Tuesday, 5 July 2022

रिअल इस्टेटचे वास्तव व भविष्यातील वाटचाल!!





 


























रिअल इस्टेटचे वास्तव व भविष्यातील वाटचाल!!

मित्रांसोबत असताना, प्रत्येक माणूस चांगला असतो; मात्र स्वत: हाच्या घरी असताना, माणूस अधिक चांगला असतो.” … लिओ टॉलस्टॉय

काउंट लेव्ह निकोलायेव्हिच टॉलस्टॉय, ज्यांचा उल्लेख इंग्रजीमध्ये नेहमी लिओ टॉलस्टॉय असा करतात, या नावाची मी ओळख करून देण्याची गरज नाही. मात्र जे फारसे वाचन करत नाहीत (म्हणजे साहित्य वगैरे असे मला म्हणायचे आहे) त्यांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, ते एक रशियन लेखक होते ज्यांचा उल्लेख आत्तापर्यंतच्या सर्वात महान लेखकांमध्ये केला जातो. मला असे वाटते त्यासाठी त्यांची एक साहित्यकृती, ‘वॉर अँड पीसही कादंबरीच पुरेशी आहे कारण बहुतेक लेखकांचे आयुष्यभरातील लेखनच तेवढे असेल. मात्र टॉलस्टॉयला एका कादंबरीमध्ये बांधून ठेवणे हा त्याचा अपमान केल्यासारखे होईल. असो, घराविषयी त्याने कमीत कमी मात्र किती समर्पक शब्दात सांगितले आहे. कारण घर ही एक भावना आहे, केवळ एक इमारत किंवा एक वस्तू नाही असा त्याचा अर्थ होतो. खरेतर त्याने घराची तुलना मित्राशी केली आहे, मात्र माझ्या मते घर पुरुषाचा (स्त्रिचाही) सर्वोत्तम मित्रही आहे, ज्याला सगळे काही सांगू शकता, तुमच्याभोवती असलेल्या भिंती तुम्हाला बाह्य जगातील त्रासापासून लांब ठेवत असतात. घरामध्ये तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे रडू शकता, हसू शकता, गाऊ शकता, नाचू शकता. एवढेच नाही तर तुमचे घर तुमच्या भावनांची तसेच तुमच्या मनस्थितीचीही काळजी घेते. तुम्ही अगदी चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी असाल (हे केवळ उत्पन्नाच्या दृष्टीने उदाहरणादाखल दिले आहे, यामध्ये सामाजिक भेदभावाचा कोणताही हेतू नाही) किंवा एखादा मध्यमवर्गीय व्यवस्थापक किंवा उच्च मध्यमवर्गीय उपाध्यक्ष किंवा यशस्वी व्यावसायिक किंवा उच्च भ्रूनोकरशहा किंवा कोट्याधीश उद्योजक, तुमच्या घरी तुम्ही आपापल्यापरीने राजे किंवा राणी असता.

तुम्हाला आयुष्यभर उत्तम सेवा देणारे असे उत्पादन (घर) तयार करणाऱ्या इतर कोणत्याही उद्योगाला केवळ सरकारद्वारेच नव्हे तर संपूर्ण समाजाद्वारे (किंवा व्यवस्थेद्वारे असे म्हणूयात) अतिशय आदराने व व्यावसायिकपणे वागविण्यात आले असते. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की रिअल इस्टेटच्या वाट्याला हा आदर कधी आलाच नाही एवढेच नाही तर त्याला योग्य वागणूकही मिळाली नाही. माझ्या लेखाचा नेमका हाच विषय आहे.

अजूनही विषाणूंचा किंवा साथीचा धोका पूर्ण संपला नाहीये. मात्र कुठेतरी लोकांना त्याची सवय झालेली आहे किंवा भीती व विषाणूसोबत जगायची सवय झाली आहे व संपूर्ण समाजासाठी हे अतिशय चांगले लक्षण आहे. ही लढाई अजून संपलेली नाही व कदाचित इतक्या लवकर संपणारही नाही मात्र बहुतेक व्यवसायांची गाडी पुन्हा वेगाने सुरू झाली आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे माझ्या बहिणीने मे महिन्यात उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी काश्मीरला जायचे ठरवले. ट्रॅव्हल एजंट तिला म्हणाला जाऊ नका कारण हॉटेलच्या सगळ्या खोल्या आरक्षित आहेत. काश्मीरच कशाला, मी जेव्हा माझ्या जंगलप्रेमी मित्रमंडळींच्या समूहासोबत एक दिवस महाबळेश्वरला जाऊन आलो, तेव्हा मॅप्रोच्या जॉईंटवर (स्थानिक खाद्यपदार्थ निर्मात्या कंपनीचे उपाहारगृह) पार्किंगसाठीच्या चारही जागा तुडुंब भरलेल्या होत्या, एकही गाडी लावायलाही कुठे जागा नव्हती एवढी गर्दी होती. पुण्यातील मॉल व उपाहारगृहांमधील चित्रही काही वेगळे नसते, लोकांची प्रचंड गर्दी असते. हे चित्र समजण्यासारखे आहे कारण दोन वर्षांहून अधिक काळ सगळ्यांनी बाहेर जाण्याची व मजा करण्याची अनावर इच्छा दाबून ठेवली होती. जे आपल्याला आता दिसून येत आहे व सगळ्याच व्यवसायांसाठी ही चांगली स्थिती आहे. तरीही रिअल इस्टेटमध्ये मात्र इतर ठिकाणांसारखे तितके उत्साहाचे वातावरण नाही व याचे एकमेव कारण म्हणजे रिअल इस्टेटच्या प्रत्येक विभागाशी संबंधित धोरणे (नेहमीप्रमाणे).

