Thursday, 30 January 2025

हवेच प्रदूषण , बांधकाम व्यवसाय आणि शहर नियोजन

 



























































हवेच प्रदूषण , बांधकाम व्यवसाय आणि शहर नियोजन 

“आपण पृथ्वी जेवढी प्रदूषित करू, तेवढा आपल्याला पृथ्वीवर जगण्याचा कमी हक्क असेल!” ― मेहमत मुरत इल्दान
“शहरांमधील सर्व समस्यांसाठी व फोलपणासाठी सोयीस्करपणे वाहनांना व ड्रायवरना जबाबदार ठरवतो. परंतु या दोनहीनचे घातक परिणाम शहराच्या नियोजनातील आपल्या अक्षमतेपेक्षा बरेच कमी कारणीभूत आहेत!” -  जेन जेकब.
       आधुनिक जगाच्या नागरी नियोजनातील या दोन महान व्यक्ती व महान विचारवंत (ते तत्वज्ञही आहेत) आपण आपल्या शहरांचे किंवा महानगरांचे नियोजन निसर्गाची किंमत मोजून ज्यापद्धतीने करत आहोत त्याविषयी आपल्याला नेहमी इशारा देतात. मेहमत हे तुर्कस्तानचे आहेत तर जेन या अमेरिकेतील आहेत, तरीही त्यांचे लेखन केवळ त्यांच्या प्रदेशांपुरतेच नव्हे तर संपूर्ण जगातील नियोजनकर्त्यांसाठी लागू होते, ज्याकडे आपण नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करतो. याची किंमत आपण आधीच मोजतोय. त्यांनी जे काही लिहीले आहे त्याला आपले पुणे शहरही अपवाद नाही व तुम्हाला असे वाटत असेल की मी हा विषय फार ताणतोय, तर प्रदूषणाची आकडेवारी दर्शविणारे स्तंभ पाहा, ज्यातून शहरातील प्रत्येक उपनगराचा हवेचा दर्जा दर्शविला जातो. समस्या अशी आहे, की नेहमीप्रमाणे या शहरामध्ये किंवा समाजामध्ये केवळ रिअल इस्टेटलाच राक्षस ठरवले जाते जसे की समोरील वाहनांना व ड्रायवरला ठरवतील (म्हणजे एकमेव राक्षस) व त्यामुळे त्याच्या झळा सोसाव्या लागतात. मला आठवतेय शाळेमध्ये माझ्या वर्गात काही मुले अशी होती (मी सुद्धा त्यांच्यातलाच एक होतो हे वेगळे सांगायची गरज नाही) शिक्षकांच्यादृष्टीने वर्गात काही चुकीचे घडले तर ते त्यांनाच मारायचे. त्याबाबत त्यांचे समर्थन असायचे की आम्हाला कोणत्याही पुराव्याची गरज नाही, याच व्रात्य मुलांनी काहीतरी उपद्व्याप केलेले असणार व आम्ही आधीपासूनच बदनाम होतो हाच आमचा एकमेव दोष होता. मी आजकाल जेव्हा वर्तमानपत्र उघडतो व त्यामध्ये हवेच्या दर्जासंदर्भात प्रदूषणाची आकडेवारी वाचतो किंवा पाणी टंचाईविषयी बातम्या वाचतो किंवा काँक्रीट मिक्सर घेऊन जाणारे ट्रक, डंपर किंवा पाण्याचा टँकर यासारख्या मोठ्या वाहनांमुळे जेव्हा अपघात होतात तेव्हाही रिअल इस्टेटलाच दोष दिला जातो, कारण शहरात व आजूबाजूच्या परिसरात सर्वत्र बांधकाम सुरू आहे. आज मोठा झाल्यानंतर विद्यार्थी असताना मला जसे वाटायचे तशीच भावना आजही मनामध्ये येते. तेव्हा शिक्षा म्हणून शिक्षकांकडून मार पडत असे आज विविध संस्था, माध्यमे, स्वयंसेवी संस्था यांच्या रूपाने प्रत्येक शिक्षकाकडून नोटीसा किंवा काम थांबवण्याच्या म्हणजेच आर्थिक स्वरूपातील शिक्षा (म्हणजेच ताण) मिळतात. 


     नाही, मी रिअल इस्टेट कशी बरोबर आहे व निष्पाप आहे याचे समर्थन करत नाही. याची दोन कारणे आहेत एक म्हणजे माझ्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही व दुसरे म्हणजे तो माझ्या लेखाचा विषय नाही. माझ्या लेखाचा विषय तुम्हाला चुकीच्या नागरी नियोजनामुळे, चुकीच्या व्यावसायिक (रिअल इस्टेट) धोरणांमुळे होणाऱ्या समस्यांची जाणीव करून देणे व प्रदूषणाच्या समस्यांवर काही तोडगे सुचवणे हा आहे, जर आपल्याला खरोखरच त्या सोडवायच्या असतील. रिअल इस्टेटच्या स्वतःच्या काही त्रुटी आहेत, जशा त्या शालेय जीवनामध्ये विद्यार्थी म्हणून आमच्यामध्ये होत्या, परंतु या समस्यांसाठी केवळ आम्हीच कारणीभूत नव्हतो व केवळ काही विद्यार्थ्यांनाच शिक्षा देऊन मग त्यांची चूक असो किंवा नसो तुम्ही इतर मुलांना सुधारू शकता हा तर्क अजूनही आहे, हा माझ्या लेखाचा विषय आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळी इतर विद्यार्थ्यांनी निर्माण केलेल्या समस्यांसाठी त्याच विद्यार्थ्यांना शिक्षा देत राहीलात, तर शिक्षणाच्या प्रवाहामध्ये तुम्ही त्यांना कायमचे गमावून बसाल, रिअल इस्टेटचेही तसेच आहे. शहरातील वायू प्रदूषण वाढले, बांधकामे थांबवा. कमी पाऊस पडल्यामुळे पाणी टंचाई आहे, बांधकामे थांबवा. सांडपाण्याच्या वाहिन्या अपुऱ्या आहेत, बांधकामे थांबवा. रस्ते चांगले नाहीत किंवा रस्त्यांसाठी जमीन अधिग्रहित केलेली नाही बांधकामे थांबवा. रस्त्यावरील अपघात वाढत आहेत, बांधकाम उद्योगाची वाहने थांबवा (त्या ओघाने बांधकामे थांबवा). कोणत्याही कारणासाठी दोष देऊन बांधकाम थांबवण्याची यादी लांबलचक आहे, जो सरकारच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम आहे, हा माझ्या लेखाचा विषय आहे.

         पाण्याच्या टंचाईविषयी बोलायचे झाले, तर सिंचन विभाग ज्यावर संपूर्ण राज्यामध्ये पाण्याच्या वितरणाची जबाबदारी असते व आपल्या पुणे महानगरपालिकेदरम्यान कुविख्यात वाद सतत सुरू असतो. यामध्ये बांधकाम व्यावसायिकांची काहीही भूमिका नाही, तरीही मला खात्री आहे की उन्हाळ्यामध्ये कमी पाणीपुरवठ्यामुळे काम थांबवले जाईल. माननीय सिंचन मंत्र्यांनी बांधकाम व्यावसायिकांनी स्वार्थीपणामुळे पाण्याचा वापर केल्यामुळे पाण्याची टंचाई झाल्याची टीका केली आहे, हे सगळे अतर्क्य आहे. लोकहो (बंधु आणि भगिनिंनो), बांधकाम व्यावसायिक याच शहराच्या नागरिकांसाठी घरे बांधतात व ते ही घरे केवळ पुणे महानगरपालिकेकडून किंवा एखाद्या सरकारी विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतरच बांधली जातात. ही परवानगी मिळावी यासाठी सरकारला भरपूर पैसे मोजावे लागतात व त्यातून सरकारने पाणीपुरवठ्यासारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित असते. असे असताना जनतेला होणाऱ्या पाण्याच्या टंचाईसाठी बांधकाम व्यावसायिकांना दोष कसा देता येईल, व सरकारचे जबाबदार मंत्री अशाप्रकारची विधाने करतात, हा माझ्या लेखाचा विषय आहे. त्याचवेळी हवेच्या प्रदूषणामुळे बांधकामस्थळांना कामे थांबवण्याच्या नोटीसा पाठवणे हा अशाच “व्यवसायास मारक ठरणारी धोरणे तयार करण्याचा” परिपाक आहे. प्रदूषणाला आळा बसलाच पाहिजे परंतु कुणीही खरोखरच बांधकामाच्या जागेवरून होणाऱ्या प्रदूषणाचे मोजमाप व त्याचे स्वरूप तपासले आहे का? कारण सीओ (कार्बन मोनॉक्साईड), सल्फर, शिसे व असे इतर घटक किंवा रसायने धोकादायक असतात व यापैकी काहीही बांधकाम स्थळावरून तयार होत नाहीत, हे स्थापत्य अभियंता म्हणून मी नक्कीच सांगू शकतो. होय, धूळ उडते परंतु तिचे प्रमाण नगण्य असते व ती ठराविक कालावधीत उडते व वर्षातून काही दिवसच होते, अर्थात ती देखील नियंत्रित करणे आवश्यक आहे हे नक्की परंतु बांधकाम थांबवणे व संपूर्ण शहरातील हवेच्या दर्जाचे खापर बांधकाम क्षेत्रावर फोडणे हे अतिशय संतापजनक, चुकीचे व अवैध आहे हा माझ्या लेखाचा विषय आहे.

