घर खरेदी, २०२५ मध्ये !
“घर म्हणजे दररोजच्या रहाटगाडग्यामधून तुम्हाला जगाला तोंड देऊन दररोज ज्या ठिकाणी आनंदाने परत जावेसे वाटते अशी जागा”…
खरे तर, फक्त गूगल केले तरीही तुम्हाला घर या शब्दाविषयी हजारो अवतरणे दिसतील परंतु मी वर जे लिहीले आहे ते अवतरण म्हणुन नाही तर मी घराविषयी जेव्हा विचार करतो तेव्हा मला जे वाटते त्या भावना आहेत. म्हणूनच माझ्या लेखाची सुरुवात करण्यासाठी मी या शब्दांचा वापर केला जो २०२५ मध्ये म्हणजेच नवीन वर्षात घर खरेदी करण्यासाठी किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्यासाठी सल्ला आहे असे तुम्ही म्हणू शकता. माझा नवीन वर्ष किंवा तारखेशी संबंधित गोष्टींवर विश्वास नाही. कारण माझ्या मते चांगल्या गोष्टीची सुरुवात करण्यासाठी कोणताही दिवस चांगलाच असतो (म्हणजे योग्य असतो). घर, रिअल इस्टेट किंवा मालमत्ता खरेदी करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा निर्णय न घेता एकेक दिवस घालवणे म्हणजे दिवस वाया जाणे. आता तुम्हाला असे वाटत असेल की एक बांधकाम व्यावसायिक जो घरे किंवा कार्यालये विकून त्याची उपजीविका चालवतो त्याच्याकडून आणखी काय अपेक्षा करायची, तर तुमचे अजिबात चूक नाही, कारण ग्राहक हा कधीच चुकीचा नसतो ! परंतु मी जे काही म्हणतो आहे त्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा, भूतकाळावर एक नजर टाकू. मला सांगा तुमच्या पालकांनी एखाद्या चांगल्या जागी सदनिका खरेदी केली असती किंवा पुण्याच्या जवळपास एखादी जमीन केली असती तर त्यांच्या मुलाने किंवा मुलीने (तुम्ही) जवळपास वीस/तीस वर्षांनंतर ती जागा खरेदी करण्यापेक्षा तो चुकीचा निर्णय ठरला असता का, जे तुम्ही करताय, किंवा तुम्ही आजही जी खरेदी करताय ती चुकीची वेळ आहे का? तुमच्या मुलांनीच ते करावे यासाठी वाट का पाहू नये व तुम्ही आत्ता जसे जगत आहात तसे जगू शकता. याचा विचार करा व घर खरेदी करण्याच्या वेळेविषयी माझे म्हणणे चूक आहे किंवा बरोबर ते सांगा व तुम्हाला माझे म्हणणे मान्य असेल तर पुढे वाचा (पुणेरी अँप्रोच)!
सर्वप्रथम, चांगली बातमी अशी आहे की पूर्वीच्या तुलनेत घर (म्हणजेच कोणतीही व्यावसायिक जागा किंवा मालमत्ता जी तुम्हाला वापरायची आहे, फक्त खरेदी करून ठेवायची नाही) खरेदी करण्यासाठी ही उत्तम वेळ आहे, केवळ दर किंवा उपलब्धता किंवा भविष्यात या क्षेत्रात तेजी असेल वगैरे कारणे नाहीत. तर तुमच्याकडे आता पर्याय आहेत व तुम्हाला थोडी वाट पाहणे व थांबणे परवडू शकते. इथेच माझी व इतरांची “खरेदी करण्यासाठी उत्तम वेळेची व्याख्या” वेगळी आहे, हा माझ्या लेखाचा विषय आहे.