केवळ सरकारच नाही (अर्थात त्यांची भूमिका सर्वात मोठी आहे) तर संबंधित सर्व संस्था मग बांधकाम साहित्याचे उत्पादक, कच्च्या मालाचे पुरवठादार, जमीन मालक व अगदी ग्राहक असोत, सगळे मिळून बांधकाम व्यावसायिकाचे आयुष्य त्रासदायक करून टाकतात, अशी रिअल इस्टेटमधील स्थिती आहे. मात्र मी त्यांच्यापैकी कुणालाही दोष देणार नाही, कारण संत वामनराव पै यांच्या सुप्रसिद्ध तत्वज्ञानानुसार (तसेच ॲडलरसारख्या इतरही अनेक तत्वव्यक्तानुसार), “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकारम्हणजेच तुझे जीवन घडविण्यासाठी तूच जबाबदार आहेस”.हेच तत्व रिअल इस्टेटलाही लागू होते कारण अनेक दशके इतरांचे आयुष्य जाचक होण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांना दोष दिला जायचा, मात्र आता प्रवाहाची दिशा बदलली आहे. हे केवळ मीच म्हणत नाही तर मी वर नमूद केलेल्या सर्व संस्था म्हणतील, जर आपण बांधकाम व्यावसायिक म्हणून ते आपले आयुष्य त्रासदायक करत असल्याची तक्रार केली. हा आरोप प्रत्यारोपांचा खेळ सोडा, कारण आपण भूतकाळ बदलू शकत नाही,तसंच आपण वर्तमानकाळही बदलू शकत नाही, मात्र आपल्याला भविष्यकाळ बदलण्याची इच्छा असेल तर आपण रिअल इस्टेटविषयी सध्याची तथ्ये स्वीकारणे व ती समजून घेणे आवश्यक आहे, नाहीतर आपण आणखी चांगल्या भविष्यकाळासाठी ती बदलण्याची अपेक्षा कशी करू शकू, नाही का?

सरकारपासून सुरुवात करू या, रिअल इस्टेट त्यांचे कधीच लाडके आपत्य नव्हते, आणि सरकारने या क्षेत्रातील धोरणांबाबत नेहमीच सावळा गोंधळ घातला आहे!

त्यामुळे व्यवसाय सुलभता (अशी काही गोष्ट अस्तित्वात असते यावर माझा खरोखरच विश्वास नाही) बांधकाम व्यवसायात उरली नाही. सरकारला घरे स्वस्त व्हावीत असे वाटते, त्यात वावगे काहीच नाही मात्र त्यात बांधकाम व्यावसायिकांचा बळी जाऊ नये एवढेच मला वाटते. मी अतिशयोक्ती करतोय असे तुम्हाला वाटत असेल तर अवतीभोवती पाहा व खाजगीत कुणाही बांधकाम व्यावसायिकाशी बोलून पाहा (मोठ्या किंवा लहान) व आपल्या आर्थिक परिस्थितीविषयी त्याचे काय म्हणजे आहे ते ऐका. रिअल इस्टेटमध्ये सर्व काही आलबेल नाही ही वस्तुस्थिती कुणीही सार्वजनिकपणे स्वीकारणार नाही, मात्र अलिकडच्या काळात रिअल इस्टेटमध्ये बरीच मोठी नावे बुडित खात्यात निघाली व एक लक्षात ठेवा त्यातील बरीच नावे ही काही एका रात्रीतून झालेले बांधकाम व्यावसायिक नव्हते किंवा नाहीत. रिअल इस्टेटमधील यापैकी काही नावे जवळपास तीस वर्षांसाठी व्यवसायामध्ये होती व त्यांची कामगिरी चांगली होती, तरीही ते दिवाळखोरीत निघाले ज्यामुळे हजारो लोकांचे तसेच संस्थांचे आयुष्य त्रासदायक व कष्टाचे झाले. अशी केवळ एक किंवा दोन प्रकरणे असतील तर बांधकाम व्यावसायिकाला दोष देता येईल, मात्र आजकाल अशी अनेक प्रकरणे दिसून येत आहेत व अजूनही आपण तो फक्त संबंधित बांधकाम व्यावसायिकाचाच दोष आहे असे म्हणत असू, तर आपण स्वतःलाच मूर्ख बनवतोय इतकेच मी म्हणेन. मी जेव्हा सरकार असे म्हणतो तेव्हा प्रत्येक विभागाचा त्याच्याशी संबंध येतो, नगर विकास विभाग जो प्रामुख्याने धोरणे तयार करण्यासाठी जबाबदार असतो, तसेच पुणे महानगरपालिका/ पुणे महानगरप्रदेश विकास प्राधिकरण/पिंपरी चिंचवड महानगरप्रदेश विकास प्राधिकरण यासारखी स्थानिक प्राधिकरणे, तसेच पायाभूत सुविधा पुरविणाऱ्या एमएसईडीसीएल सारख्या (एमएसईबी) संस्था, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला विलंब व गोंधळ दिसून येईल, ज्यामुळे केवळ विलंबच होत नाही तर घरांच्या बांधकाम खर्चात किंवा उत्पादन खर्चात वाढ होतो. एका विभागाने बांधकामाचा आराखडा तयार करायचा, त्याचसाठी ना हरकत प्रमाणपत्र दुसऱ्या विभागाकडून घ्यायचे अशी परस्परविरोधी धोरणे असतात, उदाहरणार्थ निवासी विभाग असला तरीही जल विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र किंवा हवाई दलाचे ना हरत प्रमाणपत्र घ्या, अशी विनोदांची (क्रूर विनोदांची) यादी कधीही न संपणारी असते. त्याशिवाय मंजुरी देणारे एक प्राधिकरण म्हणते की सुविधांसाठीच्या जागा त्यांच्या ताब्यात द्या, तर दुसरे प्राधिकरण म्हणते त्या तुम्ही स्वतःच विकसित करा, तर तिसरे प्राधिकरण सुविधांसाठीच्या जागी ट्रान्सफॉर्मरसाठी खोली किंवा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प यासारख्या अत्यावश्यक सुविधा बांधू देत नाही. शेवटी हीच प्राधिकरणे या सुविधावाल्या जागांचा लिलाव करतात कारण या जागा विकसित करणे त्यांना शक्य नसते. केवळ इथेच असा विनोद शक्य आहे! तुम्ही तुमच्या जागेमध्ये सार्वजनिक हेतूने रस्ता बांधायची परवानगी दिली तर तुम्हाला दुप्पट एफएसआय मिळतो हे मान्य आहे. मात्र तुम्हाला रस्ते बांधणी शुल्क द्यावे लागते तसेच तुमच्या जमीनीची क्षमताही कमी होत असते व न्यायालयानेही अशा नियामाच्या विरुद्ध निकाल दिलेला आहे. कारण तुम्ही शाळेच्या आरक्षणासाठी जमीन अधिग्रहित करताना शाळा बांधायला का सांगत नाही किंवा शाळा बांधण्यासाठी पैसे का घेत नाही? त्याशिवाय अग्निसुरक्षा शुल्कावरून तसेच रस्ते खोदण्याच्या शुल्का संदर्भात अनेक मतभेद आहेत. मॉन्सून दरम्यान चार महिने कोणत्याही कामासाठी रस्ते खणता येणार नाहीत यासारखी निरर्थक धोरणे, मग ते सांडपाण्याच्या वाहिनीसाठी असो, जलवाहिनीसाठी असो किंवा विद्युत वाहिनीसाठी, यामुळे तुम्हाला घराचा ताबा देण्यास चार महिने उशीर होऊ शकतो. त्याऐवजी, पुणे महानगरपालिका (स्थानिक संस्था) रस्ते खणावेच लागणार नाहीत याची खात्री करण्यासाठी विविध प्रकारच्या वाहिन्या जोडता येतील अशी सोय नियमित अंतरावर ठिकठिकाणी का करून ठेवत नाही, अर्थातच, तुम्ही अशाप्रकारचे प्रश्न इथे विचारू शकत नाही. जे बांधकाम व्यावसायिक ग्राहकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत नाहीत, त्यांना शिक्षा देण्यासाठी रेरा आहे, मात्रा स्थानिक संस्थांनी वेळच्या वेळी योग्य त्या पायाभूत सुविधा देण्याविषयी त्यांच्या ग्राहकांना (म्हणजेच बांधकाम व्यावसायिकांना तसेच नागरिकांना) दिलेल्या आश्वासनांचे काय, कारण स्थानिक संस्थाही बांधकाम व्यावसायिकांकडून त्यासाठी पैसे घेतात, बरोबर? इथेच या स्थानिक संस्था रस्ते, सांडपाणी, पाणी यासारख्या मूलभूत पायाभूत सुविधा ग्राहकांना देण्यात अपयशी ठरतातच मात्र त्यासाठी पैसे घेतल्यानंतरही जबाबदारी ग्राहकांवर टाकतात. या सर्व पैलूंमुळे घरे महाग होतात एवढेच नाही तर घर घेणाऱ्या ग्राहकाला या सर्व गोष्टींसाठी थोडे जास्त पैसे खर्च करावे लागतात, कारण तो सध्या जिथे राहात असतो तिथे पायाभूत सुविधांचा अभाव असतो.