    त्यात कहर म्हणजे कुणा सद्गृहस्थांनी हवेच्या प्रदूषणाविरुद्ध अहमदाबादच्या हरिद लवादाकडे तक्रार दाखल केली होती व आपल्या राज्यातील पर्यावरण विभागाने २ लाख चौरस फुटांपेक्षा अधिक बांधकाम-क्षेत्र असलेल्या पूर्ण परिसरातील प्रकल्पांसाठी आवश्यक असलेली ईसी म्हणजेच पर्यावरणविषयक मंजुरी देणे थांबवले, हा एक मोठा विनोद आहे. रिअल इस्टेटचा प्रत्येक प्रकल्प हा एकप्रकारे एक नवीन उद्योग असतो, त्यामुळेच  तुम्ही बांधकाम व्यावसायिकांना बंदुकीचा धाक दाखवून धारेवर धरू शकता. परंतु तुम्ही पुणे प्रदेशातील सर्व उद्योग का थांबवत नाही ज्यामुळे कोणत्या ना कोणत्या प्रकारे वायू व जल प्रदूषण होते हे नक्की. तुम्ही जवळपास ७० लाखांहून अधिक वाहनांना रस्त्यावर उतरण्यापासून का थांबवू शकत नाही ज्यातून दररोज शहराच्या हवेत कित्येक टन विषारी वायू सोडला जातो. या सगळ्या वाहनांचा आणखी एक दुष्परिणाम म्हणजे, त्यांचे मालक घरात राहू शकतात परंतु या वाहनांसाठी जमीन किंवा खुली जागा लागते जी ते झाडांकडून घेतात. ही ७५ लाख वाहने शहरातील नागरिकांसारखी आहेत व ती सतत कुठेतरी जात असतात व ती जिथे लावली जातात तिथे ती एखाद्या झाडाकडून जागा हिरावून घेतात जी आपण आपल्या कार लावण्यासाठी जागा मिळावी म्हणून झाडे तोडतो व परिणामी शहरातील हिरवे आच्छादन कमी होते, तसेच शहरातील हवेच्या प्रदूषणात भरच  पडते. त्यानंतर शहरातील व आजूबाजूच्या परिसरातील कचरा जाळण्याचा मुद्दा येतो जे अवैध आहे व तरीही वर्षभर केले जाते, जे हिंजेवाडीसारख्या उपनगरांमध्ये तसेच आता पुणे महानगरपालिकेच्या व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रात विलीन झालेल्या गावांमध्ये प्रदूषणाचे महत्त्वाचे कारण आहे. हे महानगरपालिकेकडून कचऱ्याचे पुरेसे संकलन होत नसल्यामुळे  व त्यावर प्रक्रिया करण्याच्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे होत आहे परंतु त्याची शिक्षा संपूर्ण शहराला व बांधकाम व्यावसायिकांना भोगावी लागते. शहरामध्ये लाखो आयटी पार्क, मॉल आहे जी वातानुकूलन यंत्रांचा वापर करतात ज्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील हवेचे तापमान लक्षणीयपणे वाढणे हेदेखील वायू प्रदूषणाच्या कारणांपैकी एक आहे; असे असेल, तर मग असे सगळे मॉल व आयटी पार्कही बंद करा, आपल्याला असे करता येईल का? शेवटचा परंतु महत्त्वाचे कारण म्हणजे, दिवाळी परंतु इतकेच नाही तर एखादी स्पर्धा जिंकली किंवा लग्न असेल किंवा कुणा भाईचा वाढदिवस असेल किंवा निवडणुकीचे निकाल असतील, तर शहरातील आकाश फटाक्यांच्या धुराने वेढले जाते. या प्रत्येक शोभेच्या फटाक्यातून बाहेर पडणारा धूर इमारतीच्या बांधकामातून हवेत सोडल्या जाणाऱ्या धुरळ्यापेक्षा कितीतरी अधिक प्रदूषित असतो, या शहरामध्ये फटाक्यांची विक्री थांबवण्यासाठी कुणी आदेश देणार आहे का, असा प्रश्न मला सरकारला विचारावासा वाटतो. सरकार वरीलपैकी कोणत्याही गोष्टी करत नाही (व करणारही नाही) कारण हे करण्याची हिंमत सरकारकडे नाही, हे सरकारला माहिती आहे व बळीचा बकरा बनवण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाचे मानगुट अगदी सहजपणे पकडता येते, त्यामुळे त्यांचे प्रकल्प थांबवायचे व तुम्हाला शहरातील स्वच्छ हवेची काळजी घेण्यात किती सक्रिय आहात हे दाखवायचे, लोकांनी आता हे समजून घेण्याची वेळ आता झाला आहे, हा माझ्या लेखाचा विषय आहे. तुम्ही हवेचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्या नियमांचे पालन करायचे याचा एक तर्कशुद्ध अभ्यास करा व धोरणे तयार करा व इमारतीच्या बाजूने मोकळी सोडायची जागा तसेच योजनेच्या आराखड्याला मंजुरी देण्यासंदर्भात इतर नियमांच्या बाबतीत केले जाते तसे यांचेही पालन केले जाईल याची खात्री करा, हे करण्याचा हाच योग्य मार्ग आहे. पुण्यातच नव्हे तर प्रत्येक शहरातील प्रत्येक गावामध्ये व शहरामध्ये हजारो अवैध घरे बांधली जात आहेत त्यांचे काय, ती कोण थांबवणार आहे. ती केवळ प्रदूषणच वाढवत नाहीत तर केवळ त्यांच्या अस्तित्वाने संपूर्ण शहर प्रदूषित करतात, आपण त्या संदर्भात काय करत आहोत, रिअल इस्टेटमधील सध्याच्या व्यावसायिकांनी हा प्रश्न सरकारला विचारायची वेळ आली आहे.

