घेताच होता !

मी खरोखरच सांगतो, ज्याप्रमाणे चातक पक्षी पावसाची वाट पाहात असतो (एका काल्पनिक पक्ष्याविषयी म्हण जो केवळ आकाशातून पडणारे पावसाचे पाणी पितो असे म्हणतात) त्याचप्रमाणे प्रत्येक जण या वर्षी दिवाळीची वाट पाहात होता. व्यापारी याकडे गेल्या दोन वर्षांमध्ये झालेले नुकसान भरून काढण्याची संधी म्हणून पाहात आहेत ग्राहकही त्यांचे खिसे रिकामे करण्यासाठी आनंदाने तयार आहेत कारण शेवटी तुम्ही कशासाठी कमवता, तर तुम्हाला कमवलेले पैसे खर्चच करता येणार नसतील तर या कमवण्याला काय अर्थ आहे,नाही का? बांधकाम व्यावसायिकही (म्हणजेच रिअल इस्टेट) याला अपवाद नाहीत, ते देखील या सणासुदीच्या काळासाठी अतिशय उत्सुक आहेत. अर्थात रिअल इस्टेटमधील उत्पादन म्हणजेच घर हे काच वाटते म्हणून  खरेदी करायला गेलो आणि घेऊन आलो असे उत्पादन नाही आजच्या ग्राहकाच्या बाबतीत तर नाहीच नाही. घर ही अतिशय शुभ किंवा महत्त्वाकांक्षी खरेदी मानली जाते कारण बहुतेक ग्राहक ते आयुष्यात एकदाच खरेदी करतात. सध्या अनेक नवीन गृहनिर्माण प्रकल्पांची सुरुवात करण्यात आली आहेत, ताबा मिळण्यासाठी तयार घरे उपलब्ध आहेत, घरे बांधली जात आहेत या सगळ्यांसाठी काही ना काही सवलती आहेत, यामुळे घर घेणाऱ्या ग्राहकांसाठी त्यातून निवड करणे अतिशय अवघड झाले आहे. तरीही मूलभूत बाबींमध्ये काहीही बदल होत नाही, सर्वप्रथम तुम्हाला घर म्हणून काय हवे आहे हे समजून घ्या काय सवलती आहेत हे पाहा कारण घर ही अशी गोष्ट आहे जी कुणीही केवळ सवलत मिळतेय म्हणून खरेदी करू नये. घर घेणारे बहुतेक ग्राहक हे समजण्याइतपत हुशार असतात तरीही इथे जाहिरातींची जादू कामी येते.

अनेक लोक मला विचारतात, सणासुदीच्या दिवसांमुळे घरांच्या खरेदी विक्रीवर खरोखरच परिणाम होतो का? मी काही विपणन तज्ञ नाही तरीही, सणांमुळे लोक आनंद असतात जेव्हा तुमची मनस्थिती आनंदी किंवा सकारात्मक असते तेव्हाच तुम्ही कुठलीही वस्तू खरेदी करता, याला एकमेव पवाद म्हणजे सिगारेट दारुच्या विक्रीचा! (हाहाहा, माफ करा थोडी गंमत केली). जेव्हा मनस्थिती उदास किंवा निराश असते, तेव्हा कुणीही जाऊन मिठाई, कपडे, कार किंवा घर कसे खरेदी करेल, अर्थात नैराश्यावर खरेदीची उपचारपद्धती नावाची संकल्पना आहे मात्र ती घराच्या खरेदीसाठी लागू होत नाही. पुन्हा रिअल इस्टेटविषयी बोलायचे झाले तर प्रदर्शनांपासून ते समाज माध्यमांपर्यंत खरी समस्या म्हणजे घर घेणाऱ्या ग्राहकाला काय आवडेल उत्पादन घर घेणाऱ्या ग्राहकाचे बजेट (म्हणजेच त्याच्या गरजा) या दोन्ही गोष्टींची सांगड कशी घालायची असा प्रश्न असतो. एकीकडे बांधकाम खर्च आकाशाला भिडले आहेत ज्यामध्ये जमीनीचा खर्च, सरकारी शुल्क (सर्वप्रकारचे कर शुल्क), विपणनाचे खर्चही दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र जेव्हा तयार घरांची प्रत्यक्ष विक्री करायची वेळ येते तेव्हा ग्राहकांना कमीत कमीत दराची अपेक्षा असते, हेच रिअल इस्टेट समोरील सर्वात मोठी आव्हान आहेमात्र या सणासुदीच्या काळामध्ये जेव्हा मन आनंदी असते प्रत्यक्ष घर खरेदी करण्यास तयार असते, तेव्हा ग्राहक दरावर फारसे अडून बसणार नाही (अशी आशा वाटते) खरेदीचा व्यवहार नक्की करेल अशी जास्तीत जास्त शक्यता असते. म्हणूनच सणासुदीच्या काळामध्ये रिअल इस्टेटसारख्या उत्पादनामध्येही फरक पडू शकतो, असे मला वाटते.

