Wednesday, 2 June 2021

मदर्स डे,जंगल बेल्स व वन्य जीवनासाठी आशा !

 





























केवळ एक व्यक्ती एकटी कदाचित काहीच बदल घडवू शकणार नाही. मात्र सामूहिकपणे प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न केले तर काहीतरी लक्षणीय बदल घडू शकतो आणि त्याची सुरुवात एका व्यक्तीपासूनच होते!- जगातील सर्व बदल असाच घडतो!”...डॉ. जेन गुडॉल

गुडॉल, चिंपांझी माकडे या विषयावरील जगातील पहिल्या अभ्यासक मानल्या जातात, त्यांचा चिंपांझींचा सामाजिक कुटुंबांमधील संवाद याविषयावर ६०- वर्षे अभ्यास असल्याने वरील शब्दांना अतिशय महत्त्व आहे. एक लक्षात घ्या त्यांनी जेव्हा पन्नास वर्षांपूर्वी आफ्रिकेच्या घनदाट जंगलात जाऊन, माकडांच्या एका प्रजातीचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला तेव्हा असे करणाऱ्या त्या एकमेव महिला होत्या. त्यानंतर ही माकडे चिंपांझी म्हणून प्रसिद्ध झाली. खरोखरच अशा काही झपाटलेल्या महिला (माता) होत्या आहेत म्हणूनच वन्यजीवनासाठी आशा टिकून आहे जे निसर्गाचे सर्वसुंदर रूप आहे. अलिकडेच आरती हेमांगी या दोन शहरात राहणाऱ्या महिलांनी जंगल बेल्स नावाची संस्था सुरू केली. माझ्या या दोन वन्यजीवप्रेमी मैत्रिणींनी सुरू केलेली ही संस्था शहरातील महिलांना वन्यजीवनाविषयी, जंगलांविषयी माहिती व्हावी यासाठी त्यांच्या सहली आयोजित करते. जंगले म्हणजे केवळ ताडोबा किंवा कान्हासारखे व्याघ्र प्रकल्प नाही तर वन्यजीवन असलेल्या स्थानिक अनेकजागांचाही यामध्ये समावेश होतो. त्यांचे हे काम दोन कारणांनी अतिशय आव्हानात्मक आहे, एक म्हणजे आपल्या देशात तुम्ही केवळ महिलांसाठी काहीही आयोजित केले (याला केवळ सेलचा म्हणजेच खरेदी महोत्सवाचा अपवाद आहे) तरी महिलांकडे (अगदी तथाकथित स्वावलंबी महिलांकडेही) कार्यालयापासून ते घरापर्यंत सहभागी होण्यासाठी हजारो कारणे असतात (उदाहरणार्थ मुले, सासु-सासरे, नवरा यापैकी काही कारणे नसतील तर कामवाली सुट्टीवर आहे) मी या प्रत्येक कारणाचा आदर करतो. दुसरे म्हणजे, महिलांना फक्त स्वतःसाठी जेव्हा निसर्गात (जंगलात) भटकंती करण्यासाठी वेळ काढायचा असतो, तेव्हाही, “आत्ता काय गरज आहे?” असा प्रश्न विचारला जातोच.

