Saturday, 5 June 2021

व्यवसाय, सरकार आणि लॉकडाऊन !

 






















































माणसाची हिंमत म्हणजेच भविष्यातील अनिश्चिततेला उत्सुकतेने आशेने तोंड देण्याची क्षमता ! समस्या सोडवल्या जाऊ शकतात, मतभेद दूर केले जाऊ शकतात हा विश्वास असतो. तो एकप्रकारचा आत्मविश्वास असतो. तो नाजूक असतो. भीती अंधविश्वासामुळे तो क्षणार्धात गळून पडू शकतो”... बर्नाड बेकेट

बर्नाड बेकेट हा न्यूझिलंडमधील तरुणांसाठी कादंबऱ्या लिहीणारा लेखक आहे. त्याच्या लेखनामध्ये प्रामुख्याने कादंबऱ्या नाटकांचा समावेश आहे. बेकेटने बऱ्या च शैक्षणिक संस्थांमध्ये नाटक, गणित इंग्रजी या विषयांचे अध्यापन केले आहे. माझ्या इन्स्टाग्रामच्या अकाउंटवर अलिकडेच एक पॉप-अप आले त्यानंतर ते नियमितपणे येत आहे. तो एका बिझनेस स्कूलचा प्रोमो आहे लॉकडाउननंतर कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये तेजी येईल याविषयी हा प्रोमो आहे. मी जाणीवपूर्वक साथ संपल्यावर किंवा कोरोनानंतर अशा शब्दप्रयोगाऐवजी लॉकडाउननंतर असा शब्द वापरलाय, कारण मी जे काही वाचले आहे किंवा विविध तज्ञांकडून (काही खरेखुरे काही स्वघोषित) जे ऐकले आहे त्यानुसार हा विषाणू आणखी काही काळ तरी राहणार आहे. आपण केवळ लॉकडाऊन संपवू शकतो कारण (किमान अशी आशा तरी आहे) कारण लॉकडाऊन मानवनिर्मित आहे, म्हणूनच या पैलूवर लक्ष केंद्रित करू असा विचार मी केला. बहुतांश लोकांनी, हळूहळू या विषाणूचे अस्तित्व (धोका) स्वीकारले आहे. हे एखाद्या जंगलात राहण्यासारखे आहे जेथे वाघ किंवा बिबट्या मुक्तपणे फिरत असतात त्यामुळे तुम्ही धास्तावलेले असता. तुम्हाला काही शेत वाघाचे दर्शन होत नाही तसेच तुम्हाला माहिती असते की जोपर्यंत तुमची वाघाशी प्रत्यक्ष गाठभेट होत नाही किंवा    तुम्ही त्याच्या वाटेला जात नाही किंवा त्याला त्रास देत नाही तोपर्यंत वाघ तुम्हाला काही अपाय करणार नाही आणि शेवटी तुम्ही वाघाची भीती बाजूला ठेवून सामान्यपणे आयुष्य जगायला शिकताच! यालाच आपण वन्यजीवनामध्ये सहजीवन असे म्हणतो, बरोबर त्याचवेळी माणूस, वाघ किंवा बिबट्यांच्या अस्तित्वाचा वापर पर्यटनासारख्या व्यावसायिक हेतूंनी करून स्वतःचे जीवनमान कसे सुधारायचे हेदेखील शिकला. इथेही अशीच परिस्थिती आहे, तुम्हाला विषाणू दिसत नाही, तरीही तुम्हाला त्याचे अस्तित्व जाणवू शकते आणि तुम्ही किती दिवस, आठवडे, महिने, वर्षे विषाणूपासून लपून राहणार आहात, असा प्रश्न मला आपल्या सगळ्यांना विचारावासा वाटतो!

