Wednesday 13 April 2022

गवताळ प्रदेशांचे अधिवास वाचवताना !

 



















 

"जंगले ही फक्त भटकंती करून समजत नाहीत, तर जंगले हे जीवन बनवावे लागते, त्यांना समजण्यासाठी"...कर्टनी एम.प्रायव्हेट

 

खरंच, श्रीमती कर्टनी यांनी जंगलाविषयी जे लिहीले आहे ते किती योग्य आहे कारण मी स्वतः अनेकदा जंगलात राहिलोय. किंबहुना मी जंगलात घालवलेल्या प्रत्येक क्षणी मी जंगलात केवळ पाहून , ऐकून, किंवा वास घेऊन नये तर जंगलाशी एकरूप कसे व्हावे हे मी शिकलो आहे. कारण त्यानंतर तुम्हाला कोणता प्राणी किंवा पक्षी पाहायला मिळाला किंवा एखादी प्रजाती किती दुर्मिळ आहे याने फारसा फरक पडत नाही. तुम्ही फक्त प्रत्येक क्षण अनुभवायचा असतो तुम्ही या जंगलात राहू शकताय म्हणून किती नशीबवान आहात यासाठी देवाचे आभार मानायचे असतात. आता तुम्हाला असे वाटत असेल की मी थोडे तात्विक किंवा भावनिक बोलतोय (किंवा थोडे नाटकी बोलतोय), पण मी स्वतःला रोखू शकत नाही. माझ्यावर जंगलांची मोहिनीच तशी असते. मला आजकाल जंगलाचे गवताळ प्रदेशही अतिशय आकर्षित करतात कारण, मला प्रत्येक वेळी त्यांची काहीतरी नवीन जादू समजते किंवा गुप्त खजिना गवसतो. मात्र आयुष्यात वास्तवात जगावे लागते बहुतांशवेळा हे वास्तव अतिशय कटू असते जंगलांबाबतचे वास्तवही कटूच आहे. तुम्ही एकीकडे जंगलांशी एकरूप होऊन त्या हिरवाईचे (गवताळ पट्ट्यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर पिवळे करडे) सौंदर्य शांतता अनुभवत असता तर दुसरीकडे तुम्हाला त्यांच्या विनाशाची मृत्यूची वेदनाही जाणवू लागते आणि  जंगलाच्या या वेदनेला तसेच मृत्यूला निसर्ग नाही तर माणूसच कारणीभूत आहे. त्याचवेळी जर अनेक माणसे जंगलांची शत्रू असतील (यातील काही कारणे खरी असू शकतात) तर काही माणसे अशीही आहेत की ती जंगलाचाच भाग आहेत त्यांची जंगलांशी मैत्रीही आहे. तुम्हाला कोणत्या माणसांमध्ये सामील व्हायचे आहे, जंगलांशी शत्रूत्व पत्करायचे आहे की जंगलांशी मैत्री करायची आहे याचा निर्णय पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे.

