शेअरिंगवाली दिवाळी !
“तुम्ही नवीन खरेदी केलेले कपडे घातले नाहीत, भरपूर मिठाई खाल्ली नाही, भोवतालच्या वातावरणाचा आनंद घेतला नाही, तर दिवाळी साजरी करण्याला काय अर्थ आहे?...सर्वेश जैन
“मित्रांनो विसरू नका, की तुम्ही या दिवाळीला उडवलेला प्रत्येक फटाका तुमच्या मुलांच्या व जगभरातील सर्व मुलांच्या मृत्यूच्या आदेशावर स्वाक्षरी करणाऱ्या पेनातल्या शाईसारखा असेल.” … अभिजित नासकर
वर एकाच सणाविषयी दोन अवतरणे मी वापरलेच, ज्यापैकी एकामध्ये तुमच्या सर्वोत्तम गोष्टींसह सण साजरा करण्याविषयी सांगण्यात आले आहे तर दुसऱ्यामध्ये सण साजरा करताना आपल्या जबाबदारीविषयी सांगण्यात आले आहे. खरंच, फक्त माझी पिढी पहिल्या अवतरणाप्रमाणेच जगत आली आहे, कारण आम्हाला वर्षाच्या या दिवाळीच्या काळातच नवीन कपडे मिळत असत, घरावर रोषणाई केली जात असे (माझ्या वडिलांना याबाबतीत अतिशय उत्साह असायचा), सलग चार दिवस रोज काहीतरी गोडधोड केले जात असे व आम्ही फटाके फोडत असू. दिवाळीच्या सुट्टीत प्रवास जवळपास होतच नसे; किंबहुना दिवाळीमध्ये घरापासून लांब राहणे निषिद्ध मानले जायचे. दिवाळीसाठी भेटवस्तू वगैरे शब्दही अस्तित्वात नव्हते, जो आजकाल एक परवलीचा शब्द झाला आहे (अर्थात त्यामागचा हेतू व्यावसायिक आहे). मात्र माझी आई घरकाम करणाऱ्या बायकांना कपडे व मिठाई देत असे, त्यांच्याकडून परत काही मिळेल या अपेक्षेने
नाही तर
त्यांची दिवाळी आनंदात जावी हा हेतू असे. मला असे वाटते, आपण आज दिवाळीचा मुख्य उद्देश विसरलो आहोत. हा सण साजरा करायलाच हवा, विशेषतः गेल्या काही काळात आपण जे काही अनुभवले आहे त्या पार्श्वभूमीवर यंदाची दिवाळी जास्त
खास आहे.अनेक लोक गेल्या दोन वर्षांपासून दिवाळीकरीता त्यांच्या मूळ गावीही जाऊ शकलेले नाहीत व प्रवासालाच मनाई होती त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीतील सहलींचा प्रश्नच नव्हता. अनेक कुटुंबांना आर्थिक तसेच आरोग्याच्या बाबतीतही बरेच नुकसान सहन करावे लागले व काहींच्या हातात पैसा असूनही सण
साजरे करण्याची मनस्थिती नव्हती. या दिवाळीमध्ये, परिस्थिती बरीच स्थिरस्थावर झाल्यासारखी वाटते आहे व इथेच सण साजरा करताना जबाबदारीची जाणीव होणेसुद्धा
आवश्यक !
मी माझ्या लहानपणी आम्ही दिवाळीला फटाके उडवत असू याचा उल्लेख केला आहे, दुसऱ्या अवतरणामध्ये अभिजितने फटाके उडविण्याचे दुष्परिणाम सांगितले आहेत. सुदैवाने फटाके उडविण्याविरुद्ध सुरू असलेल्या जगजागृती मोहिमेमुळे दरवर्षी फटाक्यांची विक्री कमी होताना दिसत आहे. आपल्याकडे आधीच भरपूर धूर, ध्वनी व प्रकाशाचे प्रदूषण आहे त्यात आणखीन फटाके वाजवून भर कशाला घालायची हा साधा तर्क आहे, बरोबर? तसेच या जागरूकीकरणं
मोहिमेमुळे सतत एखादी गोष्ट कानावर पडल्याने लहान मुलांच्या मनावर ती बिंबते त्यामुळे त्याची ताकद किती आहे हे दिसून आले आहे. कारण हे केवळ शाळा व महाविद्यालयांमध्ये चालविण्यात आलेल्या फटाकेविरोधी मोहिमेमुळेच शक्य झाले आहे (मला खरोखरच असे वाटते बऱ्याच ज्येष्ठांनाही आता
शाळेमध्ये पाठवले पाहिजे). म्हणूनच आपण हे प्रभावी माध्यम (म्हणजेच शाळेतील जागरुकता मोहीम) दिवाळी अधिक चांगल्याप्रकारे साजरी करण्यासाठी वापरू शकतो, किंबहुना दिवाळी साजरी करण्याचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी आपण त्याचा वापर करूया. आता तुम्ही म्हणाल की सण
साजरे करणे यात समजून घेण्यासारखे काय आहे, फटाके न उडवणे हा त्याचा एक भाग झाला, परंतु सगळ्यांनी एकत्र येणे, पैसे खर्च करणे, चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेणे, प्रवास, खरेदी व तत्सम गोष्टी करणे यालाच दिवाळी साजरी करणे असे म्हणतात ना?
हो, बरोबर आहे यालाच आपण सण साजरा करणे म्हणतो परंतु त्यासोबतच आपल्याला सणाच्या निमित्ताने इतरांना सुद्धा काहीतरी दिले पाहिजे याचीही जाणीव होते जे आपण हळूहळू विसरत चाललो आहोत. आता बरेच जण म्हणत असतील की असं काय करता आम्ही इतरांना नक्कीच काहीतरी देतो, आम्ही भेटवस्तू खरेदी करतो व त्या इतरांना देतो. पण मला एक सांगा हे इतर कोण आहेत ज्यांना आपण भेटवस्तू देतो, ज्याला आपण इतरांना काहीतरी देणे असे म्हणतो?