मात्र या गोष्टींमुळे घरे महाग होतात हा विचार कुणी करत नाही. त्याच शिवाय इंधनाचे दर वाढल्यामुळे विविध कच्च्या मालाचे किंवा साहित्याचे उत्पादक त्यांच्या दरातही वाढ करतात, ते देखील सरकार नियंत्रित करत नाही. अशावेळी बांधकाम व्यावसायिकाने त्याच्या समस्यांसाठी कुणाकडे पाहायचे, हा प्रश्न आहे?

सरते शेवटी, ग्राहक व जमीन मालक, यांना जास्तीत जास्त चांगला फायदा आपल्या पदरी पाडून घेण्यातच रस असतो. ग्राहकांना सदनिकेसाठी (घरासाठी) प्रति चौरस फूट कमीत कमी दर मिळावा अशी अपेक्षा असते, तर जमीन मालकांना जमीनीच्या प्रत्येक चौरस फूटासाठी जास्तीत जास्त खरेदी दर हवा असतो व सोसायट्यांच्या पुनर्विकासामध्ये त्यांच्या सध्याच्या क्षेत्रापेक्षा जास्तीत जास्त अतिरिक्त क्षेत्र फुकट हवे असते. यामध्ये बांधकाम व्यावसायिकाने हे सगळे धागे कसे जुळवायचे याचा विचार कुणीच करत नाही. मी यापैकी कुठल्याही घटकाला दोष देत नाही कारण बांधकाम व्यावसायिकच अनेक दशके त्यांच्याशी संबंधित प्रत्येक घटकाला आनंदी (घराचे ग्राहक कदाचित नसतील मात्र त्यांच्यापैकी बहुतेकांना घराचा ताबा मिळाला आहे ही वस्तुस्थिती आहे) ठेवण्याची जादू करत होते. यामुळेच वर नमूद केलेल्या सर्व घटकांच्या अपेक्षा एवढ्या उंचावल्या आहेत की त्या पूर्ण करणे आता या पिढीतील बांधकाम व्यावसायिकाला अशक्य होऊन बसले आहे, बहुतेक बांधकाम व्यावसायिक अशाच परिस्थितीमध्ये आहेत. तरीही, रिअल इस्टेट हा अतिशय उत्तम व्यवसाय आहे, मात्र या खेळातील बदललेले नियम किंवा पैलू समजून घेण्याची वेळ आलेली आहे. आता हा व्यवसाय म्हणजे केवळ, दरवाढ होणारी किंवा भरपूर परतावा देणारी दुभती गाय राहिलेली नाही, तर कुठल्याही ग्राहकोपयोगी वस्तु तयार करणाऱ्या उद्योगासारखाच हादेखील एक उद्योग झाला आहे, ज्याला कायम मागणी राहील मात्र त्यासाठी मागणीचे स्वरूप व या खेळाच्या बदलेल्या आवृत्तीचे नियम समजून घेणे आवश्यक आहे. सरकारनेही आपली ज्ञानेंद्रिये उघडली पाहिजेत (केवळ डोळेच नाहीत) व रिअल इस्टेटचे नवीन स्वरूप समजून घेऊन धोरणे तयार केली पाहिजे, तरच ते त्यातून पैसे कमवू शकेल. त्याचप्रमाणे घर घेणाऱ्या ग्राहकांनी तसेच जमीन मालकांनी त्यांची स्वतःची हाव नियंत्रणात ठेवली पाहिजे कारण जास्त मिळण्यात गैर काहीच नाही! केवळ घर खरेदीदारांनी स्वस्त हे नेहमीच उत्तम नसते तसेच जागा मालकांना सर्वाधिक दर म्हणजे सर्वोत्तम खरेदीदार अशी खात्री नाही हे सुद्धा लक्षात ठेवले पाहिजे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, बांधकाम व्यावसायिकाने आपण स्वतहाच व्यवसायामध्ये का आहेत हे ठरवले पाहिजे; फक्त इतरांना खुश करावे आणि तुमच्या नावाखाली अनेक प्रकल्प असल्याचा खोटा अभिमान मिरवावा हा उद्देश आहे किंवा थोडाफार पैसा पण कमवावा व रात्री सुखात शांतपणे झोपावे हा उद्देश आहे?  मला असे वाटते, प्रत्येक प्रकल्पाचे याच दृष्टिकोनातून विश्लेषण करण्याची व त्यानंतर पुढे जावे हे ठरविण्याची वेळ आता आली आहे, आणि सध्याच्या रिअल इस्टेटचे हेच वास्तव आहे!