आपण आता २००० या शतकाच्या पुढील पंचवीस वर्षांच्या कालावधीत प्रवेश करत आहोत व गेल्या पंचवीस वर्षामध्ये पुणे शहराची केवळ क्षितीज रेषाच नव्हे तर सामाजिक जीवनही झपाट्याने बदलले आहे. नवीन पिढीही झपाट्याने बदलतेय आधी मिलेनियल, मग जेन झी आणि आता जेन अल्फा, तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या घराविषयी बोलण्याऐवजी मी तुम्हाला हे उपदेशाचे डोस का पाजतो आहे. तर त्याचे कारण असे आहे की आधी तुम्ही तुमच्या घराविषयी चे मुद्द्ये समजून घेणे आवश्यक आहे. घर हे इतर सगळ्या उत्पादनांसारखे नसते, त्याच्याशी सामाजिक व पर्यावरणाचे घटकही संबंधित असतात. त्यामुळेच हे जेन झी किंवा जेन अल्फा प्रकरण समजून घेतले पाहिजे, जे अनेक लोक विसरतात व शेवटी चुकीची घरे बांधतात. जेन झी व अल्फा ही मंडळी १५ ते ३० वर्षे वयोगटातील आहेत व त्यांच्या घरांविषयीच्या (म्हणजे जीवनाविषयीच्या) आवश्यकता आपल्यापेक्षा (म्हणजे ज्यांचे वय चाळीसहून अधिक आहे) खूप वेगळ्या आहेत. तुम्ही जेव्हा घर खरेदी करता तेव्हा तुम्ही जेव्हा घर खरेदी करता तेव्हा तुम्ही पुढील पिढीचाही विचार करत असता, जो आपल्यापैकी बहुतेक जण करतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी घर घेताना ही पिढी कसा विचार करते हे विचारात घेणे आवश्यक आहे, ज्याचा ही जेन झी व अल्फा एक भाग आहेत. तुमच्या कामाच्या ठिकाणासाठी/कार्यालयासाठी हेच लागू होते, कारण तुमच्या संघातील (म्हणजे कर्मचारी वर्गातील) बहुतेक सदस्य याच वयोगटातील असतील व एखाद्या जागेविषयी त्यांचे विचारही अतिशय महत्त्वाचे आहेत. ही पिढी मालकीचे घर खरेदी करण्याविषयी काळजी करत बसत नाही किंवा त्यांची भाड्याच्या घरात राहण्यासही हरकत नाही व एखाद्या मांजरीप्रमाणे ते त्यांची घरे सहजपणे बदलू शकतात. याचे कारण म्हणजे त्यांची बांधिलकी केवळ स्वतःशी असते, जागेशी किंवा कंपनीशी किंवा जुन्या विचारणीच्या कोणत्याही गोष्टीशी नाही, कारण त्यांच्यासाठी त्यांचा आराम कुठल्याही गोष्टीपेक्षा सर्वात महत्त्वाचा असतो. याच कारणामुळे शहरातील काही मध्यवर्ती भागांपेक्षाही बाणेर, बालेवाडी, वाकड इथल्या मालमत्तांचे दर जास्त आहेत.
आता आपण २०२५ मध्ये घर खरेदी करण्याच्या मुद्द्याविषयी बोलू , कारण आता पुणे परिसरातील रिअल इस्टेट केवळ डेक्कन, कॅम्प, पेठा (कृपया गूगल करा) यासारख्या भागांपुरतीच मर्यादित नाही. तसेच बांधकाम व्यावसायिक ग्राहकांना क्लब हाऊस, स्विमिंग पूल वगैरेसारख्या सुविधा देवून भुलवू शकत नाहीत, त्याचप्रमाणे आता ग्राहक फक्त प्रति चौरस फूट दरावर दिल्या जाणाऱ्या सवलतीवरही जात नाहीत (बरेच अपवाद वगळता). आता तुम्ही या सगळ्या जुन्या मार्केटिंगच्या गोष्टी करून ग्राहकांना मूर्ख बनवू शकत नाही. जसे की तुम्हाला बीएमडब्ल्यू किंवा मर्सिडीज खरेदी करायची असेल तर तुम्ही ती गाडी एका लीटर पेट्रोल मध्ये किती किलोमीटर धावेल किंवा तीची रिसेल किंमत किती असेल हे विचारत नाही. आणि तुम्ही हुंडाइ किंवा मारुती खरेदी करत असाल तर तुम्ही ऐषोआराम नाही तर ती एक लिटर मध्ये किती किलोमीटर धावेल व परत विकताना किती किंमत मिळेल हे पहाता ! रिअल इस्टेट मध्ये नविन खरेदी करणाऱ्यांचा दृष्टिकोनही आजकाल असाच प्रॅक्टिकल असतो. खरेतर, बांधकाम व्यावसायिकांना अजून याची जाणीव व्हायची आहे परंतु तुम्ही ज्या बांधकाम व्यावसायिकाशी व्यवहार करत आहात त्याला तुम्ही याची जाणीव करून दिली पाहिजे, हा माझ्या लेखाचा विषय आहे.