     शहरातील वायूप्रदूषणाचे खरे कारण काही बांधकाम स्थळावरील सुरू असलेले बांधकाम नसून तर वाहनांची धोकादायकपणे वाढलेली संख्या व त्यातून बाहेर पडणारा धूर, अतिशय वाईट सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ज्यामुळे नागरिकांना त्यांची खाजगी वाहने वापरणे भाग पडते, दुसरे म्हणजे शहरात व शहराभोवती असलेले लहान व मोठे उद्योग व बांधकामाद्वारे विकास शुल्काच्या व नोंदणी शुल्काच्या व जीएसटीसारख्या करांच्या स्वरूपात अधिक पैसे मिळण्यासाठी सरकारने दिलेले अतिशय जास्त प्रमाणात दिलेले (म्हणजे हव्यासापोटी) एफएसआय ज्यामुळे शहरातील हिरव्या झाडांचे आच्छादन कमी होत चालले आहे. सरकारला रिअल इस्टेटकडून पैसा हवा असतो परंतु रिअल इस्टेटमधील प्रक्रियांची काळजी घेण्याची जबाबदारी नको असते; हा माझ्या लेखाचा विषय आहे. त्याचवेळी, लाखो लोक जगण्यासाठी एखाद्याच  शहरामध्ये किंवा प्रदेशामध्ये स्थलांतर करत असतात, तेव्हा त्यामुळे त्या शहराच्या पायाभूत सुविधांवर परिणामच होतो व त्यामुळेही सरतेशेवटी प्रदूषण वाढते, आता या स्थलांतरासाठी कोण जबाबदार आहे तर अर्थातच सरकार जबाबदार आहे. बांधकाम व्यावसायिकांनी या स्थलांतरितांसाठी घरे बांधणे अपेक्षित आहे, परंतु त्यांना वायू प्रदूषणासाठी दोष दिला जातो, हे भारीच  आहे! माफ करा, मी बांधकाम व्यावसायिक असल्यामुळे किंवा बांधकाम व्यावसायिकांना मदत करत असल्यामुळे लिहीत नाही, तुम्ही स्वतःचे डोके लावून वाचा व त्यावर विचार करा व त्यानंतर तुमच्या शहरातील वायू प्रदूषणाचे किंवा पाण्याच्या टंचाईसारख्या समस्यांचे कारण शोधा, व त्यानंतरही माझे म्हणणे चुकीचे आहे असे तुम्हाला वाटत असेल तर मग माझ्या शब्दांकडे दुर्लक्ष करा.  तुम्ही आज पाण्याच्या टंचाईमुळे बांधकाम थांबवत आहात व बांधकाम व्यावयिकांनी इमारतींना पाणी पुरवठा करावा असे प्रतिज्ञापत्र त्यांच्याकडून घेत आहात ज्यांना सरकारनेच मंजुरी दिली आहे व एकप्रकारे सरकार त्यांचे भागीदार आहे; उद्या सरकार बांधकाम व्यावसायिकांना रहिवाशांना ऑक्सिजनही द्यायला सांगू शकते कारण सरकार नागरिकांना स्वच्छ हवा पुरवण्यात अपयशी ठरलेले आहे, आता यापुढे काय? खरे तर  झाडांचे आच्छादन वाढवा, शहरात व भोवताली हरित पट्टे तयार करा, खाजगी वाहनांची गरज कमी होण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सशक्त करा, नागरी विकासाचे कायदे योग्य प्रकारे करा व पाण्याचा प्रत्येक थेंब वापरण्याचा प्रयत्न करा, नैसर्गिक जलस्रोत वाचवण्याचा प्रयत्न करा, सर्व उद्योगांचे अशा ठिकाणी स्थलांतर करा जिथे त्यांचे प्रदूषण नियंत्रित करता येईल व इतरही अशा बऱ्याच गोष्टी आहेत.  आता जनतेने सरकारला ते स्वच्छ हवा पुरवण्यात अपयशी ठरल्याबद्दल केवळ एका उद्योगक्षेत्राला दोष देण्याऐवजी जाब विचारण्याची वेळ आली आहे, कारण प्रिय नागरिकांनो तुम्ही सरकारमधील शासनकर्त्याला निवडून आणले आहे तुमच्या आरामासाठी एखाद्या उद्योजकाला नाही हे लक्षात ठेवा व त्यानुसार कृती करा नाहीतर एक दिवस तुम्ही आराशात स्वतःकडेच पाहून आपल्या नाशासाठी बोट दाखवत असाल असा इशारा देऊन निरोप घेतो!

Will be happy to assist in any possible way on the subject! 

smd156812@gmail.com / 09822037109

 संजय देशपांडे

www.sanjeevanideve.com / https://junglebelles.in/























 






Tuesday, 14 January 2025

वाघ,पर्यटक,वनविभाग आणि न्यायसंस्था 🐾

 





































वाघ,पर्यटक,वनविभाग आणि न्यायसंस्था 🐾

“बंदिस्त वर्गात बसून व तुमचे लॅपटॉप उघडून तुम्हाला जंगल समजत नाही, ती अशी एक शाळा आहे जिथे केवळ हजर राहूनही तुम्हाला खुप काही शिकता येते” … मी.
 
उमरेड कऱ्हांडला; 
माननीय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश महोदय,

        तीन दिवसांपूर्वी माझ्या एका व्हॉट्सअपग्रुपवर एक व्हीडिओ क्लिप आली त्यामध्ये एका ग्रूपने "ताडोबा जंगलामध्ये एक वाघ त्याच्या पाच बछड्यांसोबत दिसल्याचे दुर्मिळ दृश्य" असे नमूद केले होते. मी ते जंगल पाहिले व ताडोबातील ताज्या घडामोडी थोड्याफार माहिती असल्यामुळे हे ताडोबा नसून टिपेश्वर किंवा उमरेड कऱ्हांडला अभयारण्य असावे असे सांगितले. त्यानंतर अनेक लोकांनी तसेच विविध टॅग केलेल्या ग्रूपकडून ती क्लिप मला पाठवण्यात आली व समाजमाध्यमांवर ती अनेकजणांनी पाहिली. गम्मत म्हणजे, या क्लिपवरून नंतर भरपूर गदारोळ झाला ज्यामुळे संबंधित गाईड, चालक तसेच अगदी पर्यटकांवरही कारवाई करण्यात आली. आज तर हद्द झाली, मी एक बातमी वाचली ज्यामध्ये उच्च न्यायालयाने आपणहून या घटनेची दखल घेत राज्याच्या मुख्य वन संरक्षकांना यात लक्ष घालण्यास व घटनेविषयी एक अहवाल देण्यास सांगितले आहे,असे कळते !

माननीय न्यायाधीश महोदय, मी पूर्णपणे आदर राखत असे सांगतो की मी चुकीच्या वन्य पर्यटनाला पाठिंबा देत नाही. परंतु कृपया वाघाचा रस्ता अडवण्याविषयी किंवा संपूर्ण वन्य पर्यटनाविषयी केवळ एका ध्वनीचित्रफितीवरून निष्कर्ष काढू नका अशी माझी विनंती आहे. वन्य पर्यटनाविषयीचे मत समाज माध्यमांवरील काही अहवाल, छायाचित्रे, ध्वनीचित्रफिती यावरून तयार करता येत नाही. त्यासाठी तुम्हाला विविध जंगलांमध्ये बरेच फिरावे लागते, तेथल वस्तुस्थिती व अडचणी, रहिवासी , प्राणी,वनस्पतिविषयी समजून घ्यावे लागते व त्यानंतरच तुम्ही निर्णय घ्या, एवढीच माझी विनंती आहे. वस्तुस्थिती तर अशी आहे की हे सगळे प्रकार माननीय सर्वोच्च न्यायालयाच्याच एका  (न्यायालयाविषयी आदर राखत हे मत व्यक्त करत आहे) निकालामुळे  सुरू झाले! या निर्णयामुळे अभयारण्य किंवा व्याघ्र प्रकल्पांचे वन्य पर्यटन क्षेत्र ८०% नी कमी झाले व केवळ २०% क्षेत्र पर्यटनासाठी खुले ठेवण्यात आले, त्यात भर म्हणजे आपल्या सरकारच्या पर्यटन विभागाचे पर्यटनाचे मार्केटिंगहे   विपणनही व्याघ्र केंद्रित असते (एमटीडीसीच्या ताडोबाविषयीच्या जाहिराती पाहा). परिणामी, जंगलांना भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वाघच पाहायचा असतो व तुमच्या स्वतःच्या निर्णयामुळे सर्व पर्यटकांची जंगलाच्या मर्यादित भागामध्ये गर्दी झाली आहे, त्यामुळे याविषयी विचार करा. याचा अर्थ सगळे काही बरोबर व अचूक आहे असा होत नाही कारण आपण वन्य पर्यटनाच्या बाबतीत अनेक आघाड्यांवर सुधारणा करू शकतो, जसे की वनविभागाला आवश्यक त्या पायाभूत सुविधा तसेच संबंधित व्यक्तींना योग्य प्रशिक्षण व इतरही अनेक गोष्टी करु शकतो. याविषयी माझे तपशीलवार मत लिहीनच, मात्र  तुम्हाला वन्यजीवनाविषयी खरोखरच काळजी असेल तर एक अति महत्त्वाची व्यक्ती म्हणून नव्हे तर एक सामान्य पर्यटक म्हणून जंगलाला भेट द्या व त्यानंतर निर्णय कुठलेही घ्या कारण जंगलाचे भविष्य आता तुमच्याच हातात आहे, (अजूनही बऱ्याच गोष्टी  व्हायच्या आहेत) ...! धन्यवाघ !!🙏🏻
 
मी वॉट्सॲप ग्रूपपैकी काहींवर वरील संदेश पोस्ट केला, जी मी जेव्हा आजचे वर्तमानपत्र उघडले (०७-०१-२५) व वरील घटनेविषयी बातमी वाचली, तेव्हा माझी तात्काळ प्रतिक्रिया होती (म्हणजेच प्रस्टेशन होती). 