संजय देशपांडे      

संजीवनी डेव्हलोपर्स

ईमेल आयडी - smd156812@gmail.com

 


Friday, 1 July 2022

एका पाळीव कुत्र्याने शिकवलेला धडा!









एका पाळीव कुत्र्याने शिकवलेला धडा!

२१ जून १४- २१ जून २२

एका पाळीव आणि प्रेमळ कुत्र्याकडून तुम्हाला मिळालेली सर्वोत्तम भेट म्हणजे, कुणावरही निस्वार्थी प्रेम कसे करायचे याची शिकवण”…

हे कुणा निस्सीम श्वान प्रेमी व्यक्तीचे शब्द नाहीत तर माझेच शब्द आहेत. सर्वप्रथम मी हे कबूल करतो की मला काही कुत्र्यांचे फार वेड नाही मात्र तुमच्या घरात जेव्हा एक जिवंत प्राणी राहात असतो, तुम्ही भोवती असताना तुमच्याकडे बघत राहतो, तुम्ही घरात येताच तुमच्याकडे बघून आनंदाने शेपटी हलवतो, तेव्हा तुम्हाला त्याचा लळा लागला नाही तर एकतर तुम्ही संत आहात किंवा मशीन आहात व मी दोन्हीही नाही.

आमच्याकडे घरी दोन कुत्री आहेत किंवा होती म्हणा कारण त्यातील २१ जून २०२२ रोजी एक बिगल जातीचा ओरिओ, तर दुसरा काळ्या रंगाचा पग जातीचा बगिरा. ओरिओ आज हे जग सोडून निघून गेला, नेमका आजच्याच दिवशी आठ वर्षांपूर्वी त्याचा जन्म झाला होता. तो आमच्यासोबत फार काळ नव्हता, तरीही त्याने मला जे काही शिकवले ती माझ्यासाठी सर्वोत्तम भेट असणार आहे. जेव्हा कुणाचातरी वयोमानामुळे मृत्यू होतो, मग तो अगदी तुमचा कुत्राही असेल ज्याचे आयुष्य माणसापेक्षाही कमी असते, तो निसर्गनियम असला तरीही तुम्हाला ते स्वीकारणे जड जाते आणि आठ वर्षे हे काही नैसर्गिकपणे मृत्यू होण्याचे वय नाही, मग तो मृत्यू मधुमेहामुळे झाला असेल किंवा त्यामुळे उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांमुळे, जे ओरिओच्या बाबतीत झाले.

सर्वात पहिली गोष्ट म्हणजे विशेषतः जो कुत्रा आकाराने लहान असतो त्याला आपुलकी व काळजीची जास्त गरज असते, विशेषतः त्यांना जवळ घेणे कुरवाळणे, यामुळे त्यांना शांत किंवा आनंदी वाटते. तुम्ही तसे करू शकत नसाल, तर कृपया तुम्ही घरात कुत्रा ठेवू नका. कारण अशा कुत्र्यांकडे लक्ष द्यावे लागते व त्यांना त्यांच्याभोवती माणसे हवी असतात. नाहीतर ती दुःखी किंवा निराश होतात, त्यामुळे चिडचिडी होतात व भुंकत राहातात. अशावेळी बहुतेक लोकांना असे वाटते की ती भुकेली आहेत, म्हणून त्यांना खाऊ घातले जाते त्यामुळे त्यांचे जास्त खाणे होते व याचा परिणाम म्हणजे मधुमेहासारखा आजार. दुसरी गोष्टी म्हणजे जर कुत्रा आजारी असेल तर कुटुंबातील एखाद्या माणसापेक्षाही त्याची जास्त काळजी घ्यावी लागते कारण त्याला काय होते आहे हे तो सांगू शकत नाही व शांतपणे त्रास सहन करत राहतो किंवा भुंकत राहातो. त्याचे भुंकणे थांबवे यासाठी आणखी खायला घातले जाते, जे विषासारखे काम करते. बहुतेक कुटुंबांमध्ये मुलांच्या इच्छेखातर किंवा आग्रहामुळे कुत्रे पाळले जाते, मात्र नंतर त्या मुलांना कुत्र्याविषयी आपुलकी दाखवणे, त्याला जवळ घेणे यासारख्या त्याच्या मूलभूत गरजांचा विसर पडतो आणि इतर मोठ्यांना तो जाच वाटतो व त्यामुळे असे कुत्रे निराश होते.