आज संपूर्ण देशातून व राज्यातून नोकरीसाठी, शिक्षणासाठी लोक पुण्यामध्ये येतात, त्यांना घरांची तसेच कामासाठी जागेची गरज आहे, त्यामुळे जागेला नेहमीच मागणी राहणार आहे, फक्त ही जागा कुठे ,कधी व कोणत्या दराने खरेदी करायची हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
ज्या लोकांना घर किंवा कार्यालय खरेदी करायचे आहे, त्यांना मी सुचवेन (सल्ला नव्हे) की तुमचे डोळे व इतर ज्ञानेंद्रियेही उघडी ठेवा, तसेच संयम बाळगा. वेगवेगळ्या ऑफरमध्ये दाखवल्या जाणाऱ्या “मोठ्या बचतीच्या” आकड्यांमागे धावू नका. तुमच्या गरजा समजून घ्या, शहरातील वाढीचे स्वरूप अभ्यासा व त्यानंतर योग्य ठिकाणी व योग्य बांधकाम व्यावसायिकाकडे जागा घेण्याचा निर्णय घ्या. गाडी घेताना सुध्दा तुम्ही थेट मर्सिडीज किंवा बीएमडब्ल्यू खरेदी करत नाही (अपवाद तुमचे वडील अदानी किंवा अंबानी असतील तर) तर हुंडाइ किंवा मारुतीवरून सुरवात करून बीएमडब्ल्यूच्या पातळीपर्यंत पोहोचता. घर किंवा कार्यालय खरेदी करण्याच्या बाबतीतही तुम्ही असाच विचार करू शकता. बहुतेक ग्राहकांसाठी घर म्हणजे आयुष्यात केवळ एकदाच खरेदी करण्याचे दिवस गेले, आता पुरवठा भरपूर आहे व अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पुणे आता केवळ पेठा किंवा कोथरुडसारख्या काही उपनगरांपुरते मर्यादित राहिलेले नाही. स्विगी, झुमॅटो, इन्स्टामार्ग यांच्यामुळे आता किराणासामान अगदी मध्यरात्रीही तुम्हाला घरपोच मिळू शकते, आणि ओला/उबेरमुळे रात्री अपरात्री पण तुम्ही कोणत्या ही ठिकाणी सुरक्षित आणि खात्रीने पण पोहचु शकता, म्हणूनच तुमच्या घराचे ठिकाण व प्रकार अतिशय विचारपूर्वक निवडा. या दशकाच्या अखरेपर्यंत पुणे परिसरात मेट्रो पूर्ण क्षमतेने सुरू होईल (अशी आशा करूया) व घरासारख्या उत्पादनासाठी पाच वर्षे हा काही फारसा मोठा काळ नाही, त्यामुळे हा पैलूही लक्षात ठेवा. मेट्रोच्या मार्गापासून जवळ कार्यालये किंवा दुकानांची उपलब्धता ही येत्या काळात मोठी मागणी असेल कारण फार कमी लोक प्रवासासाठी त्यांचे खाजगी वाहन वापरण्यास प्राधान्य देतील. त्याचप्रमाणे तुमचे कामाचे ठिकाण दुसऱ्या टोकाला असले तरीही तुमच्याकडे मेट्रोच्या सोयीमुळे पश्चिमेकडील सूससारख्या उपनगरामध्ये किंवा पूर्वेला फुरसुंगी किंवा उत्तरेला वाघोलीसारख्या उपनगरामध्ये घर खरेदी करण्याचा पर्याय असेल. यामुळेच तुम्हाला ठिकाण निवडणे सोपे होणार आहे व व्यापक पर्यायही उपलब्ध आहेत, म्हणूनच घर खरेदी करण्यासाठी ही योग्य असल्याचे मी म्हटले.