मी वर उल्लेख केलेल्या त्या बिझनेस-स्कूलच्या प्रोमोमध्ये विषाणूसोबत राहणे म्हणजे काय हे लोकांना समजावे यासाठी त्या प्रोमोमध्ये जंगलाऐवजी दुसऱ्या जागतिक महायुद्धाचे उदाहरण देण्यात आले होते. संपूर्ण युरोपात किंवा पौर्वात्त्य देशांमध्ये सगळेजण आपल्या घरावर कधीही बाँबहल्ला होऊ शकेल या भीतीखाली जगत होते. आयुष्य अनेक वर्षे अशाच परिस्थितीत सुरू होते. वाघाचा वावर असलेल्या जंगलात राहणे असो किंवा दुसरे जागतिक महायुद्ध, यामध्ये एक समान दुवा आहे तो म्हणजे एकदा का तुम्ही भीती स्वीकारलीत त्यासोबत जगायला शिकलात की मगच तुम्ही चांगल्या आयुष्याचा विचार करू शकता आहे त्या परिस्थितीचा वापर आयुष्य अधिक चांगले करण्यासाठी करू शकता आणि मग प्रत्येक युद्धानंतर पुन्हा एकदा समृद्धी येते, मात्र त्यासाठी आधी तुम्ही युद्धामध्ये टिकाव धरला पाहिजे. आजच्या परिस्थितीचा विचार करता हे युद्ध काही काळापासून सुरू आहे मात्र त्यासोबच आयुष्यही सुरू आहे व्यवसायही, खरंतर व्यवसाय हे एकप्रकारे जीवनच आहे कारण तुम्हाला (म्हणजे लोकांना) जगत असताना फक्त अन्न, वस्त्र निवाराच नाही तर अजूनही अनेक गोष्टी हव्या असतात यालाच आपण मागणी असे म्हणतो, बरोबर?  सध्या बहुतेक व्यवसायांमध्ये आपण केवळ विषाणूच्या दुसऱ्या लाटेलाच तोंड देत नाही आहोत तर, भीती गोंधळाच्याच पहिल्या लाटेला तोंड देतोय. तिला तोंड देणे अधिक महत्त्वाचे आहे. विषाणूची पहिली लाट आली तेव्हा आपण अधिक खबरदारी घेत होतो, तसेच उत्सुकही होतो कारण शत्रूचा खरा चेहरा आपण पाहिलेला नव्हता. आपल्याला असे वाटले की काही दिवसात आपण हे युद्ध जिंकू. मात्र हळूहळू सत्य पचनी पडू लागले कोणत्याही दीर्घकाळ चालणाऱ्या युद्धामध्ये जसे शत्रूसैन्य तुमच्या किल्ल्याच्या तटबंदीवर सतत मारा करत राहिल्याने तुमचे शारीरिकच नाही तर मानसिकही खच्चीकरण करते हळूहळू युद्धात पराभव होईल अशी भीती जाणवू लागते; त्याचप्रमाणे संपूर्ण समाजातही सध्या तशीच परिस्थिती आहे.

व्यावसायिकांना तर दुहेरी भीतीला सामोरे जावे लागत आहे, एक म्हणजे विषाणूची दुसरी म्हणजे होणाऱ्या नुकसानाची (सध्याचे भविष्यातील), त्याचप्रमाणे व्यवसाय चालविण्याचा आत्मविश्वासही पुन्हा मिळवायचा आहे. इथेच आपल्याला सेनाप्रमुखाची किंवा कप्तानाची गरज असते ही भूमिका सरकारने पार पाडावी अशी अपेक्षा असते. मुख्यमंत्री, पंतप्रधान अशा तथाकथित उच्च पदांवर बसलेल्या व्यक्तींविषयी आदर राखत असे म्हणावेसे वाटते की नेमकी हीच भूमिका योग्यपणे  पार पाडली जात नाहीये. मात्र म्हणूनच स्वतःचा व्यवसाय असलेले लोक कदाचित सामान्य लोकांपेक्षा म्हणजेच पगारदार, तज्ञ, नोकरशहा यांच्यापेक्षा वेगळे असतात. यापैकी कोणत्याही वर्गातील व्यक्तीविषयी माझ्या मनात कटुता नाही. मी प्रत्येक माणूस तो किंवा ती जे काही करत आहेत यासाठी त्यांचा आदर करतो. अगदी गृहिणींनाही आपली कुणीही दखल घेत नाही असे वाटत असले तरीही त्या समाजातील सर्वात महत्त्वाचे काम करत असतात. ते म्हणजे एक मजबूत सुसंस्कृत कुटुंब तयार करणे. मला असे म्हणायचे आहे की व्यावसायिक लोक वेगळे असतात, लष्करामध्ये ज्याप्रमाणे सैन्याची फळी विभाग असतात, कृती दले असतात, विशेष मोहिमा पार पाडणारे कमांडो असतात ज्यांनी नेतृत्व करणे शत्रूची फळी मोडून काढणे अपेक्षित असते, ज्यामुळे बाकी सैन्यही जोमाने लढू शकते. त्याचप्रमाणे आता व्यावसायिक लोकांनीही समाजाचे मनोधैर्य उंचावण्यासाठी नेतृत्व करण्याची वेळ आली आहे. असो, त्यानंतर मी वर्तमानपत्रातील आणखी एक मथळा वाचला, ज्यामध्ये विविध क्षेत्रातील व्यावसायिक समूदाय त्यांच्या व्यवसायाला पुन्हा ठामपणे उभे राहता यावे याकरता सरकारकडून मदत मागत होते अशी बातमी होती. इथेही युद्धाच्या वेळी वापरल्या जाणाऱ्या तंत्राचा विचार केला पाहिजे कारण जर सरकार सेनाप्रमुख असेल तर त्यांनी आपले कमांडो दल निश्चित केले पाहिजे (म्हणजे केलेच पाहिजे) ज्यामध्ये व्यावसायिक वर्गाचा समावेश असेल त्यांना पुरेसा दारुगोळा दिला पाहिजे म्हणजे ते शत्रूवर पूर्ण शक्तिनिशी हल्ला करू शकतील त्यानंतर संपूर्ण समाजही स्थैर्याच्या दिशेने वाटचाल करू लागेल!