 जे लोक अजूनही अशा गोष्टींविषयी अनभिज्ञ आहेत अशा सुखी जीवांसाठी म्हणून सांगतो, की आपल्या राज्यात विदर्भातील उमरेड कऱ्हांडला अभयारण्यामध्ये पाच बछडे असलेल्या एका वाघीणीचा मार्ग सफारीसाठी वापरल्या जाणाऱ्या जिप्सींनी अडवला (?.) , असा आरोप असलेल्या  या घटनेची दृश्ये/ध्वनीचित्रफित समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. बहुतेक लोकांना हे ठिकाण उमरेड कऱ्हांडला अभयारण्य आहे हे माहितीही नव्हते किंवा त्याचाशी काही घेणेदेणे नव्हत !कारण तो संदेश ताडोबाच्या नावानी फिरत होता. याचे कारण म्हणजे #ताडोबा हे #उमरेड कऱ्हांडलापेक्षा जास्त जण पाहतात,  जेथे ही घटना घडली, फक्त  #tadoba टाका पोस्ट करा, ती लगेच ट्रेंड होते. ध्वनीचित्रफित व्हायरल होण्याचा मुद्दा नाही तर त्याला मिळणाऱ्या लाइकचा  मुद्दा आहे ज्या  केवळ समाज माध्यमांकडूनच (नेटकऱ्यांकडून) नव्हे तर सगळ्या यंत्रणेकडून दिली जाते. नेहमीप्रमाणे त्याचा फटका निर्दोष  लोकांना बसला, मी असे म्हणणार नाही की ते अगदी बरोबरच होते पण हे लोक  नक्कीच एकमेव दोषी नव्हते, हा माझ्या लेखाचा विषय आहे (म्हणजे उद्विग्नतेचा). त्याचवेळी माननीय उच्च न्यायालयाच्या कुणा न्यायाधीशांनी आपणहून दखल घेतली आणि याची याचिका दखल करून घेतली . व त्यावरून त्यांनी वन संरक्षकांना या प्रकरणाची चौकशी करून, दोन दिवसात स्पष्टीकरण देण्यास सांगितले (बातमीनुसार). 

आता न्यायालयाविषयी पूर्णपणे आदर राखून असे विचारावेसे वाटते की दोन दिवसात न्यायालयाला काय स्पष्टीकरण अपेक्षित आहे, की वन्यजीव पर्यटन चुकीचे आहे व वाघीणीचा तिच्या बछड्यांसोबत मार्ग अडवण्यात आला किंवा त्यांचा छळ झाला व आणखी काही? केवळ एक ध्वनीचित्रफित व्हायरल काय होते, तुम्ही अख्ख्या वन्यजीव संरक्षण यंत्रणेला धारेवर धरता, यामुळे वनविभाग व एकूण वन्य संवर्धनाच्या आघाडीवर सगळीकडे सावळा गोंधळ आहे.असा संदेश समाजात जातो ! हा आपल्या संपूर्ण यंत्रणेचा दृष्टिकोनच (माध्यमांचाही) यासाठी जबाबदार आहे किंवा वन्य संवर्धनातील अडथळा आहे असा माझा आरोप आहे जो मी माझी विवेकबुद्धी जागृत ठेवून करतोय! आणि थोडेफार जंगलामध्ये मी सुद्धा फिरलो आहे, त्या क्लिप मध्ये ती वाघीण चिडली आहे किंवा बावचळून गेलीय असे काहीही दिसत नाही! जंगलातील अरुंद रस्त्यांवर कॅमेराचा कोन आणि वाघिणीचा चालण्याचा स्पिड,  गाड्यांचे अंतर, अशा अनेक गोष्टी ठरवितात की खरच प्राण्यांना त्रास झाला का नाही! हे सगळे तपासुन मगच मत व्यक्त करावे ही अपेक्षा!
 
जेव्हा संपूर्ण जगात वाघांची संख्या कमी होत होती व ही प्रजाती केवळ आपल्या देशातच नव्हे तर जगातच नामशेष होण्याच्या मार्गावर होती तेव्हा आपल्याच वनविभागामुळे व वन्य पर्यटनामुळे वाघांची  संख्या वाढणे शक्य झाले. ताडोबाच्या जंगलांभोवती असलेल्या गावांमध्ये, जेथे वाघांच्या संख्येची घनता (प्रति चौरस किलोमीटर वाघांची संख्या) सर्वाधिक आहे, जी जागतिक सरासरीपेक्षा कितीतरी पट जास्त आहे, तिथे माननीय न्यायलयाने विचार केला आहे का की तेथे  तिथे राहणारे लोक वाघांचा तिरस्कार न करता स्वतःच्या तसेच त्यांच्या गुराढोरांच्या जिवावर उदार होऊन वाघांचे  रक्षण करतात, हे केवळ योग्य वन्य पर्यटनामुळे शक्य होते. त्यांना माहिती आहे की वाघ वाचले तरच त्यांना पैसे मिळतील व त्यांचे आयुष्य सुधारेल. यात त्यांचा काय दोष आहे, कारण गावातील  संपूर्ण कुटुंबच वाघावर अवलंबून आहे,घरातील  मुलगा जवळपासच्या रिसॉर्टमध्ये काम करतो, आई एखाद्या ढाब्यावर किंवा हॉटेलात स्वयंपाकाचे काम करते, कुटुंबातील पुरुष एकतर गाईड आहेत किंवा वन-मजूर आहेत किंवा जिप्सीचे चालक किंवा एखाद्या रिसॉर्टमध्ये मदतनीस आहेत. एखाद्या कुटुंबाचे प्रवेशद्वारापाशी किंवा गावातील रस्त्यावर  छोटेसे सुव्हेनिअर वस्तूंचे विक्रीचे दुकान आहे. व्याघ्र प्रकल्पांच्या भोवती राहणाऱ्या अशा हजारो लोकांची उपजीविका फक्त वाघांना पाहायला येणाऱ्या पर्यटकांमुळे चालते. माननीय न्यायालयाला मला असे सांगावेसे वाटते की, मला त्या संगळ्यांचे चूक वाटत नाही काही कारण  जेव्हा तुम्ही हजारो रुपये वाघ पाहण्यासाठी खर्च करता तेव्हा त्याच पैशांवर वाघही जगत असतो ही वस्तुस्थिती आहे, तुम्ही आता ही वस्तुस्थिती समजून घेण्याची वेळ झाली आहे कारण तुम्ही वन्य पर्यटनाचे हे गणित समजून घेतले व त्याचा आदर केला तरच समाज यंत्रणाही ते समजून घेईल व त्याचा आदर करेल, वाघांचे संरक्षण करण्याचा हा एकमेव मार्ग आहे, हे सांगणे हाच माझ्या लेखाचा उद्देश आहे.
 
मात्र वाघाचा किंवा कोणत्याही वन्य प्राण्याचा मार्ग अडवणे व त्याला त्रास होईल असे वर्तन   योग्य नाही, पण मुळात हे का होत आहे यामागची कारणे व त्यावर मार्ग शोधणे आवश्यक आहे.न्यायाधीश  महोदय, पुण्यासारख्या शहरातही जेथे तथाकथित सुशिक्षित व सुजाण लोक राहतात, पण साधे वाहतुकीच्या नियमांचे पालन करत नाहीत व हेच लोक पर्यटक असतात जे वाघ पाहण्यासाठी उमरेड कऱ्हांडला किंवा ताडोबा किंवा मेळघाटात जातात. तुम्हाला काय वाटते त्या जिप्सीतील चालकांना व गाईडना ते कशासाठी आग्रह करत असतील तर नियम मोडा व त्यांना वाघ दाखवा यासाठी, हीच समस्या आहे. जंगलातील लोकांवर निर्बंध घालण्याऐवजी किंवा त्यांना शिक्षा करण्याऐवजी हे लोक जंगलांना का भेट देत आहेत व त्यांना जंगलात काय करू नये व त्यांनी जंगलातील लोकांना नियमभंग करण्यासाठी भरीस पाडले तर त्यांनाच कसा त्रास होई याची या पर्यटकांना जाणीव करून द्या. वन्य पर्यटनाची हीच खरी  योग्य पद्धत आहे, व तुमच्याकडून हेच अपेक्षित आहे. त्याचवेळी एकट्या पुणे शहरात काही  हजार वाहतूक पोलीस आहेत , ते वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या लोकांना आवरू शकत नाहीत अशावेळी केवळ काहीशे कर्मचारी असलेला वनविभाग हजारो चौरस किलोमीटर क्षेत्र असलेल्या जंगलांचे व त्यातील लोकांचे कसे व्यवस्थापन करेल. म्हणूनच मायबाप सरकारला वन विभागामध्ये योग्य पायाभूत सुविधांसाठी निधी द्यायला सांगा, हा पण माझ्या लेखाचा विषय आहे.
 
