Saturday 13 August 2022

स्वात्रंत्त्याची ७५ वर्ष आणि घर घेण्याचे स्वातंत्र


                                                                                  


                                                                                  

                                                                                   

                                                                                   


                                                                                     

                                                                                  

                                                                                          

                                                                                     





                                                                                  

                                                                                 


 



स्वात्रंत्त्याची ७५ वर्ष आणि घर घेण्याचे स्वतंत्र



स्वातंत्र्याचा अर्थ तुम्ही हवे ते करण्यासाठी मुक्त आहात असा होत नाही, याचा काही भाग खरा असला तरीही, स्वातंत्र्य म्हणजे आपली समाजाप्रती जबाबदारी समजून घेणे कारण जबाबदारीच्या जाणिवेशिवाय स्वातंत्र्य व्यर्थ आहे” … मी. (हाहाहा)

 

माफ करा, मी स्वतःचे विचार सुविचार म्हणून वापरण्याइतका महान नाही, मात्र आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजेत ७५ वर्षे साजरी करतोय, आणि माझे मत व्यक्त करताना स्वतःचेच शब्द वापरण्याचा विचार केला (त्याला सुविचार म्हणता येणार नाही). सर्वप्रथम सांगायचा मुद्दा म्हणजे, हा लेख आपला एक देश म्हणून अथवा एक समाज म्हणून उदोउदो करण्यासाठी किंवा नावे ठेवण्यासाठी नाही. तसेच या दिवसासाठी स्वतःचेच अभिनंदन करण्यासाठीही नाही. आपल्याला (म्हणजे मला) आपल्या देशाचा अभिमान नक्कीच आहे, आपले स्वातंत्र्य व देशाची कामगिरी आपल्याला अतिशय आनंद देऊन जाते. मात्र प्रत्येक व्यक्तीच्या त्याच्या किंवा तिच्या देशाप्रती याच भावना असतात किंवा असणे अपेक्षित असते, त्यात काही विशेष नाही. स्वातंत्र्य साजरे करणे हा मुद्दा नाही, तर स्वातंत्र्य म्हणजे काय हे समजून घेणे तसेच आपल्याला त्याचा जो अर्थ समजला आहे त्याचे आपण काय केले याचे विश्लेषण करणे आवश्यक आहे, हे माझ्या लेखाचे सार आहे. माझा असा अजिबात दावा नाही की मला तो अर्थ समजला आहे व मी या देशाचा आदर्श नागरिक आहे, मात्र मी तसे होण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो, मी अधिक चांगला नागरिक होण्यासाठी माझ्यातल्या उणीवा कमी करू शकतो, बरोबर? तुम्हाला हा तत्वज्ञानाचा डोस जरा अति होतोय असे वाटत असेल तर माझा नाईलाज आहे. कारण स्वातंत्र्य व जबाबदाऱ्या यासारखा गुंतागुंतीचा विषय असतो तेव्हा तत्वज्ञानही थोडेसे गुंतागुंतीचे असणारच. विशेषतः आपल्या देशवासियांना काहीही साजरे करायचे म्हटले (मग तो स्वातंत्र्यदिन असो किंवा कोणत्याही महापुरुषाची जयंती) की लाउडस्पीकरच्या मोठमोठ्या भिंतीवर लावलेले कानठळ्या बसविणारे संगीत वाजवणे व बुलेटवरून (बंदूक नव्हे तर कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाचे इंजिन असलेली दुचाकी) मोर्चे काढणे एवढेच माहिती असते. किंबहुना जेवढा गोंगाट अधिक तेवढे काहीही साजरे करण्याच्या कारणाविषयी प्रेम, जिव्हाळा (म्हणजेच देशप्रेम) अधिक असे मानले जाते. मला खात्री आहे की १५ ऑगस्ट २२ हा दिवसही याला अपवाद नसेल.