मात्र दुर्दैव असे की जंगलात राहणे किंवा दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या वेळची परिस्थिती यातील साम्य इथेच संपते. सरकार सेनाप्रमुखांसारखे असले तरी दुर्दैव म्हणजे शत्रू किंवा स्वतःच्याच सैन्याला कसे हाताळावे हे त्यांना अजिबात समजत नाही तेच अतिशय त्रासदायक आहे. मी एक व्यावसायिक आहे (त्यातही बांधकाम व्यावसायिक आहे) सध्याच्या परिस्थितीत जर मला माझ्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करायचे असेल तर मला काम करण्यासाठीचे पोषक वातावरण हवे, त्याचप्रमाणे धोरण आखणे, माझा दारुगोळा म्हणजेच वित्तपुरवठा हवा, व्यवसाय सुलभता हवी (मला माहितीय हा विनोदाचा विषय झालाय, तरीही) म्हणजेच माझ्या व्यवसायाशी निगडित योग्य धोरणे तयार केली पाहिजेत व्यावसायिक म्हणून मला ज्या अधिकाऱ्यांना तोंड द्यावे लागते त्यांच्याकडून मानसिक आधार हवा आहे. बस्स एवढेच मिळाले तर मी कोणत्याही भीतीशिवाय भविष्याला सामोरे जायला सज्ज आहे. माझ्यासारखाच प्रत्येक व्यावसायिक पुरुष अथवा महिलेला थोडाफार आधार हवा आहे. प्रिय मायबाप सरकार, कृपया ही साधी गोष्ट समजून घ्या की आम्ही लॉकडाउनचा आदर करतो, विषाणूवर रामबाण उपाय असलेल्या लसींच्या पुरवठासाखळीचा अजून गोंधळ आहे हे आम्हाला समजते. मात्र योग्य प्रकारे व्यवसाय करण्याच्या आमच्या क्षमतांवर थोडाफार विश्वास ठेवला जावा एवढेच आम्हाला हवे आहे, मात्र नेमके तेच होताना दिसत नाही.  ज्याप्रमाणे जंगलाभोवती राहणारे लोक वाघासोबत जगायला शिकतात त्याचप्रमाणे आता आपण व्यवसाय सुरू केले पाहिजेत; ज्याप्रमाणे एखाद्या विशेष कृती दलाला बंदुका दिल्या जातात त्याचप्रमाणे आम्हाला योग्य धोरणांच्या स्वरुपात दारुगोळा हवा आहे. त्यानंतर पाहा आम्ही समाजाच्या मनातील भीतीवर मात करू शकू जो सध्या सर्वात मोठा शत्रू आहे. प्रिय मायबाप सरकार आम्हाला माहिती आहे संपूर्ण जीवनचक्र रखडले आहे. सध्या सामान्य माणूस केवळ किराणासामान औषधांशिवाय दुसरे काही खरेदी करू शकत नाहीत. ही परिस्थिती अशीच राहिली तर फक्त विषाणूमुळे आपण मरणार नाही तर आपण स्वतःच ते काम केलेले असेल. याचा अर्थ असा होत नाही की निष्काळजी व्हा आपल्याला हवे ते करा, पण याचा अर्थ असा होतो की लोकांवर विश्वास ठेवा, त्यांच्यात विश्वास निर्माण करा कारण केवळ सरकार (राजकारणी नोकरशहा) आयुष्य पुन्हा पूर्वपदावर आणू शकणार नाहीत; केवळ व्यापार-उदिमांद्वारेच हे शक्य होईल.