अशा परिस्थितीतही आरती हेमांगी केवळ महिलांना वन्यजीवनाची ओळख करून देण्यासाठी जो प्रयत्न करत आहेत तो " काबिले तारीफ " आहे. या लॉकडाउनच्या वेळी प्रत्येकजण आपल्या काँक्रीटच्या जंगलात बंदिस्त असताना, त्यांनी घरी असलेल्या महिलांना जंगलाच्या जवळ आणण्यासाठी व्हर्च्युअल (आभासी) प्लॅटफॉर्मचा उपयोग केला. हे करताना थोडे पैसे कमवले तर काही हरकत नाही, हा अतिशय चांगला स्टार्ट-अप व्यवसायही आहे, ज्यामुळे ही संकल्पना व्यवहार्य होऊ शकते. त्यांनी मदर्स डेच्या निमित्ताने असाच एक वेबिनार आयोजित केला होता, यामध्ये विविध वयोगटातील, वेगवेगळी पार्श्वभूमी व्यवसाय असलेल्या पाच महिला पाहुण्या वक्त्या म्हणून सहभागी झाल्या होत्या, त्यांनी निसर्गाच्या मार्गावरील त्यांचा प्रवास सांगितला. या पाहुण्यांमध्ये पहिल्या होत्या, वैजयंती गाडगीळ, ज्या फेसबुकवर एक निसर्ग गट चालवतात आपल्या काही मैत्रिणींसोबत जंगलांमध्ये भरपूर भटकंती करतात. दुसऱ्या पाहुण्या होता समँथा सिरोही त्या स्वतः एक उद्योजिका अभिनेत्रीही आहेत. त्यानंतर स्वप्ना मराठे या एक गृहिणी होत्या ज्यांना वन्यजीवन छायाचित्रणाचा छंद आहे. त्यानंतर शिल्पा देशपांडे होत्या, ज्या पुण्यातील एका अग्रगण्य जाहिरात संस्थेच्या (सेतू ॲड्स) भागीदार आहेत गेली अनेक वर्षे नियमितपणे जंगलात भटकंती करत आहे पक्षी निरीक्षण हा त्यांचा छंद आहे. पाहुण्यांमध्ये परिधी जालान नावाची एक तरुण मुलगी होती, ती अजून विद्यार्थी असूनही निसर्ग संवर्धनाविषयी आपल्या जबाबदारीची तिला जाणीव आहे तिला पर्यावरण हेच करिअर म्हणून निवडायचे आहे. या सर्व महिला जंगलाविषयी अतिशय सवेंदनशील होत्या, मी जाणीवपूर्वक त्यांचे वय नमूद केलेले नाही (महिलांचे वय सांगणे हे सभ्यपणाचे नाही , हा विनोदाचा भाग आहे), परंतु एक परिधी सोडली तर इतर सगळ्या आई पण  आहेत, त्यांना त्यांच्या वैयक्तिक संसारिक जबाबदाऱ्या आहेत ही बाब सगळ्यात महत्त्वाची आहे.

आता बरेच जण म्हणतील की आपल्याकडे महिला दिन असतो, त्यामुळे आता या मदर्स डेचे काय नवे, आपण असे दिवस साजरे करून महिलांचे जरा जास्तच उदात्तीकरण करत नाही का, कारण आई होणे हा शेवटी स्त्रीत्वाचाच एक भाग आहे, नाही काअसो, “कुछ तो लोग कहेंगे” (लोग म्हणजे पुरुष) मात्र लोकहो विचार करा निसर्गाचा उल्लेख करताना, इंग्रजीतमदर नेचर म्हणजेच निसर्ग माता असा करतात. त्यामुळेच निसर्गाच्या संवर्धनात एका आईचे किंवा कोणत्याही महिलेचे महत्त्व मी आणखी सविस्तर सांगायची गरज आहे काआपल्यापैकी प्रत्येक जण ज्याप्रकारे मोठे होतो मग ते चांगले असो किंवा वाईट (वैयक्तिक दृष्टिकोन) त्याचप्रमाणे त्यामागील  त्यातील आईच्या भूमिकेचे कौतुक होते किंवा तिला नावे ठेवली जातात. नेमके याच कारणासाठी, एक आई असल्याने महिलेची निसर्गाच्या संवर्धनातील भूमिका महत्त्वाची आहे. कारण जेव्हा एखादा पुरुष वन्यजीवप्रेमी होतो किंवा वन्यजीवन छायाचित्रकार किंवा पर्यावरणवादी होतो तेव्हा तो केवळ तेच काम करत असतो (बहुतेक वेळा), त्याच्यावर इतर कोणत्याही जबाबदाऱ्या नसतात. तो त्याला ज्याविषयी तळमळ वाटते त्यासाठी झटून काम करतोमी काही पुरुषांचा अपमान करत नाहीये किंवा त्यांची निसर्गासाठीची तळमळ ही वैयक्तिक असली तरी प्रत्येक प्रयत्न तितकाच महत्त्वाचा असतो, माझे फक्त एवढेच म्हणणे आहे की जेव्हा महिला (म्हणजे आई) निसर्ग संवर्धनासारखा विषय हाती घेते तेव्हा संवर्धनाविषयीचा संपूर्ण समाजाचा दृष्टिकोनच बदलतो. सर्वप्रथम, महिलेला निसर्गासाठी (जंगलासाठी) वेळ काढावा लागतो तिला संपूर्ण कुटुंबाला समजवावे लागते ( कार्यालयामध्येही) की आपल्या जगण्यासाठी निसर्ग हा अतिशय महत्त्वाचा पैलू आहे. जेव्हा एखादी आई आपली आवड म्हणून जंगलाची वाट धरते तेव्हा संपूर्ण कुटुंबाला (संपूर्ण जगाला नसली तरीही) त्याच मार्गाने नेण्याची क्षमता तिच्यामध्ये असते, म्हणूनच जास्तीत जास्त मातांनी जंगलाला भेट दिली पाहिजे. याचसाठी जंगल बेल्सचे काम अतिशय महत्त्वाचे आहे या पाच महिलांनी जंगलातील त्यांच्या भटकंतीविषयी सांगितलेले अनुभवही तितकेच महत्त्वाचे आहेत.