जंगलाशी संबंधित व त्यामध्ये काम करणाऱ्या लोकांनीही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुम्ही जर पर्यटकांच्या हव्यासाला किंवा दबावाला बळी पडलात तर तुमचेच भवितव्य धोक्यात येईल. कल्पना करा, तुम्ही शहरामध्ये एक ओला/उबर टॅक्सी चालकाला  आहात व तुमचा ग्राहक कितीही घाईत असला तरीही, त्याच्या किंवा तिच्या दबावामुळे तुमचा जीव धोक्यात घालून तुम्ही रेल्वेचे फाटक किंवा लाल सिग्नल ओलांडून जाल का? याचे उत्तर नाही असे आहे, तर मग तुम्ही लोक जंगलामध्ये अशा गोष्टी का करता, हा प्रश्न मी तुम्हा सर्वांना विचारेन. त्याचप्रमाणे, तुम्ही जेव्हा सफारीमध्ये असता तेव्हा तुम्ही हे का करताय याची अगदी स्पष्ट कल्पना असू द्या, पैसे मिळवण्यासाठी हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे परंतु ते पैसे वन्य पर्यटनावरच निर्बंध आले तर नाहीसे होतील, बरोबर? किंबहुना सफारीमध्ये सेलफोनवर कमी बोला, पर्यटकांना वाघ व सर्व वन्य जीवन नैसर्गिकपणे जसे दिसेल तसे पाहू द्या. त्यातच खरी मजा आहे, वन्यजीवनाचा हा पैलू त्यांना समजून सांगा. माननीय न्यायालयाने, अशा गोष्टी घडण्यासाठी वन विभाग जंगलाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीसाठी योग्य प्रशिक्षण देत असल्याची खात्री करेल हे पाहावे. वन विभागामध्ये अनेक चांगले अधिकारी आहेत ज्यांनी त्यांचे आयुष्य, त्यांचा कौटुंबिक वेळ वन संवर्धनासाठी खर्ची घातला आहे. आपल्या यंत्रणेच्या अशा दृष्टिकोनामुळे त्या सर्वांचे खच्चीकरण होईल व वन्यजीवनाचा तो अतिशय मोठा तोटा असेल, हाच माझ्या लेखाचा विषय आहे असे मला पूर्णपणे आदर राखून म्हणावेसे वाटते.

कृपया वन्यजीवन समजून घ्या, एक सामान्य माणूस म्हणून जंगलांना भेट द्या, तिथल्या लोकांना भेटा व त्यांच्या समस्या समजून घ्या व त्यानंतर इथल्या वन्यजीवनाविषयी व पर्यटनाविषयी निर्णय द्या. आणि हो, जंगलाबाहेरील रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांमध्ये हजारो वन्यप्राणी मरण पावतात त्यासाठी काहीतरी करा, त्यासंदर्भात कुणीच काहीच करत नाही. किंबहुना मी म्हटल्याप्रमाणे देशातील सर्व जंगले योग्य पायाभूत सुविधा देऊन खुली करा व सगळ्यांना खऱ्या जंगलांचा आनंद घेऊ दे, आपल्या देशाला जो निसर्गाचा समृद्ध ठेवा लाभलेला आहे जो जपून ठेवण्याचा हा एकमेव मार्ग आहे व फार उशीर होण्याआधी न्यायपालिकेनेच हे करण्याची वेळ आता आली आहे. अन्यथा केवळ वाघच नाही तर अनेक सुंदर प्रजाती केवळ समाज माध्यमांवर, केवळ आभासी जगातच उरतील, असा इशारा देऊन निरोप घेतो!..🐾🐾

संजय देशपांडे 

Sanjeevani developers 

www.sanjeevanideve.com   

www.junglebelles.com













 










Wednesday, 8 January 2025

डी एन पी एक खुबसुरत रेगिस्थान !

                                                      

                                                        





































डी एन पी एक खुबसुरत रेगिस्थान !

“चाहे आप किसी अखाड़े में हों या रेगिस्तान में, जीवा रहने की लडाई के नियम हमेशा एक जैसे होते हैं”… बेयर ग्रिल्स

 “जंगल में आपको एहसास होता है कि लोगों के पास जीवित रहने के लिए कितनी कम उपलब्धीया  हैं”......मैं स्वयं 

ब्रिटिश खोजकर्ता, लेखक, टेलीविज़न होस्ट और पूर्व एसएएस ट्रूपर एडवर्ड माइकल "बेयर" ग्रिल्स ओबीई अस्तित्व पर एक विशेषज्ञ हैं। और जब बात रेगिस्तान की आती हो, जहां अस्तित्व ही एक ऐसी चीज है जिसके इर्द-गिर्द सारा जीवन घूमता है, तो ग्रिल्स के उपरोक्त शब्द मेरे जेहन में आते हैं, क्योंकि उनके जैसे लोगों ने ऐसे वातावरण में रहने का अनुभव किया है जो कई लोगों के लिए जीवन है!

और फिर वे शब्द हैं जो मेरे मन में तब आए जब मैंने खुद को ग्रिल्स की जगह पर रखा, भले ही मैं वास्तव में बहुत अधिक आरामदायक और मज़ेदार हूं। ग्रिल्स के शब्द और मेरे शब्द थोड़े अलग हो सकते हैं, लेकिन हमारी भावनाएँ एक जैसी हैं, जैसे कि जब मैंने DNP को उसकी पूरी तरह से देखा में देखा तो पहली चीज़ जो मन में आई: लोग यहाँ कैसे रह सकते हैं?

जब मैं सफारी के लिए सुबह 6 बजे उठा तो मैंने महसुस किया  कि हर जगह और हर दिशा से ठंड दी है यथा , यह दिसंबर का दूसरा सप्ताह था, और उत्तर पूर्वी राजस्थान की प्रसिद्ध सर्दी दरवाजे पर दस्तक दे रही थी। मेरी पहली यात्रा दिन के दोपहर में थी, इसलिए मुझे ठंड का ज्यादा एहसास नहीं हुआ, लेकिन मैं इससे अच्छी तरह वाकिफ था। डेजर्ट नेशनल पार्क के सर्दियों में आपका स्वागत है!

इससे पहले कि मैं डीएनपी के बारे में कुछ भी चर्चा करूं, मैं आपको इसके बारे में कुछ ऐसी बातें बताना चाहता हूं जो आपको गुगल  पर नहीं मिलेंगी: सैकड़ों लोग इस जगह को  अनदेखा कर देते हैं, भले ही यह पार्क के गेट या उस स्थान से लगभग तीस किमी दूर हो जहां हम रह रहे थे! मैं लंबे समय से डीएनपी के बारे में जानता एवं पढा था, लेकिन दो चीजें मुझे वहां जाने से रोक रही थीं: पहली, पुणे की अन्य जगहों से फ्लाइट के अजीब कनेक्टिविटी के कारण ये जगह थोडी हटके  अजीब है और दूसरी, मैं ठंड बर्दाश्त नहीं कर सकता। हम मुंबई से जैसलमेर के लिए उड़ान भरकर पहली समस्या से निपटने में तो कामयाब हो गए, लेकिन दूसरा यह है कि सर्दी ही डीएनपी की यात्रा के लिए अच्छा समय है। राजस्थान अपनी गर्मी के लिए जाना जाता है, लेकिन सर्दी भी उतनी ही कठिन है, खासकर साल के इस समय के दौरान, जो दिसंबर के मध्य में होता है! लेकिन मुझे पता था कि अगर मुझे जीआईबी (ग्रेट इंडियन बस्टर्ड) देखना है और साथ ही डीएनपी के असली जंगल का अनुभव भी करना है तो मुझे सर्दियों में ही वहां जाना होगा। आखिरकार मेरे अंदर का वन्यजीवन जीत गया (हमेशा की तरह) और मैं रेत, झाड़ियों, सूखी घास और ठंड के बीच जिप्सी में सवार था जिसे मैं शक्षम बयां नहीं कर सकता!
जब आप साम गांव की ओर से डीएनपी में प्रवेश करते हैं तो दो चीजें आपको पुरी तरह प्रभावित करती हैं, जो इसका मुख्य प्रवेश द्वार है, एक इसका अंतहीन विस्तार और कंपकंपा देने वाली ठंड! पीली रेत और सूखी घास से ढकी सतह पर सब कुछ मृत प्रतीत होता है, लेकिन धीरे-धीरे जब आकाश में लाल नारंगी सूर्य उदय होता है, तो आप धीरे-धीरे अपने चारों ओर जीवन को देखना और महसूस करना शुरू कर देते हैं - यही डीएनपी है!

आकाश लाल और नारंगी रंग के कैनवास जैसा है, जिसमें पक्षियों के झुंड इसे काले और भूरे रंग से रंगते हैं। उनके चहचहाने की आवाज़ हवा में भर जाती है, जब आप अचानक पंखों की फड़फड़ाहट देखते हैं जब एक चील ऊंची उड़ान भरती है या एक लैगर बाज़ अपने शिकार को पकड़ने के लिए नीचे गोता लगाता है जो हमारी मानवीय आँखों के लिए अदृश्य होता है और आप देख सकते हैं कि रेगिस्तान कितना जीवंत प्रतीत होता हैं|

दुनिया में हर जगह जीवन कठिन है, और आराम कुछ चुनिंदा लोगों के ही  मुनासिब  लिए है। हालाँकि, DNP जैसी जगहों पर, जहाँ मौसम अन्य जगहों की तुलना में कठोर है - उदाहरण के लिए, सर्दियों से गर्मियों तक तापमान चार से पचास डिग्री के बीच उतार-चढ़ाव करता है - हर दिन लोगों और वन्यजीवों दोनों के लिए जीवित रहने के लिए संघर्ष करना पड़ता है।
और ऐसे आवास में ग्रेट इंडियन बस्टर्ड, डेजर्ट कैट, डेजर्ट फॉक्स जैसी कुछ सबसे लुप्तप्राय, लगभग विलुप्त प्रजातियाँ जीवित रहती हैं और ऐसी कई प्रजातियाँ हैं जो इस रेगिस्तान को अपना घर बनाती हैं! यह हमारी जिम्मेदारी है कि हम इन अंतिम बचे हुए आवासों को संरक्षित करने के लिए हरसंभव तरीके से अपने शक्तिनुरूप योगदान दें, जो उन जीवों के लिए घर के रूप में काम करते हैं जिनकी उपस्थिति इन रेगिस्तानों को बनाए रखती है!