कुणीही माणूस उघडपणे जंगलांशी शत्रूत्व स्वीकारणार नाही किंवा तसे कबूल करणार नाही(अर्थात असे करणारेही काही आहेत) हे सांगायची गरज नाही, मात्र मी केवळ जंगलांचा मित्र आहे असे म्हणायचे काहीच करायचे नाही, असे केल्यानेही तुम्ही जंगलाचे खऱ्या अर्थाने मित्र होणार नाही, बरोबर? उदाहरणार्थ, तुम्हाला पोहता येत नसेल तुम्ही अपघाताने विहीरीत पडल्यास, तुम्ही आधी मदतीसाठी आरडाओरड कराल पाण्यातून बाहेर काढायला सांगाल. त्यानंतर तुम्हाला काठावर एक मुलगा दिसला तो तुमचा मित्र आहे किंवा तुम्हाला तसे वाटत असेल. म्हणून तुम्ही त्याला हाक मारली, त्या मुलानेही तुम्हाला प्रतिसाद दिला हात हलवला मात्र तुम्हाला विहीरीतून बाहेर काढण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत, तर त्यानंतरही तुम्ही त्याला तुमचा मित्र म्हणाल का? त्याचप्रमाणे जेव्हा जंगले जगवण्यासाठी मदतीचा प्रयत्न करण्याची वेळ येते तेव्हा अशा अनेक तथाकथित मित्रांचीही अशीच गत असते. सध्या अनेक गवताळ प्रदेशांचीही अशीच परिस्थिती आहे, ते अतिशय सुंदर आहेत, अनेक लोक त्यांना भेटी देतात, त्यांच्या सौंदर्याचे कौतुक करतात, काहींना त्यांच्यापासून फायदाही मिळतो, मात्र हे गवताळ प्रदेश टिकवण्यास मदत करण्यासाठी कुणीही काहीही करत नाही. याचे कारण एक म्हणजे त्यांची जंगलांशी मैत्री नाही दुसरे म्हणजे ते जंगलांमध्ये राहात नाहीत तर केवळ भेटी देतात. त्यामुळेच आपल्यामुळे या हिरव्या जगाला किती वेदना सहन करावी लागतेय हे त्यांना समजत नाही.

या गवताळ प्रदेशांकडे परत जायचे कारण म्हणजे, अलिकडेच माझी एक मैत्रीण हेमांगी, जी शहरी महिलांमध्ये वन्यजीवनाविषयी जागरुकता निर्माण करणारी जंगल बेल्स नावाची कंपनी चालवते, ती पुण्याच्या बाह्यभागात पूर्वेला असलेल्या गवताळ प्रदेशांमध्ये गेली होती तिला तेथे  एक लहान कानाचे घुबड दिसले तिने मला त्याविषयी सांगितले. मी काही पक्षी व प्राणी (वन्यजीवप्रेमींमध्ये आजकाल हे फॅड फारच प्रचलित आहे) नाही. खरे सांगायचे तर मी फक्त पक्षी पाहण्यासाठी, त्यांची छायाचित्रे काढण्यासाठी, तसेच ते ओळखण्यासाठी एखाद्या ठिकाणी जात नाही. मात्र मला कोणत्याही वन्यजीवन उपक्रमात सहभागी व्हायला किंवा अशा अधिवासांना भेट द्यायला आवडते (याला फक्त अपवाद अति थंड प्रदेशांचा). म्हणून, दुसऱ्याच दिवशी मी अमोल काळे नावाच्या स्थानिकासोबत त्या गवताळ प्रदेशांमध्ये गेलो. या तरूणाला गवताळ प्रदेशांविषयी अतिशय तळमळ आहे या भागांमध्ये पूर्णवेळ गाईड म्हणून काम करतो तसेच सहलींचे आयोजन करतो. अमोलसारख्या तरुणांमुळेचे वन्यजीव किंवा हे अधिवास टिकून राहतील, विशेषतः पुणे इतरही अनेक शहरातील नागरी वसाहतींभोवतालचे हे गवताळ अधिवास टिकून राहतील अशी आशा आहे. अमोल लोकांना या गवताळ प्रदेशांचे सौंदर्य दाखवून केवळ आपली उपजीविकाच चालवत नाही तर फावल्या वेळेत तो या गवताळ प्रदेशांचा अभ्यासही करतो, तसेच या अधिवासांचे इथे आढळणाऱ्या प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी आपल्यापरीने प्रयत्नही करतो.

आधी या गवताळ प्रदेशाला भेट देण्यामागचे कारण सांगतो त्यानंतर गवताळ प्रदेशांच्या संवर्धनामध्ये अमोलची भूमिका किती महत्त्वाची आहे हे समजावून सांगतो.