या पाचही महिलांपैकी कुणीही जागतिक दर्जाचे छायाचित्रकार नाही अथवा वन्यजीव क्षेत्रातील तज्ञ नाही पण त्याची खरेतर आवश्यकताही नाही. वैजयंती मॅडमचेच उदाहरण घ्या, त्या एका उत्तम व्यवसायातून निवृत्त झाल्या, दोन मुलींची लग्न झाल्याने आता आयुष्यातही स्थिरस्थावर आहेत, स्वतःच्या राहत्या घराशिवाय एक फार्महाउस आहे, असे छान आयुष्य आहे. त्यांना जो काही मोकळा वेळ मिळाला त्यामध्ये त्यांनी आपली आवड जोपासली जंगलांमध्ये भटकंती करायला सुरुवात केली त्या इतरांनाही यासाठी प्रोत्साहन देतात. त्या एक अतिशय उत्तम छायाचित्रकार आहेत, त्या त्यांच्या फार्महाउसच्या परसदारी नियमितपणे येणारे पक्षी इतर प्रजातींची छायाचित्रे काढतात. दुसरीकडे समँथाने एक-दोन वर्षे आधीपर्यंत कधीच जंगलांना भेट दिली नव्हती मात्र आता जंगल बेल्सद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या पुण्याच्या जवळपास केल्या जाणाऱ्या भटकतींमध्ये नियमितपणे सहभागी होते तिला त्या ट्रिप्स अतिशय आवडतात. स्वप्ना ही गृहिणी असून तिने वन्यजीवन छायाचित्रणाचा छंद जोपासलाय तो खरोखर तिच्यासाठी अतिशय सुखद बदल होताएरवी कंपनीच्या ताळेबंदाच्या आकडेवारीमध्ये गुंग असलेली शिल्पा आता कॅमेरा शटरचा वेग, एक्स्पोजरवगैरे बाबींविषयी बोलते आणि आपली पक्षीनिरीक्षणाची आवड अतिशय अभिमानाने दाखवते. वयाने अतिशय लहान असलेली परिधी, शाश्वत विकास पृथ्वीच्या भवितव्याविषयी बोलते. तिच्या वयात मला या शब्दांची ओळखही नव्हती. हे सगळे किती छान आहे कि नाही ! , मला असे वाटते पुरुषांनी ( कुटुंबातील इतरांनी तसेच सहकाऱ्यांनीही) प्रत्येक आईला स्वतःसाठी तसेच निसर्गाच्या संवर्धनासाठी वेळ काढायला सांगितले पाहिजे, किमान एवढेतरी आपण नक्कीच करू शकतो.

वर उल्लेख केलेल्या पाचही महिलांनी एकच संदेश दिला, त्या निसर्गासाठी किंवा जंगलात भटकंती करण्यासाठी जो वेळ काढतात तो त्यांनी स्वतःसाठी काढलेला सर्वोत्तम वेळ असतो, यामुळे त्यांना पुन्हा ताजेतवाने होता येते! आईलाही जरा विरंगुळ्याची गरज असतेच, आणि त्यासोबतच एखादी आई ही पृथ्वी जगण्यासाठी अधिक चांगली जागा व्हावी यासाठी प्रयत्न करत असेल तर, मला असे वाटते जंगले हजारो प्रजातींसाठी याहून अधिक चांगले काय असू शकतेजंगल बेल्सचे त्यांनी आयोजित केलेल्या वेबसंवादात सहभागी झालेल्या पाचही महिलांचे त्यांनी निसर्गाविषयी त्यांचे अनुभव सांगितल्याबद्दल खूप आभार. नक्कीच त्यांच्यामुळे इतरही अनेक मातांना त्यांच्याच मार्गाने जाण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, म्हणूनच निसर्गासाठी अजूनही थोडी आशा जिवंत आहे.

मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की संजीवनीची टीम जंग बेल्स वन्यजीवन संवर्धनाच्या कार्यात सहभागी आहे, खारीचा वाटा सही


You can read in English version:

http://visonoflife.blogspot.com/2021/05/mothers-day-jungle-belles-hope-for-wild.html 



संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स 

smd156812@gmail.com



No comments:

Post a Comment