आता याचा अर्थ असा होत नाही की कुत्रे पाळूच नका, याचा अर्थ असा होतो की कुत्रे ठेवणे किंवा पाळणे हे एखाद्या व्यक्तीशी लग्न करून आयुष्यभर सोबत राहण्यासारखे असते व तुम्हाला सर्व आघाड्यांवर त्या व्यक्तीची साथ द्यावी लागते. मी हे विशेषतः कुटुंबातील ज्येष्ठांसाठी सांगत आहे, ते कुत्र्याला वाढविण्यासाठी जे काही कष्ट लागतात त्यासाठी नंतर लहान मुलांना दोष देतात. ओरिओच्या घरात असण्यामुळे तसेच त्याच्या अवचित जाण्यामुळे मी अनेक गोष्टी शिकलो ज्यामुळे आपले माणसांसोबतचे सामान्य नातेसंबंध तसेच माझा जीवनाविषयीचा दृष्टिकोन यासंदर्भात डोळे उघडले. अनेक जण विचार करतील की मी हा विषय जरा जास्तीत संवेदनशील होऊन लिहतोच मात्र मी तुमचे विचार नियंत्रित करू शकत नाही, पण त्यामुळे वस्तुस्थिती बदलत नाही, नाही का? जर तुम्ही तुमच्या पाळीव कुत्र्याची जबाबदारीने काळजी घेत नसाल तर तुम्ही तुमच्या अवतीभोवती असलेल्या व्यक्तींशी जबाबदारपणे वागाल व त्यांची काळजी घ्याल व तुमचे कामही जबाबदारपणे कराल अशी अपेक्षा कशी करता येईल? एक पाऊल पुढे जात, ज्या लोकांना कुत्र्यांची आवड नाही, तरीही त्यांच्याकडे कुत्रे असेल तर तुम्ही त्या कुत्र्याला कसे वागवता यावरून तुम्ही तुमची जबाबदारी असलेले कुठलेही काम कसे करता हे ठरते, कारण ते तुम्हाला आवडत नसले तरीही ते तुमच्या कर्तव्याचा भाग असते, बरोबर?

शेवटी तुमच्या कुत्र्याला फक्त तुम्ही त्याच्यासोबत थोडा वेळ घालवावा, त्याची पाठ थोपटावी व एखादे हाड किंवा बिस्कीट देऊन त्याचे लाड करावेत एवढीच अपेक्षा असते, तेवढ्यानेही ते अतिशय खुष होते. आयुष्यातील अडीअडचणींना तोंड देताना व तुमच्या मनाप्रमाणे न झालेल्या शेकडो गोष्टींविषयी तक्रार करताना तुम्हीही याच दृष्टिकोनातून विचार करू शकता. आपल्या भोवती आनंद देणारे शेकडो लहान-सहान क्षण असतात, ते गोळा करायचे की सतत दुःखीच राहायचे हे तुम्हीच ठरवायचे असते. मला असे वाटते इतक्या स्वस्तात तुम्हाला इतका चांगला धडा मिळणार नाही, आणि तुमचा कुत्रा तुमच्या अवतीभोवती राहून तुम्हाला ते शिकवण्यासाठी सतत तयार असतो.

ओरिओ, तू मला जे काही शिकवून गेलास त्यासाठी मी तुझे जितके आभार मानावे तितके कमीच आहेत. आयुष्याविषयी तुझ्या वर्गामध्ये मलाच फारसा वेळ देता आला नाही याचे मनापासून वाईट वाटते रे. कधीतरी, कुठेतरी पुन्हा कदाचित आपली गाठभेट होईलच, तोपर्यंत तू जिथे आहेस तिथे आनंद देत राहा

 

संजय, रोहित, रोशन, निखिल, केतकी व संजीवनीचा चमू

संजय देशपांडे     

संजीवनी डेव्हलोपर्स

ईमेल आयडी - smd156812@gmail.com

 

 

 


डायरी जंगलाची, बांधवगडचे दिवस !





























डायरी जंगलाची, बांधवगडचे दिवस  !

तुमची परिस्थिती कितीही वाईट असली तरीही जेव्हा, तुम्ही जंगलामध्ये व नदीच्या काठावर तीन-चार तास चालता त्यानंतर तुम्ही जिथुन सुरुवात केली त्यासारखी तुमची परिस्थिती अजिबात नसते” … जिम हॅरिसन.

जेम्स हॅरिसन हे अमेरिकी कवी, कादंबरीकार व निबंधकार होते. त्यांनी विपुल व वैविध्यपूर्ण केले असून त्यांची कविता, कादंबरी, ललित, बालसाहित्य व आठवणी अशा विविध प्रकारची तीन डझन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यामुळे बालसाहित्य लेखकाचे मन असलेले जिम जंगलांमध्ये असलेल्या जादूचे वर्णन इतक्या सोप्या शब्दात करू शकतात यात काही आश्चर्य नाही. जंगले आपल्याला नेमके हाच तर अनुभव देतात, म्हणजेच आपल्याला ताजेतवाने करतात, खरतर हा अतिशय अपुरा शब्द ठरेल, तुम्ही जंगलातून परत आल्यानंतर पुनरुज्जीवित होऊन येता असे म्हणणे अधिक समर्पक ठरेल. जवळपास दोन वर्षांच्या अंतरानंतर मी राज्याबाहेर प्रवास करत होतो, आणि भारतीय अभयारण्यांचे दोन मुकुटमणी कान्हा व बांधवगढ या ठिकाणी जाण्यापेक्षा अधिक चांगले काय असू शकते. कान्हाविषयी नंतर लिहीनच, पण मी बांधवगढमध्ये जाण्यासाठी अतिशय उत्सुक होतो कारण एक म्हणजे तिथे वाघांचे अनेक बछडे आहेत हि माहिती मिळाली होती व दुसरे म्हणजे या ठिकाणाला मी शेवटची भेट देऊन जवळपास पाच वर्षे होऊन गेली होती. याचे मुख्य कारण म्हणजे त्याचे भौगोलिक ठिकाण, पुण्याहून जबलपूरला जाण्यासाठी थेट विमान नाही (नव्हते) व कान्हा, पेंच, ताडोबा किंवा यूकेडब्ल्यूही सगळी अभयारण्ये पुण्याहून नागपुरला थेट विमानाने जोडलेली असल्याने प्रवासाचा वेळ वाचला. त्यामुळे बांधवगढचा बेत नेहमी लांबणीवर पडायचा कारण दोन दिवस प्रवासातच जात असत. मात्र जबलपूर ते पुणे थेट विमान सुरू झाल्यानंतर, मी त्या ठिकाणी जायला सज्ज झालो.