 

नेमकी इथेच स्वातंत्र्याची संकल्पना समजून घेणे महत्त्वाचे ठरते. मात्र तत्पूर्वी आपण देश म्हणून ७५ वर्षांतील घटनाक्रमावर दृष्टिक्षेप टाकू. मी आता वयाची ५० वर्षे ओलांडली आहेत त्यामुळे या देशाच्या ७५ वर्षांच्या स्वातंत्र्याच्या प्रवासातील २/३ भागाचा मी साक्षीदार आहे. मला तुम्हाला सांगावेसे वाटते की हा प्रवास थक्क करणारा आहे, कारण मला स्वस्त धान्याच्या दुकानामध्ये, शिधापत्रिका आणि कापडी पिशवी घेऊन, १ किलो साखर, ३ किलो गहू घेण्यासाठी रांगेत उभे राहिल्याचे आठवत आहे. मला दिवसभर स्लिपर (रबरी चपला) घातल्याचे आठवते आहे, म्हणजे शाळेमध्ये, क्रिकेट खेळायला, कौटुंबिक कार्यक्रमांसाठीही एकच चपलाचा जोड वापरल्या जात असे.मला वडिलांची लूना पेट्रोल भरण्यासाठी घेऊन गेल्याचे आठवते आहे जे तेव्हा ३ रुपये लिटर होते. मला आठवतेय आम्हाला तेव्हा वर्षातून केवळ एकदा दिवाळीला स्थानिक शिंप्याने शिवलेल्या कपड्यांचा एक जोड मिळत असे. मला आठवते आहे की मला माझा बीईचा (म्हणजे अभियांत्रिकीचे शेवटचे वर्ष) निकाल माझ्या पालकांना सार्वजनिक बूथवरून एसटीडी करून कळविण्यासाठी कर्वे रस्त्यावरील टेलीफोन एक्स्चेंजमध्ये ३ तास वाट पाहावी लागली होती. मला बिनाका गीत माला ऐकण्यासाठी आमच्या रेडिओचा जाळीदार अँटेना अड्जस्ट केल्याचे पण आठवतेय, तेव्हा हा कार्यक्रम सिलोन स्टेशनवर आठवड्यातून एकदा प्रसारित होत असे व बॉलिवुडमधली ताजी लोकप्रिय गाणी ऐकण्याचे ते एकमेव माध्यम होते. अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या ४०हून अधिक वयाच्या पिढीला आठवत असतील किंवा आपल्याशा वाटत असतील!

आता माझी हीच पिढी आज १ लाख रुपयांचा आयफोन १३ प्रो वापरते (मी, आयफोन वापरत नाही, केवळ एक उदाहरण देतो आहे), या फोनची जेवढी किंमत आहे तेवढ्या पैशात एका कुटुंबाला सहा महिने काढता येतील. तुम्हाला आजकाल पालकांना तुमचा निकाल कळविण्यासाठी ३ तास रांगेत उभे राहावे लागत नाही तर एका मिनिटात तो अख्ख्या जगाला कळतोमला आजकाल फारसे लोक साखर किंवा गव्हासाठी रांगेत उभे राहिलेले दिसत नाहीत, तर एखाद्या ॲपवर किंवा ॲमेझॉन किंवा डंझोने मागवून घेताना दिसतात. साखर किंवा गहूच कशाला, तुमच्यासाठी अतिशय उत्तम तयार जेवण ऑर्डर केल्यानंतर तासाभरात दारात हजर होते! आता कोणत्याही मुलाला चित्रपट संगीत ऐकण्यासाठी रेडिओ किंवा टीव्हीच्या अँटेनाशी झटापट करावी लागत नाही, तर केवळ एका क्लिकवर ती ऐकता किंवा पाहता येतात. तुम्हाला आता अस्वच्छ रेल्वे फलाटावर गाडी येण्याची वाट पाहात तासन् तास उभे राहावे लागत नाही व आता विमान प्रवास केवळ काही उच्चभ्रू प्रवाशांपुरताच मर्यादित राहिलेला नाही तर अगदी मध्यमवर्गीय शिक्षक कुटुंबालाही (जसे माझे होते) विमान प्रवास परवडतो. अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या माझ्या पिढीला आठवतात व त्या आठवल्यावर ते काहीतरी वेगळे आयुष्य किंवा दुसऱ्या एखाद्या ग्रहावरचे जीवन असल्यासारखे वाटते, एवढा बदल गेल्या ७५ वर्षात झाला आहे. प्रचंड मर्यादा व आव्हाने असूनही, आपला देश अलिकडच्या मानवी इतिहासातील सर्वात वाईट शत्रूचा सामना करतानाही, म्हणजेच कोव्हिड विषाणूविरुद्ध लढताना टिकून राहिला व ही निश्चितच सर्वात मोठी कामगिरी आहे जिचा आपल्या सर्वांना अभिमान असला पाहिजे.