जैसा कि मैंने पहले उल्लेख किया है, खराब मौसम सबसे बड़ा दुश्मन है, और जानवरों और पक्षियों के साथ-साथ सबसे विकसित प्रजाति, मनुष्यों के लिए, जिनके पास पालतू जानवरों या खेती से आय के बहुत कम स्रोत हैं उनके लिए भी जीवन कठिन है ।
मैं मूसा खान के होमस्टे में सीमित संसाधनों और रहने की सामान्य सुविधा के साथ रह रहा था| उस कड़ाके की सर्दी में सुबह 4 बजे ही वहां काम करने वाले लड़के जाग जाते थे और हमारे लिए चाय बनाते थे। यह देखकर बहुत खुशी हुई कि इस्माइल वहाँ काम करने वाले लड़कों में से एक था और ऐसी विषम परिस्थितियों में भी उसके हमेशा मुस्कुराते चेहरे और हर समय सहायता करने के लिए उसकी तत्परता को देख मैं उसका कायल हो गया हूँ !

मूसा जैसी जगहों के साथ समस्या यह है कि उन्हें नहीं पता कि वहा आनेवाले यांत्रिगण  भविष्य में भ्रमण पर कितना पैसा खर्च करेंगे या अपने यात्रा के दौरान रिसॉर्ट पर रहेंगे भी या नहीं। चूँकि यह स्थान किसी भी रिसॉर्ट से संबद्ध नहीं है, उत्साही वन्यजीव उत्साही लोगों को छोड़कर, पर्यटक यहां आने से बच सकते हैं! अगर मुसाभाई तक अगर यह  जानकारी पहुँचती है तो उनको मेरी सलाह यह है कि आप अगर पांच सितारा जैसी विलासिता नहीं दे सकते हैं, लेकिन यदि आप जगह को बढ़ावा देना चाहते हैं तो बाथरूम  और खाने की जगह को और जादा  साफ और अच्छी स्थिति में रखना होगा।

मसाले के मामले में भी भोजन शहर के लोगों के अनुरूप होना चाहिए! फिर भी मूसा जैसे लोग डीएनपी के लिए अपने तरीके से समर्पित रूप से काम कर रहे हैं क्योंकि कम पर्यटक निर्भरता के साथ वन्यजीवन जैसे व्यवसाय में बने रहने की हिम्मत करना और मनोरंजन या मनोरंजक पर्यटन जैसे रेगिस्तान सफारी या जैसे कि बस आरामदेह रहने की जगह पर ध्यान केंद्रित करने जैसे कमाई के अधिक लाभदायक तरीकों को छोड़ना आसान नहीं है। मूसा खान और उनके भाई सिकंदर को सलाम, जो लंबे समय से डीएनपी में समर्पित रूप से वन्यजीवों की देखभाल कर रहे हैं!

सभी वन्यजीव टूर ऑपरेटरों को सलाह देना चाहता हूँ, कृपया अपने नए बुकिंग क्लाइंट के साथ सफारी पर जाते समय अपने फोन का उपयोग करने से बचें। ऐसा इसलिए है क्योंकि, मैं व्यवसाय में राजस्व के महत्व को समझता हूं, आपके व्यवसाय को संचालित करने का एक तरीका है जिसे व्यावसायिकता कहा जाता है, और लेकिन यह वास्तविक वन्यजीवन को बहुत परेशान करता है।

यह कुछ ऐसा है जो मैंने देश के जंगलों में असंख्य गाइडों और ड्राइवरों के साथ देखा है। वे चल रही सफारी के दौरान नए आरक्षण के लिए कॉल का जवाब देने में बहुत व्यस्त रहते हैं, जो उन पर्यटकों के लिए अच्छा नहीं है जो आपके साथ हैं और आपका ध्यान चाहते हैं जिसके लिए उन्होंने आपको भुगतान किया है। अगर आप इसे पढ़ रहे हैं तो कृपया ध्यान दें!

डीएनपी के वन्यजीवों की बात करें तो आपको देश के ज़्यादातर जंगलों में पाए जाने वाले कोई भी जानवर यहा नहीं मिलेंगे, जैसे कि बाघ, तेंदुआ, गैंडा, हाथी या फिर गोल्डन मकॉक जैसे बंदर ! इसके बजाय, आपको शुरू में रेत, कंटीली झाड़ियाँ, सूखी घास और आसमान के अलावा कुछ नहीं दिखेगा - यहाँ तक कि कोई जलाशय भी नहीं।
और आपको एहसास होता है कि यहां प्रकृति कितनी मज़ेदार है, जब मूसा की ज्ञानपूर्ण आंखें, दूरबीन की सहायता से, आपको चीजें दिखाना शुरू करती हैं!

इसके अलावा, डीएनपी अद्वितीय है क्योंकि, अगर देश में 3,000 से ज़्यादा बाघ हैं, तो देश और संभवतः पूरी दुनिया में सिर्फ़ 200 (हाँ, आपने सही पढ़ा) जीआईबी बचे हैं। और बाघ 300 किलो का होता है और 12 फ़ीट लंबा होता है, जबकि जीआईबी एक ऐसा पक्षी है जिसके पंख 5 से 6 किलो वजन के होते हैं और यह बाघ के आकार का 1/10वाँ हिस्सा होता है।अब आप कल्पना कर सकते हैं कि जंगल में जीआईबी को देख पाना  कितना मुश्किल होगा।और यह भी मेरी एक और प्रेरणा थी कि राजस्थान के वन विभाग के महान प्रयासों के लिए उचित सम्मान के साथ जीआईबी को डोडो (कृपया गूगल) बनने से पहले देखना, फिर भी यहां इन कुछ जीवित जीआईबी पर खतरा खत्म नहीं हुआ है, यह एक सच्चाई है!

विडंबना यह है कि संबंधित विभाग (बिजली या अन्य) ने लाखों रुपये का निवेश किया है और इन क्षेत्रों के माध्यम से जीआईबी और अन्य उड़ने वाले पक्षियों को मोड़ने के प्रयास में इन बिजली लाइनों पर रिफ्लेक्टर लगाए हैं, जिससे स्थानीय लोगों के अनुसार मामला और भी बदतर हो गया है, क्योंकि परावर्तित सूर्य की किरणें पक्षियों की उड़ान योजनाओं को अधिक भ्रम पैदा करती हैं और जटिल भी बनाती हैं। और अपने भारी शरीर के  बतौर जी आय बी जावा ऊंची उडान नही भर पाता और उसकी नजर भी बाकी पंछीयां की तुलना मे कमजोर है . 
 और कि जीआईबी सालाना केवल दो या तीन अंडे खुले मैदान में देता है, जिससे इन पक्षियों को संरक्षित करना अधिक कठिन हो जाता है क्योंकि अंडे कई खतरों और क्षति के प्रति संवेदनशील होते हैं। जीआईबी को छोड़कर, यहाँ कई शिकारी पक्षी हैं जैसे हैरियर, बाज़ और चील, साथ ही घास के मैदान के पक्षी - यह वास्तव में पक्षी प्रेमियों का स्वर्ग है! रेगिस्तानी लोमड़ी और कई अन्य के साथ, रेगिस्तानी बिल्ली भी निवास स्थान के नुकसान के कारण एक लुप्तप्राय प्रजाति है।

मुझे हैरानी इस बात पर है कि एक तरफ हमारी सरकार बाघ और बाघ जैसी प्रजातियों को बचाने के लिए बहुत सारा पैसा और जनशक्ति खर्च करती है, वहीं दूसरी तरफ वह इन जानवरों के आवासों के आसपास बिजली की लाइनें, बांध, नहरें, रेलमार्ग, राजमार्ग और खदानें जैसी बाधाएं खड़ी करती है। इसका क्या मतलब है और क्या हमारे माननीय प्रधानमंत्री संरक्षण के इस पहलू पर गौर करेंगे जहां रक्षक ही वन्यजीवों को नष्ट कर रहा है?