लहान-कानाचे घुबड घुबडांच्या काही मोजक्या प्रजातींपैकी आहे ज्या स्थलांतर करतात. हि घुबडे अतिशय लांबचा प्रवास करतात, विशेषतः अथांग पसरलेला समुद्र ओलांडून सुद्धा येतात. सर्व शिकारी पक्ष्यांप्रमाणे यांच्यातही मादी ही नरापेक्षा मोठी असते रोचक बाब म्हणजे ते जमीनीवर घरटे बांधतात. हे घरटे गवताळपट्ट्यांमध्ये बाभळीसारख्या काटेरी झाडाच्या तळाशी बांधलेले असते. हा पक्षी युरोपासारख्या अति शीत प्रदेशातून स्थलांतर करून येतो तरीही तो कच्छचे लहान रण (एलआरके) किंवा सध्या पुण्याच्या बाह्यभागात पूर्वेकडील गवताळ पट्ट्यातील शुष्क, कोरड्या उष्ण परिसरात तग धरू शकतो हे आश्चर्यच आहे.

मला ही सगळी माहिती नव्हती, मला अमोलने ती दिली. माझ्यासाठी लहान कानाचे घुबड ही केवळ घुबड नावाच्या प्रजातीची एक वर्गवारी होती, जे दिसायला अतिशय गोंडस दुर्मिळ असतात. म्हणूनच हेमांगीने मला जेव्हा त्याविषयी सांगितले, तेव्हा मी अमोलसोबत ते पाहण्यासाठी गेलो. वरकरणी ओसाड वाटणाऱ्या या लांबलचक निर्मनुष्य पट्ट्यामध्ये या घुबडांचे एक जोडपे राहत असलेले पाहून मला आश्चर्य वाटले. इथे माणसांची फारशी वर्दळ नसली काही माणसे इथे येत असावीत. कारण मला तशा काही गोष्टी तिथे आढळल्या. घुबडांच्या घरट्याशेजारीच एक भयंकर वास असलेले काळ्या पाण्याचे एक डबके होते. अमोलने मला सांगितले की ती जवळपासच्या साखर कारखान्यातून टाकण्यात आलेली मळी, म्हणजेच विषारी बाय प्रॉडक्ट होते तसेच, मला या भागातून इकडे-तिकडे धूळ उडवत जाणारे डंपरही (ट्रक) दिसले, जे जवळपासच्या दगडांच्या खाणीतून खणलेला मुरूम घेऊन जात होते. हा सगळा कोलाहल घुबडांसाठी अतिशय त्रासदायक आहे परंतु अधिकारी (म्हणजे वनविभाग) अमोल त्याच्या सारख्यांना घुबडांना त्रास देण्यासाठी दंड करतील,अर्थात त्यांना इथे घुबडे घरटी बांधता  येते हे समजले तरच, पण हाच आपल्या यंत्रणेतील विरोधाभास आहे. अमोलने मला सांगितले की तो कच्छचे लहान रण म्हणजे एलआरकेला गेला होता तेव्हा त्याने पहिल्यांदा लहान कानाचे घुबड पाहिले. त्याला तिथल्या गाईडकडून या अधिवासांविषयी, त्यांच्या वैशिष्ट्यांविषयी, तसेच ते कोरड्या गवताळ पट्ट्यांमध्ये काटेरी झुडुपांच्या तळाशी ते घरटी बांधतात हे समजले. यानंतर अमोलने

तो पुण्याच्या पूर्वेला बाह्य भागात राहतो तेथे अशा विस्तीर्ण जमीनींच्या पट्ट्यांवर भटकंती सुरू केली. एकदा असाच शोध घेत असताना, त्याला हा पक्षी येथे दिसला. वनविभागातील माझ्या मित्रांना दुखवायचा हेतू नाही, मात्र तुम्हाला असे वाटत नाही का की आपण केवळ जिल्हा पातळीवर एक किंवा दोन मानद वन्यजीव रक्षक ठेवण्याऐवजी अशा सर्व अधिवासांमध्ये मानद वन्यजीव रक्षकांचा संवर्गच तयार करू शकतो. म्हणजे त्यांनाही अशा कामातून थोडेफार पैसे मिळू शकतील. मला अमोलने सांगितलेली अजून एक अडचण म्हणजे त्याने कोणत्याही अवैध शिकारीला किंवा अशा ठिकाणच्या रहिवाशाच्या वावराला हरकत घेतली तरी त्याच्याकडे कोणताही अधिकार नाही. असे करणारे लोक त्याला हुसकावून लावतात किंवा तो पर्यटकांना असे गवताळ पट्टे दाखवून थोडेफार पैसे कमवतो हे त्यांना समजल्यावर त्याच्याकडे खंडणीही मागितली जाते.