पुण्याविषयी बोलायचे झाले तर हे घरांचे  समीकरण दिवसेंदिवस अधिकच अवघड होत चालले आहे एकीकडे जमीनीचे दर अव्वाच्या सव्वा वाढत आहेत कारण केवळ घरांसाठीच नव्हे तर कार्यालये, हॉटेल्स, शिक्षणसंस्था इतरही अनेक कारणांसाठी जमीनीला मागणी आहे यामुळे घर घेणे अतिशय महागडे झाले आहे. त्याचप्रमाणे घर घेणाऱ्या ग्राहकाची क्रयशक्ती ही एक मोठी समस्या आहे. घर घेणारा ग्राहक आजकाल त्याची किंवा तिची सर्व मिळकत केवळ एकाच खरेदीसाठी खर्च करून समाधानी नसतो मग ती खरेदी घराची का असेना. या पिढीला त्यांची जीवनशैली टिकवून ठेवायची असते गृहकर्जाच्या हप्त्यांच्या ओझ्याखाली दबून जायचे नसते. त्यामुळेच ते अतिशय विचारपूर्वक निर्णय घेतात किंवा योग्य घर निवडताना त्यांना हवा तेवढा वेळ घेतात. यामुळेच बांधकाम व्यावसायिकासाठी विपणन अतिशय कठीण होते कारण किती दर प्रत्येक स्केअर फुटाला आकारायचा हा एक प्रश्नच असतो. याच कारणाने अनेक बांधकाम व्यावसायिक विपणनाचे काम चॅनल पार्टनर किंवा सोल सेलिंग एजंटकडे (विक्री एजंट) देत आहेत. एकादृष्टीने ही व्यवसायासाठी एक नवीन संधी आहे मात्र या यंत्रणेमुळे कुठेतरी बांधकाम व्यावसायिक (यामध्ये त्याच्या चमूचाही समावेश होतो) घराच्या ग्राहकांमधला संवाद हरवत चालला आहे. यामुळेच बांधकाम व्यावसायिकांना नवीन प्रकल्पांचे नियोजन करणे किंवा विक्री करणे आणखी अवघड होत चालले आहे कारण जोपर्यंत तुम्हाला तुमच्या ग्राहकाची मानसिकता माहिती नसेल तोपर्यंत तुम्ही योग्य उत्पादन कसे तयार कराल, या मुद्द्याचा बांधकाम व्यवसायिकांच्या समुदायाने विचार करण्याची वेळ आता आली आहे. बांधकाम व्यावसायिकांकडे सणासुदीच्या निमित्ताने ग्राहकांशी संवाद साधण्याची संधी आहे कारण मनस्थिती आनंदी असताना ग्राहक चालत बांधकाम स्थळी, विक्री कार्यालयात किंवा मुख्य कार्यालयात येईल तुम्ही तुमच्या चमूद्वारे तसेच बांधकाम व्यावसायिक म्हणून स्वतः ग्राहकाशी संवाद साधून त्याला अधिक चांगल्याप्रकारे समजून घेऊ शकताग्राहक तुम्हाला अगदी सूर्य चंद्रही मागू शकतो, मात्र तुम्ही त्यांना ते देण्यासाठी अंतराळवीर नाही, तुम्ही एक बांधकाम व्यावसायिक आहात हे विसरू नका. ग्राहकांचा दृष्टिकोन सकारात्मक होण्यासाठी या सणासुदीच्या दिवसांचा वापर करा मात्र त्याला बाजाराच्या वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यासाठीही त्यांचा वापर करा. घराचे ग्राहक म्हणूनही, घर घेण्यासाठी हा चांगला काळ आहे कारण पुणे संपूर्ण मध्य भारताचे केंद्र