या सफारीमध्ये साध्य झालेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे एकाच दिवसात जवळपास २१ वाघ पाहायला मिळाले, जे मी आधीच्या लेखामध्ये लिहीले आहे. मात्र बांधवगढ म्हणजे फक्त वाघ नाहीत, तर हे जंगल सर्व प्रकारच्या भूप्रदेशांचे बनलेले आहे, त्यामुळे तुम्हाला इथे प्रचंड जैवविविधता पाहायला मिळते. अनेक प्रकारची झाडे, झुडुपे (तण), जलाशय, डोंगर व कुरणे असल्याने शाकाहारी प्राण्यांसाठी हे अतिशय उत्तम ठिकाण आहे कारण त्यांना वर्षभर खाद्य उपलब्ध असते. जे एकप्रकारे वाघ, बिबटे, रानकुत्री यासारख्या व इतरही मांसाहारी प्राण्यांसाठी वरदानच असते. त्याचशिवाय काही जंगली हत्ती आहेत जे छत्तिसगढ व ओडिसा येथून दोन-एक वर्षांपूर्वी येथे स्थलांतरित झाले आहेत. या सगळ्यामुळे बांधवगढ हे सर्वार्थाने एक परिपूर्ण जंगल आहे. अर्थातच, वाघ हे या सफारीचा अविभाज्य भाग होते कारण या प्राण्याचा करिश्माच तसा आहे (आणि नशीब आम्हाला साथ देत होते) त्यामुळे मी बांधवगढमधील ३ दिवसांदरम्यान काढलेली जवळपास ८०% छायाचित्रे ही वाघांची आहेत. मला माहिती आहे की बांधवगढमध्ये विपुल जैवविविधता आहे मात्र येनकेनप्रकारेण आम्हाला सतत वाघच दिसत राहिले. आणि जेव्हा ते काळे व पिवळ पट्टे अगदी तुमच्या समोर असतात तेव्हा त्यांच्यावरच कॅमेरा रोखला जाणे स्वाभाविक होते. तरीही आम्हाला जेव्हा वाघ दिसले नाहीत तेव्हा इतर प्रजाती तसेच अधिवासांमध्ये मला अतिशय उत्तम असा काही वेळ घालवता आला.एकाच दिवस २१ वाघ दिसण्यासोबत वाघांसोबतच्या काही रोचक आठवणीही आहेत. त्याचप्रमाणे अभयारण्याच्या व्यवस्थापनामध्ये व संवर्धनाच्या उपक्रमांमध्ये मला काही चांगल्या पद्धती बघायला मिळाल्या, ज्या महत्त्वाच्या आहेत वत्यासांगणे व त्यानुसार सुधारणा करणे महत्त्वाचे आहे.

सर्वप्रथम व सर्वात महत्त्वाचे म्हणजे, वन्य संवर्धन, बांधवगढ व्याघ्र अभयारण्य तीन कोअर विभागांमध्ये पसरलेले आहे व त्याला तीन स्वतंत्र प्रवेशद्वारे असून तीन ते चार प्रवेशद्वारे बफर क्षेत्रामध्ये आहेत. यातील सर्वोत्तम भाग म्हणजे कोअर क्षेत्राच्या आजूबाजूला अतिशय घनदाट जंगल आहे जे वाघांची संख्या व इतर प्रजातींची संख्या वाढण्यासाठी वरदान आहे कारण त्यांना सर्वत्र फिरण्यासाठी जागा मिळते. मात्र वनविभागासाठी हे अतिशय अवघड काम आहे कारण बफर क्षेत्रामध्ये गावे असतात व माणूस व प्राण्यांमधील संघर्ष ही मोठी समस्या असते. मात्र एक चांगली गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या उलट, बांधवगढच्या आसपास कोणतेही उद्योगधंदे किंवा मोठे शहर नाही. त्यामुळे कोअर क्षेत्र व आजूबाजूच्या भागातील गावे व त्यातील लोकसंख्या तुलनेने कमी आहे. कान्हा पासून ते बांधवगढपर्यंत व पुढे जबलपूरपर्यंत जंगलाखाली असलेली सर्व जमीन (बहुतेक) पाहून डोळे सुखावले कारण हि सगळी जोडलेली जंगले म्हणजे वन्य प्राण्यांचे राजमार्ग आहेत. व ते टिकवलेच पाहिजेत. मला आढळलेला दुसरा मुद्दा म्हणजे बहुतेक रस्ते हे जंगलातूनच जात असले तरीही रस्त्यावरील अपघातात प्राण्यांचे मृत्यू होण्याचे प्रमाण अगदी कमी आहे व याचे मुख्य कारण म्हणजे या रस्त्यांवर कमी रहदारी आहे. हे असेच राहावे एवढीच माझी अपेक्षा आहे. कोअर क्षेत्रात प्रवेश करताना मला शेती व कोअर क्षेत्राच्या कुंपणापर्यंत चरत असलेली जनावरे दिसली. या अशा सीमा प्रदेशामध्ये तुम्हाला बिबटे किंवा अस्वले दिसण्याची शक्यता अधिक असते. कारण त्यांना गावातील गुरे-ढोरे व मेंढ्या व बकऱ्यांची शिकार करायची असते. आमच्या सकाळच्या पहिल्या फेरफटक्यातच गवतामध्ये ऊन खात पहुडलेला बिबट्या दिसला, मात्र दुर्दैवाने त्याने आमची जिप्सी येताना पाहिली व तो झटकन उठून पळून गेला. बिबटे हे प्राणी लाजाळू असतात व जेव्हा ते वाघांनी भरलेल्या जंगलात फिरत असतात, तेव्हा ते अतिशय सतर्क असतात व कधीच गाफिल राहात नाहीत. कारण वाघ बिबट्यांचा द्वेष करतात व दिसताच क्षणी त्यांना ठार करतात. याचे कारण म्हणजे, वाघ शिकार करत असताना बिबट्या त्याचे सावज दुसरीकडे वळवतो किंवा ते पळवतो. तसेच तो वाघाच्या लहान बछड्यांचाही शत्रू असतो. ही सर्व कारणे वाघाने त्याच्या हद्दीतील बिबट्याला मारण्यासाठी पुरेशी असतात. बिबट्याकडे वाघाएवढी ताकद नसली तरीही वेग व झाडांवर चढण्याची क्षमता त्याचे रक्षण करते.