दिवाळीच्यादरम्यान बऱ्याच भेटवस्तू खरेदी केल्या जातात व आप्तस्वकीयांना दिल्या जातात व ही खरोखरच चांगली गोष्ट आहे. याचे कारण म्हणजे यामुळे संपूर्ण बाजारामध्ये उलाढाल वाढते व सकारात्मक वातावरण निर्माण होते. मात्र तुम्ही भेटवस्तू देण्याची यादी तपासा, तुम्हाला दिसेल की हे सगळे मित्रमंडळी, नातेवाईक किंवा जनसंपर्कासाठी आवश्यक व्यक्ती आहेत. त्यातही गैर काहीच नाही कारण ते सगळे आपल्या आयुष्याचा (म्हणजेच यशाचा) भाग आहेत. मात्र आपण आपल्याकडे जे अधिक आहे ते, जे फारसे नशीबवान नाहीत अशांना दिवाळीच्या निमित्ताने देण्याचा विचार कधी केला आहे का, हा प्रश्न स्वतःला विचारा व त्याचे उत्तर मला सांगा. मी काही कुणी संत किंवा समाजसेवक नाही ना मी कुणी असा एकमेव माणूस आहे
ज्याने खडतर आयुष्य किंवा उपेक्षित जीवन पाहिले आहे, तर अनेकांनी ते खडतरपणा
भोगला आहे. तर मुद्दा असा आहे की, आपण जे पाहिले आहे, जे
भोगले आहे त्यासंदर्भात आपण काय करत आहोत (म्हणजे उपेक्षितांच्या जीवनासंदर्भात काय करत आहोत). आपण जे पाहिले आहे त्यासंदर्भात काही कृती करण्यासाठी दिवाळीपेक्षा अधिक चांगले निमित्त काय असू शकते, यामुळे काही उपेक्षितांची दिवाळीही उजळून निघेल आणि यासाठी तुम्हाला लाखो किंवा करोडो रुपये खर्च करण्याची गरज नाही, त्यांना काही देण्यासाठी सण साजरा करणे म्हणजे नेमके काय हे फक्त समजून घेणे आवश्यक आहे. उद्या (म्हणजे दिवाळीपूर्वी कोणत्याही दिवशी) तुम्ही जेव्हा तुमच्या घरातून बाहेर पडाल, तेव्हा तुम्ही ज्या चेहऱ्यांना भेटता किंवा पाहता त्यांची एक यादी तयार करा किंवा तुमच्या आजूबाजूला असे कोण आहे ज्यांना उद्याची विवंचना आहे याचा विचार करा. माझ्यावर विश्वास ठेवा तुम्हाला असे अनेक दिसतील. अर्थात देवही त्यांच्या सगळ्या समस्या सोडवू शकणार नाही, परंतु तुम्ही त्यांना दिवाळीच्या निमित्ताने छोटीशी भेटवस्तू देऊन त्यांच्या समस्या विसरायला लावू शकता. ही भेटवस्तू काहीही असू शकते तुमचे वापरलेली
पादत्राणे, तुमचे वापरलेले कपडे(चांगले), एका बॉक्समध्ये थोडा फराळ (सणासुदीच्या निमित्ताने केलेली मिठाई व शेव-फरसाण वगैरे) किंवा अगदी काही नाही तर भांडी
असे काहीही जे चांगल्या स्थितीत असेल किंवा नवीन वस्तूही (असे झाले तर उत्तम) भेटवस्तूच्या कागदात बांधून देऊ शकता. त्यानंतर त्यांचे आनंदी चेहरे पाहा जे तुम्हाला एखाद्या आकाशकंदीलापेक्षाही अधिक उजळलेले दिसतील!
आणि हो, ज्यांच्याकडे देण्यासारख्या काही वस्तू नसतील, ते किमान (रिटर्न गिफ्ट म्हणूनही परत देऊ शकता) एक छानसे हसू व सकारात्मकता देऊ शकतात कारण एखाद्याची मनस्थिती आनंदी करण्यासाठी तेदेखील पुरेसे असते. यालाच मी शेअररिंगवाली दिवाळी असे म्हणतो, या निमित्ताने तुम्ही जे काही सर्वोत्तम देऊ शकता ते भेटवस्तू म्हणून द्या. ज्या उपेक्षित व्यक्तीला हे द्याल त्याला किंवा तिला ती एकटी नाही, त्यांच्याविषयी विचार करणारे, जाणीव असणारे, त्यांचा त्रास समजून घेणारे कुणीतरी आहे व त्याच्याकडे किंवा तिच्याकडे जे मुबलक आहे त्यातील काही तुम्हाला द्यायला इच्छुक आहे याची जाणीव होईल. या दिवाळीला हे करून बघा, त्यातून तुम्हाला आतून किती आनंद, समाधान व सकारात्मकता मिळते ते पाहा. कारण बाह्य जगातील अंधार हजारो आकाशदिव्यांनी घालवून टाकता येतो, मात्र आतील अंधार इतरांना काहीतरी देण्याच्या छोट्याशा कृतीतूनच घालवून प्रकाशाने उजळून टाकता येतो. तर मग लोकहो, वाट कसली पाहताय, एक छोटेसे पाऊल पुढे टाका व ही दिवाळी शेअरींगवाली करा!
संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलपर्स
ईमेल आयडी - smd156812@gmail.com
you can find our english version @link below.
No comments:
Post a Comment