जीवनशैलीमध्ये बदल होणे स्वाभाविक आहे कारण आपला देश केवळ टिकूनच राहिला नाही तर समृद्धही झाला आहे. माझ्यासारख्या लोकांनी ही भरभराट केवळ पाहिलीच नाही तर त्याचा लाभही घेतला आहे. हे खरोखर आपल्यापैकी प्रत्येकाचे यश आहे कारण एक गरीब देश ज्याच्याकडे एकेकाळी फार मोठा सुशिक्षित वर्ग किंवा मदतीला तंत्रज्ञान नव्हते तो आज अनेक बाबतीत जगातील सर्वात विकसित देशांच्या तोडीस तोड आहे. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना, आपण अनेक आघाड्यांवर उल्लेखनीय कामगिरी केली असली तरीही, इतर अनेक आघाड्यांवर आपल्याला बरेच काही साध्य करायचे आहे. आजही लाखो लोकांना वैद्यकीय सुविधा, शिक्षण किंवा पिण्याचे दर्जेदार पाणी यासारख्या अनेक मूलभूत सुविधा नाहीत व सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडे राहण्यासाठी सर्व पायाभूत सुविधा असलेले चांगले घर नाही. मला असे वाटते की आपण हा १५ ऑगस्ट आपल्या देशाच्या अमृत महोत्सवी प्रवासातला मैलाचा दगड मानत असू तर इथून पुढे सर्व पायाभूत सुविधा असलेल्या घराचा हक्क असणे. हा इथून पुढे मुख्य कार्यक्रम असला पाहिजे. मी एक बांधकाम व्यावसायिक म्हणून हे म्हणत नाही तर प्रत्येक कुटुंबाला पायाभूत सुविधा असलेले एक चांगले घर देऊन आपण समाजाशी संबंधित अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे देऊ शकू जे आपल्याला कित्येक दशकांपासून भेडसावत आहेत.

प्रत्येकाला पायाभूत सुविधा असलेले एक चांगले घर देण्यातील पहिले आव्हान म्हणजे आपली लोकसंख्या नियंत्रित करणे. एकीकडे आपली १४०-कोटी लोकसंख्या आपल्यासाठी वरदान आहे किंवा आपल्या देशाचे बलस्थान आहे तर दुसरीकडे या १४० कोटी लोकांना जागा देणे (म्हणजे घराच्या स्वरूपात) हे अगदी देवालाही अवघड जाईल. कारण मी जेव्हा पायाभूत सुविधा असलेले चांगले घर म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ पुरेसे पाणी, पुरेसा वीज पुरवठा, सांडपाण्याची व्यवस्था, वाहतुकीची योग्य ती सोय, शाळा, तसेच आरोग्य सुविधाही सोबत असल्या पाहिजेत. या सर्व आघाड्यांवर आपली कामगिरी उल्लेखनीय म्हणण्यासारखी नाही, ही वस्तुस्थिती आहे. काही मूठभर नशीबवान लोकांकडे घराच्या रूपाने या सर्व बाबी असतात ज्या मात्र उर्वरित अनेकांकडे त्या नसतात. म्हणूनच, संपूर्ण देशभर अवैध घरांचे (झोपड्यांचे) पेव फुटलेले आहे. कारण आपल्यापैकी प्रत्येकालाच दिवसाअखेर विश्रांतीसाठी निवारा हवा असतो. त्यामुळे घर ही आयुष्यातील मूलभूत व सर्वात महत्त्वाची गरज आहे. यात अडचण म्हणजे घरांसाठीची जमीन मर्यादित आहे किंवा मोजकीच आहे, आपण जमीन वाढवू शकत नाही. आपण जमीनीची क्षमता वाढवू शकतो, मात्र ते सुद्धा ज्या जमीनींची घरे बांधण्याची मूलभूत क्षमता आहे त्याच जमीनींवर शक्य आहे. याचाच अर्थ असा होतो की उपलब्ध जमीनीची बांधकाम क्षमता काहीही असली तरीही, ती जमीन राजस्थानच्या वाळवंटामध्ये असेल किंवा लेहच्या पर्वतांमध्ये असेल, तर अशा जमीनीचा काही उपयोग आहे का? याचे उत्तर नाही असेच आहे, कारण लोकांची जिथे नोकरी, शिक्षण, उपजीविकेचे साधने असतील, फार समृद्ध नाही परंतु किमान राहण्यासाठी योग्य वातावरण असेल तिथे लोकांना घरे लागतील. अशा जमीनी मर्यादित आहेत, अशा जमीनी मर्यादित आहेत ज्यामुळे चांगल्या घराच्या हक्काची अमलबजावणी करणे अतिशय अवघड होते.