रिअल इस्टेट खरेदी करण्यासाठी ही योग्य वेळ आहे याचे अजुन एक कारण म्हणजे बांधकाम व्यावसायिक घासाघीस करण्यास तयार आहे (किंवा त्यांना भाग पडते आहे) कारण बाजारामध्ये अनेक स्पर्धक उतरले आहेत. परंतु केवळ दरात मिळणाऱ्या सवलतीकडे पाहू नका, वेगवेगळ्या निकषांवर घराचा दर्जा कसा आहे हे पाहा व त्यानंतरच व्यवहार करा. जर तुम्ही बांधकाम सुरू असलेले घर खरेदी करत असाल तर प्रकल्प व सदनिकाचे नियोजन कसे आहे ते पाहा कारण ते कोणत्याही त्रिमितीय दृश्यामध्ये किंवा माहितीपत्रकामध्ये दिसत नाही. अगदी ताबा देण्यासाठी तयार सदनिकाही जर तुम्ही जागरुकपणे निवडली नाही, केवळ प्रति चौरस फूट दरावर निवडली तर ती अनेक बाबतीत डोकेदुखी ठरू शकते उदाहरणार्थ देखभाल, बाह्य परिसरा मध्ये बदल, तिथपर्यंत ये-जा करण्यासाठी प्रवास, पार्किंग, कायदेशीर बाबी, शेजार पाजार,तसेच पाण्यासारख्या मूलभूत सोयी व इतरही अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश होतो.
त्याचवेळी, इथे घर घेऊन तुम्ही पुण्याच्या संस्कृतीचा एक भाग होता व तुम्ही जसे वागता (म्हणजे तुमची जीवनशैली) तीच या शहराची संस्कृती असेल, हे मूलभूत तथ्य कधीही विसरू नका. आणि हो, तुम्ही जेव्हा घर खरेदी करण्याचा विचार करता तेव्हा प्रकल्पाच्या आजूबाजूला अलिकडच्या काळातील (म्हणजे गेल्या पाच वर्षातील) वाढ तसेच विकास पण विचारात घ्या.
शेवटचा परंतु महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, तुमचे घर निवडताना निसर्गाच्या संवर्धनाचा मुद्दाही लक्षात ठेवा, कारण अशाप्रकारेच तुम्ही तुमच्या पुढील पिढ्यांचे भविष्य सुरक्षित करू शकाल व ज्या गृहनिर्माण संस्थांना पुनर्विकास करून घ्यायचा आहे त्यांच्यासाठीही हे लागू होते. तुमच्या बांधकाम व्यावसायिकाला तो किंवा ती निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी काय प्रयत्न करत आहे हा प्रश्न विचारा, हे तुमच्या शहराप्रती कर्तव्य आहे! तुम्ही तुमचे गाव सोडून तुमच्या सध्याच्या ठिकाणी स्थलांतरित का झालात किंवा होत आहात हे स्वतःला विचारा व तुम्ही आज चुकीची निवड केल्यामुळे उद्या तुमच्या मुलांना तेच करावे लागू नये, यातच खरी हुशारी आहे, एवढे बोलून (इशारा देऊन) निरोप घेतो,
२०२५ मध्ये तुमच्या मालकीचे घर खरेदी करण्यासाठी शुभेच्छा!
संजय देशपांडे आणि टीम संजीवनी.
www.sanjeevanideve.com
www.junglebelles.in
No comments:
Post a Comment