रिअल इस्टेट, शिक्षणक्षेत्र, ऑटो उद्योग, होटेल/उपाहार गृहे, लघु उद्योग, एक खिडकी उद्योग (धोबी, शिंपी, ब्यूटी पार्लर इत्यादी), पर्यटन, माध्यम, तंदुरुस्ती इतरही वैगवेगळी क्षेत्रे निश्चित करा. या सर्व व्यवसायांच्या संचालनासाठी एकदाच स्पष्ट मार्गदर्शक तत्वे तयार करा. देशातील निष्पाप नागरिकांना गंडा घालून देशाबाहेर पळून जाणाऱ्या तथाकथित व्यावसायिकांना लाखो रुपये देण्याऐवजी गरजू व्यावसायिकांसाठी तुमच्या बँकेतील चलनाचे राखीव साठे खुले करा त्याचे योग्यपणे व्यवस्थापन करा. व्यवसाय करण्यासाठी योग्य ते नियम बनविल्यानंतर, तुमच्या अंमलबजावणी करणाऱ्या चमूंना (पोलीस, आणखी कोण) सकाळच्या फेरफटक्यासाठी निघालेल्या लोकांऐवजी खऱ्या अर्थाने त्रासदायक नियमभंग करणाऱ्या व्यवसायांवर लक्ष केंद्रित करायला सांगा, यामुळे परिस्थिती वेगाने सामान्य होऊ शकेल. त्याचवेळी फक्त रिअल इस्टेटसाठी नाही तर सर्व व्यवसायांसाठी, आपण शत्रूसोबत जगायला शिकले पाहिजे असे आवाहन मी करेन. कारण आपण योग्य कृती केली नाही तर कुणीही आपले आयुष्य सुधारायला येणार नाही ही वस्तुस्थिती आहे. पुण्यातील रिअल इस्टेट उद्योगाचे अतिशय उज्ज्वल भविष्यात आहे, कारण घरांचे मागणी ही असणारच आहे, त्यासाठी आपण वेळी योग्य पाऊल उचलणे आवश्यक आहे. म्हणूनच जमीनींचे अनावश्यक साठे करणे टाळा, तुम्हाला काय विकायचे आहे यापेक्षाही ग्राहकाला काय हवे आहे याचा विचार करा. कारण इथून पुढे पै पै काळजीपूर्वक खर्च केला जाईल पैशांचा पुरेपूर मोबदला हा यापुढच्या काळातील मंत्र असेल. आजूबाजूला सुरू असलेल्या इतर प्रत्येक व्यवसायाला हाच तर्क लागू होतो कारण आपण भारतीय एकप्रकारे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण ग्राहक आहोत, आपण अतिशय झपाट्याने पूर्वपदावर येतो आपली स्मरणशक्ती अतिशय अल्प असते जो एकप्रकारे शापच आहे मात्र व्यवसायासाठी वरदान आहे. आपण अनावश्यकपणे नको त्या गोष्टींवर केवळ इतरांसमोर (म्हणजेच समाजापुढे) फुशारक्या मारण्यासाठी खर्च करतो, मात्र ज्या खरोखरच अत्यावश्यक आहेत (घरासारख्या) त्या गोष्टींच्या मूळ हेतूबाबतच तडजोड करून घासाघीस करायचा प्रयत्न करतो.

शेवटचा मुद्दा म्हणजे, सर्व व्यावसायिक समूदायाच्यावतीने पूर्णपणे आदर राखत मला सरकारला असे सांगायचे आहे की, तुम्हाला निश्चितपणे अनेक समस्यांना तोंड द्यायचे आहे, मात्र सरकारची मूलभूत व्याख्या विसरून चालणार नाही की ते लोकांनी, लोकांचे, लोकांसाठी बनवलेले असते; म्हणूनच जर लोकच टिकले नाहीत तर कोणतेही सरकारही टिकणार नाही, हे लक्षात ठेवा!

--

You can read in English version:

http://visonoflife.blogspot.com/2021/05/business-government-lockdown.html

 

संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स 

smd156812@gmail.com


No comments:

Post a Comment