होत चालले आहे ही वस्तुस्थिती आहे आज बरेच पर्याय आहेत मात्र पुढील दोन कारणांमुळे अशीच परिस्थिती फार काळ असणार नाहीएक म्हणजे, घरांची मागणी संथ मात्र स्थिरपणे वाढत आहे दुसरे म्हणजे तुम्ही लहान बांधकाम व्यावसायिकांना संपवुन टाकलेत तर केवळ खुप बडे बांधकाम व्यावसायिक बाजारात उरतील जेव्हा बाजारामध्ये स्पर्धा नसते तेव्हा काय होते हे तुम्हाला माहिती आहे (जिओने आपल्याला ते शिकवले आहे). इथे बरेच जण म्हणतील की आम्ही स्पर्धाच उरणार नाही याची काळजी कशासाठी करू, आम्ही आमचे घर घेऊन झाले असेल मी त्यांना दोष देत नाही. मात्र लक्षात ठेवा, तुमच्या घराचा तुम्हाला उपयोग होतोय मात्र ते काही दूरवर एखाद्या निर्जन बेटावर नाही. उद्या तुमच्या मुलांना या शहरामध्ये घर खरेदी करावे लागेल त्यावेळी काहीही पर्याय नसेल तर त्यासाठी केवळ तुम्हीच जबाबदार असाल ज्याप्रकारे आपण आत्ता पर्यावरणाची काळजी घेतली नाही तर पृथ्वीवरील प्रदूषणासाठी आपणच सगळे दोषी असू, बरोबरघर घेण्यासाठी इच्छुक असलेल्या ग्राहकांना माझी एकच सूचना आहे (म्हणजे सल्ला आहे), की आज तुमच्या खिशाला परवडणारा प्रत्येक व्यवहार हा भविष्यकाळाच्यादृष्टीनेही योग्य व्यवहार असेलच असं नाही, विशेषतः जेव्हा घरासारखे उत्पादन असते, कारण बांधकाम व्यावसायिकासोबत ते घर तुम्हाला पन्नास वर्षांहून अधिक काळ सेवा देईल अशी अपेक्षा असते. याचा अर्थ बांधकाम व्यावसायिक जो दर लावेल तो तुम्ही मान्य करा असे नाही, तर याचा अर्थ असा होतो की घराचा विचार करताना तुम्ही सेवा, टिकाऊपणा, बांधकाम, नियोजन, प्रकल्पामध्ये भविष्यात आजूबाजूला होणारा विकास, बांधकाम व्यावसायिक दर यासारख्या सगळ्या पैलूंचा विचार करा. जर व्यवहाराच्या या सगळ्या पैलूंचा विचार करता चांगली ऑफर (म्हणजे दराच्या बाबतीत) असेल तर तुम्ही ती चांगली ऑफर आहे असे म्हणू शकता.

म्हणूनच बांधकाम व्यावसायिकांनो घराच्या ग्राहकांनो, खऱ्या अर्थाने सण साजरा करणे म्हणजे हाव गरज यामध्ये समतोल साधणे दोघांचाही फायदा होईल असा व्यवहार करणे.म्हणूनच बांधकाम व्यावसायिक म्हणून तुम्ही स्वतः आनंदाने शांतपणे ज्याची पूर्तता करू शकता केवळ तेच आश्वासन द्या, नाहीतर घराच्या ग्राहकांची दिवाळी होईल आणि तुमचे दिवाळे निघेल, हे लक्षात ठेवा!

संजय देशपांडे      

संजीवनी  डेव्हलपर्स

you can find our English version @ link below

https://visonoflife.blogspot.com/2022/09/

 

 

 













 

No comments:

Post a Comment