धनाना उस मार्ग का अंतिम गांव या समुदाय है जहां सीमा सुरक्षा बल की चौकी है, और यह डीएनपी के प्रवेश द्वार से पाकिस्तानी सीमा तक लगभग 50 किलोमीटर दूर है। मैं वहां गया और चौकी पर तैनात सैनिकों को कुछ उपहार दिए, और उन्होंने सहर्ष इसे स्वीकार किया और हमसे बात की, लेकिन उन्होंने सुरक्षा कारणों से हमारी तस्वीर लेने से विनम्रतापूर्वक इनकार कर दिया, भले ही उन्होंने हमें चेकपोस्ट पर तस्वीरें लेने की अनुमति दी थी!

डीएनपी की सुंदरता यह है कि यह पाकिस्तान मे भी फैला हुआ है और पक्षी, ऊंट और ऐसी सभी प्रजातियां देश की  सीमा पार करती हैं, जो अक्सर हमें एहसास दिलाती हैं कि प्रकृति की कोई सीमा नहीं है, हम इंसान हैं जिन्होंने ईन सीमाओ को बनाया है और हमारी अपनी रचना के कारण पीड़ित हैं; इस अंतर्दृष्टि के साथ, मैंने डीएनपी को अलविदा कहा और जल्द ही वापस लौटने का वादा किया!

यहां कुछ अद्भुत क्षण हैं जो मुझे डीएनपी में मिले, आप नीचे दिए गए लिंक पर देख सकते हैं...

https://www.flickr.com/photos/65629150@N06/albums/72177720322741433

संजय देशपांडे





















Tuesday, 7 January 2025

घर खरेदी, २०२५ मध्ये




































घर खरेदी, २०२५ मध्ये !


        “घर म्हणजे दररोजच्या रहाटगाडग्यामधून तुम्हाला जगाला तोंड देऊन दररोज ज्या ठिकाणी आनंदाने परत जावेसे वाटते अशी जागा”…


       खरे तर, फक्त गूगल केले तरीही तुम्हाला घर या शब्दाविषयी हजारो अवतरणे दिसतील परंतु मी वर जे लिहीले आहे ते अवतरण म्हणुन नाही तर मी घराविषयी जेव्हा विचार करतो तेव्हा मला जे वाटते त्या भावना आहेत. म्हणूनच माझ्या लेखाची सुरुवात करण्यासाठी मी या शब्दांचा  वापर केला जो २०२५ मध्ये म्हणजेच नवीन वर्षात घर खरेदी करण्यासाठी किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्यासाठी सल्ला आहे असे तुम्ही म्हणू शकता. माझा नवीन वर्ष किंवा तारखेशी संबंधित गोष्टींवर विश्वास नाही. कारण माझ्या मते चांगल्या गोष्टीची सुरुवात करण्यासाठी कोणताही दिवस चांगलाच असतो (म्हणजे योग्य असतो). घर, रिअल इस्टेट किंवा मालमत्ता खरेदी करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा निर्णय न घेता एकेक दिवस घालवणे म्हणजे दिवस वाया जाणे. आता तुम्हाला असे वाटत असेल की एक बांधकाम व्यावसायिक जो घरे किंवा कार्यालये विकून त्याची उपजीविका चालवतो त्याच्याकडून आणखी काय अपेक्षा करायची, तर तुमचे अजिबात चूक नाही, कारण ग्राहक हा कधीच चुकीचा नसतो ! परंतु मी जे काही म्हणतो आहे त्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा, भूतकाळावर एक नजर टाकू. मला सांगा तुमच्या पालकांनी एखाद्या चांगल्या जागी सदनिका खरेदी केली असती किंवा पुण्याच्या जवळपास एखादी जमीन केली असती तर त्यांच्या मुलाने किंवा मुलीने (तुम्ही) जवळपास वीस/तीस वर्षांनंतर ती जागा खरेदी करण्यापेक्षा तो चुकीचा निर्णय ठरला असता का, जे तुम्ही करताय, किंवा तुम्ही आजही जी खरेदी करताय ती चुकीची वेळ आहे का? तुमच्या मुलांनीच ते करावे यासाठी वाट का पाहू नये व तुम्ही आत्ता जसे जगत आहात तसे जगू शकता. याचा विचार करा व घर खरेदी करण्याच्या वेळेविषयी माझे म्हणणे चूक आहे किंवा बरोबर ते सांगा व तुम्हाला माझे म्हणणे मान्य असेल तर पुढे वाचा (पुणेरी अँप्रोच)!

     सर्वप्रथम, चांगली बातमी अशी आहे की पूर्वीच्या तुलनेत घर (म्हणजेच कोणतीही व्यावसायिक जागा किंवा मालमत्ता जी तुम्हाला वापरायची आहे, फक्त खरेदी करून ठेवायची नाही) खरेदी करण्यासाठी ही उत्तम वेळ आहे, केवळ दर किंवा उपलब्धता किंवा भविष्यात या क्षेत्रात तेजी असेल वगैरे कारणे नाहीत. तर तुमच्याकडे आता पर्याय आहेत व तुम्हाला थोडी वाट पाहणे व थांबणे परवडू शकते. इथेच माझी व इतरांची “खरेदी करण्यासाठी उत्तम वेळेची व्याख्या” वेगळी आहे, हा माझ्या लेखाचा विषय आहे.

       आपण आता २००० या शतकाच्या पुढील पंचवीस वर्षांच्या कालावधीत प्रवेश करत आहोत व गेल्या पंचवीस वर्षामध्ये पुणे शहराची केवळ क्षितीज रेषाच नव्हे तर सामाजिक जीवनही झपाट्याने बदलले आहे. नवीन पिढीही झपाट्याने बदलतेय आधी मिलेनियल, मग जेन झी आणि आता जेन अल्फा, तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या घराविषयी बोलण्याऐवजी मी तुम्हाला हे उपदेशाचे डोस का पाजतो आहे. तर त्याचे कारण असे आहे की आधी तुम्ही तुमच्या घराविषयी चे मुद्द्ये समजून घेणे आवश्यक आहे. घर हे इतर सगळ्या उत्पादनांसारखे नसते, त्याच्याशी सामाजिक व पर्यावरणाचे घटकही संबंधित असतात. त्यामुळेच हे जेन झी किंवा जेन अल्फा प्रकरण समजून घेतले पाहिजे, जे अनेक लोक विसरतात व शेवटी चुकीची घरे बांधतात. जेन झी व अल्फा ही मंडळी १५ ते ३० वर्षे वयोगटातील आहेत व त्यांच्या घरांविषयीच्या (म्हणजे जीवनाविषयीच्या) आवश्यकता आपल्यापेक्षा (म्हणजे ज्यांचे वय चाळीसहून अधिक आहे) खूप वेगळ्या आहेत. तुम्ही जेव्हा घर खरेदी करता तेव्हा तुम्ही जेव्हा घर खरेदी करता तेव्हा तुम्ही पुढील पिढीचाही विचार करत असता, जो आपल्यापैकी बहुतेक जण करतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी घर घेताना ही पिढी कसा विचार करते हे विचारात घेणे आवश्यक आहे, ज्याचा ही जेन झी व अल्फा एक भाग आहेत. तुमच्या कामाच्या ठिकाणासाठी/कार्यालयासाठी हेच लागू होते, कारण तुमच्या संघातील (म्हणजे कर्मचारी वर्गातील) बहुतेक सदस्य याच वयोगटातील असतील व एखाद्या जागेविषयी त्यांचे विचारही अतिशय महत्त्वाचे आहेत. ही पिढी मालकीचे घर खरेदी करण्याविषयी काळजी करत बसत नाही किंवा त्यांची भाड्याच्या घरात राहण्यासही हरकत नाही व एखाद्या मांजरीप्रमाणे ते त्यांची घरे सहजपणे बदलू शकतात. याचे कारण म्हणजे त्यांची बांधिलकी केवळ स्वतःशी असते, जागेशी किंवा कंपनीशी किंवा जुन्या विचारणीच्या कोणत्याही गोष्टीशी नाही, कारण त्यांच्यासाठी त्यांचा आराम कुठल्याही गोष्टीपेक्षा सर्वात महत्त्वाचा असतो. याच कारणामुळे शहरातील काही मध्यवर्ती भागांपेक्षाही बाणेर, बालेवाडी, वाकड इथल्या मालमत्तांचे दर जास्त आहेत. 