मला आढळलेली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, अभयारण्याच्या भोवती असलेल्या सर्व भूभागातील पाण्याच्या उघड्या विहिरी, म्हणजे अगदी कोअर क्षेत्रातल्याही जाळीच्या कुंपणांनी व्यवस्थित सुरक्षित केलेल्या होत्या, ज्यामुळे वन्य प्राणी या विहीरींमध्ये पडत नाहीत. वन्य प्राण्यांच्या मृत्यूंचे विशेषतः उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या शोधात असतांना ते अशा विहिरींमध्ये पडतात हे एक मुख्य कारण आहे. आपल्यालाही आपल्या राज्यामध्ये तसेच सर्व अधिवासांमध्ये याचे अनुकरण करता येईल कारण जंगलातील भूभागातील पाण्याच्या उघड्या विहिरी सुरक्षित ठेवण्याचा तो अतिशय परिणामकारक, स्वस्त व सहज मार्ग आहे. आणखी एक दृश्य पाहून मला आश्चर्य वाटले की या अभयारण्याच्या अवतीभोवती लोक (माणसे) झोपड्यांमध्ये राहात होते, त्यांची मुले उघड्यावर खेळत होती व तेथून जेमतेम १०० मीटरच्या अंतरावर एखादा वाघ झुडुपांमध्ये झोपला असेल किंवा एखादा बिबट्या झाडावर विश्रांती घेत असेल किंवा एखादे अस्वल त्याचे अन्न म्हणजेच वाळवी शोधत असेल. आजूबाजूला वन्यप्राणी असूनही हे लोक अजिबात न धास्तावता आपापली दैनंदिन कामे करत होते. बरेच जण म्हणतील, त्यात काय मोठेसे, त्यांचे आयुष्यच तसे आहे. मात्र मी खरोखरच सांगतो ती देखील आपल्यासारखीच माणसे आहेत. त्यांनाही भीती व चिंता यासारख्या भावना आहेत. विचार करा तुमचा मुलगा घराबाहेर मैदानात खेळतोय व तुम्हाला माहितीय की एक वाघ कदाचित तुमच्या मुलाकडे पाहतोय, आपल्यापैकी कितीजण ही वस्तुस्थिती सामान्यपणे झेलू शकतात? मी कोअर क्षेत्राच्या आजूबाजूला असलेल्या लोकांच्या धाडसाचे पुन्हा एकदा कौतुक केले व आपण सगळ्यांना हे ध्यानात घेतले पाहिजे की इथल्या व्यवस्थेचा भाग असलेले हे लोकच खऱ्या अर्थाने वन्यजीवनाची देखभाल करतात. आपण सगळे त्यांचे काहीना काही देणे लागतो, ही समजुदारपणाची जाणीव हीच जंगलांसाठी खरी भेट आहे!

अशाच एका फेरफटक्यात आम्हाला दोन मोर आपला फुललेला पिसारा एकमेकांभोवती गोलाकार धरून, दोन योद्धे किंवा बॅले नर्तकांप्रमाणे, रस्त्याच्या मधोमध एकमेकांच्या समोर उभे ठाकले होते. ते त्यांच्या या प्रदर्शनामध्ये एवढे गुंग झालेले होते की आम्हाला आमची कार थांबवणे भाग होतो व ते छायाचित्रे निसर्गाची सुंदर जुगलबंदीच (द्वंद्व) होती. हे पक्षी ज्या नजाकतीने एकमेकांभोवती फिरत होते, त्याचे वर्णन करण्यासाठी शब्दही अपुरे आहेत. त्याचशिवाय यावेळी वाघीण बाहेर येताना वाट पाहताना मला लाल रानकोंबडीची छायाचित्रेही टिपता आली, ती एक अतिशय रंगीबेरंगी व सुंदर पक्षी आहे व कॅमेऱ्यासमोर तितकीच लाजते. त्या सामान्यपणे सकाळी किंवा संध्याकाळी उशीरा ये-जा करतात व या दोन्ही वेळी प्रकाश व्यवस्थित नसल्यामुळे छायाचित्रे काढण्यासाठी अनुकूल नसतात. मात्र यावेळी आम्ही एका ठिकाणी थांबलेले होतो व रान कोंबड्यांचा जथ्था चारा टिपण्यासाठी उघड्यावर आला व मला या पक्षाची खरोखरच काही अतिशय सुंदर छायाचित्रे टिपता आली. या सर्व प्रजाती शिकारीमुळे बाह्य जगातून नामशेष होत चालल्या आहेत व त्यांचा अधिवासह नष्ट होत चालला आहे व केवळ अशा जंगलांमध्येच त्यांना शेवटचा आसरा आहे.