अमोल सारख्या तरुणांचा एक सशक्त संघ बनवून, त्यांना त्यांची उपजीविका मिळवता येईल तसेच या अधिवासांच्या संवर्धनामध्ये मदतही करता येईल एवढे सक्षम बनविणे ही काळाची गरज आहे. आणखी एक मुद्दा म्हणजे अशा जागांचा व्यावसायिकदृष्ट्या वापर करणे. मला माहितीय या सूचनेमुळे अनेक तथाकथित निसर्गप्रेमींच्या कपाळावर आठ्या पडतील किंवा भुवया उंचावल्या जातील. पण आपल्याला इतर अधिवासातील असे गवताळ प्रदेश वाचवायचे असतील तर चाकोरीबाहेरचा विचार करावा लागेलयाचे कारण म्हणजे या गवताळ प्रदेशांना सभोवतालच्या माणसांकडूनच खरा धोका आहे मात्र या गवताळ प्रदेशामुळेच थोडेफार पैसे कमवता येतील हे जर त्यांना समजले तर हेच लोक त्यांचे संरक्षण करतील असा त्यामागचा साधा तर्क आहे वस्तुस्थितीही आहे.  एखाद्या दुर्गम ग्रामीण भागामध्ये लोकांना उपजीविका उपलब्ध व्हावी यासाठी सरकार मोफत जमीनी, कर सवलती, स्वस्त वीज पाणीपुरवठा देऊन अशा जागी उद्योगांना पाठिंबा देते. त्याचप्रमाणे,अशा गवताळ प्रदेशांसारख्या आधिवासाजवळही आपण निसर्गोपचार केंद्र किंवा एखाद्या सर्व सुखसोयींनीयुक्त रिसॉर्टचा विचार का करू शकत नाही, ज्यामुळे अधिक पर्यटक येथे येतील तसेच अमोलसारख्या स्थानिकांना उपजीविकेचे एक चांगले साधनही मिळेल, लोकहो याविषयी नक्की विचार करा. अशाप्रकारची रिसॉर्ट पाहण्यासाठी केवळ जवळपासच्या शहरातूनच नाही तर देशभरातून पर्यटक येतील. विचार करा एखादया रात्री खुले गवताळ पसरलेले रान, वर पहिले तर चांदण्यांनी भरलेले आकाश, आणि लांबून येणारी लांडग्यांची आरोळी , मानेवरचा केस उभे करणारा असा तो तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम अनुभव नसेल का? मात्र मी पैज लावतो, हा अनुभव तुम्ही कधीच विसरू शकणार नाही.

माझा हा लेख वरकरणी केवळ गवताळ प्रदेशांविषयी  असला तरीही आपल्या सर्व स्वरुपातील निसर्गाच्या प्रत्येक तुकड्याची अशीच परिस्थिती आहे, ज्यांना आपण जंगले किंवा अधिवास असे म्हणतो. तसेच प्रत्येक अमोल काळेचीही हीच कथा आहे, जे या जंगलांच्या संवर्धनासाठी झटताहेत; त्यांना मदत करण्यासाठी आपणही हातभार लावला पाहिजे तरच आपण स्वतःला वन्यजीवप्रेमी म्हणू शकू!


 

You can read in English:

http://visonoflife.blogspot.com/2022/04/saving-grasslands-short-eared-owl.html

 

 

संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

smd156812@gmail.com

 
















No comments:

Post a Comment