        आता आपण २०२५ मध्ये घर खरेदी करण्याच्या मुद्द्याविषयी बोलू , कारण आता पुणे परिसरातील रिअल इस्टेट केवळ डेक्कन, कॅम्प, पेठा (कृपया गूगल करा) यासारख्या भागांपुरतीच मर्यादित नाही. तसेच बांधकाम व्यावसायिक ग्राहकांना क्लब हाऊस, स्विमिंग पूल वगैरेसारख्या सुविधा देवून भुलवू शकत नाहीत, त्याचप्रमाणे आता ग्राहक फक्त प्रति चौरस फूट दरावर दिल्या जाणाऱ्या सवलतीवरही जात नाहीत (बरेच अपवाद वगळता). आता तुम्ही या सगळ्या जुन्या मार्केटिंगच्या गोष्टी करून ग्राहकांना मूर्ख बनवू शकत नाही. जसे की तुम्हाला बीएमडब्ल्यू किंवा मर्सिडीज खरेदी करायची असेल तर तुम्ही ती गाडी एका लीटर पेट्रोल मध्ये किती किलोमीटर धावेल किंवा तीची रिसेल किंमत किती असेल हे विचारत नाही. आणि तुम्ही हुंडाइ किंवा मारुती खरेदी करत असाल तर तुम्ही ऐषोआराम नाही तर ती एक लिटर मध्ये किती किलोमीटर धावेल व परत विकताना किती किंमत मिळेल हे पहाता !  रिअल इस्टेट मध्ये नविन खरेदी करणाऱ्यांचा दृष्टिकोनही आजकाल असाच प्रॅक्टिकल असतो. खरेतर, बांधकाम व्यावसायिकांना अजून याची जाणीव व्हायची आहे परंतु तुम्ही ज्या बांधकाम व्यावसायिकाशी व्यवहार करत आहात त्याला तुम्ही याची जाणीव करून दिली पाहिजे, हा माझ्या लेखाचा विषय आहे.

       आज संपूर्ण देशातून व राज्यातून नोकरीसाठी, शिक्षणासाठी लोक पुण्यामध्ये येतात, त्यांना घरांची तसेच कामासाठी जागेची गरज आहे, त्यामुळे जागेला नेहमीच मागणी राहणार आहे, फक्त ही जागा कुठे ,कधी व कोणत्या दराने खरेदी करायची हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

       ज्या लोकांना घर किंवा कार्यालय खरेदी करायचे आहे, त्यांना मी सुचवेन (सल्ला नव्हे) की तुमचे डोळे व इतर ज्ञानेंद्रियेही उघडी ठेवा, तसेच संयम बाळगा. वेगवेगळ्या ऑफरमध्ये दाखवल्या जाणाऱ्या “मोठ्या बचतीच्या” आकड्यांमागे धावू नका. तुमच्या गरजा समजून घ्या, शहरातील वाढीचे स्वरूप अभ्यासा व त्यानंतर योग्य ठिकाणी व योग्य बांधकाम व्यावसायिकाकडे जागा घेण्याचा निर्णय घ्या. गाडी घेताना सुध्दा तुम्ही थेट मर्सिडीज किंवा बीएमडब्ल्यू खरेदी करत नाही (अपवाद तुमचे वडील अदानी किंवा अंबानी असतील तर) तर हुंडाइ किंवा मारुतीवरून सुरवात करून बीएमडब्ल्यूच्या पातळीपर्यंत पोहोचता. घर किंवा कार्यालय खरेदी करण्याच्या बाबतीतही तुम्ही असाच विचार करू शकता. बहुतेक ग्राहकांसाठी घर म्हणजे आयुष्यात केवळ एकदाच खरेदी करण्याचे दिवस गेले, आता पुरवठा भरपूर आहे व अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पुणे आता केवळ पेठा किंवा कोथरुडसारख्या काही उपनगरांपुरते मर्यादित राहिलेले नाही. स्विगी, झुमॅटो, इन्स्टामार्ग यांच्यामुळे आता किराणासामान अगदी मध्यरात्रीही तुम्हाला घरपोच मिळू शकते, आणि ओला/उबेरमुळे रात्री अपरात्री पण तुम्ही कोणत्या ही ठिकाणी सुरक्षित आणि खात्रीने पण पोहचु शकता, म्हणूनच तुमच्या घराचे ठिकाण व प्रकार अतिशय विचारपूर्वक निवडा. या दशकाच्या अखरेपर्यंत पुणे परिसरात मेट्रो पूर्ण क्षमतेने सुरू होईल (अशी आशा करूया) व घरासारख्या उत्पादनासाठी पाच वर्षे हा काही फारसा मोठा काळ नाही, त्यामुळे हा पैलूही लक्षात ठेवा. मेट्रोच्या मार्गापासून जवळ कार्यालये किंवा दुकानांची उपलब्धता ही येत्या काळात मोठी मागणी असेल कारण फार कमी लोक प्रवासासाठी त्यांचे खाजगी वाहन वापरण्यास प्राधान्य देतील. त्याचप्रमाणे तुमचे कामाचे ठिकाण दुसऱ्या टोकाला असले तरीही तुमच्याकडे मेट्रोच्या सोयीमुळे पश्चिमेकडील सूससारख्या उपनगरामध्ये किंवा पूर्वेला फुरसुंगी किंवा उत्तरेला वाघोलीसारख्या उपनगरामध्ये घर खरेदी करण्याचा पर्याय असेल. यामुळेच तुम्हाला ठिकाण निवडणे सोपे होणार आहे व व्यापक पर्यायही उपलब्ध आहेत, म्हणूनच घर खरेदी करण्यासाठी ही योग्य असल्याचे मी म्हटले.

       रिअल इस्टेट खरेदी करण्यासाठी ही योग्य वेळ आहे याचे अजुन एक कारण म्हणजे बांधकाम व्यावसायिक घासाघीस करण्यास तयार आहे (किंवा त्यांना भाग पडते आहे) कारण बाजारामध्ये अनेक स्पर्धक उतरले आहेत. परंतु केवळ दरात मिळणाऱ्या सवलतीकडे पाहू नका, वेगवेगळ्या निकषांवर घराचा दर्जा कसा आहे हे पाहा व त्यानंतरच व्यवहार करा. जर तुम्ही बांधकाम सुरू असलेले घर खरेदी करत असाल तर प्रकल्प व सदनिकाचे नियोजन कसे आहे ते पाहा कारण ते कोणत्याही त्रिमितीय दृश्यामध्ये किंवा माहितीपत्रकामध्ये दिसत नाही. अगदी ताबा देण्यासाठी तयार सदनिकाही जर तुम्ही जागरुकपणे निवडली नाही, केवळ प्रति चौरस फूट दरावर निवडली तर ती अनेक बाबतीत डोकेदुखी ठरू शकते उदाहरणार्थ देखभाल, बाह्य परिसरा मध्ये बदल, तिथपर्यंत ये-जा करण्यासाठी प्रवास, पार्किंग, कायदेशीर बाबी, शेजार पाजार,तसेच पाण्यासारख्या मूलभूत सोयी व इतरही अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश होतो. 

        त्याचवेळी, इथे घर घेऊन तुम्ही पुण्याच्या संस्कृतीचा एक भाग होता व तुम्ही जसे वागता (म्हणजे तुमची जीवनशैली) तीच  या शहराची संस्कृती असेल, हे मूलभूत तथ्य कधीही विसरू नका. आणि हो, तुम्ही जेव्हा घर खरेदी करण्याचा विचार करता तेव्हा प्रकल्पाच्या आजूबाजूला अलिकडच्या काळातील (म्हणजे गेल्या पाच वर्षातील) वाढ तसेच विकास पण विचारात घ्या.  

         शेवटचा परंतु महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, तुमचे घर निवडताना निसर्गाच्या संवर्धनाचा मुद्दाही लक्षात ठेवा, कारण अशाप्रकारेच तुम्ही तुमच्या पुढील पिढ्यांचे भविष्य सुरक्षित करू शकाल व ज्या गृहनिर्माण संस्थांना पुनर्विकास करून घ्यायचा आहे त्यांच्यासाठीही हे लागू होते. तुमच्या बांधकाम व्यावसायिकाला तो किंवा ती निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी काय प्रयत्न करत आहे हा प्रश्न विचारा, हे तुमच्या शहराप्रती कर्तव्य आहे! तुम्ही तुमचे गाव सोडून तुमच्या सध्याच्या ठिकाणी स्थलांतरित का झालात किंवा होत आहात हे स्वतःला विचारा व तुम्ही आज चुकीची निवड केल्यामुळे उद्या तुमच्या मुलांना तेच करावे लागू नये, यातच खरी हुशारी आहे, एवढे बोलून (इशारा देऊन) निरोप घेतो, 


२०२५ मध्ये तुमच्या मालकीचे घर खरेदी करण्यासाठी शुभेच्छा!


संजय देशपांडे आणि टीम संजीवनी. 

www.sanjeevanideve.com 

www.junglebelles.in