मी माझ्या मागील लेखामध्ये रा नावाची वाघीण, एक नर वाघ व त्यांचे बछडे निवांतपणे बसलेले होते व एक रानगवा मध्येच घुसल्याने आम्हाला या वाघांचे दर्शन झाल्याचा उल्लेख केला होता. एका मोठ्या कुत्राच्या आकाराच्या वाघाच्या बछड्याने रानगव्यावर चाल करण्याची ती घटना आता सविस्तर सांगतो. हे वाघांचे कुटुंब निवांतपणे बसलेले असताना रानगवा मध्येच घुसला, तेव्हा वाघ व वाघीण तसेच त्यांच्या दोन बछड्यांनी बाजूला व्हायचे ठरवले व ते पुन्हा सावलीत निघून गेले. मात्र त्यांच्यातील एका बछड्याने त्यांना त्रास दिल्याबद्दल रानगव्याला अद्दल घडविण्याचे ठरवले. तो गवा चरत चरत लांब गेला तसा तो बछडा गवतातून सावकाश येत रानगव्यावर चाल करून गेला, हे पाहूनही रानगवा मात्र स्थिर होता. एक जेमतेम सहा महिन्यांचा बछडा त्याच्याहून आकाराने दहापट मोठ्या नर रानगव्यावर चाल करून जातो हे दृश्य पाहाणेही अतिशय मजेशीर होते, यालाच वाघाची हिम्मत असे म्हणतात. कदाचित आम्हाला काळजी वाटत होती की अति आत्मविश्वासामुळे बछड्याने खरोखरच त्या रानगव्यावर हल्ला केला व त्यामध्ये रानगव्याने त्याला ठार केले तर. मात्र रानगवा व बछड्यामधील अंतर सुमारे १० फूट असताना रानगवा जोरात फुस्कारत, त्यामुळे वाघाचा बछडा घाबरला व पळून गेला. त्यामुळे आम्ही सुटकेचा निःश्वास सोडला, कारण त्या दिवशी बछड्याचा जीव वाचला होता. बछड्याला त्यादिवशी बहुतेक शिकारीविषयी हल्ला मिळाला असावा तो म्हणजे सावज कधीही तुमच्यापेक्षा कोणत्याही प्रकारे बलवान असेल तर त्याला समोरासमोर भिडू नका. पुढे कधीतरी बछडा मोठा होईल व पुन्हा गव्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करेल, मात्र तो आजचा धडा विसरणार नाही असा विचार माझ्या मनात आला.

अशा सगळ्या घटना पाहात असताना तीन दिवस उलटून गेले व शेवटच्या सफारीची वेळ आली तेव्हा या खेपेस एवढे पुरे झाले असा विचार करत असतानाच, एक अंतिम नाट्य आमची वाट पाहात होते. बांधवगढमध्ये जंगली हत्ती आहेत व त्यांनी वन विभागाच्या दोन पाळीव हत्तींचे अपहरण (या शब्दासाठी माफ करा) केले आहे अशी बातमी आम्हाला समजली. हे खरोखरच अतिशय मजेशीर आहे मात्र अशा गोष्टी घडतात, जंगली हत्तींचा कळप या पाळीव हत्तींना भुलवून कदाचित घेऊन गेला असावा व वन विभाग त्यांच्या हत्तींना शोधण्यात गुंग होता. इतर सर्व जिप्सी एका पाणवठ्याकडे निघाल्या होत्या जिथे वाघीण विश्रांती घेत होती, त्यावेळी आम्ही दुसऱ्या एका पाणवठ्यावर वाट पाहण्याचे ठरवले जेथे मध्यम-वयात आलेल्या नर वाघांची ये-जा होती व त्यांचे कुटुंब आधी तेथे दिसले होते. इथे आम्हाला दोन हत्ती दिसले, एक मोठे हस्तीदंत असलेला होता व दुसरा लहान हस्तीदंत असलेला होता. ते पाहून आमचा गाईड व ड्रायव्हर म्हणालासर, “ये जंगली हाथी है, फॉरेस्टवाले हाथी को ले जा रहें हैंम्हणजेच, साहेब, हे जंगली हत्ती आहेत व वनविभागाच्या हत्तींना घेऊन जात आहेत”. अशावेळी हत्ती खरोखरच अतिशय धुडगूस घालू शकतात. जेव्हा या जंगली हत्तींना आमच्या जिप्सीची जाणीव झाली ते आमच्या दिशेने येऊ लागले त्यामुळे आम्ही व आणखी एक जिप्सी वेगाने तिथून निघून गेलो. असे दोन वेळा झाले, आम्हाला वाटले की हत्ती निघून गेले आहेत व ते पाणवठ्याच्या दिशेने निघाले, पुन्हा जंगली हत्ती घनदाट झाडीतून बाहेर आले व त्यांनी आम्हाला हुसकावून लावले व शेवटी तेच निघून गेले. मी खरोखरच सांगतो, जंगली हत्तींचे चित्कारणे व तुमच्या दिशेने पळत येणे याहून अधिक भीतीदायक काहीही नसते, कारण ती मैत्रीपूर्ण भेट नाही हे तुम्हाला माहिती असते, हाहाहा!

ही सर्वउत्सुकता (किंवा थरार हा योग्य शब्द होईल) सार्थ ठरली, कारण दोन वयात आलेले नर वाघ पहुडले होते व त्यांनी एकमेकांकडे पाहिल्यावर गाईड म्हणाला ते सावत्र भाऊ आहेत व आता पाण्यामध्ये खेळतील. मात्र ते ज्याप्रकारे एकमेकांकडे पाहात होते, मला खात्री आहे की ते खेळकर मनस्थितीमध्ये नव्हते तर त्यांच्या नजरेत प्रतिस्पर्ध्याचे भाव होते. हळूहळू दोन्ही नर वाघांनी एकमेकांच्या दिशेने यायला सुरुवात केली व क्षणार्धात ते गुरगुरत, डरकाळ्या फोडत, पंजे मारत एकमेकांवर तुटून पडले. त्याचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे खरोखरच शब्द नाहीत. कारण ही लढाई एका मिनिटात संपली जो कमजोर होता त्याने खाली बसून आपली हार मान्य केली व हळूहळू ते दोघे चालत जंगलात नाहीसे झाले! मी खरोखरच सुदैवी आहे की मला हा दुर्मिळ अनुभव पाहायला मिळाला जे वन्यजीवनाचे कटू सत्य आहे; की ते भाऊ असले तरीही जंगलामध्ये केवळ एकच वाघ असू शकतो व तुमचे रक्तही तुमचा शत्रू ठरते.

मला असे वाटते, अनेक प्रकारे, जंगल आपल्या शहरी जीवनातील घटनांचेच प्रतिबिंब आहे व आपला सर्वोत्तम गुरू आहे. तुम्हाला कधी, कुठे, कुठला धक्का बसेल हे तुम्हाला सांगता येणार नाही. यामध्ये टिकून राहण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे नेहमी जमीनीवर पाय घट्ट रोवून उभे राहणे व सतर्क राहणे. ही शिकवण मनात रुजवूनच मी बांधवगढमधून बाहेर पडलो, पुढच्या वर्गासाठी लवकरच परत येण्याचे आश्वासन देऊनच!

संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलोपर्स

ईमेल आयडी - smd156812@gmail.com