तसेचमायबाप सरकारनेहीप्रत्येकासाठी घर अशाप्रकारच्या घोषणा देण्याऐवजी ते प्रत्यक्षात साकार करण्याच्यादृष्टीने पावले उचलली पाहिजेत. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की, जे सरकार इतर  सर्व उद्योगांना जमीन, पाणी, रस्ते, वीज यासारख्या पायाभूत सुविधा मोफत किंवा अत्यल्प दरामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ती धोरणे तयार करते, तेच सरकार पाणी, विकासकांनी ये-जा करण्यासाठी रस्ते व सांडपाणी (व इतरही अनेक बाबी) यासारख्या पायाभूत सुविधा घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या खर्चाने उपलब्ध करून द्याव्यात यासाठी रिअल इस्टेट उद्योगावर (म्हणजे बांधकाम व्यावसायिकांवर) मात्र अटी घालते (म्हणजे बळजबरी करते). इथे केवळ सरकारनेच नव्हे संपूर्ण समाजाने (माध्यमातील लोकहो वाचताय ना?) पुढे आले पाहिजे व प्रत्येकाला त्याच्या किंवा तिच्या गरजेनुसार चांगली घरे उपलब्ध करून देण्यातील प्रत्येक अडसर दूर होईल याची खात्री केली पाहिजे. ७५ वर्षात, आपण आपल्यापैकी प्रत्येकाला वाहन देऊ शकलो आहोत, तसेच सेल फोनसुद्धा देऊ शकलो आहोत, अन्नही उपलब्ध करून देऊ शकलो आहोत. मात्र प्रत्येकजण त्याच्या किंवा तिच्या इच्छेप्रमाणे घर खरेदी करण्यास स्वतंत्र नाही. म्हणूनच आपण जीवनाच्या सर्वात मूलभूत गोष्टीत स्वतंत्र झालेलो नाही, ते म्हणजे घर खरेदी करणे. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्ही मी माणसांसाठी चांगले घर असे म्हणतो तेव्हा निसर्गाचाही त्यामध्ये समावेश करणे व वाघापासून ते चिमणीपर्यंत इतर सर्व प्रजातींना त्या घरात जागा देणे ही आपली जबाबदारी आहे. एक चांगले घर, चांगले नागरिक घडविण्यात मोलाची मदत करते ज्यामुळे परिणामी आपल्या देशाचे भवितव्य बदलू शकते, बरोबरम्हणूनच, जेव्हा आपण १५ ऑगस्ट २२ रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करू, तेव्हा प्रत्येक नागरिकाला घर खरेदी करण्याच्या बाबतीतही स्वातंत्र्य मिळेल अशी शपथ घेऊ. नाहीतर जेथे बहुतेक नागरिकांना रस्त्यावर किंवा अवैध घरांमध्ये झोपावे लागते, व दुसऱ्या दिवसाची, म्हणजेच १६ ऑगस्ट २२ची काळजी करत जग येते, तेव्हा अशा वेळी देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य महोत्सव साजरा करून काय उपयोग आहे, हे लक्षात घ्या!

संजय देशपांडे

संजीवनी  डेव्हलपर्स

ईमेल - smd156812@gmail.com

you can read our english version @link below.

https://visonoflife.blogspot.com/2022/08/

 



No comments:

Post a Comment